" बर दी.....तू काळजी नको करुस मी आता अभ्यास करणार आहे नंतर बोलतो." रुद्र ने बोलून कॉल कट पण केला.
तो नीट जेवत तरी असेल का..?? सगळं त्याच्या हातात द्यावं लागायचं आणि आता?? तिच्याविना करू शकेल का तो हे सगळं....
मिष्टिच्या मनात विचार घोळत होते.
विराज रुद्रच सगळं education चा खर्च पाहत होता... त्याने इतकं केल होत पण रुद्र एकटा कसा राहील हा पण प्रश्नच होता एक.......विराज आणि रूद्र मध्ये झालेल्या बोलण्याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती.
मिष्टीने मनात काहितरी विचार पक्का केला आणि मीरा आली म्हणून खाली तिला घ्यायला निघून गेली.
" आंटी मी आले." मीरा आल्याआल्या मिष्टीच्या पायाला बिलगत म्हणाली.
". अरे माझा बच्चा......कसा गेला आजचा दिवस मग??" मिष्टी तिला कडेवर उचलून घेऊन तिच्याशी बोलू लागली.
" मश्त गेला......मला भूक लागली." मीरा एवढीस तोंड करत म्हणाली.
" अरे बापरे!!.....म्हणजे आता टम्मीला काहितरी खायला दिलं पाहिजे ना?" मिष्टी
" येस."
" चला.....काय खाणार मग टम्मी??....... व्हेज रॅप्स खाणार की पराठा देऊ मश्त मश्त??" मिष्टी मिराच्या गालाची किशी घेत म्हणाली 😚
"अंमम...... पराठा " मीरा थोडा विचार करून म्हणाली.
" बर चालेल.....तू इथे बस तोपर्यंत मी गरम गरम पराठा घेऊन येते तुला." मिष्टी मीरा ला किचन मधेच असलेल्या उंच स्टूल वर बसवत म्हणाली.
" हो......तोपर्यंत मी काही मदत करू आंटी तुला??" मीरा मिष्टी कडे पाहत म्हणाली.
" काय मदत करणार ग सोनुली तू??" मिष्टी मिराकडे प्रेमाने बघत म्हणाली.
" तू थोडुशी अजून मोठी झालीस ना की मला मदत कर हा." मिष्टी हसत तिला समजावत बोलली.
" थांब.....हे घे.......आणि हे हळू हळू पील कर आणि खा......तोपर्यंत मी पराठा बनवते.....ठीके??" मिष्टी तीच्याकडे काही भिजवलेले बदाम देत म्हणाली.
" ओके आंटी." मीरा
मिष्टीने पराठे बनवून गरम गरम मीरा साठी एका प्लेट मध्ये काढला ....... गर्निशिंग म्हणून टोमॅटो केचपने एक स्मायली काढली आणि तिला घेऊन डायनिंग टेबल वर जाऊन बसली.
फुंकर मारून तिने एक घास प्रेमाने मीराला भरवला.
" कसा आहे??" मिष्टी मिराकडे पाहत विचारलं.
" Yummy and cute अगदी तुझ्यासारख आंटी" मीरा त्या स्मायलीकडे पाहत म्हणाली.
मीरा तिला मिळणार मिष्टीच अटेंशन एन्जॉय करत होती...... नाहीतर आतापर्यंत तिला ह्या घरात खूप एकट एकट वाटत होत..... विराज ही रात्रीच यायचा त्यामुळे मीरा आपापलाच काहितरी करत बसायची पण बाकीच्यांसारखा आपले ही कोणीतरी स्कूल मधून आल्यावर लाड करेल अस वाटायचं पण घरात तिच्याशी गीता (मीराला सांभाळायला ठेवलेली बाई) सोडून दिवसभर कोणीच बोलायच ही नाही आणि तिच्याजवळ फिरकायच ही नाही.
"आंटी मला सोडून नको जाऊ तू कधीच......तू खूप स्वीट आहेस." मीरा पराठा खाता खाता म्हणाली.
" हो ग माझं पिल्लू ते......नाही जाणार कधीच." मिष्ती ही मीराशी attach झाली होती.
मीराच खाऊन झाल तस दोघीही मीराच्या बेडरूम मध्ये गेल्या...... मिष्टी मिराचा होमवर्क घेत होती.......त्यातच संध्याकाळ कधी झाली हे कळलच नाही तिला.
विराज आज थोडा लवकरच घरी आला होता.....त्याने ब्लेझर काढत सोफ्यावर बसला.
"विराजबाबा....... कॉफी देऊ का??" रखमा
" रखमा मावशी मिष्टी कुठे आहे??......तिलाच सांगा आणि मी स्टडी मध्ये आणि तिथेच पाठवा." विराज एकदा किचन कडे नजर टाकत म्हणाला पण त्याला मिष्टीच्या ना पैंजणांचा आवाज आला ना तिच्या हातातल्या बागड्यांचा...... तस त्याच मन खट्टू झाल.
" ठीके..... म्या सांगते त्यांना." रखमा
विराज पायऱ्या चढत वर जाणार तेवढ्यात विराजने रखमाला परत हाक मारली.
" रखमा मावशी.....तिलाच पाठवा स्टडी मध्ये."
रखमा ने मान डोलावली.
रखमा मिष्टीला शोधत शोधत मीरा च्या रूम मध्ये आली तर दोघी ड्रॉइंग काढण्यात बिझी होत्या.
" ताईसाहेब तुम्ही इथे हायसा मी तुम्हाला केव्हापासन शोधत आहे. " रखमा म्हणाली.
" काय झाल रखमा मावशी??" मिष्टी रखमाकडे बघत म्हणाली.
