Ekapeksha - 9 in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - 9

Featured Books
  • क्या लड़की होना गुनाह है

    आज की कहानी उन सभी लड़कियों के लिए जो अपने परिवार के बीच होत...

  • Black Queen ( A Mysterious Girl )

    Rathore's club ( काल्पनिक नाम )यह एक बहुत बड़ा क्लब था ज...

  • Revenge Love - Part 1

    जय द्वारिकाधिश..जय श्री कृष्ण.. जय भोलेनाथ...... ॐ नमः शिवाय...

  • My Devil Hubby Rebirth Love - 48

    अब आगे थोड़ी देर बाद डॉक्टर का केबिनरूही और रुद्रा डॉक्टर के...

  • जिंदगी

    खुद के एहसासों को कुछ इस तरह बिखेरना चाहती हूमैं रहूं तुझमें...

Categories
Share

एकापेक्षा - 9

तर वर्कशॉप मधील आमचे बसण्याचे स्थान हे एका मशीनचा मागे निर्धारित होते जेणेकरून आम्ही काय करतो आहे हे सरांना आणी अजुन कुणाला दिसणार आणि कळणार नाही. तर आता वेळ आलेली होती राकेश सोबत थोडी गंमत करण्याची आणि त्याला अनपेक्षीत आश्चर्यचकीत करण्याची, राकेश त्याचे कार्य करण्यासाठी मशीन जवळ गेला आणि त्याने आमचाकड़े त्याची नजर वळवली, तोच आम्ही सगळ्यांनी त्याला आश्वस्त करण्यासाठी एकमेकांशी गप्पा गोष्टी करने सुरु केले. आम्हा सगळ्यांना आपापसात गप्पागोष्टींमध्ये गुंग बघुन राकेशने त्याचा आगळ्या वेळ्या कार्याला सुरुवात केली. तर राकेशने त्याचे डोळे बंद केले आणि तो आपल्या कार्यात गुंग झाला काही क्षणात त्याने डोळे उघडले तर काय बघतो आम्ही सगळे जण त्याचा समोर आमचा हाताची ओजळ करून उभे होतो आम्हाला असे अनपेक्षीत बघुन राकेशला आधी आश्चर्याचा धक्का बसला आणि मग त्याला लाज वाटू लागली. तो लाजेने पाणी पाणी होवून तेथून इकड़े तिकडे पळू लागला, तो जेथे जायचा
तेथे जाऊन आम्ही त्याला म्हणु लागलो, " राकेश मला सुद्धा देना." हे ऐकून तो आणखी लाजेने इकड़े तिकड़े जाऊन लपायचा. या गोंधळात त्या दिवसाचे आमचे प्रत्याक्षिक मात्र अपूर्ण राहिले परन्तु आम्हाला त्या गंमतीचा परिपूर्ण आनंद भोगायला मीळाले, परन्तु हे काय ती गंमत कसली होती मी तर तुम्हाला सांगितली नाही. तर त्या दिवशी राकेशने जसे डोळे बंद केले आम्ही सगळे वाऱ्याचा वेगाने त्याचा अवतीभवती जाऊन उभे झालो, आम्ही बघीतले तर राकेश काहीतरी बडबड करत होता आणि मग त्याने डाव्या हाताची ओंजळ बनवली आणि उजव्या हाताने आपण जसे प्रसादाचे वितरण करतो त्या प्रमाणे त्याचा सभोवताली तो त्याचे हातवारे करु लागला होता, मग क्षणातच त्याने मशीन कडून काहीतरी घेण्याचे हातवारे केले. त्यावेळेस तो काय बोलत होता काय करत होता याकडे दूर्लक्ष करून आम्ही फक्त आणि फक्त त्याचा अनपेक्षित वर्तनाचा आनंद घेत राहिलो. त्यानंतर त्याने डोळे उघडले आणि पुढ़ील गंमत मी आधीच तुम्हाला सांगितली आहे, ती गंमत जीतकी होऊ शकते तीतकी मी लिहून तुमचा पुढे सादर करण्याचा प्रयत्न केला परन्तु याचापेक्षा तो प्रसंग तूमचा स्वतःचा डोळ्यांनी बघून तुम्हाला अनुभवतांना यापेक्षा ही अधिक आनंद झालेला असता.
तर मित्रांनो, माझा जीवनातील आणखी एक प्रसंग मी तुमचा सोबत शेअर केला. यासारखे अनेक प्रसंग आता मी टप्या टप्याने तुमचासोबत शेअर करणार आहे. या दरम्यान माझा क्रम हा इकड़े तिकड़ होणार आहे कारण की मला ज्यावेळेस जो प्रसंग आठवणार ती वेळ कधी माझा शालेय जीवनातील असेल, माझा बालपणातील असेल, माझा कॉलेज अथवा माझा वर्तमान जिवनातील असेल. आता मीं तुम्हाला पुन्हा एकदा माझा शालेय जीवनाचा काळात नेतो. तर हा प्रसंग आहे मी आठवीत असतांनाचा काळाचा, त्यावेळेस आम्ही नुकतेच सातव्या वर्गात उत्तीर्ण झालेलो होतो आणि त्यावेळेसचा आमचा बुद्धिमानाने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेलो होतो. तर आमचा शाळेतील शिक्षकांनी शाळेतील चारही अ ब क ड या वर्गातून हुशार आणि थोडे चांगले विद्यार्थी यांना इंग्लिश मीडियम मध्ये दाखला घेण्याचा सल्ला दिला आणि त्याचावर विचार करून सांगायला सांगीतले. तर आमचा सोबतचा मीत्रांचा नावाचा सोबत माझे नाव होते म्हणून आणि इंग्रजी विषयाची मला लहानपणापासून खुप आवड असल्यामुळे मी इंग्लिश मीडियमचा वर्गात दाखला घेतला. तर तेव्हा आमचा शाळेत नुकताच नविन शिक्षक याचा
नविन स्टाफ आलेला होता, तेव्हा नवीन वर्ग सोबत नवीन शिक्षक आमचासाठी सगळ नवीन नवीन होते. तर त्या शिक्षक यांत आमचे एक नवीन मुख्यध्यापक आले होते मला त्यांचे नाव आता आठवत नाही. आणखी एक गोष्ट आवर्जुन सांगतो की कुणाचा सुंदरतेचा किंवा कुरुपतेचा उपहास हा कधी करायचा नसतो आणि कधी केला नाही पाहिजे. परन्तु हा नियम बालपण आणि त्या काळात अल्पवयीन बालक यांना लागु होत नाही, कारण की तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी आपल्या त्या काळात कधी ना कधी कुणाचा तरी अबोधपणे उपहास हा केलेला असेल, तर त्याबद्दल
मी तुम्हा सगळ्यांची मनभावनेने क्षमा मागतो, कारण की मला आज तीच थट्टा आणि उपहास तुमचा पुढ़े येथे करावा लागेल आणि या प्रसंगासाठी त्याच शब्दात ती सादर करावी लागेल. त्याचा शिवाय तो प्रसंग ऐकण्यात आनंद येणार नाही.

