Kimiyagaar - 43 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 43

Featured Books
Categories
Share

किमयागार - 43

किमयागार -पिरॅमिड
प्रवास परत सुरू झाला. किमयागार म्हणाला, मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. तरुणाने आपला घोडा जरा किमयागाराच्या घोड्याजवळ नेला. फार पूर्वी टिबेरीयस हा रोमचा सम्राट होता. त्या राज्यात एक भला माणूस व त्याची दोन मुले राहत होती. एक मुलगा सैन्यात होता आणि तो मोहीमेवर खूप दूर होता. दुसरा मुलगा कवी होता. तो आपल्या कवितांमुळे राज्यात प्रसिद्ध होता. एका रात्री वडिलांच्या स्वप्नात देवदूत आला व म्हणाला, तुझ्या दोन मुलांपैकी एका मुलाचे शब्द प्रसिद्ध होतील आणि अनेक पिढ्या ऐकले जातील. भल्या माणसाला आनंद झाला कारण देवदूताने अभिमान वाटावा अशी गोष्ट सांगितली होती. काही दिवसांनी एक मुलगा रथाखाली सापडत होता, त्याला वाचवताना तोच रथाखाली जाऊन मृत्यू पावला. त्याने आयुष्य खरेपणाने व चांगली कर्मे करीत घालवले असल्याने तो स्वर्गात गेला. तेथे त्याला तो देवदूत भेटला. देवदूत म्हणाला, तू एक भला माणूस होतास, मी तुझी एक इच्छा पुर्ण करीन.‌ भला माणूस म्हणाला, तुम्ही मला स्वप्नात सांगितले होते, माझ्या मुलाचे शब्द प्रसिद्ध होतील. कोणत्याही पित्याला ज्याने आपल्या मुलांना काळजीने ‌नीट वाढवले , शिक्षण दिलेले असते, आपला मुलगा प्रसिद्ध झालेला बघणे आवडेल. भविष्यकाळातील माझ्या मुलाचे शब्द मला पाहायचे आहेत. देवदूताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व दोघे भविष्य काळात गेले. तिथे एका मैदानावर लोक होते व काही बोलत होते. तो माणूस म्हणाला, मला माहीत होते माझ्या मुलाच्या कविता अमर होणार आहेत. देवदूत म्हणाला, तुझा जो मुलगा कवी होता त्याच्या कविता प्रसिद्ध होत्या पण टिबेरीयसचे राज्य संपल्यावर लोक त्या विसरले. तुझ्या सैन्यात असलेल्या मुलाचे शब्द प्रसिद्ध आहेत. तुझा सैन्यात असलेला मुलगा पुढे सैन्य प्रमुख झाला. त्याचा एक नोकर खूप आजारी पडला. सैन्य प्रमुखाने एका वैद्याबद्दल ऐकले होते की तो लोकांना बरे करतो.
तो त्या वैद्याच्या शोधात निघाला प्रवासात त्याला कळले की तो वैद्य देवाचा मुलगा आहे. त्याला बरे झालेले लोक भेटले. नंतर तो त्या वैद्याला भेटला. त्याने आपल्या नोकराच्या आजारपणाविषयी सांगितले. तो वैद्य त्याच्या बरोबर यायला तयार झाला. पण सैन्य प्रमुखाने ओळखले होते की वैद्य साक्षात देवाचा मुलगा आहे.
त्याने वैद्याला जे सांगितले ते शब्द अविस्मरणीय आहेत.
हे परमेश्वरा, तुम्ही माझ्या बरोबर यावे इतकी माझी पात्रता नाही, तुम्ही फक्त आशिर्वाद द्या माझा नोकर बरा होईल.
किमयागार म्हणाला, प्रत्येक माणूस जगाच्या इतिहासात एक प्रमुख भूमिका निभावत असतो पण त्याला ते माहीत नसते.
तरुणाच्या मनात आले, एका मेंढपाळाच्या आयुष्यात जीवनविषयक प्रश्नाना इतके महत्व प्राप्त होईल असे कधी वाटलेच नव्हते.
किमयागार म्हणाला, पुन्हा भेटू. तरूण म्हणाला हो, पुन्हा भेटू.
तरुणाचा प्रवास सुरू झाला. तो वाट बघत होता, ह्रदय कधी सांगतेय खजिना इथे आहे. पण त्याचे हृदय वेगळेच बोलत होते. ते त्याला एका मेंढपाळाची गोष्ट सांगत होते जो मेंढ्यांना सोडून त्याला दोनदा पडलेल्या स्वप्नाच्या मागे धावला होता. ते नियती व अशा काही लोकांबद्दल सांगत होते जे स्वप्न पूर्ती साठी प्रयत्न करत होते. प्रवास, शोध, पुस्तके याबद्दल सांगत होते.
अचानक ते म्हणाले, तुझ्या डोळ्यांतून अश्रू जिथे येतील तिथे तुला खजिना सापडेल.
तरूण टेकडीवर हळूहळू चढत होता. पोर्णिमेचा प्रकाश पसरला होता. ओॲसिस सोडून एक महिना होत आला होता. वाळूच्या टेकडीवर पडणाऱ्या किरणांच्या सावल्या समुद्राच्या लाटां सारख्या दिसत होत्या.
टेकडीवर चढल्यावर त्याला चमकणारी वाळू आणि इजिप्तचे पिरॅमिड दिसले. तरुणाने देवाचे आभार मानले कारण त्याने नियतीच्या शोधात निघण्याचा विश्वास निर्माण केला, आणि मग राजा, व्यापारी, इंग्रज आणि किमयागार भेटले आणि त्याला त्याची प्रेमिका भेटली होती जीने सांगितले की, प्रेम माणसाला भाग्य शोधण्यापासून परावृत्त करत नाही.
त्याला वाटले असते तर ओॲसिसवर परत गेला असता, फातिमा कडे जाऊ शकला असता, मेंढपाळ झाला असता. किमयागाराला जगाची भाषा कळत होती, शिशाचे तो सोने करू शकत होता तरी तो वाळवंटात राहत होता, त्याला स्वतःचे ज्ञान कुणाला दाखवायची गरज वाटत नव्हती. तरुणाने स्वतःला सांगितले, भाग्य शोधण्याच्या प्रयत्नात त्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या आणि त्याने कधी विचारही केला नसता असे अनुभव आले होते.