भाग -१
~ शिवम ❤️ हर्षा
______________________________________________
भोसले परिवार -
सुशिला बाई - शरदराव, अमर , छाया
कुसुम - शरदराव :- शिवम , आदिती
शरदरावांना कुठल्याही गोष्टीचे गर्व नव्हते...शरदराव यांनी खुप मेहनत करून त्यांचा बिझनेस वाढवला होता....त्यात शिवमनेही कमी वयातच भरपुर मेहनतीने त्यांचा बिझनेस दुपटीने पुढे नेला होता...
आदिती ही BBA च्या first year ला शिकत होती....
अनिता -अमर :- वेदांत , नील
अमर डॉक्टर होते त्यांचे ही अनेक नामांकित हॉस्पिटल होते
वेदांत त्याच्या शिक्षणासाठी अमेरिकेत होता.... आणि नील अजुन ज्युनिअर कॉलेज ला मुंबई मध्येच शिकत होता
(सर्व जण एकत्र प्रेमाने मिळून मिसळून राहत होते )
मोहिते परिवार -
छाया -गिरिश म़हिते :- तन्मय , मानसी
{ गिरीशराव हे एक उत्तम Businessnen आहेत यांचा बिझनेस आख्या भारतातच नव्हे तर लंडन मध्ये ही त्यांच्या विविध ब्रांचेस आहेत....ते आणि त्यांचा परिवार लंडनला राहतात आणि काही दिवसांतच ते भारतात शिफ्ट होणार आहेत.....}
जाधव परिवार -
माधवी -विजय:- हर्षा, समृद्धी
छोट्याशा स्वप्नातच आनंदी राहणारे..
________________________________________________
( स्थळ :- पुणे )
आज हर्षाचे लग्न होतं.....हर्षा घाबरलेलीच होती मनात एक प्रकारची हुरहूर लागली होती...तिला येवढ्यात तरी लग्नं करायचे नव्हते.ती नुकतीच २० वर्षांची झाली होती....म्हणजेच B.com च्या Second year ला होती....येवढे चांगले स्थळ हातातून जाऊ नाही म्हणून आईबाबांचा अट्टाहास ( प्रत्येक आई वडीलांच हेच स्वप्नं असत आपली मुलगी सुखात राहिली पाहिजे बास..) आईबाबांच्या शब्दाबाहेर तीही नव्हती....पण आज आईबाबांना सोडून जायचा दिवस होता म्हणून तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आलं तेवढ्यातच तिची आई एक लाल कलरची पैठणी आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी घेऊन आली आणि हर्षाच्या डोळ्यांतील पाणी पाहून तिच ही मन भरून आले पण चांगल स्थळ आहे पोरगी सुखाची नांदेन आणि सुखाने संसार करेल हे सगळ्याच आईवडिलांना वाटते म्हणून त्यांनीही घाई केली होती पण एक ना एक दिवस येणारच म्हणून आता का होईना नशीबात आताच चांगला योग आहे म्हणून त्यांनी तिचं लग्न करायचे ठरवले....हर्षा उठून तिच्या आईचा हात धरून तिला बसवते आणि आईच्या मांडीवर डोके ठेवून रडते......
"मुली किती लवकर मोठ्या होतात ना......एवढुशी होतीस माझी गोंडूली इवले इवले हात आणि पाय आणि अशीच मांडीवर येऊन झोपायचीस..."
असं म्हणत माधवी हुंदके देत रडू लागली.... तिच्या सोबत हर्षाही अजून रडायला लागली
"तुमचं माय लेकिच रडुन झाले तर आत येऊ का"..... विजयराव दरवाज्यात उभे राहून म्हणाले
"पप्पा याना " असं म्हणत हर्षाने आपले अश्रू पुसले... आणि नीट बसली
"माधवी माझी परी रडताना अजिबात छान वाटत नाही हा सांग तिला माझी परी खुप strong आहे माझ्या परीला नेहमी मला आनंदी बघायचय...."विजय राव
तशी हर्षांनी विजयरावांना मिठी मारली आणि रडू लागली
विजयरावांचही मन भरून आले पण त्यांनी सावरलं त्यांना तिच्या समोर कमजोर व्हायचं नव्हते......आपल्या काळजाचा तुकडा दुसर्यांना स्वाधीन करणे त्यांच खरं दु:ख फक्त एका बापालाच माहित
"दि लवकर तयार हो मुहूर्ताची वेळ होत आली आहे भटजींनी लवकर तयार व्हायला सांगितले आहे"समृद्धी
तसं विजयराव निघून गेले.....
