Aayushy - 2 in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | आयुष्य - भाग 2

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

आयुष्य - भाग 2

आयुष्य भाग दोन

ती शाळा......... ती शाळा झाडांनी वेढलेली होती. त्या शाळेत गुलमोहराची झाडं होती. त्या शाळेतील त्या गुलमोहराच्या झाडावर रानपक्षी येत व आपलं मनोरंजन करीत असत. कोकीळा येत असे व नित्य कुहूकुहू करुन गायन करुन जात असे. तिचे बालपणीचे बोल कानावर पडत व वाटत असे की आपणही गाणं शिकलेलं बरं. आरतीनं तर शाळेजवळंच एके ठिकाणी गायन तासिका लावली होती.
ती शाळा........ त्या शाळेला विस्तारीत असं मैदान होतं की ज्या मैदानात आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत. कोणी म्हणत की पुर्वी राजेशाहीच्या काळात इथं एक तलाव होता व त्या तलावाची जागा आणि तो परीसर हा देशमुखांना दानात मिळाला. पुढं जावून देशमुखांनी ती शाळा बांधली होती. खरं तर ती शाळा देशमुखांचीच होती.
त्या शाळेचं शिक्षण चांगलं होतं. शाळेत गाजलेले शिक्षकवृंद होते की जे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले होते. ज्यांचा व्यासंग केवळ शिकवणं नव्हता तर कला जोपासणाराही होता. शिवाय साहित्य असो वा ज्ञानविषयक पदव्या? गायन असो की चित्रकला. त्या सर्वच कला त्या शाळेतील शिक्षकांनी हस्तगत केल्या होत्या. त्यामुळंच त्यांना वाटत होतं, त्यांच्या विद्यार्थ्यांनीही अशाच ज्ञानविषयक पदव्या हस्तगत कराव्यात. जेणेकरुन त्यांचाच नाही तर त्या विद्यार्थ्यांमुळं देशाचाही विकास होईल. देश विकासाला आपल्या हातून शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचा हातभार लागावा. म्हणूनच त्या शिक्षकांचं ते जिवापाड शिकवणं. ते शिकवणं सर्वांच्या मनात जिज्ञासा व तेवढंच प्रेम निर्माण करणारं होतं. ते देशाबद्दलचं प्रेम होतं. मित्रमैत्रीणीबद्दलचं नाही.
विस्तीर्ण अशा मैदानात उभारलेली शाळा आज डौलानं उभी होती. तिनं विद्यार्थ्यांच्या कित्येक पिढ्या घडवल्या होत्या. ज्यातून कोणी शिक्षक तर कोणी कलावंत घडले होते. कोणी साहित्यीक तर कोणी तंत्रज्ञ घडले होते. सभोवताल गुलमोहराच्या पर्णझाडांनी वेढलेली ती शाळा. शाळा जवळ आली तरी ओळखू यायची नाही झाडांमुळं. शिवाय त्या शाळेतील त्या पर्णझाडीनं आनंद वाटायचा. शिकतांना कंटाळवाणं वाटायचं नाही. तसं शिक्षकांनी शिकविण्यातून सांगीतलं होतं की शिकतांना जर कंटाळा आला वा डोळे थकले की या हिरव्यागार झाडांकडं पाहायचं. कंटाळा दूर होईल. मग कंटाळा आला की रोजचं पाहाणं सुरु झालं.
शाळा भव्यदिव्य अशीच होती की जी इमारत पाहून विद्यार्थीही प्रगल्भतेचा विचार करतील आणि तसंच घडत होतं.
शाळा....... शाळेला मंदीराचं नाव दिलं आहे. खरं तर ते ज्ञानमंदीरच आहे. कारण ज्या मंदिरातून भक्त जागृत होतात. ज्ञान पदोपदी, नसानसात तसंच धमणीत वाहात असतं व त्याच ज्ञानाच्या भरवशावर आपण भवसागर पार करुन जातो. ते ज्ञान, ज्ञानमंदिरातच मिळतं, देवमंदिरात मिळत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच गोष्टीसाठी सांगीतलं होतं की जाती आधारीत धंदे सोडा, तरच विकास संभव आहे. नाही तर नाही. कारण त्यांना विकसीत भारत, समृद्ध भारत बनवायचा होता. आज तसा भारत बनलाही. परंतु हाच दर्जा पुढं टिकून राहिल काय? यावर आज प्रश्नचिन्हं लागलेले आहे. कारण आज शाळेतून कौशल्यधिष्ठीत ज्ञानाच्या आधारावर जातीविषयक शिक्षण शिकवले जात आहे. ही शंका नाही तर वास्तविकता आहे.
आज देशात राममंदीर बनलं. एक चांगली गोष्ट झाली. कारण संस्कार जो लोप पावत चालला होता. तो वृद्धिंगत व्हायला चालना मिळाली. परंतु त्याचबरोबर एक हा ही परिणाम झाला, तो म्हणजे शाळेतून भजन शिकवलं जाणं. ती बाब काही बरोबर नाही. ज्यांच्या मनात आज शाळेमध्ये भजनाचे कार्यक्रम शिकवले जात आहेत, शिक्षिका भजनाच्या तालावर नाचतांना दिसतात. मुलं टाळ आणतात. कारण संस्कार पेरायचाय. असंच चित्र दिसत आहे.
खरं सांगायचं झाल्यास शाळेतून भजनाचे कार्यक्रम शिकवले जावे काय? त्या निरागस विद्यार्थ्यांना केवळ आरती, पुजा करण्यापुरतं सीमीत केलं जावं काय? शिवाय त्याच्या मनातील शास्त्रज्ञ बनायचे आहे व नवनवे शोध लावायचे आहे. ही भावना काढायची आहे काय? हे ओळखणं आजच्या काळात कठीण होवून बसलंय. धार्मिक भावना नक्कीच जोपासली पाहिजे. परंतु ती शाळेतूनही जोपासायची काय? तर त्याचं उत्तर होय असं देता येईल. त्याचं कारण म्हणजे शाळेत विविध धर्माचे लोकं असतात. त्या लोकांना एकमेकांच्या धर्माबद्दल आदर वाटावा म्हणून. ठीक आहे. ते बरोबर आहे. परंतु धर्माबाबत बोलतांना एकच म्हणता येईल की शाळेमध्ये तरी अशा धार्मिक पणाला रंग देवू नये. कारण शाळेत विविध धर्माचे मुलं असतात. धार्मिक कार्यक्रम घेतल्यानं इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात. कारण शाळेत कार्यक्रम घेण्यालाही मर्यादा असतातच.
अलिकडील काळात मात्र तिळगुळ, गोपाळकाला, गुरुपौर्णीमा यासारखे बरेच कार्यक्रम साजरे केले जातात, तेही शाळेतून. ते बरोबर नाही. शिवाय भजन? तेही शिकवणं बरोबर नाही. कारण त्यानं ज्ञानाच्या कक्षा विस्तारीत होत नाहीत. फक्त वाढते ती धार्मिक तेढं.
शाळेत जशी आजची शिक्षिका भजन गायन करुन शिकवते. तसंच शिकवलं जातं कुंभारकाम. माती आणा. बैल बनवा. कापड आणा, शिलाई करा. बॅग बनवा. टोपली बनवा. वेतकाम करा. गवंडी काम शिका. ज्याला कौशल्यविकास हे नाव दिलं. ज्यातून पैसा कसा कमवता येईल हा उद्देश ठेवला आहे व ही शिकविण्याची पद्धती भविष्यात मुलांना त्याच काळात नेत आहे की ज्या काळात बारा बलुतेदार पद्धती होती. लोकांना आपल्या जातीचं काम आपल्याच बिरादरीत शिकता येत होतं. कामाचं कसब वाढत होतं. भेदभाव नव्हताच त्या काळात. परंतु जसं कामाचं कसब वाढलं. तसा भेदभावही वाढला. धंद्यावरुन हिन धंदा व चांगला धंदा असे प्रकार पडले. ज्ञानाच्या कक्षेत खंड पडला.
आज आपल्याला दिसतेय की खरं ज्ञान शाळेत शिकवलंच जात नाही. कौशल्य ज्ञानावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे आणि उद्देश ठरवला गेला आहे की लोकांनी फक्त आपलं पोट भरावं यासाठी असंच कौशल्यधिष्ठीत शिक्षण शिकवावं व तेच शिक्षण शिकविण्याची गरज आहे. बाकीच्या गोष्टी शाळेतून शिकविण्याची गरज नाही.
पुर्वी असं नव्हतंच. ज्ञान विकसन्यावर आधी जास्त भर दिल्या जायचा. जेणेकरुन मुलांना ततंज्ञ कसं बनवता येईल हा हेतू होता. अलीकडील शिक्षणातून तसा उद्देश दिसूनच पडत नाही. कारण आजचं शिक्षण तसं वाटत नाही. त्या शिक्षणातून चिकीत्सक बुद्धी वाढेल वा वृद्धिंगत होईल असे वाटत नाही. कारण मुलांना आज, शाळेत कुंभारकाम, पसबागकाम शिकवलं जात आहे. मुलं कुंभारकाम, परसबागकाम. गवंडी काम, सुतारकाम यात पारंगत होत आहेत. व्यावसायिक शिक्षणानं ते आपलं पोट भरणार आहेत. त्याचबरोबर लोकांचंही ते पोट भरु शकतील. जे गरीब असतील. ते नक्कीच जास्त शिक्षण घेण्यापेक्षा व्यावसायीक शिक्षण घेवून आपलं पोट कसं भरता येईल याचाच विचार करतील. त्याकडे लक्षही देतील. आपल्या कौशल्यधिष्ठीत शिक्षणाकडे अधिक लक्ष नक्कीच देतील. ते जास्त शिकणारच नाहीत. मधातच शिक्षण सोडतील. कारण त्यांना कळलेलं असेल की जास्त शिकूनही नोकरी मिळणार नाही. फक्त पोट भरण्यापुरतंच शिकावं. ते पारंगत तर होतीलच. परंतु कशात? व्यवसायात की देशाला दर्जा मिळवून देण्यात? साधी मुंगीही अन्न गोळा करण्यात पारंगत असते. पण तिच्या अन्न गोळा करण्याच्या शैलीचा काही उपयोग तरी होतो काय? शक्यता नाकारता येत नाही.
आज खरं तर देशाला ज्या गोष्टीची गरज आहे. त्या गोष्टी देशाला दुसऱ्याच देशाकडून घ्याव्या लागतात. जरी देशाची लोकसंख्या एवढी अफाट असली तरी. शिवाय एका शाळेतील शिक्षिकेचे आपल्या मुलांना भजन शिकविणे. ही गोष्ट देखील आपल्याला हेच शिकवते की देश प्रगतीकडे जात नाही तर अधोगतीकडे जात आहे. आपल्या डोक्यातल्या कल्पक गोष्टीचा व बुद्धीमत्तेचा वापर करुन जो दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला देश आज आकाशातील तारे मोजायला निघालाय आपल्या तंत्रज्ञानविषयक पाठ्यक्रमाच्या माध्यमातून. ते आपआपल्या शाळेत तंत्रज्ञानविषयक शिक्षण शिकवतात व अभ्यासक्रम राबवतात. अन् आपण चक्कं मुलांच्या कल्पक बुद्धीमत्तेकडे दुर्लक्ष करुन त्यांना व्यवसायीक शिक्षण शिकवतो. तेही जातीचे. हे काही बरोबर नाही. ह्यानं देश विकसीत होणार नाही. विकसनशीलच राहील.
खरंच मोठमोठ्या गोष्टी करणार्‍या देशात आगामी काळात तंत्रज्ञानविषयक गोष्टी शिकविण्यावर भर दिला जाईल की काय की शाळेतून यापुढे भजन किर्तनासारख्या गोष्टी शिकविण्यावर भर दिला जाईल. यावर तुर्तास तरी विचार करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानविषयक गोष्टी शिकविण्यावर मर्यादा पडत आहेत. जे ज्ञान पुर्वी अर्थात मध्यंतरीच्या काळात शिकवल्या गेलं. ज्यातून आज जग एका सेकंदात जगालाही प्रदक्षिणा घालू शकतं व देश एका सेकंदात पादाक्रांत करु शकतं. जे मध्यंतरीच्या काळानं घडवलं. यात शंका नाही. देशानं यावर सखोल विचार करावा. आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात व ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पुर्ण करावे. विकसीत भारत, समृद्ध भारत.
