मला स्पेस हवी पर्व १ भाग ३४
मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचं नितीन आणि निशांत सांत्वन करतात.पुढे बघू.
आज ऑफीसमध्ये नेहाचं कामाकडे अजीबात लक्ष लागत नव्हतं. प्रियंकाच्या आजारपणाबद्दल कळल्या पासून तिला प्रियंकाशी आपलं असलेलं सुंदर बाॅंडीग आठवलं.
नेहा लग्न होऊन आली तेव्हा प्रियंका 'वहिनी वहिनी' करत नेहाच्या सतत पाठीमागे असायची. नेहा सव्वीस वर्षांची तर प्रियंका तेवीस वर्षांची. दोघींमध्ये तीनच वर्षांचं अंतर असल्याने काही दिवसातच नेहा आणि प्रियंकाची छान गट्टी जमली.
प्रियंकाच्या मोकळा आणि हसरा स्वभाव नेहाला खूप आवडला. नणदेची भीती वाटावी अश्या प्रकारचा स्वभाव प्रियंकाचं नसल्याने नेहाचीपण ती लगेच लाडकी झाली.
प्रियंकाशी नेहाचं नातं जे मोकळं आणि निर्मळ होतं तसंच नातं नेहाचं प्रणालीशीपण होतं. एकीकडे वहिनी आणि एकीकडे नणंद दोन्ही बाजूंनी आपण खूप सुखी आहोत असं नेहाला नेहमीच वाटायचं.
आत्ता नेहाच्या जवळचा एक कोपरा भयंकर अडचणीत सापडलेला होता. ते संकट दूर होण्यासारखं नव्हतं. हे माहीत असल्याने नेहा मनात खचली. आत्ताही तिच्या चेहऱ्यावर हे सगळे भाव उमटले होते.
बराच वेळा पासून रंजना नेहाचं निरीक्षण करत होती. वेळ मिळाला की नेहा सांगेल असं न करता रंजना नेहाजवळ गेली आणि तिने विचारलं,
"काय झालं नेहा?"
'काय सांगू कसं सांगू कळत नाही."
नेहा म्हणाली.
"एवढं काय झालं? तुझं आणि सुधीरचं भांडण झालं का?"
रंजना ने विचारलं.
"नाही .ग तुला माझी नणंद प्रियंका माहिती आहे का?"
"हो. तिचं मागच्या वर्षी लग्न झालंय तीच नं !"
"हो तिचं. तिला कानाचा कॅन्सर झाला आहे आणि ती काही दिवसांचीच सोबती आहे."
"अरे बापरे एवढ्या पुढच्या स्टेजला जाईपर्यंत कळलं नाही?"
"नाही नं. कान दुखतो म्हणत होती. थांबेल म्हणून पंधरा दिवस डाॅक्टरकडे गेली नाही नंतर ते दुखणं तिला सहन होईना झालं तेव्हा ती कानाच्या डाॅक्टरकडे गेली. तेव्हा
कळलं की कॅंन्सर आहे. डाॅ.ने तिचं आयुष्य आता फक्त सहाच महिने आहे असं सांगितलं."
"एकदम हे असं कळलं?"
" हो नं. आमच्यासाठी खूप मोठा शाॅक आहे."
"खूप वाईट वाटलं ग हे ऐकून. उपचार सूरू झालेत का?"
"हो ."
"नेहा कॅंन्सर पिडीत व्यक्तींना समुपदेशनाची गरज असते. "
"होका?"
"हो. कारण कॅंन्सर या नावाने अजूनही भीती वाटते. त्याच्या वेदना पण त्यांना सहन होत नाहीत. अशावेळी पेशंट आपलं मनोबल गमआऊ बसतो. बरेच पेशंट मनोबल कमी पडल्याने लवकर दगावतात.'
"रंजना खरं सांगू कॅंन्सर वर उपचार निघाले आहेत पण कॅंन्सर म्हटलं की माणूस कधी न कधी जाणारच हे पक्कं माहीत असल्याने जीव घाबरतो ग. प्रियंकाशी माझ्या मनाच्या तारा इतक्या छान जुळल्या म्हणून मी सासरी लवकर रूळले. तीच आज इतक्या मोठ्या संकटात सापडली आहे की मला काही सुचत नाही ग."
