Mala Space havi parv 1 - 28 in Marathi Moral Stories by Meenakshi Vaidya books and stories PDF | मला स्पेस हवी पर्व १ - भाग २८

Featured Books
Categories
Share

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २८

मला स्पेस हवी पर्व १भाग २८

मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीरचा साखरपुडा ठरला आहे त्याच्या आधी दोघंही फोनवर बोलतात.आता साखरपुडा कसा होतो ते बघू.


आज सुधीरचा आणि नेहाचा साखरपुडा आहे.

सुधीर…

आज माझा साखरपुडा आहे. विश्वासच बसत नाही. नेहासारखी समंजस मुलगी माझी बायको होणार आहे यावरही विश्वास बसत नाही. नेहा सुरवातीला जरा नाराज वाटली. बरं झालं बाबांनी आम्हा दोघांना बोलायची संधी दिली. त्यामुळे नेहाचं खरा स्वभाव कळला नाही तर मुलीला लग्न करायचं नाही याचं समजुती मध्ये आम्ही सगळे राहिलो असतो.

थॅंक्यू बाबा. तुम्ही किती अचूक ओळखली नेहाची अवघडलेली स्थिती. बाबा तुम्ही ग्रेट आहातच. मला आणि प्रियंकाला नेहमीच वाटतं की बाबा असावे तर असे.

गेले आठवडाभर आम्ही रोज भेटतोय. तिच्या घरी पहिल्यांदा आम्ही दोघं बोललो नंतर एकाही भेटीत आमची नवीन ओळख आहे असं आम्हाला वाटलं नाही. किती छान आवडीनिवडी जमल्या.

तिच्या आवडीनिवडीच्या बरोबर विरुद्ध माझं आहे. पण आम्ही ठरवलं या गोष्टीवरून सतत वाद घालायचे नाहीत. आपल्याला जी गोष्ट आवडतं नाही ती जर जोडीदाराची असेल तर त्या आवडीला आपलं करून घेण्याचा प्रयत्न करायचा.

किती छान जमतय आमचं. नेहाबद्दल विचार डोक्यात सुरू असल्याने सुधीरच्या चेहऱ्यावर आनंद होता पण त्याबरोबरच एक वेगळीच गोड आणि भीतीयुक्त धडधड त्यांच्या हृदयात चालली होती.

"अरे वा! पोरगं झालं तयार?"

आवाज ऐकून सुधीर भानावर आला. निशांत आणि नितीन दोघं त्याच्या काॅलेजमध्ये असल्यापासूनचे मित्र आहेत. ज्यांना बेस्टी म्हणता येईल असे. आता योगायोगने ते तिघही एकाच ऑफीसमध्ये आहेत. त्यामुळे तिघही काॅलेजमध्ये असल्यासारखे रोज भेटतात.

नितीन सेल्स साईडला असल्याने तो ब-याच वेळा टूरवर असतो. सुधीर आणि निशांत रवीवार सोडल्यास रोजच भेटतात. रविवारी ऑफीसमध्ये नाही तर चौकात भेटतात इतकी गाढ मैत्री आहे यांची.

"सुधीर ड्रेस मस्त दिसतोय."

"निशांत लेका तुझीच कल्पना आहे ही."

सुधीरने मोतिया रंगाचा नेहरू कुर्ता आणि चुडीदार घातलं होतं त्यावर कलरफुल जॅकेट घातलं होतं. हातात सोन्याचं ब्रेसलेट घातलं होतं. गळ्यात नव्या डिझाईनची सोन्याची चेन होती.

सुधीर मुळातच नाकीडोळी देखणा होता. त्यात जिममध्ये जाऊन त्याने त्याचं शरीर पिळदार केलं होतं. व्यायामामुळे शरीराबरोबर त्याच्या चेहऱ्यावर एक ग्लो आला होता.

दाट कुरळे केस, पिळदार शरीरयष्टी, नाकेडोळी नीटसं, गौरवर्णीय असा सुधीर तयार झाल्यावर निशांत आणि नितीन मुलं असून सुधीरकडे डोळे विस्फारून बघायला लागले.

