दुसऱ्या हातात तिचा... फोटो " कुठून पण शोधून काढा पण मला ही मुलगी हवी आहे..." तो
पण तीच नाव काय होत..... " किट्टू??? " नाही नाही हे तर मी ठेवलेल निक नेम आहे.. तीच नाव तर
" मा.....
तो बोलणारच होता कि तो थांबला... " मला ही मुलगी हवी आहे. "
एवढच बोलून तो थांबला.
******************
मिष्टीने विराजच्या केबिन डोअर वर नॉक केलं.
आतून कम इन आवाज आल्यावर ती दार उघडून आत गेली.
" सर तुम्ही मला बोलवलं??" मिष्टी नम्रपणे त्याच्या समोर उभी राहत म्हणाली.
" हो....तुमच्याशी जरा बोलायचं होत....बस ना." विराज समोरच्या खुर्चीकडे इशारा करत म्हणाला.
" हा प्रोजेक्ट संपल्यावर तुम्हाला ती कंपनी सोडावी लागेल."
" पण का??" मिष्टी शॉक होत विचारत होती.
" ह्या प्रोजेक्ट पुरत दोन कंपनी एकत्र आल्या आहेत पण आम्ही रायवल कंपनी आहोत मार्केट मध्ये.... माझीच बायको तिकडे काम करत असेल तर हे बरोबर नाहीये." विराज स्पष्टीकरण देत म्हणाला.
" सर सॉरी टू से पण तुम्हीच सांगितल आहे की आपल लग्न झालेलं कोणालाही कळणार नाही आणि खूप मेहनती नंतर मला कंपनी मध्ये ही पोझिशन मला मिळाली आहे....मी अशी कशी सोडून देऊ??....मान्य आहे तुम्ही माझ्या भावाचा शिक्षणाचा खर्च उचलेन म्हणालात पण माझीही काही जबाबदारी काही कर्तव्ये आहेत ती अशीच मी दुर्लक्षित करू शकत नाही."
" मिसेस. मिष्टी विराज जहागीरदार तुम्हाला ती नोकरी सोडावी लागेल..... विषय संपला....तुम्ही येऊ शकता." तो परत त्याच लक्ष laptop कडे वळवत म्हणाला.
" अहो...."
" मिष्टी परत कामाला लागा." ती पाय आपटतच बाहेर निघून गेली आणि कामाला लागली.
मीरा घरी येण्याची वेळ झाली तस तिने तीच काम आवरत घेतल.
ती निघणार तेवढ्यात मागून अविनाश ने तिला थांबवलं.
" मिष्टी एवढ्या लवकर निघालीस??" तो घड्याळात बघत म्हणाला.
" ते....हो.....ते जरा काम आहे." मिष्टी.
" आजच आलीस ना तरीही??" अविनाश कपाळावर आठ्या पाडत म्हणाला.
" हो...."
ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिचा ड्रायव्हर कम बॉडीगार्ड तिच्याजवळ आला.
" मॅडम कार रेडी आहे."
" हो...आलेच."
"अविनाश सर मी निघते आता....उद्या बोलते मी तुमच्याशी." म्हणत मिष्टी निघून ही गेली.
*************
ती घरी पोहोचली आणि थोड्याच वेळात मीरा ही आली......तीच्यातच तिचा वेळ निघून गेला.
विराजने सांगितलेली गोष्ट ती विसरूनही गेलो होती.
रात्री सगळ आवरून झाल्यावर तिने मिराला झोपवलं आणि त्यांच्या रूम मध्ये आली....विराज अजून आला नव्हता.
तिने क्लोसेट मध्ये जाऊन नाईट ड्रेस घालायला घेतला.
तेवढ्यात मागून दार उघडलं गेलं.... मिष्टीने पटकन अंगात टी - शर्ट चढवला.
" सॉरी.... सॉरी.....मला माहिती नव्हत." विराज क्लोसेटच दार पटकन लावत म्हणाला.
ती बाहेर आली तसा तो आत जाऊन फ्रेश होऊन आला.
" ते मला माहिती नव्हत तू रूम मध्ये आहेस...मला वाटल मीरा कडे आहेस."
" इट्स ओके." ती स्मित हास्य करत म्हणाली.
" तू बोललीस का ??" विराज बेडवर बसत म्हणाला.
