Sparshbandh? - 15 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 15

Featured Books
  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

Categories
Share

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 15

" अहो मला काहीतरी बोलायचं होत...... म्हणजे विचारायचं होत." मिष्टी त्याच्याकडे बघत म्हणाली.


" बोला." विराज कॉफी एन्जॉय करत म्हणाला.


" ते मी ऑफिस परत जॉईन केलं तर चालेल का??.......म्हणजे ते दिवसभर घरात बसून कंटाळा येतो...... मीरा ही सकाळी गेली की दुपारीच येते.....वाटल तर मी ती यायच्या आधी घरी येइन......मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी लग्न तिला आई मिळावी म्हणून केलं आहे...... पण ऑफिस सांभाळून मी तिला ही सांभाळेन." मिष्टी भरभर बोलून गेली आणि उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे बघत राहिली.


त्याने शांतपणे त्याच्या हातातला मग खाली ठेवला.. तिला जरा भितीच वाटत होती तो काय बोलेल?? तिच्यावर रागावणार तर नाही ना? परमिशन देतील कि नाही??? मला घरातून बाहेरच काढलं तर...? नको नको त्यापेक्षा मी घरीच राहिलेली बरी आहे....


ती विचार करण्यातच व्यस्थ होती.... समोर विराज तिच्याकडे पाहत होता.. ती त्याला किती घाबरते हे पाहूनच त्याला थोडं हसू आलं.

" खरच ही मुलगी किती घाबरते मला...." विराज...


" का...?? तुला जॉबच का करायचा आहे?? घरात बरंच काही काम करण्यासारख आहे." विराज ने उलट तिलाच प्रश्न केला.....


" ते.....ते... सगळे कामात बिझी असतात मला बेडरूम मध्ये बसून खूपच कंटाळा येतो..... आणि खूप एकट ही वाटत..... किचन मध्ये पण जास्त काही काम नसतं....ऑफिसला गेल तर काम ही होईल आणि वेळ ही जाईल माझा.....आणि घरी खरच खूप कंटाळा येतो आणि तुमच्या आई खूप प्रश्न ही विचारतात....." मिष्टी कंटाळून म्हणाली......


" हं... ठीक आहे , पण माझ्या काही अटी आहेत , त्या मान्य असतील तर तू जाऊ शकतेस ऑफिसला... " विराज थोडा विचार करत म्हणाला.


" काय आहेत अटी..??? " मिष्टी.....


" तू हे मंगळसूत्र जे घातलं आहेस ते ऑफिस मध्ये घालायचं नाही..... आणि तुझं लग्न झालाय हे कुठेही समजता कामा नये... ऑफिस टायमिंग सकाळी 10 ते 7 आहे.... तू कधीही येऊ शकतेस आणि कधीही जाऊ शकतेस कारण मिरा लवकर येते... सो तुला घरी लवकरच जावं लागेल..... त्यामुळे तू ज्या डिपार्टमेंट मध्ये आहेस तिकडच्या हेडशी मी बोलून घेतो.... आणि हा हे साडी आणि ड्रेस अलाऊड नाहीत.... तू फॉर्मल च घालायचे आहेस...." विराज....

तो इतका भरभर बोलत होता..... कि मिष्टी जरा बावरूनच गेली...

" मान्य आहेंत का अटी ??? " विराज शांत होत तिला म्हणाला....


" अ.. हो मान्य आहेत." मिष्टी पटकन बोलून गेली...


विराज स्टडी मध्ये काम करण्यात मग्न झाला........ पण मिष्टी विचार करत होती कि हे मंगळसूत्र कस काढू शकते मी...?? भलेही लग्न फक्त मिरा ला आई मिळावी म्हणून केल आहे पण ते माझे हजबंड आहेत आता.... आणि


मिष्टी विचार करत होती.... पण असो थोड्यावेळ साठीच काढायच तर आहे...!! आता परमिशन मिळाली होती म्हणून ती खुश होती.....!! एकतर या घरात काय करण्या सारखं पण नाही.


ती बेडरूम मध्ये येत बेडवर वर तशीच आडवी झाली...


