Mala Space havi parv 1 - 58 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५८

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ५८

मला स्पेस हवी पर्व १ भाग 58
 
मागील भागात आपण बघितलं की नेहा आजारी पडलेली आहे. तिच्या सोबत अपर्णाला राहण्यास साहेबांनी सांगितलेलं आहे. अपर्णाला नेहा थँक्यू म्हणते आता पुढे काय होईल बघू
 
रमण शहा कालपासून नेहाला खूपदा फोन करून थकला होता. कारण नेहा एकही फोन उचलत नव्हती आणि एकही मेसेज तिने वाचला नव्हता. ती असं का करते आहे? हे रमणला कळत नव्हतं म्हणून याचा खूप त्रास रमण शहाला होत होता.
 
त्यावेळेला त्याला पुन्हा एकदा जाणवलं की आपण खूपच नेहा मध्ये अडकलो आहे. काय करावं म्हणजे नेहा अशी का वागते आहे हे कळेल खूप विचार करून रमण शहाचं डोकं गरगरायला लागलं. कारण ही जाहिरात आता सगळीकडे दिसायला लागलेली होती पण ती चांगली झाली आहे की नाही हे रमण शहाला नेहा कडून ऐकायचं होतं आणि नेहाचा तर फोन लागत नव्हता.
 
 
दोन दिवस वाट बघून शेवटी त्याने अपर्णाला मेसेज केला. अपर्णा नेहासाठी नाश्ता तयार करत होती त्यावेळेला तिच्या फोनवर मेसेजटोन वाजला. तिने बघितलं तर फोनवर रमण शहाचा मेसेज दिसला. आता याला काय उत्तर द्यावं याचा विचार अपर्णा करत होती. पण आत्ता ऊत्तर देण्याच्या भानगडीत न पडता अपर्णांनी नाश्ता तयार करून स्नेहाच्या खोलीत आणला.
 
“मॅडम उठता नं? ब्रश करायचा आहे. मी तुमच्यासाठी तुम्हाला आवडतात तसे मटर घालून पोहे केलेले आहेत.”
हे बघून नेहा म्हणाली,
 
“अपर्णा किती करतेस ! बाहेरून बोलवू शकतो ना?
 
यावर अपर्णा म्हणाली,
 
“मॅडम तुम्ही पेशंट आहात म्हणून मी घरी करते. बाहेरून येतं ते तुम्हाला इथल्या पद्धतीचा आवडेल की नाही माहित नाही आणि बरं नसताना पोट फार नाजूक होतं. म्हणून मी तुम्हाला घरी करून देते आहे. दोघींसाठी नाष्टा आणि स्वयंपाक करायला किती वेळ लागतो?”
 
यावर नेहा हलकसं हसत म्हणाली,
 
“मागच्या जन्मी बहुदा आपलं काहीतरी जवळच नातं असावं म्हणून तू इतकं माझं करते आहेस.”
 
अपर्णा म्हणाली,
 
“ मॅडम मागचा जन्म कुणी बघितला? पण असेल तर खरंच असं असेल की तुमची माझी मैत्री आणि ओळख अर्धवट राहिली असेल म्हणून कदाचित या जन्मात आपण दोघी पुन्हा एकत्र आलो आणि तेही एकाच विभागामध्ये.”
 
“असेल. “
 
असं म्हणून नेहा हळूच उठली. दोन दिवसात औषध पोटात गेल्यामुळे नेहा आता बरी वाटत होती. पूर्वीसारखं उठता उठता तिला चक्कर येत नव्हती. थकव्यामुळे तिला ती चक्कर यायची आता तिच्या अंगात थोडी ताकद यायला लागली होती.
 
 
अपर्णाने लक्षात ठेवून नेहाच्या आवडीचे पदार्थ स्वयंपाकात करत होती. अपर्णा नेहाला फळ सोलून खायला देखील देत होती. पहिल्या एक-दोन दिवस तर नेहाला उठून बसून जेवायलाही जमत नव्हतं त्यावेळेला अपर्णांनी तिला भरवलेलं होतं
 
इतकी काळजी कोण घेऊ शकत? जी व्यक्ती आपल्या खूप जवळची असते तीच आपल्याला इतका वेळ देऊन आपली काळजी घेते. हे नेहाला माहीत असल्यामुळे नेहा अपर्णाला वारंवार मनातल्या मनात धन्यवाद देत असते.
 