" काय??"
" ते जॉबच अविनाशशी ?"
" अहो पण हे खरच करण जरूरी आहे का?? मी माझं लग्न झाल आहे कोणालाच नाही सांगणार."
" एक मिनिट.....आपल लग्न झालंय कोणाला सांगायचं आणि कोणाला नाही हा प्रश्नच नाहीये इथे......तुझी सेफ्टी इंपॉर्टन्ट आहे आता माझ्यासाठी......आणि ती कंपनी एवढी चांगली नाही.... मिष्टी समजून घे ना जरा."
ती असा विचार करेल त्याला वाटलच नव्हत....त्याला वाईट ही वाटत होत पण तिची सेफ्टी आता किती इंपॉर्टन्ट आहे हे त्यालाच माहिती होत.
" अहो पण....."
" मिष्टी माझ्यासाठी आणि मीरासाठी तरी हे कर." विराजने तिच्या समोर आता कोणताच पर्याय ठेवला नव्हता.
" आणि तू जहागीरदार इंडस्ट्रीज मध्ये परत अप्लाय करूच शकतेस." विराज हळूच आवजात म्हणाला.
" परत रिजेक्ट करायला का??" मिष्टी पटकन बोलून गेली.
त्यावर विराज काहीच बोलला नाही.
पहिल्यांदा त्यांच्यात काही शब्दांपेक्षा जास्त बोलणं झालं होत.
नाही म्हणलं तरीही विराजच्या मनात आता तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण होत होता.
विराज बेडवर तर मिष्टी सोफा कम बेड वर झोपले.
.
..
.....
....
मध्यरात्री विराजला अस्पष्ट आवाज ऐकू येत होते.....तो पटकन उठून बसला.....त्याने सगळीकडे नजर फिरवली आणि त्याची नजर सोफ्यावर येऊन थांबली.
मिष्टी झोपेतच काहितरी बडबडत होती.
" आई - बाबा.....आई मला...मला सोडून जाऊ नका......एकदा माझं..... माझं ऐकून घ्या ना....."
खुप घामेघुम झाली होती ती....झोपेतच ती रडत होती......विराज पटकन तिच्यापाशी आला.....त्याने हळुवारपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
टीशू घेऊन तिचा घाम टिपला.
" शांत हो मिष्टी....शांत हो.....मी आहे ना....."
त्याच्या आवाजाने ती हळू हळू शांत होऊ लागली.
" नका जाऊ सोडून मला....." तिने हळूच आवाजात सांगितल.
" नाही....कधीच नाही....झोप आता." त्याचा हात पकडुन ती शांत परत झोपली.
तिने त्याचा हात घट्ट पकडल्यामुळे त्याला हलता ही येत नव्हत पण सोफ्यावर बसता ही येत नव्हत......त्याने अलगद तिला दोन्ही हातात उचललं......तिने झोपेतच त्याच्या छातीवर चेहरा हलका रब केला.
त्याने तिला बेडवर झोपवल आणि तीच्याशेजारी आडवा झाला......ती लगेच लहान मुलीसारखी त्याच्या कुशीत शिरली.
" हिला रोजच अशी स्वप्न पडतात का?? रोज रात्री ही अशीच ओरडत असते का आणि मला कस नाही कळलं इतके दिवस??....आज मी जागा झालो म्हणून कळलं तरी मला." विराजच्या मनात प्रश्न निर्माण होत होते.
हिच्या आयुष्यात नक्की घडल तरी काय आहे?? हाच मोठा प्रश्न आता तिच्यासमोर होता.
त्याला अचानक आठवलं एकदा डॉक्टरांनी सांगितलं होत की तिची आधीची स्मृती गेली आहे.....तिच्या डोक्याला आधीच्या ऑपरेशनच्या खुणा आहेत.
नक्की हीचा भूतकाळ काय आहे??
तिच्या कडे बघून त्याला कधी झोप लागली कळलच नाही त्याला.
*******************
सकाळी 6 वाजता त्याला जाग आली.
मिष्टी अजूनही विराजच्या कुशीतच झोपली होती.....तिचा एक हात त्याच्या छातीवर होता.
त्याने हळूच तिचा हात काढला आणि तिच्या अंगावर पांघरून घालून जिम साठी गेला.