कसला मऊ बेड होता तो!!.....त्याच्यावरच झोपून रहावस वाटत होत.... ती डोळे मिटून तशीच झोपी गेली

तिला ना ते सगळं अगदी स्वप्ना सारखं वाटत होत......अगदी त्या स्लीपिंग ब्युटी च्या स्टोरी सारखं होत!!


अचानक तिच्या आयुष्यात एक राजकुमार आला आणि तिला तो घेऊन गेला....... पण हा राजकुमार खरंच तिचा होता का??? कधी तरी होईल का तो तिचा?? आज पर्यंत कधी कोणत्या जोडीदाराची तिने अपेक्षाच नाही केली.... आता तर तिचा तो नवरा होता.....हो पण आणी नाही पण.... लग्न कोणत्याही परिस्थितीत झाल असलं तरीही आता सत्य नाकारता येणार नव्हत...... तिने तसेच आपले हात त्या मंगळसूत्रावर लागले....

"हे नावापुरतीच आहे मिष्टी तुझ्या गळ्यात हे लक्षात ठेव.. उगाच नको ती स्वप्न आणि अपेक्षा तर ठेवुच नकोस.... आणि त्याने त्रास फक्त तुलाच होणार आहे.....!! " ती स्वतः ला समजावत म्हणाली.....


नकळत तिला रडायला आल.... का ते तिला सुद्धा माहीत नाही.... ती तशीच उठली आणि बाहेर जायला निघाली तर समोर विराज होता... ती तशीच त्याला क्रॉस करून जाणार कि तेवढ्यात त्याने तिला खांद्याला पकडून थांबवले....


" वेट... तू रडतेयस?? पण का?? कोणी काही तुला बोललं का? " विराज तिला अस अचानक रडताना पाहून विचारत होता....


" नाही ते असच मला रडायची सवय आहे... तुम्ही नका लक्ष देऊ.... ती त्याच्या पासून दूर होत म्हणाली...मला खाली काम आहेंत......आणि मिरा कडे पण जायचं आहे


मिष्टी असं बोलत गडबडीत खालती गेली.....!! विराजला समजलंच नाही हिला काय झालं अचानक....???


तो लगेच एका रूम मध्ये गेला तिथे समोरच्या मोठ्या भिंतीवर भरपूर वेगवेगळे स्क्रीन लावलेले दिसत होते...... अख्ख्या मेन्शन मध्ये जितके कॅमेरे होते त्याचे cctv फुटेज होते..... त्याने तिथे बसलेल्या गार्ड्स ना त्याच्या रूम मधलं cctv फुटेज दाखवायला सांगीतल आणि बाहेर पाठवलं....... त्यात फक्त मिष्टी त्याला झोपताना दिसली ना तिकडे कोण आलेलं आणि तिला काही झालेलं......त्याने ते बंद करायला सांगितलं.


त्याच्या रूमचे कॅमेरे ऑनच असायचे.....आता मिष्टी असते म्हणून तो रात्रीचे बंद करायचा..... त्याने सेफ्टी साठी घरात जागोजागी कॅमेरा लावले होते.....

तो पुन्हा त्याच्या रूम मध्ये आला...!!


रात्री जेवण झाल्यानंतर विराजने मिराच्या बेडरुमच दार उघडल आणि आतलं दृश्य पाहून दारातच उभा राहिला.


मीरा मिष्टिच्या कुशीत बसली होती आणि मिष्टि तिला एक स्टोरी बुक वाचून दाखवत होती.

मध्ये मध्ये त्यांचे प्रश्न उत्तर ही सुरू होत.


" संपली स्टोरी." मिष्टी बुक बंद करत हसत म्हणाली.


" आवडली का स्टोरी मिरूला?? "


" हो आंटी." मीरा खुदुखदू हसत म्हणाली.


" चला आता झोपी झोपी करूयात....नाहीतर डॅडा येतील आणि आपल्या दोघींनाही रागवतील."

मिष्टिने मीराला पांघरूण घालून दिलं.


" आंटी तू खरच बेस्ट आहेस आणि क्यूट पण."

मीरा आपल्या एवलाश्या हातात तिचा चेहरा घेऊन सांगत होती.