तर मी आत्ता वळतो आपल्या या प्रसंगाकड़े, मित्रांनो, आमचा शाळेतील नविन शिक्षक यांचात आमचे नवीन मुख्याध्यापक हे स्वतःला नेहमी
सर्वगुणसंपन्न असे सगळ्यांना भासवत असायचे. परन्तु जेव्हा कोणी त्यांचा तावडीत सापडले तर त्या बिचाऱ्याची काही खैर नसायची. ते त्यावेळेस रिटायमेंटचा जवळ असतील म्हणजे ५० ते ५५ वर्षाचे. त्यांचा चेहरा हा गोरा गुमटा असून गोल गोल मोठ्या चेंडूचा प्रमाणे म्हणजे बास्केटबाल प्रमाणे होता. विशेष म्हणजे त्यांचा तोंडात दात हे नाम मात्र उरलेले होते. त्यात आणखी विशेष म्हणजे त्यांचा तोंडात वरचा दोन्ही हिरडयाचा बाजूचे दोन दात पूर्ण होते आणि मधले हे दात तुटलेले होते. त्यामुळे त्यांचा चेहरा मला माफ़ कराल परन्तु एख़ाद्या बुलडॉग सारखा दिसायचा.

तर ते प्रिंसिपल असल्यामुळे त्यांना शाळेतील ऑफिस मध्ये बसण्या आणि सम्पूर्ण शाळेत फेरफटका मारण्याशीवाय दुसरे कार्य दिलेले नव्हते. त्यानुसार ते सकाळी शाळेत आल्यावर प्रथम शाळेचा ऑफिस मधील कार्य करून मग सम्पूर्ण वर्गात फेरफटका मारण्यासाठी नीघायचे. त्या दरम्यान कुठल्या वर्गाचे शिक्षक त्यांचा तासाला गैरहजर असतील तर ते स्वतः त्या वर्गात जाऊन शिकवणी ध्यायचे. तर आमचे प्रिंसिपल सर हे मराठी फार उत्तम रीतीने शिकवायचे. ते कुठला धडा म्हणा की काव्य हे त्या संबंधित विषयात संपूर्णपणे शिरून ते तो संबंधित विषय शिकवायचे.
तर त्या दिवशी आमचा मराठी शिकवणाऱ्या शिक्षिका गैरहजर होत्या, त्यामुळे आमचा वर्गात आमचा गोंधळ सुरु होता, तर आमचे सर शाळेचा फेरफटका मारण्यासाठी नीघाले असतांना आमचा वर्गातून त्यांना आमचा बोलण्याचा आवाज आला आणि ते आमचा वर्गाचा बाहेर येऊन उभे झाले. आम्हा विद्यार्थ्यांचे त्यांचाकड़े लक्ष नव्हते म्हणून आम्ही गोंधळ करत राहिलो मात्र त्यांनी तेथे उभे राहून सगळ ते अवश्य बघीतले. मग पाच मिनिटांनी ते थेट आमचा वर्गात शिरले आणि आमचा पुढे येऊन उभे झाले, तेव्हा मात्र आमची घसरगुंडी झालेली होती आणि आम्ही पटापट आपापल्या बेंचवर जाऊन शांत बसून गेलो. आता आमचा वर्गात चीर शांतता पसरली होती, त्या क्षणी एक टाचणी सुधा पडली तर तीचा आवाज स्पष्ट ऐकायला येईल इतकी शांतता पसरली होती. मग आमचे सर बोलले, "काय रे तुमचे शिक्षक नाही आलेत काय? मग आमचातील एकाने सांगीतले," सर,आमचा शिक्षिका आज आल्याच नाही." मग त्यांनी
पुन्हा विचारले, " हा कुठल्या विषयाचा तास आहे. मग आम्ही सांगीतले, " सर हा मराठी विषयाचा तास आहे." तेव्हा ते फारच आानंदित झाले आणि त्यांना परम आनंदाची अनुभूती झाली.

शेष पुढील भागात 2