angha in Marathi Classic Stories by Akshata alias shubhadaTirodkar books and stories PDF | अनघा

Featured Books
Categories
Share

अनघा

दुपारची ती वेळ अनघा आपल्या खोलीत एकटीच बडबडत होती "देवा मला असा जोडीदार मिळू दे जो श्रीमंत नसला तरी चालेल पण दोन घास सुखाचे आणि आपुलकीचे देणारा असावा आणि माझी साथ कायम देणारा असावा" एवढ्यात अनघाच्या आईने अनघाला आवाज देत तिच्या खोलीत प्रवेश केला  

"अनघा तयारी कर संध्यकाळी जायचं आहे ना आपल्याला "

"कंटाळा आलाय आई मला ह्या बघण्याच्या कार्यक्रमाचा "

"असं बोलू कसे चालेल बेटा स्थळ हि पाहावीच लागतात पटलं तर नाहीतर सोडून द्यायचं सोयरीक जुळूवन लग्न केल्यावर असेच असते पटलं तर पुढे जावे नाहीतर नकार दयावा "

"तरी पण आई मला हे सर्व  नाही आवडत "

"बाळा प्रत्येक सोयरीक लग्न असेच जमते त्यात तू काही नवीन नाही करत चल तयारी कर "

अनघाला खूप स्थळ आलेली पण काहींची वय जास्त तर काहींची  कुंडली जमत नव्हती काहींची नोकरी स्थिर नव्हती कधी इथून नकार तर कधी तिथून नकार आणि हे सर्व अनघाला असहाय  जात होत आणि त्यात आणखी एक नवीन स्थळ तरी पण आई बाबांच्या मनाखातीर ती तयार झाली अनघा च्या कुटूंबात अनघा तिचा भाऊ आई वडील आणि आजी

संध्याकाळची वेळ बागेत बघण्याचा कार्यक्रम होता अनघा आपल्या आई बाबासह तिथे पोहोचली   मुलाकडून मुलाचे आई बाबा  आणि सोयरीक जुळवणारा माणूस सोयरीक जुळवण्याऱ्याने ओळख करून दिली तसे गप्पा गोष्टी सुरु झाल्या मुलाची आई च बोलत होती बाबा गप्प च होते नवरा मुलगा हि गप्पच होता गप्पा गोष्ठी चालू होत्या आणि मध्येच सोयरीक जुळणारा माणूस म्हणाला त्यांना बोलू द्या तसे अनघा आणि तो मुलगा जरा बाजूला केले तो गप्प आहे हे पाहून अनघानेच त्याला विचारले 

"तुमचे काम कसे चालले ?

त्यावर मग थोडे बोलणे झाले त्याचे ते अलगद हसणे अनघाच्या मनावर कोरले मुलगा तसा हुशार होता उच्च पदावर कंपनीत कामाला होता पण थोडा रंगाने काळा होता 

ते दोघे बोलून परतले  आणि  सगळ्यांनी उत्तराची प्रतीक्षा करत निरोप घेतला अनघाच्या बाबानी आम्ही कळवू असे सांगून तिथून रजा घेतली घरी आल्यावर काहीही न विचारता रात्रीच्या जेवणानंतर आई बाबानी अनघाला समोर बसवले आणि प्रश्न पुढे केला 

"अनघा बाळा काय ठरवलास मुलगा पसंद पडला ना तुला ?"

अनघा जरा गप्पच राहिली हे पाहून आई म्हणाली "हे बघ अनघा तुला पटलं तरच आम्ही पुढे जाऊ तुच्या मनाविरद्ध आम्ही काहीही करणार नाही "

तेव्हड्यात अनघाच्या बाबाचा फोन वाजला फोन नवऱ्या मुलाकडून होता होकार कळवण्यासाठी बाबानी आपण कळवू असे सांगून फोन ठेवला अनघा आणि तिच्या आईला निरोप समजला आणि त्या एकमेकांकडे पाहू लागल्या 

आईने अनघाला सांगितले "तू विचार कर आपण दोन दिवसांनी  सांगू हो की नाही ""

ती रात्र अनघा साठी कसोटीची रात्र होती ती चारही बाजूनी विचार करू लागली ह्या स्थळाला नाही म्हटले तर परत तो बघण्याचा कार्यक्रम नवरा मुलगा दिसण्यास एव्हडा खास नसला तरी चेहऱ्यावरून साधा सरळ प्रेमळ वाटत  होता आणि त्याचे ते हसणे एखाद्या धबधब्यासारखे अनघाच्या मनाला भिजवून केले होते  नोकरी हि चांगली होती सर्व निर्णय आई बाबांनी अनघा वर सोडला होता त्यामुळे काय करावे हे तिला सुचत नव्हते गणपती बाप्पा वर अनघाची खूप श्रद्धा गणपती बाप्पाला तिने मनोमन प्रार्थना केली हे गणपती बाप्पा मला सुख शांती आणि समाधान जर ह्या स्थळातून मिळत असेल तर हि सोयरीक जुळू दे "

दुसऱ्या दिवशी ची सकाळ उजाडली अनघा तयारी करून ऑफिस ला निघाली तिच्या चेहऱ्यावरचे भाव आईला कळले पण ती काही बोलली नाही ऑफिस मध्ये अनघाचे मन लागेना तरीही ऑफिस सुटेपर्यत तिनी वेळ मारून काढला आणि संध्यकाळी घरी परतली ती काहीही न बोलता सरळ आपल्या खोलीत गेली आणि २० मिनिटे होऊन गेली तरी आली नाही नेहमी ऑफिस मधून आली कि चहा घेत आई बरोबर गप्पा मारणे तर तिचा नित्यनियम होता पण अजून आली नाही म्हणून आई ने चहा चा कप घेतला आणि तिच्या खोलीच्या दिशेने गेली" अनघा हे काय आज तू बाहेर आली नाहीस काय झालं बाळा ?

"काही नाही "

"घे हा चहा पी काय झालं बाळ तुला जर स्थळ पसंद नसेल तर सांगून टाक "

"नाही आई तसे नाही "

"मग उदास का आहेस हे बघ लग्नाचा निर्णय हा विचार करून घ्याला हवा अखे आयुष्य त्यावर अवलंबून असते  आपला होणारा साथीदार मनाने चांगला असायला हवा त्याची साथ असेल तर आयुष्यात सुखच सुख तो नवरा मुलगा  जरा दिसायला चांगला नाही पण स्वभावाने चांगला वाटला आज काही रंग रूपाने राजकुमार असतात पण रात्री दारू पिऊन धिगाणा घालतात त्या समोरच्या मीराचं पाहिलं ना गोरा गोमटा राजकुमार सारखा नवरा पण दारूचे व्यसन पण काहीही झाले तरी निर्णय तूच घेणार आमची काहीही जबरदस्ती नाही तुझा सुखी संसारच आम्हला पाहायचा आहे आणि तो हि तुझ्या आवडीच्या मुलाशीच "

असे सांगून आई गेली खरी पण अनघा ला आणखी चिंता पडली पाहायला गेलं तर खरंच होत त्याच्या शेजारची मीरा तिचा नवरा राजकुमार सारखा दिसणारा पण लग्नानंतर कळले कि तो एक नंबरचा दारुडा हे सर्व पाहून अनघाला काय करू हो म्हणू कि नको हेच कळत नव्हते 

दुसऱ्या दिवशी सांगितल्या प्रमाणे दोन दिवस झाले होते बाबांनी अनघाला विचारले 

"बाळा त्याला दिलेली वेळ संपत आली आहे काय हो कि नाही आपण सांगून टाकू उगीच बांधून ठेवल्या सारखे नको "

अनघा ने आई बाबा कडे पहिले आणि" माझा होकार आहे "असे कळवले 

आई बाबा नि तिला परत विचारले "परत विचार कर" 

"नाही बाबा माझा होकार कळवा "

आई बाबा दोघेही खुश झाले 

अनघाने गणपती बाप्पाला मनोमन हात जोडले 

सोयरीक तर जुळली आता पुढे काय अनघाच्या मनावर त्या नवऱ्या मुलाचे हसणे कायमचे कोरले जाईल का ?

अनघाचा होकार कळताच बाबानी नवऱ्या मुलाच्या घरी होकार कळवला तसे अनघाच्या नातेवाईकांनकडे  अनघाचे लग्न ठरल्याची बातमी पसरली नातेवाईकांना नवरा मुलग्याला पाहण्याची इच्छा झाली तसे अनघाच्या आईने  फोटो दाखवला काहीही नि नाके मुरडत अनघाला म्हण्टले "काय गं अनघा तू दिसायला एव्हडी चांगली आणि ह्याला कसे पास केलेस जोडा तरी शोभायला हवा कि नाही हे ऐकून अनघा जरा बावरली पण आई त्यावर उत्तर दिले "देवाचा देव काळा असतो मन स्वच्छ असले पाहिजे "

ह्यात अनघाची आजारी आजी चे निधन झाले आणि बोलणी लांबवणीवर पडली त्यात सुद्धा काहींनी अनघाला सूचीत केले "अनघा असे काही होणे म्हणजे तुझ्या आजीला पण हे स्थळ नको "पण अनघाने त्याचे म्हणणे कानावर घेतले नाही कारण तिनी नवऱ्या मुलाचा फोटो आजीला दाखवला होता आणि आजीने हि मुलगा चेहऱ्यावरून सोज्वळ दिसतो असे सांगितले होते आजीच्या महिन्यानंतर बोलणी ठरली लग्नाची बोलणी करून आल्यावर  नातेवाईक पैकी काहींची ह्या स्थळाला नकार होता त्यांनी अनघाला सावध करत म्हटले "अनघा सासूबाई जरा कडक वाटतात सांभाळून रहा " मुलगा चांगला आहे फक्त रुपाला पाहून नाही म्हणे हे योग्य नसल्याने अनघाचे त्या सगळ्यांना योग्य उत्तर दिले

असेच दिवस जात होते लग्न दोन महिन्यांनी होणार होते अनघाला आपल्या साथीदाराला सौरभ ला जाणून घ्याचे होते म्हणून तिनी फेसबुक वरून त्याच्या नंबर शोधला आणि व्हाट्सअँप ला मॅसेज केला पण त्याचे काही उत्तर आले नाही असेच गुड मॉर्निंग पासून गुड नाईट मेसेज ती पाठवू लागली पण त्याच्या रिप्लाय कधीही येऊ लागला आता मात्र अनघाला राग येऊ लागला तिला त्याच्याशी बोलायचे होते पण ते कधी साध्य झाले नाही तिनी हि गोष्ट आईला सांगितली तर आई तिला समजावत म्हणाली  "अंग तो कामात असेल आणि त्याच्या आईने वगैरे सांगितले असेल लग्नपहिली बोलू नकोस म्हणून "

ह्यावर चिडून अनघा म्हणाली "आई काळ कुठे केला आहे बोलायला काय जात बोलल्यावरच  एकमेकांना आम्ही समजू शकतो ना "

"हो बाळा लग्नानंतर  बोल ना काहींचा स्वभाव असतो लाजाळू "असे म्हणुन आईने अनघाची समजूत काढली तशी अनघा शांत झाली आणि आपल्या भावी आयुष्यविषयी स्वप्न रंगवू लागली दोन महिने तयारीत असेच गेले 

लग्नच्या दोन दिवस पहिली साखरपुडा होता आज त्याच्याबरोबर बोलायचे  असे अनघाने ठरवले पण तसे  काही झाले नाही आणि दोन दिवसात हळद होऊन लग्न हि पार पडले सप्तपदीच्या बंधनात अनघा आणि सौरभ अडकले सौरभच्या नावाचे मंगळसूत्र अनघाच्या गळ्यात शोभून दिसत होते तिला सौभाग्यवती झाल्याच्या आनंद झाला होता पाठवणी वेळी आई बाबा चे डोळे पाणावले अनघा हि आई बाबा पासून दूर होण्याचे दुःख व्यक्त करत होती  होती तो दिवस पार पडला

पाहुणे मंडळी घरात असल्याने तिला त्याच्याशी मनमोकळेपणे बोलता आले नव्हते  दुसऱ्या दिवशी देव दर्शन झाले पाच दिवसांनी घरातले पाहुणे मंडळी हि  गेली आता घरात फक्त सौरभ आणि त्याचे आई बाबा लग्न झाल्यापासून सौरभ अनघाशी मनमोकळे पणाने बोलला नव्हता म्हणून आज अनघा ने ठरवले आपणच बोलावे संध्यकाळची वेळ होती सौरभ आपल्या लॅपटॉप वर  रूम मध्ये काही करत बसला होता अनघा त्याच्या शेजारी येऊन बसली त्याने सौरभ ला पहिले तर सौरभला तिचे तिथे येणे हि जाणवले नव्हते म्हणून तिनेच विचारले 

"काय करतोस "?

"काही नाही जरा काम आहे"

"पण तू सुट्टीवर  आहेस ना "?

"लग्नच्या सुटीत काही कामे राहिली ती जॉईन होण्याआधी पुरी करायला हवी "

"बरं सौरभ  एक विचारू का ?

"विचार "

"मी तुझ्या आयुष्यात आल्यानंतर तुला कसे वाटते "

"काही नाही "

"नाही म्हणजे पहिली तू एकटा होतास आता मी सोबत "

"तसे हो आपण सोबत राहणार आहोत खरं सांगू का मला लग्न करायचं नव्हतं पण आई कुठे ऐकणार "

"हो का मग आता तर तू लग्न केलस मग "

"तेच ना" 

"पण तुला लग्न का नाही करायचं  होत "?

"नको नको त्या बायकांच्या अटी आणि ती भांडणे "

"पण आपले नाते तसे नसणार   आपण मैत्री चे नाते निर्माण करू या मग बघ आपले वैवाहिक जीवन हि सुखकर होईल सौरभ मी ऐकलंय कि इथे फळ्यांचे ताजे आईस क्रीम मिळते जाऊ या खायला कालपर्यत पाहुणे होते म्हणून गप्प राहिले आज आपणच आहोत "

हे ऐकताच सौरभ ने अनघाला प्रश्न केला "तू हे आईला सांगितलंस "?

"नाही का "?

"आई ने परवानगी दिल्याशिवाय मी कुठे हि जात नाही "

"पण ह्यात परवानगी कसली आपण इथेच तर जात आहोत आणि नवीन जोडपी बाहेर जाणार ह्यात आई नाही म्हणार नाही तू तयार हो आपण निघताना सांगू ना "

"नाही आई ने सांगितल्याशिवाय मी कुठे जात नाही पहिली तू परवानगी घे मग जाऊ "

"परवानगी मी घेऊ "?

"हो "

"पण सौरभ त्या तुझ्या आई आहेत तू सांग ना मी सांगितलं तर बरं नाही वाटणार "

"नाही मी नाही तूच सांग "

सौरभ चे  हे बोलणे ऐकून" राहू दे तर सौरभ "असे म्हणून अनघा बाहेर गेली  एवढ्यात सौरभ ची आई सौरभला हाका मारत आली "अरे सौरभ जरा सुधा मावशी कडे जाऊन येऊ या   "

सौरभ ने लगेच "हो "म्हटले आणि लगेच तयार झाला हे पाहून अनघाला वाईट वाटले ती दोघे बाहेर पडली तेव्हा सौरभ च्या सासू ने सांगितले अनघा तुझे कपडे कपाटात व्यवस्तीत लाव आम्ही येतो अनघाने सौरभ कडे पहिले पण सौरभ ने तिला न पाहता चालत राहिला तिच्या डोळ्यातून अलगद अश्रू गळले ते अनघाच्या सासऱ्याने पहिले त्याने विचारले "काय झालं बाळ तुला कुठे बाहेर जायचं होत "?

"नाही बाबा "

"मग डोळ्यात पाणी  "?

"नाही बाबा सहज "

"माहित आहे मला "

"म्हणजे बाबा "?

