भाग – १६
सावली आता आणखीनच मानसिक त्रासात एकदम गहरी समावली होती. या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे तीचे मस्तिष्क चालणे बंद झाले होते. ती तीच डोकं घेऊन बसून राहिली वीचार करत. तीचं दिवसाचं सुख आणि रात्रीची झोप उडाली होती. तेवढ्यात तीची आई आली आणि म्हणाली, “ बाळा आता काय बर आपण करायचे, हे तर फारच मोठे संकट आहे. हे देवा तूच काही मार्ग सुचव रे आम्हाला.” सावली आता वीचार करून करून थकली होती आणि ती फारच रागावली होती. तीचा मानसीक अवस्थेत गेलेली होती. ती त्याच भारात बोलली, “ आई आता घाबरून चालणार नाही. काय करायचे ते आता तेथेच जाऊन करायचे आहे. मला त्यांचाच दगडाने त्यांचीच मान ठेचायची आहे.” तेव्हा आई बोलली, “ असे काय करणार आहेस बाळा तू?” तेव्हा सावली म्हणाली, “ आई मी त्या ऑफिसला जाणार आणि त्यांचा मध्ये जाऊन त्यांचेच कान कापणार. याचा शिवाय आपल्या जवळ दुसरा मार्ग नाही आहे.” मग सावली तीचा ऑफिसला जाण्याचा तयारीत लागून गेली. ती सरळ तीचा रुममध्ये गेली आणि स्वरक्षणाचा वस्तू संग्रहीत करू लागली. उदयाला काय तर रोजचं तीला त्या वस्तू सोबत बाळगायचा होत्या. शिवाय तीला संपूर्ण पुढचे भवीष्य दिसत होते कि तीचा सोबत काय होणार आहे आणि काय होऊ शकते. तर ती त्यासाठी आणि त्या गोष्टींचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करत होती.
सकाळ झाली आणि दुसरा दिवस उजळला होता. सावली आता आपल्या मीशनवर जाण्यास तत्पर झालेली होती. तीने तीचे साहित्य आधीच व्यवस्थित घेतले होते. तर ती आईची परवानगी घेऊन त्या ऑफिसला जाण्यास निघाली. घराचा बाहेर जाऊन तीने तीची गाडी सुरु केली आणि ती निघाली होती. तीने गाडीचा आरशात बघीतले तर तीचा पाठलाग करतांना एक गाडी तीला दिसली. त्या गाडीवरील व्यक्तीने फोन काढून समोरील व्यक्तीला सावलीचा निघण्याचाबद्द्ल माहिती दिली आणि फोन ठेवला. सावलीला ज्या प्रमाणे वाटले होते त्याच प्रमाणे घडत होते. सावली सुद्धा आता अशा अपराधिक वृत्तीचा लोकांचे मस्तिष्क वाचण्यास सक्षम होती. कारण कि कराटे शिकत असतांना त्यांना हे सगळ शिकवण्यात येत होत. म्हणून आता सावली त्याच शिकवणीची उजळणी करत होती. सावली थेट त्या ऑफिसला जाऊन पोहोचली तर तेथील चपराशी तीला बघून आश्चर्य चकित झाला. सावली सरळ आत गेली तर ते तीघेही सावलीची वाटच बघत होते. कारण त्यांना सावलीचा आगमनाची वार्ता आधीच फोनवर कळली होती. तर सावली आत गेली आणि त्यांना नमस्कार केला. त्यांनीही तीला नमस्कार केला आणि म्हणाले, “ या मीस झाशीची राणी, आलात न वठणीवर, दोन दिवसांपूर्वी तर खूपच उड्या मारत होत्या. तर आज कशा काय आलात येथे आमचा चरणी.” तेव्हा सावली म्हणाली, “ मी तर माझे काम करायला आले आहे. तुमचा तोंडाला लागण्यासाठी नाही आले आहे.” तेव्हा त्यातील एकजण बोलला, “ माज तर बघा सालीचा आमचाच घरात उभी राहून आम्हालाच वेडेवाकडे बोलते. तुझी सगळी मस्तीच काढून टाकतो,” असे म्हणून तो सीटवरून उठणार तोच दुसरा बोलला, “ अरे शांत व्हा रे ती आता आपल्याच तावडीत असणार आहे. तीला कसे वठणीवर आणायचे आहे ते शांतपणे विचार करून करू. सोडा तीला आता आणि आपले काम करू आधी नंतर तीला बघू.” असे म्हणून ते तीघेही त्यांचा कामात व्यस्त झाले. त्यांनी एका स्टाफला बोलावून सावलीला घेऊन जाण्यास सांगीतले आणि तीला काय काम करायचे आहे याबद्दल सांगण्यासाठी सांगीतले. सावली त्याचा बरोबर गेली आणि तीचे काम त्याचाकडून समजावून घेऊ लागली. त्याने सावलीला एक कॉम्पुटर दिला आणि तीला काही लेटर टाईप करण्यास सांगीतले. सावलीने आता ते लेटर टाईप करण्यास सुरुवात केली होती. ते जवळ जवळ चार ते पाच लेटर होते. सावली तर हुशार होतीच तर तीला तसे लेटर बनवण्याचा अनुभव सुद्धा होता. म्हणून तीने अर्ध्या तासात ते लेटर बनवून तयार केले. तेव्हा तो स्टाफ तेथे आला आणि तीला सांगितले कि हे लेटर साहेबांकडे घेऊन जा त्यांचा सह्या या लेटरवर घ्यायचा आहे. तर आता सावलीला पुन्हा त्यांचा नजरेपुढे जायचे होते.
तर सावलीने हिम्मत केली आणि ती गेली. तीने दार वाजवले आणि आत येण्याची परवानगी मागीतली, तर त्यांनी तीला आत बोलावले. सावलीने ते लेटर त्यांचा पुढे ठेवले आणि म्हणाली, “ तुमची सही यावर पाहिजे होती.” तेव्हा ते तीघेही सावलीकडे बघू लागले आणि त्यांचा डोक्यात एक युक्ती आली. त्यांनी सावलीला केबीनचे दार संपूर्ण उघडायला सांगीतले. सावलीने ते उघडले त्यानंतर त्यांनी ते लेटर हातात घेतले आणि मग क्षणातच ते तीचावर जोराने ओरडू लागले. ते सोबत सोबत तीचा अपमान करू लागले. सावलीने तर ते लेटर कार्यालयीन भाषेत अचूक असे बनवले होते परंतु त्या तीघांना तीचा अपमान करण्याची संधी मिळाली होती. म्हणून सगळ्या ऑफिसचा स्टाफला ऐकायला जाईल इतक्या मोठ्या आवाजाने ते तीचावर ओरडत होते. मात्र सावली जसे काहीच ऐकू येत नाही आहे असे वर्तवून त्यांचा त्या वर्तणुकीवर हसत राहिली. तीला तसे हसत असलेले बघून त्यांना आणखी राग येत होता आणि सावली तशीच हसत राहिली. शेष पुढील भागात........