शारदा भरपूर शिकली होती. तिचं एम एस डब्लू झालं होतं आणि तिचा पती........तिचा पतीही भरपूर शिकला होता. तो पदवीधर होता व एका कंपनीत नोकरी करीत होता. बहुतेक त्यांनी आय टी आय चा अभ्यासक्रमही पुर्ण केला होता. ते स्वभावानं चांगले होते. ज्यावेळेस शारदेनं आपल्या पतीला म्हटलं की तिला उच्च शिक्षण घ्यायचं आहे. त्यावेळेस त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता होकारच दर्शवला होता. शिवाय जवळ पुरेसे पैसे नसतांनाही व परिस्थिती जेमतेमच बेताची असतांनाही त्यांनी शारदेला शिक्षणासाठी दिलेले पैसेही आज शारदा विसरु शकत नव्हती. ती आपल्याला आपल्या पतीनंच नाही तर प्रत्यक्ष विधात्यानंच मदत केली आहे असं मानत होती. परंतु ते तिला शिकवणं तिच्या पतीच्या उच्च शिकण्याचा परिणाम होता.
आज आयुष्याची तपासणी करतांना मोठी त्रेधातिरपीट उडत होती. बऱ्याच वर्षानंतर भेटलेली ही मंडळी, त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होत होती. आनंद बोलू पाहात होता त्यांचेशी. त्यालाही बोलावसं वाटत होतं त्या आयुष्याच्या उतार वळणावर भेटलेल्या मुलींशी. आज शारदा जुळली होती ग्रुपवर. त्याचबरोबर एक नवीन मुलगीही जुळली होती ग्रुपवर. आनंदनं फक्त विचारलं होतं तिला की तुझे पती कोणतं काम करतात. जसं त्यानं त्यापुर्वी शारदेला विचारले होते प्रश्न. मग बस तिच्या नाही, बाकीच्यांच्या पोटात दुखलं होतं. अशातच एक फोन आला. म्हटलं,
"हैलो, कशाला विचारलं तिला की तुझे मिस्टर काय करतात? असं ग्रुपवर बोलायचंच नाही. अन् ऐक तू ग्रुपवर मेसेजही करायचे नाहीत."
'हे मेसेज करायचे नाहीत.' समोरुन आलेले शब्द. ती धमकी होती की सुचना होती ते आनंदला कळत नव्हतं. तो मित्र तसा का बोलत होता तेही कळत नव्हतं. हे कनेक्शन काही समजत नव्हतं आनंदला. त्याला वाटत होतं की ज्या मुलीला त्यानं तिचे पती का करतात हे विचारलं, त्या गोष्टीशी संबंधीत व्यक्तीचा संबंध काय? विचारांती त्याला आठवलं ते स्याही फेक प्रकरण. गतकाळातील हेच मित्र शिक्षकांवरही स्याही फेकत होते नव्हे तर चॉटी हॉप म्हणून शिक्षकांना नावबोटं ठेवत होते. चिडवीत होते. परंतु विधात्यांनी त्यांना काहीही केलं नव्हतं. तसंच त्या शिक्षकांनीही त्यांना काहीही म्हटलं नव्हतं. उलट आशिर्वादच दिलेले होते.
आज आपण पाहतो की शिक्षकाला सन्मान मिळत नाही. कधी कधी त्याचे वाभाडे काढले जातात. त्याला हिणवलं जातं. चिडविलं जातं. ताशेरे ओढले जातात व नावबोटंही ठेवली जातात. असं का होतं? काल असं होत नव्हतं असंही मानलं जातं. परंतु ते सर्व खोटं आहे. कारण कालही घडत होती अशीच काही प्रकरणं. परंतु काठीचा धाक असल्यानं ती प्रकरणं बाहेर येत नव्हती जास्त प्रमाणात. आजही तेच घडत आहे वास्तववादी चित्रण. लोकं फक्त दुसऱ्याकडेच बोट दाखवतात व हे विसरतात की आपली चार बोटं आपल्याकडे आहेत व खुणावत आहेत की खरं तर तो वाईट नाही. वाईट आहेस तू. कारण तुझ्यात अहंकार आहे अन् एवढे सारे षडरिपू आहेत की तू त्याचं मोजमापच करु शकत नाही.
अलीकडील काळात शाळेच्या वर्गखोल्यातून कुसंस्कारही वाढतांना दिसत आहेत. याला जबाबदार केवळ शिक्षकच नाही तर पालकही तेवढेच जबाबदार आहेत. आज समाजाचं दिसतं वास्तववादी चित्रण. कुठं जाळपोळ, सत्याग्रह, आंदोलन व देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान. आज मोठमोठी मंडळीही एकमेकांच्या अंगावर स्याही फेकतात. तर कुठं संसदेतही मिरचीची पुड. ज्याची तालीम होते शाळेतील वर्गखोल्यातून. असे म्हटल्यास काहीच हरकत नाही. परंतु ते वय नाबालिक असतं. त्या वयात काहीच कळत नाही व आपल्या पाल्यांना समजावून सांगणारे समाजकंटकच ढोल बडवून सांगत असतात की मी शिक्षकांवर माझ्या काळात स्याहीफेक प्रकरण केलं होतं. त्यातून असा संदेश जातो की मुलं सुसंस्कारी बनत नाहीत तर ते कुसंस्कारी बनतात. विशेष म्हणजे मुलांमध्ये जर सुसंस्कार रुजवायचे असेल तर आपण स्वतः एक पालक म्हणून सुज्ञ वागावं. शिक्षकांचा आदर करावा. आपल्या पाल्यांना आपण गतकाळात काय केलं. कोणता तीर मारला. ते सांगण्याची गरज नाही आणि असं जो कोणी सांगत असेल, त्यानं आपल्या लेकराला शाळेत पाठविण्याची गरज नाही. घरीच कुसंस्कार दिलेले बरे. कारण शाळा हे सुसंस्काराचे केंद्र आहे. कुसंस्काराचे केंद्र नाही.
आज समाज असाच आहे. मग तो गुरु जरी असला तरी त्याला इज्जत मिळत नाही. इज्जतीचे वाभाडे काढले जातात. जिथं एक व्यक्ती आपल्या स्वतःची कमजोरी न बघता दुसऱ्याकडेच बोट दाखवतात. तिथं इज्जत वा अब्रूचं काय? आजचा शिक्षकही त्याला पुरुन उरतो. कालच्या शिक्षकांवर ते कडक असतांनाही स्याही फेक प्रकरणं व्हायची. कुठं शिक्षक मारतात. म्हणूनच काठी धरली जायची. याबाबतीत एक प्रसंग सांगतो. प्रसंग बालपणातील आहे. एका शाळेत काही शिक्षक होते. आता शाळा म्हटलीच तर शिक्षक राहणारच आणि प्रत्येकाची पाच बोटं सारखी राहात नाहीत. तसे शिक्षकही. त्या शाळेत एक शिक्षक असा होता की त्याला डोक्यावर केसं नव्हते. तो आनुवांशिकतेचा प्रॉब्लेम होता. परंतु विद्यार्थीच ते. ते विद्यार्थी चक्कं त्यांना त्यांचं नाव घेवून चॉटी हॉप म्हणायचे व पळून जायचे. जरी काठीचा धाक होता तरी. असंच त्याच शाळेतील एक प्रकरण. ते शिक्षक फार कडक होते. खुप मारायचे व एक दिवस एका विद्यार्थ्यांनं ठरवलं. स्याही फेकायची. त्यानं स्याही फेकली एक दिवस त्यांच्या शर्टावर. मग काय त्या शिक्षकांना एवढा राग आला की त्यांनी तब्बल आठ दिवस शिकवलं नव्हतं शाळेत. मग नंतर ते शिक्षक सबंधीत प्रकरण विसरले व सर्व राग, दोष विसरुन शिकवायला लागले.
शिक्षक असेच असतात की जे चांगले असतात. कडक वाटतात ते. परंतु त्यांच्यात नम्रपणा असतो. ते कडक वागतात. कारण ते जर कडक वागलेच नाही तर विद्यार्थी नावाची पिढीच घडणार नाही. तसंच विद्यार्थी असेच असतात. काही फारच छान असतात की ते शिक्षकांना हवेसे वाटतात. त्यांच्याचसाठी शिक्षक हिरीरीनं शिकवीत असतो अगदी मेहनत घेत असतो. काही विद्यार्थ्यांना मात्र अजिबात शिकवावंसं वाटत नाही. जे रिस्पॉन्स देतात. अशांच्याचमुळं खरं तर शाळेत शिकवणं होतं. याबाबतीतही एक प्रसंग सांगतो.
एक शिक्षक होते. ते काय करायचे, प्रत्येक रविवारला योग साधनेचा अभ्याससत्र घ्यायचे. त्यांच्या त्या योग साधनेत पंच ज्ञानेंद्रिय वगैरेचे मोठमोठे चित्र लावायचे, ज्यात मानवी सांगाड्यांचा समावेश असायचा. ते पाहूनच बालपणात भीती वाटायची आणि त्यांचा तो परिसर झाडूने छान स्वच्छ करण्याकरिता काही मुलांना बोलवायचे. मुली दूर राहायच्या किंवा त्या मुली असल्याकारणानं ते शिक्षक त्यांना बोलवत नसत. त्या मुली परिसर स्वच्छ करण्याच्या कार्यापासून वाचायच्या, मुलं मात्र त्यांच्या घराशेजारी राहायचे, त्यामुळे त्यांना विशेष बोलावणं असायचं. मग विचार यायचा की एकतर सुट्टीचा दिवस, शिवाय इच्छा असो वा नसो, मन मारुन जावं लागायचं, नाहीतर दुसऱ्या दिवशी वर्गात मार खाण्याकरीता हजर राहावं लागायचं किंवा मार मिळेल याची भीती असायची. कारण ते गुरूजी खूप कडक शिस्तीचे होते.
महिन्यातील दोन तीन रविवार त्या योगसाधनेची साफसफाई करावी लागायची. त्यावेळेस ते कंटाळवाणं वाटायचं परंतु त्यावेळी ते जरी कंटाळवाणं वाटायचं. परंतु त्यावेळेस जरी ते कंटाळवाणं वाटतं असलं तरी ते करावं लागायचं. पण काल त्यांनी दिलेली स्वच्छतेची शिकवण, ते संस्कार पुढील जीवनात नक्कीच विद्यार्थ्यांच्या कामी आले असतीलच यात शंका नाही. म्हणून हे जे शिक्षक ज्या कोणाला लाभतात. हा आपल्या आयुष्याचा एक भागच असतो. तो खरोखरच आपल्या आयुष्याचा एक भाग आहे असंही विद्यार्थ्यांनी आज तरी समजण्याची गरज आहे. नाहीतर आजच्या काॅन्व्हेंटच्या काळात आजच्या मुलांना वाटत नाही की असे शिक्षक वा गुरू भेटत असतील की नाही. ही शंका नाकारता येत नाही. याबाबतीत माझ्याच जीवनात घडलेला एक प्रसंग आनंदला आठवत होता. तो लहान असतांना त्याला त्याची बहिण पोळ्या बनवायला शिकवायची. भाजी भात बनवायला लावायची व त्याला कंटाळा यायचा. वाटायचं की हे काम माणसाचं नाही. महिलांचं आहे. आपण का बनवावा स्वयंपाक? त्यामुळंच मनात इच्छा नसतांना त्या काळात तो स्वयंपाकाचे धडे शिकला त्याच्या बहिणींकडून. आज मात्र तेच धडे कामात येत होते आनंदला कधीकधी. कधी पत्नी आजारी राहात असे तेव्हा किंवा कधी ती बाहेरगावी जात असे तेव्हा. यामुळं आनंद उपाशी तर राहात नसे. शिवाय बाहेरचे अन्नभेसळीचे पदार्थ खावून अंगात रोग शिरवण्यापासून तर नक्कीच तो वाचत असे.