माधवी ने हर्षाला साडी नेसवली आणि समृद्धी ने तिचा मस्त मेकअप केला.... हर्षा नवरीच्या वेशात खुपच सुंदर दिसत होती....लाल कलरची साडी त्यावर सोनेरी काठची डिजाइन.....लाल कलरची लिपिस्टिक आणि गोरा वर्ण असल्यामुळे तो कलर तिच्यावर जास्तच उठून दिसत होता...... माधवीने तिची नजर काढली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले..
*******************
मोठा आलिशान लग्नाचा हॉल होता पाहुण्यांची तर कमीच नव्हती बापरे किती मोठे नामांकित मंडळीचीही लग्नात उपस्थिती होती कारण ( The Famous young businessmen The Shivam Bhosale याच लग्नं होतं त्यानी कमी वयातच नाव गाजवलेले होतं जगातील Top 10 Businessmen मध्ये त्याच नाव होतं...... लहानपणापासूनच हुशार आणि त्याला लहाणपणापासूनच बिझनेस मध्ये रस होता त्यामुळे शिक्षण पुर्ण झाल्या झाल्याच तो त्यांच्या बिझनेस मध्ये आला होता दिसायलाही एकदम Handsom, Dashing , गोरा वर्ण, काळेभोर तेजस्वी डोळे,
GYM मध्ये कमवलेलं पिळदार शरीर, चेहर्यावरुन एकदम Confident , तसेच रागीट ही होताच, वय 25 )
त्याला या लग्नात काडीचाही रस नव्हता पण आईवडिलांच्या शब्दापुढे तो जाणार नव्हता....त्याचे आईवडील हे पहिले प्राधान्य होते.... त्याच्या वडीलांनी आपल्या लहानपणीच्या जिगरी मित्र विजयराव यांच्या मुलीसोबत शिवमचं लग्नं करायचे ठरवले होते.....विजयराव यांची Middle class family होती..... विजयराव पुण्यात बॅंकेत नोकरीला होते त्यांना दोन मुली हर्षा आणि समृद्धी आणि त्यांची पत्नी माधवी असं त्यांचा छोटासा परिवार होता........शरदराव पुण्याला कामानिमित्त गेले की न चुकता विजयरावांच्या घरी जायचे....... शरदरावांनी कधीच त्यांच्या मैत्रीत पैशाचे गर्व दाखवले नाही आणि विजयरावांनीही आपला स्वाभिमान कधी सोडला नाही
.
.
शरदरावांनी शिवम साठी हर्षाची मागणी विजयरावांना घातली होती.....
आणि शिवमच्या कुंडलीतही दोष असल्यामुळे त्याचे लग्न याच वर्षी करायला गुरुजींनी कुसुमला सांगितले होते कुसुमला शिवमची काळजी लागली होती त्यामुळे कुसुम शरदरावांच्या मागे लागली होती कुसुमला आणि शरदरावांना आपली सुन संस्कारी आणि आज्ञाधारी हवी होती
हे दोन्ही गुण हर्षात असल्यामुळे त्यांनी शिवम साठी हर्षाची निवड केली होती.....आणि दोघांचीही कुंडली बरोबर जुळली होती बाकी शिवमला त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं तो फक्त त्याच्या वडिलांचा शब्द पाळत होता......
( चला आधी लग्न लावुया नाहि तर मुहूर्ताची वेळ निघून जायची...😜 )
********************************
लग्नं घटिका समीप आली होती भटजींनी माईक वरुन "मुलीचे मामा वधुला सोबत घेऊन मंडपात यावे"
नवरदेव शिवम नवरदेवाच्या पोशाखात पाटावर निर्विकार चेहरा ठेवून उभा राहिला....
तितक्यात नवरीनेही लग्नमंडपात प्रवेश केला...
भटजींनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली
.... स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम् मोरेश्वरम् .....
........... शुभ मंगल सावधान म्हणून वधुवराच्या डोक्यांवर अक्षता पडल्या....