रंजनाने नेहाच्या हातावर थोपटलं आणि म्हणाली,
"नेहा मला तुझी मानसिक स्थिती कळतेय पण तू खंबीर रहा. प्रियंकाला समुपदेशन करण्यासाठी तिच्या सासरी तुला सांगावं लागेल."
"समुपदेशन म्हणजे काय करतात?"
"पेशंटच्या मनातून कॅंन्सर या आजाराची भीती समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. हळुहळू पेशंटचं मन स्थिर होतं. आपल्या आवडीच्या गोष्टींकडे तो लक्ष देऊ लागतो. पेशंट आपले छंद जोपासू लागल्याने त्याला कॅंन्सरच्या वेदना सहन करायला ऊर्जा मिळते. काहीजणं यातून बाहेर पडतात आणि बरीच वर्ष जगतात."
"हो असं होतं?"
"हो."
"तू असे पेशंट बघीतले आहेस?"
नेहाने रंजनाला विचारलंं.
"मी स्वतः नाही बघीतले पण माझ्या शेजारी विद्ध्वंस राहतात. त्या काकू हे काम करतात. नेहा तुझा विश्वास बसणार नाही पण बरेच कॅंन्सरपिडीत लोकंही हे समुपदेशनाचं काम करतात."
"काय सांगतेस तू ?"
'हो. समुपदेशनामध्ये एवढी ताकद आहे. डाॅक्टरांनी प्रियंका काही महिने जगेल असं सांगितलं आहे पण जर तिने समुपदेशन करून घेतलं तर ती वर्षभर किंवा त्याहून जास्त काळ जगेल."
"खरच सांगते?"
"हो. काही पेशंट खूप खचलेल्या मनोवस्थेत विद्ध्वंस काकूंकडे आले होते. पण एखाद्या महिन्यातच समुपदेशनामुळे त्यांचं मनोबल इतकं ऊंचावलं की ते पाच वर्ष ठणठणीत जगले. नंतर गेले. तसेही ते साठवर्षाच्या वर होते. नेहा माणसाचं किती आयुष्य आहे हे वरच्याने ठरवलं असतं. त्यामुळे आपण फक्त त्याला सकारात्मक ऊर्जा देऊन उरलेले उपचार घेण्यास आणि कॅंन्सरच्या तीव्र वेदना सहन करण्याची ताकद मिळवून देणे एवढं तर करू शकतो."
"हो तू म्हणतेस ते बरोबर आहे."
"नेहा तुझं प्रियंकाशी बाॅंडीग चांगलं आहे त्यामुळे तू तिला समुपदेशनाबद्दल सांग."
"हो ग पण कसं सांगू ते कळत नाही."
"तू खूप टेन्शनमध्ये येऊन तिला सांगू नकोस. खूप सहजतेने सांग. सुधीरला पण सांग प्रियंकाशी बोलायला."
"हो. रंजना मी एकदा त्या विद्ध्वंस काकूंना भेटाव म्हणते. त्यांना विचारते मी समुपदेशनाबद्दल प्रियंकाला कसं सांगू?"
"चालेल. मी काकूंना वेळ विचारते तशी तू माझ्या बरोबर चल."
या दोघी बोलत असतानाच नेहाचा फोन वाजतो.फोनवर प्रियंकाचं नाव बघून नेहा म्हणाली,
"रंजना नेहाचा फोन."
"घे मग."
नेहा फोन घेते
"हॅलो "
"नेहा काय करतेय ग?"
" मी ऑफीसमध्ये आहे. काग?"
"काही नाही ग.डोक्यात खूप विचार येतात.अस्वस्थ व्हायला होतं. काही कळत नव्हतं म्हणून तुला फोन केला. साॅरी."
"साॅरी कशाबद्दल प्रियंका.?"
"तुला ऑफीसमध्ये डिस्टर्ब केलं."
"प्रियंका काहीतरी काय बोलतेस तू माझी फक्त नणंद नाहीस माझी बेस्ट फ्रेंड आहेस माहीत आहे नं तुला?"