इकडे अपर्णांनी फोनवरचा मेसेज वाचला रमण शहाने
 
‘नेहा मॅडम फोन का उचलत नाही? जाहिरात कशी झाली हे का सांगत नाही ?त्या मेसेज सुद्धा वाचत नाहीये ? काय झालं असं ?त्या रागावल्या आहेत का माझ्यावर ?’
 
रमण शहाने इतके प्रश्न विचारलेले होते. त्याला काय उत्तर द्यावं अपर्णाला कळलं नाही. अपर्णांने मेसेजवर कळवलं की,
 
‘ नेहा मॅडम ना बरं नाहीये त्यामुळे त्या सुट्टीवर आहे.’
 
अपर्णाला असं वाटलं नाही की रमण शहा फोन करेल पण रमण शहा तो मेसेज वाचून खूप अस्वस्थ झाला. त्याला नेहाची प्रचंड काळजी वाटायला लागली. इतकी की तो स्वतःला शांत ठेवू शकत नव्हता.
 
त्या मेसेज मुळे रमण शहाची ऑफिसमध्ये फार चिडचिड व्हायला लागली आजूबाजूच्या लोकांना कळेना रमण शहा इतका अस्वस्थ का झाला आहे? कारण शहा असा अस्वस्थ कधीच व्हायचं नाही त्यामुळे कोणाला रमणच्या मनात काय आहे हे माहिती नव्हत.
 
अपर्णा स्वयंपाक घरात काम करत असतानाच नेहाचा फोन वाजला. नेहा ब्रेकफास्ट करून गोळ्या घेऊन झोपली होती. तिला इतकी गाड झोप लागली होती की बाजूला असलेल्या फोनचा पण तिला आवाज आला नाही.
 
अपर्णांने नेहाचा फोन उचलून कोणाचा कॉल आहे हे बघितलं आणि तिला स्वतःला रमण शहाचा खूप राग आला. तिला कळेना माणूस आजारी म्हटल्यावर ही त्यांनी आजारी माणसाला फोन करावा !
 
 
इकडे रमण शहाजी जी अवस्था झाली होती ती अपर्णाला माहिती नव्हती. अपर्णाने फोन उचलला आणि विचारलं,
 
“ मॅडमशी काय काम होतं?”
 
नेहाच्या फोनवर अपर्णाचा आवाज ऐकून रमण शहा आणखीनच टेन्शनमध्ये आला. त्यानी घाबरूनच विचारलं,
 
“अपर्णा मॅडम तुम्ही का बरं नेहा मॅडमचा फोन उचलला? नेहा मॅडमला काय झालं ?काही सिरीयस आहे का? मदतीची गरज आहे का ?”
 
यावर अपर्णा म्हणाली,
 
“नाही सर नेहा मॅडम औषध घेऊन झोपल्या आहेत. त्यामुळे त्यांनी फोन घेतला नाही मी घेतला. सिरीयस काही नाही. डाॅक्टरांनी सध्या सक्तीचे चार दिवस विश्रांती सांगितली आहे म्हणून त्या झोपल्या आहेत.”
 
“मला नेहा मॅडमला भेटायचं आहे.”
 
“ सर त्या ऑफिसला जॉईन झाल्या की तुमच्याशी बोलतील. सध्या त्यांना आराम करायला सांगितला आहे. ऑफिसचं काहीही काम करू द्यायचं नाही असं मला ताम्हाणे सरांनी बजावलं आहे.”
 
यावर रमण शहां अत्यंत काकुळतीला येऊन म्हणाला,
 
“मॅडम मला नेहा मॅडमची काळजी वाटते आहे. तुम्ही त्यांचा पत्ता मला द्या मी त्यांना भेटायला येतो.”
 
हे ऐकल्यावर अपर्णा थोडी बावचळली. तिला काही सुचेना तेव्हा तिच्या कानावर रमण शहाचा आवाज आला,
 
“ मॅडम बोला. तुम्ही ऐकताय नं?”
 
“ हो ऐकतेय. पण सर तुम्ही मॅडमना भेटायला येऊ नका. त्यांना आरामाची आवश्यकता आहे.”
 
“ असं कसं म्हणता तुम्ही? मी काळजी पोटी त्यांना भेटायला येतोय.”
 
“ हो कळतंय मला पण डाॅक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगीतलं आहे की त्यांच्याशी जास्त बोलू नका म्हणून मी सांगतेय की तुम्ही भेटायला येऊ नका.”
 
“ मॅडम मी नेहा मॅडमशी गप्पा मारत बसणार नाही.मला कळतं की पेशंटला आरामाची गरज असते. मी फक्त मॅडमना बघायला येणार आहे. मला त्यांचा पत्ता सांगा.”
 
