Sparshbandh? - 12 in Marathi Love Stories by Pradnya Jadhav books and stories PDF | स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 12

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 12

त्याने ऑफिस मध्ये पाऊल टाकलं आणि त्याची नजर नुकत्याच आलेल्या मिष्टीवर पडली.

तो त्याच्या केबिनमध्ये गेला.....मागून त्याची असिस्टंट आली आणि त्याच्याकडे काही इंपॉर्टन्ट papers देऊन गेली.

त्याने लगेच मिष्टीला त्याच्या केबिन मध्ये बोलावून घेतले.

मिष्टी ही लगेच त्याच्या केबिन मध्ये हजर झाली.


" मिस. मिष्टी बसा." विराज समोरच्या chair कडे इशारा करत म्हणाला.


" काल तर अग तुग करत होते....आज परत खडूस मोड ऑन केलेला दिसतोय." मिष्टी मनात बोलतच खुर्चीवर बसली.

विराजने तसे तिच्या समोर काही papers ठेवले.


" रिड देम." त्याने ऑर्डर सोडत म्हणलं.


तिने गोंधळूनच ते पेपर हातात घेतले आणि वाचू लागली.


ती वाचत होती तसे तसे तिचे डोळे हळू हळू मोठे होत होते.


" सर हे.....हे काय आहे सगळ ??" मिष्टी जरा गोंधळून म्हणाली.


" नीट सगळ वाचलस ना?.....मग तुला काय आहे ते कळलच असेल." विराज त्याच बॉसी टोनमधे हनुवटी खाली हात ठेवत बोलला.


" हे..... हे शक्य नाहीये. " मिष्टी ला अजून तिने वाचलेल्या पेपर्स वर विश्र्वासच नव्हता बसत.


"का??.......तुझ आधीच लग्न झाल आहे??" विराज तिच्यावर नजर रोखत म्हणाला.


मिष्टीने मान हलवतच नाही बोलली.


" मग तुझ दुसऱ्या कोणावर प्रेम आहे का??" विराज पुढे बोलला.


आता पण तिने नाही मध्ये मान हलवली.


" मिस. मिष्टी मग प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला??" विराज थोडंसं वैतागत म्हणाला.


" सर तुम्हाला कळत नाहीये का तुम्ही काय बोलत आहात ते??......हे शक्य नाहीये......आपण अस किती ओळखतो एकमेकांना??......तुमची आणि माझी बरोबरी कधीच होऊ शकत नाही.....तुमच्यात आणि माझ्यात जमिन आसमानच अंतर आहे सर...... माझं आयुष्य पूर्ण वेगळं आहे सर आणि महत्वाचं म्हणजे मला कधीच लग्न करायचं नाहीये सर. " मिष्टी डोळ्यात पाणी आणत म्हणाली.


" मिस. मिष्टी हे बघा जे आहे ते तुमच्यासमोर आहे......आपल लग्न झाल्यावर तुमच्या भावाचा सगळा शिक्षणाचा खर्च मी उचलेन.... त्याचा सगळा भार मी माझ्या खांद्यावर घेईन फक्त...." विराज पुढे बोलायचं थांबल.


" फक्त काय सर??" मिष्टी त्याच्याकडे बघत बोलली.


" फक्त त्याबदल्यात तुम्हाला मीराची काळजी घ्यायची आहे आणि माझ्या घरच्यांसमोर सूनेसारख वागायचं आहे." विराज निर्विकार चेहऱ्याने बोलला.


" थोडक्यात तुम्हाला दिखाव्यासाठी बायको हवी आहे आणि मीराची काळजी घ्यायला एक आया....... काल माझी परीक्षा घ्यायची होती म्हणूनच मला गोकुळ आश्रमात घेऊन गेला होतात ना." मिष्टी खिन्न पणे त्याच्याकडे बघत म्हणाली.


" हो....तूम्ही लहान मुलांना चांगल सांभाळता...... मीरा आणि तुमच चांगल जमत पण आणि तुम्हाला ह्या नात्याला काय नाव द्यायचं आहे ते तूम्ही देऊ शकता मला काहीही फरक पडत नाही." विराज अजूनही तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.


