Kimiyagaar - 27 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 27

Featured Books
Categories
Share

किमयागार - 27

किमयागार -विहिर - Girish
दुसऱ्या दिवशी तरुण परत विहिरीकडे गेला . त्याला खात्री होती की फातिमा भेटेल.
तेथे त्याला इंग्रज बसलेला दिसला.
त्याला आश्चर्य वाटले.
तरुणाकडे बघून इंग्रज म्हणाला, मी दिवसभर वाट पाहिली पण किमयागार मला आकाशात चांदण्या दिसू लागल्या तेव्हा भेटला.
मी त्याला सांगितले मी तुम्हालाच शोधत इथे आलों आहे.
किमयागाराने विचारले ' तू यापूर्वी कधी कोणत्या धातूचे सोने केले आहेस का?'.
मी म्हणालो तेच तर शिकण्यासाठी मी आलोय. तो म्हणाला, मग तू तसा प्रयत्न केला पाहिजे.
जा ! प्रयत्न कर.
तरुण क्षणभर काहीच बोलला नाही. बिचारा इंग्रज इतक्या दूरवर आलाय आणि त्याला सांगितले जातेय की तू इतके दिवस जे केलेस तेच कर . मग तो म्हणाला,
' मग करा प्रयत्न '.
इंग्रज म्हणाला, हो मी आता तेच करणार आहे. मी लगेच सुरवात करणार आहे आणि तो तिथून गेला.
आणि फातिमा विहिरीकडे घागर घेऊन आली. तिने पाणी भरल्यावर तो तिच्या जवळ गेला
व म्हणाला ' मला तुला सांगायचे आहे की, माझे तुझ्यावर प्रेम आहे व मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो.'
हे ऐकताच फातिमा घाबरली,
तिच्या हातातील घागर पडली व सर्वत्र पाणी सांडले .
मी इथे रोज तुझी वाट पाहीन. मी हे वाळवंट पार करून पिऱ्यामिडजवळ असणाऱ्या खजिन्याच्या शोधात आलो आहे.
हे युद्ध मला शाप वाटले होते, कारण माझ्या शोधात हा अडसर ठरणार आहे, पण आता ते मला वरदानच वाटत आहे कारण आपली भेट ही माझ्या जीवनातील सर्वात आनंददायी घटना‌ आहे.
किमयागार -ओॲसिस मधील दिवस. - Girish
फातिमा म्हणाली, युद्ध कांही दिवसांत थांबेल. तरुण खजुराच्या झाडाकडे बघत विचार करीत होता.
त्याच्या मनात आले आपण मेंढपाळ होतो व परत मेंढपाळ बनू शकतो.‌ खजिन्यापेक्षा फातिमा महत्वाची आहे.
फातिमा म्हणाली, 'आमच्या समाजातील तरुण पण खजिन्याच्या शोधात असतात'.
आणि सॅंटिॲगोच्या मनात काय विचार चालू आहेत हे ओळखल्यासारखे ती म्हणाली, वाळवंटातील तरुणींना त्यांच्या समाजातील तरुणांचा अभिमान असतो.
तिने कळशी भरली व तिथून निघून गेली.
तरूण फातिमाला भेटण्यासाठी रोज विहिरीजवळ जाऊ लागला.
फातिमाला तो मेंढपाळ असतानाच्या आठवणी सांगत असे. तसेच म्हातारा राजा व क्रिस्टल दुकानातील आठवणी सांगत असे.
ते दोघे आता मित्र बनले होते. तिच्याबरोबर असतांनाची पंधरा मिनिटे सोडली तर बाकीचा दिवस त्याला कंटाळवाणा वाटे.
ओॲसिसवर येऊन आता जवळपास महिना झाला होता.
एक दिवस सकाळी तांडा नेत्याने सर्व प्रवाशांना एकत्र बोलावले.
तो म्हणाला, युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे आपण पुढील प्रवास करू शकत नाही. युद्ध काही वेळा बरेच दिवस चालू राहू शकते.
दोन्ही सैन्ये ( दोन्ही बाजुचे लोक) तुल्यबळ आहेत. हे युद्ध त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हे सज्जन विरुद्ध दुर्जन असे युद्ध आहे. दोन वेगळ्या विचारांनी प्रेरित अशा ताकदवान समाजामध्ये सत्तेसाठी संघर्ष चालू आहे आणि अशा प्रकारचे युद्ध बरेच दिवस चालू राहू शकते.
लोक आपापल्या राहण्याच्या ठिकाणी गेले. तरुण दुपारी फातिमाला भेटण्यासाठी गेला. त्याने तिला सकाळी झालेल्या घटनेबद्दल सांगितले.
फातिमा म्हणाली, आपली भेट झाल्यावर तू लगेचच तुझे माझ्यावर प्रेम आहे असे सांगितलेस. त्यानंतर तू मला वैश्विक भाषा व जगाचा आत्मा याबाबत सांगितलेस. मी आता तुझ्या जिवनाचा भाग झाले आहे.
तिचे बोलणे ऐकताना तरुणाला असे वाटत होते की, खजुराच्या झाडांमधील वाऱ्याच्या आवाजापेक्षा हा आवाज अत्यंत मोहक आहे.
किमयागार -फातिमा
मला वाटते की या वाळवंटातील ओॲसिसवर मी तुझीच वाट पाहत होते.
मी माझा भुतकाळ विसरले आहे. माझ्या परंपरा विसरले आहे. वाळवंटातील स्त्रीयांनी कसे वागावे याबाबतच्या इथल्या पुरुषांच्या कल्पना ( मते ) काय आहेत त्यापण मला महत्वाच्या वाटतं नाहीएत.
लहानपणापासून मला वाटतं असे की हे वाळवंट मला एक उपहार देणार आहे आता मला वाटतेय की तो उपहार आता माझ्या समोर आहे, तो उपहार तूंच आहेस.
त्याला वाटले की, तिचे हात हातात घ्यावे पण तिचे हात कळशीवर होते.
तू मला तुझ्या स्वप्नाबद्दल सांगितलेस. म्हातारा राजा व खजिन्याविषयी सांगितलेस आणि शकुनांबद्दल व भाग्य शोधण्याविषयी सांगितलेस.
त्यामुळे आता मला कसलीही भीती वाटत नाही कारण तू माझ्यापर्यंत येणे हा शकुनांचा आणि माझ्या भाग्याचा एक भाग आहे.
मी आता तुझ्या स्वप्नांची किंवा तू म्हणतोस तसे तुझ्या नियतीची एक भागीदार आहे.