“ साॅरी पण नेहा मॅडमना विचारल्याशिवाय मी त्यांचा पत्ता तुम्हाला देणार नाही. फोन ठेवते.”
 
अपर्णाने फोन ठेवला. अपर्णाला कळत नव्हतं की या माणसाला स्पष्ट सांगूनही समजत नाही का? आपण रमाण शहाला नेहा मॅडमचा पत्ता दिला नाही यात आपलं काहीही चुकलं नाही.याउलट नेहा मॅडमना बरच वाटेल कारण त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या चेहऱ्यावरील हवभवावरून कळतं की रमण शहा हा माणूस त्यांना फारसा पटत नाही.
 
 
त्यामुळे अपर्णाने नेहाचा फोन चक्क सायलेंट वर टाकून समोरच्या खोलीत ठेवला. जिथे अपर्णा बसणार होती. नेहाला खूप गाढ झोप लागलेली होती. एकदा तिच्याकडे बघून अपर्णाने घड्याळात बघितलं. साडे अकरा वाजले होते. अपर्णाने नेहाला बारा वाजता नेहाला जेवायला ऊठवायचं ठरवलं.
 
समोरच्या खोलीत येऊन अपर्णा मोबाईलवर काहीतरी गेम खेळत बसली होती. थोड्यावेळाने ताम्हाणे साहेबांचा अपर्णाला फोन आला.
 
“हॅलो “
 
“हॅलो. नेहा मॅडम कशा आहेत?”
 
साहेबांनी विचारलं.
 
“आत्ता मॅडमना खूप गाढ झोप लागली आहे. सकाळी नाश्ता झाल्यावर त्यांना गोळ्या दिल्या. त्यामुळे त्या झोपल्या आहेत. थोड्या वेळाने त्यांना मी उठवून जेवायला वाढणार आहे. औषधांमुळे दोन दिवसांत मॅडमच्या तब्येतीत बराच फरक पडला आहे.”
 
“ छान. तुम्हीअजून दोनतीन दिवस राहू शकता नं?”
 
साहेबांनी अपर्णाला विचारलंं.
 
“ हो मी राहीन. फक्त एक दिवस घरी जाऊन येईन त्यादिवशी अनुराधा मॅडम नेहा मॅडमच्या घरी थांबल्या तर बरं होईल. साहेब तुम्ही अनुराधा मॅडमना सांगून बघा नं.”
 
“ हो सांगतो. आणखी काही सांगायचं आहे का?”
 
साहेबांनी असं विचारताच अपर्णा म्हणाली,
 
“सकाळी रमण शहांचा नेहा मॅडम फोन का उचलत नाहीत हे विचारण्यासाठी मला फोन आला होता. मग त्यांना मी नेहा मॅडमच्या तब्येतीबद्दल सांगितलं तर ते मॅडमच्या घरचा पत्ता मागायला लागले. मी दिला नाही. मॅडमना विचारल्याशिवाय मी रमण शहांना मॅडमच्या घराचा पत्ता दिला नाही.”
 
“ योग्य केलंत. सध्या नेहा मॅडमना आरामाची आवश्यकता आहे. त्यांची काळजी घ्या.”
 
“ हो साहेब.”
 
साहेबांनी फोन ठेवला. पाठोपाठ अपर्णानेही फोन ठेवला.
 
****
 
 
अपर्णांनी नेहाचा पत्ता न दिल्याने रमण शहाला राग राग येत होता. कशावर राग काढू हे त्याला कळत नव्हतं. त्याला नेहाची प्रचंड आठवण येत होती. असं आतापर्यंत कधी घडलं नव्हतं.
 
रमण शहाचीच सगळ्या बायकांना तीव्र आठवण यायची. त्या बायका त्याला भेटायला तडफडायच्या. नेहाला भेटण्यासाठी तडफड करावी हेअसं रमण शहाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडत होतं.
 
रमण शहाने स्वतःला खूप तर विचारून पाहिलं की मी एवढा अस्वस्थ का होतो आहे ? मला का नेहा भेटायला हवी आहे? त्याला आतून आवाज येत होता की तो आता नेहामध्ये खूप गुंतला आहे. त्याच्यामुळे त्याला नेहा शिवाय करमत नाही त्याच्या चिडचिडीचं कारण, त्याच्या विचित्र वागण्याचं कारण त्याच्या बायकोला कळलं नसलं तरी तिला जाणवत होतं की काहीतरी गडबड आहे .तिने विचारलही,
 
“‘रमण काय झालं? का वागतोयस असा?”
 