"ए असं काय बघताय तुम्ही माझ्याकडे?'

"हाय हाय मैं मर जावा ."

नितीन हातवारे आणि मोठे डोळे करत असं बोलल्यावर निशांतला हसू आलं तर

"ए नितीन फिल्मी स्टाईल बोलू नको. खर सांग.अरे या मुली इतक्या सजतात नं! तिच्या पुढे मी चांगला दिसेन नं?"
सुधीरने विचारलं.

"अरे टेन्शन नको घेऊ."
नितीन म्हणाला.

"सुधीर तू मुळातच देखणा आहेस तुला गरज नाही खूप तयारीची. हां एक गोष्ट मार्क केली का नितीन तू?"

निशांतने विचारलं.

"कोणती गोष्ट म्हणतोय तू?"

"अरे याचे गाल बघितलेस का? किती सुंदर सजलेय. लाजेने गुलाबी रंगाचे हलकेसे फटकारे याच्या गालावर मारलेत बघ "

"हो रे खरंच. सुधीर तुला गरजच नाही कोणत्या मेकअपची."

"आज तुम्ही सगळी कसर पूर्ण करणार असं दिसतं. ऊद्या बघतो तुम्हाला."

सुधीरच्या या बोलण्यावर तिघांमध्ये खसखस पिकली.

***
नेहाला तयार करायला पार्लरवाली आली होती. नेहाच्या काॅलेजमधील मैत्रीणी, आणि रंजना तिच्या ऑफिस मधील मैत्रीण सगळे नेहाला चिडवण्यात मशगूल होत्या.

नेहा एवढ्यातच स्वस्तिक टूर्स अँड ट्रॅव्हलच्या पुण्याच्या शाखेत नोकरीला लागली होती. नेहाने टूर्स अँड ट्रॅव्हलचा डिग्री कोर्स केला होता. तिला टूरप्लॅनींग डिपार्टमेंट मिळालं होतं.

नेहाच्या हातावरची मेंदी छान लालभडक रौगली होती. ते बघून मैत्रीणी चिडवायला लागल्या.

"नेहा 'अहोंचं ' खूप प्रेम दिसतय.'

"मंजिरी काहीतरी काय?"
नेहा लाजत म्हणाली.

"अगं खरंच तुझ्या हातावरची मेंदी बघ किती छान लालभडक रंगली आहे."

"मेंदीच्या रंगाचा आणि सुधीरच्या प्रेमाचा काहीतरी संबंध आहे का?"
नेहा कृत:कोपाने म्हणाली.

"हो आहे. माझ्या ताईंचा अनुभव आहे हा."
मंजिरी म्हणाली.

नेहा वरकरणी चिडली असं दाखवत होती पण तिच्या मनात मात्र आनंदाचा मोहोर दरवळत होता.

तेवढ्यात प्रणाली आली. नेहाच्या मैत्रीणींना गप्प गप्प बघून म्हणाली,

"काय ग मैत्रीणींनो नेहाचा साखरपुडा आहे आणि तुम्ही इतक्या शांत कशा? चिडवण्याचे सगळे फंडे संपले का?"

"नाही वहिनी फंडे अजून आहेत. पण नेहाला आवडत नाही आम्ही चिडवलेलं."

"अगं तिचं काय ऐकता? आज तिला चिडवण्याचाच दिवस आहे. चिडवा मनसोक्त."
हसत प्रणाली म्हणाली.

"ऐ प्रणाली काही काय सांगते ?".

"बघ वहिनी कशी बोलतेय."

नेहाला साडी नेसणार शांतपणे साडी नेसवत होती. नि-यांना पीन लावल्यावर ऊठता ऊठता म्हणाली,

"ताई आजच सगळी गंमत होणार. मग कोणी विचारत नाही. चिडवून घे. "

"नेहा खरय बरं हे. माझं लग्न होईपर्यंत सगळे चिडवायचे. लग्नानंतर बंद झालं तेव्हा वाटलं किती छान मजा असते या चिडवण्यात. रोजच्या आयुष्यातील रूक्षपणा नाहीसा होतो."