तसे भटजींनी फुलांचा हार घालून दोघांनी एकमेकांचा स्वीकार करावा असे म्हणत अंतर पाट बाजूला केला तसं दोघांनी एकमेकांना हार घातला.... तसं भटजीं म्हणाले एकमेकांना सात जन्म साथ द्यायची वचन देत सप्तपदी चालायची आहे......दोघांनीही सप्तपदी घालून वचन देत सात फेरे घातले
भटजींनी मंगळसूत्र शिवमच्या हातात दिलं....शिवम ने मंगळसूत्र हर्षाच्या गळ्यात घातले....
"आजपासून तुम्ही एकमेकांचे जीवन साथी झाले आहे.....सुख दुःखात कायम एकमेकांच्या सोबत राहायचं"भटजी
दोघेही पवित्र बंधनात अडकले गेले....बाकिच्याही विधी कन्यादान, वगैरे पूर्ण होउन जातात ....शिवम मात्र शांत आणि निर्विकारपणे निरस वावरत असतो
आतून तर त्याची खुप चिडचिड होत होती....दोघांनीही भटजींच्या सांगण्याप्रमाणे मोठ्यांचे आशीर्वाद घेतले...
हर्षाने परत एकदा तिच्या आईवडीलांना बिलगून रडू लागली......शिवम हे सगळं बघून वैतागून जात होता.....सर्व पाहुणी मंडळी सगळ्यांचा निरोप घेऊन निघून जातात.....नंतर हर्षासोबत कलवरी म्हणून तिची मामेबहीण दिशा तिच्या सोबत होती....हर्षा च्या आईवडीलांनी तिचा निरोप घेतला आणि तेही आपल्या घरी निघून गेले.....
*********
लगेच नवरदेव नवरीची गाडी मुंबईकडे जायला निघते...... हर्षा तर शांतपणे काचेतून बाहेर पाहत बसते......
( मुंबई )
काही वेळातच गाडी भोसले मेंशनच्या समोर येऊन थांबते.... गाडीतून हर्षा खाली उतरते आणि समोरचा परिसर बघून ती काही क्षण हरवून जाते.... बापरे किती मोठा बंगला आहे अगदी मुवी मध्ये दाखवतात तसं दिशा आणि हर्षा दोघीही बंगला पाहून मनातच विचार करु लागल्या....
शिवम एक सुस्कारा सोडत ताडकन पुढे चालायला लागला तसं हर्षा त्या उपरनामुळे त्याच्याकडे ओढल्या गेली तशी तीभानावर आली आणि पुढे त्यांच्या मागोमाग चालू लागली..
.
.
.
दोघांच्या स्वागतासाठी सर्वजण दरवाज्यात उभे होते.....शिवम रागातच सर्वांकडे एक कटाक्ष टाकतो....
"दोघांचा जोडा लक्ष्मीनारायण सारखा दिसतोय हा " छाया कुसुम ला म्हणाली..... कुसुमनेही हसुन प्रतिसाद दिला.. नंतर लगेच कुसुम आणि शिवमची काकू अनिता यांनी दोघांचं औक्षण केले......आणि उंबरठ्यावर तांदुळांनी भरलेलं माप ठेवलं.... छाया हर्षा कडे पाहून म्हणाली " हर्षा उजव्या पायांनी माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी आत गृहप्रवेश कर "
तेवढ्यात आदिती आणि मानसी दोघीही पुढे येऊन थांबल्या "वहीनी थांब थांब आधी पटकन नाव घे बरं मगच तुला आतमध्ये एंट्री...!!"
हर्षा घाबरतच नाव घेते "कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट ,तशी रुपेरी सागरावर चंदेरी लाट, शिवम रावांचं नाव घेते बांधूनी सात जन्माची ही अनोखी गाठ "
शिवम रागातच आदिती कडे पाहतो
आदिती : व्वा वहिनी खुप छान.....दादा चल आता तुझी बारी
शिवमला आता खुपच राग येत होता त्याने रागातच आदिती कडे पाहीले
शरदराव : आदु मानसी चला बास झालं आता गृहप्रवेश करु द्या... कारण
त्यांना समजलं शिवम आता वैतागला आहे याची जाणीव त्यांना झाली होती
हर्षानी अलगद आपल्या उजव्या पायांनी माप ओलांडून घरात कुंकवाच्या पाण्यात पाय ठेवून गृहप्रवेश केला.....