"माझ्या कानावर तुमचे मघाशचे बोलणे पडले त्याचे ते उत्तर ऐकून मला एव्हडा राग आला वाटले आत येऊन त्याचे कान धरावे पण मग जाणीव झाली कि तो आता लग्न झाला आहे  नवरा बायकोच्या बोलण्यात आपण पडणे बरे नव्हे "

"नाही बाबा जाऊ दे मला राग नाही आला "

"अनघा मला सर्व माहित आहे आणि ह्याची तुला सवय करावी लागेल"

"म्हणजे बाबा " 

"घरात कोणीच नाही आणि आज मला तुला हे सांगणे योग्य वाटते प्रत्येक मुलगी लग्न ठरल्यानंतर आपल्या सासू बाई कश्या असतील वाईट तर नसतील ना ह्यावर विचार करतात सगळ्याच सासवा वाईट नसतात काही सासू आपल्या सुनेला मुली प्रमाणे वागवतात सासू सुनेचे नाते हे नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्यावर घराचा पाया असतो माझी आई तर तुझ्या सासूला मुलगी मानायची लग्न माझे लग्न ठरताच  माझी आई ने मला एवढेच सांगितलेले तुझ्या साठी एक मुलगी आपले सर्वस्व सोडून येणार आहे तिच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देऊ नकोस आणि तो शब्द आज पर्यंत पाळला म्हणून तू पहिले अशील तुझी सासू बोलताना मी काहीही बोलत नाही  आणि त्याचे परिणाम ती मुजोर झाली आहे "

"नाही बाबा असे नाही आई खूप चांगल्या आहेत "

तुझ्या पासून काय लपवायचं तुझ्या सासूबाईंना मी  चांगला  ओळखतो सौरभ आमचा एकुलता एक मुलगा त्यामुळे तिचे  त्याच्यावर जरा जास्तच प्रेम तो कुठे जाणार कि नाही हे तीच ठरवते आणि तो हि तिच्या परवनगी शिवाय कुठे हि जात नाही असेच म्हण कि तो आपल्या आई शिवाय अपूर्ण आहे "

"काय "?

"हो बाळा आता तरी त्याच्यावर चा तिनी अधिकार कमी करावा असा वाटतो माझ्या आई प्रमाणे चांगले बाळकडू सौरभला पाजावे अशी अपेक्षा होती पण नाही पण तू काळजी करू नकोस "हे ऐकताच अनघाला काय करावे सुचत नव्हते तिचे मन बधिर झाले तरी तिनी स्वतःला सावरले 

अर्ध्या तासांनी  सौरभ आणि तिची आई परतली अनघाने चहा केला आणि सगळ्यांना दिला अनघाचा मूड काही ठीक नव्हता ती गप्पच होती रात्रीचे जेवण झाले सगळे आटोपून ती  अनघा रूम मध्ये आली सौरभ लॅपटॉप मध्ये डोके घुपसून बसला होता अनघा ने त्याला काहीही न विचारता गप्प झोपून गेली तिला वाटत होत कि सौरभ तिचा राग दुर करेल पण तसे काही झाले नाही 

दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ आपल्या कामावर रुजू  होणार होता आणि अनघा ने हि ह्या शहरात नवीन नॊकरी शोधली होती सकाळी ती सगळे आटपून तयार झाली आणि सौरभ चे कपडे काढून ठेवण्यासाठी तिने सौरभ चे कपाट उघडले तर सौरभ ची आई त्याच्या रूम मध्ये आली 

"थांब मी देते त्याला कपडे मला त्याची आवड माहित आहे "

आणि त्यांनी दिलेले कपडे सौरभ ने घातले तिनी त्याच्याकडे एकटक पहिले तर कपड्याचा रंग मिळताजुळता नव्हता पण ती काहीही  बोलली नाही 

तिच्या कानात सौरभच्या वडिलांचे शब्द घुमत होते "आई शिवाय सौरभ अपूर्ण आहे "काय होईल कसा करेल अनघा अश्या मुलाबरोबर संसार ?

असेच लग्नाचे १५ दिवस ओसरले  बाहेर जाताना  सौरभ ची आई सौरभला कपडे द्याची तो घालून जायचा एक दिवस अनघाने त्याला या बदल जाप विचारला तर त्याने सांगितले "हे बघ ती माझी आई आहे ती जे काही करते तिला मी नाकारू तिचे मन दुखवू शकत नाही  "

त्यानंतर अनघाने त्याला विचारणे सोडले अनघा माहेरी आली पण आई बाबांना आपण खुश आहोत हेच दाखवले त्या तिच्या आठ दिवसात सौरभ ने तिला एकदा हि फोन केला नाही अनघा मात्र त्याला फोन करायची पण तो थोडंच बोलायचा आणि ठेवून द्यायचा कधी कधी मी कामात आहे म्हणून कट करायचा  त्यामुळे ती आणखी दुखावली अनघा जेव्हा घरी परतली तेव्हा तिने हे सौरभला विचारले तर सौरभ ने हसत हसत म्हटले "अगं तू तुझ्या आई कडे गेली होतीस ना मग उगीच कशाला तुला डिस्टर्ब म्हणून नाही केला"

"अरे पण नवरा म्हणून तुला माझी आठवण आली नाही आई पण विचारत होती सौरभ ने फोन केला कि नाही मी उगाच हो म्हण्याची असे म्हणून अनघाच्या डोळ्यातून पाणी आले ते पाहून सौरभ चा चेहरा जरा बदला तो भावुक होत म्हणला "अनघा सॉरी मी तुला फोन नाही केला  आम्ही घरात तीनच माणसं असल्यनाने मला बोलायला पण जास्त आवडत नाही "

त्याच्या तो भावुक चेहेरा पाहून अनघा पण भावुक झाली "इट्स ओके  सौरभ तू आहेस तसा मला आवडतोस आणि तो दिवस संपला त्या  दिवसा नंतर सौरभ आपल्या साठी बदलेले असे वाटले पण तसे काही झाले नाही

दररोज सकाळी ते बरोबर जात पण संध्यकाळी मात्र सौरभ लवकर येई  आणि १०-१५मिनिटांनी अनघा येई असे हे त्याचे काही शेजारी सतत पाहत होते त्यातला एका शेजाऱ्यांनी विचारले "अनघा सौरभ बरोबर येत जा १५ मिनिटे राहिला तर कुठे बिघडत "अनघाने ते हसत हसत घेतले घरी आल्यावर तिनी ते सहज सौरभला म्हटले तर ते सासूबाईंनी ऐकले "काय तो बिचारा काम करून परत तुझी वाट पाहत राहणार त्यांना काय जात सांगायला "हे ऐकल्यावर अनघाने सौरभ कडे पहिले आणि गप्प बसली  शेजाऱ्यांना हि सौरभ च्या आईचा स्वभाव माहित होता त्यामुळे त्याचे येणे जाणे तेवढे नव्हते सौरभ च्या आईच्या अश्या वागण्याने अनघाला राग यायचा बायकोच्या काही भावना असतात का नाही ह्यावरून त्याचे खटके उडू लागले  पण हयाचा त्रास अनघाला व्ह्याचा  कारण सौरभ तर लग्नालाच तयार नव्हता मग बदलण्याची आशा हि नव्हती आणि आईच्या मनाविरुद्ध तो जाणे अशक्य होते 

अनघाला सौरभला आपल्या ताब्यात ठेवायचा नव्हता त्याने स्वतःच्या आईवडिलाचा आदर ठेवत आपल्या भावना समजून घ्यावात असे तिला वाटत होते पण कुठलं काय 

असेच लग्नाला सहा महिने होत आले रविवारी सुद्धा कुठे बाहेर फिरणे नाही कशाला तो उगीच वायफळ खर्च दोघाना एकांतात बसून चार गोष्ठी करणे हि मुश्किल होत होते अनघाच्या सासूबाईचा दरारा तसा होता आणि सौरभ आईच्या शब्दाबाहेर नाही हे सगळे पाहून अनघा मनातल्या मनात कुडत होती सांगणार कॊणाला आई बाबाना सांगून त्यांना  उगीच त्रास देणे तिला पटत नव्हते सौरभ आपल्यासाठी कधी बदलेल त्याला आपल्या मनातल्या भावना कधी कळतील हाच विचार तिच्या मनात असे 

दुसऱ्याचे वैवाहिक आयुष्य कसे मजेत जगत आहेत आणि आपले कसे का ?हा एकच प्रश्न ती देवाला विचारत होती

आपले  वैवाहिक आयुष्य पाहून अनघा खूप दुखी होत होती तिला तिच्या नातेवाईकांचे बोलणे परत परत कानावर पडत होते आजीचे निधन हि एक संकेत होता का जो आपल्याला कळला नाही असे असंख्य प्रश्न अनघाच्या मनात येत होते पण उत्तर मात्र सापडत नव्हते अनघाची सासू अनघाला जास्त दिवस माहेरी पाठवत नव्हती सौरभ चे अनघाच्या माहेरी लग्नानंतर एकदाच जाणे झाले होते 


अश्याच एका दिवशी अनघा चार दिवसासाठी माहेरी आली माहेरी आल्यावर तिने आनंदित असल्याचा मुखवटा चढवला आपल्या आयुष्यात चालत असलेल्या घडामोडीची भनक आपल्या आईबाबांना लागू दिली नाही एका संध्यकाळी आई आणि अनघा गप्पा मारत बसल्या होत्या बोलता बोलता अनघाच्या डोळ्यातून पाणी आले आणि ते आई ने अचूक पहिले 


"काय झालं बाळा तुझ्या डोळ्यात पाणी "?


"काही नाही आई "


"नाही अनघा हे पाणी उगाच आलं नाही काय झालं "?


असे विचारताच मनात साठवून ठेवलेला दुःखाचा साठा फुटला अनघाने आईला घट्ट मिठी मारली आणि सगळी हकीकत सांगितली घरात कोणीच नव्हते हे सगळे ऐकून आईने डोक्याला हात लावला आणि रडू लागली "अनघा माझ्या बाळा तू एवढे सहन केलेस कशी हिम्मत झाली त्याची तुझ्या भावनांशी खेळण्याची लग्न म्हणजे काय खेळ आहे का तू हे मला पहिले का नाही सांगितले "


"काय फायदा आई माझा साथीदार च माझ्या भावना समजू शकत नाही तर मी आणखी कोणाकडून अपेक्षा ठेवू तू म्हणालीस होतीस ना कि साथीदारांची साथ असेल तर सुखकर आयुष्य इथे साथच नाही नातं आहे फक्त नावासाठी "


हे ऐकून अनघाची आई व्याकुळ होऊन देवाकडे पाहू लागली "हे देवा काय रे माझ्या पोरीच्या नशिबी अनघा मी काय सांगू तुला तुझ्या पंसदीच्या मुलाशी तुझे लग्न व्हावे हीच आमची इच्छा होती आणि तू सौरभला निवडलंस चेहऱ्यावरून तो सोज्वळ वाटला पण आपल्या बायको ची जबाबदारी टाळणे म्हणजे मग तो लग्न का झाला होता आणि त्याच्या आईचा त्याच्यावर हक्क आहे त्यांनी तो खुशाल गाजवावा पण काही नवरा बायकोच्या गोष्टीत लुडबुड करणे नाही पटत मनाला त्या अश्या वागत राहिल्या तर तुमच्यात प्रेम कसे होईल  घटस्फोट घेऊन घरी ये म्हणायला सोपे असते पण कुठल्याच आईला आपल्या मुलाचा किंवा मुलीचा संसार मोडलेला कसा बघवेल तरी बरे तुझे सासरे तुझ्या बाजूनी आहेत पण त्याचीही तिच्या पुढे काही च चालत नाही काय सांगू मी अनघा खरंच काय करावं सुचत नाही नाही मी बोलते त्याच्याशी आणि सौरभ शी "


"काहीही फायदा होणार नाही उगीच मी माहेरी जाऊन सगळं सांगितलं म्हणून चार गोष्टी मलाच ऐकायला लागेल "


"ते हि बरोबर आहे अनघा बाळा मी काय करू नाही पाहवत तुला असे" 


"आई मी पाहिलंय सौरभ तसा वाईट नाही फक्त आईच्या विरुद्ध काही करणे जमत नाही सगळे त्यांना विचारूनच नवऱ्या बायकोच्या नात्यात असे नसते ना पण त्याला ते नाही कळत कधी कधी असे वाटते कि मी फक्त घरात नावापुरती त्याची बायको आहे त्याला काय आवडत नावडते सगळे त्याच पाहतात बाहेर जाऊन चार मनमोकळ्या गोष्टी माराव्यात तर कशाला बाहेर रविवार एक दिवस मिळतो आराम कर त्या दिवशी त्याच्या ऑफिस तले सहकारी मला वाटेत मिळाले तर मला म्हणाले "सौरभच्या आई थोड्या विचित्रच आहे आता तुम्ही सौरभला सुधारा तो तसा घाबरतो आपल्या आईला पण बायको म्हणून तुम्हला हे करावेच लागेल "


"अशी कशी  आहे ती बाई "


"आई तू हे बाबांना नको सांगू ते उगीच चिडतील आणि मग उगीच तो गोधळ नको "


"अनघा एवढा समजुदार पणा कुठून आला गं आणि दुसरी कोण असती तर बॅग घेऊन घरी परतली असती आणि डिवोर्स घेऊन मोकळी झाली असती "


"आई डिवोर्स दयाला सोपं असत पण त्या बरोबर होणारा त्रास त्यात तुम्हला किती त्रास होईल "


"बाळा तू आमच्या साठी एवढे सहन करतेस पण ह्या पुढे तू माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवणार नाही आणि तशीच स्थिती आली तर मी गप्प बसणार नाही देवा माझ्या पोरीच्या आयुष्यात सगळे सुरळीत कर एवढेच मागते "आणि आई रडू लागली अनघाने आई ला परत एकदा घट्ट मिठी मारली आणि मायेच्या कुशीत विसावली पण दोघांच्या डोक्यात एकच प्रश्न होता पुढे कसे होणार ?

असेच दिवस भर भर निघून जात होते आणि कधी वर्ष होत आले समजले नाही पण अनघाचे आयुष्य मात्र जसे तसे होते सौरभच्या बदलण्याकडे तिचे डोळे अजून हि होते पण हि प्रतीक्षा कधी संपेल माहित नव्हते सौरभ चे सहकारी मित्र त्याला नेहमी सांगत त्यावरून त्याला आपण कुठे तरी चुकत आहोत ह्याची जाणीव होत होती पण आईच्या भीती ने तो बदलण्यास तयार नव्हता आपण काहीतरी वेगळे केले आणि आई दुखावली तर ह्याच विचाराने त्याने अनघाच्या मनावर घाव घातला होता आणि ते घाव कधी भरतील अनघाला माहित नव्हते अनघाने आपल्या  आईला ज्यादिवशी सगळे सांगितले त्या दिवसापासून आई दररोज तिची फोन वर खबर घेऊ लागली काही झाले तरी आपल्या काळजाचा तुकडा तिने परक्याच्या हातात दिला होता जो सांभाळण्यास असमर्थ होता पण आईची हि स्थिती ओठ हि आपले आणि दात हि आपले सारखी झाली होती ती सौरभला काही बोलू शकत नव्हती  फक्त देवाचा धावा ती करत होती जेणेकरून अनघाचे आयुष्य सुरळीत होऊ दे अनघाच्या बाबांनी हि अनघाची आई फोन वर बोलताना त्याच्या घरात चालत असेलली खबर लागली त्याच्या तर पारा चढला पण आई ने समजावले तसे ते शांत झाले पण मनात आपल्या पोरीला कुठल्या घरात दिले ह्याची खंत त्याच्या मनी लागली 


ह्यात त्याच्या पहिल्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला हे पाहून अनघाने सौरभ कडे विषय काढला 


"सौरभ आपली एनिवर्सरी जवळ येत आहे आपण साजरी करायला हवी छान कुठे तरी बाहेर जाऊ मी तू आई बाबा एखाद्या हॉटेल मध्ये जेवायला "


"अनघा आईला असेल वायफळ खर्च नाही आवडत आणि ती परवानगी नाही देणार "


"झालं परवनगी सौरभ तू कधी ह्या परवानगीच्या कचाट्यातून बाहेर येणार अरे वर्ष होत आलं तरी तुझं आपलं तेच परवानगी परवानगी बायको च्या मनाचा कधी विचार केलास मी असं म्हणत नाही कि तू आईच ऐकू नको पण आपल्या नात्याला तू त्या परवानगीने बांधले आहे अरे तो दिवस आपल्या दोघांचा मी आणि तू जाऊया असे म्हण्टले असते पण सगळे जाऊया असे सांगितले तरी अरे आपण जगतो त्याला जगणं नाही अडजस्टमेन्ट म्हणतात माझे मन तुला कधी कळणार मला कंटाळा आलाय "


"मग जा ना सोडून मला फरक नाही पडत" 


"हो रे तुला कसला फरक पडेल आज मी घरात असताना सुद्धा माझी तशी काही तुला गरज नसतेच तुझ्या आई सगळं करतात त्यामुळे माझ्या जाण्याने तुला काही फरक पडणार नाही आणि मुळात तू माझी बायको म्हणून कुठे जबाबदारी घेतलीस कधी तुला काय हवंय विचारलंस नाही ते हि परवानगी शिवाय तू कसा देणार "


"अनघा "असे म्हणून सौरभ ने तिच्यावर हात उचला 


"कुठल्या हक्काने तू हा हात उगारलास तुला जर लग्न करायचे नव्हते तर स्पष्ट पने सांगितले का नाही का माझ्या भावनांशी खेळ करत आहात "


आणि अनघाने ती रात्र फक्त आपले अश्रू पुसण्यात काढली त्या निशब्द रात्री अनघा आपल्या मनाशी एकटीच हितगुज करत उघड्या डोळ्याने आपले भविष्य पाहू लागली काय असेल तिचे भविष्य ?