"हो ग पण तू ऑफिसमध्ये आहेस आणि मला तुझी खूप आठवण आली म्हणून फोन केला."
"काही हरकत नाही मी ऑफिस संपलं की लगेच येते तुमच्या घरी."
"हो? नक्की?"
प्रियंकाचा आवाज खूप थकलेला आणि रडवेला होता.
क्षणभर थांबून नेहाने विचारलंं,
"प्रियंका तू जेवलीस का?'
प्रियंका काही बोलत नाही.
"प्रियंका तू काही बोलत नाहीस म्हणजे तू जेवलेली नाहीस. पण आज मी रात्री तुमच्या कडे जेवायचं ठरवलं होतं. आता माझा प्लॅन कॅंन्सल करते. मी नाही येणार."
"नाही नाही असं नको करूस. तू आली की मला खूप छान वाटतं. एक ऊर्जा मिळते ग."
"हो नं मग आत्ता तू जेवलीस तर मी रात्री तुमच्या कडे येणार आणि जेवणार. जेवशील नं?"
"हो.ठेवते."
"ठेव. मी येतेय संध्याकाळी."
नेहाने फोन ठेवला.
"कायग? काय म्हणाली प्रियंका?"
रंजनाने कुतूहलाने विचारलं.
नेहाने प्रियंकाशी फोनवर झालेलं बोलणं सांगितलं.
"नेहा खरच तू सारखी जात जा. तिचं मनोबल वाढवणं आवश्यक आहे आणि आपण ते करायला हवं. तू त्या विद्ध्वंस काकूंना पण भेट मी आजच विचारते त्यांना जर ऊद्याच जमलं तर केव्हाचा वेळ घेऊ? "
"सांगते तुला.आज घरी गेल्यावर तिघांशी बोलते. नंतर बाबा निरंजनच्या बाबांशी बोलतील. विद्ध्वंस मॅडमची वेळ घेण्यापूर्वी प्रियंकाशी मला बोलावं लागेल. तिची समुपदेशनासाठी तयारी करावी लागेल. ती तयार नसेल तर मॅडमचा वेळ फुकट जाईल."
"अगं सुरूवातीला तयार नाही झाली तरी एकदोनदा त्या बोलल्या प्रियंकाशी की ती तयार होईल. खूप वेदना सहन करत असतात हे पेशंट त्यामुळे ते थोडे निराश झालेले असतात. त्यांच्या मनाला आलेलं नैराश्य काढून टाकायचं हाच मोठ्ठा टास्क असतो. म्हणून हे समुपदेशक अत्यंत तळमळीने या पेशंटना नैराश्यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतात. एकदा हे थोडे बाहेर आले की मग ते स्वतःच यातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे तू काळजी करू नकोस. प्रियंकासाठी समुदेशन खूपच महत्वाचं आहे."
"हो मी आजच घरी बोलते. घरी कोणी यासाठी नाही म्हणणार नाही याची मला खात्री आहे. तू तोवर मॅडमची वेळ घे."
"ठीक आहे."
नेहाला रंजनाशी बोलून छान वाटलं. प्रियंका म्हणजे नेहाचं दुसरं मन होतं इतकी त्या दोघी एकमेकींमध्ये दुधात साखर विरघळावी तश्या विरघळल्या होत्या. त्यांचं असं एकरूप होणं सुधीरचे आईबाबा आणि सुधीरला नेहमीच अचंबित करते असे.
सुधीरची आई मात्र दोघींचं एकमेकीत इतकं रूजून जाणं बघून आनंदीत व्हायची. म्हणायची,
"या दोघींचं असं एकमेकीत रूजून जाणं बघून मला वाटतं मला दोन मुली आहेत. एकमेकींबरोबर दोघी किती खूश असतात."
यावर सुधीरचे बाबा आनंदाने मान डोलावत.
नेहाच्या मनात प्रियंकाला समुपदेशन करण्याचा विचार चालू आहे याची कल्पना अजूनतरी सुधीर आणि त्याच्या आईबाबांना नाही.
__________________________________
नेहा घरी प्रियंकाला समुपदेशन करण्याचा विचार बोलून दाखवले? घरचे तिचं तयार होतील? बघू पुढील