आदिवासी आपले शत्रू नाहीत
दूर डोंगराळ भागात राहणारी आदिवासी जमात. बिचारे किडे, मुंग्या खावून उदरनिर्वाह करीत असतात. त्यांना औषधीचं पुरेपूर ज्ञान आहे. तसेच ही मंडळी सापासारखे विषारी प्राणीसुद्धा अत्यंत शितापीनं पकडत असतात. त्यातच जंगलातील कंदमुळं, झाडपाला खावून तसेच मिळेल त्या अन्नावर आजही पोट भरत असतात. त्यातच ही मंडळी स्वाभीमानी असतात. चोर नसतातच. चोर जर असती तर ते अगदी समृद्ध जीवन जगत राहिली असती अगदी चो-या करुन.
ती मंडळी जंगलातील लाकडं गोळा करतात. डिंक, राळ औषध्या गोळा करतात. चारं, बोरं गोळा करतात. त्या वस्तू शहरात विकतात आणि स्वतःचं पोट भागवतात. परंतू आज हीच शहरातील मंडळी त्यांची शत्रू बनत चालली आहे. त्यांना चोर ठरवू लागली आहे. त्यामुळं त्यांच्यात व शहरातील जनमाणसात एक खोल दरी निर्माण होत चाललेली आहे.
चोर..........चोर कुठं नाहीत. ते श्रीमंतांच्या घरी सुद्धा जन्माला येत असतात. परंतू श्रीमंतांच्या घरचं मुसळ खपतं पण गरीबाच्या डोळ्यातील कुसळ खपत नाही या अर्थाची जी एक म्हण आहे. ती म्हण या आदिवासींना लागू पडते. मुळात आदिवासी गरीब जरी असले तरी त्यांनी आजही स्वाभिमान सोडलेला नाही. याची परीयंती पदोपदी येते. ते श्रीमंतांची सेवा करीत असतात. पण त्यांच्या घरी चोरी करीत नाहीत. ते आपल्या भागात आपले पीक कापायला येतात. ऊस कापायला दिसतात. नाले खोदकाम करतांना दिसतात. तसेच धरणं बांधकाम, रस्ते बांधकाम यासारख्या सरकारी कामावरही अगदी भाडेतत्वावर काम करतांना दिसतात. तेही अल्प मजूरीत. कंत्राटदार हा त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्यांना अगदी अल्पमजूरीत राबवत असतो. हा त्यांच्यावर अन्याय नाही तर काय? आम्हीच असा अन्याय त्यांच्यावर करीत असूनही आम्ही स्वतःला शेर समजत त्यांच्यावर गुन्हेगारीचे ठपके लावत असतो. चोर समजत असतो.
कालचा एक प्रसंग सांगतो. प्रसंग असा की ह्याच आदिवासी जमातीतील काही महिला काडीकचरा वेचायला शहरातील वस्तीत फिरत होत्या. त्यांच्या काखेत एक लहानसं बाळ होतं. त्यातच एक दोन घरी हातात एक भिक्षापात्र घेवून 'माई दे न' असं म्हणून रात्रीचं शिळं अन्न आणि दिवाळीचा फराळ श्रीमंतांच्या घराबाहेर मागत असतांना दिसल्या. त्यातच त्यांच्यावर कुत्राचं भुंकणं ऐकायला येत होतं. जणू तेच चोर असावेत. त्यातच काही घरातून त्यांना भाकरतुकडा मिळाला. परंतू काही घरातील माणसं त्यांना दुषणे देत हाकलून देत असतांना दिसले. तसेच ते गेल्यावर एक महिला म्हणाली,
"हे लोकं चोर असतात. ही मंडळी भिक्षा मागण्यानिमित्यानं येतात. घरं पाहतात व रात्रीला येवून चो-या करुन निघून जातात."
त्या महिलेचं बोलणं खरं असेलही कदाचित. परंतू शंभर टक्के खरं होवू शकत नाही. कारण ही मंडळी आपल्या अन्नात राजषी जेवन जेवत नाहीत. राजषी पोशाख वापरत नाहीत आणि अक्षरज्ञान नसल्यानं आपल्यावर होणा-या अन्यायावर दादही मागू शकत नाहीत. त्यातच त्यांच्यावर प्रशासन ते चोर नसतांनाही चोर म्हणून ठपका लावत असते.
मुळात खरे चोर जे असतात. त्यांना प्रशासन पकडत नाही.ठपका लावत नाही आणि पैशाच्या जोरावर सोडूनही देत असतं. त्यातच ते खरे चोर कोण? असा जर विचार केल्यास खरे चोर ते, जे भ्रष्टाचार करतात.