महत्वपुर्ण बाब ही की कोणताही गुण हा व्यर्थ नसतोच. तो गुण वायाही जात नाही. कधी एखाद्या वेळेस कामात येतोच. आज आनंद पाहत होता की काही लोकांना स्वयंपाक नीट करताच येत नाही. ते चक्कं पत्नी आजारी असतांनाही तिला स्वयंपाक बनवायला लावतात. त्यामुळं त्याला वाटायचं व तो सांगायचा की ती पत्नी मग कशीतरी स्वयंपाक बनवते. ज्या स्वयंपाकात गोडी नसतेच स्वयंपाक त्यानंच बनवावा की जो सात्विक असेल. जो सात्विक नसेल. त्यानं स्वयंपाकच बनवू नये. कारण सात्विकतेचे गुण स्वयंपाकात उतरत नाहीत व तामसीपणा अन्नाद्वारे शरीरात जात असतो. हेच यातून वाखाणण्याजोगं आहे. विद्यार्थ्यांनी स्याही फेकलीही असेल त्या काळात शिक्षकांवर. परंतु ते त्याचं बालवय होतं. त्या वयात त्याला तेवढं समजत नव्हतं. आज तर काही काही नेते स्याहीफेक प्रकरणं करतात. जरी ते सुज्ञ असले तरी. याचा अर्थ काय? पुन्हा एक प्रकरण सांगतो. एक शाळा की ज्या शाळेत विद्यार्थ्यांनी चक्कं पोळ्याच्या चौर्य मटाट्या मुख्याध्यापकाच्या दरवाज्यासमोर टाकल्या होत्या. तसं ते दिसताच सर्वच विद्यार्थ्यांना फटकारलं होतं मुख्याध्यापकांनी. महत्वाचं सांगायचं झाल्यास शाळा हे विद्यार्थ्यांना प्रेरणाच देण्याचं काम करीत असते. मग ते विद्यार्थी कसेही वागो. शिक्षकही चांगलेच वागत असतात विद्यार्थ्यांशी. मग ते विद्यार्थी कसेही वागो. ते भेदभाव करीत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांनीही ही बाब समजून घ्यावी. पालकांनीही समजून घ्यावी व आपल्या पाल्यांना ज्ञानरुपी बोधात्मक सुसंस्काराचे दूध पाजावे. अज्ञानरुपी कुसंस्काराचे दूध पाजू नये. जेणेकरुन घडणारी वा पुढं येणारी पिढी ही सुसंस्काररुपानं बाहेर येईल. कुसंस्कारानं नाही. हे तेवढंच खरं. परंतु आजही काही काही लोकं असे ढोल पिटवून सांगतांना दिसतात की मी सरांचं ऐकत नव्हतो. मी सरांचा हात पकडला होता. मी स्याही फेकली होती. म्हणजे त्यात त्यांना सांगायचं असतं की त्यानं किती मोठा तीर मारला की त्याच्यासारखा तीर जगात कोणीच मारला नाही. ना जगात कोलंबस झाला, ना जगात गॅलिलिओ. तोच जगाचा क्रमांक एकचा व्यक्ती आहे की जो सर्वात जास्त हुशार आहे. विशेष म्हणजे जीवनात जगत असतांना कळत नकळत आपल्या हातून चांगल्या वाईट गोष्टी घडतातच. त्याचा बाऊ करु नये. व्यक्तीनं कोणतेही पराक्रम करावे. परंतु त्याची आतिशयोक्ती करु नये. जर आतिशयोक्ती केली तर अहंपणा येतो व आपल्यात आलेला हाच अहंपणा आपल्याच विनाशाला कारणीभूत ठरत असतो यात शंका नाही.
फळाची अपेक्षा करु नये. कर्म करावं असं वक्तव्य गीतेतून दिसून येतं. आनंद कर्मच करीत होता. तो कुणालाही न दुखवता पाऊल टाकत होता. त्याचं पाऊल टाकणं हे शत्रूला जळवणारं नव्हतं. परंतु आज त्याच्या त्या प्रत्येक पावलानं शत्रू जळून खाक होत होते.
शत्रू कोण होते? शत्रू होते, ते त्याच्याच वर्गातील मित्र की जे मित्र त्याच्याशी गोडगोड बोलत होते आणि मागं कुरघोडी करीत असतील असं वाटत होतं. काही तर फोन करुन स्पष्टता व्यक्त करीत होते. काही मात्र तसं बोलत नव्हते. परंतु त्यांच्या एकंदर बोलण्यावरुन त्यांच्या मनात त्याच्याविषयी भयंकर राग असावा असं वाटत होतं. तसं शारदाचं नव्हतं.
शारदा ही मनमिळावू स्वभावाची होती. तिला आनंद प्रत्येक गोष्टी सांगायचा आपली एक वर्गबहिण म्हणून. ती त्यावर त्याचं समाधान करायची. ती म्हणायची की तू फक्त कर्म कर. फळाची अपेक्षा करु नकोस. फळ एक ना एक दिवस मिळणारच. शेवटी तो त्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा व मार्गस्थ व्हायचा नव्या प्रेरणेनं. ज्या प्रेरणेची मार्गदर्शिका शारदाच होती.
ते दहावीचं वर्ष. ते वर्ष आनंदच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय त्रासदायक ठरलं. विद्यार्थ्यांनी ठरवलं होतं की हे वर्ष आपलं शेवटचं वर्ष. या वर्षी फारच मौजमजा करायची. परंतु या मौजमजेत कारणीभूत ठरलं स्याहीफेक प्रकरण. कारण शाळेतील विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी सारखे नव्हते. काही वात्रटही होते. जसे, माणसाचे पाच बोटं सारखे राहात नाहीत तसे.
आनंदच्या वर्गात काही हुशार विद्यार्थी होते तर काही बुद्धू आणि तेवढेच वात्रटही. असाच एक विद्यार्थी. तो वर्गातील एक हुशार विद्यार्थी होता. तो अतिशय हुशार की ज्याची तुलना थॉमस अल्वा एडीशनशी करता येईल.
तो दहावीचा वर्ग. स्याहीफेक प्रकरण झालं होतं. त्या स्याही फेक प्रकरणाची चर्चा ही शाळेत रंगली होती. अगदी स्टॉपरुमपर्यंत गेली होती ती चर्चा. परंतु बिंग फुटलं नसल्यानं सारेच चिंतेत होते. त्यात शिक्षकही. कारण कोणी नाव सांगायला तयार नव्हतं आणि कोणाचंच नाव अजूनपर्यंत पुढं आलं नव्हतं. आज त्या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले होते. त्यातच सरांनी गुपीत उघड व्हावं, म्हणून संपूर्ण वर्गाला शिक्षा केली होती. दहा दिवस शिकवणी बंद करुन पाहिलं होतं, अशानं तरी गुपीत बाहेर येईल म्हणून. जर विद्यार्थ्यांना शिक्षा झालीच तर कदाचीत गुपीत बाहेर येवू शकतं असं वाटत होतं शिक्षकांना. परंतु काहीच पर्याय निघाला नव्हता.
त्यानंतर सर्वांना वाटलं की हे प्रकरण इथेच संपलं असणार. पण आग जरी विझली असली तरी राखेखाली निखारे अजूनही शिल्लक असतात ना. तसंच झालं असेल कदाचीत. निखारे अंगारत होते. त्याचं कारण नंतर माहीत झालं. कारण त्यानंतर शिक्षक सर्व वर्गाला त्रास द्यायला लागले होते. सर्वांना मारायला लागले होते. सर्वांचा राग करायला लागले होते. त्यातच त्या बदल्याच्या भावनेनं खुद्द हुशार विद्यार्थ्याला सोडलं नाही. जेणेकरुन त्याला माहीत असेल तर तो सांगेल. असं शिक्षकांना वाटत होतं.
त्याला मारण्याचं कारण तो विद्यार्थी स्याही फेक प्रकरण समजायचा. परंतू ते तसं कारण नव्हतंच. कारण होतं त्याचं स्टॉपरुमजवळून भटकणं. तसा रागच होता शिक्षकांच्या मनात. शिवाय तो हुशार विद्यार्थी त्या शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. राग धुमसत होता वर्गशिक्षकाच्या मनात. तसं पाहता ते शिक्षक त्या विद्यार्थ्यांचे आवडतेच शिक्षकच नाही तर वर्गशिक्षकही होते. त्यांना वाटत होतं की माझ्या वर्गातील मुलांनी असं करायला नको होतं.
राग मनात धुमसत होता. तो कुणावर काढायचा. ते शिक्षक त्याचा विचार करीत होते. एवढ्यातच दिसला तो हुशार विद्यार्थी. जो सतत स्टॉपरुमजवळून जायचा.
तो हुशार विद्यार्थी जेव्हा-जेव्हा त्या कोपऱ्या वरच्या स्टॉपरूम जवळून जायचा, तेव्हा-तेव्हा आतमधील गप्पांचा आवाज त्याला ऐकायला यायचा. ते शाळेतील शिपायानं बरेचदा पाहिलं होतं. तसंच ते त्या वर्गशिक्षकांनीही पाहिलं होतं. त्याची तक्रार शिपायानं वर्गशिक्षक असलेल्या शिक्षकांना केली होती. तेही त्याच्या वागण्याचं निरीक्षण करीत होते.
तो एकदाचा दिवस. तो एक दिवस. त्या दिवशी असाच तो हुशार मुलगा त्या वर्गशिक्षकांना दिसला. त्यांनी ताबडतोब त्याला शिपायाकरवी त्या वर्गशिक्षकांनी बोलावलं, त्यानंतर त्यांनी चांगली भरभरुन लावली त्याच्या कानशिलेत की ज्यानं कान लाल होवून गेला होता त्याचा. त्यानंतर शिक्षकांनी त्याला वर्गात जायला लावलं होतं. राग पुर्ण निवळला होता. जो स्याहीफेक प्रकरणाचा राग होता.
शिक्षकांचा तो राग. ज्यावेळेस शिक्षकांनी त्याला बोलावलं होतं. तेव्हा तो समजून गेला होता की काहीतरी गडबड झालेली आहे. जसा तो आतमध्ये गेला. तसे शिक्षक अचानक उठून त्याच्यासमोर उभे ठाकले. ते काही बोलले नाही आणि काही कळायच्या आत एक तीव्र स्वरुपाची चापट त्याच्या उजव्या कानाखाली मारली, ती चापट इतकी जोरात लागली होती की अख्ख्या गालरुपी ब्रम्हांडाला लाल करुन करुन टाकलं होतं. त्यानंतर म्हटलं होतं की चल जा इथून. त्यावेळेस पहिल्यांदा वाटलं होतं त्याला की आता समदं संपलं. आता या शाळेतील शेवट करायचा. आता परत कधीच यायचं नाही या शाळेला. कारण शेवटच हा. तो गोड व्हावा असं वाटत होतं त्याला आणि त्याचबरोबर सर्वांना. परंतु ते शाळेतील त्या आवडत्या प्रिय विद्यार्थ्याला आवडत्या शिक्षकानं मारलेलं पाहून काही विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबाबतची असुया आणि तेवढाच तिटकारा निर्माण झाला होता.
ती शाळा. त्या दहाव्या वर्गात असतांना आवडत्या सरांनी त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्याला मार दिला होता. तो दिवस बहुधा सर्व विद्यार्थ्यांसाठी वाईट दिवस ठरला होता. त्यानंतरही विद्यार्थी सुधारले नाहीत.
ती चापट. त्या चापटीचे कारण अजूनही त्याला समझलेले नसले तरी एक गोष्ट निश्चित होती, ती म्हणजे मौजमजा करणं. ती गोष्ट अजूनही विद्यार्थ्यांच्या स्मरणात होतीच. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अशी घटना घडवून आणली की संबंध शाळेलाच त्या विद्यार्थ्यांचा वैताग येईल. ती घटना म्हणजे मुख्याध्यापकाच्या कार्यालयासमोर पोळ्याचे मेढे टाकणे. तेही प्रकरण शिक्षकांची भीती असतांनाही विद्यार्थ्यांनी अगदी सुनियोजीत पद्धतीनं घडवून आणलं होतं. त्यामुळंच तर मुख्याध्यापकांसह संपुर्ण शिक्षक वर्ग चिडला होता. ज्यात त्या वर्गाचे वर्गशिक्षकही सहभागी होते.
विद्यार्थी हुशार असतात अभ्यासात. परंतु त्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनाही दाखवून दिलं होतं की ते केवळ अभ्यासातच हुशार नाहीत तर ते इतर वात्रट गोष्टीतही हुशार आहेत. ते केवळ त्याही गोष्टीत हुशार नाहीत तर आपल्या ज्ञानाच्या भरवशावर मोठमोठे रहस्यही लपविण्यात हुशार आहेत. तेच दिसलं होतं सर्वांना त्या विद्यार्थ्यांच्या कृतीवरुन.
एकदाची आनंदच्या शाळेतील गोष्ट. ती शाळा. त्या शाळेत विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी पेपर दिले जायचे व ते पेपर शिक्षकांना एका फाईलमध्ये लावून तपासायला दिले जायचे. त्यातच ते पेपर एकदा आनंदच्या शाळेतील त्या हुशार विद्यार्थ्यानं पेपर सोडवले व ते पेपर आपल्या वर्गशिक्षकाला तपासायला दिले. परंतु तपासायला देतांना त्यानं त्या फाईलला माधुरी दीक्षित व अनिलकपूरचं चित्र कव्हरपेजवर लावलं. ते त्या शिक्षकाला माहीत नव्हतं. त्यानंतर त्यांना सर्व मुलांच्या वह्या तपासायला घेतल्या. ती वही एवढी सुंदर दिसत होती की ते आनंदच्या शाळेतील वर्गशिक्षकाच्या पत्नीला व मुलीला आवडली. त्यांनी त्या विद्यार्थ्याची प्रशंसा केली. परंतु गणित चुकलं. त्या वर्गशिक्षकाला त्यावरील कव्हर सिने अभिनेत्याचं असल्यानं त्यांना ते आवडलं नाही. त्यांनी दुसऱ्याच दिवशी त्याला म्हटलं की हे कसं विचित्र चित्र लावलं. हे चित्र बदलवून दुसरं कव्हर लावून दे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यानं ताबडतोब ते चित्र बदलवलं व त्या ठिकाणी गणपतीचं चित्र लावलं व ती वही त्या शिक्षकांना दिली. त्यानंतर शिक्षकानं सांगीतलं की हे चित्र चित्रविचीत्र वाटत असलं तरी माझ्या मुलीला व पत्नीला भावलेलं होतं. ते चित्र एवढं सुंदर होतं. परंतु शालेय विद्यार्थ्यांनी तरी असे चित्र लावू नये. कारण ती आपली संस्कृती नाही.
