My Cold Hearted Boss - 6 in Marathi Love Stories by saavi books and stories PDF | My Cold Hearted Boss - 6

The Author
Featured Books
  • మనసిచ్చి చూడు - 5

                                    మనసిచ్చి చూడు - 05గౌతమ్ సడన్...

  • నిరుపమ - 5

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ- వీర - 6

    వీర :- "నీకు ఏప్పట్నుంచి తెల్సు?"ధర్మ :- "నాకు మొదటినుంచి తె...

  • అరె ఏమైందీ? - 18

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • మనసిచ్చి చూడు - 4

    మనసిచ్చి చూడు - 04హలో ఎవరు.... ️ అవతల మాట్లాడకపోయే సరికి ఎవర...

Categories
Share

My Cold Hearted Boss - 6

" गुड नाईट बॉस... उद्या भेटू.. ", तो तिला ग्रीट करत म्हणाला... तसं तीने मान डोलावली...



तो तसाच खुशीत निघून गेला...


ती मात्र त्याला जाताना पाहत होती....

....



दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्यची आई त्याला टिफिन बनवून देते...दोघांसाठी..!!

आदित्य तोच डब्बा घेऊन जातो... पण मनात वैतागलेला असतो... त्याच्या बॉसला...!!


तो येतो आणि त्याच्या डेस्क वर बसतो...


वेदांशी अजून आली नव्हती... तिला अर्धा तास वेळ लागणार होता.. तसं त्याने त्याचं सगळं सामान त्याच्या डेस्क वर नीट रचून ठेवले.. आणि त्याच्या कामाला सुरवात केली... सगळे एम्प्लॉयी हळू हळू येत होते... पण आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर भयानक भीती होती...!


कारण आज तर सगळ्यांना प्रेसेंटेशन द्यायचे आहे.. आणि जर चुकलो तर नोकरी जाणार होती.. सगळ्यांना याचीच धास्ती असल्याने.. कोणालाच नीट झोप लागली नव्हती रात्री... शिवाय वेदांशी आणि आदित्यला सोडून..!


वेदांशी तर असंही बॉस होती... आणि आदित्याचं टेन्शन कालच संपले होते... म्हणून तो तर अगदी निर्धास्त होता...


थोड्याच वेळात वेदांशी आली... त्याच रुबाबदार अटीट्युड मध्ये..!! पायात हिल्स.. ब्राउन कलरचा बिझनेस सुट.. हातात घड्याळ.. तर एका हातात ब्रेसलेट.. जे तिच्या हातात नेहमी असायचं.. चेहऱ्यावर तेच शांत आणि गंभीर भाव..! तिला पाहून सगळे आपापल्या जागेवरुन उठत तिला ग्रीट करत होते... आदित्यने तिच्याकडे पाहिलं... तसं त्याला ती काल ज्या क्युट नाईट सुट मध्ये होती ती आठवली... आणि नकळत त्याने तिचे दोन्ही अवतार तोलून पाहिले...


" ऑफिस मध्ये असताना डरकाळी फोडणारी वाघीनच वाटते... आणि घरी..?? घरी अगदी निरागस वाटल्या त्या.... ", आदित्य मनातच म्हणाला... ती सगळ्यांना नेहमीप्रमाणे इग्नोर करत तिच्या कॅबिन मध्ये शिरली...


तसं आदित्यही उठला आणि तिचा लेमन टी आणि तिच्यासाठी आणलेला ब्रेकफास्ट घेऊन तिच्या कॅबिन मध्ये गेला...


" बॉस.. टी.. ", तो लेमन टी तिच्यापुढे सरकवत म्हणाला....


" हम्म... ", तीने केवळ हुंकार भरला...


" माझा ब्रेकफास्ट...???", तीने जरा अधीरतेने विचारलं...


तसं तो मनातच हसला... आणि ब्रेकफास्टची प्लेट तिच्या समोर केली....


तसं तीने पाहिले तर कांदापोहे होते... सोबत लिंबू...


तसं तीने पटापट खायला सुरवात केली... याचाही विचार केला नाही.. की आदित्य अजूनही तिथेच आहे...



आदित्य मात्र तिला असं अध्याश्यासारखं खाताना पाहून वेगळ्याच विचारात पडला...