***********सकाळी ऑफिस साठी अनघा तयार झाली रात्रीच्या कारणाने तिचा चेहरा पार उतरला होता सासऱ्यांनी ते ओळखले होते सौरभ ने अनघा कडे पहिले पण अनघाने न पहिल्या सारखे केले आणि आपले काम करत राहिली बरोबर ते ऑफीसा ला गेले सौरभ तिला बस स्टॉप वर सोडून जाई मग ती बस ने ऑफिसला जाई पण अनघाने एक नजर हि सौरभवर टाकली नाही 


सौरभ ने तिच्यावर हात उचला पण त्याला हि ते बरोबर वाटले नाही तो ही आतून दुखावला गेला होता एवड्यात त्याच्या बाबाचा फोन आला

"हॅलो सौरभ बिझी आहेस"?


"नाही बाबा"


"थोड बोलायचं होत"


"मला पण बाबा"


"तर थोडा वेळ तू बाहेर भेटशील घरात बोलता येऊ शकत नाही "


"हो बाबा आमच्या ऑफिस च्या जवळ हॉटेल मध्ये भेटू"


"बरं तर मी पोहचतो"


सौरभ ने काही काम आहे असे सांगून अर्ध्या तासाची रजा टाकून बाहेर पडला तर सौरभ च्या बाबांनी बाहेर मित्राकडे जातो असे सांगून बाहेर पडले आणि ठरवेल्या ठिकाणी दोंघे ही पोहचले


"बाबा काय झालं "?


"सौरभ अनघाचा चेहेरा आज पाहिलास नेहमी पेक्षा खूप गंभीर होता नेहमी बाहेर पडताना ती हसायची पण आज काय झालं"?


"बाबा तेच मला तुम्हाला "


"म्हणजे  सौरभ "


सौरभ ने झालेला प्रकार सगळा कानावर घातला


"काय मूर्खा तू तिच्यावर हात उगारलास वेडा झालास का ती जे काही बोलली त्यात तिचे कुठे चुकले ती म्हणून तुझ्याबरोबर आहे दुसरी मुलगी तर केव्हाच माहेरी निघून गेली असती तू कुठल्या अधिकाराने तिच्यावर हात उगारलास नवरा म्हणतोस  तर तसा कधी वागलास का नेहमी आपला परवानगीच्या जाळ्यात तुझी आई कधी सुधारणार नाही आणि तू ही नाही "


"पण बाबा तीनी आईला असे"?


"काय वाईट बोलली ती खरी परिस्थिती च तशीच आहे ना मग माफी मागितली तिची"


"नाही"


"मग कधी मागणार"?


"बाबा ते"


"आता फोन कर आणि माफी माग"


"नाही बाबा मी नंतर मागेन "


"मग कधी"?


"बाबा मी मागेन तिची माफी पण फोन वर नको


"बरं पण तू तिची माफी मागायला हवी"


"हो बाबा मी मागेन "


"काय बोलू मी सौरभ अरे तिला काय वाटल असेल विनाकारण तुझे असे वागणे हे बघ सौरभ आपली बायको चुकली तर तिला समजून  सांगावे हात वैगरे मी तुझ्या आईवर कधीच हात उगारला नव्हता सौरभ मी अनघा बरोबर आणि तुझी आई  चूक म्हणत नाही तुझी आई खूप चांगली आहे आपल्या मुलाने चांगले राहवे वाईट संगतीत न राहता आपले नाव उज्ज्वल करावे असे तिचे म्हणे तुझे वाकडे पाऊल न पडो ह्यसाठी तिने नेहमी तुझ्यावर लक्ष ठेवले तुझे पंख गगन भरारी घेण्यासाठी तयार असताना सुद्धा नेहमी आतापर्यंत तिनी तुला आपल्या पंखाखाली ठेवले जबाबदारी कुठलीच तुझ्यावर लादली नाही ह्यात तिनी तुला चांगले बनवले असे तिला वाटत असले तरी तुझ्या स्वतःच्या आयुष्यात तुला मागे ओढले आहे तू तिच्यावर एव्हडा अवलंबून आहेस कि तू अनघाची जबाबदारी कशी घेशील ?तू जेव्हा कॉलेज जायला लागला तेव्हा मी तुझ्या आईला म्हण्टले त्याचवरचा अधिकार कमी कर जगू दे त्याला तेव्हा ती मला म्हणाली हेच वय असत वाईट पाऊल पडण्याचे सौरभ तिनी तुला प्रेम प्रेम करता तुझ्यावर अधिकार आणि हक्क गाजवणे सुरु गेले जे आज हि तू वयात येऊन लग्न झाले तरी संपत नाही खरं सांगू तर तिला भीती आहे उद्या अनघा ने तुला तिच्यापासून दूर केले तर म्हणून ती तुझ्यावरचा हक्क कमी करत नाही तिच्यावरच प्रेम हे निस्वार्थ नसून भीती पोटी बनले आहे तुमच्या अश्या वागण्याने अनघाला काय वाटत असेल ती काय विचार करत असेल कि मी कोणाशी लग्न केले ह्याच्या विचार तुझ्या मनात कधी कसा आला नाही"?


सौरभ सगळे गप्प राहून ऐकत होता 


"जाऊ दे मी बोलून काहीही फायदा नाही पण एवढेच सांगतो हि माझी चेतावणी समज  ह्या पुढे अनघावर हात उचलास तर माझ्याशी गाठ आहे त्या पोरीला सुख नाही देऊ शकत तर किमान दुःख तरी नको देऊ "असे सांगून सौरभ चे बाबा उठून निघून गेले 


सौरभ मात्र त्याच्या पाठमोरी जाण्यांकडे पाहू लागला पण खरंच सौरभ बदलेल का ?

सौरभ बाबाच्या बोलण्याने अस्वस्थ झाला होता त्याने अनघाला फोन केला अनघाने उचला 


"हॅलो अनघा "


"हा सौरभ "


"अनघा सॉरी माझं चुकलं म्हणजे "


"इट्स ओके "


"अनघा माहित आहे  तुझ्यावर मला हात उचलायला नको होता "


अनघाने मला काम आहे असे सांगून फोन ठेवून दिला 


दोन दिवसावर एनिवर्सरी येऊन ठेपली होती पण अनघाला काही उत्सुकता उरली नव्हती पहिली एनिवर्सरी आपण जय्यत साजरी करण्याची तिची इच्छा काही पूर्ण होणार नाही ह्याची तिला खात्री झाली 


त्या दिवसापासून अनघा सौरभ शी फक्त कामापुरतेच बोलत होती ती मनातून दुखावली होती एनिवर्सरी च्या आदल्या दिवशी सौरभ ने सहज अनघाला म्हण्टले "उद्या आपली आनिव्हर्सरी ना "?


अनघाने न ऐकला सारखे केले हे पाहून सौरभ परत म्हणाला "अनघा उद्या हाल्फ डे टाक आपण दोघे बाहेर जेवायला जाऊया "


अनघाने एक नजर सौरभ कडे फिरवली तिच्या कानावर तिचा विश्वास बसेना कि असे काही सौरभ बोलत आहे ती फक्त त्याला पाहत राहिली 


हे पाहून सौरभ म्हणाला अग अशी काय पाहतेस ? खरंच आपण उद्या बाहेर जाणार आहोत तूला नेण्यास मी येईन मग कुठल्या तरी हॉटेल मध्ये मस्त जेवू "


"पण सौरभ हे तू "


"अनघा तू उद्या हाल्फ डे टाक मग पाहू पुढचे "


अनघा गप्प राहून पाहू लागली  ती ने फक्त मान डोलवली आणि पटकन आपल्या मोबाईल ने हाल्फ डेचा मेसेज टाईप केला तिच्या चेहऱ्यावर कुठलेच हावभाव दिसत नव्हते कारण हे सत्य आहे कि स्वप्न? हेच तिला समजत नव्हते 

अनिवर्सरीचा दिवस उजाडला अनघा चा चेहरा खुलला होता आज प्रथमच ती सौरभ बरोबर कुठे बाहेर जाणार होती तिनी सौरभचा  आणि तिचा जोडीने असलेला फोटो व्हॉट्सॲप वर स्टेटस म्हणुन टाकला सासू सासऱ्यचा आशीर्वाद घेऊन दोघेही ऑफिसला जाण्यासाठी बाहेर पडले  त्याच्या बाहेर जाण्याची कुणकुण घरी नव्हती सौरभ ने तिला बस स्टॉप वर सोडले आणि तो निघून गेला सौरभ ने हि स्टेट्स ठेवावा अशी अनघाला अपेक्षा होती पण तसे काही झाले नाही तशी अनघा गणपतीच्या मंदिरात गेली मनोमन आपल्या संसारासाठी सुख आणि समाधान मागून ती ऑफिस ला निघून गेली तिची इच्छा सौरभ ने मंदिरात येण्याची होती पण सौरभ ने नकार दिला त्यामुळे ती थोडी हिरमुसली पण आज सौरभ आपल्या साठी वेळ देणार हे मनी येताच तिचा चेहरा खुलला


अनघा ऑफिस मध्ये पोचली पण तिला कधी एकदा १ वाजते असे झाले होते ती तिथेच बसून सौरभ ला भेटल्याची स्वप्ने पाहू लागली


आणि 1 वाजला तशी अनघा अधिकच खुश झाली ती लगेच ऑफिस बाहेर पडली आणि सौरभला  तिची नजर शोधू लागली आणि सौरभ बाईक वरून येताना दिसला तशी ती लगेच पुढे गेली सौरभ ने गाडी थांबवली


"इथे समोर हॉटेल आहे तिथे जाऊ" असे म्हणून सौरभ ने गाडी सुरू गेली आणि अनघा बिन्धास्त पणे मागे बसली आणि गाडी येऊन हॉटेल च्या समोर उभी राहिली दोघेही आत गेले सौरभ ने आत नजर मारली तर आत मोजकेच लोक होते ते दोघे आत गेले एका टेबल वर ते बसले 

अनघाने हसत हसत सौरभ कडे पहिले तसा सौरभ म्हणाला 


"अनघा तूच काहीतरी  ऑर्डर कर "


"नाही सौरभ हे घे मेनू कार्ड तूच काहीतरी कर "


"अनघा मी हॉटेल मध्ये कधी येत नाही त्यामुळे डिशेस "


"ओके "असे म्हणत अनघाने काही डिशेस निवडल्या आणि सौरभ ला विचारून वेटर ला ऑर्डर दिल्या अनघाने आपल्या पर्से मधून एक छोटासा बॉक्स काढला आणि सौरभ ला दिला 


"हे काय "?


"माझ्याकडून छोटस गिफ्ट उघडून पहा नक्कीच आवडेल "


असे म्हणताच सौरभ ने उघडून पहिले तर त्यात घड्याळ होते ते पाहून सौरभ चे डोळे चमकले 


"आवडले ना तुझ्या जवळ नेहमी राहील म्हणून हे निवडले "


तसे सौरभ ने हि आपल्या खिशातून एक डब्बी बाहेर काढली आणि अनघा समोर ठेवली 


"काय आहे "?


"अनघा माझ्याकडून गिफ्ट "


हे ऐकून अनघा ला समजत नव्हते कारण तिला एका वर एक सुखद धक्के मिळत होते तिनी ती डब्बी उघडून पहिली तर त्यात सुंदर अशी कानातली होती ती पाहून ती खुश झाली एवढ्यात त्याची ऑर्डर आली दोघेही जेवू  लागले अनघाचे पोट तर हे सारे पाहूनच भरले होते तरीही चार घास जास्तच गेले जेवण आटोपता ३ वाजले तसे सौरभ म्हणाला 


"अनघा तू घरी जातेस तर जा मी ऑफिस मध्ये जातो "


"अरे पण तू आज हाल्फ डे "?


"नाही थोडं काम आहे आणि एवढे वेळ काय करणार ना "


"आपण समुद्र किनाऱ्यावर फिरायला जाऊ आणि मग घरी "


"नको अनघा उग्गीच आपल्याला कोणी पहिले आणि आईला सांगितले तर उगाच घोळ नको  ती रागवेल "


तिला आज चा दिवस सौरभ बरोबर घालवासा  वाटत होता पण असे बोलण्याने ह्यावर अनघाने काही न बोलता सौरभ ची रजा घेतली आणि घरी परतली तरी हि काही क्षण सौरभ बरोबर घालवल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला होता 


ती घरी परतली आणि सरळ गार्डन मध्ये गेले जिथे सौरभ चे बाबा गार्डनिंग करत होते 


"अरे अनघा आज लवकर "


"हो बाबा "


 "थँक्स बाबा "


"थँक्स का "?


"बाबा तुम्हला माहित आहे "


"पण काय अनघा "?


"बाबा मी आणि सौरभ बाहेर जेवायला गेलो होतो "


"काय कुठे सूर्य उगवला आज नशीब आजच्या दिवसाचे महत्व त्याला कळले "


"बाबा मला माहित आहे हे सर्व तुम्ही घडवून आणले "


"नाही बाळा मला या बाबत काहीच माहित नाही "


"बाबा मी तुम्हला सौरभला सकाळी काही देताना पहिले आणि आता कळले की ती  डब्बी होती "


"हो का जाऊ दे पण हे तुला माहित आहे हे सौरभला कळू देऊ नकोस अनघा पण तू खुश झालीस ना "?


"हो बाबा काही क्षण सौरभ बरोबर घालवले पण बाबा हे त्यानी स्वतः केले असते तर "


"बाळा मला तुझ्या भावना कळतात पण सौरभ तुला माहित आहे कसा आहे तो तसा तो वाईट नाही खूप चांगला मुलगा आहे पण थोडा आईच्या धाकात वाढलेला त्यामुळे त्याला भावना कळत नाही पण तो समजेल कधी ना कधी त्याला तुझ्या भावना समजतील त्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील माहित आहे कठीण रस्ता आहे पण सगळं ठीक होईल "


अनघाने मान डोलावून सौरभ च्या बाबाच्या म्हण्याला होकार दर्शवला आणि घरात गेली रात्रीची जेवणे झाली सौरभ आपल्या रूम मध्ये लॅपटॉप वर काहीतरी पाहत बसला होता तेव्हड्यात तिथे अनघा आली आणि त्याच्या शेजारी बसली सौरभ चा हात हातात धरून ती म्हणू लागली 


"थँक्स सौरभ आजच्या दिवसासाठी मला खरंच मनापासून आनंद झाला "


"थँक्स कशाला "


"सौरभ मला गिफ्ट्स जी गरज नाही रे फक्त तुझ्या प्रेमाची साथ हवी बस तेच माझ्यासाठी खूप आहे देशील ना मला तुझ्या प्रेमाची साथ "


ह्यावर सौरभ फक्त तिला पाहत राहिला का खरचं सौरभ देईल का तिला प्रेमाची साथ ?

