मला स्पेस हवी पर्व १ भाग १९
मागील भागात आपण बघीतलं की सुधीरने आई बाबांना नेहाच्या बंगलोरला जाण्यामागचं खरं कारण सांगितलं. आता नेहा बंगलोरला काय करतेय ते बघू.
नेहाला बंगलोरला येऊन साधारणतः दहा दिवस झाले असतील. तिच्याकडे टूरप्लॅनींगबरोबर जाहीरात विभाग पण असल्याने दोन्ही विभागातील मुख्य व्यक्तींशी तिची ओळख आणि दोन्ही विभागातील कामाच्या गती बद्दल माहिती करून घेतल्यावर आज तिने जाहिरात विभागाची अपर्णा आणि टूरप्लॅनींगमधील राजेशला आपल्या केबीनमध्ये बोलावलं.
ते दोघंही नेहाच्या केबीनमध्ये यायला आणि नेहाचा फोन वाजायला एकच गाठ पडली. तिने मोबाईलच्या स्क्रीनवर तिच्या आईचं नाव वाचूनही तिने फोन घेतला नाही.
अपर्णा आणि राजेश दोघंही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसले.
" गुड मॉर्निंग मॅडम."
" गुड मॉर्निंग."
नेहाचा फोन पुन्हा वाजला. तिने फोन घेण्याऐवजी सायलेंट वर टाकला.
" मॅडम फोन महत्वाचा असेल तर घ्या. आम्ही थांबतो."
अपर्णा म्हणाली.
" नाही काही महत्वाचं नाही. आपण कामाबद्दल बोलूया. राजेश सर आता दिवाळी आहे पुढच्या महिन्यात नंतर ख्रिसमस आणि नंतर उन्हाळ्याची मोठी सुट्टी."
" हो. मॅडम."
राजेश म्हणाला.
" या सुट्ट्यांचं तुम्ही काय प्लॅनींग केलंय?"
" मॅडम आपण नेहमी दिवाळी आणि ख्रिसमससाठी छोटे टूर आखतो आणि उन्हाळ्यासाठी मोठे टूर आखतो."
" ओके. उन्हाळ्यात मोठे टूर किती आखता?"
" मॅडम दोन आखतो ."
" आणि कमी दिवसांचे टूर किती आखता?"
" मॅडम कमी दिवसांचे आपण टूर ठरवत नाही."
राजेश म्हणाला.
" का?"
नेहाने विचारलं.
" कारण काही नाही. आपल्या कंपनीची पाॅलीसी आहे."
" मला सांगा तुम्ही जेव्हा टूर प्लॅन करता तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कोणत्या वयातील प्रवासी असतात?"
"मॅडम उन्हाळ्यात आम्ही फॅमिलीसाठी टूर आखतो. ज्यांची मुलं शाळेत आहेत अशां लोकांना आम्ही डोळ्यासमोर ठेवून टूर आखतो."
" मला वाटतं आपण कमी दिवसांचे टूरपण ठेवायला हवेत."
" बुकींग आलं पाहिजे."
राजेशने शंका व्यक्त केली.
"कमी दिवसांच्या टूरला बुकिंग येईल. आपण दोन दिवसांचे, तीन दीवसांचे टूर आखायचे. बंगलोर जवळ हे टूर घ्यायचे. या टूरला शाळेतील मुलं ज्यांना नाही जे साधारण पन्नास वर्ष आणि त्याच्या पुढच्या वयाची लोकं या टूरमध्ये येतील. उन्हाळा असल्याने या वयातील प्रवासी जास्त दिवस बाहेर फिरून शकत नाहीत."
" बरोबर बोललात मॅडम."
राजेश म्हणाला.
" या वयातील लोकांना उन्हाळ्यात दोन दिवसांचा टूर मिळाला तर ते येतील. "
" तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण नक्की येतीलच असंही आपण म्हणू शकत नाही."
" राजेश वयाच्या पंचेचाळीस मधील प्रवासी मुलांच्या परीक्षा आणि मोठ्या सुट्ट्या बघून येणार.पंन्नास आणि त्या पुढचे प्रवासी हे वर्षभरात केव्हाही टूरला येऊ शकतात. हा वयोगट आपल्याला वर्षभर बुकींग देऊ शकतो. थंडीच्या सीझनमध्ये आठ दिवसांच्या टूरला हे प्रवासी येतील. लहान पल्ल्याच्या टूरसाठी हे वर्षभरातील कोणताही टूर निवडू शकतात. आलं का लक्षात?"