" आव विराजबाबा आले आहेत.....त्यांना तुमच्याच हातची कॉफी हवी आहे...."
" बर....मी आलेच" मिष्टी
मिष्टी लगेच किचन मध्ये आली आणि कॉफी करायला ठेवली.
" आज हे एवढ्या लवकर कसे आले??.....रोज तर किती उशीर होतो यांना." मिष्टी विचार करत उकळत्या कॉफी कडे एकटक बघत होती.
" ताईसाहेब झाली ती कॉफी." रखमा गॅस बंद करत म्हणाली.
" हो....हो....." मिष्टी
तिने कॉफी एका मग मध्ये ओतली आणि थोड्या कुकीज ठेवून रखमा कडे ट्रे दिला.
" मावशी हे घ्या......त्यांना देऊन या कॉफी......" मिष्टी ट्रे देत म्हणली.
" विराजबाबांनी तुम्हालाच बोलावलं आहे स्टडी मध्ये." रखमा
" मला बोलावलं आहे त्यांनी??" मिष्टी प्रश्नार्थक नजरेने म्हणाली.
" होय......जाताना सांगून गेले की तुम्हालाच धाडा म्हणून." रखमा.
मिष्टिने मान हलवली आणि वर स्टडी रुमच्या दिशेने जायला निघाली.
विराजची बेडरूम, मीराची बेडरूम एका साइडला आणि त्याच मजल्याच्या दुसऱ्या बाजूला स्टडी रूम होती.
मिष्टी स्टडी रूम समोर उभी होती..... डिजिटल लॉक असल्यामुळे पासवर्ड किंवा फिंगरप्रिंट शिवाय कोणालाही स्टडी मध्ये ॲक्सेस नव्हता.
तिने दरवाजा नॉक केला.....आतून विराज ने रिमोटने उघडला.
मिष्टीने एक पाऊल आत टाकलं आणि स्टडी रूम कडे बघतच राहिली......
एकदम नीटनेटकी, साफसुधरी होती.....कुठेही पसारा नाही की धूळ नाही......एका बाजूला फाईल्सने भरलेलं रॅक होते..... विरजचा मोठा डेस्क...... त्यामागेच पुस्तकांनी भरलेलं शेल्फ होत.......डेस्क च्या समोरच 2 लेदरच्या खुर्च्या ठेवल्या होत्या......काही अंतरावरच मोठा सोफा होता.....त्यासमोर कॉफी टेबल होत....आणि सोफ्याच्या मागची डिझायनर भिंत वेगवेगळ्या फोटो फ्रेम्स ने सजवली होती...... विराजचे काही फोटो.....मिराचे काही लहानपणीचे फोटोज्.......आणि दोघांचेही एकत्र फोटो होते सगळे.
" मिष्टी माझी कॉफी गार होइल." विराज तिला अस रूमच निरीक्षण करताना पाहून म्हणाला.
" अनं......काय??" मिष्टी जी अजूनही सगळ पाहत होती ती त्याच्या बोलण्याने थोडी गोंधळली.
" मी म्हणालो की मला आधी कॉफी द्या आणि मग नंतर आरामात रूम पाहत बसा मला काहीच प्रॉब्लेम नाही." विराज हसत म्हणाला.
" सॉरी.... सॉरी ." तिने ओशाळून त्याला कॉफी मग आणि कुकीज ची प्लेट दिली.
त्याने नकळत तिच्या बांगड्यांवरून हात फिरवत मग घेतला.
तिच्या पायातल्या पैजणांचा आवाज आणि हातातल्या बांगड्यांची किणकिण ऐकल्यावर त्याला एकदम सुकून वाली फिलिंग आली 😌.....सकाळ पासून तो हेच मिस करत होता.
त्याने तिच्याकडे बघतच कॉफीचा मग तोंडाला लावला.......एकदम त्याला आवडते तशीच झाली होती कॉफी.
तिच्या हातांची चुळबुळ सुरू होती म्हणजे तिला काहीतरी बोलायचं आहे हे त्याला कळलं होत.
" सकाळी तुम्ही बनवून पाठवलेला उपमा छान झाला होता.....मी थांबणार होतो पण अचानक एक meeting प्रि- पोन झाली म्हणून जावं लागलं." विराज तिला कंफर्टेबल करायचं म्हणून बोलू लागला पण तिला clarification का देत होता त्यालाच माहिती😂......कारण आजपर्यंत त्याने कोणालाही तो अस का वागला हे कधीच explain केलं नव्हत.
" आणि जेवणाचा डबा??" मिष्टीने लगेच विचारलं तिला वाटल की तो दुपारी जेवायचं विसरला की काय??.....आपली उगाच असलेली काळजी ❤️
" हो तो पण खाल्ला .......भाजी छान झाली होती." विराज तिची धडपड बघून म्हणाला.
तिने फक्त एक छानशी स्माइल केली.
" अहो मला काहीतरी बोलायचं होत...... म्हणजे विचारायचं होत." मिष्टी त्याच्याकडे बघत म्हणाली.
" बोला." विराज कॉफी एन्जॉय करत म्हणाला.
" ते मी ऑफिस परत जॉईन केलं तर चालेल का??.......म्हणजे ते दिवसभर घरात बसून कंटाळा येतो...... मीरा ही सकाळी गेली की दुपारीच येते.....वाटल तर मी ती यायच्या आधी घरी येइन......मला माहिती आहे तुम्ही माझ्याशी लग्न तिला आई मिळावी म्हणून केलं आहे...... पण ऑफिस सांभाळून मी तिला ही सांभाळेन." मिष्टी भरभर बोलून गेली आणि उत्तराच्या अपेक्षेने त्याच्याकडे बघत राहिली.
त्याने शांतपणे त्याच्या हातातला मग खाली ठेवला.