saint rohidas in Marathi Moral Stories by Ankush Shingade books and stories PDF | संत रोहिदास

Featured Books
Categories
Share

संत रोहिदास

संत रविदास : एक मानवतावादी संंत

*मानवतावादी संत म्हणून सुविख्यात असलेले व ज्यांची गिणती संतांमध्ये येते असे संत शिरोमणी संंत रविदास. या संत रविदासाची जयंंती दि. ५ सप्टेेंबरला आहे. या निमीत्याने या लोकप्रिय संताचा घेतलेला आढावा*
संत रविदासाचा जन्म १३७७ मध्ये गोवर्धनपुरला झाला. कोणी म्हणतात की मंडूरला झाला. पर्यायानं सांगायचं झाल्यास जन्माबाबत संभ्रम आहे. संत रविदास हे बालपणापासूनच चिकीत्सक बुद्धीमत्तेचे होेते.
समाजात दोन समुदाय आहेत. एक समुदाय असा आहे की तो चमत्कार मानतो व दुसरा समुदाय असा आहे की जो चमत्कार मानत नाही. कोणी म्हणतात की त्यांनी चमत्कार केले. ते चमत्कार त्यांच्या जन्मापुर्वीपासूनच झाले. जसे. त्याच्या बाळंतपणाच्या वेळी त्याचं बाळतंपण करणा-या दाईच्या डोळ्याला स्पष्ट दिसणे. गंगा अवतरणे वैगेरे. पुढे ते मोठे होत असतांना त्यांच्या हातून साापाचा दंश उतरणे, ब्राम्हण भोजाच्या वेळी प्रत्येक पंगतीतच रविदास दिसणे एवढंच नाही तर कटो-यात गंगा दिसणे. म्हणूूनच म्हटलं जातं की मन चंगा तो कटौती मे गंगा. असा चमत्कार केला संत रविदासांनी. असे मानणारा एक गट. या गटानुसार जर संत ज्ञानेश्वर भिंत चालवू शकतात, तर रविदास कटो-यात गंगा अवतरु शकत नाही का? याबाबत दुसरा गट म्हणतो की चमत्कार वैगेरे काही नाही, ते ब्राम्हण वादाचं षडयंत्र आहे. ते भासमान भ्रमण आहे. असो, ती याबाबत न बोललेलं बरं.
संत रविदास यांच्याबाबत मत मांडत असताना महत्वाचं सांगावंसं वाटतं की संत रविदासांनी जनकल्याणासाठी कार्य केले. समाजात माजलेली दांभीकता दूर केली. त्यातच लोकांना ज्ञानाचा मार्ग सांगीतला. समाजातील पाखंडवाद दूर केला. भेदभाव लक्षात घेवून त्यांंनी सांगीतलं की प्रत्येक माणूस हा जन्मतः समान असून तो उच्चनीचता मानणारा नाही. प्रत्येकाचं हाड, मास, रक्त हे सारखंंच असतांना तो उच्च वा तो कनिष्ठ कसा? प्रत्यक्ष परमेश्वर जन्म देतांना भेदभाव मानत नाही. हवा, आपल्याला हवा देतांना भेदभाव करीत नाही. तसाच झाडं अन्न देतांना भेदभाव करीत नाही. तसंंच पाणी देखील प्रत्येक जीवाचा भेदभाव करीत नाही. प्राणीमात्राही असा भेदभाव करीत नाहीत. गाय दूध देतांंना हा अस्पृश्य वा हा उच्च असा भेदभाव करीत नाही. मग आपण मानवानं भेदभाव का करावा? मानसानंही भेदभाव करु नयेे.
रविदासांनी हेच सांगीतलं लोकांना आपल्या सत्संंगातून. त्यांनी समाजाला जागृत करण्यासाठी सत्संगाचा मार्ग अनुसरला. त्याचा परिणाम की काय, लोकं मोठ्या संख्येनं जागृत होवू लागले. त्यातच रविदासाचे शिष्य बनू लागले. त्यांचा मोठा शिष्यपरीवार आजही अस्तित्वात आहे.
रविदासाचा आज जरी जास्त शिष्य परिवार असला तरी त्यावेळी मोजता येण्यालायक शिष्य होता. त्याच्या शिष्य परिवारात मोठमोठे राजेमहाराजे होते. चितोडची महाराणी झाली ही रविदासाची शिष्या होती. तसंच महाराणा सांगा, महाराणा विक्रमजीत, महाराज नागरमल, शहंशाहा बाबर याशिवाय अनेक राजे रविदासाचे शिष्य होते. त्यातच काही राजांनी त्यांना राजगुरुही बनवलं होतंं. याशिवाय संत पीपा, संत कबीर हे सुद्धा रविदासांना सन्मान देत.
रविदासांनी बालपणापासूनच अस्पृश्यतेच्या झळा शोषल्या. पंडीत वा पुरोहित वर्गानं रविदासांना कसं छळलं याचा इतिहास आपल्याला इतिहास सांगतो. रविदास जगू नये म्हणून धर्ममार्तंंड त्यांची कुरघोडी राजांंना करीत गेले. परंतू धर्ममार्तंडाच्या कुरघोडीनंं रविदासाचंं बरंवाईट झालं नाही. ते त्यांच्याजवळ सखोल ज्ञान होतं. जेेव्हा त्या ज्ञानाच्या भरवशावर ते प्रत्येक कुरघोडीतून तरुण निघाले. कोणी त्याला चमत्कार नाव दिलं. कोणी त्या गोष्टीला ज्ञानवंतांचा शिक्का दिला.
रविदास हे बरेच वर्ष जगले. ती कोणी म्हणतात की ते एकशे सव्वीस है वर्ष जगले तर कोणी एकशे एक्कावन वर्ष जगले असं म्हणतात. त्यानंतर कोणी म्हणतात की रविदास वैकूंठाला गेले तर कोणी म्हणतात की रविदासाची हत्या झाली. कारण त्यांचा मृतदेेह सापडला नाही. फक्त पादत्राणेे सापडली. ती त्या पादत्राणावरुन निष्कर्ष काढला गेेला. त्यानंंतर रविदासप्रेमी लोकांनी जिथं पादत्राणं सापडली होती तिथं रविदासाचं मंदीर बांधलं.
काळाच्या ओघात रविदास गडप झाले. त्यांंना लोकं विससरले होते. परंंतू त्यांचं साहित्य अजरामर ठरलं. तेे साहित्य लोकांनी वाचलं. ते साहित्य मनाला भावलं. पटलं व लोकांंनी निर्णय घेेतला की रविदास हे काही छोटे संंत नाही. त्यांच्यामध्ये मोठी शक्ती आहे.
रविदासांनी जनकल्याणासाठी स्वतःची लिपी तयार केली. कारण पुर्वीची असलेली लिपी वाचनाचा अधिकार धर्ममार्तंंडांना होता. त्या लिपीला वाचन करण्याचा अधिकार ना स्रियांना होता ना अस्पृश्यांना. म्हणून ती लिपी. महत्वाचं म्हणजे रविदासानं जकल्याणकारी कार्य केले. समाजातील भेदभाव, पाखंडवाद दूर केला व समाजात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवले. त्यामुळं ते महान संत ठरलेले दिसतात असं म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. यामुळंच त्यांंना मानवतावाादी संत म्हणतात.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०