Literary conference special in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | साहित्य संमेलन विशेष

Featured Books
Categories
Share

साहित्य संमेलन विशेष

साहित्य संमेलनं लिहित्या हातांना बळ देवू शकतात का?

साहित्य संमेलनं लिहित्या हातांना बळ देवू शकतात का? असा जर कोणी प्रश्न केल्यास त्याचे उत्तर नाही असे येईल. कारण अलीकडील संमेलनं ही अशाच धरणीवर होत आहेत.
अलीकडं संमेलनं भरतात. त्या संमेलनाला खर्च लागतो. तो खर्च काढण्यासाठी स्मरणिका काढाव्या लागतात. त्या स्मरणिकेत प्रत्येक पानानुसार जाहिरातीचे दर असतात. त्यातच कधीकधी असे जाहिरात देणारे प्रतिनिधी भावही करीत असतात. ते भाव करतांना त्यांच्या परिचयाच्या असलेल्या लोकांना पुरस्कार द्या असे म्हणत असतात. मग ते पुरस्कार त्यालाच प्रदान होतात. ज्याची ओळख आहे किंवा जो पैसे देवू शकतो.
पैशाच्या मुद्यावरुन सांगतो की अलीकडे पुरस्कारासाठीही पैसे मोजावे लागत आहेत. आम्हाला हजार रुपये द्या. आम्ही तुम्हाला दोनशे रुपयाचा पुरस्कार देवू. वरुन शाल श्रीफळ देवू आणि संमेेलनात तुम्हाला तो पुरस्कार प्रदान करुन तुमचा सत्कार करु. बस, साहित्यीकही यावर हुरळून जातात व त्या प्रसंगावर हजार रुपये देवून पाचशे रुपयाचा पुरस्कार घेतात. असे बरेच आहेत. ही झाली पैसे देवून पुरस्कार घेण्याची गोष्ट. याचा अर्थ असा की पुरस्कार खरेदी केला जातो.
पुरस्काराबाबत आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे संमेलनात जे पदाधिकारी असतात. त्या पदाधिका-यांच्या ओळखीचे काही लोकं असतात. जे संमेलनाला मदत करतात. त्या लोकांनाही पुरस्कार दिला जातो. यावरुन असंं दिसतं की पुरस्कार मिळवणं आजच्या काळात काही कठीण नाही. फक्त पैसे द्या आणि पुरस्कार घ्या. अशी अवस्था आहे आजच्या पुरस्काराची.
संमेलनात पुरस्कार. असा पुरस्कार मिळताच लोकं त्या पुरस्काराचा गाजावाजा करतात. एवढा गाजावाजा करतात की जसा त्यांंनाच पुरस्कार मिळाला. इतरांना तसे पुरस्कार मिळूच शकत नाही. मग त्यांचं ते वर्तमानपत्रात छापणं......वैगेरे वैगेरे गोष्टी पाहण्यासारख्या असतात. याबद्दल एक प्रसंग सांगतो. असाच एक कवी होता की ज्यानं एक पुस्तक काढली. ती पुस्तक त्यानं त्या राज्यातील अनेक मान्यवर लेखकांना पाठवली. ज्यांचं नाव आहे. म्हणजेच ज्यांच्या नावावर मोठमोठ्या पुस्तका आहेत.मग फोन केलेत. विचारणा केली की पुस्तक मिळाली का? त्यानंतर ज्यानं पुस्तक मिळाली असं सांगीतलं. त्याला त्या पुस्तकावर समीक्षा लिहायला सांगीतलं. त्यानंतर ती लिहिलेली समीक्षा काही जणांना वर्तमानपत्रात छापायला लावल्या. त्यानंतर त्यांची कात्रणंही पाठवायला लावली. काहींच्या समीक्षी साहेबानं स्वतः वर्तमानपत्राला छापून आणल्या. मग काय, माझ्या एवढ्या समीक्षा छापून आल्या, म्हणून त्यानं ग्रिनीच बुकाला रेकॉर्डसाठी प्रस्ताव पाठवला. त्यातच ग्रीनीच बुकानं तो रेकॉर्ड तपासला व त्याची नोंद केली. असं असतं लेखकाचं वागणं. त्या पुस्तकात काही उद्बोधनपर असो वा नसो, ते कोणीही पाहात नाही. परंतू पुरस्कार मिळत असतात. ग्रीनीच बुकात नोंदही होत असते. परंतूू जो खरा साहित्यीक असतो. तो या पुरस्कारामागं धावत नाही. तो लिहीत असतो निरंतर. मग त्याला पुरस्कार मिळो वा न मिळो. याबाबत आणखी एक प्रसंग सांगतो. तो असा. एका प्राध्यापकाची वशिलतेबाजीनं एक पुस्तक एका विद्यापीठाला लागली. त्यातच ती पुस्तक एका मुलीनं वाचली. त्या पुस्तकात एक शिवी लिहिली होती. मग काय तिला ती शिवी बोचली. त्यानंतर वादंग उठलं व त्या विद्यापीठातील ती पुस्तक बंद झाली.