" यांना काय खायला भेटत नाही का..??? की घरचं खायला भेटत नाही..????", आदित्यच्या मनात बरेच प्रश्न पडले होते...


....


दिवस गेले... आठवडे गेले... आणि आता ऑलरेडी पाच महिने होऊन गेले... !

पाच महिने होऊन गेले.... पण या पाच महिन्यात काहीच बदलले नव्हते... वेदांशी आणि आदित्यच्या बाबतीत...!


वेदांशी आजही त्याच्यावर ऑर्डर सोडत होती... आणि आदित्य मनात तिच्यावर डाफरत सगळी कामे करत होता... तो चुकल्यावर ओरडाही खात होता... पण आता त्यालाही तिचा ओरडा खाण्याची सवय झाली असल्या कारणाने तो गोष्टी जिथल्या तिथे सोडून द्यायचा...



वेदांशी तर टाकामका पाहत त्याच्या येण्याची वाट पाहत असते...! म्हणजे केवळ टिफिनची..!
आदित्यची जाम पंचाईत होत होती... गाडीवरून नुसता इकडे तिकडे फिरावं लागत होतं.. म्हणून तो कंटाळत होता... पण तरीही त्याला फायदा होत होता.. म्हणून हे पण त्याने चालवून घेतले..!



आताही तो तिला टिफिन द्यायला म्हणून आला होता... आता हे रोजचे झाले होते... गार्ड्स त्याला काही न विचारता आत पाठवत होते...


त्याने दरवाजा वाजवला... तसं अपेक्षे प्रमाणे तीने दरवाजा उघडला... पण आज तिचा चेहरा जास्तच उतरला आहे असं त्याला वाटलं...


तीने दरवाजा उघडला आणि नेहमीप्रमाणे जाऊन डायरेक्ट किचनमध्ये चेयर वर जाऊन बसली... तसं त्यानेही नेहमीप्रमाणे तिच्यासाठी प्लेट रेडी केली... आणि तिच्या समोर ठेवली...
गेल्या काही महिन्यापासून हाच रुटीन होता त्यांचा... ती जेवेपर्यंत तो थांबत होता... आधी तर त्यालाही कंटाळा यायचा... पण आता मात्र सवय झाल्याने काही एवढं विशेष वाटायचं नाही... तोही तिच्या आयुष्यात लुडबुड करत नव्हता.. आणि तीही..!


तसं तीने जेवायला सुरवात केली... खूप डल वाटत होती ती... म्हणून आदित्यला राहवलं गेलं नाही... आणि त्याने तिला काय झाले म्हणून विचारायचे ठरवले....



" बॉस...", त्याने काही अंतर ठेवून एका खुर्चीवर बसत हळूच हाक मारली....


" हम्म...???", तीने त्याच्याकडे नजर टाकत केवळ हुंकार भरला...


" काही प्रॉब्लेम आहे का..?? तुम्ही खूप डल वाटत आहात..?? तुम्ही ठीक आहात का...???", त्याने विचारलं... आणि टी क्षणभर त्याच्याकडे पाहतच राहिली...


काळजीने भरलेले डोळे... आणि त्यात केवळ काळजीच... कुठला देखावा नाही की कपट नाही... आणि तिलाही खरं खरं सांगावेसे वाटले...



" काही नाही... मंथली पिरियेड आलेत.. म्हणून थोडसं लो वाटत आहे... बाकी आय एम फाईन..", तीने ओठांवर स्मित हास्य पसरवत सांगितलं... तसा आपला आदित्य स्तब्ध झाला..!!


कारण आज तो पहिल्यांदा त्याच्या हिटलर बॉसला किंचित का असेना.. पण हसताना पाहत होता... आणि त्याला तर त्याच्या बॉसची स्माईल खूपच भारी वाटली... अगदी निराळी आणि तेवढीच सुंदर..!!


त्याला काही बोलताच आले नाही... केवळ मान डोलावली...


ती मात्र हळू हळू जेवू लागली....


तो मात्र उठला आणि किचन मध्ये अजून काय आहे ते पाहू लागला... तिला मात्र काहीच फरक पडत नव्हता की तो काय करतोय किंवा काय शोधतोय..!


ती हळुवार पणे तिचं जेवण करत होती... जेवण झालं तसं ती उठली..!!



....