" आंटी तुझ्यामुळे आता मला जास्त कोणी रागवत नाही..... मारत पण नाहीत." मीरा तीच्याकडे एकटक प्रेमाने बघत म्हणली.


" माझ्यामुळे नाही ग सोनूली...... तुझ्यामुळेच...... माझी मिरु आहेच क्यूट आणि गूड गर्ल जिच्यावर कोणीच नाही रागवू शकत......चला आता खूप झाल्या गप्पा आता झोप उद्या स्कूल पण आहे."

मिष्टी ने मिरच्या हातांवर आपले ओठ टेकवले आणि तिला जरावेळ थोपटत बसली.


ती झोपी जाताच लाईट बंद करून मिष्टी दार ओढून बाहेर आली.


त्यांचं बोलणं ऐकून विराज मीरा झोपत असतानाच तिथून निघून गेला होता.


मीरा आणि मिष्टीच एक नात तयार झाल होत.....नात्याला नाव जरी नसले तरी दोघिंसाठी ही ते तितकंच मौल्यवान होत!!



******************


ती बेडरूम मध्ये आली तर विराज पुस्तक वाचण्यात मग्न होता.


नुकताच शॉवर घेतल्यावर त्याचे पुढचे केस कपाळावर पसरले होते आणि काही पाण्याचे थेंब ही दिसत होते.


त्याच्याकडे एकटक बघत ती तिथेच उभी होती.

तिची नजर त्याला जाणवत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर हळूच हसू पसरत होत.


त्याने एक नजर तिच्यावर टाकली तशी ती closet मध्ये पळाली.


" वेडी!!" विराज हसतच म्हणाला.


" मिष्टी तुला खरच वेड लागलं आहे....कशी त्यांना बघू होतीस तू!!"

आत आल्या आल्या तिने कपाळावर हात मारून घेतला.


Closet च्या एका साईडला त्याचे तर त्याच्या समोरच्या बाजूला तिचे कपडे व्यवस्थित लावले होते.


तिने तिच्या साईड चा दरवाजा उघडला तर सगळे कप्पे विविध कपड्यांनी भरले होते.....प्रकारानुसार व्यवस्थित वेगवेगळे लावले होते....काही कपड्यांचे तर प्राइस टॅग ही तसेच होते.


" सकाळपर्यंत तर हे कपडे इथे नव्हते." मिष्टी सगळ बघून म्हणाली.


तेवढ्यात मागून closet च दार उघडण्याचा आवाज आला.


तस तिच्या हृदयाची गती आपोआप वाढायला लागली.


त्याचा ऑरा तिला तिच्यामागे जाणवत होता !!


" हे सगळे तुझ्यासाठी आहेत."


त्याचा आवाज ऐकल्यावर ती मागे वळली.


" एवढे???" मिष्टी डोळे मोठे करत म्हणली.


" हो.....सगळ सेट केलेलं आहे......तुला हवे ते तू कपडे घालू शकतेस.....Feel free to wear comfortable clothes..... आणि रात्री साडीत झोपण्याची काहीच गरज नाहीये."

विराज हे बोलून निघून ही गेला.


काल रात्री तिला साडीत बघून त्याने सकाळीच तिच्यासाठी कपडे मागवले होते आणि दुपार पर्यंत सगळे लावून ही झाले होते.


" खूपच पैसे खर्च करतात हे." मिष्टी एका टी- शर्ट चा प्राईस टॅग पाहत म्हणली.


नाईट ड्रेस घालून तिने लोशन लावलं आणि बाहेर आली.


विराट सोफा बेडमध्ये कन्व्हर्ट करत होता.


त्याची नजर तिच्यावर पडली......ना कोणता मेकअप ना कोणते भरजरी दागिने फक्त गळ्यात तीच मंगळसूत्र आणि केसांची वेणी त्यातून ही केसांच्या काही चुकार बटा बाहेर आलेल्याच.


किती साधी होती ती !!


मिष्टी शांतपणे सोफ्यावर येऊन झोपली आणि विराज बेडवर जाऊन झोपला.