तो येईपर्यंत ती गाढ झोपली होती.
तिला हळू हळू जाग येत होती.....बेडवर मऊ मऊ गादीवर झोपल्यामुळे तिला आज छान वाटत होत.
आळस देत ती उठली ....विराज तिच्याकडेच बघत तिथे शेक पित उभा होता.
तिने त्याला बघून गोड स्माइल दिली.
नंतर ती स्माइल शॉक मध्ये बदलली.😲
" तुम्ही .....तुम्ही इथे??.....एक मिनिट मी बेडवर?? मी....मी बेडवर कधी आले??" मिष्टी एकावर एक प्रश्न त्याला विचारत होती.
तो काही उत्तर देणार तेवढ्यात तीच लक्ष घड्याळावर गेलं.
" अहो......किती उशीर झाला आहे.....तुम्ही मला उठवल का नाही??.....व्हा बाजूला....मीराला उशीर होईल." ती घाईघाईत उठत बाथरूम मध्ये निघून ही गेली.
ती गेल्यावर विराजने हसत हसत डोक्यावर हात मारून घेतला..... टीपिकल बायको आणि आई झाली होती ती आता!!
तो फोनवर मेल चेक करत होता......तिच्याशी काल रात्रीबद्दल बोलायचं होत म्हणून तो तिथेच बसला होता.
" अहो....मी खाली जाते आहे.... ब्रेकफास्ट आणि डबा बनवायला....तुम्ही आवरून या आणि येताना मीरालाही घेऊन या....मी तिचं आवरून ठेवते." मिष्टी गडबडीत केसवर क्लचर मध्ये बांधत म्हणाली.
विराज उठला आणि तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवला......ती शांतच झाली.
" हळू....किती ती घाई!!....थोडा उशीर झाला तरी काही बिघडणार नाहिये." मिष्टीचे डोळेच मोठे झाले आणि तिला हसूच फुटलं.
ती हसतीये म्हणून त्याने भुवई उंचावून तीच्याकडे पाहिलं.
" काय झाल ?? का हसतियेस?"
" चक्क चक्क टाईमने सगळ करणारे मि. विराज जहागीरदार म्हणत आहेत की थोडा उशीर झाला तरी चालणारे म्हणून हसू आल मला." मिष्टी हसत म्हणाली.
तिला हसताना पाहून त्याला का कोण जाणे पण बर वाटलं....काल तिचा झोपेत रडताना ,ओरडतानाचा चेहरा पाहिल्यावर त्याला कसतरीच झाल होत......तिची खूप काळजी लागून राहिली होती पण तिला हसताना पाहून त्याच्या मनाला बर वाटलं.
"म्हणजे ह्याचं अजून एक अर्थ होता की तिला काल रात्री काय घडल हे ही आठवत नव्हत." विराज विचार करत होता.
" अहो...." तिचा आवाज आला.
" ह्ममम." विराज न कळून म्हणाला.
" हात...हात काढता का?? उशीर...उशीर होतो आहे." हसताना काही तिला वाटलं नाही पण त्याला इतकं जवळ पाहून तिच्या मनात फुलपाखरं उडत होती.....इथून कधी सुटते आहे अस झाल होतं.
" जा.....आणि मी येताना घेऊन येतो मीराला." विराज बाथरूम मध्ये जात म्हणाला.
************************
इकडे तो... इंडियात आल्या आल्या तिचा शोध घेऊ लागला... त्याच्या ओळखी इतक्या होत्या कि 1 दिवसातच ती कुठे आहे हे त्याने शोधून काढले...
खरंच त्याला त्याची मायरा कुठे आहे हे समजलं होत..... ती मुंबई मध्येच होती जिथे तो होता...!!
त्याच्या बॉडी गार्डस् ने तिची सगळी इन्फॉर्मशन त्याच्यासमोर ठेवली..... ती कुठे राहते , काय काम करते तिची सगळीच माहिती त्या फाईल मध्ये होती....
काही महिन्यांपूर्वी ती अचानक विराज जहागीरदार याच्या मेन्शन मध्ये राहत होती.....अजून माहिती काढल्या नंतर त्यांना समजलं कि तीच लग्न विराज सोबत झालंय.... त्यांना एक 4-5 वर्षांची मुलगी आहे....!! आणि ती त्याच्याच ऑफिस मध्ये जॉब करते....!!
