Mala Space havi parv 1 - 38 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३८

Featured Books
  • तमस ज्योति - 51

    प्रकरण - ५१मेरे मम्मी पापा अब हमारे साथ अहमदाबाद में रहने आ...

  • Lash ki Surat

    रात के करीब 12 बजे होंगे उस रात ठण्ड भी अपने चरम पर थी स्ट्र...

  • साथिया - 118

    अक्षत घर आया और तो देखा  हॉल  में ही साधना और अरविंद बैठे हु...

  • तीन दोस्त ( ट्रेलर)

    आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं हम एक नया उपन्यास जिसका...

  • फाइल

    फाइल   "भोला ओ भोला", पता नहीं ये भोला कहाँ मर गया। भोला......

Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३८

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३८

मागील भागात आपण बघीतलं की निरंजन, सुधीर आणि नेहाला कॅंन्सर ग्रस्त पेशंटची काळजी कशी घ्यायची विद्ध्वंस मॅडमने सांगीतलं.आता पुढे बघू


काल प्रियंकाची पहिली केमो झाली. प्रियंका बरोबर नेहा,सुधीर, निरंजन होते. प्रियंका सुरवातीला घाबरलेली होती. ज्या दिवशी तिला कॅंन्सर डिटेक्टर झाला त्या दिवसापासून ती खूण टेन्शन मध्ये होती.

आपलं आयुष्य इतक्या लवकर संपणार यावरच तिचा विश्वास बसला नव्हता आणि अजूनही बसत नाही. आत्ता तर कुठे ती निरंजनला ओळखायला लागली होती. नव्या आयुष्याचे नवे लोभस रंग तिला खूप काही करण्यास खुणावत होते तोच आपल्या आयुष्याची इतिश्री होणार हे कळल्यावर कोणालाही धक्का बसणारच आहे.

प्रियंका शांतपणे डोळे मिटून पलंगावर पडली होती. मिटलेल्या डोळ्यात खूप टोचणारे अश्रू साठले होते. अश्रू म्हणजे पाणी. पाणी कसं टोचणार? पण त्या क्षणी प्रियंकाला ते अश्रू धारदार करवतीसारखे वाटतं होते. जे तिच्या स्वप्नांना कापत चालले होते. स्वप्नं संपली की माणूस संपला. म्हणजे आपणही एक दिवस संपणारच. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.


प्रियंकाच्या डोक्यात वाईट विचारांचा हलकल्लोळ चालू होता. निरंजनला मात्र वाटलं प्रियंका थकल्यामुळे झोपली आहे. प्रियंका विचारांनी सैरभैर झालेली होती तेव्हाच तिच्या कानावर निरंजन आणि त्याच्या आईचं बोलणं आलं.

"झोपली कारे प्रियंका?"
निरंजनला आईने लिचारलं.

"हो. काल पहिली केमोथेरपी झाली. काल बहुदा तिला थकवा जाणवला नाही. थोडी सैरभैर झाली होती. पण आज मात्र थकलेली वाटते आहे."

"रात्री झोप लागली का नीट?"

"हो. मधून मधून जाग येत होती. पण थोडी झोप लागली."

"आता बघ ऊठतेय का ?जेवायची वेळ झाली."

"उठवून बघतो."

"हळूच हाक मार गाढ झोप लागली असेल तर दचकेल."
निरंजनला आईने म्हटलं.

प्रियंकाच्या मनात आलं की माझी किती काळजी घेतात हे सगळे. मी तर त्यांची सून म्हणून कोणतीच कर्तव्य पार पाडली नाही. देवा त्यांची सेवा करण्याची संधी मला द्यायची होती.मग द्यायचा नं हा आजार.

"प्रियंका ऊठतेस का?"

निरंजनने हळूच प्रियंकाच्या हाताला स्पर्श करत म्हटलं. त्याक्षणी आवेगाने प्रियंकाने निरंजनचा हात धरला.

"निरंजन का नाही रे आपण आयुष्यभर एकत्र राहू शकत?"

"अरे हे काय नवीन? आपण दोघं आयुष्यभर एकत्रच राहणार आहोत. लग्न झालंय आपलं विसरलीस का??

"मी नाही काही विसरले.पण हा देव विसरला. त्यानेच या कॅंन्सरला आपल्या दोघांमध्ये ढकललं. मी कधी तुझ्या आयुष्यात नंदनवन फुलवणार? मनात इच्छा असली तरी मला आयुष्यच तेवढं नाही."