दिवसावर दिवस भर भर निघून जात होते दोन वर्ष होत आली पण ज्या प्रेमाच्या साथीची गरज अनघाला होती ती मात्र सौरभ तिला देऊ शकला नाही हि खंत दर दिवशी तिच्या मनाला टोचत होती पण ती खंत ती कोणाला सांगू शकत नव्हती अनघाचे आई बाबा हि अनघाच्या चिंतेने व्याकूळ झाले होते आपली पोर केवढे कसे सहन करते हाच प्रश्न त्याच्या मनात घुमत होता पण उत्तर मात्र सापडत नव्हते अनघाच्या आई बाबानी सौरभच्या घरी जाप विचारण्यास जाण्याची तयारी दाखवली पण अनघानेच त्याना रोखले 


अश्याच एके दिवशी सासूबाईं आणि अनघा किचन मध्ये काही करत होत्या त्यावेळी सासूबाई म्हणाल्या  "अनघा दोन वर्ष होत आली  लग्न होऊन लवकर काही ते पहा लोक विचारतात आम्हला आता नको वगैरे तुझ्या मनात असेल तर काढून टाक "


ह्यावर अनघाला काय बोलावे तेच कळेना कारण सौरभ कसा आहे हे तिला माहित होते आणि त्याचे नाते हि  तिनी ह्यावर काही उत्तर दिले नाही तर त्याच परत बोलल्या " हे बघ अनघा असल्या गोष्टी वेळेवर झाल्या तर बऱ्या उगीच वेळ नको नाहीतर डॉक्टर कडे जा काही तुझ्यात दोष असेल तर उपचाराने ठीक होऊ शकतो उग्गीच वर्ष निघून जातील "


अनघा ने फक्त मान डोकावली आणि तिथून निघून गेली तिला कळत नव्हते कि ह्यावर काय बोलायचे  कारण त्याचे नाते च पक्के नव्हते तर मग पुढच्या गोष्टी आणि एक मोठी जबाबदारी तिचे मन मात्र त्या बोलण्याने दुखावले "तुझ्यात काही दोष कसेल तर "?अनघाचे डोळे आपसूकच भरले तिने आपले डोळे पुसले आणि कामात मग्न झाली पण तिचे लक्ष मात्र त्या गोष्टी वर च जात होते 


अनघाला हि समजत होते कि लग्नानंतर अपत्य झाले कि कुटुंब पूर्ण होते पण इथे सौरभ तिची जबाबदारी घेण्यास असमर्थ होता तिथे आणि काय बोलायचे तिला मनातून सौरभ च्या आईचा राग येत होता कारण त्यांनी सरळ सरळ अनघावर दोष लादला होता ती नि डोळे बंद केले आणि मनातल्या मनात देवाला हाक दिली "देवा संसारच माझा अजून सुरळीत चालू झाला  नाही आणि हा दोष "?


अनघाला हि गोष्ट मनात रुजत होती म्हणून तिनी लगेच शहरातली प्रसिद्ध डॉक्टर ची अँपॉईंटमेंट घेतली आणि सासू बाईना खबर केली कारण सौरभ आपल्या आईच्या परवानगी शिवाय जाणार नव्हता लगेच दुसऱ्या दिवशी दोघेही हॉस्पिटल मध्ये गेले 


हॉस्पिटल मध्ये बरीच गर्दी होती दोघे हि आपला नंबर विचारून बसले अनघाने चार हि बाजूनी नजर मारली तर काही जोडपी तिथे बसली होती काही मातृत्वाचे अनुभव घेत होती तर काही मातृत्वाची वेदना सहन करत होती तर काही मातृत्वाची आस घेऊन आली होती हे सर्व पाहून अनघाने डोळे बंद केले तिला काही समजत नव्हते 


एक एक करून नंबर येत होता आणि अनघाचा नंबर आला तसे दोघेही डॉक्टर च्या केबिन कडे वळले 

दोघेही डॉक्टर च्या केबिन मधून बाहेर पडले अनघाच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते सौरभ हि गप्प होता दोघेही घरी परतले सौरभची आई आणि बाबा दोघेही हॉल मध्ये बसलेले घरी येताच सौरभच्या आईने अनघाला प्रश्न केला 


"काय सांगितले डॉक्टर ने "?


हे पाहून सौरभचे बाबा म्हणाले "अगं  त्याना बसू तरी दे "


"हा बसू दे ना मी कुठे नाही म्हणते पण आपल्याला पण कळायला हवे "


सौरभ हे ऐकताच रूम मध्ये गेला पण अनघा समोर प्रश्न उभे राहिले 


"काय सांगितले अनघा" 


"आई काही प्रॉब्लेम आहे औषध दिलीत "


"हो का मला कळेच होते मग घे बाई वेळेवर ती औषध उगीच वर्ष नको वाया जायला "


"आई प्रॉब्लेम मला नाही "


"मग" ?


"सौरभला "


हे ऐकताच "काय असू दे औषध घेतल्यावर बरे होईल त्यात काय एव्हडं टेन्शन ह्याची गरज नाही सौरभ टेन्शन घेऊ नकोस रे "


हे ऐकल्यावर अनघा रूम मध्ये निघून गेली तिचे डोळे डबडबले काही विचार न करता सौरभ च्या आईने तिच्यावर दोष असल्याच्या आरोप लावला होता आता दोष आपल्या मुलात असल्यावर टेन्शन घ्याची गरज नाही अनघाने तो राग मनातल्या मनात गिळला तिचे मन बधिर झाले होते तिला समजत नव्हते कि तिच्या आयुष्यात चालले तरी काय सगळ्याबाजूनी सौरभ असमर्थ होता आणि अनघा मात्र संसाराचा गाडा ओढत होती नाते टिकवण्याचा प्रयत्न करत होती ती शांत गॅलरी मध्ये जाऊन निळ्या आकाशाकडे पाहत आपल्याला पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांना शोधत एकटीच बसली तिला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे मिळतील ?

सौरभ डॉक्टर कडून आल्यापासून गप्पच होता हे अनघाच्या लक्षात आले तिनी स्वतः सांभाळत सौरभला धीर देत म्हटले "सौरभ टेन्शन घेऊ नको सगळं ठीक होईल "पण ती मनातून दुखावली होती तो दिवस शांततेत गेला 


दुसऱ्या दिवशी अनघा ने ऑफिसाला जाण्याची तयारी गेली आणि दोघे हि बाहेर पडले सौरभ ने अनघाशी एक शब्द हि बोलला नाही बस स्टॉप वर सोडून तो निघून गेला 


अनघाला आज ऑफिसला जाण्याचे मन होत नव्हते तरी ती ऑफिसाला गेली पण तिचे कामात लक्ष लागेना बरं नाही वाटत असे सांगून ती ऑफिस मधून बाहेर पडली आणि गणेश मंदिरात गेली मंदिरात तशी वर्दळ कमी होती अनघा नेहमी ह्या मंदिरात येऊन आपल्या लाडक्या बाप्पाशी हितगुज करायची आज हि तिला भरून आले होते ती मंदिरात आली गणेश मूर्ती समोर डोळे बंद गेले आणि मनातल्या मनात बोलू लागली 


"बाप्पा सुख समाधान असेल तरच हे स्थळ होऊ दे अशी प्रार्थना गेली होती पण ह्यातली कुठलीच गोष्ट माझ्या वैवाहिक जीवनात मिळाली नाही नेहमी मन मारून आपलेपणाची वाट पाहत जगावं लागलं सौरभ तसा वाईट नाही देवा पण तो मला समजून घ्याला तयार नाही मी त्याच्यासाठी माझे सर्व सोडून आले पण त्याची किंमत त्याला कधी कळीचं नाही त्यात विनाकारण माझ्यावर दोष असल्याचा आरोप देवा आरोप सिद्ध केलास तू पण पुढे काय कसे होणार? आणि माझ्या आयुष्यात फक्त दुःखच लिहिलंस का ?लग्न झाल्यापासून सुटकेचा श्वास कधी घेतलेला आठवत हि नाही ह्यासाठी का माझ्या आई बाबा पासून मला दूर केलंस काय मागू तुझ्याकडे आणि किती मागू काहीच कळत नाही बाप्पा आयुष्यात कुठे हरलेल्या सारखे वाटते माझे असे हे अनघटीत आयुष्यच मला जगावे लागेल का ?"


डोळे बंद असले तरी डोळे डबडबले होते तिनी हळूच ते रुमालाने पुसले हे तिथल्या भटजी बुवा नि पहिले ते अनघा नेहमी येत असल्याने ते  अनघाला ओळखू लागले होते ते जरा पुढे आले आणि अनघाला पाहत म्हणाले "बाळा काय झालं रडतेस का "?


अनघाने डोळे उघडले आणि त्यांना पाहता "नाही काही नाही "


"बाळा तो समोर बसला आहे ना तो सर्व विघ्न निवारण करील चिंता करू नकोस "असे म्हणून ते भटजी परत गाभाऱ्यात परतले अनघाने परत डोळे बंद केले मंदिरात लोकांची ये जा चालू होती मात्र अनघा शांत पणे डोळे बंद करून बसली होती 


संध्याकाळ झाली सौरभ ऑफिस मधून आला मात्र वेळ झाली तरी अनघा आली नाही म्हणून तिला फ़ोन लावण्यात आला तर फोन स्विच ऑफ येऊ लागला तरीही एक तास केला बाहेर काळोख पडला तरी अनघाचा पत्ता नाही  नेहमी वेळेत येणारी अनघा आली नाही हे पाहून सगळ्याचा जीवाला घोर लागला सौरभ कडे अनघाच्या ऑफिस चा नंबर नव्हता  नाही तिच्या मैत्रिणीचा  त्याने ऑफिस कडे जाऊन पहिले तर ऑफिस बंद होते अनघाच्या आई बाबांनाही विचारण्यात आले पण तिथे हि ती नसल्याने त्याच्या हि जीवाला घोर लागला ते लगेच तिथे येण्यास निघाले तीन तासाचा प्रवास होता पण अनघाच्या आई बाबा साठी अनघाच्या काळजी पोटी अंतर वाढत होते


बाहेर काळाकुट्ट अंधार पडला हे पाहून सौरभ चे बाबा म्हणाले 


"सौरभ खरे सांग तू काही बोलले नाही ना तिला "?


"नाही बाबा काहीच नाही "


हे ऐकून सौरभ ची आई म्हणाली "पण तो का बोलेल तिला अनघाने असे न सांगता जाणे पटत नाही कुठे गेली असेल उगीच मनाला घोर लावला "


रागाच्या भरात सौरभ चे बाबा सौरभला म्हणले "आता त्याच्या आई बाबा ना आपण काय उत्तर देणार सांग ना सौरभ काय उत्तर देशील "?


"अहो तुम्ही त्याच्यावर का चिडता त्याने सांगितले नाही तिला असे जायला "


"तू जरा गप्पच बस "


"अहो "


"हो उमा हो जरा गप्प च बस  हे सर्व तुझ्यामुळे घडलंय एवढे दिवस मी गप्प राहिलो पण आता नाही ज्या दिवसाची मला भीती होती तो दिवस आलाच "


"तुम्हाला म्हण्याच काय मी सांगितले का तिला जाण्यास सौरभ बघ ना कसे बोलतात "


सौरभ वैतागून म्हणाला "आई पिल्झ जरा गप्प बसता तुम्ही दोघे "


"सौरभ तू हि चीड माझ्यावर आता हेच पाहिजे राहिले होते "


"मग काय करू  आई अगं अनघा कुठे गेली असेल हे टेन्शन आहे आणि तुम्ही "


"अरे पण तुझे बाबा माझ्यावर का आरोप लावतात "


"का नको लावू माझे आरोप बिनबुडाचे नाही ती उगीच नाही गेली काय करणार श्वास गुदमरत असेल तिचा इथे "


"तुम्हाला काय म्हण्याचे आहे आम्ही तिचा  छळ करत होतो"


"हो मानसिक छळ उमा अगं हा तुझा मुलगा लग्न झाला आहे पण विचार त्याला कि तो तुझ्यावर किती अवलंबून आहे लग्न झाला तरी तो तुझ्या परवनगी शिवाय काहीच करत नाही नेहमी तू म्हणशील ती पूर्व दिशा ह्यात त्याने कधी तिचा किंवा तिच्या मनाचा विचार केला नाही आणि सांगते काय केलं मानसिक छळ केलात तुम्ही तिचा "


"हे काय बोलता तुम्ही "?


"बरोबर बोलता बाबा तुम्ही मी अनघा चा विचार कधी केला नाही नेहमी फक्त आई दुखावली जाणार ह्याच्या विचार केला पण ती मुलगी दुसऱ्या मुली सारखी नाही ती मला माझ्या आई पासून दूर करत नव्हती फक्त दिला माझ्या प्रेमाची साथ हवी होती सगळे जण मला म्हणतात सौरभ तू नशीबवान आहे म्हणून एव्हडी समजुदार बायको मिळाली नाही तर आमच्या बायका रविवार कि फिरायला जाऊया आणि काय काय बाबा अनघा ने माझ्याकडे कधीच काही मागले नाही मागणार हि कशी आज कळते मला माझं काय चुकलं ते आई माझ्यात दोष असताना सुद्धा एवढे सहन करून सुद्धा तिनी मला काल काय सांगितले माहित आहे "सौरभ टेन्शन घेऊ नकोस सगळे ठीक होईल "अनघा तू कुठे गेलीस "असे म्हणून सौरभ रडू लागला 


बाबानी त्याला सावरले आणि त्याला पाहत म्हटले "सौरभ कळ ना अनघाचे मन केवढे मोठे आहे ते देवा आमच्या अनघाला सुखरूप घरी परंतु दे "


अनघाची आई भाऊ आणि बाबा पोहचले पण त्याच्या प्रश्नाना उत्तरे देण्यास सौरभ आणि त्याचे आई बाबा असमर्थ ठरले  पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अनघा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली सगळेच जण अनघाच्या  वाटेकडे डोळा लावून बसले होते सगळयांच्या मनात एकच प्रश्न होता अनघा गेली कुठे ?

अनघाच्या वाटेकडे सगळ्यांनी डोळा लावला त्यात  रात्र सरली पण अनघा काही परतली नाही दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली अनघाच्या आई बाबाचे तर रडून रडून हाल झाले होते सौरभ हि स्वतःला अपराधी असल्या सारखा वागत होता सौरभ चे बाबा हि शून्यात नजर टाकत विचारत गडून गेले होते सौरभच्या आई हि चिंतेने व्याकुळ झाल्या होत्या अनघा बेपत्ता झाल्याची बातमी त्याच्या आजूबाजूला  पसरली तशी त्याच्या घरी माणसे जमू लागली 


पोलिसांच्या फोन कडे सगळ्याचे लक्ष लागले होते कधी एकदा अनघा परत येते असे सगळ्यांना झाले होते सौरभ तर तिचा नंबर लावत होता पण मोबाईल स्वीट ऑफ येत होता हे पाहून तो अस्वस्थ होत होता दुपार होत आली पण अनघा काही आली नाही ना पोलिसाचा फोन तहान भूक सगळेच जण विसरले होते 


तेव्हड्यात सौरभ उठला आणि बाहेर जाण्यासाठी निघाला हे पाहता सौरभच्या बाबांनी त्याला विचारले 


"कुठे चालास "


"येतो बाबा असे म्हणुन सौरभ निघाला '


"सावकाश जा रे "बाबांनी आवाज दिला 


सौरभ ने गाडी सुरु गेली आणि गाडी येऊन गणेश मंदिराकडे येऊन थांबली तो लगबगीने आत गेला अनघा ह्या मंदिरात येते हे त्याला माहित होते त्याने इथे तिथे पहिले पण अनघा काही दिसली नाही त्याने देवासमोर हात जोडले आणि यातना देवाला सांगितली 


"देवा मी खूप वाईट वागलो अनघाशी मला शिक्षा कर पण माझ्या अनघाला सुखरूप परत येऊ दे देवा मी शिक्षा म्हणून एक निर्णय घेतला आहे ती परत आली कि तिला कसले च दुःख नसेल फक्त दिला सुखरूप परत येऊ दे "


तेव्हड्यात भटजी बुवा चे बोलणे सौरभ च्या कानावर पडले "आली का ती शुद्दीवर "


"देवा त्या पोरीला लगेच बरे वाटू दे "


सौरभ ला हे बोलणे जरा संशयित वाटले म्हणून त्याने भटजी बुवांना विचारले 


"भटजी बुवा तुमचे कोणी बरे नाही का "?


