Kimiyagaar - 41 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 41

Featured Books
  • हीर... - 28

    जब किसी का इंतज़ार बड़ी बेसब्री से किया जाता है ना तब.. अचान...

  • नाम मे क्या रखा है

    मैं, सविता वर्मा, अब तक अपनी जिंदगी के साठ सावन देख चुकी थी।...

  • साथिया - 95

    "आओ मेरे साथ हम बैठकर बात करते है।" अबीर ने माही से कहा और स...

  • You Are My Choice - 20

    श्रेया का घरजय किचन प्लेटफार्म पे बैठ के सेब खा रहा था। "श्र...

  • मोमल : डायरी की गहराई - 10

    शाम की लालिमा ख़त्म हो कर अब अंधेरा छाने लगा था। परिंदे चहचह...

Categories
Share

किमयागार - 41

किमयागार - वारा
तुमच्या मनात प्रेमभावना असेल तर तुम्ही काहीही करू शकता. घटना घडत जातात. माणूस वारा बनू शकतो, अर्थात वाऱ्याने मदत केली तरचं.
खरेतर हे बोलणे वाऱ्याला विचित्र वाटत होते. त्याने आपला वेग वाढवला, वाळू उंच उडू लागली, पण त्याला कळले की, आपण जरी असे केले तरी, माणसाला वारा कसे बनवायचे आपल्याला माहीत नाही. आणि प्रेमाबद्दल काही माहिती नाही.
वारा म्हणाला, मी माझ्या प्रवासात लोकांना
प्रेमाबद्दल बोलताना आणि आकाशाकडे बघताना पाहीले आहे. तो आता स्वतः वर रागावला होता. त्याला त्याच्या मर्यादा कळल्या होत्या.
तो म्हणाला आपण आकाशाला विचारून बघुया.
तरुण म्हणाला, या जागेवर असे वादळ उठव की सूर्यपण दिसला नाही पाहिजे, मी आकाशाकडे (परमेश्वर) पाहतो.
आणि वारा पूर्ण क्षमतेने वाहू लागला, आकाशात वाळू पसरली.
सूर्य पण त्या ढिगाऱ्यात एखाद्या सोनेरी वर्तुळासारखा दिसत होता.कॅंपवरील लोकांना काही दिसत नव्हते.
हे वादळ समुद्रातील वादळापेक्षा वेगवान होते. त्यांचे घोडे ओरडत होते आणि हत्यारांवर वाळू साचली.

त्यांना तरुण दिसतचं नव्हता. प्रमुख म्हणाला, मला अल्लाहची महानता अनुभवायची होती. प्रमुखाने दोन माणसे अशी ओळखली होती जी घाबरली होती , त्यांना तो काढून टाकणार होता कारण वाळवंटातील माणसे घाबरत नाहीत.
तरूण सूर्याला म्हणाला, तू प्रेमाबद्दल जाणतोस ना?.
तुला जर प्रेम माहीत असेल तर तू जगदआत्म्याला पण जाणत असशील कारण तो प्रेमानेच बनला आहे.
सूर्य म्हणाला, मी जेथे आहे तेथून मी जगदआत्म्याला पाहू शकतो. तो माझ्या आत्म्याशी संभाषण करत असतो.
आम्ही दोघे मिळून झाडे झुडपे याना वाढवतो, मेंढ्याना निवारा शोधण्यात मदत करतो.
मी पृथ्वी पासून खूप दूर आहे पण मी प्रेम जाणतो. मला माहीत आहे की मी पृथ्वीच्या थोडा जास्त जवळ आलो तर सर्व नष्ट होईल. जगदआत्मा व मला एकत्र राहावे लागते,
"मी त्याला जीवन व उब देतो आणि तो मला जगण्याचे कारण 'देतो.
म्हणजे तुला प्रेम माहीत आहे.

