Kimiyagaar - 39 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 39

Featured Books
Categories
Share

किमयागार - 39

तरुणाने किमयागाराला विचारले, माणसाचे ह्रदय त्याला मदत करत असते कां?
किमयागार म्हणाला, खरेतर जे‌ लोक स्वतःचे नशीब आजमावाण्याचा प्रयत्न करतात त्यानांच ते मदत करते, पण मुले, वृद्ध व्यक्तीना ते मदत करते. म्हणजे माझ्यावर कोणते संकट येणार नाही का?.
याचा अर्थ इतकाच की , ह्रदय त्याला शक्य ते सर्व करत असते.
त्या दुपारी ते एका टोळीच्या वस्तीवर पोहोचले. त्या वस्तीवर चांगले कपडे घातलेले अरब होते, पण ते हत्यारबंद होते.
ते हुक्का पित युद्धातील प्रसंगाविषयी बोलत होते. त्यांच्या पैकी कोणी या प्रवाशांकडे बघितले नाही.
तरुण म्हणाला, आपल्याला काही त्रास झाला नाही ते बरे झाले.
किमयागार म्हणाला, ह्रदयावर विश्वास ठेव, पण एक लक्षात घे तू वाळवंटात आहेस, हे लोक एकमेकांत लढाई करत आहेत, या आकाशाखाली जे राहतात त्यांना आजुबाजुला घडतं असलेल्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतात.
हे बोलणे चालू असताना त्यांच्या मागुन दोन घोडेस्वार आले. ते म्हणाले, तुम्ही येथून पुढे जाऊ शकत नाही, ही युद्ध भुमी आहे. किमयागार त्यांच्या डोळ्यात बघून म्हणाला, आम्ही फार दूर जाणार नाही आहोत.
तेव्हा ते म्हणाले जाउ शकता. तरूण म्हणाला, तुमच्या नजरेच्या प्रभावाने ते दोघे शांत झाले. किमयागार म्हणाला, डोळ्यात आत्म्याची ताकद असते.
क्षितिजापर्यंत दिसणारी पर्वतरांग पार केल्यावर किमयागार म्हणाला, आता दोन दिवसांत आपण पिरॅमिड पर्यंत पोहोचू.
तरूण म्हणाला, मला किमयागारी शिकवाल का?.
किमयागार म्हणाला, जगद्आत्म्याचे आकलन करून घेणे पण महत्वाचे आहे. खजिना शोधणे तुझ्या नशिबात लिहून ठेवले आहे.
तरूण म्हणाला, मला सोने बनवण्याबद्दल विचारायचे होते. किमयागार काही बोलला नाही.
ते जेवणासाठी थांबले तेव्हा तो म्हणाला, जगात सर्व गोष्टी विकसित होत असतात. सोने हे सर्वात विकसित आहे. कां ते विचारू नकोस, कारण मला फक्त एवढेच माहीत आहे की परंपरा नेहमी योग्य असतात. लोक ज्ञानी माणसांची भाषा समजून घेत नाहीत, सोन्याला विकासाचा भाग न मानता तो त्यांनी संघर्षाचा मुद्दा बनवला.
किमयागार - जगाची भाषा -
जगातील सर्व गोष्टी निरनिराळी भाषा बोलत असतात. एकेकाळी, उंटांचे ओरडणे फक्त एक ओरडणे होते, नंतर ते धोक्याची सूचना देणारे ठरले. एवढे बोलून तो गप्प बसला कारण त्याला वाटले की या सर्व गोष्टी किमयागाराला माहिती आहेत.
किमयागार म्हणाला, मला असे अनेक किमयागार माहिती आहेत जे स्वतःला कोंडून घेत असत आणि गोष्टी विकसित करत.
नंतर त्याना परिस सापडला आणि त्याना कळले की एखादी गोष्ट विकसित होताना आसपासच्या गोष्टी पण विकसित होतात. काही लोकांना अचानक परिस सापडतो पण असे लोक कमी असतात.
आणि काही असतात जे फक्त सोनेच शोधत असतात पण त्यांना कधीही त्याचे गुपित कळत नाही. ते हे विसरतात की, शिसे, तांबे, लोखंड यांचे स्वतःचे काही रुप, महत्व आणि दैव असते आणि जे इतरांच्या नशिबाशी खेळतात त्याना स्वतःचे भाग्य कधीच शोधता येत नाही.
