व्हि आय पी संस्कृती मोडीस निघावी
आज सरकारी कार्यालयात कोण्या अधिका-याला भेटायला गेलं तर आपणाास हमखास जाणवतं की सगळ्या सरकारी कार्यालयात कुलर, एसी लागलेले आहेत. पंखे लागलेले आहेत. परंतू त्या ठिकाणी कोणीच सरकारी कर्मचारी कामावर हजर नाही. त्यातच अधिकारीही. समजा एखादा अधिकारी भेटलाच तर त्या अधिका-याची प्रत्यक्ष भेट घेता येत नाही. त्याचा एक असिस्टंट, ज्याला आपण शिपाई म्हणतो, तो बाहेर बसलेला असतो. दिवटी तास त्याची सेवा असते. असं वाटतं की तोच साहेब असावा. तो तसा वागतोही. त्याचे भाव मात्र नेहमी वाढलेलेच असतात.
एखाद्या वेळी साहेबाची भेेट घ्यायची असल्यास तोच म्हणतो,, पैसे लागतील. नाहीतर थांबा. आता साहेबाची भेट घेण्यासाठी व. तिही लवकर घेण्यासाठी लांबून आलेल्या माणसाला पुरेसे पैसे दिले तर काय हरकत आहे. असं समजून भेटणारा व्यक्ती आधी त्या चपराश्यालाच काही पैसे देतो. पैसे मिळताच तोही काय सेटींग करायची ते करतो आणि साहेबाची भेट घालून देतो. समजा पैसे नाही दिले तर अख्खा दिवस जातो. परंतू साहेबाची भेट होत नाही. इथूनच भ्रष्टाचार सुरु होतो. ही वास्तविकता आहे.
आज देश विकासाच्या मार्गावर आहे. असे असतांना सर्वच सरकारी कार्यालयात अशा घुसखो-या चालत आहेत.शिपायापासून तर अधिकारी वर्गापर्यंत प्रत्येकाचे भाव ठरलेले आहेत. मग ते कोणतेही सरकारी कार्यालय असो. समजा एखाद्या अधिका-याला लाचलुचपत प्रतिबंधक जाळ्यात अडकववतोही म्हटलं तर प्रकरण आपल्याच अंगावर शेकतं. त्रासही भरपूर होतो. म्हणून कोणताच व्यक्ती असे करीत नाही. तो चुपचाप आपल्याजवळील पैसा देेतो आणि आपली कामे करवून घेतो.
डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान बनवलं. त्यानुसार प्रत्येकाला आरक्षणाच्या सुविधाही मिळाल्या. त्याच आरक्षणाचा फायदा घेत काही मंडळी शिकली. मोठी झाली. उच्च पदावरही गेली. बाबासाहेबांनी राजा या पदाचं महत्व कमी केलं. त्यांनी संविधान माध्यमातून प्रत्येकाला राजा बनवलं. त्यानुसार देशातील हर एक व्यक्ती राजा बनला. आता कुणालाच कुणाचं ऐकायची गरज नाही. कुणालाच कुणाची गुलामीही करायची गरज नाही. सगळे कसे स्वतंत्र्य आहेत. ते स्वतंत्र्यतेसारखे वागतात. अनुभवतात. सरकारी अधिकारी तर त्याहूनही वरच्या स्तरातील. ते तर स्वतःला राजेच समजतात. तसं दिसतंही.
आज ह्याच अधिकारी वर्गाची तानाशाही वाढतांना दिसत आहे. त्यांच्याकडे पुरेसा वेळंही असेल, तरी ते भेटायला तयार नसतात. शेवटी व्हि आय पी संस्कृतीच्या मुळं त्यांचे भाव वाढल्यागत ते शिपायाला सांगून ठेवतात की कोणालाही आत पाठवायचे नाही. साहेब बिझी आहेत आणि समजा आत गेलंच तर म्हणतात, लवकर लवकर बोला, मला वेळ नाही.
सरकारी अधिकारी ........त्यांच्या कार्याालयाच्या बाहेर असणारा तो शिपाही. तो गुलाम असल्यागत वागत असतो आणि तो अधिकारी एक राजा असल्यागत वागत असतो. त्यातच सामान्य जनता ही देखील त्याची गुलाम असल्यागत वागत असते नव्हे तर वागावंच लागतं.
पुर्वीच्या काळी काही राजे सामान्य माणसांना न्याय देत नसत. ते सामान्य माणसांना दास वा गुलाम म्हणूनच वागवत असत. त्यांची केव्हाही मान कापली जात असे. त्यांची इच्छा नसतांना त्यांना जबरदस्तीनं फौजेत युद्धस्थळी नेत असत. त्यांची इच्छा नसतांना त्यांची खरेदी विक्री होत असे.
