Should the mother take care of the baby? in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | आईनं बाळाचं संगोपन करावं?

Featured Books
Categories
Share

आईनं बाळाचं संगोपन करावं?

प्रत्येक आईनं आपल्या बाळाचे संगोपन करावं!

प्रत्येकच आई बाळाला जन्म देत असते. ती आपल्या बाळाचं संगोपन करीत असते. त्याला खावूपिऊ घालण्यापासून तर त्याला कपडेलत्ते घेवून देण्यापर्यंत तसंच पुढं त्याला शिक्षण देण्यापर्यंतही आई आपल्या बाळासाठी करीत असते. ती आपल्या बाळासाठी आपला देह झिजवीत असते हे अगदी खरं आहे. परंतू याला काही अपवादही आहेत.
काही काही महिला ज्या नोकरी करीत असतात. त्याही महिला आपल्या इवल्याशा बाळाला त्याचं चांगलं संगोपन व्हावं म्हणून त्याला पाळणाघरात टाकत असतात किंवा त्याच्यासाठी आयांचा बंदोबस्त करीत असतात. जणू आपला बाळ आपलाच आहे अशाप्रकारचे वर्तन करीत असतात.
काही काही माता याला अपवाद आहेत. त्या बाळाचं संगोपन करणं सोडा, त्या स्वतःच्या बाळाचा जीवही घेत असतात.
मोहिनी अशीच एक आई. बालपणापासून तिच्या वडीलानं तिला अगदी लाडानं प्रेमानं वाढवलं. तिला चांगलं चांगलं खावू पिवू घातलं. परंतू ती जेव्हा वयात आली. तेव्हा तिला भलतीच सवय लागली व ती प्रेमाच्या चक्करमध्ये फसली.
प्रेमच ते. आजचं प्रेम हे खरं नसतं. त्या प्रेमात फक्त आणि फक्त वासना असते. स्वार्थ दडलेला असतो त्यात. मोहिनीचंही तसंच झालं. खरी प्रेम करणारी मोहिनी, ती याच गोष्टीची शिकार बनली. ती वाढत्या वयाबरोबर प्रेम करायला तर लागली. परंतू त्या प्रेमात तिला धोका मिळाला व एक दिवस जेव्हा वेळ आली, तेव्हा त्या मुलानं विवाह करण्यास नकार दिला. त्यातच मोहिनीची मती बिघडली. तिला आपलं जगात कोणीच नाही असं वाटायला लागलं. शेवटी तिला त्या मुलाची सवय पडल्यानं तिला राहवत नव्हतं. त्यातच तिनं दुसरा मुलगा पकडला. तिथंही तिला खरं प्रेम मिळालं नाही. ती प्रेमाची भुकेलीच राहिली. शेवटपर्यंत तिच्याशी मुलांनी स्वार्थासाठीच प्रेम केलं. परंतू मोहिनीशी कुणीही विवाह केला नाही. याच दरम्यान तिला एका तरुणापासून एक मुलगीही झाली. ती लहानाची मोठी होवू लागली. शेवटी त्या मुलीनं म्हटलं की आई, तू अशी का करतेस. हे धंदे सोड. नाहीतर या मुलीला पारखी होशील. परंतू ती काही ऐकली नाही. तिनं मुलगी असतांनाही असे पती करणे सुरुच ठेवले.शेवटी मुलीनं तिला सोडलं. ती आता आपल्या मोठ्या वडीलांकडे आनंदानं राहात होती. लहानाची मोठी होत होती. आईच्या कृत्याबाबत तिला कोसत होती. देवाजवळ ती सुधरु दे अशी प्रार्थना करीत होती.
आज मोहिनीजवळ एकही पती टिकला नव्हता. ती फक्त प्रेम पाहात फिरली होती. परंतू कोणीही तिला प्रेम दिलं नव्हतं. मुलीनंही तिला टाकून दिलं होतं. त्यातच तिनं पकडलेल्या वासनाधीन पुरुषांनीही. आज ती एकाकी झाली होती. तिला मुलीची आठवण येत होती. तिला मुलीला फोन करावासा वाटत होता. ती फोन करीतही होती. परंतू ती मुलगी काही फोन उचलत नव्हती. तसंच तिला मुलीला भेटावसंही वाटत होतं. परंतू मुलगी काही भेटत नव्हती. मुलीचं हे वागणं म्हणजे तिच्या आईला धडा शिकविण्यासारखं होतं. ती हताश निराश मोहिनी आज मुलगी मुलगी करुन रडत होती. कारण ती मुलगी म्हणजे आज तिला तिच्या काळजाचा तुकडा वाटत होता. तिला आत्महत्या करावीशी वाटत होती. परंतू नियती अशी निष्ठूर झाली होती की ती तिला आत्महत्याही करु देत नव्हती.
