Nishabd Swas - 6 in Marathi Love Stories by satish vishe books and stories PDF | निशब्द श्र्वास - 6

Featured Books
Categories
Share

निशब्द श्र्वास - 6

6.🥰😘 प्रेम 🥰

'' सर कसे आहेत.
मागून आवाज ऐकू आला, मी मागे वळून पाहिले तर डोळे चमकले बोल मायरा
मायरा: कसे आहेत.
मी : मस्त आहे.
मायरा: तुमची तबीयत खराब होती सगळे बोलत होते.
मी: हा थोड बर नव्हतं, आता मस्त आहे.
एक गोड smail,😊 देऊन ती निघून गेली. मी मीटिंग साठी निघून गेलो.
मीटिंग झाल्यावर मी आलो तर मायरा वाट बघत बसली होती. तिला मी तिचं काम समजाऊन माझ्या कॅबिन मध्ये बसलो. परंतु माझं मन मात्र कामावर लागत नव्हतं. मी बराच वेळ प्रयत्न केला पण मना पुढे काय करणार?
शेवटी मन कोणाच्या बंधनात अडकले का ,
होऊनी स्वार फुलपाखरा परी !
चंचल स्वार वाऱ्यावरी!
होऊनी धुंद मदना वरी!
जीव घुटमलतो कुणा परक्या वरी!

मी मायराच्या जवळ जाऊन काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणार तोच मला समोरून आवाज आला,
सर बरोबर आहे ना ?
मी थोडा स्तब्ध होऊन जणू तिने मना मधल जानाव.
हा मान डोलवत पुढे गेलो. मनातल्या मनात गोड हसत म्हणतात ना गोड गुद्गुल्या होन, खरचं तसच काहीसं,😘☺️
😊😊🥰
थोडा वेळ शांत बसून मी काम करत राहिलो.
हा सारा खेळ चालू होता. केव्हा मध्ये मध्ये ती मला काही ना काही विचारायचं म्हणून आवाज देत असे. मध्ये मध्ये आखं मीचोली चालू थी,😜😊

हे असं चालूच होत. दिवस जात होते तसा मी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या सोबत जाणारा थोडासा वेळ सुद्धा मला हवा हवा असा वाटत होता. नेहमी जाताना तिचा तो हसरा चेहरा पाहून मला आगदी भारावून जात असे.
😍 मध्ये मध्ये कंपनी मध्ये माझ्या मित्रांमध्ये कोणी कोणी मला तिला घेऊन चिडवत पण मला ते समजत नव्हतं.
अशीच एक संध्याकाळ सुट्टी झाली होती. ती सगळ्यांच्या मागे होती. मी जणू तिचीच वाट बघत होते. ती जवळ आली मी तिला विचारलं मला वाटल तू गेली, ती थोडी थांबून मला म्हणाली , ' मी तुम्हाला भेटल्याशिवाय कशी जाणार ,' तो माझ्या कडे बघून एक नाजरेच वेगळाच तिर मारून निघून गेली. त्याच क्षणी जो भाव तिचा मी जाणला होता.
अंतरंगी भावनांचा कल्लोळ हा माजला,
शब्द होऊन ओठांवरती शब्दमाळेत सजला ! ,,🥰
🥰🥰🥰
असच काही सगळेच प्रेमात पडले की कविता करायला लागतात. खर आहे ना. खरंच!
दिवस आता आगदी मस्त जात होता, कामाचं स्वरूप आगदी वेगळं भासत होत. मी जेव्हा पण डिपार्टमेंट व्हीजिट साठी जात असत तेव्हा मी आगदी मन सारखी तिथेच मोहात पडून जात असे .
जेव्हा पण ती सुट्टी वर असे तेव्हा मला मुळीच करमत असे.
आज काल तिची खूप ओढ लागत चालली होती.
जेव्हा पण ती सुट्टी वर असे तेव्हा मला मुळीच करमत असे.
आज काल तिची खूप ओढ लागत चालली होती.
असाच एक दिवस तिला कामाला येऊन काहीच दिवस झाले होते. त्या दिवशी ती आली नव्हती तिच्या ताईला मी विचारलं काय मायारा आली नाही.
रेशना - नाही आली तिची तबीयत खराब आहे. ती बोलून पुढे निघून गेली.
मला मात्र काय झालं माहीत नाही. मला एकदम अस्वस्ता झालं.
मला राहवत नव्हते, मी पुंन्हा रेशना ला बोलावलं . मायरा कशी आहे , काय झालं असे दोन तीन प्रश्न विचारले.
रेशना - तुम्ही call करून विचारा ना ' कदाचित ती तुमचा कॉल गेल्यावर बर वाटेल तिला?
( ती स्मित हास्य करत निघून गेली. पून्हा मागे आली)
रेशना - हा नंबर घ्या . call करा माझ्या कडे रिचार्ज नाही.
मी मान डोलवत तिला हा म्हटलं, माझी हिम्मत होत नव्हती. पण करमत पण नव्हतं काय करणार थोडा वेळ शांत बसून मी कॉल लावला.
दुसऱ्या रिंग ला तिने call उचलला. ती थोडी हसत बोलत होती.
तिला जणू माझ्या फोन ची वाट बघत होती. तिच्याशी बोलून बर वाटलं पण एक सक्त ताकीद दिली की सुट्टी घ्याची असेल तर कॉल करायचा तेव्हा सुट्टी घ्याची.
आता कुठे कामावर लक्ष लागलं. 😍
😍😍
भास तुझा तो होई माजला
घेऊनी रंग तुझ्या प्रीतीचा!
होऊनी स्पर्श तुझ्या मनाचा
भाव फुळुदे तुझ्या प्रीतीचा!
😍😍
😍