'आपली संस्कृती' हा शब्द महान होता. परंतु त्या काळात तो शब्द आनंदसह इतरांना समजला नव्हता. परंतु आज काळ गेला. अनेक वर्ष झाली होती. पत्न्या आल्या होत्या. मुलंबाळं झाली होती व आता ती मुलं आज वयात आली होती. त्यातच आनंदसह इतरांना उतारवय लागलं होतं नव्हे तर म्हातारचाळच. त्यामुळंच आता संस्कार म्हणजे काय? ते चांगलं कळायला लागलं होतं. त्यातच संस्कृती हा शब्दही चांगलाच कळला होता. आज तीच संस्कृती होती की ज्या काळात कळली नसल्यानं स्याहीफेक व मेढे फेक प्रकरणं घडली होती. कदाचीत त्यावेळेस जर ती संस्कृती आनंदसह इतर सर्वांना कळली असती तर त्यापैकी कोणतीच प्रकरणं घडली नसती यात शंका नाही.
आनंदच्या वर्गातील तो हुशार विद्यार्थी. त्या विद्यार्थ्याचं नाव राजेश होतं. राजेश हा मागील बाकावर बसायचा. त्यातच त्या बाकावर तो इतर मुलांसोबत गोष्टी करायचा. तसं पाहिल्यास तो त्या शाळेतील वर्गशिक्षकाचा आवडता विद्यार्थी होता.
एकदा शिक्षक शिकवीत होते शाळेत. अचानक त्यांचं लक्ष राजेशकडे गेल. राजेश बोलत होता. ते शिक्षकांच्या लक्षात आलं व त्यांनी राजेशला बोलावलं. म्हटलं,
"आजपासून याच पहिल्या बाकावर बसायचं. उद्यापासून तू इथंच बसायचं. मागे जायचं नाही व मागे बसायचं नाही."
राजेश त्या दिवशीपासून पुढील बाकावरच बसला होता. आता त्याची बोलतीच बंद झाली होती. मात्र त्यालाच पुढं का बसवलं? यावरुन मागील त्याच्यासोबत बसणारी मंडळी कुरकूर करीत होती. राजेश केवळ त्या दिवशीपासून पहिल्या क्रमांकाच्या बाकावरच बसला नव्हता तर त्या वर्षीच्या परीक्षेत तो पहिल्या क्रमांकावरही आला होता. असाच एक प्रसंग राजेशच्या बाबतीत घडला होता. तो म्हणजे त्याचं शाळेतील फलक पाहाणं. त्यानं शाळेतील एक फलक पाहिला होता. ज्या फलकावर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या मुलांची नावं लिहिली होती. राजेशनं तो फलक पाहिला व ठरवलं की पुढील वर्षी आपलेही नाव या फलकावर लागावं. तो त्याच जिद्दीनं दहावीत जाताच जोमानं अभ्यास करु लागला होता. त्याच धुमश्चक्रीत तो दहावीला असतांना एवढा समोर निघून गेला होता की त्याचं नाव त्याच फलकावर सुवर्ण अक्षरात लिहिल्या गेलं होतं. मात्र यावेळेस नित्य अभ्यास करणारा आनंद घसरला होता. कारण ते प्रारब्धच होतं की त्याची नवीन घेतलेली सायकल एका प्रसिद्ध दर्ग्यातून चोरीला गेली होती. त्याचाच धसका घेत आनंद स्पर्धेतून बाद झाला होता.
आनंदच्या हुशारीचे दिवस आता संपले होतेच. आनंद सातवीत असतांना दुसऱ्या क्रमांकानं पास झाला होता. परंतु तो आठवीत जाताच त्याला आठवीची हवा लागली होती व त्याचा क्रमांक ढेपाळला होता. तो आठवीत असतांना पाचव्या क्रमांकावर गेला होता. पुढं नववीत त्याला क्रमांकाची बढतीच मिळाली नाही आणि दहावीला तर नाहीच नाही.
राजेशचा नववीत आलेला द्वितीय क्रमांक वाखाणण्याजोगाच होता. नववीला असतांना त्याचा दुसरा क्रमांक आला होता. परंतु त्याला तिसरा क्रमांक दिला होता. पण वर्गातील विद्यार्थी एवढे हुशार होते की त्यांनी यशस्वीता खेचून आणली होती. तोही एक किस्साच होता.
वर्ग अ म्हटला की डोळ्यांसमोर येत होता, तो हुशार मुलां-मुलींचा समुह. हा समज सत्तर ते नव्वदच्या दशकात रूढ झालेला होता. आनंदच्या शाळेत हीच समज रूढ झालेली होती. तशा त्या शाळेत चार तुकडया होत्या, शाळा तशी सरकारमान्यच होती, त्यातच त्या शाळेत सर्व स्तरातील, समाजातील पालकांची मुलं-मुली होती, शिवाय कोणत्याही प्रकारचा वंशभेद, जातीभेद हा त्या शाळेत नव्हताच. शिक्षक मंडळीही हुशारच होती. ती मंडळी मुलांवर तेच संस्कार द्यायची की ज्या संस्कारातून विद्यार्थ्यांचं आयुष्य घडेल. मात्र त्या शाळेतील मुलांना या बाहेरील जगाचा गंधही नव्हता.
बालपण निरागस असतं आणि ते मुलं अनुभवत होती. ती मुलं प्राथमिक स्तरातून माध्यमिकला पोहचली होती. स्पर्धाही वाढीस लागल्याच होत्या. त्यातच स्पर्धा होती अभ्यासाची. तिही वाढीस लागली होती की कोण शाळेत पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकविणार.
ती सारखी चढाओढ. त्या चढाओढीत एक मुलगी हमखास पहिल्या क्रमांकासाठी ठरलेली असायची. त्यानंतर बाकीच्यांचा क्रमांक लागायचा. ती नेहमीच पहिली यायची. पाचवी ते सातवी तिनं कधीच पहिला क्रमांक सोडलाच नव्हता. पहिले तीन हे “अ” तुकडीतूनच यायचे, त्यामुळे आनंदच्या वर्गातील मुलांचा वेगळाच दरारा असायचा. त्यातच त्या वर्गाचा दरारा आणि सम्मान वाढीस लागला होता. काही मुलं याचं जोरावर दुसर्‍या वर्गातील मुलांसोबत हातापाई वर येत असत. पण हे सगळं कसं बाहेर घडायचं? हे सांगता येणं कठीण होतं.
शिक्षकांनाही या गोष्टींचा थांगपत्ता लागत नसे. ती मुलगी पहिली येत होती. त्याचा अर्थ तिची शिकवणी. तिची शिकवणी शाळेतच एक शिक्षक इंग्रजी शिकवीत असलेल्या शिक्षकाकडे होती. त्यामुळंच तिला गुण नक्कीच जास्त मिळायचे. मात्र बाकीच्यांचं रहस्य गुपीतच होतं आणि तेवढंच गुलदस्त्यातही. परंतु आठवीपासून चित्र बदलायला लागले, बालपण जाऊन तारुण्यात शिरायला लागले होते सगळे. क्षितीजं विस्तारली होती. त्यातच त्यांच्या नव्या आशा-आकांशा वाढीस लागल्या होत्या.
आठवीपासून आनंदच्या वर्गात स्पर्धा सुरु झाली होती, तिमाही आणि सहामाही परीक्षेत कधी राजेशचा एक मित्र मनोज पहिला यायचा तर कधी राजेशचा दुसरा मित्र शैलेश तर कधी तो तर कधी ती एक मुलगी. हा पावसाच्या लपंडावासारखा पहिल्या क्रमांकावर येण्याचा खेळ सुरु होता वर्षभर शाळेत. त्यामुळं आपलीही वर्णी लागावी या हेतुनं इतर मुलं- मुली जोमाने अभ्यासाला लागली होती. कारण होतं नववीच्या वार्षिक परीक्षेत पहिल्या क्रमांकावर येणं.
आनंदला आठवत होता तो नववीच्या वार्षिक परीक्षेच्या निकालाचा दिवस. मे महिन्याचा पहिला आठवडा असेल बहुतेक तो. आठवी आणि नववीच्या आठही तुकड्यांचा निकाल एकाच दिवशी घोषित होणार होता. सर्व तुकड्यांचे विद्यार्थी छान टॉपटीप मध्ये आले होते. तशी एक प्रकारची आशा यावर्षीही लागली होती की कोणता वर्ग बाजी मारेल. मग एका एका क्रमांकाचं नाव घेणं सुरु होणार अशी चिन्हं दिसत होती. अशातच सकाळचे नऊ वाजले.
सकाळी नऊला सर्व विद्यार्थी शाळेच्या आवारात गोळा झाले होते. ती जागा छान डौलदार गुलमोहोराच्या झाडांनी वेढलेली होती. सकाळचा सुर्य आकाशात विराजमान झाला होता. कोकीळ गुलमोहराच्या झाडावर बसून गाणं म्हणत होती. सकाळचा गार वारा आणि थोडं कडक ऊन पसरलेले होते. ते कडक ऊन्हं व गार वारा अंगाला स्पर्शून जात होता. अशातच हळूहळू निकाल घोषीत व्हायला सुरुवात झाली. निवेदन करणारा एक-एक निकाल घोषीत करीत होता. मुलांची हुरहुर वाढत चालली होती. त्यातच ज्यांना क्रमांक येईल, असं वाटत होतं. त्यांना धडकी भरत चालली होती. ज्यांची नावे घोषीत होत होती, त्यांच्या करीता टाळयांचा कडकडाट होत होता आणि त्या वर्गातील मुलं, मुली एकच कल्लोळ करीत होते. राजेशच्याही मनाची धडधड वाढली होती आणि त्यालाही वाटत होते की मी याहीवर्षी पहिला क्रमांक नक्कीच पटकावणार. मात्र यावर्षी निवेदकानं नाव वाचलं व पहिला, पहिला क्रमांक मनोज नावाच्या मुलाचा आला आणि राजेशच्या चेहर्‍यावरचा आनंद पार एका झटक्यात ओसरवला. मनोजचं नाव घोषीत झालं. थोडं राजेशला नक्कीच वाईट वाटलं. परंतु तेवढाच आनंदही. कारण तो अ वर्गाचा विद्यार्थी होता की ज्याचा पहिला क्रमांक आला होता. राजेशला वाटायला लागले होते की पहिला क्रमांक नाही आला, परंतु दुसरा क्रमांक तरी त्याचा नक्कीच येईल. पण झालं उलट. यावेळेस दुसरा नंबर हा ब तुकडीतील मुलीकडे गेला होता. तसा राजेश आश्चर्यचकीत झाला होता की असं कसं झालं? कारण आपला अभ्यास आपल्याला कळत असतो व तोच अभ्यास, तीच महत्त्वाकांक्षा आपल्याला आपल्या स्वतःची ग्वाही देत असते की मी एवढा अभ्यास करुनही माझा पहिला नाही तर दुसरा क्रमांक का आलेला नाही?
राजेशचा पहिला क्रमांक नाही तर दुसराही क्रमांक आला नव्हता. आता शेवटची आशा उरली होती, ती म्हणजे फक्त तिसऱ्या क्रमांकाची आणि त्याच्या नावाची घोषणा झाली.
त्याच्या नावाची घोषणा झाली आणि स्वर्ग पावल्याचा आनंद त्याला झाला. तो पहिल्यांदाच बक्षीस घेण्यासाठी पुढे गेला. बक्षीस्वरुपात त्याला काही रूपये मिळाले होते. त्याला बक्षीस मिळाल्यापेक्षा त्याचा तिसरा क्रमांक आल्याचा आनंद त्याच्या चेहर्‍यावरुन ओसंडून वाहात होता. त्याला तसा जास्तच आनंद झाला होता.
कार्यक्रम संपला. सर्व मुलं- मुली आपसांत गप्पांमध्ये रमली होती. ते एकमेकांचा निरोप घेत होती. कारण दुसऱ्या दिवशीपासून उन्हाळ्याच्या सुट्या लागणार होत्या. एवढयात एक वर्गमैत्रिण धावतच राजेशकडे आली. धापा टाकू लागली आणि म्हणाली,
"राजेश, तुझा दुसरा क्रमांक आलेला आहे. त्या मॅडमकडून घोषणेवेळी काहीसा घोळ झालेला आहे ."
ते तिचे शब्द. तशी परत एकदा आनंदच्या वर्गाची चमू परत त्या मॅडमकडे गेली. परत प्रकरणाची शहानिशा केली आणि परत तपासणी केल्यावर त्यांची चुक त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी लगेच राजेशला दुसर्‍या क्रमांकाचे बक्षीस दिले. त्यानंतर सर्व विद्यार्थी परत वर्गाकडे गेले होते.