प्रियंकाचं हे बोलणं ऐकल्यावर निरंजनला भडभडून आलं. आलेला हुंदका कसाबसा दाबत, मोठ्या मुष्कीलीने आवाजावर नियंत्रण ठेवत निरंजन म्हणाला,

"प्रियंका आज असं विचित्र का बोलते आहेस? तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझ्या आयुष्यात तू सुखाचं, आनंदाचं नंदनवन फुलवलय. तुझा विश्वास बसणार नाही कदाचित पण हे खरं आहे."

अचानक प्रियंका रडायला लागलेली बघून तिला शांत कसं करावं निरंजनला कळेना. विद्ध्वंस मॅडम म्हणाल्या ते निरंजनला आठवलं.आज प्रियंकाचा मूड काही चांगला दिसत नाही आपणच तिला सावरायला हवं.

"प्रियंका फार विचार करू नकोस ग. जेवायला चलतेस नं? "

"नको. निरंजन मला आता कोणावरही ओझं व्हावंसं वाटत नाही."

"कोण म्हणालं तू ओझं आहेस?"

"निरंजन कॅंन्सर पेशंट घरच्यांवर ओझच असतो.नीट जगतही नाही आणि मरतही नाही."

"प्रियंका पुन्हा असं बोलू नकोस."

निरंजन प्रियंकाच्या तोंडावर हात ठेवत तिला म्हणाला
आपल्या डोळ्यातील पाणी बाहेर येऊ न देण्याची खबरदारी घेत निरंजन पुढे म्हणाला,

"प्रियंका आपलं पूर्वजन्मातील नातं आहे ग. मागील जन्मात तू खूप प्रेम केलं असशील माझ्यावर. माझी खूप सेवा केली असशील म्हणून या जन्मात मी तुझ्यावर खूप प्रेम करतो."

"निरंजन प्रेमाबरोबर ही अवघड सेवा पण करणं तुझ्या नशिबात आलं नं ?"

"तुला असं का वाटतं की ही सेवा मला अवघड काम वाटतंय. अग आपल्या प्रेमाच्या माणसासाठी आपण करत असलेलं कुठलही काम अवघड नसतं."

"नकोरे एवढं कठीण बोलूस. "

'प्रियंका त्या समुपदेशन करणा-या मॅडम म्हणाल्या की तुला आवडणा-या गोष्टी तुला करायला सांगणार आहेत."

"तुला कसं माहिती? "

"मी भेटलो परवा त्यांना "

"कशाला?"

"अगं आपण समुपदेशन पण करून घ्यायचंय नं त्यांच्या कडून. नेहाने तुला त्या दिवशी सांगीतलं नं सगळं. "

"हो. खरच माझ्या जगण्यामध्ये बदल होईल?"

"अगं त्या विद्ध्वंस मॅडमनेच सांगीतलं त्यांच्या पेशंटमध्ये कसा बदल झाला ते."

"हो?"

"हो."
निरंजन म्हणाला.

"खरच होईल माझ्यात बदल की मला सांगतोय?"

"नाही ग खरच. परवा तुझं पहिलं सेशन होईल तेव्हा तू विचार.त्याच सांगतील तुला."

"ठीक आहे."

"प्रियंका तुला भूक नाही का लागली?"

"इच्छा नाही होत. डोळ्यापुढे सगळा अंधार दाटला आहे."

"प्रियंका असा निगेटिव्ह विचार मनात आणू नकोस. तुझं समुपदेशन सुरु झालं की असे विचार तुझ्या मनात येणार नाही. आई बाबा थांबले आहेत तुझ्यासाठी जेवायला."

"काय?"

प्रियंका झोपलेली होती तिने धडपडत उठून विचारलं.

"निरंजन मला सांगायचं नं!"

"अग एवढ्या धडधड उठू नकोस."

"चल काही होत नाही. माझ्यामुळे आई बाबांना उशीर नको रे. बाबांची जेवायची वेळ ठरलेली असते."

प्रियंका झरकन उठून स्वयंपाघरात गेली. प्रियंका आजारी असून, थकलेली असून केवळ आई बाबांना जेवायला उशीर नको व्हायला म्हणून किती धडपडत उठून गेली.

ते बघून निरंजन मनात आलं,
"ही आजारी आहे आम्ही हीची काळजी घ्यायची तर हीच आमची काळजी घेतेय. देवा तू मला इतकी गुणी बायको दिलीस मग तिला इतकं कमी आयुष्य का दिलं?"

डोळ्यावर हात ठेवून निरंजन हुंदके देत होता तेव्हाच त्याच्या कानावर त्याच्या बाबांचा आवाज आला

"निरंजन जेवायला चल."

"हो बाबा आलोच."

कसेबसे डोळे पुसून निरंजन स्वयंपाघरात जेवायला.
गेला.

