Hi Anokhi Gaath - 6 in Marathi Love Stories by Pallavi books and stories PDF | ही अनोखी गाठ - भाग 6

The Author
Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

ही अनोखी गाठ - भाग 6

भाग - ६



I am really sorry माझा तो intension नव्हता......मी जास्तच बोलून गेलो......

It's ok ती खाली मान घालतच चॉकलेट खात म्हणाली....तिचं खाऊन झाल्यावर नंतर त्यानी lights off केले.....
तिलाही चॉकलेट खाल्लयानी आता जरा बरं वाटायला लागलं होतं त्याने तिला बेडवर नीट झोपवलं आणि तिच्या अंगावर blanket टाकली.....
त्याची काळजी पाहून हर्षालाही छान वाटलं.....

पुढे........

सकाळी हर्षाला जरा उशीराच जाग आली.....शिवम मिरर मध्ये बघून त्याचे हेअर सेट करत होता....त्याला मिरर मधुन हर्षा उठलेली दिसली...‌तो तिला न बघताच म्हणाला........
" Are you feeling better now?" शिवम

"ह..हो.....आता ठिक आहे ती खाली मान घालतच उठून बाथरुममध्ये फ्रेश व्हायला गेली.....

थोड्यावेळाने हर्षा खाली आली........ खाली कोणीच नव्हतं सगळे आपापल्या कामाला निघून गेले होते हेच दिसत होतं

तेवढ्यात कुसुम तिथे आली ......काय गं हर्षा बरं नाही वाटत का बाळा कुसुम तिचा चेहरा न्याहाळत बोल्ली.......

" काही नाही आई ते पिरियडस् आले आहेत म्हणून थोडं थकवा वाटत आहे आणि म्हणूनच उशिरा उठले"हर्षा

" काही हरकत नाही आता बरं वाटतंय ना.........तु नाश्ता करून घे आणि आराम कर ठिके.....कुसुम

हर्षाने नाश्ता केला आणि तिच्या रूम मध्ये गेली तिने लगेच माधवीला कॉल केला....

"हॅलो मम्मी "

"बोल सोनू काय करतेयस"

"पडलेय गं मम्मी बेडवर....पिरीयडस आले आहे म्हणून आईंनी आराम करायला सांगितला आहे...."

सोनू काळजी घे हा बाळा तुला खुपच त्रास होतो ना........नीट जेवत जा आणि बाळा तिथं तुझी काळजी तुच घे सोना....

हो मम्मी मी तर घेतेच आई पण माझी खुप काळजी घेतात....पण इथे खुपच बोर होतं ग मला.... हर्षा

आता तुला आयुष्यभर तिथेच राहायचे आहे बाळा तेच तुझं विश्व आहे...... आणि तुझ्या कॉलेजच काय झालं .... माधवी

कालच डॉक्युमेंट्स दिले गं आता बघू कधीपासून start होईल काय माहित...
थोडंफार बोलून हर्षाने फोन ठेवून दिला..... आणि थोडावेळ झोपी गेली....
शिवम आज घरी लवकर आला.......तो त्याच्या रुम मध्ये गेला... हर्षाला दरवाजा उघडण्याच्या आवाजाने जाग आली ती तशीच उठली.....
शिवम ने एक नजर तिच्यावर टाकली आणि बाथरुममध्ये फ्रेश व्हायला गेला.....

"आत येऊ का......." कुसुम हसत येत म्हणाली

आह.....आई तुम्ही असं का विचारता याना....... हर्षा

अगं हर्षा मी जेवायला बोलवण्यासाठी आले होते ....कितीवेळ आवाज दिला पण तु काय उठलीच नाही ...मग मला पण तुला काय उठवू नाही वाटले....जा आता फ्रेश हो मी तुला काहीतरी खायला देते .....तुझं आवरलं का खाली ये हा..... कुसुम निघून गेली

हर्षाला तर खुपच ऑकवर्ड वाटत होतं तिची सासू तिला तिच्या आईप्रमाणेच जपत होती तिची येवढी काळजी घेत होती आणि आपण नुसतं एक आरामच करतोय.हे तिला पटतच नव्हतं........
शिवम बाथरुममधून बाहेर आला...... हर्षा गप उठून फ्रेश व्हायला गेली
काही वेळातच ती बाहेर आली....शिवम बेडवर बसून लॅपटॉप वर काम करत होता......

शिवमने एक envelope हर्षा समोर देत " हे धर ॲडमिशन झालं आहे उद्या पासून आदिती सोबत जाउ शकतेस...."

हर्षाची तर कळीच खुल्ली तिने हसतच तो envelope घेतला
"Thank you so much....."हर्षाने एक क्यूट स्माईल दिली

शिवमने हर्षाला पहिल्यांदाच हसतानी पाहीले होते......त्याने ही एक स्माईल दिली आणि त्याच काम करु लागला......

