गांधीजींना नावबोटं ठेवू नये!
रणाविणं जर स्वातंत्र्य कोणाला मिळालं तर त्यात भारत देशाचा उल्लेख केला जातो.तसेच प्रथम नाव पुढे येतं. ते म्हणजे म.गांधींचं.खरंच म.गांधी थोर पुरुष होते काय?
आज भारतात दोन विचारप्रवाह सुरु झाले आहेत.एक गांधीजींना न मानणारा विचार प्रवाह तर दुसरा गांधीजींना मानणारा विचारप्रवाह.काही लोकं खुल्या मनानं समर्थन करतात.तर काही लपून चोरुन.काही खुल्या मनानं नाकारतात तर काही लपूनचोरुन.पण यावरुन काही म.गांधींची थोरवी व योग्यता कमी होत नाही.
आज म.गांधी चलनाच्या नोटावर आहेत.याचं कारण की ते राष्ट्रनिर्माते आहेत.देशाचे राष्ट्रपिता.काहीजण मानतही नाहीत त्यांना राष्ट्रपिता.असे लोक त्यांना चलनाच्या नोटांवरुन हटविण्याचा विचार मांडतात.मग चलनावर काय ठेवावं.तर काही लोक डॉक्टर बाबासाहेबांचं नाव सुचवतात तर काही आपआपल्या जातीतील लोकांची नावे सुचवितात.पण ह्या जाती सर्वांना चालत नसल्यानं पर्याय नाही म्हणून म.गांधींचा फोटो सध्या सुरु आहे.तो केव्हा हटवतील हे सांगता येत नाही.
भारत पाकिस्तानचं विभाजन व्हावे अशी काही लोकांची मागणी होती.त्यातच मोहम्मद इक्बालनं तसेच बैरीस्टर जीनानं पाकिस्तान मागीतला.पण काही लोकांचा त्याला विरोध होता. त्यातच पाकिस्तान बनवीत असतांना या अखंड हिंदूस्थानात दंगेही भडकले. कित्येक लोकं मारले गेले.त्यातच फाळणी झाली व भारत पाकिस्तान बनला. परंतू त्यानंतर म.गांधीची हत्या झाली.
मुख्य म्हणजे फाळणी झाली व फाळणी जीनामुळं झाली, याचा विचार न करता व त्याला दोषी न धरता सरळ सरळ म.गांधींनाच त्यात दोषी धरलं गेलं आणि फाळणी होण्यापुर्वी ठार न करता ती झाल्यानंतर म.गांधींना ठार करण्यात आलं.खरं तर ही फाळणी होण्यापुर्वीच म.गांधीना ठार केलं असतं.तर कदाचित त्याचा फायदा झाला असता.पण फाळणी झाल्यानंतर स्वतःला देशभक्त समजून ठार करणे उपयोगाचे नव्हते.
नाथुरामनं गांधीजीला दोषी समजत ठार केलं. हे त्याचं जरी देशप्रेम असलं तरी त्या देशप्रेमानं म.गांधीची किर्ती काही कमी होत नाही.परंतू आजचा समाजही म.गांधींनाच दोषी मानते.ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी कोणतंच योगदान दिलं नाही.त्याच मंडळींचे म.गांधीवर दोष लावणे बरोबर नसतांना आम्ही स्वतः किती हुशार आहोत असं समजून काही लोकं उगाच दुषणे लावतात. खरं तर त्यांनी म.गांधीवर दोष लावण्यापुर्वी विचार करावा की आपण या देशासाठी किती योगदान दिलं? म.गांधीएवढं योगदान दिलं का? मगच दोष लावावा.जिथं आपल्या घरची दोन माणसं आपण एकत्र करु शकत नाही. तिथं म.गांधीनं अख्खा देश एकत्र केला. ही विचार करायला लावणारी बाब आहे. खरं तर त्यांच्याच प्रयत्नानं देश स्वतंत्र्य होवून भारत आणि पाकिस्तानही बनला.खरं तर तेच या पाकिस्तान आणि भारताचे राष्ट्रपिता आहेत.पण आजचा आमचा मतलबी समाज हा त्यांना राष्ट्रपिता मानायला तयार नाही.पाकिस्तान तर नाहीच नाही.शिवाय भारतातील लोकंही म.गांधीवरच आगपाखड करतात.