****

निरंजनने जेवण झाल्यावर मघाचा प्रसंग सुधीरला कळवला.

सुधीरने आई, बाबा, आणि नेहाला सांगितलं.

"आपली प्रियंका खूप समजूतदार आहे. एवढं मोठं आजारपण असुनही हिला सासुसाऱ्यांची काळजी आहे."

"तेच तर इतक्या गुणी मुलीच्या नशिबी असं का यावं?"

"हे बघ काही बाबतीत आपल्याला कळत नाही. असं का घडलं? तेव्हा त्या गोष्टी पूर्व संचित आहे म्हणून गप्प बसायचं."
सुधीरचे बाबा म्हणाले.

"प्रत्येवेळी कसं हो तुम्ही असं म्हणता?"

सुधीरची आई जरा रागानेच बोलली.

"आई मला तुझा राग कळतोय. पण बाबांना जर अध्यात्मिक दृष्ट्या तसं वाटत असेल तर तू का चिडतेस?"
सुधीर आईला म्हणाला.

"चिडत नाही रे. तुझे बाबा प्रत्येक वेळी हाच तर्क लावतात."

"ठीक आहे. तुला जसं वाटतं तसा तू विचार कर. आपल्या सगळ्यांच्या मनातला जो हळवा कोपरा आहे तो म्हणजे प्रियंका. ती सध्या इतक्या विचित्र काळातून जातेय ते आपण बघु शकत नाही.त्यामुळे आपल्या सगळ्यांचीच चिडचिड होतेय."

"खरंय सुधीर तू म्हणतोस ते. प्रियंकाच्या आठवणीने खूप हळवी होते मी. ती लग्न करून सासरी गेली म्हणून विरहाच दु:खं होतं पण ती सारखी भेटायची आता कधी भेटेल का की नाही अशी भीती वाटते."

असं बोलून सुधिर्ची आई ढसाढसा रडायला लागली.

नेहाने चटकन त्यांना जवळ घेतलं आणि त्यांना थोपटू लागली. सुधीरचे बाबापण आपलं रडणं थांबवू शकले नाही.

सुधीर खिन्नपणे बसला. कोणालाच काहीच सुचत नव्हतं. नेहा सुधीरच्या आईला थोपटत राहिली. तिच्या लक्षात आलं की आत्ता या क्षणी शब्दांचे बुडबुडे बोलायची गरज नसते फक्त प्रेमळ स्पर्शातून आधाराची गरज असते.

***

निरंजन,त्यांचे आई बाबा आणि प्रियंका जेवत होते.
प्रियंकाचं सगळं पथ्याचं जेवण होतं. जेवणापूर्वी तिचं ताट, वाटी, ग्लास सगळं उकळत्या पाण्यातून काढून निर्जंतुक केलेलं होतं. तिचं जेवण निर्जंतुक केलेल्या भांड्यातच शिजवलं जायचं.

तिघही प्रियंका हसतमुखाने कशी जेवेल याची दक्षता घ्यायचे. निरंजनची आई भजन मंडळात जात असे. आता प्रियंका आजारी झाल्यापासून त्यांनी क्लासला जाणं बंद केलं असतं. तरी त्या क्लास मधील गमती जमती नेहमी सांगत असत.

या गमती ज्या मैत्रीणींबद्दल सांगायच्या त्यांना प्रियंका ओळखायची.त्यामुळे तिला हसायला यायचं.ती हसली की इतर तिघं एकमेकांकडे बघून समाधानाने हसायचे.

निरंजनचे बाबा पण हल्ली फार कमी फिरायला जात. प्रियंकाचा औषधोपचार नीट सुरू झाला की ते एकटेच फिरायला जाऊ शकतात. जातांना मात्र कटाक्षाने मास्क बांधुन जा आणि आल्यावर आंघोळ करत चला असं त्यांना डाॅक्टरांनी सांगीतलेलं असतं.

प्रियंकासाठी कितीही अडचणीचे आणि कटकटीचे वाटणारे उपचार असतील तरी ते करण्याची निरंजनची आणि त्याच्या आईबाबांची तयारी होती कारण या तिघांचा प्रियंकाला फार जीव होता.

हलक्या फुलक्या गप्पा मारत, हसत चौघांची जेवणं झाली. निरंजन प्रियंकाला औषधं देण्यासाठी खोलीत आला.निरंजनचे आई बाबा एकमेकांच्या मदतीने मागचं आवरून लागले.

__________________________________
प्रियंकाची केमोथेरपी तर सुरु झाली.आता समुपदेशनाचा तिला काही फायदा होतो का बघू.