Not to love college? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | महाविद्यालय प्रेम करण्यासाठी नाही?

Featured Books
Categories
Share

महाविद्यालय प्रेम करण्यासाठी नाही?

महाविद्यालय प्रेम करण्यासाठी नाही!

ते तरुणपण.........आपल्याला तरुणपण चांगलं वाटतं. कारण त्या वयात कोणाचं ऐकावं लागत नाही. कोणाचं बंधन राहात नाही. आपल्याला आपण स्वतःचे मालक असल्यासारखे वाटते. तरुण मुलांची चांदीच असते. तशी मुलींचीही चांदीच असते.
हा तरुणपणाचा काळ. आपण निर्णयक्षम झालेले असतो. स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला लागतो. त्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही. तसं कायद्यानुसार अठरा वर्षाची मुलं मुली झाल्यास त्यांच्यावर मायबापाची वा इतर कोणाचीही मर्जी चालत नाही.
प्रेम करणे हा गुन्हा नाही. प्रत्येकांनी प्रेम करावं. तरुण तरुणींंनीही प्रेम करावं. प्रेम करायला मनाई नाही. परंतू याबाबत थोडा विचार करायला हवा. थोडी शहानिशाही करायला हवी. कारण अठरा वर्षानंतर कायद्यानुसार आपण सक्षम झालेले असलो आणि आपल्याला हवे तसेे निर्णय घेता येत असले तरी आपण घेतलेले आपले निर्णय कधी काळी फसत असतात. याबाबत एक गोष्ट सांगतो.
एक सुशिला नावाची मुलगी. ती ग्रामीण भागात राहायची. मुलगी हुशार होती. ती शालान्त पास झाली. तसं तिनं वसतीगृहात प्रवेश मिळवून शहरात तिनंं महाविद्यालयात प्रवेश घेतला.
सुशिलाच्या घरची परिस्थिती बेताचीच होती.. म्हणून तिला नाईलाजानं वसतीगृहात राहावं लागलं. तसं पाहता वसतीगृहात सुशिलाला राहतांंना तिथं असलेल्या मुलींनी तिला प्रेम करण्याविषयी डिवचलं. परंतू त्या बाबतीत तिनं स्वतः निर्णय घ्यायला हवा होता. परंतूू तिनंं मुलींच्या म्हणण्यानुसार तिनं प्रेम केलं त्या तरुणाशी. ज्या तरुणाचं वेश्यालयाशी कनेक्शन होतं नव्हे तर तो वेश्यालयात महाविद्यालयाच्या मुलींना प्रेम करुन विकत होता.
त्याचं नाव अर्शद होतं. हा मुलगा महाविद्यालयात महाविद्यालय विद्यार्थी म्हणून प्रवेश घेत होता व शिक्षणही. त्यानंतर तो मुलींना मदत करायचा. अतिशय काळजी घ्यायचा त्यांची. त्यातच त्या मुली त्याचेवर भाळायच्या. त्या जिवापाड प्रेम करु लागायच्या त्याचेवर. त्यातच त्या मुली त्याचेवर जिवापाड प्रेम करु लागताच एखाद्या दिवशी संधी साधून अतिशय शिताफीनं काहीही बहाणा करुन तो त्यांना बाहेरगावचं नाव सांगून फिरायला न्यायचा आणि संधी न दवडता विकून टाकायचा. बदल्यात पैसे कमवायचा. त्या त्याच्या अशा करण्यानं त्या मुलींचं उभं आयुष्य उध्वस्त व्हायचं.
विशेष सांगायचं म्हणजे महाविद्यालयात शिकणारे सर्वच मुलंमुली आपले मित्र असतात. चांगले मित्र असतात. ते आपली काळजी घेतात. याचा अर्थ असा नाही की ते चांगले असतीलच. कोणाच्या मनात तुमच्याविषयी काय चाललं आहे ते तुम्ही तपासू शकत नााही. जिथे एकाच आईच्या पोटातून जन्म घेणारी भावंडं सारख्याा विचाराची नक्षेची नसतात. तिथं तर ही मित्र आहेत. त्यामुळं ती नेमकी काय करु शकतील हे काही सांंगता येत नाही.
