Power of Attorney 2 - 5 in Marathi Fiction Stories by Dilip Bhide books and stories PDF | पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ५

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे ) भाग ५

पॉवर ऑफ अटर्नी (पर्व २ रे )

  भाग ५  

भाग ४  वरून पुढे वाचा  ....

रात्री विभावरी म्हणाली “किशोर काय करायचं समजत नाहीये, तू बिहार सोडून दुसरं शहर मागून बघ ना, बिहार म्हंटलं की भीती वाटते.”

“विभावरी, आपण फार सुरक्षित जीवन जगतो आहोत, यात वाद नाही. पण पळपुटेपणा करून कसं चालेल? अग कसंही असलं तरी तिथेही माणसंच राहतात, हे बघ, मी तिथला नाही म्हंटल्यांवर, त्यांच्या कुठल्याही भांडणा मधे मी असणारच नाहीये, तेंव्हा घाबरण्याचं काही कारण नाही. काळजी नको कारूस. तू अमेरिकेत जा, मी बिहारला जातो आईला पुण्यातच ठेवू. जरूर पडली तर पटण्याहून पुण्याला फ्लाइट आहे, मी दोन तासात पुण्याला येऊ शकतो. फक्त तू आईला समजाव, तुझं तिला लवकर पटतं.

दुसऱ्या दिवशी विभावरीने माईंना पटवलं. विभावरीला जायला अजून वेळ होता. किशोर आधी दरभंगा येथे जाऊन काय परिस्थिती आहे हे बघून, घर वगैरे घेऊन मग माईंना घेऊन जाणार होता. पण तसंही माईंनी पुण्यात राहणं सोईचं आहे, हे त्यांना सुशीलाबाईंनी पटवून दिलं होतं. चांगला शेजार असल्याने त्या एकट्या पडणार नाहीत, हे त्यांना सुशीलाबाईंनी लक्षात आणून दिल. मग माईंनी सुद्धा त्यांच्या बरोबर विचार विनिमय झाल्यावर, ठरवलं की त्या पुण्यालाच राहतील, जर एकटं वाटलं तर मग किशोरकडे जाण्याचं ठरवतील.

किशोर आणि विभावरीच्या मार्गातला एक तिढा सुटला होता. दोन दिवसांनंतर किशोर दरभंगा येथे जायला निघाला. विभावरीची फायनल ऑर्डर यायची होती, त्यामुळे काही दिवस तरी माईंना एकटं वाटणार नव्हतं. साधारण महिन्या भराने विभावरी अमेरिके साठी प्रस्थान ठेवती झाली.

किशोरने CAIIB ची परीक्षा पास केली असल्याने त्याची  डायरेक्ट ब्रँच मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली होती. आता खरी किशोरची परीक्षा होती. नवीन जबाबदारी, गाइड करायला कोणी नाही, शाखा नवीन, प्रदेश नवीन, आणि लोकंही नवीन. आपली बुद्धिमत्ता आणि लॉजिक वापरून सर्व कामं करावी लागणार होती. हळू हळू त्याने सर्वात प्रथम स्टाफ चा विश्वास संपादन केला, त्यांच्या स्टाफ मधे एक अकाऊंटंट, एक कॅशियर एक चपराशी आणि सहा कारकून होते, सातवा, सर्व कामात निपुण होता, तो जरूरी प्रमाणे त्या त्या जागेवर बसायचा किंवा सर्वांना मदत करायचा. जेंव्हा रेमिटन्स यायचं त्या वेळेस किंवा, जर एखाद्या दिवशी खूप कॅश जमा झाली असेल तर ती मोजण्या साठी हाच सातवा माणूस बसायचा. कॅशची खोली म्हणजे चारी बाजूंनी मजबूत जाळी लावलेला एक पिंजरांच होता. त्यांचे दोन भाग होते. एक समोरचा भाग, म्हणजे कॅश काऊंटर, जिथे रोज कॅशियर बसायचा, आणि मागच्या बाजूला, दूसरा भाग, जिथे जास्तीची कॅश आली तर तिथे मोजली जायची. त्या वेळेस हा सातवा माणूस तिथे बसायचा.

