आजचे शिक्षण उपयोगाचे नाही
काही विचारवंत म्हणतात की शिक्षण माणसाला मोठे करते.त्यांचं म्हणणं बरोबर आहे.एखादा माणूस खुप शिकला की लोकं त्याचा आदर करायला लागतात.त्याच्याशी अदबीनं वागतात नव्हे तर त्या माणसांकडं पाहून शिक्षणाबद्दल कोणाच्याही मनात आदर निर्माण होतो.
शिक्षण शिकून मोठे होणा-याच्या यादीत बरेच लोक आहेत.शिक्षणानं माणूस मोठा होतोच हे निर्वीवाद सत्य आहे.म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी आधीच म्हटलं शिका.डॉक्टर बाबासाहेबही शिकले,म्हणून त्यांना लोकं मानायला लागले.विचारायला लागले.ते जर शिकलेच नसते तर त्यांना कोणीही ओळखलं नसतं.
शिक्षण हे जरी माणसाला मोठं जरी करीत असलं तरी अलिकडच्या शिक्षण शिकणा-याचं वागणं पाहून कोणालाही शिक्षण हे माणसाला मोठं करतं असं वाटत नाही.पुर्वीचा काळ गेला की शिकणारा व्यक्तीही वडीलधा-यांशी अदबीनं वागत असे.त्याच्यात समजदारीपणा येत असे.पण आजच्या काळातील लोकं हे शिकतात.पण अदबीनं वागतांना दिसत नाही.
आज मुले एवढी शिकतात की कोणी डॉक्टर बनतात,कोणी इंजीनियर.कोणी विदेशात जातात.तर कोणी देशात राहतात.पण हे शिक्षण संकुचीत बुद्धीमत्ता बनवणा-यांचं शिक्षण आहे.त्याचं कारणंही तसंच आहे.ते म्हणजे हे शिक्षण नेहमी उच नीचतेचा फरक करीत आहे.
आजच्या काळात जे जास्त शिकतात.त्यांना थोडा अभिमान नक्कीच वाटते.त्यांना थोडासी गर्व नक्कीच येतो.त्यांना असं वाटायला लागतं की आमच्याएवढा कोणीच शिकलेला नाही.शिकूच शकत नाही.त्यांच्यापुढे कोणी जर गेलाच तर त्यांना वाटते की ते त्याची अवहेलना करतात.पण त्यांना ते कळत नाही की हा व्यक्ती जरी कमी शिकलेला असेल तरी त्याला जास्त अक्कल आहे.मला फक्त पुस्तकी अक्कल आहे.
आज आपण पाहतो आहोत की शिक्षण शिकलेला माणूस किती प्रमाणात स्वातंत्र्य असतो.तो तर आदर्श गुलामच वाटतो.संयमाच्या गोष्टी करतांना निव्वळ गुलामगीरीचं प्रदर्शन करतात ते.नव्हे तर नोकरदार असलेला जास्त शिकलेला व्यक्ती आपली नोकरी टिकविण्यासाठी मोठ्या साहेबांसमोर गुलाम होवूनच वागत असतो.त्यांच्याकडे पाहिलं तर आजचं शिक्षण हे माणसाला सक्षम बनवीत नाही.तसंच शिक्षण जरी मोठ्या पदावर नेत असलं तरी ते शिक्षण काही माणसाच्या उपयोगाचे नाही.त्याची कारणं खालीलप्रमाणे आहेत.
१)आजचं शिक्षण उपयोगाचं नाही असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.कारण लोकं जेव्हा शिकतात.ते एवढे शिकतात की त्यांना कोणतीही कामं करायला लाज वाटत असते.त्यांना वाटते की आपण एवढे शिकलो.मग अशी हलकी कामं कशी करावीत.ते प्रसंगी खाली(रिकामे) राहणं पसंत करतात.पण मिळेल ती कामं करीत नाहीत.अशांचे शिक्षण हे शिकून कोणत्या उपयोगाचे असे म्हणता येईल.
२)सेवेच्या दृष्टीकोणातून आजचं शिक्षण हे निरुपयोगी आहे.कारण जो शिकतो,तो व्यक्ती आपल्या मायबापाची सेवा करीत नाही.तो आपल्या पत्नीसोबत राहायला जातो.तो जे मायबाप शिकवतात, लहानाचं मोठं करतात.त्याच मायबापांना विसरतो.त्याच मायबापांना सोडून दूर जातांना त्याला एवढं शिकवूनही तो निर्णय अज्ञानी व्यक्तीसारखेच घेतो नव्हे तर मायबापाला वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात टाकतो.अशी मुलं कितीही शिकली तरी ते शिक्षण त्यांच्या कोणत्या कामाचे?
३) काही लोकं शिकतात.त्यांना नोकरीही लागते.त्यांची नोकरी लागल्यानंतर ते स्वतःचे निर्णय घेवू शकत नाहीत तर साध्या दोन वर्ग शिकणा-या माणसाच्या हातचे कळसुत्री बाहूले बनून वागतात.वावरतात.जसे एखाद्या शाळा चालविणा-या संचालकांच्या शाळेत काम करणारी उच्च शिक्षीत शिक्षक मंडळी ही त्या शाळेतील कमी शिकणा-या संचालकाच्या विरोधात बोलू शकत नाहीत.एवढंच नाही तर त्या शाळेतील कमी शिकलेला मुख्याध्यापक हा त्या शाळेतील उच्च शिक्षीत शिक्षकांवर अत्याचार करतो.पण हा जास्त शिकलेला शिक्षक त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही.राजकारणातही कमी शिकलेले नेते हे जास्त शिकलेल्या अधिका-यांना नेस्तनाबूत करतात.यावेळी ते अधिकारी कितीही शिकलेले असले तरी या नेत्यांसोबत वावरतांना ते निरक्षरच वाटतात.अशावेळी त्यांचे शिक्षण कोणत्या उपयोगाचे असे वाटल्याखेरीज राहात नाही.
४) आज माणसे खुप शिकतात.नोकरी लागत नाही.त्यानंतर ते कोणतीही कामे करतात.पण आपल्या शिक्षणाचा उपयोग करुन कोणापुढे आदर्श निर्माण करीत नाहीत.नव्हे तर त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन स्वतःचा उद्योगधंदा सुरु करुन आपले पोट भरायला हवे. तसेच इतरांचेही पोट भरायला हवे.पण ही माणसं तसं करीत नाहीत.ही मंडळी आपलेच पोट भरु शकत नाही, ती काय दुस-यांना कामं देतील! ती त्यावेळी अज्ञानीच वाटतात.त्यांच्या अशाच प्रकारच्या वर्तनामुळे त्यांच्याही शिक्षण उपयोगाचे वाटत नाही.
विशेष सांगायचं म्हणजे आज शिक्षणानं माणसं मोठी जरी होत असली तरी ती माणसं दिशा दाखवू शकत नाहीत.अर्थात आंधळ्यांंची काठी बनत नाहीत.खरं सांगायचं झाल्यास शिक्षण हे शिकावे.शिकण्याची गरज आहे.पण त्याचबरोबर या शिक्षण शिकणा-यानं न शिकलेल्या माणसाची काठी व्हावं.त्यांना व्यवस्थीत मार्ग दाखवावा.त्यांचे मार्गदर्शक व्हावे.जेणेकरुन त्यांनाही शिक्षणाचे महत्व वाटेल व ते जरी शिकले नसले तरी आपल्या येणा-या पीढीला शिकवू शकतील.जेणेकरुन पुढील काळात तरी ते शिक्षण उपयोगाचे ठरेल यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०