ती हॉल मध्ये बसली होती टीव्ही चालू करून..! तेच नेहमीचं कार्टून लावलं होतं... डोरेमॉनचं..!!


ती एकटक पाहत होती टीव्हीकडे... लक्ष तर नव्हतेच.. पण उगीच आपलं काहीतरी करायचं म्हणून करत होती..!


" बॉस.. ", त्याने तिकडे येत हाक मारली तिला... तसं तीने टीव्ही वरून नजर हटवत त्याच्याकडे पाहिलं... आणि तिच्या कपाळावर आठ्या पसरल्या...


" हे काय आहे..??", तीने गोंधळून विचारलं...


" बॉस... ginger tea आहे ही.. तुम्हाला हे पिल्यावर आराम भेटेल थोडा.. मी आईला हेच बनवून देतो जेव्हा तिचे पिरेड्स चालू असतात.. आरामदायी आहे... एकदा पिऊन नक्की पाहा..", तो शांतपणे म्हणाला... आणि त्याने चहा चा काप तिच्या समोर टेबल वर ठेवला...


ती मात्र समोर ठेवलेल्या कपकडे एकटक पाहू लागली.... किंचित डोळे लाल झाले होते तिचे... कंठ अचानक दाटून आला... पण सावरलं तीने स्वतःला... आणि मग हळूच चहाचा कप हातात घेत पिऊ लागली....


" आदित्य... बस थोड्यावेळ... ", तीने ऑर्डर सोडला.. तसं तो तिच्यापासून सुरक्षित अंतर ठेवून नीट बसला...


" आदित्य... लकी आहे रे तुझी आई... खूप केरिंग आहेस वाटतं तु आईसाठी..", ती शांतपणे म्हणाली...


" नाही बॉस.. लकी तर मी आहे की ती माझी आई आहे.. खूप प्रेम करते... माझी ताकद आहे ती... जे काही करतोय ते तिच्याचसाठी करतोय.. आजपर्यंत तीने स्वतःला झोकून दिले मला चांगलं आयुष्य देण्यासाठी... आता माझी वेळ आहे तिला सुखात ठेवण्याची... म्हणून जोपर्यंत तिला चांगलं जीवन देत नाही... तोपर्यंत मी हार मानणार नाही... प्रयत्न चालूच ठेवेन... "", तो किंचित हसून म्हणाला... तसं तिच्या काळजात एक कळ आली...


" खरंय रे... !! लकी आहेस तु... आई आहे तुझ्याकडे.. ", ती कुठेतरी हरवत म्हणाली...


त्याला मात्र काही नीट समजले नाही...


पण ती उदास झाली हे मात्र त्याला कळले...


" मग घरी कोण कोण असतं तुझ्या..?? बाबा काय करतात तुझे...???", वेदांशीने स्वतःला सावरत विचारलं...


" मी लहान असताना... बाबा गेले.. तेव्हापासून आईनेच सांभाळले मला... शिकवले... म्हणून सध्या तरी आमच्या कुटुंबात आम्ही दोघेच..! काका वैगेरे आहेत.. ते गावी असतात... कधी कधी येणं जाणं होतं... ",


" आय एम सॉरी.. मला माहीत नव्हतं.. नाहीतर हा प्रश्न विचारला नसता.. I was just curious... ", तीने गिल्टी होऊन म्हंटले... पण तीने पहिल्यांदा सॉरी म्हंटले... आणि एवढ्या जेंटल पणे म्हंटले... की आदित्यला तर जणू धक्काच बसला... त्याला विश्वास बसत नव्हता की त्याची हिटलर बॉस अशी जेंटलपणे पण बोलू शकते...!


" नो नो बॉस.. इट्स ओके... ", तो पटकन म्हणाला...


तसं काहीवेळ शांतता पसरली...


" बॉस.. तुमच्या घरी कोण कोण आहे..?? आय मिन जस्ट विचारतो.. गेल्या पाच महिन्यापासून मी तुम्हाला एकटीलाच पाहतो आहे या एवढ्या मोठ्या घरात... ", तो जरा बिचकून बोलला... ती कधी भडकून उठेल सांगता येत नव्हते अजूनही...



तशी ती शांत झाली... काहीच बोलली नाही....