" आणि मी नकार दिला तर??" मिष्टी थोड रागात त्याला बोलली.


" आधी नीट विचार करा आणि मगच काय ते ठरवा......चांगली ऑफर आहे माझी......तुमचं आयुष्य सेट होऊन जाईल......तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही......तुमच्या भावाच पण आयुष्य चांगल बनेल.....आणि तरीही नकारच असेल तर मला तुमच्या कामाचा मला विचार करावा लागेल." विराज थोड कडक शब्दात म्हणाला.


" म्हणजे??......नक्की तुम्हाला म्हणायचं काय आहे??" मिष्टी थक्क होऊन म्हणाली.

तिला जे वाटतं आहे ते नसावं एवढीच तिची अपेक्षा होती.


" हो तुम्ही बरोबर ऐकलत.....तुमचा परफॉर्मन्स खराब करायला मला काही क्षण ही पुरेसे आहेत .......तुमच्या कंपनी बरोबरचा प्रोजेक्ट तर बंद पडेलच पण तुम्हाला परत कोठेही जॉब मिळणार नाही ह्याची मी नक्कीच चांगली दक्षता घेईन....तुमच्या भावाच ही शिक्षण थांबवायला मला जास्त वेळ नाही लागणार....तुमच्याकडे जास्त ऑप्शन आणि वेळ ही नाहीये.....त्यामुळे पटकन काय ते ठरवा." विराज घड्याळात बघत रुक्ष पणे बोलला.


तिच्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा निर्णय तो पटकन घे अस बोलून मोकळा झाला होता......लग्न म्हणजे खायची गोष्ट मुळीच नव्हती...... हो..... लग्नाचेच कॉन्ट्रॅक्ट पेपर्स तिला देण्यात आले होते.

तिच्यासाठी लग्न हे एक पवित्र बंधन होत पण त्याच्यासाठी...... त्याच्यासाठी फक्त एका कॉन्ट्रॅक्ट सारखच होत ते.


तिचं मन तर तयार होत नव्हत पण तीच्यासमोर त्याने पर्यायच कुठे ठेवले होते??.... एकतर त्याच्याशी लग्न किंवा स्वतःच आयुष्य बरबाद होताना पहायचं......फक्त एकटी ती आली असती तर तिने लगेच नकारही दिला असता पण इथे तिच्या लहान भावाचा पण प्रश्न होता.

काल तिने त्याच्या बद्दल काय विचार केला होता आणि आता काय होऊन बसलं होत.


तिच्या नशिबावर आता तिलाच हसू येत होत......काय नशीब होत तीच??.....भूतकाळात जगलेल आयुष्य तिला धूसरस आठवत होत.....भूतकाळ नाही अस मान्य करून ती तिचा वर्तमानात कशीतरी जगत होती आणि आता.....आता तर तिच्या समोर असलेल्या व्यक्तीने तर तिचा वर्तमान आणि भविष्यकाळ ही ठरवून टाकला होता.


तिला तिच्याच आयुष्यात काहीच कशाचाच हक्क नव्हता का??


मिष्टी आता सगळ्यालाच वैतागली होती......तिने काहीच पुढचा मागचा विचार न करता निर्णय घेतला आणि समोर ठेवलेल्या पेन ने तिने त्या पेपर्स वर सही केली.

आणि विराजकडे ते पेपर्स दिले.

त्याने ते पेपर्स वर एकदा नजर टाकली आणि आदित्यला ( विरजचा सेक्रेटरी) आत बोलावलं.

आदित्य पटकन त्याच्या केबिन मध्ये निघून आला.


" हे पेपर्स.....काम करून लवकरात लवकर तिकडे पोहोच." विराज तेच पेपर्स त्याच्याकडे सोपवत त्याला सूचना देत बोलला.

आदित्यने होकार दिला आणि मिष्टीकडे केविलवाण्या नजरेने पाहून बाहेर निघून गेला.

विराजने मिष्टीकडे नजर टाकली.

" Let's go." विराज.