"नाही आमचे कोणी नाही पण परकी हि नाही ती ह्या मंदिरात नेहमी येते काल हि आली होती दुपार पर्यंत डोळे मिटून बसली  दुपारी मंदिर बंद करून मी घरी जातो तिला हि सांगितले कि तू घरी जा पण आपल्याला भूक नाही आपण इथेच बसून राहते असे म्हणाली चेहऱ्यावरून तणावात दिसत होती माझ्या मुली प्रमाणे असल्याने मी तिला मुद्दाम घरी जेवण्यास नेले तिथे ती बेशुद्ध पडली माझी बायको डॉक्टर असल्याने तिनी लगेच उपचार सुरु केले ती कुठल्या तरी तणावात आहे रात्री तिला शुद्धी आली पण ती अशक्त असल्याने आम्ही तिला काही विचारले नाही आज संध्यकाळ पर्यंत ती ठीक झाली तर तिची चौकशी करणार होतो "


"अहो पण तिच्या घरच्यांना "


"नाही माहित नाही कोण तिचे तिचा मोबाईल हि बंद आहे आणि ते शोधण्यापेक्षा तिला बरे करणे हे आम्हला गरजेचे दिसले "


सौरभ ने आपला मोबाइल काढला आणि  अनघाचा फोटो होता तो त्या भटजी बुवा ना दाखवला तसे ते हीच ती मुलगी म्हणले तसा सौरभ ने सुस्कारा सोडला आणि लगेच भटजींच्या घरची वाट धरली 


सौरभ ने घरात प्रवेश केला अनघा बेडवर पडली होती बाजूला भटजी च्या बायको उभ्या होत्या भटजींनी आपल्या बायको ला सौरभ विषयी सांगितले तसे त्या म्हणायला 


"काळजी नसावी थोडा अशक्त पणा आहे इंजेकशन दिले तिला झोपू दे  "


सौरभ ने अनघाला पहिले तर ती शांत पणे झोपली होती सौरभ ने घरी फोन करून सांगितला आणि पोलीस स्टेशन मध्ये खबर केली सौरभ ला भटजींनी पाणी पिण्यासाठी दिले सौरभ अनघा झोपलेल्या शेजारी खुर्चीवर बसला आणि अनघा उठते का हे पाहू लागला तेव्हड्यात भटजींच्या बायको म्हणाल्या "तुम्ही जा आम्ही आहोत तिला जाग आल्यावर फोन करू आणि ती इथे राहिली तरी आम्हला काही प्रॉब्लेम नाही "


"नाही तुम्ही एवढे केलेत हेच खूप आहे मी वाट पाहतो तिला घरी नेतो "


आणि एवढ्यात सौरभ चे आई बाबा आणि अनघाचे आई बाबा आणि भाऊ तिथे पोहचतात अनघाला खूप माणसाच्या आवाजाने जाग आली तिने डोळे उघडले तर सगळीच तिच्या समोर होती 


अनघा च्या आईने अनघाला जाऊन मिठी मारली तशी मायेच्या कुशीत अनघा ओक्शाबोक्शी रडू लागली बाबांनी तिला शांत केले सौरभ आणि त्याचे आई बाबा फक्त अनघा कडे पाहत होते 


अनघाच्या आई बाबांनी आणि सौरभच्या आई बाबानी भटजी दाम्पत्याचे आभार मानले भटजी च्या बायको नि औषध लिहून दिली आणि काळजी घेण्यास सांगितले अनघाच्या बाबानी अनघाचा हात पकडला आणि अनघा काही दिवस आमच्याकडे राहील असे सांगून निघाले सौरभ आणि त्याचे आई बाबानी काहीच उत्तर दिले नाही अनघाने एक नजर सौरभ वर मारली तर तो तिच्या नजरेस नजर मिळवण्यास भीत होता असे तिला जाणवले पण बरं वाटत नसल्याने तिनी काहीही म्हटले नाही आणि ती आपल्या आई बाबा बरोबर निघून गेली 


तसे सौरभच्या बाबानी देवाला हात जोडत म्हटले "देवा गणेशा पावलास आमची अनघाला सुखरूप ठेवलेस अशीच तिला सुखात ठेव "


"हो बाबा आता अनघा फक्त सुखात राहील "


"म्हणजे सौरभ "?


"मी एक निर्णय घेतला आहे "


"निर्णय आणि तू आणि कसला "


"कळेच तुम्हाला "


"सौरभ पण कसला निर्णय "


"आई सांगितले ना कळेल आता नाही सांगू शकत "


"म्हणजे तू असा काय बोलतोस "


"उमा हि वेळ प्रश्नाची नाही त्यांनी काही ठरवलं असेल तर त्याला ते करू दे त्याचे आयुष्य आता तरी त्याला जगू दे सौरभ जो काही निर्णय घेशील तो फक्त तिच्या सुखाचा असू दे "


"हो बाबा "


सौरभ च्या आईने ह्यावर गप्पच राहणे पसंद केले सौरभ चे बाबा मात्र सौरभच्या त्या निर्णयांकडे डोळे लावून बसले कुठला असेल निर्णय जो अनघाचे सुख पाहिलं ?

"काय वाट लावून ठेवली माझ्या पोरीची येऊ दे त्या सौरभला आणि त्याच्या आई बाबांना जाप विचारल्या शिवाय राहणार नाही "


"शांत व्हा तुम्ही "


"काय शांत व्हा पाहिलंस ना अनघाची काय अवस्था झाली ती देव पावला म्हणून ती सुखरूप मिळाली "


"होय हो खरं बोलात पण उगाच रागात बोलून अनघाला त्रास नको "


"होय ते हि आहे आराम करू दे तिला "


तिथे सौरभच्या घरी हि अनघा जाण्याने गंभीर वातावरण निर्माण झाले होते सौरभ गप्प गप्पच होता हे पाहून सौरभच्या बाबांनी सौरभला बोलते करण्याचा प्रयन्त केला 


"सौरभ अनघाला फोन केलास "?


"नाही बाबा "


"का रे "?


"नाही "


"हिम्मत होत नाही ना कळत मला सौरभ तुझ्या मनात काय चालू आहे सौरभ मला वाटत तू तिला भेटून यावंसं तू तिचा नवरा आहेस आणि एवढे दिवस तिची जबाबदारी झडकलीस पण आता नको "


"नाही बाबा भेटणे '


"का सौरभ तिला पण वाटत असेल ना की तू तिला भेटायला यावेस आता तरी आपली जबाबदारी सोडून नकोस "


"बरं बाबा उद्या जातो" असे म्हणून सौरभ गप्प राहिला


दुसरा दिवस उजडाला सौरभ अनघाला भेटण्यासाठी निघाला आणि काही तासात अनघाच्या घरची बेल वाजली तशी अनघाच्या आई ने दरवाजा उघडला 


"सौरभ तू ये आता ये "


सौरभला पाहतच अनघाच्या बाबाचा पारा चढला पण आईने त्यांना खुणेने शांत केले तसे ते गप्प राहिले 


"अनघा कुठे आहे "?


"आपल्या रूम मध्ये आहे तिथेच भेट तिला "असे सांगून आई किचन मध्ये गेली सौरभ अनघाच्या रूम कडे वळला अनघा जागी होती नुसती   बेड वर पडली होती सौरभला पाहतच ती उठली 


"सौरभ तू बस  "?


"हो कशी आहेस ?"


"मी बरी आहे"


आणि सौरभ अनघाला पाहत गप्पच बसला तसे अनघाने विचारले " काय झालं गप्प का "?


"काय बोलू अनघा"


"म्हणजे "?


"अनघा सॉरी तुला खूप त्रास झाला पण माझी चूक मला कळली आहे नवरा म्हणून मी कधीच तुझा विचार केला नाही खूप त्रास दुःख दिले म्हणून तुझ्या ह्या स्थितीला मी जबाबदार आहे पण आता नाही ह्या पुढे तुला कुठलाच त्रास नसेल तू फक्त सुखात अशील "


"म्हणजे "?


"खूप दुःख सहन केलंस तू आता फक्त सुख "


"म्हणजे तुला नेमके काय म्हण्याचे आहे "


"सांगेन तुला येतो मी तोपर्यंत तू काळजी घे"


असे म्हणून सौरभ निघाला अनघा त्याला पाहत राहिली  हॉल मध्ये अनघाचे आईबाबा बसले होते त्याची नजर चुकवत" येतो म्हणत" सौरभ निघून गेला काय चालत असेल सौरभच्या मनात खरचं तो विचार करत असेल अनघाच्या सुखाचा की आणखी काही चालत असेल त्याच्या मनात ?


सौरभ अनघाच्या घरून आपल्या घरी परतला त्याचे आईबाबा हॉल मध्ये बसले होते तो काहीही न बोलता आपल्या रूम मध्ये गेला सौरभ ची आई मागे जाण्यास निघाली तेव्हा सौरभच्या बाबांनी तिला अडवले 


"थांब जरा आता आला तो लगेच प्रश्नोत्तर सुरु नको करू "


"हो माहित आहे मला "


एवढ्यात सौरभ हॉल मध्ये आला आणि गप्प समोर बसला 


"काय झालं सौरभ कशी आहे अनघा"? 


"बरी आहे "


"काय म्हणाली अनघा "?


"काय म्हणले "


"म्हणजे "?


"काय म्हणणार "


"अरे तिने काहीतरी म्हटले असेल ना "


"नाही मीच तिला संकेत देऊन आलोय "


"संकेत कसला "?


"तिच्या सुखाचा "


"म्हणजे सौरभ "?


"बाबा माझा निर्णय झाला आहे "


"कसला निर्णय "?


"मी अनघाला माझ्या नात्यातून स्वखुशीने मुक्त करणार "


"काय हे काय बोलतोस ?"


"हो आई मला अनघाला आता सुखात पाहायचे आहे खूप दुःख दिली त्रास दिला "


"अरे पण लोक काय म्हणतील" 


"लोकांचं काय आई अनघा ने  सहन केलं ते खूप आहे आणखी मला तिला दुःख नाही द्यायचे "


"अनघाला माहित आहे "


"नाही बाबा"


"मग तू हा निर्णय स्वतः कसा घेतोस "?


"मग काय करू बाबा अनघा जर इथे परत आली तर परत तेच होईल "


"म्हणून तू नाते संपवणार म्हणजे परत एकदा तिचे मन दुखावणार"? 


"बाबा तिला जर तेच हवे असेल तर "


"हे तिनी तुला सांगितले जर तिला हे नाते नको असते तर ती तुझ्या बरोबर हि दोन वर्ष काढलीच नसती सगळं काही सहन केलं नसत मन मारून जगली नसती "


"मग बाबा मी काय करू परत तिला ते सहन करायला लावू "


"

नाही ते ती परत सहन नाही करणार आणि हो तुमचे नाते हि नाही तुटणार "


"म्हणजे "?


"तुम्ही वेगळे राहा "


"काय हे तुम्ही काय बोलता स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला वेगळं राहा म्हणून सांगता "


"मग मी काय सांगू उमा तू तर बदलणार नाहीस मग काय पोराचा संसार तुटू दे "


"मी एव्हडं काय केलंय कि सगळे खापर माझ्यावर फोडतात "


"काही नाही केलंय तू सौरभ तू आणि अनघा वेगळे राहा कधी आम्हला भेटायला या "


"नाही मी सौरभला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही तुम्ही दोघे इथेच राहा "


"आणि तुझी लुडबुड चालू राहू दे  हो ना "?


"मी कसली लुडबूड करते मुलगा आहे तो माझा त्याची काळजी घेतली तर कसली लुडबुड "


"हो का तू त्याची काळजी म्हण्यापेक्षा त्याच्यावर हक्क जास्त गाजवते ते काही नाही सौरभ तुम्ही वेगळे राहा दुरून तुमचा सुखाचा संसार आम्ही पाहू "


"अहो पण नाही सौरभ तू मला सोडून नाही जाऊ शकत" 


"जरा गप्प बसता तुम्ही दोघे तुम्ही तुमची मते सांगून मोकळे झालात मला विच्रारलात माझं काय मत आहे नाही कसे विचारणार लहानपानापासून आजपर्यंत माझं मत मी कधी सांगितले नाही म्हणून आज ही त्याची गरज नाही "


"आई तुला वाटत मी तुझ्यापासून दुर जाऊ नये बाबा तुम्हला वाटत मी अनघाचा विचार करावा आणि वेगळे राहावे इथे आड आणि इथे विहीर अशी अवस्था माझी झाली आहे आई लहानपणासून आजपर्यत मी फक्त तुझं ऐकत आलोय ते हि सगळं तुझ्या विचारा पासून राहणीमान पर्यंत आजकालची मूल आपल्याला आवडतात तसे जगतात पण आई तू मला तसे कधी जगूच दिले नाही तुझी आवड तीच माझी आवड झाली तुला माहित आहे मला दाढी ठेवलेली आवडते पण तुला ते मवाली असल्याचे लक्षण वाटते म्हणून तू मला नेहमी क्लीन शेव करत जा असे सांगते अनघाने हि मला म्हटले होते कि दाढीत तू हँडसम दिसतो पण तुला आवडत नाही म्हूणन मी कधी ठेवली नाही आई माझ्या बाकीच्या मित्रांना पाहून मला असा विचार येतो कि खरंच मी मोठा झालो  आहे का कि अजून हि मी लहान आहे कळसूत्री बाहुला  जो तुझ्या इशाऱ्यावर नाचणारा मी आयुष्यात आजपर्यत माझ्या मनाप्रमाणे जगलो नाही आणि माझ्या अश्या वागण्याची शिक्षा मात्र मी अनघाला दिली आई मी असे नाही म्हणत कि तू माझ्यावर जुलूम केलास पण तुझ्या अति प्रेमापोटी मला खऱ्या आयुष्यात मात्र हरवलंस "


सौरभचे डोळे डबडबले त्याने बाबा कडे पाहत म्हटले


"तुम्हला काय वाटत बाबा मला अनघा पासून दूर होण्याचा निर्णय घेताना  दुःख झाले नाही खूप दुःख झाले बाबा पण फक्त अनघाच्या सुखाचा मी विचार केला त्या मुलीने माझ्यासाठी खूप सहन केले एक नवरा म्हणून मी तिला कधीच सुख दिले नाही मग तिच्या परत येण्याची आशा मी कशी बाळगू शकतो म्हणून मी हा निर्णय घेतला तिला सुख देणारा जोडीदार मिळू दे एवढेच माझे म्हणे आहे माझ्यासाठी मी तिच्या आयुष्याची राख रांगोळी नाही करू शकत त्यामुळे मी माझ्या निर्णयाशी ठाम आहे आणि प्लिज मला ह्या बदल तुमचे मत नकोय"


काय होईल आता अनघा आपल्या सुखासाठी स्वीकारेल का सौरभ चा निर्णय आणि हेच मत असेल का अनघाचे?

अनघा आपल्या लाडक्या बाप्पाच्या मूर्ती समोर बसून मनातल्या मनात बोलत होती '"देवा तूच स्वर्गात जोड्या जुळवतो असे म्हणतात मग खरचं माझ्या नशिबी सौरभच होता की माझा निर्णय कुठेतरी चुकला सुख समाधान  मिळावी अशी अपेक्षा होती पण ती काही मिळाली नाही मिळाले फक्त दुःख आणि यातना माझं काय असे चुकले होते कि मला सौरभच्या प्रेमासाठी हि परीक्षा दयावी लागते आणि कधी पर्यंत देवा माझं गुपित तुलाच माहित आहे कि मला आमच्या कॉलेज मधला सिद्धार्थ आवडायचा पण हि गोष्ट मी त्याला कधीच सांगितली नाही आणि कोणालाच कळू दिली नाही  प्रेमात पडण्याची हिम्मत हि नव्हती आई बाबांना उगीच त्रास नको म्हणून मी त्या वाटेला गेले नाही आणि माझे प्रेम माझ्या मनातच राहिले आई बाबा ज्याला निवडतील त्यालाच आपलं सर्वस्व मानावे आणि तसे मानले देखील पण प्रेमाची परतफेड दुःख यातना आणि एकटेपणाने झाली 


आज कधी कधी मनात येत कि खरंच जर मी सिद्धार्थला माझ्या प्रेमाविषयी सांगितले असते तर आणि त्याच्या मनात जर तेच असते तर आज आम्ही एकत्र असतो पण देवा सौरभ तसा माणूस म्हणून वाईट नाही पण काही अटी नियमांनी एव्हडा बांधला कि त्याच्यासमोर तो असमर्थ आहे आणि माझ्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा पुढे काय होणार माहित नाही माझं भविष्य मला अंधारात दिसते ह्या नात्यातून बाहेर पडणे हाच एक सुखकर उपाय आहे  पण त्यातून होणारा त्रास मला माहित नाही बाप्पा मी काय करू मला काय हवे सगळ्याचा विचार येतो मनात पण माझं सुख मलाच कुठे आहे कळत नाही  बाप्पा तुझ्या आशीर्वादाने माझ्या नवीन संसाराची सुरवात  झाली होती आता माझ्या संसाराची गाडी तूच रुळावर आण एवढेच मागते असे म्हणून अनघा रडू लागली तिच्या हुंद्क्याचा आवाज आईच्या कानावर पडला ती लगेच अनघाच्या रूम मध्ये आली 


"काय झालं अनघा डोळे का भरले "?