म.गांधींनाही भारताचे दोन तुकडे होवू द्यायचे नव्हते.राष्ट्रीय सभाही त्या विरोधातच होती.पण गांधीजी तरी काय करणार? त्यांच्या हातात तरी काय होतं?
भारत पाकिस्तान बनण्यापुर्वी इथे राहणारा दलित समाज.त्यांनाही त्यांचे हक्क हवे होते.म्हणून डॉक्टर बाबासाहेंबांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितला.कारण त्यांच्यावर भयंकर अत्याचार झाला होता.इथल्या समाजानं त्यांच्यावर अनन्वीत अत्याचार केले होते.त्यांना माणूस म्हणून वागवले नव्हते.त्यांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात गाडगा दिला होता.नव्हे तर आपल्या स्वतःच्या उष्ट्या पत्रावळीही चाटायला लाचार बनवलं होतं.त्यांची सावलीही विटाळ करणारीच होती.नव्हे तर त्यांचा साधा स्पर्श.म्हणून जेव्हापर्यंत माझ्या समाजातील बांधवांना असं हक्काचं विचारपीठ मिळणार नाही,तेव्हापर्यंत माझा समाज सुधारणार नाही.असं डॉक्टर बाबासाहेबांना वाटलं.म्हणूनच त्यांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली.परंतू माझ्या देशातील एकही व्यक्ती माझ्या देशातून तुटून जावू नये यासाठी म.गांधींनी पुण्यात आमरण उपोषण केलं.त्यातच त्यांची प्रकृती एवढी खालावली की त्यांच्या जीवासाठी डॉ बाबासाहेबांना आपली मागणी सोडावी लागली.निव्वळ त्यांचा जीव वाचनिण्यासाठी.दलित समाजावर अत्याचार होवूनही मागणी मागे घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी उचललेले हे पाऊल म्हणजे आजही दलित अत्याचार सहन करीत आहेत.डॉक्टर बाबासाहेबांना तसं करणं योग्य वाटत नव्हतं.कारण म.गांधींचं दलितांना हरीजन म्हणणं आवडत नव्हतं.पण त्यांना हेही माहीत होतं की.म.गांधी जर नसतील तर हा देश अजून दिडशे वर्ष स्वतंत्र्यच होवू शकणार नाही.
राष्ट्रीय सभा काही म.गांधींची एकट्याची नव्हती.ती भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारी एक संघटना होती. १९४२ च्या चलेजाव भारत छोडोच्या आंदोलनात राष्ट्रीय सभेच्या ४ आगष्टला भरलेल्या बैठकीत हिंदू महासभा,मुस्लिम लीग व भारतीय कम्युनिस्ट पक्ष हजर राहिले नाही.म्हणून चलेजावचं आंदोलन करायचं की नाही हा म.गांधींच्या मनात संभ्रम निर्माण झाला.कमीतकमी हजर राहून या तिन्ही संघटनांनी आपलं मत प्रदर्शित करायला हवं होतं.त्याचा विचार करता आला असता.परंतू ते हजर न झाल्यानं परत सात आगष्टला सायंकाळी अशीच बैठक झाली.यात तरी त्यांनी हजर राहावं व परामर्श द्यावा असे म.गांधी तसेच तत्सम राष्ट्रीय सभेच्या लोकांना वाटत होते.शेवटी ती बैठक भारतीय स्वातंत्र्यासाठीच होती.पण यातही या तिन्ही संघटना हजर झाल्या नाहीत वा परामर्श दिला नाही.शेवटी एकला चलोरे ही भुमिका घेवून राष्टीय सभेने आठ आगष्टपासून बंद पुकारला.मग चलेजाव भारत छोडो म्हणत समाजातील सर्वच स्तरातील लोकं बाहेर आले.त्यात शिरीषकुमार,घनश्याम दास गिरीधरलाल सारखे विद्यार्थी इंग्रजांच्या गोळीबाराचे शिकार झाले.कित्येक लोकं भुमिगत झाले.कित्येकांनी आत्मबलिदान केले.क्रांतीकारकांचा जीव जात होता.त्यामुळं राष्ट्रीय सभेने शरणागती पत्करली.याचा अर्थ असा नाही की राष्ट्रीय सभेला अपयश आलं.याच झालेल्या १९४२ च्या आंदोलनातूनच इंग्रजांची पाळेमुळे खचली.त्यांची अर्थव्यवस्था डामाडोल झाली व त्यांनी देशाला स्वातंत्र्य देण्याचं कबूल केलं.
इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य देण्याचं कबूल जरी केलं असलं तरी त्यांची एक अट होती.ती म्हणजे आपल्या देशातील वाद मिटवा.परंतू भारतीय स्वातंत्र्यात मदत करणे दूरच.१९४६ ला मुस्लिम लीगने नौवाखाली येथे दंगा घडवला.कारण असा पाकिस्तान मिळत नाही तर तसा मिळवू.ही मुस्लिम लीगची भुमिका.मरेंगे या मारेंगे म्हणत त्यांनी हिंदूंची कत्तल केली.मग हिंदूही काही मागे नव्हते.त्यांनीही मुस्लिमांची कत्तल केली.यातच याचे लोण सर्व भारतभर पोहोचले.शेवटी मारामारी,कापाकापी,बलात्कार,छेडखानीचं सत्र सुरु झालं.शेवटी नाईलाजानं पाकिस्तान देणं भाग पडलं.मग मुस्लिमांचं पाकिस्तान म्हणून निर्वासीतांचे प्रश्न सुरु झाले.कोणी कोणत्या देशात राहायचं?हिंदूंनी कुठे राहायचं.मुस्लिमांनी कुठं राहायचं.तसेच दंगेही काही थांबलेले नव्हतेच.याचं खापर म.गांधीवर फोडण्यात आलं.तसेच त्यांनाच ठार करण्यात आलं.ज्या दंग्यात दोष जीनाचा होता.
म.गांधी मरण पावले.त्यानंतर त्यांच्या अस्थींचा प्रश्न निर्माण झाला.ह्या अखंड हिंदुस्तान निर्मीतीस म.गांधीचं योगदान असल्यानं त्यांच्या अस्थी ह्या अखंड हिदुस्थानातील पाच नद्यांमध्ये विसर्जीत करायचं ठरवलं.यात भारतातील तीन नद्या व पाकिस्तानातील दोन नद्या होत्या.पण जीनानं म्हटलं की आमचा पाकिस्तान पाक आहे.त्यात म.गांधीच्या अस्थी विसर्जनानं आमच्या पाकिस्तानला नापाक करायचं नाही.
पाकिस्तानचा कसला पाक नापाकचा प्रश्न.जो पाकिस्तान पाक नापाकच्या गोष्टी करीत होता.तो पाकिस्तान म.गांधीचीच देण होती.हा भारतही म.गांधीचीच देण आहे.कारण चलेजावचं आंदोलन जर झालं नसतं तर आजही इथला प्रत्येक नागरीक इंग्रजांचाच गुलाम राहिला असता.अजूनही स्वतंत्र्य झाला नसता हे तेवढंच खरं आहे.तसं पाहिल्यास चलेजावच्या आंदोलनात सक्रीय सहभागी मुस्लिम लीग नव्हताच.