पुरस्काराबाबत सांगतांना एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. ती अशी. एकदा मला एका संस्थेतर्फे कथेच्या पुरस्काराचे परीक्षण आले. त्यात मी पुरस्कारासाठी काही निवडक कथा काढल्या.त्याचं वितरण झालं. त्यानंतर मला एक फोन आला एका कथालेखकाचा. तो म्हणाला, 'माझी कथा सुंदर असून माझ्या कथेला पुरस्कार का दिला नाही?"
मी म्हटले, "म्हणजे?"
तो म्हणाला, "माझ्या कथेला पहिला पुरस्कार मिळाला लोकमतचा. लोकमत जर देवू शकते माझ्या कथेला पहिला पुरस्कार, तर तुम्ही कोण लागले मला पुरस्कार न देणारे. माझी कथा पुरस्कारातून कशी वगळली?"
त्या कथालेखकाचे ते शब्द. अलीकडे एखाद्या कथासंमेलनात किंवा कवितासंमेलनात परीक्षक म्हणून काम करतांना आधीच सेटींग करण्यासाठी फोन येत असतात. म्हटलं जातं की काय लागते ते देवू. परंतू माझा क्रमांक द्या. नाही काही तर उत्तेजनार्थ तरी द्या. अशांची कीव येते. वाटतं की हे खरे लेखक कवी आहेत की नखरेबाज. त्यावेळी कसं परिक्षण करावं तेच कळत नाही. त्या कथालेखकाचा तो प्रश्न. मला लोकमतनं पुरस्कार दिला आणि तुम्ही माझी कथा कापली. का कापली कारण द्यावं.
हा त्याचा प्रश्न. धमकी देणारा प्रश्न. कथालेखक नावाजलेला. परंतू त्याचीही मला कीव आली. एवढ्या मोठ्या लेखकाला उत्तराची अपेक्षा का? परिक्षकाला ती कथा भावली नाही त्या क्रमांकासाठी. परंतू त्याला वाटलं असेल की काही सेटींग असेल, म्हणून तर माझा क्रमांक कटला. शेवटी त्याचा आग्रह. विनंती नाही. तो धमकीचा आग्रह. त्यामुळं मी उत्तर दिलं. म्हटलं,
"समजता काय हो स्वतःला. अहो, तुम्हाला लोकमत सारख्या संस्थेनं पुरस्कार कसा दिला तेच कळत नाही. कारण तुमच्या कथेत एक शिवीचा शब्द आहे. कथेत शिवी नसावी. जर मी आणि माझ्यासारख्या दहा परिक्षकानं तुमच्या कथेला पुरस्कार प्रदान केला तर उद्या ती कथा पाठ्यपुस्तकात येईल आणि मग ज्या मुलांकडून संस्कार अपेक्षीत आहे. ती मुलं शिव्या द्यायला लागतील. मला हे अपेक्षीत वाटलं नाही. म्हणून मी ती कथा कापली.'
माझं बोलणं समाप्त होताच त्या लेखकानं आणखी दोनचार जेष्ठ मंडळींचे दाखले दिले. त्यावर मी म्हटलं की त्या लेखकाची ती पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागली का? याचं उत्तर त्याचेजवळ नव्हतं. कापण त्याचं समाधान झालं होतं.
मी काही मोठा लेखक नाही. परंतू त्या कथांचं परिक्षण करतांना कथा कशा असाव्यात याची जाणीव मला झाली. एकशे एक कथा लिहिणारे असतात. कथा कोणत्याही स्वरुपाच्या असू शकतात. परंतू कथा पुरस्कारासाठी पाठवतांना त्या कथा केवळ मनोरंजनासाठी नसाव्यात. त्यातून बोध निघावा.
पुरस्काराबाबत आणखी सांगतांना संंतांना पुरस्कार मिळत होता काय? नाही ना. त्यांना श्रोते होते काय? नाही. तेवढा श्रोता वर्गही नव्हता. आद्यकवी मुकूंदराजाने मराठीचा आद्यग्रंथ विवेकसिंधू जेव्हा लिहिला. तेव्हा कोणीच श्रोता नव्हता. तो त्यांनी ताम्रपटावर लिहून ठेवला. परंतू आजही त्या ग्रंथाला मराठीचा आद्यग्रंथ म्हणून ओळख मिळाली आहे.
पुरस्कार...... असा पुरस्कार ज्याला प्रदान केला जातो. तो त्या लायकीचा असतोच असे नाही. तसेच संमेलनातून लिहित्या हातांना बळ मिळतं असं नाही. कारण संमेलनातही अशाच लोकांना स्थान मिळत असते. जे लोकं वरील स्वरुपाची वागत असतात. कृत्य करीत असतात.
महत्वाचं म्हणजे साहित्य संमेलन नक्की व्हावीत. ती नक्कीच घ्यावी. परंतू त्या संमेलनातून रास्त अपेक्षा म्हणजे लिहित्या हातांना बळ मिळावं. ते तेव्हाच मिळेल, जेव्हा साहित्य संमेलनं कोणाच्या मनधरणीनं होणार नाहीत. दबावातून होणार नाहीत. ही सत्य बाब आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०