"काही नाही बाप्पाला माझ्या आयुष्याची कहाणी सांगत होते "


"बाळा काय बोलू पण एवढेच सांगते बाप्पा तुझा संसार सुखाचा नक्की करेल "


"त्याचीच वाट पाहत आहे "


"अनघा मी तुला विचारलं नाही पण त्या दिवशी सौरभ काय म्हणाला "


"काही वेगळे बोलून गेला "


"म्हणजे "?


"तू फक्त आता सुखात राहणार असे काहीतरी "


"म्हणजे "?


"मी विचारलं तर नंतर सांगतो म्हणाला "


"म्हणजे नेमके काय चालाय त्याच्या मनात "


"तेच कळत नाही आई "


एवढ्यात अनघाचा फोन वाजला सौरभच्या बाबाचा फोन आहे हे पाहतच अनघा ने लगेच उचला 


"हॅलो बाबा" 


"हा बाळा कशी आहेस "?


"मी बरी आहे तुम्ही कसे आहात "


"आता पर्यंत तरी बरा आहे पुढे माहित नाही "


"म्हणजे बाबा "?


"बाळा एक गोष्ट कानावर घालायची होती तुझं मत यावर काय आहे हे मी तुला नाही विचारणार फक्त शांतपणे ऐकून घे मग तुला वाटत ते तू कर तुझा कुठलाही निर्णय आम्ही स्वीकार करू "


"पण बाबा काय झालं "?


"सौरभ तुला येऊन आता तू फक्त सुखात अशील असे म्हणाला याचा अर्थ तुला कळला "


"नाही बाबा तोच विचार मी करत होते तुम्हला माहित आहे का "?


"बाळा तो तुला स्वखुशीने आपल्या नात्यांतून वेगळं करण्यास तयार झाला आहे "


"काय "?"


"हो त्याचे असे म्हणे आहे कि तू परत आल्यावर तेच सहन करशील आणि त्याला तुला दुःख द्याचे नाही "


"पण बाबा "


"अनघा ह्यावर मी त्याला एक उपाय सांगितला कि तुम्ही दोघे वेगळे राहा मग झाले तर तो ऐकायला तयार नाही त्याचे म्हणे हि खरे आहे तू म्हणून सहन केले  सगळे आता तो कुठल्या आशेवर तुला परत ये म्हणून सांगेल अनघा ह्यवर तुझे काय मत आहे हे मी तुला नाही विचारणार बस मला वाटलं कि हि गोष्ट तुझ्या कानावर घालावी बाकी निर्णय आता तुझाच असेल तो तर आपल्या निर्णयाशी ठाम आहे आणि मला त्याने ह्या विषयावर न बोल्य्ण्यास विनंती केली आहे "


"काय "?


"हो अनघा "


"ठेवतो काळजी घे बाळा "


अनघाने फोन ठेवला आणि बाप्पाच्या मूर्ती कडे पाहू लागली काय असेल अनघाच्या मनात बाप्पा आणेल का तिचा संसार रुळावर कि अनघा घेईल कायमचा सुखकर उपाय?

सौरभच्या निर्णयाने त्याच्या घरात शांतता पसरली होती प्रथमच सौरभ ने असा काय निर्णय घेतला होता कि त्यावर तो ठाम होता हयामुळे त्याचे आई बाबा दोघे हि चिंतेत पडले नेहमी आईच्या निर्णयापुढे तो काहीच बोलायचा नाही पण ह्यावेळी मात्र तो काहीच ऐकायला तयार नव्हता त्यामुळे त्याची आई अधिक चिंतेत पडली होती 


"ऐकता हो सौरभ शी बोलून पहा अहो संसार मोडला तर लोक काय म्हणतील आणि माझं नेहमी ऐकणारा आज माझं ऐकत हि नाही "


"कसा ऐकणारा तू त्याला कधी पोहूच दिले नाही आज तो आयुष्यच्या समुद्रात फरकटला आहे आता पाणी गळ्यापाशी आले तेव्हा त्याला आपल्याला पोहता आले पाहिजे ह्याची जाणीव झाली "


"झाले तुम्ही काही झाले तरी माझाच दोष करणार मलाच दोषी ठरवणार "


"नाही तर काय करू आज ह्या सगळ्याला तू जबाबदार आहेस आता तूच समजावं तुझ्या मुलाला "असे म्हणून सौरभचे बाबा रागाने बाहेर गेले 


संध्यकाळाची वेळ अनघा कॅफे अरोमा मध्ये कोणाची वाट पाहत बसली होती तिच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते तिने घड्यळाकडे पहिले आणि समोर पहिले आणि तिचा चेहरा जरा खुलला तो आला आणि अनघाच्या समोर बसला तो हि गप्प मग अनघाने बोलते केले 


"कसा आहेस "?


"बरा आहे तू कशी आहे आता बरं वाटत ना "?


"हो आता बरी आहे "


"कशाला बोलवलंस "?


"का तूला  यायचं नव्हतं कि परवानगी मिळाली नाही "


"तसं नव्हे प्लिज मला टोचून बोलू नको "


"सॉरी म्हणजे तू आज घरी न सांगता मला भेटायला आलास "


"हो "


"बरं त्या दिवशी तू आमच्या घरी आलास तेव्हा तू आता फक्त सुखात अशील असे म्हणालास त्याचा अर्थ नेमका काय आहे "?"


"बरं झालं तूच हा प्रश्न विचारलंस नाही मी सांगणार होतो पण अनघा मला माहित आहे कि बाबांनी तुला फोन केला "


"नाही सौरभ "


"माझे बाबा आहे ते अनघा त्यांनी किती हि प्रयत्न केले तरी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे "


"निर्णय कसला "?


"अनघा मी स्वखुशीने तुला आपल्या नात्यातून मुक्त करणार खूप सहन केलंस तू आता मला परत तुला माझ्या आयुष्यात आणून त्रास नाही द्यायचा त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे तू मला डिवोर्स दे आई बाबांना तुझ्या साठी चांगला जोडीदार म्हणून माझी निवड केली होती पण ती फोल ठरली ह्या वेळी तुझ्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न कर आणि सुखाचा संसार कर तुझे सुख पाहून मला मनाला शांतता  मिळेल "


" आणि तू काय करणार "?


"मी काय एकटा राहणार तुझी सोबत असून सुद्धा मी तुला एकटे पाडले "


"कधी पर्यत तू एकटा राहशील "?


"अनघा मी चांगला नवरा नाही होऊ शकत तुझ्या भावनांशी मी खेळलो  आता परत नको अनघा मला माफ कर येतो मी "


"थांब सौरभ तुझं म्हण तू सांगितलंस माझं पण ऐकून घे तुझं म्हण मला पटतंय तू जे काही बोलास खरंच आहे आपल्या लग्नाला तीन वर्ष झाली सौरभ आपल्या नात्यात तो गोडवा नव्हताच एकमेकांविषषी प्रेम आतुरता मला कधीच दिसली नाही आपण फक्त नात्याने एकमेकांचे झालो होतो ह्यात तुझं चुकला असं नाही आहे आईनी तुला नेहमी अटी नियमांनी बांधून ठेवले त्यामुळे तू माझ्या मनाचा विचार करणे विसरला मला आठवत हि नाही कि आपण असा निवांत वेळ एकमेकांसोबत कधी घालवा मला पण तुझा खूप राग यायचा "


"म्हणून तर अनघा मी हा निर्णय घेतला जो तुला माझ्यापासून दूर नेईल "


"पण त्या सहवासाचा काय "?


"सहवास "?


"हो जो तुझ्याबरोबर मी तीन वर्ष घालवला आपले नाते एवढे चांगले नव्हते पण नकळत मी तुझ्या प्रेमात पडले "


"काय प्रेमात अनघा मी तुझ्याशी कधीच चांगला वागलो नाही आणि "


"एकदा सप्तपदीच्या नात्यानं बांधल गेलं कि ते नाते प्रेमानेच बहरते माझा जीवनसाथी हे मनाशी स्वीकारून मी तुझ्या प्रेमात पडले पण तू मात्र तसे नाही केले माझा प्रेमभंग केलास आणि आता हा निर्णय तुला त्या सहवासाचा अर्थच कळला नाही मग त्या सहवासात असून  तरी काय फायदा "


"सौरभ उद्या मी घरी येईन तेव्हाच माझा निर्णय सांगेन कारण मला निर्णय तुझ्या आई समोर सांगायचा आहे भेटू उद्या "


काय असेल अनघा चा निर्णय सौरभ आणि अनघाच्या नात्याचा होईल का पूर्णविराम ?

"आई बाबा तुम्ही काहीच चिंता करू नका मी सगळं काही पाहीन "


"पण बाळा त्याना जाप विचारायला नको ते तुझ्याशी कसे वागले त्या दिवशी सौरभला विचारणार होतो पण तुझ्या आईने मला रोखले "


"मी रोखले फक्त त्याचे म्हणे काय आहे ते पाहण्यासाठी पण आता नाही आम्ही हि सोबत येऊ तुझ्या "


"आई बाबा तुम्ही नको मी एकटीच जाईन माझ्या आयुष्याचा निर्णय मला घेऊ द्या "


"अगं पण कोणता निर्णय घेतला आहे तो तरी सांग "?


"नाही आई बाबा तिथून आल्यावरच सांगेन पण हा माझा निर्णय मात्र माझा सुखाचा असेल खूप त्रास काढले आता नाही येते मी "


असे म्हणून अनघा सौरभच्या घरी निघण्यास बाहेर पडली पण आई बाबाच्या मनाला घोर लागला 


सौरभच्या घरी अनघा येण्याची खबर होती म्हणून तिघेही तिची वाट पाहत होते सौरभ तर आपल्या निर्णयणावर ठाम होता पण त्याच्या आई बाबाच्या काळजात धडकी भरली'होती एवढ्यात दरवाजाची बेल वाजली सौरभच्या बाबांनी दरवाजा उघडला 


"अनघा ये "


"कसे आहात "?


"ठीक आहे ये "


सौरभ आणि त्याची आई सोफ्यावर बसली होती 


अनघाला पाहून सौरभ मिश्किल हसला तशी ती समोर बसली सौरभची आई तिला पाहून जरा गंभीर झाली अनघाने सगळ्यावर नजर मारली आणि बोलायला सुरवात केली 


"मी सौरभला सांगितलेल्या प्रमाणे आज माझा निर्णय इथे सांगायला आले आहे तो फक्त शांत पणे ऐकून घ्या बाबा तुमच्यापासून सुरवात करते "


"बाबा मी ह्या घरात सून म्हणून आले त्या दिवसापासून तुम्ही मला तुमची मुलगी मानले माझ्या बाबा पासून दूर आले पण मला तुमच्या रूपात मला माझे बाबा मिळाले माझ्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाशी भांडलात  मुली प्रमाणे प्रेम दिले थँक क्यू बाबा तुमच्या ह्या प्रेमासाठी "


हे ऐकून सौरभच्या बाबाचे डोळे भरले ते आपले डोळे पुसत म्हणाले "नाही अनघा थँक क्यू तर मी तुला म्हणल्या हवे तुझ्या सारखी सून मुलगी म्हणून मिळाली हे माझे नशीब बाळा "


हे ऐकून अनघा हि हळवी झाली पण स्वतःला सावरत तिने सौरभच्या आई कडे पहिले "आई मी लग्न होऊन आले तुम्हाला माझी आई च मानले तुम्ही माझ्याशी काही वाईट नाही वागलात मला सौरभला तुमच्यापासून दूर करायचे नव्हते त्यांनी तुम्हा दोघांचा आदर करता माझ्या भावना समजून घ्यावी एवढीच अपेक्षा होती पण ज्या तऱ्हेने तुम्ही सौरभला वागवता हे पाहून मात्र माझ मानसिक आरोग्य बिघडल तुमच्या मुलाला तुम्ही स्वलंबी न बनवता तुमच्या वर अवलंबून ठेवले हाचे परिणाम मात्र आमच्या नात्यावर पडले जो स्वतःची काळजी नाही घेऊ शकत तो माझी जबाबदारी काय सांभाळणार तुमचा मुलगा आपल्या शब्दाच्या बाहेर नाही ह्याचा तुम्हाला गर्व आहे पण तुम्ही तुमच्या अश्या वागण्याने सौरभला त्याच्या आयुष्यात मात्र मागे टाकले आणि ह्याचा परिणाम आज तुमचा मुलगा हे नाते तोडू पाहतो आणि आज पाहा तो तुमचं ही ऐकत नाही कसा ऐकणार आज प्रथमच आपल्या आयुष्याचा आपला निर्णय घेतला मला आणखी काही बोलायाचे नाही जे आहे ते समोर दिसत आहे "


सौरभ अनघा कडे पाहत राहिला कारण आजच्या अनघात त्याला बदल दिसत होता नेहमी घरात कमी बोलणारी आज निर्भीड पणे बोलत होती


अनघाने सौरभ कडे पाहिले आणि तिला भरून आले तरी सावरत ती म्हणली "सौरभ मला आता  तुला  निर्णय सांगायचं आहे "

 

काय असेल अनघाचा सौरभ साठी निर्णय?

"सौरभ तुला काय सांगू सगळ्या मुली लग्नापूर्वी आपल्या साथीदाराबद्दल स्वप्न पाहतात तसे मी हि पहिले आणि तुझ्या आयुष्यात आले तुला सर्ववस्व मानले माझी अपेक्षा मोठ्या नव्हत्या पण तू मला कधीच आपले माझी बायको असे मानलेच नाही मग अपेक्षा पूर्ण करणे तर पुढची गोष्ट आपण एकमेकांना कधी वेळच दिला नाही आणि तुला दयावा असं कधी वाटलं नाही आपण सोबत होतो पण मनाने नाही  मला पण वाटायचं कि तुझ्या सोबतीत समुद्र किनाऱ्यावर फिरायचं तुला प्रेमाने एक घास भरवायचा कामावरून आल्यावर तुझ्या खांद्यावर डोके ठेऊन सगळा  थकवा घालव्याचा पण आपल्यात तसे काहीच झाले नाही तू फक्त आई साठी लग्न झाला पण ते नाते मात्र तुला सांभाळता आले नाही मी मात्र आपले नाते टिकवण्याचा प्रयन्त केला तुझे सगळे आई करत असल्याने तुला माझी गरज च लागली नाही त्यामुळे आपल्या नात्यात कधी आपलेपणा दिसला नाही असो  आता बोलून काही फायदा नाही 

पण सौरभ आज तू माझा विचार करून हे नाते तोडायला चालास आज माझा तू विचार करायला लागलास तर तू मला तुझ्यापासून दूर करत आहेस माझ्या सुखाचा विचार करत आहेस पण ते कोणा दुसऱ्यासोबत हे पाहून मला खूप वाईट वाटत आहे माझ्या मनातल्या भावना तुला नाही कळणार कारण त्या तुला कधी कळल्या नाही मी तुझ्या सोबत होते पण तुझ्या मनात नाही तरी पण मी हा निर्णय विचारपूर्ण घेतला आहे मी हे नाते नाही तोडू शकत "


हे ऐकून सौरभ म्हणाला "काय अनघा हे तू काय बोलतेस मी तुला खूप त्रास दिला त्यातून तुला बाहेर काढण्याचा प्रयन्त करत आहे तर तू कशाला परत त्यात गुंतण्याचा प्रयत्न करत आहेस अनघा मी तुला खुश नाही ठेऊ शकत तू जा माझ्यापासून दूर जा आणि सुखात रहा" 


हे ऐकून अनघाचे डोळे डबडबले ते पुसत ती म्हणाली "सौरभ प्रेम प्रेम माहित आहे का तुला ते केलं मी तुझ्यावर आणि तू एका सहीवर माझे प्रेम संपवायला निघालास अरे तू आज स्वतः निर्णय घेतला हाच बदल मला तुझ्यात हवा होता मी हे नाते तोडायला तयार नाही पण मला त्या दुबळ्या सौरभला नाही भेटायचं आज मला स्वालंबी सौरभ बरोबर माझे पुढचे आयुष्य काढायचे आहे ते हि सुख आणि समाधानात तू हा निर्णय माझ्या सुखासाठी घेतलास पण हे दाखवून दिलंस कि तू किती कमजोर आहेस तू ह्यातून सुटून  माझ्यावर घटस्फोटित म्हणून झिक्का मारणार आहेस का? मग मी पुढचे आयुष्य काही चूक नसताना का तसे जगावे सांग ना जर तुला जबाबदारी घ्याची नव्हती तर लग्नच करायचे नव्हते ना आपली भेट झाली असती ना हे सगळे कारनामे त्यामुळे आता निर्णय तुला घ्याचा आहे मी काही हे नाते तोडू शकत नाही आणि माझ्या परवानगी शिवाय तू ह्या नात्यातून मुक्त होऊ शकत नाही पण मला हा बदलेला सौरभ हवाय दुबळा सौरभ नको "


"एवढे सहन करून परत माझ्याकडून अपेक्षा कशी ठेवू शकतेस नको नको मुक्त हो ह्या नात्यातून "


"सौरभ प्रेम काय असत ह्याची जाणीव तुला नसेल पण मला आहे माझा निर्णय मी सांगितला आहे तुला मला परत तुझ्या नव्या आयुष्यात आण्याचे असेल तर तू माझ्या घरी येऊन मला घेऊन  जाऊ शकतो पण तुझा निर्णय जर नात्यातून मुक्तता असेल तर माझा त्याला नकार असेल आणि माझा घटस्फोट झाल्याशिवाय मी  काही तुच्या म्हण्यानुसार दुसरे लग्न नाही करू शकत आता तूच विचार कर माझं खरं सुख  कशात आणि कोणासोबत आहे येते मी "


आणि अनघा निघून गेली ती आली होती आपला निर्णय सांगण्यासाठी पण तिनी सौरभलाच प्रश्नचक्रात अडकवले  आता काय असेल सौरभचा  निर्णय ?