" सॉरी बॉस... जरा जास्तच लिमिट क्रॉस केली मी... असा पर्सनल प्रश्न नको विचारायला पाहिजे होता मी.. ", आदित्य जरा आवरत म्हणाला.. त्याला वाटलं की त्याने पी.ए. म्हणून जरा जास्तच लिमिट क्रॉस केली हा प्रश्न विचारून..!


त्यावर ती मंद हसली....


" कुटुंब म्हणशील तर आहे... ! आणि म्हणशील तर नाहीही..! ", ती खिन्नपणे हसत म्हणाली... पण तिच्या त्या हसुमध्ये दडलेल्या वेदना मात्र तिच्या डोळ्यांत दिसून येत होत्या...


आदित्य केवळ तिच्याककडे पाहत होता... प्रश्नार्थक नजरेने..!


" खूप मोठं कुटुंब आहे माझं... पण कदाचित माझं नाही बोलता येणार मला..! ", ती पुन्हा कोड्यात बोलली... आणि आदित्यच्या कपाळावर आठ्या पसरल्या...


" माझा जन्म होताच माझ्या आईवडिलांनी डिवोर्स दिला एकमेकांना...! No one wanted me..! ना आईला मी हवी होती... ना बाबांना...!! दोघेही रिच फॅमिली मधून... त्या दोघांचं कधीच पटलं नाही एकेमकांशी..! पण बिझनेसच्या प्रॉफिट साठी... माझ्या आजी आजोबांनी... त्यांचं लग्न लावून दिलं होतं.. आजी आजोबांना वाटलं की लग्नानंतर... आपोआप प्रेमात पडतील दोघेही..! चालू होईल त्यांचा सुखाचा संसार..! पण कुठे काय..!! लग्नाला वर्ष पण झालं नाही... आणि त्या दोघांनी डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला... पण आजी आजोबा तयारा नव्हते त्या दोघांच्या डिवोर्स साठी..! त्यांचा संसार वाचवण्यासाठी आजोबांनी अट घातली की त्यांना वंश पाहिजे हा बिझनेस पुढे चालू ठेवण्यासाठी...!! मग काय.. प्रेशर मध्ये येऊन दोघांनी मला जन्म दिला..!! आणि मला जन्म दिल्यावर दोघांनी एकमेकांना डिवोर्स दिला... !! And you know what the funny part of it.. की त्या दोघांनी मला जवळ ठेवण्यासाठी नकार दिला..! ते ऑलरेडी एकमेकांना एवढे हेट करत होते की ते दोघे मला पण हेट करू लागले... कारण मी तर वंश होती ना त्या दोघांचा...!!
They abandoned me..!!
I was there unwanted child..!!
सो... तेव्हापासून मला आया ने सांभाळले... माझ्यासाठी आई वडील तिच... पण दोन वर्षांपूर्वी ती पण मला सोडून देवाघरी गेली... सो आय एम ऑल अलोन नाव..!
मला माहित आहे आदित्य पैशांच्या मागे धावणाऱ्यांपैकी तु नाही... पण तरीही सांगते... आयुष्यात कधीही आपल्या आईला सोडून नको देशील... आपल्या बायकोसाठीही नाही... कारण खूप लकी आहेस तु... आई आहे तुझ्याकडे... आमच्याकडे बघ..! आई वडील दोन्ही असून सुद्धा मी अनाथासारखी जीवन जगते आहे.... विचारणारं कोणी नाही मला...!!! ", वेदांशी गालात हसत म्हणाली...


तीने नजर त्याच्याकडे वळवली... आणि ती जागीच गार झाली...!


" अरे आदित्य... तु का रडतो आहेस...???", तीने चकित होऊन विचारलं...


त्याला मात्र तिच्या प्रश्नाचे उत्तर पण देता आले नाही...!! तो वेडा तिच्या मनातील दुख जाणून घेऊन रडू लागला... जणू तिला दुःखात पाहून त्यालाच तिच्या दुःखाची जाणीव झाली...



ती अजूनही चकित होऊन पाहत होती त्याच्याकडे... आज पहिल्यांदा.. कोणीतरी तिचं दुःख ऐकून रडत होतं... आणि तिलाच कळत नव्हतं की रिऍक्ट कसं करावं...???






क्रमश :



कथा आवडत असेल तर मनापासून कमेंट नक्कीच करा... धन्यवाद...