दलितांवर इथल्या हिंदू समाजाचे एवढे अत्याचार होवूनही त्यांनी स्वतंत्र प्रदेश आपल्यासाठी मागीतला नाही.आजही मागत नाही.तसे मुस्लिमांवर कोणते अत्याचार झाले होते? तसेच म.गांधीनं हिंदू मानणा-या समाजावर कोणते अत्याचार केले की त्यांना मारण्यात आले.म.गांधीचंही स्वप्न अखंड हिंदूस्थानाचंच होतं.त्यात जीनानं लक्ष्मणरेषा आखली. त्यात त्यांची काय चूक? नंतर फाशावर जाण्यापुर्वी नाथुराम म्हणतात की माझी अस्थी तेव्हापर्यंत सांभाळून ठेवा की जेव्हापर्यंत सिंधू नदी भारतातून वाहणार नाही.अर्थात अखंड हिंदुस्तान बनणार नाही.स्वतः आरोपीने फासावर जाण्यापुर्वी मी गुन्हा केला नाही असे म्हणणे.हं नाथुरामजीही देशभक्तच होते.ते म.गांधीच्या विचारानं प्रेरीत झाले होते.त्यांना अखंड हिंदुस्तान हवा होता.पण त्यांना नेमका दोष कोणाचा हे समजलं नसेल.म्हणूनच त्यांनी म.गांधीना ठार केलं.ते जर समजलं असतं तर आज त्यांच्या हातून असं कृत्य घडलंच नसतं.
महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय सभा १९४२ ला लढली.त्यातूनच इंग्रजांना क्षती पोहोचली व स्वातंत्र्य मिळालं.त्यात मुस्लिम लीग,हिंदू महासभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष सहभागी नव्हते.म्हणून त्यांना या संदर्भात बोलण्याचा व मत मांडण्याचा अधिकारच नव्हता.म.गांधींना त्यांनी दोषी मानणं व भारत पाकिस्तान निर्मीतीचं खापर त्यांच्यावर फोडणं म्हणजे बापानं काबाडकष्टानं मिळविलेल्या मालमत्तेवर त्यांची वृद्धावस्थेत सेवा न करता हक्क सांगणं होय.हे खरंच बरोबर आहे काय? यावर आजतरी विचार करण्याची गरज आहे.तसेच म.गांधी तर गेले.नाथुराम,जीनाही गेले.ती राष्ट्रीय सभा ही गेली.आता फुकटच वाद करणे सुरु आहे.तेव्हा तो वाद विसरुन आपण त्यावेळी नव्हतो ना.भारतीय स्वातंत्र्याला आपण मदत केली नाही ना.हा विचार करुन आता म.गांधीच नाही तर इतर भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणा-या तमाम क्रांतीकारकांना वंदन करुन स्वातंत्र्याचा प्रत्येकांनी उपभोग घ्यावा व फुकटचे वाद करण्यापेक्षा देशाला कसे विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेता येईल.याचा विचार प्रत्येकांनी करावा.वाद करुन तसेच नकारात्मक विचार मांडून शक्ती वाया घालवू नये.कोणीही म.गांधीच नाही तर तत्सम स्वातंत्र्यात झालेल्या नेत्यांवर आगपाखड करु नये.नावबोटं ठेवू नये.ती शक्ती देशाच्या विकासाच्या कामी लावावी.जेणेकरुन नव्या वादाला तोंड फुटणार नाही व या वादातून पराया एखादा राष्ट्राला लाभ होवून ते इंग्रजांसारखे परत आपल्या देशातील या वादाचा लाभ घेवून आपल्यावर चढाई करुन आपल्याला गुलाम करणार नाही.हेच म.गांधी जयंतीच्या निमित्यानं सांगणे आहे.या विचारांचा नक्कीच मन लावून विचार करावा.जेणेकरुन म.गांधी समजण्यास मदत होवू शकेल.
अंकुश शिंगाडे ९३७३३५९४५०