आज राजेशही तब्बल तीस वर्षानंतर भेटला होता शाळेतील त्या मित्रमैत्रीणींना. त्यानं त्याच्या वर्गातील केवळ त्या प्रकरणासाठी त्यावेळेस आभार मानले होते. आजही तो आभारच मानत होता. त्याच प्रकरणाबद्दल. आज तीस वर्ष झाल्यानंतरही. कारण तेच एक असं प्रकरण घडवून आणलं होतं त्या शाळेतील वर्गमैत्रीणींनी की ज्या प्रकरणानं त्यानं पुढं कधीच मागं वळून पाहिलं नव्हतं. आज तो एका ऑफीसर पदी विराजमान झाला होता. ध्रृवताऱ्यासारखा. अविरत अचल आणि निरंतर अशाही स्वरुपात.
राजेश दहावी झाला. त्यानं सर्वात जास्त गुण मिळवलेत. त्यानंतर मनोज व ती मुलगी की जी पहिल्या क्रमांकावर असायची दरवर्षी. परंतु आनंद या शर्यतीत कुठंच नव्हता. मात्र आनंदच्या मनात महत्वाकांक्षा होती. ती म्हणजे तिच्या पुढे जाण्याची. त्याला वाटत होते की जर त्या दोघांनी एकाच महाविद्यालयात प्रवेश घेतला तर तो तिच्या पुढं कधीच जावू शकणार नाही. म्हणूनच त्यानं दुसऱ्याच महाविद्यालयात प्रवेश घेतले व बारावीला असतांना त्यानं कितीतरी गुणांची कमाई केली.
आज आनंद दुसऱ्याच महाविद्यालयात होता व तो त्या महाविद्यालयातून दुसऱ्याच क्रमांकावर पास झाला होता. ती मात्र दुसऱ्याच महाविद्यालयात होती आणि तिला आनंदपेक्षा कमी गुण मिळाले होते. त्यामुळंच तिला मागं टाकल्यानं आनंदला झालेला आनंद हा गगणात मावेनासा असाच होता.
नाश्ता किंवा जेवन. घरचं जेवन कितीही स्वादिष्ट असलं तरी ते आपल्याला आवडत नाही. बाहेरचं हॉटेलातील जेवन आपल्याला आवडते. तसंच घरच्या पत्नीच्या हाताला काहीच चव नाही असं आपण म्हणतो. कारण तिच्या हातचं ते जेवन नेहमीचंच असतं. तशीच ती आपली पत्नी, लक्ष्मीचे रुप जरी असली तरी ती आपल्याला आवडत नाही आणि बाहेरची सुरपंखा कितीही खराब असली तरी ती आपल्याला आवडते. तसंच महिलांचंही असतं. तिला तिचा पती कितीही चांगला असला, तिच्यावर प्रेम करणारा असला तरी तो तिला आवडत नाही. बाकीची माणसं आवडतात. जे त्यांचं सौभाग्य नसतं. काही मात्र याला अपवाद असतात.
लोकांना दुसऱ्याचे कपडे, दुसऱ्याची घरं, दुसऱ्याची मालमत्ता हे सगळंच आवडत असतं. सगळं दुसऱ्याचंच. मग ती साडी असो की कोणतीही गोष्ट. तसंच नाश्त्याचंही आहे. आनंदच्या शाळेतील विद्यार्थी मंडळ पाहिजे त्या प्रमाणात गरीब होतं. तशी त्याच शाळेतील त्या राजेश नावाच्या मुलाची गोष्ट. त्याला समोसा जास्त आवडायचा. समोसा हा त्याच्या अधिवास क्षेत्रातील आवडता पदार्थ. तो पदार्थ इतर भागात आढळून येत नाही.
आनंदच्या शाळेतील तो एक विद्यार्थी, तो एक दिवस क्लासला न जाता रेस्टॉरेंटला गेला. त्यानंतर त्यानं त्या रेस्टारेंटमध्ये समोस्याचा आर्डर दिला. समोसा तसा त्याच्या आवडीचा पदार्थ. तो दोन हॉटेलातील समोसे खायचा. ज्या हॉटेलातील समोसे चांगल्या चवीचे असत.
एकदा तो हॉटेलात गेला असतांना त्यानं समोस्याचा आर्डर दिला. त्यानंतर त्या दुकानातील वेटरनं एका प्लेटात समोसे व दुसऱ्याच प्लेटात गरम गरम कढी आणून दिली. तशी ती सकाळची वेळ आणि त्याचीही तारुण्याची वेळ. तशी तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाईंना भूक फार लागत असते. तशी त्यालाही भूक फारच लागली होती. आईनं तसाही डबा बनवून दिला होता. मग काय, गरम गरम समोसे व गरम गरम कढी प्लेटमध्ये येताच व कढीचा वापर सुरु झाला. मग काय, बापूनं कढी पेणं सुरु झालं. मग त्यानं प्लेटावर प्लेटा घेतल्या.
कढीच्या प्लेटावर प्लेटा घेत असलेला तो. ज्यातून मालकाला त्याचं कढी घेणं लक्षात आलं होतं. दोन प्लेट कढी अशीच संपली होती. आता त्यानं तिसरी प्लेट कढी मागतली. समोसा जशाच्या तसाच डोळे वटाळून पाहात होता. मग काय त्यानंतर त्या मालकानं त्याच्याकडे डोळे वटाळून पाहिलं आणि म्हणाला,
''पता नही, कहॉ कहॉ से आते है |''
त्यानंतर त्यानं तसं म्हणत प्लेटात कढी ओतली. त्यातील अर्धी कढी प्लेटच्या बाहेर सांडली. त्यानंतर त्याचीही लाज न बाळगता त्यानं ती कढीची प्लेट संपवली व पुन्हा कढीसाठी ती प्लेट घेवून तो वेटरकडे गेला. ती त्याची त्यानंतरची प्लेट. ती प्लेट तो घेताच रेस्टॉरेंटचा मालक म्हणाला,
"बे तू समोसा खाने आया की कढी पिने. कितनी सारी कढी पी है और समोसा जैसा का वैसाही है |"
त्यानंतर त्यानं अर्धाच चमच कढी दिली. त्यानंतर त्या मालकाचं वर्तन पाहून व त्याचा राग पाहून त्याला अर्ध्याच प्लेटवर समाधान मानावं लागलं होतं.
जीवनात अशाही गोष्टी असतात की ज्या घडत असतात. त्या गोष्टी आठवत असतात आयुष्याच्या वळणावर. तीस वर्ष होताच आनंदच्या शाळेतील त्या वर्गमित्राला त्यानं तारुण्यात खाल्लेल्या समोस्याची गोष्ट आठवत होती. त्या समोस्याच्या रुपानं तो समोसा आणि तो याचं नातं घट्टं जुळलं होतं. तो आता त्याच्या अधिवासाच्या बऱ्याच दूर अशा ठिकाणी नोकरीवर होता. परंतु तो जेव्हा परत यायचा. तेव्हा तो नक्कीच त्याच रेस्टॉरेंटमध्ये जात असे व आठवणीनं परीवारासह नाश्ता करीत असे. त्याला त्यावेळेस त्या तारुण्यात केलेली नाश्त्याची व कढीची गोष्ट आठवत असे व तो आपल्या परीवारालाही आवर्जून सांगत असे ती गोष्ट. शिवाय त्याला ती शाळाही आठवत असे व तो जेव्हा जेव्हा अधिवासाच्या ठिकाणी येत असे. तेव्हा तेव्हा तो त्या शाळेतही जात असे व त्या शाळेच्या दरवाज्याजवळ जावून त्या दरवाज्याजवळ नतमस्तक होत असे. कारण त्याला आजही वाटत होतं की त्याच शाळेनं त्याचं भविष्य बनवलं होतं. जे त्याचं भविष्य उज्ज्वल बनलं होतं. जणू प्रारब्धच बदलवलं होतं त्या शाळेनं. त्यानंतर उतो यशस्वी जीवनाच्या पायऱ्या चढू शकला होता.

************************************************

शारदा नेमकं कोणतं काम करायची ते काही आता समजत नव्हतं. ती नेहमी सांगत असे की ती ब्युटीपार्लर करते तर कधी सांगत असे की ती फॅशन डिझायनिंग करते तर कधी शेतीवर जाते असंही सांगत असे. यावरुन तिचं नेमकं काम आनंदच्या लक्षात येत नव्हतं. तसा तिचा चेहराही आज बर्‍याच दिवसानंतर त्याला स्पष्ट आठवत नव्हता.
शारदा आनंदच्याच पुस्तकाची एक नायिका होती. त्यामुळंच त्याला वाटत होतं की ज्या नायिकेला तो बरोबर ओळखत नाही. तिला भेटावं. जाणून घ्यावेत तिच्या जीवनाचे सार आणि त्याचबरोबर जाणून घ्यावं तिच्या उतारवयातील स्वप्न. ते स्वप्न काय असतील.
शारदा ही लठ्ठ होती जरी ती रोज शतपावली मारत होती. काळाच्या ओघानं भोगलेल्या गतकाळातील यातनांवर मात करुन तिला विधात्यानं एवढं सुख दिलं होतं की आज तिच्यात फारच लठ्ठपणा आला होता.
आनंद शारदाला बहिण मानत असे. कारण शालेय जीवनात जी त्याची एकमेव बहिण होती. ती संगीता आज या जगात नव्हती. ती गेल्यानंतर त्याचं जीवन रुक्ष झाल्यासारखं वाटत होतं. सतत तिचीच आठवण यायची त्याला. अशातच योगायोग हा की त्याला शारदेचा रुपानं बहिण मिळणं. तसं पाहिल्यास गतकाळातील संगीताच आपल्याला शारदेच्या रुपानं प्राप्त झाली असं त्याला वाटत होतं. आज त्याच्या रुक्ष वाटणाऱ्या जगण्यात आनंद भरला होता नव्हे तर जसा शिशीरावर मात करुन वसंत जसा येतो. तसा वसंत आज शारदेच्या आगमनानंतर त्याच्या जीवनात आला होता. आता फक्त वाट होती तिला भेटण्याचीच. त्या क्षणाची तो प्रतिक्षा करीत होता.
कालपर्यंत महापूर आल्यागत बऱ्याच जणांनी ग्रुपवर चॅट केली होती. आज चॅटचा महापूर कमी झाला होता. तसा महापूरच आला होता. परंतु आज तो ओसरला आहे असं वाटत होतं. आज ग्रुप शांत होता. परंतु आनंदला ग्रुप शांत राहून कसा चालेल. तो मेसेज करीतच होता.
आनंदला वाटत होती ग्रुपमध्ये रेलचेल, चिवचिवाट झाला पाहिजे. त्याशिवाय मजा नाही. म्हणूनच तो विनोद करीत होता. ग्रुपची मौज घेत होता. तसा तो मैत्रीणींना त्याच विनोदी भाषेत 'या, बिळातून बाहेर या' असं म्हणत होता. तसाच 'अश्वावर बसून या' असंही म्हणत होता. तसंच 'तुम्हीही वाहन पकडा, अन् वाहन नाही सापडलं तर मुंगीवर बसून या' असंही म्हणत होता. तसाच तो सर्वांना 'बोलते व्हा, बोलके व्हा, तरुण व्हा, मरगळ झटकून टाका' असेदेखील म्हणत होता.
आज ग्रुपच्या आकाशात कुठंही ढगाळ वातावरण नव्हतं. महापूर येण्याची चिन्हं दिसत नव्हती. वादळी वातावरणही अलिप्त नव्हतं आणि अचानक वादळ येईल असंही वाटत नव्हतं. परंतु वादळी वाऱ्यासह अचानक पाऊस कोसळण्याची चिन्हं दिसली. अचानक एक लखलखती वीज आकाशात चमकली. वारे वाहू लागले तेढ्यामेढ्या विचाराचे. त्यातच वातावरण गढूळ झालं व वादळी वाऱ्यासह ग्रुपमध्ये पाऊस कोसळायला लागला होता गारांचा. एक ग्रुपमधील सदस्य मित्रातील गतकाळातील जुनेपणा विसरुन नव्यापणाच्या गोष्टी सांगायला लागला होता. ग्रुपमधील सदस्यरुपी शेतीचं पीक बुडवायला लागला होता. ते पाहून साऱ्यांनाच चिंता वाटत होती की हा ग्रुपमधील सदस्यरुपी अवकाळी पाऊस कदाचीत पुर्ण सदस्यरुपी पिकाचं नुकसान तर करणार नाही.