अनघा सौरभ च्या घरातून निघून गेली आणि सौरभच्या घरात शांतता पसरली सौरभ चे डोळे डबडबले तो आपले डोळे पुसत बसला होता सौरभचे बाबा हि डोक्याला हात लावून बसले होते आई जरा गंभीर होती 


सौरभच्या बाबांनी सौरभला पाहत म्हटले "पाहिलंस सौरभ आता कळे  असेल अनघा कशी आहे ती तू कसा असला तरी तिनी तुझ्यावर प्रेम केलं ती नाते तोडायला तयार नाही दुसरी कोण असती तर एवढ्यात सही करून मोकळी झाली असती आता तरी सुधार तिचा विचार कर तूच नशीब म्हणून अनघा सारखी बायको मिळाली हि संधी जर तू सोडलीस तर तुझे आयुष्य भरकटेल तीच तुझे आयुष्य सावरू शकते मी आणि तुझी आई तुझ्या सोबत किती वेळ असू विचार कर अनघा शिवाय तू अपूर्ण आहेस माझं म्हण ऐक तू आणि अनघा वेगळे राहा कधी आठवण आली तर भेटायला या तुम्ही सुखात तर आम्ही हि खुश राहू "


"आणि उमा तू ह्यात काहीच बोलणार नाहीस तुझ्या मुलाची काळजी तू घेतलीस आता त्याची बायको आली आहे ती घेईल आता मला तुझी लुडबुड नको आहे तुझा मुलगा ती हिरावून नाही घेत आहे अगं आपला मुलगा कसा आहे हे तुला माहित आहे त्या नवीन मुली बरोबर त्याचे चांगले नाते जमावे ह्या साठी प्रयंत्न करायचा सोडून तू आपलीच बाराखडी गिरवलीस आणि काय झालं लग्न करून हि आई शिवाय त्याची गाडी पुढे चालेना मग त्या बायको म्हणून आलेल्या मुलीचे काय ?हा विचार तुझ्या मनात कसा आला नाही आणि त्यात तू तिच्यावर दोष लावून बसलीस पण खरी चुकी कोणाची कळताच मात गप्प बसलीस तुला का वाटत तुझ्या शिवाय सौरभ जगू शकत नाही तो तुला सांगत नसेल पण तुझे अति प्रेम त्याला जीवाशी आले आहे म्हणून तर तो अनघाला यातून सोडवण्याचा प्रयंत्न करत आहे उमा सुधार आता सौरभ आपला मोठा झाला आहे त्याला त्याची जबाबदारी स्वीकारू दे पडेल तर त्याला परत उभा राहण्यासाठी प्रयत्न करू दे तरच तो सुखात राहील"


"सौरभ असा गप्प बसू नकोस काय तो निर्णय लगेच घे एकदा वेळ निघून गेली ना कि मग तू काहीच करू शकत नाही तुझे भविष्य मला फक्त आणि फक्त अनघाच्या हातात सुरक्षित वाटते आमचा कुठलाच विचार न करता स्वतःचा विचार कर त्यातच तुझं भलं आहे एवढे दिवस तू आईचा बाळ होतास पण आता स्वतःचा विचार कर मी असं नाही म्हणत कि तू आई ला विसर पण तिला पण दाखवून दे कि तू समर्थ आहेस "


सौरभ ची आई मान खाली घालून सर्व ऐकत होती तिचे हि डोळे डबडबले होते पण एक शब्द काही निघत नव्हता 


सौरभ काहीही न बोलता आपल्या रूम मध्ये गेला आणि दरवाजा लावून घेतला आणि त्याची नजर त्याचा आणि अनघाचा सोबत असलेल्या फोटोवर गेली 


"का अनघा का असा निर्णय घेतलास माझ्यावर प्रेम अगं मी कधी तुझ्यावर प्रेम केलंच नाही आणि तू माझ्यावर कशी काय प्रेम करू शकतेस का तुला माझ्याबरोबर पुढचे आयुष्य घालव्याचे आहे नाही ठेवू शकत मी तुला खुश नाही ठेवू शकत असे म्हणून तो रडू लागला त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून आई बाबांनी त्याला बाहेरून हाक दिली "सौरभ दरवाजा उघड "


त्यांनी यातूनच आवाज दिली "प्लिज मला एकटे सोडा मला कोणाशीही आता बोलायचे नाही "


हे ऐकून सौरभ ची आई म्हणाली "बाळा दरवाजा उघड रे असे बोलू नकोस "


"प्लिज सोडा मला जरा एकटे "


हे ऐकताच सौरभच्या बाबांनी आईचा हात पकडून तिला हॉल मध्ये आणून बसवले दोघे हि ५ मिनिटे गप्प बसली पण सौरभ दरवाजा काही उघडेना हे पाहून सौरभची आई म्हणाली 


"अहो सौरभला दरवाजा उघडायला सांगा तो काही जीवाचे "


"हि वेळ नाही हे बोलायची पण पाहिलंस नेहमी तू निर्णय त्याच्या माथी थोपवलेस आणि आज तो विचार चक्रात अडकला त्याला कळत कि काय करू आणि  काय  नको आता बोलून काय फायदा "


सौरभ चे बाबा उठले आणि सौरभच्या रूम बाहेर दरवाजावर   वर हात मारत आवाज दिला 


"बेटा सौरभ एवढेच सांग ठीक आहेस ना प्लिज जिवाचे काही करण्याचा प्रयत्न करू नकोस माझी शप्पथ आहे "


ह्यावर काहीच उत्तर आले नाही हे पाहून  


बाबांनी मोठ्यांनी सौरभला हाक दिली "सौरभ सौरभ "


काय असेल सौरभचे न उत्तर देण्यामागचे कारण ?

"सौरभ सौरभ "अशी हाक दरवाजा बाहेर   सौरभ चे आई बाबा दोघेही देत होते  आणि १० मिनिटनी दरवाजा उघडला समोर सौरभला पाहून दोघे ही त्याल्या पकडुन रडायला लागले

.

"वेड्या आमचा जीव टांगणीला लागला होता एवढा उशीर का केलास दरवाजा उघडायला "


"बाबा हे पहा "


'हे काय "?


"अनघाची डायरी ह्यात तिने सर्व काही लिहिले आहे "


"म्हणजे "?


"आपल्या मनाच्या भावना तिनी ह्या डायरीत बंद केल्या त्या वाचण्यात मी गुंग झालो खरचं मी किती वाईट वागलो तिच्याशी "


"चल बाहेर चल "


"नाही आई मी थोडा वेळ इथेच बसतो जा तुम्ही"


"अरे पण कसा अवतार करून घेतलास पाहिलास का ?"


"आई माझ्या चुकीची फळ आहेत ती "

 

"तु स्वतः ला का दोष देत आहेस "


"नाहीतर कोणाला देऊ मीच त्रास दिला ना तिला"


"सौरभ हे अती होतय तुझ"


"उमा त्याला एकांत हवा असेल तर जाऊया आपण बाहेर चल पण सौरभ तू काही "


"नाही बाबा तुम्ही निसकोच रहा "


तसे सौरभ चे आई बाबा दोघेही बाहेर गेले


अनघाच्या घरी अनघाने सर्व हकीकत आपल्या आई बाबाच्या कानावर घातली ते ऐकून


"तुला काय वाटत तो खरचं तुझ्यासाठी बदलेल "


"हो आई सौरभ मध्ये थोडा फरक आला आहे नाहीतर त्याने मझ्या सुखासाठी एवढा मोठा निर्णय आपल्या आई ला न सांगता घेतला नसता "


"ते ही बरोबर आहे पण जर तो आपल्या निर्णयाशी ठाम राहिला तर तू काय संपूर्ण आयुष्य असेच घालवणार आहेस


"बाबा त्याचा विचार नाही केला पण माझे मन सौरभ पासून दूर जाण्यास तयार नाही"


"काय म्हणावं तुला त्या माणसाने तुला सुख कधीच दिले नाही आणि तुला त्याच्यापासून दूर नाही जायचे "


"अहो तिनी तीन वर्ष काढली त्याच्याबरोबर स्त्रिया मनाने खूप हळव्या असतात तो कसा ही वागला तरी तिनी त्याला आपले मानले होते आणि आता जर तो बदलायला तयार आहे तर हे चांगले आहे "


"पण त्याने निर्णय कुठे सांगितला "


"बाबा तुमची काळजी मला कळते आपल्या मुलींच्या आयुष्यात असले वादळ असेल तर कोण ही शांत बसणार नाही पण बाबा सौरभ ला आपण एक संधी त्याला हवी "


"आणि अनघा तो आपल्या निर्णयाशी ठाम राहिला तर "?

ह्यावर मात्र अनघा निरुतर झाली

सकाळची ती वेळ दरवाजाची बेल वाजली दरवाजा उघड्यात आला अनघाच्या  आई ने दरवाजा वर सौरभला पाहिले आणि त्याला आत येण्यास सागितले तसे तो आत आला त्याला पाहून अनघा चे बाबा जरा गंभीर झाले अनघाच्या आईला पाहून सौरभ म्हणाला 


"अनघाला जरा बाहेर बोलवा मला बोलायचे आहे "


अनघाच्या आई ने अनघाला हाक दिली तशी ती बाहेर आली सौरभ ला पाहून तीचा चेहऱ्याचे भाव बदले अनघाला आणि त्याच्या आईला सौरभ ने बसण्यास सांगितले आणि तो काही बोलणार एवढ्यात अनघाचे बाबा त्याला पाहून म्हणाले 


"सौरभ तू इथे काय सांगण्यासाठी आला आहेस मला माहित नाही पण एवढेच सांगतो ह्या पुढे मी माझ्या मुली ला दुःखात पाहू शकणार नाही "


"बाबा मला कळतात तुमच्या भावना म्हणून तर मी असा निर्णय घेतला आहे जो अनघाच्या सुखाचा असेल अनघा मी तुला माझ्यापासून दूर करत होतो पण अनघा मी सुद्धा तुझ्यात तेव्हडाच गुंतत चाललो आहे हे मला कळले नाही आणि आपला दुरावा जर तुला दुःख देणार असेल तर आपण सोबत राहू हे नाते तुटणार नाही "


हे ऐकल्यावर अनघाच्या चेहऱ्यावर  अलगद पणे हसू आले पण आई बाबा मात्र ह्या प्रश्नात पडले कि पुढे काय होईल त्याच्या चेहऱ्यवरची चिंता सौरभ ने ओळखली आणि तो म्हणाला 


"चिंता नसावी मी तिला परत ते दुःख सहन करायला लावणार नाही अनघा मुळेच मला माझी चुकी कळली तिच्या मुळेच मी विचार करू लागलो पहिली फक्त हुकुमाचा दावेदार होतो पण आता नाही त्यामुळे मी वेगळे राहण्याचे ठरवले आहे "


ह्यावर आई बाबा चकित झाले अनघाने मात्र सौरभला पाहत विचारले 


"वेगळे "?


"हो अनघा तिथे राहिलो तर परत तेच होणार "


"पण तू हे घरी सांगितले "?


"नाही मी माझा निर्णय कोणालाच सांगितला नाही "


"मग ते काय समजतील "


"अनघा बाबा नि मला हा उपाय पहिली सांगितला होता त्यावेळी मला तो पटला नव्हता पण आज तोच उपाय आपल्या नात्याला वाचवू शकतो आणि बाबाची आपल्या वेगळे राहण्यास परवानगी आहे "


"आणि आईची "?


"ती नाही देणार परवानगी "


"मग तिच्या परवानगी शिवाय "


"अनघा आपण वेगळे राहिलो  म्हणजे आई बाबाना विसरणार असे तर नाही आपण त्याची ख्यालीखुशाली घेऊ कि "


"तरी पण त्याना असे च वाटेल कि मी तुला त्याच्यापासून दूर केले आणि लोक हि हेच म्हणतील कि एकुलत्या एक मुलाने आई बापाला वाऱ्यावर सोडले "


"अनघा लोकांचे काय काहीही बोलतील हेच उपाय आहे ह्यावर नाहीतर  काय करणार परत तेच चालू राहणार नको माझं ऐक आपण वेगळे राहू आपण काय त्यांना वाऱ्यवर सोडत नाही "


"सौरभ आपण आपल्याच घरी राहू आणि ते परत होणार कि नाही हे तुझ्या हातात आहे कारण पहा ना आता तू किती बदलास आहे स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ लागला आहेस आणि काय हवंय मला फक्त तुझी साथ मला गरजेची आहे आपण तिथेच राहू "


त्याच्या संभाषणाकडे अनघाचे आई बाबा फक्त डोळे लावून पाहत होते त्यांनी त्यात काहीच म्हटले नाही 


अनघाने सौरभला समजावले तसे तो हि तयार झाला अनघा लगेच तयार होऊन आली आई बाबाना  पाहून तिनी मिठी मारली आई बाबा सुद्धा भावुक झाले दोघे हि सौरभ समोर उभे राहिले आणि म्हणाले 


"माझ्या अनघा मध्ये खूप समजुदार पणा आहे म्हणून तिनी फक्त आपला विचार केला नाही तुझ्या आईवडिलाचा सुद्धा विचार केला तू तिला परत घेऊ जात आहेस पण तिच्या सुखाची जबाबदारी तुझी तिनी खूप त्रास सहन केले पण आता तरी तिला सुखाचे दिवस दाखव 


"आई बाबा तुम्ही काही काळजी करू नका आज तुमच्या समोर सौरभ आहे तो दुबळा  सौरभ नाही स्वालंबी आहे आज चा सौरभ अनघाचा आहे "


दोघांनी आशीर्वाद घेतले आणि ते निघाले आई बाबा मात्र घरी काय होईल ह्याची चिंता करू लागले 

सौरभचे बाबा पुस्तक वाचत बसले होते आई किचन मध्ये होती  एवढ्यात दरवाजाची बेल वाजली सौरभच्या बाबानी दरवाजा उघडला सौरभ आणि अनघाला समोर पाहतच त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच भाव आला ते आनंदित होऊन म्हणाले "तुम्ही दोघे ते हि एकत्र "?


"हो बाबा तुमच्या सुनेला तिच्या घरी घेऊन आलोय "


"खरंच अनघा तू परत आलीस "?


"हो बाबा"


"या या" 


सौरभच्या बाबानी सौरभच्या आईला हाक दिली तश्या त्या बाहेर आल्या त्यांना पाहत सौरभ म्हणाला 


"आई मी तुझ्या सुनेला परत घेऊन आलो "


ह्यावर आईनी फक्त मान डोकावली तसे बाबांनी सौरभला विचारले "मग कुठे राहणार आता जवळच आहे ना तुमचा फ्लॅट "?


"नाही बाबा मी आणि अनघा इथेच राहणार "


"काय "?