आज सरकारी कार्यालयाचे अधिकारी वर्ग सामान्य माणसाला युद्धाला नेत नाही. त्यांची खरेदी विक्री करीत नाही. कारण प्रत्येक नागरीकाला त्याचेवर अत्याचार झाल्यास न्याय मागण्याचा अधिकार संविधानानं प्रदान केलेला आहे. परंतू असे असतांनाही न्यायालयात ज्या प्रलंबीत केसेस चालतात आणि त्या चालल्यानंतर बहुतःश विजय या अधिकारी वर्गाचाच होतो, सामान्यांचा होत नाही. त्यातच ते अधिकारी त्या केसच्या निकालानंतर ज्यानं त्याचेवर केस केली. त्यांचेवर नुकसान भरपाईची केस दाखल करुन सामान्य माणसाला जे घाईस आणलं जातं. त्यामुळं सरकारी कर्मचारी वर्ग वा अधिकारी वर्गाच्या कोणीही वाट्याला जात नाही.
न्यायालयातही अगदी तीच अवस्था आहे. तेथेही शिपाही. तो शिपाही तारीख लवकर लावून देतो असे म्हणून पैसे उकळतो. तेथील बाबूही पैसे घेवूनच कोणतेही काम करतो. यात जो इमानदारीनं चालण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच सर्वात जास्त त्रास आहे आणि तो भोगावाच लागतो.
महत्वपूर्ण गोष्ट अशी की ज्या सरकारी कार्यालयातून सामान्य लोकांची कामं होतात. त्या सरकारी कार्यालयातून त्यांची कामं जर होत नसतील तर अशी सरकारी कार्यालये कोणत्या कामाची? ज्या सरकारी कार्यालयातील कर्मचा-यांचे वेतन सामान्यांनी भरलेल्या करावर चालतं. त्यांनी आपल्या पदाबाबत एवढा गर्व का करावा? तसेच ज्या सरकारी कर्मचा-यांना सर्व सुविधा जनतेेच्या करातून मिळतात. त्या सरकारी कर्मचा-यांनी जनतेसोबत अशा प्रकारचे वर्तन का ठेवावे? नव्हे तर सरकारी अधिकारी हे जनतेचे नोकर असतांना त्यांना भेटण्यासाठी जनतेला का तपश्चर्या करावी लागावी? त्यांना व्हि आय पी सुविधा का मिळावी?
हे सर्व प्रश्न........बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, म्हणून आज सामान्य माणसंही रंकाचे राजे बनलेले आहेत. त्यांनी स्वतःला व्हि आय पी अधिकारी समजू नये. मृत्यूनंतर आपण सोबत काहीच नेत नाही. हे घर, बंगला, गाड्या, नोकर चाकर......सगळं जाग्यावरच राहातं. मिळते फक्त साडे पाचफुट जागा. तिही जागा तुमची नसतेच. त्या जागेवर पुढील तीन महिण्यानं दुसरं पार्थीव दफन केलं जातं. तुमचं अस्तीत्व समाप्त करुन आणि जाळल्यास दुस-या दिवशी दुसरं पार्थीव. तसेच वर जातांनाही काहीच घेवून जात नाही. सगळं ठेवूनच जातो ते या पृथ्वीतलावर. मग एवढी स्वतः व्हि आय पी वागणूूक का बरं ठेवावी? स्वतःला व्हि आय पी का बरं समजावं? आज राजा असणारा अधिकारी वर्ग. या वर्गानं सामान्यांचे प्रश्न सोडवावेत. स्वतःला व्हि आय पी समजू नये. तसेच लक्षात ठेवावे की आईच्या गर्भातून कोणीही बारा महिण्यानंतर बाहेर पडलेला नाही. प्रत्येक व्यक्ती नवच महिने राहिला. त्याचं रक्त, मास हाड काही वेगळं नाही. प्रत्येकाचं सारखंच आहे. म्हणून शेवटी मी एवढंच म्हणेल की अधिकारी वर्ग वा सरकारी कर्मचा-यांनी आपला गर्व सोडावा. निवृत्त झाल्यावर स्वतःला समाधान वाटायला हवं. तसेच इतरांनाही समाधान वाटायला हवं की अमूक अधिकारी चांगला होता. अमूक कर्मचारी चांगला होता. तसेच वरही गेल्यानंतर अमूक माणूस चाांगला होता असंच सर्वांना वाटायला हवं. तेेव्हाच ख-या अर्थानं जगण्याचं सार्थक झाल्याचं समाधान वाटेल. त्याशिवाय कोणीही स्वतःला मोठे समजू नये.
मुखत्वे अधिकारी असो की आमदार खासदार वा पंतप्रधान असो की देशाचा राष्ट्रपती वा एखादा न्यायाधीश......कोणीही स्वतःला व्हि आय पी समजू नये. कारण त्यांचं वेतन हेे सामान्यांच्या करातून चालतं. ते जनतेचे सेवक असतात. म्हणून या जनतेचे काही जर प्रश्न असतील तर ते सोडविण्यासाठी त्यांना प्रतिक्षा करावी लागू नये.थेट भेटता यावे. महत्वाचं म्हणजे ही व्हि आय पी संस्कृती मोडीस निघावी म्हणजे झालं. तसेच या सरकारी कर्मचा-यांची बैठेशाही होवू नये एवढंच मी सांगेन.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०