नेहाने विचारलं.
" हो मॅडम.मी दोन ते दिवसांच्या टूरचं प्लॅनिंग पण करतो."
" गुड. अपर्णा जाहीरात कशी करणार?"
" मॅडम राजेश सरांनी पक्क्या तारखा दिल्या की मी जाहिरातींचं बघते."
" ठीक आहे. पेपरमध्ये छापील जाहीराती बरोबर टिव्ही साठी जाहीरात कशी करणार?"
" व्हिडिओ जाहीराती साठी आपण सेलिब्रिटींची मोकळी वेळ बघून करतो."
अपर्णा म्हणाली.
" सेलिब्रिटी किती मानधन घेतात?
" लाखात असतं."
" यावेळी ही पद्धत बदलायची."
" म्हणजे काय करायचं?"
काही न कळून अपर्णाने विचारलं.
" राजेश आपल्या मोठ्या पल्ल्याच्या टूरमध्ये कोणी पन्नासच्या पुढच्या वयोगटातील किती प्रवासी आहेत?"
" बघावं लागेल मॅडम."
" बुकिंग डिटेल्स कोण बघतो."
" रेवा मॅडम बघतात."
" त्यांना विचारा."
" हो विचारतो ."
" राजेश आत्ता विचारा."
हे बोलून नेहा राजेशला इंटरकाॅम दाखवते.
" हो करतो."
असं म्हणून राजेश आपल्या डिपार्टमेंट मध्ये फोन लावतो.
" हॅलो"
" रेवा मॅडम मी राजेश बोलतोय."
" बोला नं सर."
" रेवा मॅडम आपल्या मोठ्या पल्ल्याच्या टूरमध्ये किती जण पन्नास वर्षांच्या पुढचे प्रवासी आहेत हे मला आत्ता लगेच सांगा."
" सांगते सर. मी बघून फोन करू की फोन होल्ड करताय?"
" होल्ड करतो."
राजेशने फोन होल्ड केलेला बघून नेहा म्हणाली,
" राजेश सर त्या प्रवाशांचं नाव, वय आणि पत्ता पाठवायला सांगा."
" हो मॅडम सांगतो."
एवढ्यात रेवा बोलली.
" सर मोठ्या पल्ल्याचे दोन टूरचं बुकिंग मी बघीतलं. दोन्ही मध्ये एकूण तीस जणं आहेत."
" त्याची नाव आणि वय तसंच त्यांचा पत्ता मला लगेच व्हाॅट्स ॲप कर."
" हो सर. लगेच करते."
रेवाचा मेसेज येईपर्यंत नेहाने त्या वयोगटातील लोकांबद्दल का विचारलं हे सांगते.
" राजेश सर आपण या वेळी पहिल्यांदा कमी दिवसांचे टूर उन्हाळ्यात ठरवणार आहोत त्याची जाहिरात या वयोगटातील लोकांकडून करून घेऊ."
" मॅडम लोकं सेलिब्रिटींवर विश्वास ठेवतात."
" आपण त्याच वाटेवरून जायचं का? जरा वेगळी वाट शोधली तर काय हरकत आहे?"
" हरकत काही नाही. पण जर बुकिंग आलं नाही तर?"
राजेशने मनातील प्रश्न विचारला.
"सेलिब्रिटी पेक्षा आपल्यातीलच एक वयस्क प्रवासी सांगतोय की मी या दोन दिवसांच्या टूरला स्वस्तिक ट्रॅव्हल कडून जाणार. हे तो सांगतो तेव्हा राजेश सर त्या प्रवाशांचा मोठ्या टूरचा अनुभव तिथे सांगायचा आणि आता ते कमी दिवसांच्या टूरला जाणार आहे. हे ते सांगतील. त्या वयोगटातील प्रवासी त्यांच्यावर विश्वास ठेवणार आणि आपल्याला बुकिंग येणार."
" मॅडम तुम्हाला विश्वास आहे? असं होईल?"
अपर्णाने विचारलं.
" शंभर टक्के होईल. अगं साधं सिनेमाचं उदाहरण घेऊ. आपल्या समवयस्क लोक जेव्हा एखाद्या सिनेमाबद्दलचं मत सांगतात त्यावर आपण विश्वास ठेवतो.आपल्या पेक्षा लहान वयातील लोकांच्या मतांवर विश्वास ठेऊन सिनेमा बघत नाही. इथे या टूरसाठी समवयस्क माणसाच्या मतांवर इतर प्रवासी विश्वास ठेवणारच. "
" मॅडम रेवाने सगळे डिटेल्स पाठवलेत."