प्रणाली म्हणाली.

"ऐ पोरींना आटोपलं की नाही?"

"हो झालंच आहे."

आईकडे बघून नेहाला हसू आलं. पार्लरवाली तिला पावडर लावत होती. तिला थांब अशी नेहाने हाताने खूण केली. नेहाचं हसणं बघून आई चिडली.

"देवा या पोरीचं लग्नं ठरलंय तरी हिला अक्कल येत नाही."

"काय झालं आई पॅनीक नका होऊ."
प्रणाली म्हणाली.

"अगं हिचं हसणं कसं आहे ?एवढ्या जोरात हसायचं?"

"आई मला असंच हसायला येतं मी काय करू?'

अर्धा सेकंद हसणं थांबवत नेहा म्हणाली.

"प्रणाली हिचं कायव्हायचौ राह्यलं आहे?"

"पावडर लावायची आहे फक्त."

पार्लर वाली म्हणाली .

"लाव मग चटकन".
"आई जरा नीट बघ नं माझ्याकडे सारखी रागावतेस."

आई काही न बोलता बाहेर गेली. नेहा हिरमुसली.

"नेहा एक सांगू लग्नाची मुलगी झाली की आईला काळजी लागते पण जेव्हा तिचा साखरपुडा असतो तेव्हा आईला कळतं की आपली लेक आता लवकरच सासरी जाणार आहे .म्हणजेच तिचा आईला मिळणारा हक्काचा सहवास आता खूप कमी दिवस राहीला आहे. यामुळे आईची चिडचीड होते. ही नेहमीसारखी चिडचीड नसते. एका डोळ्यात आनंद असतो तर एका डोळ्यात होणा-या विरहाची वेदना असते. म्हणून आई मनातून हळवी होते. "

बोलता बोलता प्रणालीच्या डोळ्यात पाणी आलं. हे
बघून नेहा गडबडली.

"प्रणाली तू रडतेस?"

"माझ्या लग्नाच्या वेळची आईची मन:स्थिती आठवली. तू आईंचा राग नको करूस. आज रात्री आईला घट्ट मिठी मारून साॅरी म्हण. बघ त्या लगेच तुला मायेने जवळ घेतील. करशील नं असं?"

"हो. प्रणाली बरं झालं तू सांगीतलं. आईचं मन ओळखायला नाही आलं मला."

"मॅडम तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा टचअप करावं लागेल. आता रडू नका ."

आपले डोळे आणि मनातला हुंदका दाबत नेहा म्हणाली,

"करा टचअप. नाही रडणार."
नेहाचं टचअप होत असतांनाच अक्षय आला

"अरे तुमचं आटोपलं नाही का अजून? गुरूजी केव्हाचे वाट बघतात आहे. प्रणाली नेहाला घेऊन लवकर बाहेर यायचं तर तूही इथे गप्पा मारत बसलीस?"

प्रणाली काही बोलली नाही.

"ही फायनली तयार झाली आहे नं?

अक्षयने पार्लरवालीला विचारलं.

"हो . झाली आहे."

"चल मग ."

असं म्हणत अक्षय नेहाला घेऊन बाहेर आला. स्टेजवर
नेहा हळूच चढली आणि चौरंगावर जाऊन बसली. तिच्यासमोर सुधीरचे आईबाबा बसले होते.

आपल्या खोलीच्या खिडकीतून सुधीर नेहाला बघून दंग झाला. मनातच म्हणाला खरच नेहा तिच्या सुंदर विचारांप्रमाणे दिसायलाही सुंदर आहे. सुधीर आपल्यातच गुंतला.

" आपल्या सुधीरभाऊची विकेट गेली रे बा !"

नितीन हसतच म्हणाला

"तुम्ही गप्प बसानं. माझा मूड नका घालवू."

सुधीर असं म्हणताच नितीन आणि निशांत सुधीरच्या पाठीवर थाप मारून खोलीबाहेर येऊन उभे राहिले.

_________________________________
पुढे बघू काय गंमती जमती होतील.