सदस्य हा पोलीस दलातील होता. तो पोलीस दलातील असल्यानं ग्रुपवर धमकीचे वादळी पाऊस आणून सदस्यरुपी नुकसान करीत होता. परंतु त्याला थांबविण्याची ताकद आनंदमध्ये होती. त्यानं त्या धमकीच्या सदस्यरुपी पावसाला थांबविण्यासाठी वेळीच सुसंस्काररुपी ऑक्साईडची ग्रुपच्या हवेतील वातावरणात फवारणी केली. मग काय त्या ऑक्साईडनं आपले रुप दाखवले. ग्रुपमधील हवेतील हायड्रोजन हा संस्काररुपी ऑक्साईडशी संयोग पावला व त्याचा प्रभाव ग्रुपच्या हवेतच संपवला. त्याला ग्रुपमधील सदस्यरुपी शेताच्या पिकातच येवू दिलं नाही.
त्यानंतर काही वेळ भांडणाच्या कुविचारांच्या अतिवृष्टीचा ओलावा सदस्यरुपी जमीनीतून सुकेपर्यंत ग्रुप शांत होता. जसा तो ओलावा सुकला. तसे आनंदसह सर्वजण बोलायला लागले होते. तद्नंतर सर्वजणच ग्रुपमध्येच एकमेकांची गंमत घ्यायला लागले होते. त्यानंतर ग्रुपमध्ये आनंदमय वातावरण निर्माण झालं होतं.

************************************************

काही वेळ असाच गेला. राग धुमसतच होता. काही वेळानं तो राग पुन्हा उफाळून आला. त्याचं सर्व मित्रमंडळ त्याच ग्रुपवर इतर मित्रांशी आणि त्या पोलीस दलातील सदस्यांशी गोड गोड बोलायला लागले होते. त्यानंतर आनंदला वाईट वाटत होतं. त्याचा परिणाम हा झाला की त्यानं त्या पोलीस दलातील अधिकाऱ्याला ग्रुपचा रस्ता दाखवला. त्यानंतर परत त्याला ग्रुपवर जोडण्यात आलं व त्याचा पुन्हा आनंदला राग आला. त्याची परियंती अशी ही झाली की आता आनंद बाहेर पडला होता.
ती रात्र तशीच गेली होती वैतागात. पुरेशी झोप येत नव्हती आनंदला. मेंदू चिडचिड करायला लागला होता. रात्रभर झोप झाली नाही. सकाळी झोप सतवत होती.
ती रात्रीची झोप. त्यातच ती मनात झालेली वेदना. तशी ती मनाची चिडचिड. त्यामुळं आज आनंद आपल्या कार्यालयातही गेला नव्हता व वाट पाहात होता. कोण चांगला? खरं तर ती मित्रत्वाची सत्वपरीक्षाच होती.
आनंद घरीच होता. तसं त्याचं मन उद्विग्न होतं. आज ग्रुपही दिवसभर शांतच होता. कुणालाही बोलावसं वाटत नव्हतं. तसा आनंदही सकाळपासून कोणाशी बोलला नव्हता. त्याला वाईट वाटत होतं की ग्रुपमध्ये भांडणं झालीत. असं व्हायला नको होतं. परंतु तो तरी काय करणार? खरा मित्र कोण? कोणीच नाही. सगळा मनातील विचार. ती शारदाही नाही. तिला आपण बहिण मानले तरीही.
सगळा विचार. शिवाय अविचारही तेवढाच. तसे सकाळचे दहा वाजले व शारदाचा गुड मॉर्निंगचा मेसेज त्याच्या वैयक्तिक क्रमांकावर धडकला. तो दिसताच त्याला थोडं हायसं वाटलं. तसा त्याला आनंद झाला. हीच खरी मैत्रीण. मैत्रीणीची परीक्षाच ती. तशी आज पदमाही बोलली होती त्याचेशी.
शारदा थोर होती की जी त्याचेशी आज बोलली होती. त्याला सांत्वना देत होती. ती त्याला समजून घेत होती. खरं तर तिला ज्या आनंदनं वर्गबहिण मानलं होतं. तिनं त्या बहिणीच्या नात्याला आज खऱ्या स्वरुपात न्याय दिला होता. तशी ती पदमा. पदमाही बोलली होती त्याचेशी आज. तिनं तर त्याही काळात आनंदला मदतच केली होती आणि याही काळात तिनं बोलून एकप्रकारे आनंदला मदतच केली होती.
शहाणपणा ही अशी गोष्ट आहे की ती कुठंही माणूस दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो. तो स्वतःला महान समजत असतो. असाच एक अधिकारी व्यक्ती होता. तो स्वतःला महान समजत होता. तो भरल्या सभेमध्ये म्हणायचा की मी देवालाही मॅनेज करतो. माझ्याकडून शिका देवाला मॅनेज करणं. तसं पाहता त्याचं बरोबरच होतं. कारण त्याला त्यावेळपर्यंत अडविणारं कोणीही मिळालं नव्हतं. मग अहंकार तर येणारच.
आज अहंकारपणाचा आणि दिखावूपणाचा काळ आहे. ज्याच्याजवळ काहीही नसतं. तो स्वतःला थोर समजतो व दाखवतोही आणि ज्याच्याजवळ भरपूर असतं. ज्याला दाखविण्याची गरज नसते. तो मात्र कधीच दिखावूपणा करीत नाही. कारण त्याला दिखाव्याची गरज नसते.
आज आनंद म्हातारा झाला होता. परंतु त्याला आजही आठवत होत्या त्या गतकाळातील आठवणी. त्यातच त्याला आठवत होतं, तो दहावीच्या बालमित्रांनी काढलेला ग्रुप. आपला आनंद व्यक्त करण्यासाठीच त्यांनी एकमेकांना जोडलं होतं. त्याच मित्रांपैकी एक मित्र पोलीस अधिकारी बनला व तो सर्वांना आय पी सी नियमावलीची धमकी द्यायला लागला होता. शिवाय सगळ्यांना मी पोलीस आहे. मला मान द्या असा म्हणत होता. त्यातच तो सांगत होता की कुठे अपघात झाल्यास सर्वात पहिलं जो बातमी देतो, तो पोलीस. मग त्याला तुमच्याकडून मान मिळायलाच हवा.
ग्रुपबद्दल सांगायचं झाल्यास ग्रुपवर सगळे मित्र जुळले होते. ते योगीतानं जोडले होते आणि योगीता कधीही कोणाला त्या पोलीस मित्रासारखी मान द्या. स्थान द्या म्हणत नव्हती. तरीही तिला स्थान मिळत होतं. त्याचं कारण म्हणजे तिचा असलेला सुस्वभाव. योगीता खरंच कॅप्टन बनण्यालायकीचीच होती. ती खरी नेतृत्व करीत होती. तशीच ती बाजूही सांभाळून घेत होती, कुणाला कुणाचा राग येवू नये याची. शिवाय ग्रुपमधील सर्वजण तिला ओळखत होते.
दहावीला असतांना शाळेत कधी पदमा तर कधी योगीता कधी विकास तर कधी दिपक कॅप्टनशिप करायचे. त्यातच योगीता ही अगदी यशस्वी कॅप्टन बनली होती त्याही काळात. तिचं नेतृत्व विशाल होतं. ती मनानं उदार होती. त्यामुळंच की काय? ग्रुपवरचे सगळे तिला मान देत आणि तेवढंच स्थानंही.
मान हा कुणालाही मागून मिळत नसतो. तो मिळतो आपोआपच. ज्याचं कार्य महान असतं. त्याला तो मिळत असतो. जसा आज योगीताला मिळत होता. ती मान आणि स्थान मागत नव्हती तरीही.
आनंद आज प्राचार्य होता. खरं तर त्याच्याच पिढीनं त्या पोलीसवाल्याला शिकवलं होतं. तरीही आनंदची त्या मित्रांकडून मान आणि स्थानाची अपेक्षा नव्हती. कारण ते बालपणातील मित्र होते आणि त्या बालपणात मित्रांकडून मान कसला मागायचा? त्यानं आजपर्यंत कोणालाच मान द्या आणि स्थान द्या वा मला भेटायला या असं म्हटलं नव्हतं आणि तो स्वतःला तेवढाच थोरही समजत नव्हता. कारण त्याला माहीत होतं की कोणताही व्यक्ती हा आईच्या गर्भात काही जास्त दिवस राहात नाही. मग त्याला अधिकचा मान का द्यायचा? जर तो व्यक्ती आईच्या गर्भात जास्त दिवस राहात असेल तर त्याला मान देणं साहजीकच आहे.
आनंदला आज जो ग्रुप आठवत होता. त्यात आठवत होती एकदा त्याच्या मित्रानं सांगीतलेली गोष्ट. ती गोष्ट होती मदिराप्राशन करणे. एकदा आनंदचा एक मित्र व तो पोलीसवाला असे दोघंही मित्र मदिरा प्राशन करायला गेले. त्यात दोघांनीही मस्त दारु प्राशन केली. त्यानंतर पोलीस मित्र म्हणायला लागला त्या मित्राला की मी आता तुला आत टाकू शकतो. कारण तू दारु पिवून आहेस. तसा तोही मित्र काही कमी नव्हता. त्यानं लागलीच उत्तर दिलं.
"मी काय तुझं तोंड पाहणार काय? मी सुद्धा तू वर्दी वापरुन पित आहे हे सिद्ध करुन आत टाकू शकतो."
तो त्या दोन मित्राचा संवाद. खरंतर त्या पोलीस मित्राला दारु, पोलीस नसलेल्याच मित्रानंच पाजली होती. शिवाय बोलणंही ऐकलं होतं.
पोलीस मित्र स्वतःला थोर जरी समजत असला तरी त्याचा दारु पिण्याचा अड्डा माहीत होता सर्व मित्रांना. त्याचं लोकांना लुटणंही माहीत होतं. शिवाय तो पोलीसवाला लोकांचा रक्षक जरी असला तरी तो लुटारु आहे असं बरेचजण प्रत्यक्षरित्या पाहिलेले मंडळी सांगत होते.
ड्रक अँड ड्राईव्हमध्ये पकडले जाणाऱ्या मंडळींपैकी कितीतरी लोकांना दारु पिवून गाडी चालविल्यास, पोलीसवाले त्यांचेवर कारवाई करीत होते. परंतु पोलीसवाले, तेही स्वतःच पीत होते. तो पोलीसवालाही पीतच होता. याची साक्ष ही काही मित्रमंडळी होती की ज्यांनी त्याला प्रत्यक्षरित्या पाहिलं होतं. त्यांना वाटत होतं की आम्ही मदिरापान केल्यास ते आम्हास पकडतात. मग त्यांना कोण पकडणार? त्यांच्या एकंदरीत वागण्यावरुन कोणताच साधारण व्यक्ती त्यांची इज्जत करीत नव्हता तसाच स्थानही देत नव्हता.
आज बरेच वर्ष झाले होते. ग्रुप जीवंत होता. ग्रुपवर तरुणाई फुलत होती. ते सर्व मित्र आपसात बोलत होते. कधी त्यांच्या चर्चा रंगत होत्या. आनंदही होत होता सर्वांना. परंतु ज्या आनंदनं सर्वांना आनंद मिळावा म्हणून ग्रुपसाठी काम केले होते. तो आनंद आज दुःखातच होता.
आज आनंद म्हातारा झाला होता आणि त्याचबरोबर शारदाही आणि बाकीचे सर्व मित्रमंडळही. हळूहळू ते वार्धक्याकडे जात होते आणि त्याची माहिती सर्वांना अप टू डेट मिळत होती. परंतु आजही त्याला आठवत होतं ते ग्रुपमधील झालेलं भांडण आणि तेवढाच आठवत होता तो अवकाळी विचारांच्या गारांचा पाऊस. ज्याच्यानं त्याच्या जगण्याचा आनंद हिरावून घेतला होता.
आनंद म्हातारा झाला होता. तो कार्यालयातून निवृत्तही झाला होता आणि अगदी सुखात होता आणि आता त्याला मदत पाहिजे होती सुख देणाऱ्या त्या मित्रांची. परंतु कुठंतरी स्वाभिमान आड येत होता त्याला. म्हणूनच तो आजही ना ग्रुपवर बोलत होता ना कुणाशी बोलत होता. मित्र कधीकधी त्याला फोन करायचे. परंतु त्यांच्याशी बोलण्यात आज त्याला सारस्य वाटत नव्हतं. त्याला सारस्य वाटत होतं त्या शारदेबद्दल आणि त्या पदमाबद्दल. ज्या दोघींनी गतकाळात त्याचं मन खजील होवू दिलं नव्हतं. शिवाय त्याच्या मनात झालेल्या प्रसंगाबद्दल आत्मीयता भरली होती.
आज आनंद म्हातारा झाला होता. आजही त्याला बालपणातील जया, पदमा, छाया आणि संगीता आठवत होत्या. त्यात आता संगीता जिवंत नव्हती. जिला त्यानं वर्गबहिण मानलं होतं. परंतु त्याच वर्गबहिणीची जागा घेतलेली शारदा आजही आठवत होती त्याला. ती तेवढीच बळ देत होती त्याला. जसं बळ संगीतानं दिलं होतं.