किमयागार -सूर्य - Girish

हो, कारण आम्ही दोघे या विषयावर बोलत असतो. पण प्रश्न असा आहे की आतापर्यंत फक्त खनिजे व भाज्यांना माहीत आहे की सर्व वस्तूमात्र व प्राणिमात्र एकचं आहेत.
लोखंडाने तांब्यासारखे असणे गरजेचे नाही, किंवा तांब्याने सोन्यासारखे.
प्रत्येक जण आपाआपले अद्वितीय काम करत असतो. निर्मिती करणाऱ्याचा हात पाचव्या दिवशी थांबला असता तर वेगळेच घडले असते. शांती व ताळमेळ राखला गेला असता. पण सहावा दिवस उजाडला.
सूर्य म्हणाला.
तरूण म्हणाला, तू हुशार आहेस, कारण तू सर्व दूरून पाहत असतोस. पण तुला प्रेमाबद्दल माहीती नाही. सहावा दिवस आला नसता तर मानव अस्तित्वात नसता, तांबे तांबेच राहीले असते आणि शिसे हे शिसे.
प्रत्येकाचे स्वतःचे भाग्य असते आणि ते कधीतरी कळतेचं त्यामुळे प्रत्येक वस्तू स्वतःला चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करत असते , विकसित करत असते.
आणि या प्रक्रियेत असा एक क्षण असेल की सर्व जगदआत्म्यात सामावले जाऊन एकचं होईल. सूर्याने जास्त तेजाने तळपण्याचे ठरवले, वारा हे सर्व पाहत होता त्याने आपला वेग वाढवला जेणेकरून तरुणाचे डोळे दिपू नयेत.
तरूण म्हणाला, किमयेचे अस्तित्व यासाठीच आहे, त्यामुळे प्रत्येक जण आपल्या खजिन्याचा शोध घेईल आणि खजिना
सापडल्यावर जीवन चांगले करेल.
शिसे आपले काम करत राहील जोपर्यंत त्याची गरज संपत नाही मग ते स्वतःला सोन्यात परावर्तित करेल.
किमयागार हेच करतात. ते स्वतःला अधिकाधिक चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्या आसपास पण सर्व चांगले बदल घडतात.
सूर्य म्हणाला, मला प्रेमाबद्दल माहीती नाही असे का म्हणालास.
कारण प्रेम हे वाळवंटासारखे स्थिर नसते किंवा वाऱ्यासारखे सगळीकडे फिरत नसते. आणि दूरून बघणे म्हणजे प्रेम नव्हे.
प्रेमात माणसाला सुधारण्याची व जगद्आत्म्याला बदलण्याची ताकद असते.
प्रेम ही शक्ती आहे.

मी पहिल्यांदा जेव्हा यातून गेलो तेव्हा मला वाटले की जगदआत्मा परिपूर्ण आहे पण नंतर माझ्या लक्षात आले की, तो पण इतर निर्मित वस्तू सारखा आहे त्यालाही भावना आहेत.
आपण स्वतःचा विकास करत असतो आणि आपण ज्या जगात राहतो ते उत्तम किंवा वाईट होते तेही आपण स्वतःला किती उत्तम अथवा वाईट बनवतो त्यावर अवलंबून असते.
सूर्य म्हणाला, तुला काय हवे आहे ते सांग. तरूण म्हणाला, मला वाऱ्यात परावर्तित व्हायचे आहे. निसर्ग मला निर्मितीमधील सर्वात उत्तम व ज्ञानी निर्मिती मानतो पण मला माणसाला वारा कसे करायचे माहीत नाही. तरूण म्हणाला, मग मी कोणाला विचारू.
सूर्य विचार करू लागला.
वारा सगळे नीट ऐकत होता आणि सगळ्या जगाला ओरडून सांगू इच्छित होता की, सूर्याच्या ज्ञानाला पण मर्यादा आहेत. जगाची भाषा बोलताना तो तरुणासमोर निरुत्तर झाला आहे.
सूर्य म्हणाला, तू ज्या हाताने हे सर्व लिहीले आहे त्यालाच विचार.