Women should not be considered weak in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | स्रियांना कमजोर समजू नये

Featured Books
Categories
Share

स्रियांना कमजोर समजू नये

स्रियांना कमजोर समजू नये?

*महिलांना कोणीही कमजोर समजू नये. कारण महीला या कधीही कमजोर नसतात. त्या संयमी व शांतीप्रिय असतात. त्यांनी विचार केला तर त्या तख्तचे तख्त पालटवून टाकतात. त्यांना लवकर राग येत नाही. परंतू एकदा का राग आला की त्या भल्याभल्यांची वाट लावतात.*
हा देश मुळातच स्रीच्या शुरतेच्या कहाणीपासून घडलेला देश आहे. या देशाला स्री विरतेचा इतिहास आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास ज्याला काही लोकं भाकडकथा वा अंंधश्रद्धा समजतात. ती काली शुर होती. तिही स्रीच होती. जिला महिषाशूर मर्दीनी म्हणतो तिही शूरच होती. त्यातच अशा ब-याच स्रिया झाल्या की ज्यांचा शुरतेचा इतिहास आहे हिंदू धर्मात. हिंदू धर्मात झालेल्या सीता असो वा मंदोदरी, शुरपंखा असो वा ताडका या शुरच होत्या. तशाच त्यांना सिद्ध्या प्राप्त असल्याचं दर्शवलं आहे. म्हणतात की रामायण सीतेनं घडवलं तर त्यानंतर आलेला द्वापरयुग. या युगात एकट्या द्रोपदीनं अख्खं महाभारत घडवलं. गार्गी, मैत्रेयीचं नाव आजही येतं. या स्रियांनी पुरुषांसोबत त्या काळात शास्रार्थ केला व त्यांना शास्रार्थात जिंकलं.
या देशातील विद्यमान गतकाळही असाच आहे. या काळात झालेली राणी पद्मावती तसंच राजकुमारी बाला या शुरच स्रिया होत्या. या देशात राजा दाहिरवर विजय मिळवल्यानंतर मुस्लीम शासक मोहम्मद बिन कासीम याने देशातील राजा दाहिरच्या दोन मुलींना बगदादला नेलं. परंतू बगदादला गेल्यावर या दोन्ही मुलींनी आपल्या अक्कलहुशारीनं मोहम्मद बिन कासीमचा खात्मा केला.
या देशातील स्रियांचा इतिहास हा गौरवशाली इतिहास राहिला आहे. कुठेही स्री कमजोर असलेली दिसत नाही. मग आता ती मुस्लीम का असेेना. मुस्लीमामध्येही चांदबीबी नावाची राणी झालेली आहेे.
या देशात राणी लक्ष्मीबाई अशी स्री होवून गेली की जिचं नाव आजही इतिहास देतो. काल केलेली मेरी झाशी नही दुँगी ही सिंहगर्जना आजही इतिहासातच नाही तर अख्ख्या देशात गाजते. या देशात झालेली जीजामाता सर्वांच्या परिचयाची आहे. या जीजामातेनं तर अख्खा इतिहासच बदलवून टाकला. तिनं महाराष्ट्रातील मुस्लीम सत्ता पुर्णतः नेस्तनाबूत करण्याची बीजं रोवली. त्यानंतरही राजारामाच्या मृत्यूनंतर आता आमचाच झाला दख्खनचा प्रांत समजणा-या औरंगजेबाला धुळ चारणारी महाराणी ताराबाई ही देखील वीरच. तिनं केवळ राज्याची बागडोरच हाती घेतली नाही तर ती व्यवस्थीत सांभाळली. परंतू तिनं कोणाला झुकू दिलं नाही औरंगजेबासमोर. ना ती शरण गेली औरंगजेबाला. शेवटी हताश होवून औरंगजेबाला याच मातीत मरावं लागलं आणि याच मातीत दफन व्हावं लागलं.
आज मात्र स्पर्धा लागली आहे श्रेष्ठ समजण्याची. आजही काही महिला सर्वच गोष्टींमध्ये श्रेष्ठ आहेत. आजही त्या औरंगासारख्या व्यक्तीवर विजय मिळवू शकतात एवढ्या त्या सक्षम आहेत. काही राजकारण चालवीत आहेत तर काही आजही अंतराळ भरारी मारत आहेत. कोणी क्रिकेटमध्ये अजरामर ठरल्या आहेत तर कोणी धावपटू बनल्या आहेत. पीटी उषा अशीच. तसंच या महिलांच्या यादीत पी व्ही सिंधूनं बँटबिंटन गाजवलं. तिही महिलाच. या महिलांच्या यादीत अहिल्या होळकर आहे तसंच सावित्रीबाई फुले व रमाईदेखील. त्यातच स्रीजातीची संतपरंपराही लाभली आहे या देशाला. संत जनाबाई, ती मुक्ताबाई, संत मीराबाई या महान संत या देशात होवून गेल्या.
महिलांनी केवळ भजन किर्तनच केलं नाही तर त्यांनी तलवारीही हातात घेतल्या. त्यांनी सतत दाखवून दिलं की आम्ही केवळ भजन किर्तनच करीत नाही तर आम्ही वेळ आला तर शत्रूशी दोन हातही करायला मागं पुढं पाहात नाही. म्हणून आजच्या तरुणांना संदेश आहे की महिलांना त्यांनी कमजोर समजूच नये. त्यांनी विचार केला तर त्या काहीही करु शकतात एवढंच सांगणं आहे.
आज त्यांना कमजोर समजण्यात येत आहे. कोणी त्यांच्यावर अत्याचार करीत आहेत. कारण त्या सहनशील गटातल्या आहेत. लवकर भडकत नाहीत. परंतू त्या भडकल्या की त्यांची महिषासूर मर्दीनी वा रणरागीणी केव्हा बनेल हे सांगणे कठीण आहे. म्हणून आपण महिलांना कमजोर न समजता सावधान राहिलेलं बरं. कोणी चार हात दूर म्हटलं तरी चालेल वा कोणी भित्रा भागूबाई म्हटलं तरी चालेल.

अंकुश शिंगाडे नागपूर