आजही त्याला संगीता आठवत होती पदोपदी आणि त्याच्या डोळ्यातून तिची आठवण आली की अश्रुधारा गळत. तेव्हा त्याला शारदेची आठवण यायची. मग बोलत बसायचा तिच्याशी तासन्‌तास. त्यानंतर त्याची आठवण विसरायची. तेव्हा बोलतांना त्याला जणू वाटायचं की आपण आपली वर्गबहिण असलेल्या संगीताशीनच बोलत आहोत.
त्या सर्व वर्गमैत्रीणी व वर्गमित्र होते की ज्यांनी त्याचं आयुष्य बनवलं होतं व तो मोठा लेखक झाला होता. त्यातच ती संगीता. ती एक संगीता होती की जी आज हयात नसली तरी तिनं आनंदचं जीवन बनवलं होतं. लिहायला बळ दिलं होतं की ज्यातून त्याला लेखक बनता आलं होतं आणि दुसरी शारदा होती की त्याला लेखक बनल्यानंतर त्याच्यातील आत्मशक्ती जागृत ठेवली होती नव्हे तर आपल्या बोलण्यातून त्याच्यासमोर येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी तयार केलं होतं. ते कार्य शारदाला जमलं होतं. कारण तिनंही गतकाळात संकटांचा सामनाच केला होता.
शारदाही आज म्हातारी झाली होती. परंतु म्हातारपणाकडे जात असतांना तिनं शेतीकडे लक्ष दिलं होतं. नवेनवे शेतीचे तंत्रज्ञान विकसीत केले होते. त्यावर संशोधन केलं होतं व तिनं केलेलं ते संशोधन आज अजरामर झालं होतं नव्हे तर ते शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरलं होतं.
आज शेतकरी आत्महत्या थांबल्या होत्या नव्हे तर थांबवता आल्या होत्या. त्याला कारणीभूत होती शारदा. शारदा जर नसती तर आजही शेतकरी आत्महत्या सुरुच राहिल्या असत्या. त्यांच्या आत्महत्या थांबवताही आल्या नसत्या.
***********************************************

आनंदला आठवत होती ती वर्गातील एक मुलगी होती. जी कॅप्टन होती. तशी ती पाहायला सुंदरच होती. परंतु ती स्वतःला सुंदर समजत नव्हती. कोणी तिची प्रशंसाही करीत नव्हते. तसं तिचं प्रारब्ध वाईटच होतं. परिस्थिती तिची फार गरीबच होती. तसं तिच्या वडीलाला सरकारी नोकरी होती. परंतु प्रारब्धच असं की तिचे वडील मदिराप्राशन करायचे. त्यामुळंच पैसा पुरायचा नाही. तिच्यावर तसं पाहता वडीलाचं प्रेम होतं. परंतु ती सवयच होती. एक प्रकारची वाईट सवय. त्या सवयीवर कोणताच उपाय नव्हता.
आज ती सुखी होती. कारण तिला पती चांगला मिळाला होता. तो पीत नव्हता व तेवढंच प्रेम तिच्यावर करीत होता.
आज ती सुखी होती. कारण आज तिला सर्व मिळालं होतं. तिची मुलंही चांगली निघाली होती. आज चांगली शिकली होती. त्याच गोष्टीचा आनंद होता तिला.
आज तिला आठवत होता तिच्या शाळेतील काळ. परिस्थिती नाजूक असल्यानं ती जास्त पुढे पुढे करीत नव्हती. तिला आवडत होतं सर्व करणं तरीही. ती साधारणच कपडे घालायची. परंतु ते कपडे स्वच्छ धुतलेलेच असायचे. शिवाय तिच्या एकंदर वागण्यावरुन जाणवायचं नाही की तिची परिस्थिती हलाखीची असेल.
आनंदचा तो वर्ग. त्या वर्गाला लाभलेल्या त्या दोन मुली. त्या दोन्ही कॅप्टन होत्या वर्गाच्या. वर्ग चांगलाच सांभाळायच्या त्या. नियतीनं त्यांना घरचं सुख नव्हतं दिलं त्या काळात. कारण एकीचं स्वतःचं घर होतं. परंतु ते तुटकंफुटकं होतं. मदिराप्राशननं घरावर छतही टाकता आलं नव्हतं. तर दुसरी कॅप्टन होती की जिला घर नव्हतं व जी त्या काळात एका घरी भाड्याच्या खोलीत राहात होती. त्यावेळेस परिस्थिती नाजूक असल्यानं तिला शारदेकडं अभ्यासाला जावं लागायचं व शारदाही तिला अभ्यासाला येवू द्यायची.
मदिराप्राशनाचा अतीरेक नकोच. मदिराप्राशन अशी गोष्ट की ती केल्यानंतर आपण काय करतो? कसे बोलतो? कसे वागतो? याचं भान नसते. म्हणूनच मदिरापान करु नये. कारण त्याचे गंभीर परिणाम कुटूंबावर होतात व अख्खं कुटूंबच देशोधडीला लागत असतं.
मदिराप्राशन...... खरं तर मदिराप्राशन करणं ही काही वाईट गोष्ट नाही. कित्येक लोकं मदिराप्राशन करतात. काही छंद म्हणून तर काही सवय म्हणून. काही लोकांना मदिराप्राशनची एवढी सवय असते की ते सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मदिराप्राशनच्या तालातच थिरकत असतात. मदिराप्राशन करणाऱ्यांचेही दोन प्रकार आहेत. एक प्रकार असा आहे की जी मंडळी मदिराप्राशन करतात. ती अजीबात बोलत नाहीत. त्यावरुन त्यांनी मदिराप्राशन केलं की नाही हा विचारच असतो. ते दिसतच नाहीत तसे. दुसरा प्रकार असतो. तो म्हणजे मदिराप्राशन करणारा व्यक्ती एवढा बोलतो की त्याचं बोलणं संपत नाही. जसा तोच एक जगातील बादशाहा असतो की त्यालाच मदिराप्राशन करता येतं. इतरांना नाही.
मदिराप्राशन ही एक कला आहे. त्या कलेनुसार जो वागतो. तो कधीच उध्वस्त होत नाही. कारण मदिराप्राशन हे थोड्या थोड्या प्रमाणानुसार करावं लागतं. जर तसं केलं तर ते अंगाला लागतं. नाहीतर तेच मदिराप्राशन अंगाला फाडून खात असतं. काही लोकं असेही असतात. ते मदिराप्राशन एवढे करतात की त्यांना होशच नसतं. तर काही लोकं हे मदिराप्राशन मर्यादेत राहूनच करीत असतात. एक उदाहरण देतो. एक व्यक्ती असा आहे की त्यानं सांगीतल्यानुसार त्याला सवय आहे. त्यानं जर मदिराप्राशन केलं नाही तर त्याचं शरीर थरथर कापायला लागतं. म्हणूनच तो सकाळी व सायंकाळी दोन्ही वेळेला मदिराप्राशन करतो. परंतु तो प्रमाणाच्या बाहेर जात नाही आणि त्याचाच मुलगा दिवसभर मदिराप्राशनातच बेधुंद राहतो.
मदिराप्राशनची सवय काही जन्मजात नसतेच. आनंदचे वडील अगदी बालवयातच एक झाकणभर मदिरा द्यायचे त्याला. ते त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून. परंतु ती सवय त्याला लागली नाही. कारण त्याच्या वडीलांनी मदिरेचा उपयोग त्याच्यासाठी एक टॉनिक म्हणून केला. मदिरा म्हणून नाही. जेव्हा तो वयात आला आणि शाळाच शिकत होता. त्यावेळेस तोही निवडणुकीचा प्रसार करायला लागला. त्यावेळेस मदिरेचा गैरवापर कसा होतो. तेही त्यानं प्रत्यक्षात पाहिलं. परंतु त्याला सवय लागली नाही. कारण त्याचे वडील भरपूर प्यायचे. त्यामुळंच पैसा उरायचा नाही.
मदिराप्राशन सुटतं. परंतु कोणी त्यावर सतत टोकत गेलं तर. परंतु लोकं टोकत नाहीत व विचार करतात की आमच्या घरातील काय जातं. ती मंडळी दुसऱ्याचं घर जळत असतांना त्यात आनंद शोधत असतात. याला असुरी आनंद म्हणतात.
मदिराप्राशन सुटंत. ते जर मदिराप्राशन करणाऱ्या व्यक्तीनं मनात आणलं तर.......याबाबतीत एक प्रसंग आनंदला आठवत होता. त्याचाच एक मित्र. एक व्यक्ती हवं तर त्याला मुलगा म्हणता येईल. वय वर्ष एकोणवीस सुरु असतांना त्याला एका गावातील नेत्यानं आपल्यासोबत प्रचाराला फिरवले. सायंकाळी तो नेता प्रचार झाला की गाडी एका धाब्यावर थांबवायचा. मग त्या धाब्यावर तो आदेश द्यायचा की बिल तो देणार. हे माझे कार्यकर्ते आहेत. यातील ज्याला जेवढी मदिरा प्यायची असेल, तेवढी त्याला मदिरा प्यायला द्या. पैशाचं पाहून घेवू. तसा तो नेताही पियक्कडच होता.
आनंदचा तो मित्र. तो एकोणवीस वर्षाचा होता व नुकतीच त्याला सरकारी नोकरी लागली होती. ते त्या नेत्याला माहीत होतं. त्यानंच लावून दिली होती सरकारी नोकरी. तिही त्याच्याच शाळेत. त्यानंतर त्या एकोणवीस वर्षाच्या मुलानं मदिरापान केलं. ती मदिरा एवढी चढली होती की त्याला समोरचा ग्लासच दिसत नव्हता. त्यानंतर त्याला तेथील काही कार्यकर्त्यांनी ग्लासातील पाणी पाजलं. ते त्या नेत्यानंच पाजायला लावलं होतं. त्यानंतर काही वेळानं तो मित्र होशात आला. तेव्हा तो नेता त्या आनंदच्या मित्राला म्हणाला,
"मदिरापान ही अतिशय वाईट गोष्ट आहे. तू आता मास्तर बनतो आहेस. मग तू जर असा मदिराप्राशन करीत राहशील, तर आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवशील?"
काही दिवस गेले. काही दिवसानं तोच मित्र त्या नेत्याच्या बारवर सकाळी गेला. सकाळी सकाळीच तो नेता मदिरापान करुन असलेला दिसला. त्यावेळेस त्याला फार चढलेली होती. त्याला पाणी हवं होतं. सर्व नोकरचाकर त्याच्या आजुबाजूला उभे होते. परंतु कोणीही त्याला पाणी द्यायला तयार नव्हतं. अशातच त्या मित्रानं पाणी दिलं. त्यावेळेस तो आनंदच्या त्या मित्राला पुन्हा म्हणाला,
"मदिराप्राशन वाईट गोष्ट. ती करु नये. हे बघ, हे माझेच नोकर. माझ्या पैशावर राज करतात. परंतु मला आता पाणीही देत नाहीत. कारण मी प्यायलेला आहे. म्हणूनच मी तुला त्या दिवशी सांगत होतो की मदिराप्राशन वाईट गोष्ट आहे."
तो प्रसंग. त्या प्रसंगाचा बोध घेतला त्या मित्रानं व त्यावेळेपासून त्यानं मदिराप्राशन कधीच केलं नाही. आता तो निवृत्तही झाला होता.
आनंद सांगत होता, "मदिराप्राशन करणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही. ती करुच नये. कारण ती गोष्ट चार लोकांतून आपल्याला उठवते. ती तुमचीच बदनामी करते आणि तेवढीच तुमची गैरसोयही करते यात शंका नाही. मदिराप्राशननं घराची राखरांगोळीही होत असते. पैसा उरत नाही. मुलांना त्रास होतो. पत्नीला त्रास होतो. नातेवाईक येत नाहीत. ढुंकूनही पाहात नाहीत. खरं पाहिल्यास मदिराप्राशन ज्या घरात केलं जातं. त्या घराला संपूर्णतः वाळीत टाकलेलं असतं. म्हणूनच मदिराप्राशन करु नये आणि करायचंच झालं तर त्यात मर्यादा असावी. तिला एक औषधी म्हणून घ्यावं. तिचा अतिरेक करु नये. नाहीतर ती तुमचाच अतिरेक करुन टाकेल यात शंका नाही."
त्या आनंदच्या शाळेतील त्या मुलीचे वडील मदिराप्राशन करुन घर संसार उध्वस्त करीत होते. त्यामुळंच जे काही हाल झाले. त्यामुळंच तिला वाटत होतं की आपल्याला पती म्हणून मिळणारा व्यक्ती हा निर्व्यसनी मिळावा. ती मनोमन त्यासाठी परमेशाला प्रार्थना करीत होती. तीच तिची प्रार्थना ऐकली परमेशानं व तिला पुढील काळात अपार सुख मिळालं होतं की जे सुख कशातच मोजता येत नव्हतं.