मिष्टी एकटक कुठेतरी बघत बसली होती.....त्याचा आवाज कानी पडताच तिने मान हलवली आणि डोळ्यात आलेले अश्रू पुसून ती त्याच्या मागे गेली.


...
....
......
........



थोड्याच वेळात ते एका मंदिरात पोहोचले.


तो तिला घेऊन मंदिरात आला......समोर त्यांच्या लग्नाची सगळी तयारी करून ठेवली होती..... गुरुजी ही होते.


सगळी तयारी पाहून मिष्टी तर आवाकच झाली.


विराजने तिच्या हातात एक साडीचा बॉक्स दिला आणि तिथेच उभ्या असलेल्या बाईला इशारा केला.


तशी ती बाई पटकन पुढे आली मिष्टीला घेऊन एका देवळातल्याच रूम मध्ये घेऊन गेली.


थोड्याच वेळात आदित्य विराजपाशी आला......आदित्यने विरजच्या हातात एक बॉक्स दिला.

तसा विराजही आवरून बाहेर आला.


विराज आला तसा गुरुजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली......मुलाने करायचे विधी आधी त्याच्याकडून करून घेतले......मुहूर्ताची वेळ जवळ येऊ लागली तशी गुरुजींनी वधूला बोलवा म्हणून सांगितलं.


तशी मिष्टीला घेऊन ती बाई बाहेर आली.


विराजची नजर तिच्यावर पडली.....तसा तो स्तब्धच झाला....ती दिसतच इतकी सुंदर होती की बास!!


हळदीचा रंग आणि त्याला राणी कलरचा जर्द काठ असलेली ती साडी.....मध्ये मध्ये सोनेरी रंगाच्या बुट्ट्या एक वेगळीच चमक आणत होत्या त्या साडीला ..... त्यावर विराजने आधीच त्या बाईकडे दिलेले बरेच दागिने होते..... छोट गळ्यातल, मोठं गळ्यातल, कानातल,बाजूबंद, वाकी, बिंदी, कंबरपट्टा, पैजण.....काय नव्हत एवढंच विचारायचं बाकी होत.
तिच्या केसांची छान हेअर स्टाईल केली गेली होती.


तिच्याच साडीला मॅच होईल असा त्याचा हळदी रंग आणि फेंट पिंक कलरची शेरवानी होती...... गळ्यात मोत्याची माळ, कंठ माळ, ब्रोच, हातात ब्रेसलेट, सातलाडा हार (सात पदरी) ......विराज पण काही कमी दिसत नव्हता.....एकदम रॉयल लूक होता त्याचा आणि तिचा!!



पण विराजच लक्ष वेधलं होत ते तिने.......कपडे, दागिने त्याला काही नवीन नव्हते पण त्यांच्यातल्या तिने त्याच मन वेधून घेतलं होत!!


अगदी राणी दिसत होती पण चेहऱ्यावर फक्त तिच्या हास्याची कमी होती......तिच्या नूर ची कमी होती.



विराजने गुरुजींनी हाक मारली तस लक्ष त्याने वळवल......तिला त्याच्या शेजारी बसवण्यात आल.....आधी त्याने तिच्या बोटात अंगठी सरकवली......तिनेही त्याला अंगठी घातली...... नंतर तिच्या पायात जोडवी घातली त्याने......गुरुजी सांगत होते तस तस तो एक एक गोष्ट करत होता.



गुरुजींनी मंगळसूत्र घालायला सांगितलं तस आदित्य एक बॉक्स पुढे घेऊन आला.



विराजने ते घेऊन त्या मंगळसूत्राच्या दोन्ही वाट्यांमध्ये हळद कुंकू भरलं.


मिष्टी फक्त यंत्रवत तो जे करत होता त्याच्याकडे बघत होती.


विराजने मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं......मंगळसूत्र गळ्यात घालताना तिने तिचे डोळे घट्ट बंद केले आणि नाही म्हणता ही तिच्या डोळ्यातून एक टपोरा अश्रू तिच्या गालावरती ओघळलाच....... विराजने नंतर तिच्या भांगेत
सिंदुर भरल.


