२ वर्षांनंतर....
चिऊ... चिऊ...
उठ बाळा सकाळ झाली बघ...उठ आणि दात घासून अंघोळ करून घे... मी तोपर्यंत आपल्यासाठी नाश्ता बनवते.
हो ग् ताई.. उठते.., मी डोळे चोळत म्हणाली..
ताई नी छान दोघिंसाठी भाकरी आणि बेसन बनवलं होत.
'माई'... बाईसोबत गेल्यानंतर बऱ्याच दिवसांनी आम्ही दोघी आधी सारखे राहत होतो.
ताई.. चिऊ.. काय करता ग..?? उठलात का ग पोरींनो??
हो उठलोय ना काकू.. या ना..
अगं काही नाही.. मी विचारत होती, मी आज गावात लग्न आहे ना तिकडे जाणार आहे, येता का तुम्ही दोघी ?? आज चिऊ ला शाळेला सुट्टी पण असेल ना???
हो, आहे ना.. चिऊ ला शाळेला आज सुट्टी.. पण काकू लग्नाला आम्ही दोघी कसं येऊ .. ? नको नाही येत आम्ही..
"ताई, ताट पुसत म्हणाली.."
चला ग, आमच्या सोबत काही नाही होत त्याला..
'काकू, ताईच्या बाजूला जाऊन, ताईच्या पाठीवर हात फिरवत म्हणाल्या..
ताई, ऐक ना.. चल आपण काकुंसोबत जाऊयात लग्नात पण गजरे बनवून नेऊयात ना ???
"मी केस पुसता पुसता ताईला म्हणाली..."
अरे, चिऊ.. चल, तु बोलतेस तर तस करूयात ..
"काकू तुम्ही चला पुढे आम्ही दोघी गजरे बनवून सोबत घेऊन येतो.. '
ताई स्वतःला आवरत म्हणाली..
आम्ही दोघी मस्त तयार होऊन लग्नात गेलो. गजरे मंडपाच्या बाहेरच घेऊन थांबलो होतो. सर्व गजरे आता संपलेच होते. गजरे संपल्यानंतर आम्ही लग्न मंडपामध्ये जाणारच होतो.
तेवढ्यात समोरून कार आली, त्यामध्ये एक जोडपे होते. दिसायला गोरी गोरी, केस लांब मोकळी सोडलेली, लाल रंगाची काठाची साडी आणि पदर एका हातावर घेतलेला सावरत, कारमधून एक काकू उतरली..
आणी म्हणाल्या ...
"२ गजरे", कसे देणार ग?
एक गजरा २० रुपया मध्ये देतो आम्ही काकू.. पण आमच्याकडे आता एकच गजरा राहिला आहे..
ताई गजरा हातात घेऊन म्हणाली..
अरे.. व्वा.. संपले पण गजरे.. लवकर संपले मग तर..
पैसे पर्समधून काढत त्या काकू म्हणाल्या..
हो ना.. काकू,.. ताई गजरा त्यांना देत म्हणाली..
काकू, तुम्हाला गजरा आणखी एक हवा असेल तर बनवून आणू का आम्ही ??
मी त्यांना हळूच विचारलं..
ओह.. नको नको, बाळा.. तुम्हाला त्रास नको उन आहे ना बाहेर, पुन्हा घरी जाऊन यावं लागेल ना तुम्हाला..
असं म्हणत त्या काकू ताई आणि माझ्याकडे टक लावून बघतच होत्या....
पल्लवी.. चल ना.. झालं ना गजरा घेऊन.. चल चल लवकर.. लग्न लागेल तिकडे..
ते काका मागून येऊन म्हणाले..
अरे.. हो हो.. अमेय.. किती घाई.. नाही लागणार लग्न..
तुम्ही दोघी येणार आहात ना आतमध्ये???
काकूंनी मागे बघून आम्हाला विचारलं..
हो काकू येतोय ना आम्ही..
ताई नी गजऱ्याची टोपली मंडपामागे लपवत त्यांना उत्तर दिलं...
चिऊ चल लवकर, मागे बसु चल आपण, तिकडे जागा आहे तिकडे चल..
आम्ही दोघी मागे जाऊन बसलो .... लग्न समोर लागतच होत.. पण लाल साडी नेसलेल्या त्या सुंदर काकू आम्हाला मागे वळून वळून बघतच होत्या..
ताई ताई.. त्या लाल साडी नेसलेल्या काकू बघ मागे वळून आपल्याला बघतात ..
नाही ग.. आपल्याला नसतील बघत त्या.. तू नको बघू.. समोर बघ तू..
काय ग आलात का तुम्ही दोघी..? कधी पासून वाट बघत होती मी.. पण मला माहित होत गजरे संपल्या शिवाय तुम्ही काय येणार नाहीत .. संगीता काकू आम्हाला बघून आमच्यासमोर आल्या..
हो ना काकू सर्व गजरे संपले पण लगेच... मस्त वाटलं..
हो ना चिऊ..
संगीता... संगीता..
काकू काकू.. त्या लाल साडी नेसलेल्या काकू तुम्हाला आवाज देत आहेत ..
अग.. माझी मैत्रीण आहे ती.. जाऊन येते हा ताई मी...