" तिच्यात आणि हीच्यात फक्त दिसण्याच साम्य आहे पण राहणीमान किती वेगवेगळं आहे!!" विराजच्या डोक्यात विचार चमकून गेला.


दोघेही झोपी गेले.

************************

दुसऱ्या दिवशी मिष्टी लवकर उठली आणि आवरून खाली आली.


मीराचा डब्बा आणि विराजचा नाश्ता आणि दोघांचेही जेवणाचे डबे तिने तयार केले.

थोडाफार स्वयंपाक ही तिने करून ठेवला होता.


मीराच आवरून दिलं होत आणि ब्रेकफास्ट टेबलवर दोघीही विराजची वाट बघत होत्या.


रखमा कडून आई - बाबांनी नाश्ता केला आहे तिला कळलं होत.


विराज फोन वर बोलत बोलतच खाली आला.....तो आला तस त्याला सर्व्ह करून ती परत मिरापाशी बसली.


मीराला पहिलं घास भरवून तिने तिला खायला सांगितल.

मीरा ही स्वतःच्या हाताने खात होती.


विराज ने तिच्यावर नजर टाकली.....आधी तर स्वतःच्या हाताने खायला किती नखरे करायची.

विराज विचार करत होता.


नाश्ता झाला तस मीरा आणि तो निघून गेला.


ते दोघेही गेले तशी मिष्टी ऑफिस साठी रेडी झाली....तिने विराजने सांगितल्या प्रमाणे फॉर्मॅलच घातले होते..... 9 वाजले होते ती पटापट आवरत खाली आली... आई आणि बाबा होतेच खाली.


ती आली आणि दोघांच्याही पाया पडली.....!!


" मिष्टी अग तू कुठे चालीस..?? " बाबा...


" अहो बाबा ते मी ऑफिस परत जॉईन केल आहे so मी आता ऑफिसलाच जातं आहे.... " मिष्टी...


" आणी मग मीरा तीच काय..?? " आई नी लगेच विचारलं.


" ती यायच्या आधीच मी ऑफिस वरून येईल.... " मिष्टी.....


" पण नवरा इतका मोठा बिझनेस मॅन असून तू ऑफिस मध्ये का काम करतेयस..?? " आईना काही तीच अस जाणं पटत नव्हत.


" ते मला घरी खरं तर खूप कंटाळा येतो....आणि ऑफिसची सवय आहे......मला राहवत नाही आहे... दिवसभर एकटीने खूप बोअर होत." मिष्टी.....


" बर ठीक आहे... तू जा आता तुला उशीर होत असेल... " बाबा....


तशी मिष्टी तिथून निघाली.... मेन्शन बाहेर येताच तिच्या समोर कार थांबली.....


" आता मी या कार मधून जायचं?? " मिष्टी विचार करतच उभी राहिली....


ड्रायव्हर बाहेर येत म्हणाला... " सरांनीच सांगितलं आहे तुम्हाला ऑफिस वरून सोडायचं आणी आणायचं.... "


ती काहीही न बोलता कार मध्ये बसली.... विराज बोलला आहे म्हणजे नक्कीच काहीतरी विचार करून बोलला असेल.. त्यामुळे ती काहीही न बोलता डायरेक्ट कार मध्ये बसली....


थोड्यावेळात कार ऑफिस खाली पोहोचली... ती लगेच कार मधून ऑफिसला जायला निघाली..... मंगळसूत्र तिने आधीच काढून ठेवलं होत....!!


आज सकाळी ही ते एकमेकांशी काहीच बोलले नव्हते!!


ती आज बऱ्याच दिवसांनी येत होती....सगळं काही नॉर्मल होत पण तिला सगळं वेगळं वेगळंच वाटत होत.... खरंच हे तिच्या नवऱ्याच स्वतःच ऑफिस होत... आणि त्यात ती एका प्रोजेक्ट वर दुसऱ्या कंपनी तर्फे काम करायला तिथे आली होती....!!


मिराच आणि त्याच समुद्रकिनारी भेटणं... सगळं काही अवचितच होत...!!


ती डोक्यातले विचार ठेवून ऑफिस मध्ये आली.. तिचे फ्रेंड्स झाले होते आणि टीम ही होती पण अजून जास्त जवळच कोणी नव्हतच.