गुरुजींनी त्यांना उभ राहण्यास सांगितल.....त्यांच्या मध्ये अंतरपाट धरण्यात आला.


स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम,
मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम
चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम
विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल
सावधान।।


मंगलाष्टक झाल्यावर अंतरपाट काढण्यात आला.....दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात हार घातले.


गुरुजींनी त्यांना फेऱ्यांसाठी उभच राहायला सांगितल.....त्याच्या उपरण्याची आणि मिष्टीच्या पदराची गाठ बांधण्यात आली.


गुरुजी मंत्र म्हणत होते..... विराजने तिचा हात पकडला तसा तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं......त्याने फेरे घ्यायला सुरुवात केली..... 7 जन्मांची 7 आयुष्याची वचन त्यांनी एकमेकांना दिली.


त्यांनी वचन तर दिली होती पण त्यात प्रेम कुठे होत??......यंत्रवत सुरू होत सगळ फक्त.


गुरुजींनी लग्न संपन्न झाल म्हणून जाहीर केलं.


तसा आदित्यने त्या दोघांचं फोटो काढून घेतला आणि त्यांच्या जवळ जाऊन आदित्यने त्यांच्याकडे त्यांच्या लग्नाचं सर्टिफिकेट सोपावल.


मिष्टीला एवढ्या लवकर सर्टिफिकेट आलेलं पाहून आश्चर्यच वाटलं.

विराजने बरोबर ते हेरल.


" तुम्हाला मी त्या ऑफिस मध्ये सर्टिफिकेट साठी खेपा घालत बसेन अस वाटलं का??.....विसरू नका की मी विराज जहागीरदार आहे आणि आता तुम्हीही सौ. मिष्टी विराज जहागीरदार आहात." विराज तीच्याकडे पाहत एकदा म्हणाला.


ती कस विसरली की तो कोण आहे??......त्याची पॉवर काय आहे??


पण ती आता कागदोपत्री आणि अग्नीच्या साक्षीनेही त्याची बायको झाली होती......आता ती मिष्टी देसाई नाही तर सौ. मिष्टी विराज जहागीरदार झाली होती......त्या दोघांचं आयुष्यभरासाठी नात जोडल गेलं होत.


त्याने गाडीच मागचं दार उघडल तिच्यासाठी.....ती आत बसल्यावर तो ही दुसऱ्या साईडने तिच्यापाशी येऊन बसला.

दोघेही काहीच बोलत नव्हते..... मिष्टी खिडकीच्या बाहेर बघत तिच्याच विचारात गुंग होती.


काल जर तिला कोणी सांगितल असत की तिचं उद्या लग्न होणार आहे तर तिने चुकूनही विश्वास नसता ठेवला पण एका रात्रीत तीच सगळच आयुष्य बदललं होत.


आज नियतीमुळे ती तिच्याच बॉसची वाइफ झाली होती.


मनात धाकधूक तर खूप होत होती......पुढे सगळ कस होणार??.....खूप सारे विचार तिच्या मनात येत होते पण उत्तर कशाचीच नव्हती तीच्याकडे.


आता समोर हे येईल त्याला सामोरी जायचं एवढंच तिच्या हातात होत.


मिष्टीने हार तर कधीच मानली नव्हती आताही ती मानणार नव्हतीच.

.
..
...
....
.
.


दोघेही थोड्यावेळ जहागीरदार मेंशन समोर पोहोचले.


खूप प्रशस्त आणि मोठा बंगला होता तो.

एवढं मोठं घर आहे यांचं?? मी तर आयुष्यात पहिल्यांदाच इतकं मोठं घर बघतेय मिष्टी आजूबाजूला बघत मनात विचार करत म्हणाली.....


मिष्टी तर पूर्ण घाबरलेलीच होती , त्याने त्याच्या घरी सांगितली कि नाही याची भीती वाटत होती तिला , त्यांची काय प्रतिक्रिया असेल आता..??


तिने विराज कडे पाहिलं.....तो तर एकदम शांत होता , जणू त्याला काही फरकच पडत नव्हता कशाचा....!!


