हेच रामराज्य असेल
(विदेशवारी;दोष कोणाला द्यायचा)
अंकुश शिंगाडे लेखक १२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपुर ४४००३५फोन नंबर ९३७३३५९४५०
विदेशवारी:दोष कोणाला द्यायचा.अलिकडे विदेशवारीचं फड निर्माण झालं आहे.जो तो विदेशात जाण्यासाठी आपली मानसिकता तयार करतो आहे.कोणी शौक म्हणुन तर कोणी स्वतःचं करियर करण्यासाठी,कोणी भारतात इज्जत मिळत नाही हा बहाणा करवाकर कोणी आपलं संशोधन भारतात खपत नाही अर्थात या देशात आपलं कोणी ऐकत नाही म्हणुन विदेशात गेली.नीरव मोदी, विजय माल्या,ललित मोदी यासारखी मातब्बर मंडळी घोटाळे करुन विदेशात पळाली.सरकारमध्ये बसलेल्या बड्यी नेत्यानं म्हटलंच आहे की ज्यांना ज्यांना घोटाळे करुन विदेशात पळायचे असेल त्यांनी लवकर पळा.नाहीतर तुमची खैर नाही.
भारत कृषीप्रदान देश आहे.तसेच हा देश नवरत्नाची खाण आहे.आम्हीही म्हणतो.सगळेच म्हणतात.खरंच आहे.भारत कृषीप्रदानच देश आहे.तसेच नवरत्नाची खाण आहे.या देशात पिकणारा कापुस हा उच्च दर्जाचा असल्यामुळे त्या काळच्या इंग्रजांनी ह्याच देशातुन कापुस कमी दामात आपल्या देशात नेला होता.हा इतिहास आहे.इथे पिकणा-या लांब धाग्याचा कापुस जगात कुठेच पिकत नाही.कारण इथली माती काळी कसदार असुन.कापुसच नाही तर इतरही जिनसासाठी अनुकूल आहे.इथले जमीनीतुन निघालेले पदार्थ जसे रुचकर लागतात.तसे रुचकर इतर भागातले लागत नाही.
आज भारत कृषीप्रदान जरी वाटत असला तरी आज भारतात कृषीची काय गत आहे?देशातील कृषीवर दुष्काळाचे सावट आहे.कधी सुका दुष्काळ तर कधीकधी ओला दुष्काळ शेतक-यांचा घात करीत आहे.आमचे सरकारही या शेतक-यांच्या पाठीशी नाही.तेही शेतक-यांचा घात करीत आहे.देशात शेतकरी आत्महत्या घडत आहेत.पण त्यावर तोडगा सरकार काढत नाही.निव्वळ आश्वासन फैरी....निव्वळ आश्वासनाच्या फैरी सरकार झाडत आहे.
भारत नवरत्नाची खाण आहे हेही बरोबर आहे.जे काही अठराव्या शतकात संशोधन झालं.त्याची पाळमुळं ब-याच वर्षापुर्वी भारतीय शास्रज्ञानी रोवली होती.ह्याचे दाखले आजही त्या काळात लिहीलेल्या धर्मग्रंथात आजही दिसतात.त्या काळात उच्चकोटीचे शिक्षण घ्यायचे असेल तर विदेशी लोकांना भारतात यावं लागायचं.तक्षशिला नालंदा विद्यापीठात त्या काळी विदेशातुन आलेली मंडळी शिकली.नव्हे तर मेगँस्थनीस युवान श्वांग ह्युएनत्संग ही भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतात आलेली मंडळी.त्यांनी आपल्या लेखनीने भारतीय संस्कृतीचे जे वर्णन लिहिले.ते पाहुन मोगल,इंग्रज,फ्रेंच, डच,पोर्तुगीज या सर्वांना भारतात येण्याचा मोह आवरला नाही.तेही भारतात आले.भारताला गुलाम बनवुन त्यांनी लुटलुट लुटले.येथील खजिना आपल्या देशात नेला.तरीही ही पवित्र भुमी नेता न आल्याने.या मातीत पिकणारे सोने त्यांना नेता आले नाही.महत्वाचे म्हणजे ह्या भुमीने जे ऐश्वर्य आपल्याला प्रदान केले.तेच ऐश्वर्य इतर कोणताही देश प्रदान करु शकत नाही.आजही देश सुजलाम सुफलाम आहे.
मोहम्मद गझनी पासुन तर आजच्या निरव मोदी पर्यंत सगळ्यांनी भारताला लुटले.आपल्या देशात येथील पैसाच नाही तर सोनंही नेलं.कोहीनुर हिरा हा ह्या देशातील शान.पण तोही ब्रिटीशांनी आपल्या देशात नेला.सोमनाथांचं मंदीर हे सोन्यानी मढवलेलं होतं.तेही मंदीर गझनीनं लुटून नेलं.तरीही भारताला त्या काळीही क्षति पोहोचली नाही.आजही पोहोचत नाही.नीरव मोदी ललित मोदी विजय माल्यासारखे ऐरेगैरे नत्थु खैरे सारखे कितीही येवो.
खरंच भारतात इज्जत मिळत नाही.सामान्य लोकांना न्याय मिळत नाही.खुन करुन भारतातुन पलायन करतात.कोणी पैसा घेवुन भारतातुन पलायन करतात.तर कोणी मनपसंद नोकरी मिळत नाही म्हणुन जातात.तिथेच रमतात.त्या देशाचे नागरिकत्व स्विकारतात.रोजी रोटीसाठी सारखे वणवण भटकावे लागते.