जी गोष्ट खूप सेक्रेटली करण्यात आली होती ती पण त्याच्या ओळखीने आणि पॉवरने त्याला ते अशक्य नव्हत.
त्याने ती फाईल घेतली आणि तशीच फाडूनं टाकली....त्याने समोरचा टेबल तसाच लाथेने उडवला...!!
" नाही हे शक्य नाही...... माझी मायरा मला सोडून कोणा दुसऱ्याशी लग्न करुच शकत नाही.... माझी किट्टू मला धोका देऊच शकत नाही..... तुम्ही सगळ्यांनी खोटी माहिती काढली असेल... I know जा परत एकदा तिची माहिती काढून या.... जा.... " तो जोरात ओरडत म्हणाला.....
तीच लग्न झालय हे त्याला ऐकवत ही नव्हत..... तिचा शोध घेण्यासाठी तो इंडियात आला... तिची माहिती जमवली तर समजलं तीच लग्न झालय....
त्याने आजूबाजूच्या सर्व वस्तू फोडून टाकल्या.... रागाने तो पूर्ण लाल झाला होता... त्याच प्रेम , त्याची मायरा दुसऱ्या कोणाची होती.....
" किट्टू तू फक्त ह्या सागर सूर्यवंशीची आहेस लक्षात ठेव....फक्त ह्या सागरची......तुला कोणीही माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.....कोणीच नाही. " तो तिच्या फोटोकडे पाहत डोळयात राग आणत म्हणाला.
त्याच्या आजूबाजूला असलेले बॉडीगार्ड त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते... खरंच आपला बॉस इतका दिवाना आहे त्या मुली साठी.....!! आणि आता तो एका सायको आशिक सारखंच वागत होता...
....
........
इथे मिष्टीला सकाळ पासून भीती वाटत होती... मनात धाकधूक होती , काय तरी वाईट होईल असच वाटत होत.....सगळी काही सध्या तरी ठीक चालू होत.... पण आता पून्हा कसलं तरी वादळ येणार होत....
जे तिच्या भूतकाळाशी निगडित होत.
" आंटी..." मीराची हाक ऐकू आली तशी तिने त्या फिलिंगकडे दुर्लक्ष केलं.
सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला तसे प्रत्येकजण आपापल्या कामांना निघून गेले.
मीराला तिच्या कारमध्ये बसवून मिष्टीने पटकन तिचं आवरलं आणि ऑफिस साठी तयार झाली.
ती उशीर होईल म्हणून पटपट पायऱ्या उतरून खाली येत होती.
" मिष्टी हळू जरा." विराज जरा मोठ्यानेच म्हणाला.
तशी तिच्या पावलांची गती मंदावली.
ती खाली आली तस दोघेही बाहेर आले.....त्यांच्या समोर एक कार उभी होतीच.
विराजने तिच्यासाठी दार उघडल....तिला वाटलं तो बसेल आणि जाईल पण नाही तो तिथेच तीच्याकडे बघत थांबला होता.
" अं....काय झाल??" नकळून तिने शेवटी विचारलं.
" Sit inside." दोनच शब्दात त्याने उत्तर दिलं.
" दोघे एकत्र ??..... ऑफिस?? "
" मिष्टी आत बस." विराज तिला ऑर्डर देत म्हणाला.
ती पटकन आत बसली.
दोघेही पहिल्यांदा एकत्र ऑफिसला जात होते.
ऑफिस जवळ आल्यावर थोड्या अंतरावर मिष्टिने गाडी थांबवायला सांगितली.
" मी इथेच उतरते....उगीच कोणाला संशय नको." ती निघूनही गेली.
तो बोलणार पण ती थांबलीच कुठे त्याच ऐकायला!!
नाही म्हणलं तरी लग्न झालं असूनही लपवण त्यात मंगळसूत्र पण नाही घालायचं म्हणजे तिला नको वाटतं होत.....उगाच गिल्टी वाटत होत.....मन नाही म्हणत असतानाही करावं लागत होत.
त्यात सकाळपासून जाणवत असलेली अनामिक हुरहुर!!
तिने छातीवर हात ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेत ती ऑफिसमध्ये गेली.
क्रमशः.......