त्याने मिष्टीचा हात पकडला आणि मेन्शन मध्ये प्रवेश केला..


खाली हॉल मध्ये आई आणि बाबाच होते...
विराज आत आला तस आई त्याच्याकडे पाहू लागली..
आज पहिल्यांदा तो कोणत्या तरी मुलीला घेऊन घरी आला होता ,


आई बाबांना म्हणाली....
" लग्नाच जरा जास्तच मानवर घेतलेलं दिसतंय...... " आई.....


" अग काहीही काय बोलतेय.. ऑफीस मधली असेल कोणीतरी सेक्रेटरी किंवा तुझे पाय दुःखत असतात म्हणून तुझा सांभाळ करायला कोणाला तरी आणली असेल.... " बाबा....


" म्हातारी नाही झाली मी.... सांभाळ करायला म्हणे....."आई तोंड वाकड करत म्हणाली....


आई उठून विराज जवळ आली आणि त्यांनी ईशाऱ्यानेच त्या मुलीबद्दल विचारलं....


" आई तुझी इच्छा होती ना माझं लग्न व्हावं....... See मी लग्न करून आलोय आणि ही तुझी सून आहे.. म्हणजेच मीराची आई....." विराज


हे ऐकताच आईबाबा दोघांचेही डोळे एकदम मोठे झाले.

(काय पद्धत आहे ना लग्न झाल हे सांगण्याची?😂🤣😝)


हे ऐकून लगेच त्याचे बाबापण विराज जवळ आले...


" विराज काय बोलतोयस हे तू..?? तू लग्न करून आला आहेस?? " आई थोडी रागात म्हणाली.....


त्यांनी मिष्टीकडे पाहिलं... ती खुप गोंधळलेली होती , तिने विराजच्या हाताला एकदम घट्ट पकडून ठेवलं होत.....


दिसायला तशी सुंदर होती , पण ठीक होती....


" आई प्लिज मला भांडायचा मूड नाहीये... तुमचीच इच्छा होती ना मी लग्न कराव?? मग मी केलय.... आता तरी खुश आहेस ना?? " विराज...


" तू लग्न केल ते ठीक आहे पण , आम्हाला सांगायचं तरी..... हे असं लपून लग्न करून यायची काय गरज होती??... आम्ही काय लग्नाला नाही थोडी बोललो असतो....." आई.....


" असुदे लग्न करून आलाय ना तो, तू आधी त्यांना आत तरी घे कितीवेळा अशेच प्रश्न विचारत राहशील.......नवीन जोडप्याला अस बाहेर ताटकळत नसत ठेवायचं." बाबा.....


" ह्म्म्म... तुम्ही दोघ थांबा इथेच मी आले..... " आई असं बोलून आतमध्ये निघून गेली......


मिष्टीला जरा आश्चर्यच वाटलं कि इतक्या लगेच यांच्या घरचे तयार ही झाले...????.

आईंनी सगळ्या घरातल्यांना खाली बोलावलं...... मीरा सोडून कारण ती झोपली होती.

हा काय प्रकार सुरू आहे कोणालाच कळत नव्हत....सगळेजण फक्त बघ्या च काम करत होते.

आईंनी आतून आरतीचं ताट आणलं... आणि दोघांना ओवाळलं आणि उंबरठ्यावर तांदळाचं माप ठेवलं.

मिष्टीने हळूच पायाच्या अंगठ्याने ते माप ओलांडल.

ते आत यायला निघाले तेवढ्यात आईंनी त्याला दारातच थांबवलं.

" अस नाही आत यायचं आधी नाव घ्या आणि मग आत या." आई त्यांना म्हणाल्या.

" हे गरजेचं आहे का आता??" विराज वैतागूनच म्हणाला.

" हो....आहे गरजेचं." आईही त्यांच्या मुद्द्यावर अडून राहिल्या.

" काय करायचं आहे ते करा." विराज मान नाही हलवत म्हणाला.

" घे ग नाव." आई मिष्टी कडे बघत म्हणाल्या.