किमयागाराचे शब्द आकाशात घुमले. किमयागाराने एक शिंपला उचलला व म्हणाला वाळवंट कधीतरी समूद्र होते. तरूण म्हणाला हो ते मला कळले आहे.
परत प्रवास चालू झाला.
सूर्यास्त होऊ लागला होता, आणि तरुणाच्या ह्रदयाने त्याला धोक्याचा इशारा दिला. ते आता मोठ्या टेकड्यांच्या भागात होते.
तरुणाने किमयागाराकडे पाहीले, त्याला काही जाणवले आहे का ते बघण्यासाठी पण किमयागाराच्या वागण्यात बदल दिसला नाही. थोड्याच वेळात तरुणाला दोन घोडेस्वार उभे असलेले दिसले. तो किमयागाराला हे सांगणार तोपर्यंत दोनाचे शंभर घोडेस्वार झाले होते. आणि सगळीकडे सैनिक दिसू लागले.
ते टोळीवाले होते. त्यांनी निळे कपडे, पागोट्याभोवती काळी रींग घातली होती. त्यांचे डोळे फक्त दिसत होते कारण त्यांनी चेहरे निळ्या बुरख्याने झाकले होते.
तेवढ्या अंतरावरून त्यांच्या डोळ्यातील आत्मिक ताकद कळत होती. ते डोळे मृत्यूची भाषा बोलत होते. त्या दोघांना त्यानी कॅम्पवर नेले आणि तंबूत बसलेल्या प्रमुखांपुढे उभे केले. व त्यातल्या एकाने सांगितले की हे हेर आहेत आम्ही याना शत्रूच्या कॅम्पवर पाहिले होते.
मी वाळवंटात फिरणारा आणि तारे ओळखणारा माणूस आहे, मला कोणत्याही सैन्याबद्दल माहीत नाही, त्यांच्या हालचाली बद्दल माहीती नाही.
मी या मित्राचा वाटाड्या म्हणून आलो आहे. किमयागार म्हणाला.
प्रमुखाने विचारले, तुझा मित्र कोण आहे?. तो किमयागार आहे. त्याला नैसर्गिक शक्तीचे ज्ञान आहे आणि तुम्हाला तो त्याची शक्ती दाखवू शकतो. किमयागार म्हणाला. तरुण हे सर्व भयचकीत होऊन ऐकत होता.
हा परका माणूस येथे काय करत आहे, एकाने विचारले. त्याने तुम्हाला देण्यासाठी पैसे आणले आहेत, तरुणाला काही कळायच्या आत किमयागाराने तरुणाच्या पिशवीतील सोन्याची नाणी त्याना देत सांगितले. अरबाने न बोलता ती घेतली, भरपूर शस्त्रे घेता येईल इतकी नाणी होती.
अरबाने विचारले, किमयागार म्हणजे काय? असा माणूस जो निसर्ग आणि जगाला समजतो. त्याने मनात आणले तर तो ही वस्ती वाऱ्याच्या झोताने नष्ट करू शकतो.
अरब हसला. त्याला माहीत होते की वारा असे काही करू शकत नाही पण तरी अरबाचे ह्रदय धडधडत होते.
ते वाळवंटात राहणारे होते आणि जादूगारांची त्याना भीती वाटत असे.‌
प्रमुख म्हणाला मला बघायचे आहे तो काय करतो ते.
किमयागार म्हणाला त्यासाठी काही दिवस लागतील. त्याला स्वतःला वारा बनवावे लागेल ते सुद्धा फक्त शक्ती दाखविण्यासाठी. आणि तो तसे करू शकला नाही तर आम्ही तुमच्यासाठी आमचे प्राण देवू.
प्रमुख म्हणाला, जे माझ्याच हातात आहे ते तुम्ही मला देऊ शकत नाही. मी तुम्हाला तीन दिवसांची मुदत देतो.
तरुण भयभीत झाला होता पण किमयागाराने त्याला तंबूत नेले.
तू घाबरला आहेस हे त्याना जाणवून देऊ नकोस. ते शूर वीर आहेत आणि भित्र्यांचा तिरस्कार करतात.
तरूण काही बोलू शकत नव्हता ते जेव्हा आत वस्तीत गेले तेव्हा तो थोडा सावरला. सैनिकांनी त्यांना कैद केले नाही फक्त घोडे ताब्यात घेतले होते.
आणि जगाने आता वेगळीच भाषा दाखवली होती. थोड्या वेळापूर्वी वाळवंट फक्त न संपणारे पण मुक्त वाटत होते, ते आता भिंत व बंधक वाटत होते.