मुलगी ती. मुलीचा आवाज ऐकण्यासाठी ती तरसत होती. परंतू मुलगी काही बोलत नव्हती. आज तो दिवस उजळला. तिच्याच्यानं राहणं जमलं नाही. तसा न राहवून तिनं आपल्या मुलीला फोन केला. परंतू मुलीनं काही तिचा फोन उचलला नाही. तसा तो फोन तिच्या मोठ्या वडीलानं उचलला. अत्यंत संयमानं त्याचं बोलणं सुरु झालं. तशी ती म्हणाली,
"माझी मुलगी मला परत करुन द्या."
"कशासाठी?" वडील भाटवा म्हणाला.
"मला जगवत नाही."
"मग मी काय करु?"
"मला मुलगी हवी."
"कशाला? अजून एखादा पती शोधून घे. परंतू मुलगी दे म्हणू नको."
मोठ्या वडील भाटव्याचे ते बोललेले शब्द. ते शब्द काही खोटे नव्हते. त्यात किंचीतही खोटेपणा नव्हता. परंतू मोहिनीला ते शब्द बोचरे ठरले होते. तशी ती भीती दाखविण्यासाठी पुन्हा म्हणाली,
"मुलगी नाही देणार तर मी आत्महत्या करीन आणि तुम्हा सर्वांना फसवीन. नाहीतर मी तुमच्या नावानं पोलिस तक्रार करीन आणि तुम्हाला फसवीन. तुमची नोकरी खाईन."
मोहिनीचा राग......ती काय बोलत होती हे तिलाही कळत नव्हतं. तसा वडील भाटवा म्हणाला,
"हा विचार तेव्हाच करायला हवा होता. जेव्हा तुझी मुलगी पती नको करु म्हणत होती. तू फक्त आपली वासनेची तृष्णा पाहिली. मुलगी पाहिली नाही. आता मुलगी तुला टाळते, त्यात माझा काय दोष? तू एक आई म्हणून वागलीच नाही. आई म्हणून वागली असती तर आज तुझ्यावर ही वेळ आली नसती."
ते शब्द........वडील भाटव्याचे शेवटचे शब्द ठरले. मोहिणीला त्या शब्दानं भयंकर वाईट वाटलं. तशी मोहिनीनं एक चिठ्ठी लिहिली व त्यात माझी माझ्या भाटव्यानं जिंदगी खराब केली असं लिहून एक दोर घेतला. तो छताला लावला व आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं.
मोहिनी संपली होती. तशी ती फाशीची गोष्ट लोकांना माहित झाली. पोलिसांनी तपास केला. तपासात मोहिनीजवळ एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीतील मजकूर सापडला. मजकूर वाचला. त्यानुसार पोलिस वडील भाटव्याच्या घरी आले. त्याला त्या चिठ्ठीनुसार अटक केली. अटकेनंतर ती केस न्यायालयात चालली. न्यायालयात सर्वांचे बयाण झाले. त्यातच तिच्या मुलीचेही बयाण झाले व तो वडील भाटवा बा इज्जत बरी झाला.
मोहिनी मरण पावली होती. तसा दोष तिचाच होता. ती फक्त आपल्या सुखासाठी जगली होती. परंतू तिनं तो दोष दुस-यावर लावला होता. आज तिच्या मुलीनच तिला धडा शिकवला होता नव्हे तर तिला आत्महत्या करण्यासाठी मजबूर केलं होतं.
प्रत्येक आईनं आपल्या बाळाला जन्म द्यावा. परंतू सर्व प्रकारचा विचार करुन. जर बाळाला पोसायचे नसेल आणि असे पतीच करत सुटायचं असेल तर आपल्या बाळास जन्म देवूच नये व मुलांना वा-यावर सोडून आपलं सुख शोधू नये आणि शोधलंच तर त्याचा दोष कुणावरही लावू नये हे तेवढंच खरं आहे. प्रत्येक आईनं बाळाला जन्म देण्यापुर्वी आपल्या बाळाच्या संगोपनाचा विचार आधीच करावा. जेणेकरुन आपल्या कृत्याचा परीणाम बाळाला सोसावा लागू नये म्हणजे झालं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०