" अम्..... हो." मिष्टी कसनुस हसत म्हणाली.

ह्या सगळ्याची काहीच कल्पना तिला नव्हती......काही वेळ विचार करून ती बोलू लागली.


" देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा , विष्णू , महेश,
विराज ह्यांच नाव घेऊन आज करते मी गृहप्रवेश." मिष्टी विराज आणि तिच्या गुंफलेल्या हाताकडे बघत म्हणाली.

विराजने चमुकन लगेच तीच्याकडे पाहू लागला..


उखाणा घेतल्यावर आईंनी त्यांना आत घेतलं.....!! आईने मिष्टीला त्यांच्या बरोबर यायला सांगितलं....


तिने विराज कडे पाहिलं , त्याने ईशाऱ्यानेच तिला आई बरोबर जायला सांगितलं....

तशी मिष्टी त्यांच्यासोबत गेली.... तस विराज पटकन त्याच्या रूम मध्ये निघून गेला.....

...
.......

आई इथे मिष्टीला प्रश्नच विचारत होती.... तू कोण तू कुठली?? याने तुझ्याशिच कस काय लग्न केल...?? मिष्टी तिच्याबद्दल सगळं सांगत होती... तिने त्यांच्या लग्नाबद्दल सांगणं टाळल..... आईनी पण जास्त काही विचारलं नाही तिला......!!!


त्यांना ती आवडली..... कारण ती खूप साधी होती , आणि थोडी भांबावलेली ही होती जरा....
तिने साडी नेसली होती...आणि गळ्यात छोटच मंगळसूत्र होत....!! आईनी तिला विचारलं...


" तुम्ही लग्न कस केल नक्की..??? " आई...


" ते आम्ही... " मिष्टी बोलतच होती कि विराज तिथे आला....


" आई बस्स कर ना आता तू किती प्रश्न विचारणार आहेस तिला...??? तुमचं बोलून झालं असेल तर तिला माझ्या रूम मध्ये पाठव...... " विराज....


" ए काहीही काय बरळतोयस.... आजच लग्न केल आणि रूम मध्ये पाठव काय..?? लग्न केलस आता पूजा तरी माझ्या मनाने होउदे त्याशिवाय तुम्ही दोघे एकत्र राहणार नाहीत.... " आई....


" व्हॉट?????...... काय गरज आहे पूजा वैगेरे ची.... आई तू पण ना.... " विराज चिडत म्हणाला....


" तू शांत रहा.... आणि जा चल तुझ्या रूम मध्ये..... " आईने त्याला तिथून जायला सांगितल........


विराज तिथून गेला... मिष्टीला तस ही दडपणच आलेले कि ती विराज सोबत कस राहणार..?? आणि त्यांची फॅमिली?? मी राहू शकेल का यांच्यासोबत.... नेहमी तिचा भाऊ आणि तीच राहायचे आणि आज असं अचानक इतक्या जणांना सोबत राहायच..?? भीतीच वाटत होती तिला तर.....!!


आईनी तिला आराम करायला सांगितलं... आणि निघून गेल्या....


ती तशीच त्या रूमला निरखून पाहत होती.... खूप सुंदर होती ती....... आणि पॉश ही होतीच.... मिष्टीने साडी चेंज केली आणि तिथेच तिच्यासाठी ठेवलेली एक साधीशी साडी नेसली....


दिसायला खूप साधी होती पण खुप महाग होती... कारण तिच्यासाठी विराजने सगळं आणलं होत....!! त्यामुळे तिला पण बर वाटलं कारण तिच्याकडे साड्या तर मुळीच नव्हत्या.....!!


मिष्टी तशीच तिथे झोपून गेली....

..
.....

आता घरा मध्ये सगळ्यांना कळलं होतच कि त्याने लग्न केलय....!! पण कोणी जास्त विचारायची हिम्मत नाही केली त्याला...!! दुसऱ्या दिवशी पूजा होती..... आईनी तिला त्यांची साडी आणि काही दागिने देऊन तयार व्हायला सांगितलं.....!!