आज ऑनलाइन काळ जरी असला तरी आजही साधा सातबारा मिळविण्यासाठी तलाठ्यांना काही पैसा लाच म्हणून द्यावा लागतो. आजही साध्या साध्या गोष्टीसाठी आणि त्या प्राप्त करण्यासाठी पैसाच मोजावा लागतो. तसेच आजही सरकारी कार्यालयात कोणत्याही कामासाठी पैसा मोजावा लागतो. अशी कितीतरी प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत आहेत की ज्या प्रकरणात पोलिसांंनी रंगेहाथ लाच घेतांना पकडलेलं असूनही न्यायालयात ती प्रकरणं मातब्बर वकीलाच्या वकीलकीनं निकालात निघालेली नाहीत. तसेच बा इज्जत ते आरोपी बरीही झालेली आहेत. हे सगळं घडतं पैशाच्या जोरावर. ते तर खरे चोर. परंतू त्यांचा पैसा पाहून ते सर्व खटले मैनेज होत असतात. त्यांना कोणी बोलत नाहीत वा कोणी दुषणं लावत नाहीत. परंतू आजचा काळ असा आहे की त्यांना चोर न समजता त्यांना शाव समजत जे चोर नसतात. त्यांनाच चोर समजत वागत असतो. त्यातच पोलिसही त्यांना जबरदस्तीनं मारुन किंवा त्यांना काही पैशाची लालच देवून त्यांना गुन्हेगार ठरवत असते.
मुळात आमचा आदिवासी बांधव हा दूरदेशी राहून, चोरी न करता किड्यामुंग्यावर जगून दिवस काढत असला तरी त्यांना आम्ही सुखानं का जगू देत नाही ते कळत नाही. त्यांचा शहरातील अधिवासच आम्हाला आवडत नाही. पण ते शहरात का आले याचा विचार आम्ही कधीच करीत नाही. केला नाही.
ते शहरात येण्यामागे आम्ही स्वतःच जबाबदार आहोत. कारण आम्हीच जंगले तोडली आमच्या स्वार्थासाठी. ज्या जंगलात ते राहात होते. तिथे मिळणा-या वस्तू गोळा करुन त्यावर गुजराण करीत होते. त्या खावून वा त्या विकून दोन पैसे जमवून उदरनिर्वाह करतांना त्यांना आनंद वाटत होता. परंतू आम्ही त्यांचं अस्तित्व संपवलं. आम्ही आमच्या शहरातील गरजा पूर्ण करण्यासाठी जंगलं तोडलीत. त्या वनाला तोडून त्याला शहरात आणलं. त्याचं टिकावू फर्नीचर बनवलं. अन्न शिजविण्यासाठी लाकूड मिळवलं. मोठमोठे बंगले त्या वस्तूनं सजवले.
आम्ही जंगलं तोडून केवळ त्यांनाच प्राब्लेममध्ये आणलं नाही तर त्या ठिकाणी अधिवास करणा-या वन्य प्राण्यांनाही प्राब्लेममध्ये आणलं. त्यांना राहायलाच तिथे जागा राहिली नाही. म्हणून ते आमच्या शहरात आले आहेत. दारोदार भिक्षा मागत फिरु लागले आहेत. कोणी त्यांना चोर समजू लागले आहेत. मुळात काल ज्या जंगलात डिंक, राळ, औषधी मिळायच्या. काल हेच आदिवासी चारं, बोरं वेचायचे. शहरात विकायचे. काल लाकडाच्या मोळ्या गोळा करायचे. शहरात विकायचे. काल कलाकुसरीच्या वस्तू गोळा करायचे. शहरात विकायचे अगदी स्वाभीमानानं. परंतू आज त्या वस्तू जंगलातून उपलब्ध होत नाहीत. म्हणून ते शहरात आणि आम्ही त्यांच्या गरीबीचा फायदा घेवून आम्ही त्यांना चोर ठरवतो. हे योग्य नाही.
आम्ही मुळात त्यांना चोर ठरवू नये. त्यांना मदत करावी. त्यांना अंतर देवू नये. भेदभाव करु नये त्यांच्याशी. त्यांच्याशी आत्मीयतेने वागावे. त्यांना शिकवावे नव्हे तर त्यांच्याशी जवळीक करावी. त्यांच्या भावना ओळखाव्या आणि त्यांच्याही सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न करावेत. जेणेकरुन त्यांना शहराबद्दल तिटकारा वाटणार नाही. त्यांनाही शहराबद्दल आत्मीयता वाटेल. तसेच शहरातील प्रत्येक माणसांबद्दल गोडी निर्माण होईल. कारण ते आपले शत्रू नाहीत तर काल मदत केलेले मित्रच आहेत.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०