Kimiyagaar - 42 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 42

Featured Books
Categories
Share

किमयागार - 42

तरुणाने आकाशाकडे पाहीले आणि त्याला कळले की सर्वत्र शांतता पसरली आहे.
आणि अचानक त्याच्या ह्रदयातून उर्मी आली आणि तो प्रार्थना करू लागला.
त्या प्रार्थनेत मेंढ्यांना नवीन कुरणे मिळाल्याबद्दल आभार नव्हते, तरुणाला क्रिस्टल विक्रीमध्ये वाढ होण्याची इच्छा नव्हती, तो ज्या स्रीला भेटला होता ती त्याची वाट बघत राहूदे अशी विनंतीही नव्हती.
या शांततेत त्याच्या लक्षात आले की, वाळवंट, वारा, सूर्य हे पण परमात्म्याचे संकेत कळून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे मार्ग शोधत आहेत आणि 'पाचूच्या गोळी' वर काय लिहिले असावे ते समजण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्याला कळले होते, पृथ्वी व आकाशात शकुन चिन्हे पसरली आहेत आणि त्यांच्या दिसण्यामागे कोणतेही कारण नव्हते.
त्याच्या लक्षात आले की वाळवंट, वारा, सूर्य, मानव यांच्यापैकी कोणालाच त्यांची निर्मिती का झाली आहे ते माहीती नाहीये.
पण परमात्म्याकडे या सर्वासाठी कारण आहे, तो एकच असे चमत्कार करू शकतो. समुद्राचे वाळवंट करू शकतो व माणसाला वारा.
कारण सहा दिवसांच्या परिश्रमांनतर निर्माण झालेली ही चित्राकृती विश्वाला अशा बिंदूला
घेऊन आली होती जीचे रुपांतर महत्कार्यात झाले आहे आणि ते फक्त त्या हातालाच माहीत आहे.
त्याला कळले की, परमेश्वराच्या आत्म्याचा एक भाग जगदआत्मा आहे आणि तरुणाचा आत्माही त्याचाच भाग आहे
आणि म्हणूनच तरुणही चमत्कार करू शकतो.
त्यादिवशी जे 'सिमम' वादळ झाले होते तसे पूर्वी कधीच झाले नव्हते.
त्यानंतर पिढ्यानपिढ्या अरब लोकांच्यात वारा बनलेल्या तरुणाची कथा सांगितली जात राहीली. सर्वात सामर्थ्यशाली टोळीप्रमुखा समोर ही घटना घडली होती आणि तो कॅंपही उध्वस्त झाला असता.
जेव्हा वारा थांबला तेव्हा, सगळ्यानी‌ तरुण जेथे होता तिथे पाहीले पण तरुण तेथे नव्हताच, तो कॅंपपासून लांब अंतरावर वाळूने माखलेल्या पहारेकऱ्याजवळ उभा होता.
सर्व लोक चमत्काराने चकित झाले होते पण किमयागार मात्र हसत होता कारण त्याला त्याचा खरा शिष्य मिळाला होता.
दुसऱ्या दिवशी प्रमुखाने त्या दोघांबरोबर काही सैनिक दिले व सांगितले की त्याना वाटेल तोपर्यंत सैनिक त्यांच्याबरोबर राहतील.
तरूण म्हणाला, तुम्ही मला जगाची भाषा शिकवली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. किमयागार म्हणाला मी फक्त तुला प्रेरित केले.
किमयागार -सोने - Girish
ते दोघे प्रवास करत एका कॉप्टिक मठापाशी पोहोचले. किमयागार घोड्यावरून उतरला आणि सैनिकांना परत जाण्यास सांगितले. किमयागार म्हणाला, आता पिरॅमिड तीन तासांच्या अंतरावर आहेत.
किमयागाराने मठाचे दारात हाका मारल्या तेव्हा एक काळ्या पेहरावातील एकजण बाहेर आला, ते दोघे कॉप्टिक भाषेत बोलले आणि किमयागाराने तरुणाला आत बोलावले. किमयागार म्हणाला, मी त्याचे स्वयंपाक घर वापरण्याची परवानगी मागितली. ते दोघे स्वयंपाकघरात गेले. किमयागाराने शेगडी पेटवली. त्या माणसाने शिसे आणले. किमयागाराने ते लोखंडी तव्यावर ठेवलें.
जेव्हा त्या शिशाचा रस झाला तेव्हा किमयागाराने एक पिवळे भांडे काढले व त्यातून मेणात गुंडाळलेली अतिशय पातळ चांदी काढली आणि ती त्या रसात टाकली.
ते मिश्रण लाल रंगाचे दिसत होते. किमयागाराने तवा शेगडीवरून खाली उतरवला‌ व मठातील माणसाशी युद्धाबद्दल बोलू लागला. तो माणूस म्हणाला, युद्ध बरेच दिवस चालेल असे दिसते. अनेक तांडे युद्ध थांबण्याची वाट पहात गिझा येथे थांबले आहेत. तवा थंड झाला तेव्हा तो माणूस व तरुण चकीत झाले कारण तव्यात शिसे नव्हे तर सोने होते.
तरूण म्हणाला, मी पण एक दिवस हे करायला शिकेन. किमयागार म्हणाला, हे माझ्या भाग्यात लिहीले आहे, तुझ्या नाही.
मला फक्त तुला हे कसे होते ते दाखवायचे होते. ते बाहेर आले. किमयागाराने सोन्याचे चार तुकडे केले. एक तुकडा मठातील माणसाला दिला व म्हणाला यात्रेकरूंच्या सोयी साठी वापर.
तो म्हणाला हे माझ्या गरजेपेक्षा जास्त आहे. किमयागार म्हणाला, असे म्हणू नका कारण नियति ऐकत असते आणि पुढील वेळी कमी मिळवून देते.
किमयागाराने एक तुकडा तरुणाला दिला व म्हणाला, तू सैन्य प्रमुखाला दिलेस त्याबदल्यात हे घे , तरुणाला पण वाटले की याची किंमत दिलेल्या पेक्षा जास्त आहे, पण तो काही बोलला नाही कारण मठातील माणसाला किमयागार काय म्हणाला ते त्याने ऐकले होते. मी स्वतःला एक तुकडा घेतोय कारण मला परत जायचे आहे, किमयागार म्हणाला.
चौथा तुकडा त्याने मठातील माणसाला दिला व सांगितले की, हा तरुण परत इथे आला तर त्याला दे.‌
तरूण म्हणाला, मी तर खजिन्याच्या शोधात निघालोय आणि मी खजिन्याजवळ पोहोचलोय.
किमयागार म्हणाला, तुला तो सापडेलच, पण तू आतापर्यंत दोनदा तुझ्याकडे असलेले सर्व गमावले आहेस, एकदा चोरामुळे व एकदा सैन्य प्रमुखामुळे. मी एक म्हातारा व श्रद्धाळू माणूस आहे आणि माझा म्हणींवर विश्वास आहे.
प्रत्येक घडणारी घटना परत घडेलचं असे नाही पण जे दोनदा घडते ते तिसऱ्यांदा घडू शकते.