इथली माती नवरत्न निर्माण करते.पण या नवरत्नांना देशात पाहिजे तो वाव मिळत नाही.नवरत्नांच्या मनपसंद काम मिळत नाही.नव्हे तर नवरत्नांनी कार्य करतो म्हटले तर त्यांचे पाय खिचले जातात.त्याला कार्य करुच दिले जात नाही.चापलुसी करणारा घटक हा चापलुसी करतो.त्याच्याजवळ गुणवत्ता नसल्याने तो राज्य करणा-या घटकाच्या अगदी जवळ चिपकुन राहतो.त्यालाच सन्मानाची पदं मिळतात.कर्तृत्व नसेल तरीही.....गुणांची पारख न करता....त्यांना वाव न देता. हिरे कोळश्याच्या खाणीत जन्मल्यासारखी विद्वानाची गत असते.
आज या देशातील मोठमोठी विद्यापीठं बंद पडली.विद्यापीठातही गोंधळ निर्माण झाला आहे.नवरत्न एखाद्या झोपडीत जर जन्मला तर त्याला घडायला वाव नाही.कारण शिक्षणाचं खाजगीकपण झालं आहे.शिकायला भरपुर पैसा लागतो आहे.उद्योगपतींचीच वाहवा आहे.मोठमोठे श्रीमंत मंडळी आँक्सफोर्ड मध्ये जातात शिकायला.नालंदा तक्षशिलेची जागा आँक्सफोर्ड विद्यापीठाने घेतलेली आहे.
देशात संस्कृती उरलेली नाही.जी सिंधु संस्कृती संपुर्ण जगात प्रसिद्ध होती.ती संस्कृती दिसत नाही.संस्कृतीच्या नावानं भांडतात लोकं.त्यांना मजा वाटते.जात धर्म ह्या गोष्टी विकासाला अडसर असल्या तरी त्याचाच बाऊ केला जात आहे.न्याय हा श्रीमंतापुरताच मर्यादित झाला आहे.गरीबीची गत एखाद्या किड्यामुंग्यांसारखी आहे.केव्हाही कुचलता येईल अशी.राम राज्याचा हव्यास आहे.लोकांना राम पाहिजे.पण त्यांचा विचार नको आहे.भीम पाहिजे त्यांचा विचार नको आहे.जातीजातीत राजकारण.गांधीनी अहिंसा मांडुन देश एकत्र आणला.पण भारत पाकिस्तान फाळणीला त्यांनाच दोषी मानले जात आहे.लोकांना खिशातला गांधी हवा आहे.पण विचारात गांधी नको आहे.असा आमचा समाज.आजही अबलावर अत्याचार करतो आहे.हिस्यासाठी भाऊ बहिणीचा खुन करतो आहे.नव्हे तर हुंड्यासाठी महिलांना चक्क जीवंत जाळले जाते.सावकारी पद्धती काही अंशी बंद झाली असली तरी आजही शेतक-यांना कर्जात फसवुन आत्महत्या करायला भाग पाडले जात आहे.
देशातील अशी अवस्था पाहुन इथली माणसे वैतागणार नाही तर काय?म्हणुनच ती माणसे देवाने दिलेला जन्म एकदाच मिळतो हा उद्देश गृहीत धरुन काही या पृथ्वीचे देणे लागतो असा विचार करुन आपल्या देशात नाही तर कोणत्याही देशात कर्तृत्व बजावण्यासाठी जातात.तर काही या देशाला गहाण टाकुन येथील मालमत्ता घेवुन पळुन जातात.यात दोष कोणाचा?ते पळेपर्यंत सरकार झोपलं होतं का?असे प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आजही उभे राहतात.
आज तरी देशाने जागृत व्हावे.व्हिसा बनवितांनाच त्याच्यावर किती कर्ज आहे हे तपासुन पाहावे.विदेशात जावु देण्यापुर्वी जामीन म्हणुन त्या परिवाराची संपुर्ण मालमत्ता जमा ठेवावी.नाही आल्यास इशारे देवुन ती मालमत्ता विक्रीस काढता येईल.मग कोणीही असो.न्यायाचं सामान्यीकरण करावं.कोणालाही न्याय मिळेल.पैसा हा घटक चालणार नाही.हेही लक्षात घ्यावे.त्यासाठी वकिल, दलालांची फौज नष्ट करावी.
प्रत्येक तक्रारीवर अंमल व्हावा.देशातील सर्व घटकांना आपल्या वरील अत्याचार दुर करता यावा.धोब्याच्या बोलण्यानंही नात्याला माफ करु नये.न्याय असाच असावा की ज्यामध्ये जनतेचेच नाही तर सामान्य लोकांचे हित दडलेले आहे.आईचे वचन प्रत्येक लेकराला शिरसावंद्य असावे.राजा विदेशात गेला तरी चालेल.पण जनता जाता कामा नये.पण राजाने विदेशात जातांनाही रामासारखं काही नेण्याची गरज नाही.राम जंगलात गेले,काहीही न नेता.......अगदी तसंच.हेच रामराज्य असेल.तुम्हा आम्हा सर्वांचं.