पृथ्वीवरील प्रत्येकासाठी त्याचा खजिना वाट बघत असतो. पण माणूस शोध घ्यायला तयार नसतो.
माणसे त्याबद्दल बोलतात, पण ते नंतर आयुष्य जसे पुढे जाते तसे जाऊ देतात, जिकडे नेईल तिकडे.
आणि दुर्दैवाने फारचं थोडे लोक त्यांना आखून दिलेल्या मार्गावर चालतात, त्यांचे भाग्य मिळवण्याचा आणि त्यांना आनंद मिळवून देणारा मार्ग.
बरेच लोक जगाकडे भीतीयुक्त नजरेने पाहतात आणि त्यांना हे जग एक भयंकर ठिकाण वाटू लागते.
आणि आम्ही ह्रदये खुप मृदुपणे बोलतो, आम्ही बोलणे थांबवत नाही आणि आपले शब्द ऐकले जाणार नाहीत अशी आशा करतो, आम्हाला असे वाटते, माणसाला ह्रदयाचे न ऐकल्याने दुःखाची वेळ येउ नये.
तरुण किमयागाराला म्हणाला, ह्रदय माणसाला स्वप्न पूर्तीसाठी प्रयत्न करायला का सांगत नाही?
"
कारण ह्रदयाला दुःख नको असते."आता तरुणाला ह्रदयाची भाषा कळू लागली होती. तो स्वप्नापासून दुर जातोय असे वाटले की ह्रदय त्याला जागे करीत असे.
आणि तरुणाने ठरवले की , तो ह्रदयाची हाक काळजीपूर्वक ऐकेल व त्याची दखल घेईल.
त्या रात्री तरुणाने किमयागाराला सर्व सांगितले आणि किमयागाराला समजले की, तरुणाचे ह्रदय जगद्आत्म्याबरोबर जुळले आहे.
तरूण म्हणाला, आता मी पुढे काय करू?
किमयागार म्हणाला, पिरॅमिडच्या दिशेने चालत राहा आणि शकुनांची(संकेत) दखल घे.
तुझे ह्रदय तुला खजिना दाखवायला समर्थ आहे.
मला अजूनही माहीत नसलेली गोष्ट ही आहे का?. किमयागार म्हणाला 'नाही'.
तुला समजून घ्यायची गोष्ट ही आहे, जेव्हा स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर असते तेव्हा जगद्आत्मा आपण या मार्गावर काय शिकलो त्याची सतत परिक्षा घेत असतो.
तो वाईट आहे म्हणून तसे करत नसतो तर स्वप्नपूर्तीबरोबरच त्या मार्गावर आपण शिकलेले धडे पक्के व्हावेत यासाठी.
ही अशी वेळ असते, जसे आम्ही वाळवंटाच्या भाषेत बोलतो, क्षितिजावर खजुराची झाडे दिसत असतानांच एखादा तहानेने व्याकूळ होऊन मरतो.
प्रत्येक शोध हा सुरू होतो सुरुवातीला मिळणाऱ्या संधीने आणि तेव्हाच संपतो जेव्हा विजयी होणारा सर्व परिक्षा पास होतो.
तरुणाला त्याच्या देशातील म्हण आठवली,
" रात्र सर्वात जास्त अंधारी तेव्हांच असते जेव्हा लगेचच पहाट होणार असते."दुसऱ्या दिवशी एक वेगळीच घटना घडली. तीन शस्त्रधारी सैनिक त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी विचारले तुम्ही दोघे इथे काय करीत आहात?.
किमयागार म्हणाला, मी बहिरी ससाण्याच्या सहाय्याने शिकार करत आहे. एकजण म्हणाला तुमच्याकडे शस्त्रे आहेत का बघावे लागेल.
दोघे घोड्यावरून उतरले. तपासणीत तरुणाच्या बॅगेत पैसे पाहून त्याने विचारले तुम्ही पैसे बरोबर का ठेवले आहेत,
तेव्हा तरुण म्हणाला, आम्हाला पिरॅमिड पर्यंत जायचे आहे .
किमयागाराच्या तपासणीत क्रिस्टलची बाटली ज्यात काही द्रव्य होते आणि काचेचे कोंबडीच्या अंड्यापेक्षा थोडे मोठे अंडे सापडले.
हे काय आहे? त्याने विचारले.
तो तत्वज्ञानाचा दगड व जीवनाचे अमृत आहे, हे रसशास्त्रातील मोठे काम आहे, यातील द्रव्य पिणारा कधीच आजारी पडत नाही आणि हा दगड कोणत्याही धातूचे सोने करू शकतो.
अरब हे ऐकून जोरजोरात हसले, त्यानी हे मजेशीर उत्तर ऐकून त्याना त्यांच्या वस्तू परत दिल्या व जाण्यास सांगितले.
तरूण म्हणाला, "तुम्ही हे काय केले? असे कसे सांगितले, कां केले तुम्ही असे, "
किमयागार म्हणाला, तुला जीवनातील एक साधा धडा शिकविण्यासाठी !. जेव्हा तुमच्याकडे काहीतरी मोठा खजिना किंवा सामर्थ्यशाली वस्तू असते आणि तुम्ही जेव्हा तसे लोकांना सांगता तेव्हा तुमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही.ते वाळवंटात मार्गक्रमण करत होते. जसे दिवस जात होते तसे तरुणाचे ह्रदय शांत होत होते.
ते भुतकाळातील किंवा भविष्यकाळातील गोष्टींचा विचार करत नव्हते, ते फक्त या वाळवंटाचे निरिक्षण करत होते
तरूण आणि त्याचे हृदय मित्र बनले होते.
जेव्हा ते बोलत असे तेव्हा तरुणाला ताकद, स्फुर्ति देत होते.
कारण हे वाळवंटातील दिवस कंटाळवाणे होत होते. ते तरुणाला त्याच्यातील सुप्त गुण दाखवत होते. त्याच्या मेंढ्या विकून नशिब आजमावाण्यासाठी निघण्याच्या निर्णयाबद्दल, दाखवलेल्या धैर्या बद्दल आणि क्रिस्टल दुकानात काम करताना नवीन कल्पना राबवल्या होत्या त्याबद्दल सांगतं होते.
ते सांगत होते, त्याच्यासमोर खुप संकटे , धोक्याचे क्षण आले होते, असे क्षण जे खरेतर त्याच्या लक्षात आले नव्हते एकदा तो मैदानावर असताना त्याला खुप उलट्या झाल्याने तो गाढ झोपला होता आणि दोन चोर त्याच्या मेंढ्या चोरण्यासाठी त्याच्या नेहमीच्या वाटेवर थांबले होते पण त्यावेळी त्याने मार्ग बदलला असल्याने ते चोर तरुण आपल्याला सापडणार नाही असे समजून निघून गेले होते.