हर्षा आदितीला सांगायला तिच्या रुममध्ये निघुन गेली....
आदिती माझं ॲडमिशन झालं हे बघ‌..... हर्षा तिला तो एनव्होलप दाखवत हसत म्हणाली....

"येययय...वहीनी आता आपण एकच कॉलेज मध्ये सोबत जाणार....वॉव खुप मज्जा येईन" आदिती तिला मिठी मारतच ओरडू लागली....नंतर दोघी जणी खाली जातात ......

आई माझं ॲडमिशन झालं.‌‌..... हर्षा कुसुमला आनंदाने सांगू लागली

कुसुमनेही हसुन प्रतिसाद दिला.....चल आधी खाऊन घे बाळा मग तुला जे कॉलेजसाठी साहित्य लागेल ते घ्यायला जा.....आदु हे घे तु पण खा थोडस

"हो मम्मा"आदीती

कुसुम शिवमच्या रुममध्ये जाते.....

अरे शिवम एक ना बाळा हर्षा आणि आदुला घेऊन जा सोबत हर्षासाठी कॉलेजसाठी जे काय लागेल ते साहित्य आता तिची जबाबदारी आपलीच आहे न ती तर काय बोलणार नाही म्हणून तिला काय हवं ते नको ते आपल्यालाच पाहावं लागेल तुझं झाल्यावर दोघींना घेउन जा ठिके...

"ओके"शिवम

कुसुम निघून गेली.....

शिवम नंतर खाली आला....दोघीही त्याच्यासोबत जाउ लागल्या....
शिवम ने गाडी काढली....हर्षा आदिती सोबतच मागे बसायला गेली.......दोघी मागे बसलेल्या पाहून शिवम म्हणाला

"मी काय तुमचा ड्रायव्हर नाही आहे...."

"वहीनी अगं तु पूढे बसना........ हर्षा तसच घाबरत पुढे बसली

"सीटबेल्ट लाव " शिवम

" आ...ह..हा लावते " हर्षा सिट बेल्ट लावायचा प्रयत्न करते पण तिला ते जमतच नव्हतं.... काय देवा याला पण आताच लागायचं नव्हतं का त्यांना काय वाटेल हिला साधं सिट बेल्ट पण लावता येत नाही देवा काय यार तु माझ्याच मागे लागलाय ती मनातच बडबड करु लागली.....नंतर ती एक नजर शिवम कडे टाकते......तो तिलाच पाहत होता...ती जरा गडबडलीच
तो लगेच तिच्याकडे झुकला आणि तिचा सिट बेल्ट लाऊ लागला......त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या खुपच जवळ होता आणि त्याच्या परफ्यूम चा smell तिला वेडं करत होता ती तिचा श्वास रोखून धरत होती......पण त्याचे श्वास तिला जाणवत होते........ नंतर त्याने बेल्ट लावून गाडी स्टार्ट केली........शिवम आणि हर्षा दोघं शांतच होते पण आदितीची बडबड चालुच होती.....

" काय वहिनी तु किती शांत बसलेय मीच एकटी बडबडतेय......तु तर कोणी नसताना माझ्यासोबत किती बडबड करते हे न ते काय काय ....आता काय झालय शांत बसायला ती एक नजर शिवम कडे पाहते.....ओह् दादामुळे तु शांत आहेस काय....हर्षा तर मनातुनच कपाळावर हात मारुन घेते तिला तर काय बोलावं समजतच नाही ती शिवम कडे एक नजर टाकते......पण शिवम एकदम निर्विकार चेहरा ठेवत गाडी चालवत असतो.......

थोड्यावेळाने ते एका मॉलमध्ये येतात.......आदीतीची शॉपिंग चालु होते
हर्षा फक्त तिला जे हवं तेच घेते........ आदिती मात्र भरभरून शॉपिंग करते

वहीनी अगं काय घेतलयस तु काहिच नाही हे तर काहीच नाही याला कोण शॉपिंग बोलतं....... तुझ्यासाठी तुला जे हवं ते घेणा....... चल मी तुला नेते तु तर स्वतःहून काहीच नाही घेणार....... आदिती च्या आग्रहाखातर हर्षा थोडीफार शॉपिंग करते .......खरंतर तिला खुपच ऑकवर्ड वाटत असते पण आता आदितीपूढे कोणाचं काय चालतं काय....... थोड्यावेळाने आदिती शिवमला कॉल करुन बोलावते आणि तो येतो व बिल पे करतो.........नंतर ते तिघं एका रेस्टॉरंट मध्ये जातात........

आदीती गाडितुन उतरतच म्हणते...."वहीनी हे बघ हे आपलंच रेस्टॉरंट आहे अजून खुप रेस्टॉरंट आहेत त्यातलच हे एक आपलं आहे..... "आदिती

तिघेही डिनर करुन घरी जायला निघतात.... थोड्यावेळातच ते घरी पोहोचतात.‌‌.....हर्षा तिचं चेंज करून माधवी ला कॉल केला थोडं बोलुन तिने फोन कट केला आणि तिच्या मोबाईल मध्ये अलार्म लावुन झोपी गेली..........