"सौरभ हे तू काय म्हणतोस ""


"बाबा मीच त्याला इथे राहण्यास भाग पाडले तुम्हा दोघांना सोडून जाणे मनाला पटत नाही "


"पण सौरभ"


"चिंता नसावी "


सौरभ ने आईकडे पाहून म्हटले "आई मी तुझ्या पासून दूर जाऊन नये असे तुला वाटत होते आणि तसेच झाले पण जे पूर्वी व्ह्याचे ते आता होणार नाही ह्याची जबाबदारी तुला घ्यावी लागेल अगं  मी आता मोठा झालो आहे माझ्यावर कोणाचीतरी जबाबदारी आहे ते असताना सुद्धा तू मला नेहमी तुझ्यावर अवलंवून ठेवले आणि मला पण त्याचे काहीच वाटत नव्हते पण आता मात्र जाणीव झाली कि मी किती मूर्ख होतो तो दुबळा सौरभ संपला आता तुझ्या समोर जो सौरभ आहे तो स्वालंबी आहे फक्त अनघा मुळे मी इथे राहायला तयार झालो आता तरी माझे आयुष्य मला जगू दे "


असे म्हणून अनघाचा हात पकडून सौरभ आपल्या रूम मध्ये गेला 


आईचे डोळे मात्र भरले सौरभच्या बाबांनी ते पहिले "रडू नकोस उमा तो जे काही बोला ते खोटे नाही आपला मुलगा मोठा झाला हे सत्य आता तरी मानून घे त्याच आयुष्य त्यांना जगू दे "


 मात्र सौरभच्या आई च्या तोंडून काही शब्द बाहेर आले "मोठा झाला म्हणून काय झालं माझा मुलगा आहे तो आता असेल तिचा नवरा "


हे ऐकून सौरभच्या बाबांनी देवाला हात जोडत म्हण्टले "देवा तू तिला समजावं बुडती नाव काठाला लागली आहे परत तिला बुडू देऊ नकोस "

अनघाचा सौरभच्या घरात दुसरा नवीन दिवस सुरु झाला सकाळी अनघा आपली ऑफिसला जाण्याची तयारी करत होती एवढ्यात सौरभची हाक तिला आली 


"अनघा माझे कपडे दे "


सौरभची आई हॉल मध्ये बसलेली पण ती गप्प राहिली सौरभच्या बाबांनी अनघाला डोळ्याने आत जाण्याचा इशारा केला तशी अनघा रूम मध्ये गेली तिला पहाताच 


"अनघा कपडे दे लवकर "


"नाही मी नाही देणार "


"म्हणजे "?


"सौरभ आज पासून तुला आवडीचे कपडे तू घालणार "


"काय "?


"हो मला तुला स्वालंबी बनवता माझ्यावर अवलंवून नाही ठेवायचे अग पण मला नाही समजत ते कपडे निवडायला  "


"त्यात काय आहे तूच निवड एव्हडी वर्ष नाही करू शकला ते आता तरी कर "


"बरं ते हि खरंच आहे "


सौरभ ने आपण निवडलेले कपडे घातले आणि तयार होऊन अनघा बरोबर ऑफिस ला निघाला अनघाला बस स्टॉप वर न सोडताऑफिस कडे सोडून पुढे गेला  अनघाने मध्येच आपलं मोबाईल पहिला तर सौरभ ने प्रथमच तिचा फोटो टाकून व्हाटसप स्टेटस ठेवला होता खाली काही शब्द लिहिले तिनी वाचले  "मी खूप नशीबवान म्हणून मला अनघा सारखी साथीदार मिळाली "हे वाचून अनघाचे डोळे भरले आज प्रथमच असे काही तिच्या साठी त्याने  नि केले होते दुपारी कधी फोन न करणारा सौरभ ने अनघाला "जेवलीस  का"? विचारण्यासाठी फोन केला  संध्यकाळी तिला बरोबर घेऊनच  घरी आला घरी आल्यावर नेहमी लॅपटॉप मध्ये तोंड घुपसून बसणारा आज अनघा बरोबर गप्पा मारण्यात व्यस्त होता असेच चार दिवस गेले अनघाला हे प्रत्येक क्षण स्वप्नापरी वाटत होते तिला हवा असणारा सौरभ आज तिच्या सोबत होता 


अश्याच एका संध्यकाळी दोघेही ऑफिस मधून आले दोघांनी चहा घेतला सौरभला कोणाचा तरी फोन आला म्हणून तो गॅलरी मध्ये गेला तर अनघा खुर्चीवर डोळे बंद करून बसली होती एवढ्यात तिला तिच्या डोक्यावर कोणाचा तरी हात असल्याची जाणीव झाली तिनी डोळे उघडले तर सौरभ तिचे डोके चेपत होता 


"सौरभ तू"? 


"काय डोकं दुखत काय झालं असे अचानक दुखायला "?


"तुला कसे कळले "


"मी मघाशी चहा बरोबर डोकेदुखीची गोळी घेतलीस ती पहिली "


"काय झालं काही प्रॉब्लेम "?


"नाही आज जरा काम जास्त झालं "


"बरं मी बाम लावून देतो डोक्याला म्हणजे तुला बरं वाटेल "


"नाही नको सौरभ मी लावेन "


"का मी लावलेला तुला आवडणार नाही "


"तसे नाही रे तू पण दमून आलास "


"अनघा एवढे दिवस तुला काय होत काय नाही ह्याची जाणीवच झाली नाही करणे सोडा कधी प्रेमाने विचारपूस हि गेली नाही आता


जाणीव झाली आहे तर करू दे ना मला तुझी सेवा हेच माझे प्रायश्चित असेल" 


"सौरभ कशाला मनाला लावून घेतोस जे झाले ते झाले तू आता बदलास आहे मग परत ते आठवून का त्रास करून घेतोस "


"नाही अनघा मला स्वतःची लाज वाटते मी तुझ्या सॊबत असून सुद्धा नसल्या सारखा होतो आणि तू मात्र माझ्यावर प्रेम करत होतीस "


"पुरे माझे अजून डोके दुखेल तू ला चालेल "


"नाही नाही तुला त्रास झालेला मला चालणार नाही "


आणि दोघे हि हसू लागले अनघाच्या चेहऱ्यावर किती दिवसांनी असे मनमोकळे पणाचे हसणे आले होते पण हे हसणे कायम राहील का? 

अनघा आणि सौरभ चे नाते आता हळू हळू सुधारत होते प्रेमाच्या हिंदोळयावर ते झुलत होते अश्याच एका संध्याकाळी सौरभचे आई बाबा हॉल मध्ये बसले होते अनघा किचन मध्ये होती सौरभ त्याच्या समोर आला आणि म्हणाला 


"आई बाबा मी आणि अनघा काही दिवस बाहेर फिरायला जातोय १० दिवसाचा प्लॅन आहे "


"वाह वाह सौरभ मस्त प्लॅन आहे जा पण कुठे जातात "?


"मनाली ला "


"मस्त"


"तिथे कोणी ओळखीचे आहेत का"" 


नाही आई मी टूर कंपनी कडून जातोय म्हटल्यावर टेन्शन नाही आणि लग्नानंतर आम्ही कुठेच गेलो नाही "


"अरे बिंदास जा सौरभ अरे हेच वय तुमचं फिरण्याचं "


"बरं अनघाने मला नाही म्हटले या बद्दल "


"नाही बाबा तिला हि माहित नाही आता सांगणार आहे "


"बरं सांग तिला ती पण खुश होईल "


"हो बाबा" म्हणत  सौरभ किचन कडे वळला 


सौरभच्या आई मात्र गप्प झाल्या हे पाहून सौरभचे बाबा म्हणले "पाहिलास आपला मुलगा काय करू शकतो ते नेहमी तुझ्या परवानगी शिवाय न जाणार आज टूर फिक्स्ड करून आला आता तरी पटत का तुझ्याशिवाय तो जगू शकतो 


अनघा किचन मध्ये जेवण बनवण्यात व्यस्त होती एवढ्यात सौरभ तिथे आला ते पाहून 


"काय हवंय का तुला "?


"नको लवकर रूम मध्ये ये काहीतरी दाखवायचं आहे "


"अरे पण काय "?


"ये तरी "


अनघा सौरभ बरोबर रूम मध्ये गेली तशी सौरभने तिच्या हातावर टूर ची तिकिटे ठेवली 


"हे काय "?


"आपण मनाली ला चाललो आहे ते हि १०दिवस "


"काय पण हे कधी ठरवलं "


"त्यात काय ठरवायच लग्ननंतर  कुठेच बाहेर गेलो नाही मग "


"आई बाबा" 


"सांगितलं "


"काय म्हणाले "


"ते सोड तू रजा टाक मस्त फिरून येऊ "


अनघा मात्र चकित झाली कारण हे सर्व म्हणजे तिला एक एक सुखद धक्का होता आणि तो दिवस आला अनघाचे आई वडील हि हे सारे पाहून खुश होते आणि अनघा आणि सौरभ चा मनाली प्रवास सुरु झाला मनालीच्या थंडीत अनघा आणि सौरभचे प्रेम हि बहरत होते आजचा सौरभ त्या सौरभ पेक्षा वेगळा होता अनघा मात्र एक एक क्षण आपल्या मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करत होती मनालीचा प्रवास करून दोघे हि परतले


अश्याच एका दिवशी अनघा रूम मध्ये गप्प बसली होती हे पाहून सौरभ ने विचारले 


"काय झालं अनघा आज गप्प का "?


"सौरभ आपले आयुष्य पहिली कसे होते पण आता आपण सुखात आहोत तरी  पण "


"म्हणजे "?


"सौरभ आपले कुटुंब अजून अपुरे आहे "


"अपुरे "?


"आपले बाळ "


"हो अनघा बरोबर आहे तुझे "


"सौरभ आपण डॉक्टरला भेटूया "


"हो अनघा उद्याच जाऊ "


अनघाला सौरभचे प्रेम तर मिळाले पण तिचे अपुरे कुटुंब पूर्ण होईल ?

असेच दिवस जात होते अनघा आणि सौरभ चे नाते बऱ्या पैकी अतूट झाले होते  डॉक्टर चे उपचार ही चालू होते त्यातच  एक वर्ष उलटले  तरीही ते सुख पदरात पडले नव्हते दोघे हि निराश झाले होते अनघा ही मनाने खूप खचली होती तरी पण अनघा सौरभ ला धीर देत होती 


पण म्हणतात ना भगवान के घर देर है अंधेर नही तसेच काहीसे झाले आणि  एके दिवशी देवाच्या कृपेने अनघाच्या गर्भात एक फुल उमगले  अनघाच्या चेहऱ्यावर मातृत्वाचे सुख  झळकत होते हि बातमी सौरभला कळताच सौरभ खूप खुश झाला  त्याला तर आकाश ही ठेंगणे  वाटू लागले  सौरभचे आई बाबा अनघाच्या घरातले सगळेच आनंदित झाले त्या दिवसापासून सौरभ अनघाची जास्त  काळजी घेऊ लागला सौरभच्या आई हि अनघा वरचा राग विसरून तिला काय हवं नको ते पाहू लागल्या


असेच एक एक महिना जात होता आणि सौरभ हि त्या  मातृत्वच्या वेदना अनघा बरोबर सहन करत होता आणि तो दिवस आला अनघाला हॉस्पिटल मध्ये भरती  करण्यात आले आणि  काही मिनिटांनी ऑपरेशन थिएटर मध्ये दाखल केले  दरवाजाच्या आवारात सौरभ आणि सगळे चिंतेत बसले होते सौरभ कधी नव्हते तो  ही देवाला हात जोडून बसला होता


एक तास उलटला आणि नर्स बाहेर आली तिला पाहून सगळे तीला काही विचारण्या आत नर्स म्हणाली "अभिनंदन तुम्हला मुलगी झाली "


हे ऐकताच सौरभ आनंदाच्या भरात मोठ्याने किंचाळला सगळेच जण खुश झाले आता उत्सुकता होती त्या बाळाला पाहण्याची तिथे ऑपरेशन थियटर मधून अनघा आणि बाळाला रूम मध्ये शिफ्ट करण्यात आले आणि लगेच सगळे त्या दोघाना भेटण्यास गेले अनघा बेडवर पडली होती आणि तिच्या शेजारी ते छोटेसे पिलू अनघा शरीराने अशक्त झाली होती पण मनाने मात्र ती बळकट झाली होती हे तिच्या चेहऱ्यावरून दिसून आले सगळेच जण त्या दोघाना पाहून खुश झाले दिसायला गुटगुटीत असे ते बाळ आईच्या कुशीत विसावले होते सगळ्याची गर्दी नको म्हणून बाकीच्याना बाहेर पाठवण्यात आले सौरभ मात्र अनघा सोबत राहिला सगळे गेल्यावर सौरभ ने बाळाला पाहत म्हटले "अनघा आपले बाळ "त्याचे डोळे भरलेले पाहून 


अनघाने विचारले "हो सौरभ आपले बाळ पण तू का रडतोस ,,"?


"कुठे अगं हे तर आनंदाचे अश्रू आहे थँक क्यू अनघा आज तुझ्या मुळे मला हे सुख मिळाले "


"सौरभ आनंदाच्या क्षणी झालेल्या गोष्टी कशाला काढतोस "


"ते हि खर आहे बर अनघा तू आराम कर मी पाहतो माझ्या पिलूला "


असे म्हणत उत्सुकतेने आपल्या बाळाकडे सौरभ पाहू लागला अनघाने एक नजर सौरभ कडे व बाळाकडे टाकली आज तिला सुख शांती आणि समाधान प्राप्त झाल्याचे जाणवले ती अलगद हसली 


असेच दिवस जात होते बाळाला पाहण्यासाठी नातेवाईक येत होते अनघाचे हि लाड  पुरवले जात होते त्या बाळाला अनेक नावानी पुकारले जात होते कोणी पिलू तर कोणी परी मात्र अनघा आणि सौरभ ने एक नाव ठरवले होते आणि अनघा आणि सौरभ पालकत्वाचे क्षण अनुभवत होते आणि काही दिवसात अनघाच्या आईच्या घरी अनघाला नेण्यात आले तिथेच बारश्याची तयारी जय्यत चालू होती आणि तो दिवस उजडाला संध्यकाळी ४ वाजता कार्यक्रम सुरु झाला अंगाई गीत गात त्या बाळाचे "इच्छा" म्हणून नामकरण करत  पेढे वाटण्यात आले अनघा आणि सौरभ तर खूप खुश होते हळू हळू सगळे निमंत्रीत गेले इच्छा पण दमून झोपी गेली अनघा थोडी दमली होती म्हणून इच्छा ला पाळण्यात झोपवून जराशी बेडवर पडली एवढ्यात सौरभ रूम मध्ये आला 


"इच्छा झोपली "?


"हो रे "


"तू पण दमलीस ना "?


"हो रे म्हणून जरा पडले "


त्याने इच्छा कडे पहिले तर इच्छा झोपेत हसत आहे हे पाहून त्याला हि हसू आले त्याने अनघाला पाहत म्हटले "अनघा पहा आपली


इच्छा झोपेत हसत आहे खरंच अनघा इच्छाला पाहून खूप आनंद मिळतो आणि हे फक्त तुझ्यामुळे झाले आपण वेगळे झालो असतो तर मला नाही वाटत हे सुख माझ्या नशिबी आले असते "


"सौरभ आता सगळं चांगले आहे ना मग कशाला झालेल्या गोष्टी उगाळत बसतो आता तर सगळं छान झालाय बघ ना आपले अपुरे कुटुंब ही पूर्ण झाले आता बस एकमेकांना साथ देत आनंदात जगायचे "


"हो अनघा आता फक्त आनंद आपण आपल्या इच्छा चे बालपण तिच्या मनासारखे जगायला हवे तिला माझ्या सारखे न बनवता तुझ्या सारखे बनव"


"सौरभ विसरून जा ना त्या गोष्टी आता तरी तू तसा नाही आहे इच्छा चा बाबा खूप चांगला आहे कळ "


"हो आणि त्याला तू चांगल तु बनवलं"


"किती किती करशील स्तुती माझी पुरे आता तुझ्या आवाजाने इच्छा उठेल "


"बरं बरं मी बाहेर जातो तू पण थोडा आराम कर इच्छा उठली तर मी आहे"

असे म्हणून सौरभ बाहेर गेला आणि अनघाने आपल्या इच्छा कडे पाहत हात जोडले " बाप्पा सुख शांती आणि समाधान उशीर का होईना पण दिलंस "


अनघाचे अंघटित आयुष्य घडीत सुखात बदले


************समाप्त**************