यावर रमण शहाने काही उत्तर दिलं नाही. बायकोने पुन्हा पुन्हा रमणला विचारून पाहिलं पण रमण शहाने उत्तर दिलं नाही तेव्हा मात्र त्याच्या बायकोने नाद सोडून दिला. तसेही तो जास्त स्वतःबद्दल घरी कधी सांगत नसे. त्यामुळे त्याच्या बायकोनेही हे विचारण्यासाठी स्वतःचं डोकं वापरणं सोडून दिलं.
 
 
रमण शाहचे मात्र आता कामाकडे सुद्धा लक्ष लागत नसे. त्याच्या ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्यांना रमण शहाला काय झालं आहे? याचं कामात का लक्ष लागत नाही ? कोणी अपॉइंटमेंट घेऊन आलं तरीही त्यांच्याशी हा बोलत नाही. बोलताना त्यांच्याकडे रमण शहाचे लक्षही नसतं. मध्येच वेगळच काहीतरी बोलत असतो.
 
 
सगळ्यांना रमण शहाच्या या वागण्याचं गूढ वाटू लागलं. रमण शहाच्या असिस्टंटने आडून आडून त्याला हे सगळं विचारून बघितलं पण रमण शहा स्वतःच्या मनातलं काहीही बोलत नव्हता. एरवी जो दिलखुलास बोलायचा, एन्जॉय करायचा, जोक करायचा, सगळ्यांबरोबर गप्पा मारायचा तो रमण शहा दोन दिवस झाले ऑफिसमध्ये कोणालाच भेटत नव्हता. एक अस्वस्थ रमण शहा दिसत होता.
 
त्याचा उतरलेला चेहरा वेगळेच काहीतरी सांगत होता. पण नेमकं काय आहे याचा अंदाज कोणालाच बांधता येत नव्हता. त्याच्या बायकोला सुद्धा अंदाज आला नाही की नेहा मुळे हे सगळं होतय.
 
 
 
रमण शहा केबिनमध्ये खूप अस्वस्थपणे झाला होता. त्याचा असिस्ट केबिनमध्ये आला
 
“ साहेब ते यवतमाळचे क्लायंट आलेले आहेत. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे.?
 
“ कोण क्लाएंट ?”
 
रमण शहाने प्रश्न विचारला असिस्टंट म्हणाला,
 
 
यवतमाळचे आले आहेत .त्यांनी चार दिवसापूर्वीच तुमची अपॉइंटमेंट घेतली होती. तुम्ही आजची वेळ दिली होती. ते लोक येऊन अर्धा तास होऊन गेला तुम्ही त्यांना अजून भेटला नाही. त्यांना लगेचच्या रात्रीच्या पॅसेंजरने परत जायचे आहे .”
 
 
यावर रमण शाह खूप चिडला,
 
 
“अरे समोरच्या माणसाला काय फक्त स्वतःच कामच दिसतं का ? माझ्या वर काय परिस्थिती आली आहे याची काही कोणाला फिकीर आहे की नाही?”
 
 
तेव्हा असिस्टंटने आलेली संधी न सोडता विचारलं
 
“साहेब असं झालं तरी काय ?तुमची तब्येत ठीक नाहीये का? काय झालं? अंगात ताप आहे का ?काही वेगळं आहे का?”
 
 
“काय सांगू तुम्हाला मला सांगता येत नाही. मला काय त्रास होतो तो मी सांगूननही तुम्हाला तो कळणारही नाही.”
 
“ पण सर त्या यवतमाळच्या क्लायंटला काय सांगू?”
 
 
 
असिस्टंट ने विचारलं.
 
“त्यांना मला खूप अर्जंट नसेल तर चार-पाच दिवसांनी यायला सांग. कारण माझी आजतब्येत ठीक नाही.”
 
“बर “
 
असं म्हणून असिस्टंट रमणच्या केबीनमधून बाहेर पडला.
 
असिस्टंट गेल्यावर रमण शहा परत अस्वस्थपणे येरझाऱ्या घालू लागला. नेहाच्या घरचा पत्ता कसा मिळवावा यांचा विचार त्याला सतावत होता. पुढल्या क्षणी रमणला काहीतरी सुचलं आणि
 
“ यसं.”
 
असं म्हणत रमणने आनंदाने चुटकी वाजवली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद थिरकू लागला. आणि त्याचे हात वेगाने कामात गुंतले.
 
______________________________
काय सुचलं रमणला? बघू पुढील भागात.