पूजा झाली तस विराज लगेच निघून ही गेला...!! नेहमी प्रमाणे...... त्यानंतर घरामध्ये सगळे मिष्टीशी हळूहळू बोलत होते......!! सगळ्यांनाच ती आवडली , आईनी सांगितल्या प्रमाणे तिने जेवणात ही मदत केली.... मीरा तर तिच्यामागे मागेच होती, पण तिला जास्त वेळ देता नाही आला मिष्टीला कारण ती सगळ्यांमध्ये व्यस्थ होती.....

मीरा मिष्टीला पाहून तशी खुश झाली होती कारण तिची आधीच तिच्याशी ओळख असल्यामुळे चांगलच जमत होत .

विराजच्या भावाची बायको तिला सारखंच विचारत होती कि तुम्ही दोघे लग्न नंतर कुठे जाणार आहात..?? पण मिष्टीला यातलं काहीच माहित न्हवत......!! त्यामुळे ती काही जास्त बोलली नाही......


आईने तीच सामान विराजच्या रूम मध्ये शिफ्ट करायला सांगितल आणि तिला तिथेच पाठवलं......!! मिष्टीने चेंज करून दुसरी साडी नेसली आणि बाथरूम मधून बाहेर आली.

बाहेर मीरा तिचीच वाट बघत बेडवर बसली होती.

" मिष्टी आंटी मला तूप तंताला आला आहे." मिष्टीला पाहताच मीरा तिच्याकडे जात म्हणली.


" अरे बापरे एका मुलीला कंटाळा आला आहे!!!.....मग आता काय करायचं आपण??......खूपच मोठा प्रोब्लेम झाला की हा!!" मिष्टी तिच्यासमोर बेड वर बसत तीच्याकडे बघत हावभाव करत म्हणाली.


" बघ ना..... डॅडा पण नाही आला अजून घरी." मीरा एकदा दाराकडे नजर टाकत नाराज होत म्हणाली.


" काम असेल ना त्यांना खूप म्हणून उशीर झाला असेल त्यांना...... चल मी तुला गोष्ट सांगते..... डॅडा येईपर्यंत तुला कंटाळा पण नाही येणार म्हणजे." मिष्टी गोड हसत म्हणाली.


" खरचं!!......तू मला स्टोरी सांगणार??" मीरा आनंदाने डोळे मोठे करत म्हणाली.


" हो..... खरचं." मिष्टी तीच्याकडे हात करत म्हणाली.


मीरा लगेच तिच्या कुशीत शिरली...... मिष्टीने तिच्या अंगावर पांघरूण घालून दिलं आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू लागली.

" आंटी तुला माहितीये आजपर्यंत मला कोणीच स्टोरी नाही सांगितली टीचरने सोडून...... स्कूलमधे माझ्या सगळ्या फ्रेंड्सला त्यांचे आजी आजोबा किंवा मम्मा डॅडा स्टोरी सांगतात पण मला घरी कुणीच नाही सांगत.... डॅडा ऑफिस मधून उशिरा येतो म्हणून तो पण नाही सांगत मला." मीरा मिष्टीकडे बघत नाराज होत म्हणाली.


" आता मी आहे ना ......मी रोज तुला एक स्टोरी सांगत जाईल." मिष्टी मीराला कवटाळत म्हणाली.


" पिंकी प्रॉमिस??" मीरा मिष्टीपुढे तिच्या छोटुष्या हाताची करंगळी करत म्हणाली.

मिष्टीने हसून तिची करंगळी तिच्या बोटांत गुंतवली.


" पिंकी प्रॉमिस." मिष्टी...

मिष्टी स्टोरी सांगता सांगताच मीरा मधे सोपून गेली.

मीरा झोपलेली बघताच मिष्टिने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

विरजची वाट बघत बघत तिला कधी झोप लागली हे कळलच नाही.


.
....
............


रात्री 2 वाजता विराज रूम मध्ये आला..... त्याने पाहिलं कि मिरा मिष्टी ला एकदम घट्ट पकडून झोपली होती............



क्रमशः.....


Guys do कंमेंट्स... 😒❤