ती केबिन मध्ये आली तेवढ्यात मागून दार उघडल गेलं.


" मिष्टि तू ठीक आहेस ना??" अविनाश काळजीने विचारू लागला.


" हो अविनाश."


" अग मग इतके दिवस कुठे गायब होतीस?? ना साधं फोन नाही की मेसेज नाही.....सगळा प्रोजेक्ट थांबला होता..... डॅड पण तुझ्याबद्दल चौकशी करत होते.....काही कळवायची पद्धत असते की नाही??" अविनाश थोडा चिडत म्हणाला.



" सॉरी....घरी जरा पर्सनल emergency होती अरे म्हणून मला कळवता नाही आलं....खरच आय एम एक्स्ट्रेमली सॉरी."



" मिष्टी कोणत्या संकटात नाहियेस ना तू??"



" नाही अस काहीच नाहीये."



" बर ठीके....... डॅड ना पण कळव एकदा......आणि तू माझ्याशी बोलू शकतेस."

अविनाश तिचे हात हातात घेत म्हणाला.


तिला ऑकवर्डच झाल....तिने हात काढून घेतले आणि कसनुस होकार मध्ये मान हलवली.


" आता कामाला लागू.....खूप दिवसांच काम रखडलं आहे......हा प्रोजेक्ट ही लवकर पूर्ण करायचा आहे." अविनाश बाहेर जात म्हणाला.


तिच्या टीम मधल्या बऱ्याच जणांनी ती का नव्हती येत याच कारण विचारलं.. तस तिने काहीतरी खोटं कारण सांगत त्यांना कटवलं.



मिष्टी तिच्या केबिन मध्ये काम करत होती तेवढ्यात आदित्य तिला दिसला तो बाहेरच उभा होता.


तिने त्याला आत बोलावलं.


" Ma'am विराज सरांनी तुम्हाला बोलावलं आहे." आदित्य.



" आलेच.....आणि आदित्य प्लिज मला मॅम नको म्हणू आधी सारखं मिष्टीच हाक मार."



" पण आता तुमचं लग्न झाल आहे विराज सरांशी." आदित्य बिचकत म्हणाला.



" मग काय झाल?? लग्न झाल म्हणून आधीची नाती नाही बदलत ना?? आधीही एका भावाप्रमाणे माझ्याशी वागायचा ना मग बहिणीशी अस बोलणारे का?? झाल असेल माझं लग्न पण ह्याचा अर्थ असा नाही होत की आपल्या बहीण भावाच्या नात्यात बदल होईल."



" हो....हो....कळलं." आदित्य तिला थांबवत म्हणाला.


" फक्त सरांसमोर मॅमच म्हणावं लागेल मला आणि त्यावर कोणतेही आर्गुमेंट्स नको आहेत मला." आदित्य पुढे म्हणाला.


" बर......मी आलेच." मिष्टि हसत म्हणाली.



...
......
.........
...


तो इंडिया मध्ये आला होता....फक्त तिच्यासाठीच , पण त्याला ती भेटणार होती का???? आणि का नाही भेटणार त्याला त्याची किट्टू ?? तिची सगळी खबर होती त्याला....!! त्याला तिला पाहायचं होत , भेटायचं होत.. तिला आपलं करायचं होत...!!


समोर काळे सूट घातलेले बरीच माणसं होती... त्यांच्या हातात मोठ्या गन्स ही होत्या....


त्यांच्या समोर एक 29-30 वयाच्या च्या आसपास असलेला तरुण बसला होता.... डोळ्यावर गॉगल होत , हातात सिगरेट होत......


आणि दुसऱ्या हातात तिचा... फोटो " कुठून पनं शोधून काढा पण मला ही मुलगी हवी आहे..." तो


पण तीच नाव काय होत..... " किट्टू??? " नाही नाही हे तर मी ठेवलेल निक नेम आहे.. तीच नाव तर


" मा.....


तो बोलणारच होता कि तो थांबला... " मला ही मुलगी हवी आहे. "

एवढच बोलून तो थांबला.



क्रमशः.........