" गुड. आता या जाहिरातींमध्ये कोण प्रवासी काम करेल हे विचारा. जे तयार होतील त्यांच्या घरी आपण ही जाहिरात शूट करायची"
" मॅडम त्यांच्या घरी ?"
" हो. का? त्या लोकांना प्राॅब्लेम असेल तर ती जाहीरात त्यांच्या घरी नाही करु. आधी विचारून तर बघा."
" हो मॅडम विचारतो."
" अपर्णा जाहीरात कोण लिहिणार आहे?
" आपले लेखक आहेत."
" मला जाहिरात टिपीकल नकोय. काहीतरी वेगळं लिहीणारा लेखक हवाय."
" नवीन लेखकाला ट्राय करायचं?"
" काय हरकत आहे? जरा वेगळं काही तरी करायची इच्छा ठेवा. तेच ते का करता?"
" मॅडम एक लेखिका आहे. तिने मागेच आपल्याला ॲप्रोच केलेलं आहे."
" पुढे काय झालं?"
" तिला लागलं की सांगू असं म्हटलं आहे.
" तिला काॅन्ट्याक्ट करा. या जाहीरातीची कल्पना तिला समजावून सांगा.तिच्याकडून वेगवेगळ्या प्रकारे लिहून घ्या. मग बघू."
" ठीक आहे. "
" अपर्णा मला वाटतं की जाहीरात लेखनासाठी आपण एक स्पर्धा घ्यायला हवी. या स्पर्धेत या क्षेत्रातील लोकं ट्राय करतील तसेच बाहेरील लोकपण भाग घेऊ शकतील. आऊट ऑफ द बाॅक्स जाऊन विचार करणारा लेखक आपल्याला हवा."
" मॅडम स्पर्धा म्हटलं की परीक्षक, बक्षीस हे सगळं आलं. त्याची परवानगी घ्यावी लागेल."
अपर्णाच्या वाक्यावर नेहा म्हणाली,
" मी साहेबांना विचारीन. वरून परवानगी मिळाली तरच हे होईल. या स्पर्धेची जाहिरात पण हटके व्हायला हवी. साहेबांनी परवानगी दिली तर त्या नवीन लेखिकेकडून जाहीरात तयार करून घ्या."
" हो मॅडम. "
" राजेश सर त्या वयस्कर प्रवाशांपैकी कोण जाहीरात करेल याची चवकशी करा. फार दिवस आपल्या हातात नाही तेव्हा लवकर हालचाल करा. अपर्णा मॅडम तुम्ही पण लवकर हालचाल करा"
" हो मॅडम."
" ठीक आहे. तुम्ही निघू शकतात. मला लवकरात लवकर यांचे डिटेल्स द्या."
" हो मॅडम "
राजेश आणि अपर्णा नेहाच्या केबीनमधून बाहेर पडले.
थोडं बाजूला गेल्यावर राजेश म्हणाला,
" नेहा मॅडम खूपच वेगळा विचार करतात नाही?"
" हो नं. आपण आत्तापर्यंत त्या एकाच पद्धतीने सगळं काम करत आलो. नेहा मॅडमची व्हिजन खूप मोठी आणि वेगळी आहे."
"अगदी बरोबर. मलाही वाटतंय सेलिब्रिटी पेक्षा आपल्या प्रवाशाने केलेली जाहिरात लोकांना लवकर पटेल ते विश्वास ठेवतील."
" राजेश सर मला वाटतंय त्यांच्या या कल्पना अमलात आल्या आणि यशस्वी झाल्या तर बिझनेस खूप वाढेल."
" नक्कीच. त्याचबरोबर ट्रॅव्हल टुरिझमच्या क्षेत्रात आपल्या स्वस्तिक ट्रॅव्हलचं नाव अग्रस्थानी राहील."
"नक्कीच. चला मॅडमना लवकर डिटेल्स द्यायचे आहेत."
" हो ठीक आहे."
राजेश आणि अपर्णा दोघंही आपापल्या जागेवर गेलेत.
__________________________________
नेहाच्या कल्पना यशस्वी होतील का? बघू पुढील भागात.