याबाबतीत एक आणखी गोष्ट सांगतो. एक मुलगी एका महाविद्यालयात शिकत होती. ती प्रेम करीत होती त्या मुलावर. ज्या मुलावर त्याच महाविद्यालयातील तिचीच जीवलग असलेली मैत्रीण प्रेम करीत होती. त्यानं ते सांगीतलं नव्हतं तिला. तो दोघींवरही प्रेम करायचा. यातूनच त्यानं दोघींशीही प्रेमसंबंध बनवले होते. विवाहाचं आश्वासन देत देत. या प्रेमसंबंधातून एक गरोदर राहिली. तिला पाच महिने झाले होते दिवस गेल्याला. तसं प्रेमसंंबंध करतांना त्यानं त्या दोघींनाही अंंधारात ठेवलं. सांगीतलं नव्हतं काहीच. परंतू पाच महिने झाल्यानंतर गरोदर मुलीनं त्याच्याशी विवाहाचा तकादा लावताच त्यानंं आपल्यावर तिच्या मैत्रीणमचं प्रेम असल्याचं सांंगीतलं. जर ती आपलं प्रेमसंबंध तोडेल तर मी तुझ्याशी विवाह करणार. अन्यथा नाही असं तो म्हणाला. शेवटी तिच्याजवळ उपाय उरला नाही. गर्भपातही पाच महिने झाल्यानं करता येत नव्हता. शेवटी ती तिच्याजवळ गेली. तिला
त्याचेवरील प्रेमसंबंध तोडून टाकण्याविषयी बोलू लागली. गयावया करु लागली. परंतू ती ऐकेना. ती म्हणाली की यात तुझी चूूक आहे. तू त्याला ही गोष्ट आधीच विचारायला हवं होतंं. मी माझं त्याचेवर असलेलं प्रेम बंद करु शकत नाही. शेवटी तिचा नाईलाज झाला. ती दुःखी अंतःकरणानं घरी आली. कम-यात गेली. छतावर पंख्याला दोर अडकवला व लावला गळफास व आपलं जीवन संपवलं.
ती मुलगी मरण पावली होती. मुलाचं काय गेलं. काहीच नाही. गेलं ते मुलीच्या आईवडीलाचं. त्यांची उपवर मुलगी मरण पावली होती.
आज मुलं मुली तरुण झाले आणि के महाविद्यालयात गेले तर कोणत्याही गोष्टीचा आव विचार न करता प्रेम करु लागतात. प्रेम हे त्यांना सर्वस्व वाटत असते. परंतू त्या प्रेेमाच्या आड काय लपलेलं असतं. ते त्यांना दिसत नाही. कोणता मुलगा वा कोणती मुलगी आपल्यासाठी संकट घेवून येईल ते काही कळत नाही कोणत्याच महाविद्यालयीन मुलांना. या गोष्टीचा विचार प्रत्येक महाविद्यालयीन मुलामुलीने करण्याची गरज आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास एखाद्या वेळी एखादा मुलगा वा मुलगी आपली जीवलग मैत्रीण वा जीवलग मित्र असल्याचा देेखावा करुन आपल्यासमोर केव्हा संकट उभं करेल नव्हे तर आपल्यावा विकून टाकेल वेश्यालयात. ते सांगणे कठीण आहे. म्हणून कधीही कोणीही महाविद्यालयीन मुलांनी प्रेमाला सर्वस्व मानू नये. कोणावर जिवापाड प्रेम करण्यापुर्वी सावधान असलेलं बरं. प्रेम करावं. प्रेमाची पावलं नक्कीत टाकावीत. परंतू प्रेमाची पावलं जरा जपून टाकावीत. कारण प्रेम हे काचाासारखं असतं. थोडासा धक्का लागलाच तर काच जशी लवकर फुटते. तसंच प्रेमाचंही आहे. त्याही प्रेमाने आपल्यावर केव्हा आणि कोणतं संकट येईल ते काही सांगता येत नाही.
विशेष सांगायचं म्हणजे महाविद्यालयात मुलांनी नक्की यावं. शिकावंं, उच्च शिक्षण घ्यावं. करियर बनवावं. ते ठिकाण आपलं करीयर बनविण्यासाठी आहे. महाविद्यालय हे शिकण्यासाठी आहे. परंतू ते ठिकाण प्रेम करण्यासाठी नाही. कारण या महाविद्यालयातून कोणकोणते संंकट निर्माण होवू शकतात आपल्यावर हे सांगणे कठीण आहे. महाविद्यायीन प्रेमातून वेश्यावस्तीत विकणे दुरच. व्यतिरीक्त आत्महत्या (मायबापाच्या व आपल्याही), डिप्रेेशन, खुन (आपला व आपल्या प्रेमींचाही, आपल्या भावाचा व मायबापाचाही) वेडेपणा (मायबापाचा व आपलाही), बलत्कार, करीयरचा उध्वस्तपणा, विश्वासघात, कुमारीमातेचा प्रश्न, बाळाची विल्हेवाट त्यातच त्याचा दोष नसतांनाही खुन. या सर्वच समस्या निर्माण होत असतात. म्हणून प्रेम करावं महाविद्यालयीन तरुणांनी. परंतू तसं प्रेम करु नये. संसार बसविण्याचे प्रेम करु नये. ज्या प्रेमातून वरील प्रकारच्या समस्या निर्माण होतील व ज्या समस्येतून आपली कधी सुटकाच होवू शकणार नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०