किशोर रोज निरनिराळी वर्तमान पत्र वाचत असल्याने त्याचं ज्ञान अद्ययावत होतं परत त्याचा मृदु आणि मनमोकळा  स्वभाव, स्टाफ आणि ग्राहकांना सुद्धा आवडला. त्यामुळे जवळ जवळ वर्ष भरातच तो लोकांमध्ये लोकप्रिय झाला. बँकेची काही NPA खाती होती ती त्याने बऱ्याच अंशी व्यवस्थित करून घेतली. त्यांच्या गोड बोलण्याने बरीच जुनी खाती पुन्हा बँकेत वापस आणण्यात त्याला चांगलं यश मिळालं. साहेब लोकं त्यांच्यावर नजर ठेवून होते, त्यांनी पण त्यांच्या कामाची प्रशंसा केली. किशोर त्यामुळे खुश होता.

पांच पुरुष आणि दोन महिला असा कारकुनाचा स्टाफ होता. पुरुषांपैकी तिघं विवाहित होते आणि दोन अविवाहित, दोघी बायका विवाहित होत्या, पण त्यापैकी एक माधवी नावाची महिला विधवा होती. तिचा नवरा सैन्यात होता, काश्मीर मधे अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत त्याला वीर गती प्राप्त झाली. सरकार ने  त्याचा सन्मान करून त्याच्या बायकोला एक प्लॉट आणि बँकेत नोकरी दिली. प्लॉट वर घर बांधून ती आपल्या सासू बरोबर राहत होती. गव्हाळ रंगाची आणि तरतरीत चेहऱ्याची माधवी सगळ्यांशी मिळून मिसळून वागायची. तिच्या नवऱ्याने जे शौर्य दाखवलं होतं त्यांची सर्वांनाच जाण होती आणि तिच्याबद्दल आदरच सर्व लोकांमध्ये दिसून येत होता.

जवळ जवळ रोज रात्री त्याचं आणि माईंचं बोलणं होत होतं. माई पण आता रूळल्या होत्या. विभावरीशी दर शनिवारी बोलणं व्हायचं. अश्या रीतीने सर्व सुरळीत चाललं होतं.

अशातच एक दिवस सकाळी तो प्रकार घडला. त्या दिवशी बँकेत गर्दी कमी होती, जेमतेम २० एक ग्राहक बँकेत असतील, स्टाफ मधले १० लोकं आणि किशोर एवढेच लोकं बँकेत होते, नेहमीची कामं सुरळीत चालू होती, इतक्यात कमांडोचा  ड्रेस असलेले चार जण बँकेत शिरले. अंगावर मिलिटरी चा ड्रेस असल्याने, कोणी फार लक्ष दिलं नाही, पण नंतर त्यांनी जे काही केलं त्यामुळे लोकं घाबरले. एक जण कॅशियर च्या काऊंटर  कडे गेला, एक जण जनरल काऊंटर ओलांडून मागे गेला, एक जण दारा जवळ उभा राहिला आणे एक जण किशोरच्या केबिन मधे गेला.

“सब लोग बेंच पर बैठ जाईए, कोईभी हरकत करने की कोशिश की तो गोली चल जाएगी.” त्यांच्या पैकी जो दाराजवळ उभा होता, त्याने पिस्तूल  काढून जोरात ओरडून धमकी दिली आणि बँकेचं  दार लाऊन टाकलं. आत्ता पर्यन्त कॅश काऊंटर वर असलेल्या माणसांनी पिस्तूल काढलं होतं, तो कॅशियरला धमकावत होता. आणि बाकीच्या दोघा जणांनी सुरे  काढून ते पण लोकांना धमकावत होते.