तेवढ्यात कुसुम म्हणाली "शिवम बाळा जा दोघं जोडीनी जाऊन आईच्या पाया पडून या.... त्या नंतर देवघरात जाऊन नमस्कार करून घ्या "तसं शिवम आजीच्या रुममध्ये जायाला निघाला हर्षा ही त्याच्या मागोमाग पाऊल ठेवून जात होती.....
सुशीला बाई
सुशीला बाई बेडवर बसून पुस्तक वाचत होत्या... त्यांना चाहूल लागताच त्यांनी दरवाज्याकडे पाहिलं आणि हसत दोघांना जवळ बोलावलं
दोघांनीही सुशीला बाईंना वाकुन त्यांचे आशीर्वाद घेतले...
सुशीला बाई : सदा सुखी रहा...
( सुशीला बाई यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते लग्नाला फक्त अक्षता टाकून निघून आल्या त्यांची दगदग झाल्याने त्यांची तब्येत जास्त बिघडते म्हणून त्या घरी आल्या...)
सुशीला बाई हर्षाला न्याहाळत म्हणाल्या बापरे माझी नातसून तर फोटो पेक्षाही जास्त सुंदर आहे होना चिकू.....अगदी नक्षत्रासारखी दिसतेस गं......शिवम ने एक सुस्कारा सोडल.....तसं त्या हर्षाला जवळ बोलावून तिच्या कपाळावर ओठ टेकवतात.....तशी हर्षां गालात गोड हसते
चिकु माझ्या नातसूनेला अजिबात त्रास द्यायचा नाही हा ....शिवमला आजीने हर्षा समोर चिकू म्हटलं म्हणून राग आला होता पण काय करणार..... आता हे चालतच राहणार
तेवढ्यात दोघंही देवघरात जाऊन देवाचं दर्शन घेऊन हॉलमध्ये आले आले.....शिवम वैतागूनच त्याच्या रुममध्ये निघुन गेला...
कुसुम हर्षाला घेऊन रुममध्ये गेली
हर्षा रूम बघूनच हैराण झाली गेस्ट रुमच येवढी सुंदर होती की एकदम पॉश निटनेटकी....
" हर्षा तुला काही लागलं तर निःसंकोचपणे आवाज दे माझी रुम इथेच आहे.... कुसुम तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या निघून गेली "
हर्षाला माधवीची आठवण झाली....तिने लगेच माधवीला कॉल केला
आणि २ सेकंद मध्येच फोन उचलला
" हॅलो सोनू क...शी आहे..स ...बाळा ... गृहप्रवेश झाला ना
कसे आहेत सगळे काही त्रास नाही ना..."
तेवढ्यात विजयराव म्हणाले माधवी काही काय बोलतेय आजच ती सासरी गेलीये कसला त्रास असेल...
"अगं मम्मी इथं सगळे चांगले आहे खुप काळजी घेतात तू नको टेंशन घेऊस आताच रुममध्ये आले आणि खुप दमलेय गं "
"होना सोनू तु आराम कर परत उद्या सकाळी लवकर उठायचं आहे पहिल्या दिवशीच सासरी उशीरा उठशीन काय आता तु त्या घरची सुन आहेस त्यामुळे तुला सांगते ह् सोनु " माधवी
" हो गं मम्मी करेल मी प्रयत्न अलार्म लावुन ठेवते " हर्षा
तसं थोडंफार बोलून हर्षा फोन ठेवून देते .....तेवढ्यात दिशा रुममध्ये येते...
" दि किती सुंदर घर आहे हे मी थोडं फार फिरून आले आदिती आणि मानसीने मला दाखवलं आजून तर काहीच नाही मी अर्धच पाहिलं खुप मोठ घर आहे वॉव दि तुझी तर मज्जाच मज्जा "
दिशाचं वेडपण पाहून हर्षा नी तर कपाळावर हातच मारुन घेतला
" जा आधी फ्रेश हो मी पण दुसरी साडी घालते सकाळी लवकर उठायचं आहे आवर पटकन....." हर्षा
हर्षा तर थकल्यामुळे लगेच झोपी गेली.....
*************************************
क्रमशः
©® ~ पल्लवी