*************************

सकाळी ५ वाजता हर्षानी लावलेला अलार्म वाजला.........तरी तिचा उठायचा पत्ता नव्हता त्या अलार्म मुळे मात्र शिवम ला जाग आली.....तो अलार्म बंद व्हायचं नाव घेत नव्हता......शिवम ने रागातच तो अलार्म बंद केला आणि झोपून राहिला......परत अर्ध्या तासानी तो अलार्म वाजला तरी
मॅडमचा अजून उठायचा पत्ता नव्हता......शिवमला परत जाग आली त्याने रागातच तिचा मोबाईल घेतला आणि अलार्म बंद करायला घेतला..... हर्षाने अशे सात आठ अलार्म लावुन ठेवले होते......शिवम ते पाहून तर वैतागला आणि सगळे अलार्म बंद केले

"किती विचित्र आहे ही मुलगी येवढे अलार्म कोणी लावतं का...?? दुसऱ्यांची झोप मोडून खुशाल झोपलेली आहे "

शिवम तसाच वैतागत उठुन फ्रेश व्हायला गेला.......

थोड्यावेळाने हर्षाला जाग आली ती दचकून उठली रुममध्ये कोणीच नव्हते घड्याळात ७ वाजलेले.....बापरे येवढे अलार्म लावुन पण मला जाग नाही आली आज कॉलेजचा फर्स्ट डे आणि त्यात उशीर तर अजिबात नको व्हायला ती पळतच बाथरुमकडे वळाली..... लगेच ती आवरुन बाहेर आली व्हाईट सिगारेट पॅन्ट त्यावर 3-4 साईजची स्लीव्हज् असलेली रेड कलरची कुर्ती आणि फ्लॅट सॅन्डल.....गळ्यात नाजुकसं मंगळसूत्र........केस मोकळे सोडलेले कपाळावर नाजुकशी टिकली...... मेकअप च्या नावाने फक्त रेड कलरची लिपिसटिक आणि काजळ.......खुपच सुंदर दिसत होती... तीचं आवरुन ती खाली आली...

खाली सगळेजण नाश्ता करायला बसले होते....

"हर्षा ये पटकन नाश्ता करून घे..." कुसुम

हर्षा आदितीच्या जवळ बसुन नाश्ता करते

"आदु हर्षाला सगळं नवीनच आहे त्यामुळे तिला नीट समजावून सांग हा "
शरदराव

"हो डॅड वहिनीला मी सगळं नीट समजावून सांगते " आदिती नाश्ता करत म्हणाली.....

अनिता रागातच हर्षा कडे पाहत होती.......आणि हर्षालाही ते जाणवतच होतं पण तीने पुन्हा दुर्लक्ष केले.......

" वहीनी तु पण आता कॉलेजला येणार....मगतर खुपचं मज्जा....." नील

"ये काय मज्जा 12 th boards आहेत तुझे नीट अभ्यास कर आधी......आता 1 वर्ष तरी नो मज्जा....आदींती नीलच्या डोक्यात एक टपली मारत म्हणते..... आणि पळत सुटते नील पण तिच्या मागे तिला मारायला पळतो..... दोघांची पकडापकडी चालू होते.... हर्षा दोघांना पाहुन हसते.....

"अरे ये काय लहान आहात काय असं मस्ती करायला चला आवरा पटकन "सुशिला बाईं दोघांना दटावत म्हणाल्या....

"काय आज्जु दिदुनी मला आधी मारले .....ती नेहमीच मला त्रास देत असते नील रागातच तीला पाहु लागला....

"अरे असं बघू नकोस जा आवर नाही तर अजून बदडेल तुला...... "आदींती नीलला चिडवत म्हणाली

तेवढ्यात शिवम खाली आला एक नजर हर्षाकडे टाकली आणि नाश्ता करायला बसला......
नील लगेच शिवम जवळ जाऊन बसला"Bro ही बघना नुसतं त्रास देत असते मला ....."नील

"ये जा दादाचा चमचा....आला मोठा bro ला नाव सांगणारा"आदीती

"आदु आवर बरं पटकन खुप झाली मस्ती परत तुम्हालाच लेट होईल......" कुसुम

हर्षा सगळ्यांच्या पाया पडून कॉलेज ला जायला निघते.....
दोघीही कॉलेज मध्ये येतात.......आदीती हर्षाला सगळं सांगते तिचा क्लास दाखवते तिचा सेक्शन कुठे आहे ते सगळं सांगते आणि तिच्या क्लास मध्ये निघून जाते......

***************************
क्रमशः

©® ~ पल्लवी

स्टोरी कशी वाटतेय ते नक्की सांगा.......😊