बँकेतलं वातावरण एकदम बदललं होतं. सर्व बाहेरची ग्राहक मंडळी, काऊंटर सोडून भिंती पाशी ठेवलेल्या बाकांवर जाऊन बसली. काय करावं हे कोणालाच कळत नव्हतं. कॅशियरने पैसे द्यायला नकार दिला. त्यांची केबिन बंदिस्त होती. तो काऊंटरच्या खाली लपला. आता तो पिस्तुलाच्या रेंज च्या बाहेर होता. कॅशची केबिन थोडी मोठी होती. त्यांचे दोन बंदिस्त भाग होते, एक काऊंटर साठी आणि दुसरी मधे, जास्तीची रक्कम आल्यावर ते मोजण्यासाठी एक माणूस बसायचा. आता नकार मिळाल्यावर पिस्तूल धारी बादमांश चिडला. त्याची नजर कॅशच्या कॅबिनच्या आतल्या खोलीवर पडली. आत मधे जो माणूस बसला होता त्याला लपायला जागाच नव्हती. बदमाशाने त्याला धमकावले “दरवाजा खोल, तुझे  कुछ नहीं होगा, नहीं तो मैं तेरी खोपड़ी मे गोली दाग दूंगा.” किशोर हे सगळं आपल्या केबिन मधून पाहत होता, त्याच्या मानेवर सुरा ठेवून एक बदमाश उभा होता, त्यामुळे तो काहीच हालचाल करू शकत नव्हता. तेवढ्यात, त्याची आणि कॅशियरची नजरानजर झाली, किशोरने त्याला टेबला खाली असलेले सायरन चं बटन दाब अशी खूण केली. कॅशियरला आता कळलं होतं की काऊंटरच्या खाली तो सुरक्षित आहे म्हणून. तो जरा सावरला होता. त्याने बटन दाबले.

काहीच झालं नाही. सायरन बिघडला होता, वाजलाच नाही. पण त्यामुळे परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. बदमाशाने आतल्या माणसाला पुन्हा धमकावलं. आतला माणूस विचार करत होता, त्याने बदमाशाकडे पाहून मान हलवली आणि उठला. त्यानी एक चतुराई केली, बाहेरचा दरवाजा न उघडता, दोन्ही कॅश काऊंटरच्या मधला दरवाजा उघडला आणि जवळ जवळ झेप घेऊनच काऊंटरच्या  खाली आपल्या सहकाऱ्या जवळ सुरक्षित जागी जाऊन बसला. कॅश काऊंटर समोर जो बदमाश उभा होता त्याला आता काय करावं हेच कळत नव्हतं. आता जो दूसरा साथीदार होता तो हे सगळं पाहत होता, त्यांनी जोरात ओरडून त्याला सांगीतलं की काऊंटरच्या  खालचा भाग लाकडी आहे. त्यावर पिस्तुलाच्या गोळ्या झाड म्हणजे ते तुटेल. पण त्याचं हे बोलणं ऐकल्यावर किशोरच्या केबिन मधे जो त्यांचा मुख्य साथीदार  होता, तो धावत बाहेर आला आणि त्यांनी दोघांनाही झापलं. “कुछ भी ऐसा मत करो, जिससे आवाज बाहर जाएगी। तुम चुप बैठो, मैं देखता हूँ.”

त्या मुखिया ने बँके वरून नजर फिरवली आणि त्यांच्या लक्षात आलं की काही तरी वेगळं करायला पाहिजे. त्यांची नजर माधवी वर पडली, आणि त्याने तिला तिचे केस धरून  खेचलं. केसांना बसलेला तो झटका इतका जबरदस्त होता की माधवी कळवळली आणि जोरात किंचाळली. आपल्या साथीदारांकडे बघून तो मोठ्या आवाजात म्हणाला, “अरे सुनो, ये लड़कीकोही लेके चलते हैं, पहिले मजा करेंगे और फिर इसको बेच देंगे, कमसे कम १० लाख तो सेठ आरामसे देगा” बाकीच्या तिघा जणांनाही ती कल्पना एकदमच पटली. माधवी आता जिवाच्या आकांताने किंचाळत होती आणि त्या बदमाशाच्या हातून सुटण्याची केविलवाणी धडपड करत होती.

 

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

कथा आवडली असेल तर जरूर लाइक करा.

धन्यवाद.