आनंदला आठवत होता तो काळ. तो पोलीसवाला मित्र काही गोष्टी लिहून निघून गेला होता. तो मित्र सुरुवातीला आला, तेव्हा त्याच्या मनात राग धुमसत होता. परंतु ज्यावेळेस आनंदला राग आला व तो मौन राहिला. त्यानंतर त्या गोष्टीचा त्या पोलीस मित्राला पश्चाताप झाला. वाईट वाटलं व तोही त्यातून निघून गेला होता. हे आनंदला माहीत नव्हतं. आनंदनं जेव्हा रात्रीला मेसेज वाचले. तेव्हा कळलं होतं की त्याला कधीतरी अटॅक आला होता.
आनंदला समजलं की आजार हा आपल्या स्वभावाचा स्वभावगुण आहे. पोलीस मित्राला कधीकाळी आलेला अटॅक हा त्याच्याच स्वभावगुणाचा परिणाम होता.
माणसाचा स्वभाव. माणसाच्या स्वभावगुणाला पर्याय नाही. तो कसा राहावा याला उपाय नाही. आरोग्य ही स्वभावगुणांची गोळाबेरीज आहे. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. माणसाचा स्वभाव हा आजच्या काळात अतिशय रागीट बनलेला आहे. त्याचं कारण आहे माणसात आलेला अहंभाव. त्यानंच वेगवेगळे आजार होत असतात. काही आजार हे आपल्या स्वभावगुणानुसार ठरत असतात तर काही आजार हे आनुवंशशास्रानुसार आपल्या पिढीपासून आलेल्या स्वभावगुणानुसार होत असतात. परंतु स्वभावगुण हे बदलत असतात. ते बदलवावे व प्रत्येकानं आनंदी जीवन जगावे. कारण परीवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तसंच झाडं तोडणे, मांस खाणं या गोष्टी टाळाव्यात. कारण मनुष्यप्राणी हा पुर्वीपासून शाकाहारी प्राणी आहे. त्याची ठेवण तशीच बनलेली आहे. तो थेट हिंस्र प्राण्यांसारखा तोंडानं पाणी पीत नाही तर हातानं ग्लास उचलून पाणी पितो.
माणसाच्या स्वभावगुणाला पर्याय नाही. तो कसा राहावा याला उपाय नाही. कधीकधी हा स्वभावगुण आनुवंशिक येतो. आनुवंशिक याचा अर्थ रक्तसंबंध. हा स्वभावगुण माणसाच्या गुणसुत्रानुसार कित्येक पिढीपासून येत असतो. अर्थात संक्रमित होत असतो.
स्वभावगुण हा अतिशय महत्वाचा गुण आहे. या गुणानुसार माणसामध्ये राग, लोभ, द्वेष असतोच. जर त्या व्यक्तीचे मायबाप रागीट असतील तर त्या व्यक्तीचा स्वभावगुण हा रागीट असतो. जर त्या व्यक्तीचे आईवडील हे प्रेमळ असतील तर त्या व्यक्तीचा स्वभावगुण हा प्रेमळ असतो. तसंच आजाराचंही आहे. आजारही आनुवंशिकतेनं चालत असतात. ज्या व्यक्तीच्या पिढीला लकव्याचा आजार असेल, तर तो आजार पिढीपासून चालत असतो.
स्वभावगुण व आजार यांचे परस्पर संबंध आहेत. त्याच्या पिढीला लकवाच का? कारण आनुवंशशास्रानुसार त्या व्यक्तीचा स्वभावगुण हा लकव्यासंबंधीत आजाराला लायक असतो. म्हणूनच पिढीत तो लकवा संक्रमित होत असतो.
आनुवंशिकतेनुसार व्यक्तीचे अल्पवयात केसं पांढरे होणे, डोक्याला टक्कल पडणे, डोळ्याला बरोबर न दिसणे, चिडचिड होणे, काही किरकोळ व भयंकर रोग होणे इत्यादी गोष्टी घडत असतात.
स्वभावगुण बदलवता येतात का? तर त्याचं उत्तर आहे, स्वभावगुण हे खरंच बदलवता येतात. मग त्यावर कोणता उपाय आहे? असा प्रश्न केल्यास सांगता येईल की स्वभावगुण हे बदलवता येवू शकतात. त्यावर उपाय आहे मैत्री. तुमची मैत्री कोणाशी आहे यावरुन तुमचे स्वभावगुण बदलवता येवू शकतात. जर मैत्री ही चांगल्या व्यक्तीशी असेल तर तुमचे स्वभावगुण आपोआपच हे चांगले बनतीलच. परंतु त्यासाठी तुमच्या मनाची तयारी असावी लागते आणि मैत्रीत तो गुण आणि ताकद आहे की ती मैत्री तुमचे स्वभावगुण बदलवून दाखवू शकते. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या मदिरापान करणाऱ्याचं देता येईल. मदिरापानात बरेचदा आपण पाहतो की वडील भरपेट मदिरापान करतात. परंतु मुलं थेंबभरही पीत नाहीत. त्याचं कारण काय? ते मदिरापान करणं तर अनुवंशिकतेनं चालायला हवं ना. परंतु ते चालत नाही. कारण त्या मदिरापानाच्या विचारात चांगली मैत्री काम करून जाते. ती त्या संबंधीत व्यक्तीला मदिरापान करु देत नाही.
मैत्रीची परिक्षा घेता येवू शकते काय? मैत्रीची परीक्षा घेता येवू शकते काय? असा जर कोणी प्रश्न विचारला तर ती घेता येवू शकते आणि ती घ्यायलाच हवी. ती जर घेतली नाही तर चांगल्या चांगल्या सुसंस्काराची मुलं मुली फसू शकतात. आज तसा काळच आला आहे फसवा. या काळात मुले खास करुन मुलींना फुस लावून पळवून लावतात. मग त्यानंतर विचीत्र असे प्रकार घडतात. काही प्रकार बिभीत्स घडतात. काही प्रकारात हत्याही होते. हे सगळं का घडतं? त्याचं कारण असतं, आपण मैत्रीची परीक्षा घेतलेली नाही. खरं तर ही परीक्षा विवाह करण्यापुर्वी घ्यावी. कारण ती परीक्षा विवाहापुर्वीच घेणं गरजेचं आहे. तिला विवाह करण्याची पात्रता परीक्षा म्हणता येईल. कारण त्यानंतर खरी म्हणजे आयुष्याची परीक्षा सुरु होते. ज्यात सतत भांडण, मारपीट, चिडचिड, क्लेष ह्या गोष्टीचा प्रत्येक जोडीदाराला सामना करावाच लागतो. ज्यावर उपाय कोणताही ज्योतिषी करु शकत नाही. म्हणतात की ज्योतिषीविवाह करण्यापुर्वी काही विवाह गुण जुळवले जातात. मुलाकडील गुण आणि मुलीकडील गुण यांची बेरीज सत्तावीस होणे. म्हणतात की असे गुण जुळले की संसार सुखमय होतो. विशेष म्हणजे हे जे गुण असतात. त्याला स्वभावगुण म्हटलं जातं. परंतु यातील बरेच स्वभावगुण आनुवंशिक नसतात की ज्यामुळं संसार टिकेल. ते स्वभावगुण मैत्रीनं बदलत असतात. म्हणूनच विवाह झाल्यानंतर कितीही स्वभावगुण वा विवाहाचे गुण जुळवले तरी तो विवाह टिकत नाही. म्हणूनच असे गुण न जुळवलेले बरे. उगाच शंका कशाला?
काही लोकं प्रेमविवाह करतात. ते गुण पाहात नाहीत. तरीही त्यांचा विवाह टिकतो. कारण त्यांचे स्वभावगुण त्यांनी जरी ज्योतीषांकडे पाहिले नाही तरी जुळलेले असतात.
आता तर ज्योतीषशास्रानुसार मंगळदोषही पाहिला जातो काही परिवारात. म्हटलं जातं की मंगळदोष असलेल्या मुलींशी विवाह केल्यास पती मरण पावतो. परंतु ती धांदात खोटी गोष्ट आहे. कोणताच ज्योतीषी हा मृत्यूला रोखू शकत नाही. जरी त्या मुलीला मंगळदोष नसेल तरी. अन् मंगळदोष असला तरी. कोणताच ज्योतिषी माणसाला मरण देवू शकत नाही. म्हणूनच हा मंगळदोषही न पाहिलेला बरा.
महत्वाचं सांगायचं म्हणजे विवाह करा किंवा जीवनात कोणत्याही गोष्टी करा. परंतु त्या करण्यापुर्वी बराच विचार करावा. घाईगडबडीने कोणतेही निर्णय घेवू नये. नाही निर्णय निघत असेल तर काही काळ मौन बाळगावे. कारण उतावीळपणानं आपलंच नुकसान होत असतं. घाईघाईत घेतलेले निर्णय हे अंगाशी येत असतात. यात शंका नाही.
महत्वपुर्ण बाब ही की आपले स्वभावगुण हे आपण बदलवायला हवे. कारण त्यानुसारच आपल्या शरीराची ठेवण होत असते. आपला आकार बदलत असतो. आपलं शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. फक्त विचार बदलविण्याची आवश्यकता आहे. आपल्याला अति राग आला तर आपल्याला सर्दी पडसं नक्कीच होणार. शिवाय विवाह करण्यापुर्वी मैत्रीची परीक्षा घेतलेली बरी. कारण ती न घेतल्यानं अख्ख्या आयुष्याची राखरांगोळी होत असते. मैत्रीची परीक्षा घेतली नाही तर त्यानंतर जे काही घडतं. त्यानंच व्यक्तीचं डोकं शांत राहात नाही. मग त्यानंतर ब्लडप्रेशर, मधूमेह आणि इतर असाध्य रोग जडत असतात.
खरं सांगायचं झाल्यास माणसानं स्वतःला कधीच मोठं समजू नये. त्यानं अहंकार वाढत असतो. कुणाला कमजोर समजू नये. त्यानंही अहंकार वाढत असतो व त्यातूनच शरीरातील पित्ताची मात्रा कमी अधीक होत असते. ती पातळी कमी अधीक झाल्यानं आपल्याला आजार होत असतात. हे आजार जर दूर करायचे असतील तर चांगले मित्र असावे. जे परीक्षेत पास झालेले असतील. तसेच बालपणातील मित्र असावेत. जे मित्र कधी काळी आनंद देत असतात. आपण स्वतः आनंदी राहावे. मदिरापान करु नये. कोणाला करु देवू नये. तसंच आपले चांगले विचार ठेवावेत. तसेच कर्मही चांगलेच ठेवावे. कारण चांगले कर्म आणि चांगले विचार हे आपलं आरोग्य चांगलं ठेवत असतात. आपण जर एखाद्याचा आत्मा दुखावला तर त्यातून निघणारी शापवाणी आपला स्वभावगुण कितीही चांगला असला तरी आपल्याला छळत असते. मग ते दुखावणे प्राणी, पक्षी वा एखादी वृक्षवल्ली का असेना.
आनंदला आठवत होते ते तीस दिवस. दहावीनंतरच्या तीस वर्षानंतरचे दिवस. ते दिवस त्याला रमणीयता देवून गेले होते. त्याचबरोबर तेवढंच दुःखही. कारण तिथं एक तो पोलीसवाला आल्यानं सारी मजा किरकिऱ्या स्वभावाची झाली होती. मित्र मैत्रीणी आता ग्रुपवर जास्त बोलत नसत. ग्रुप बंद झाल्यासारखाच वाटत होता. महिला वर्ग तर अजीबात बोलत नसत. कदाचीत ही शंका यायची की त्यांना त्यांच्या घरवाल्यांनी मनाई केली असेल. त्या मुली वैयक्तिकवर बोलून घेत.
काही दिवस शांततेत गेले. तसा तो दिवस उजळला. मुलांनी एक कार्यक्रम आयोजित केला. एकत्र मिलनाचा तो कार्यक्रम होता. परंतु त्यालाही गालबोट लागलं. त्या कार्यक्रमात बऱ्याचशा मित्रांनी कार्यक्रमाला येण्याला मंजूरी दिली. परंतु कोणी आलं नव्हतं. दोन तीन मुली सोडल्या तर बाकी कोणत्याच मुलींची उपस्थिती नव्हती. जी स्थिती मुलींची होती. तीच स्थिती मुलांचीही होती. ती मुलं जास्त उपस्थीत नव्हती. त्यावरुन वाटत होतं की त्यांच्यासाठी मित्र महत्वाचे नव्हते, तीस वर्षानंतर मिळालेले. महत्वाचं होतं काम. कारण ते काम आजही ते पोटासाठीच करीत होते.
आज कार्यक्रमाच्या निमीत्य का होईना, पुन्हा एकदा शाळा भरली होती. मुलांनी त्याच शाळेच्या आवारात गुलमोहराच्या गर्दीत एक कार्यक्रम आयोजीत केला होता, पुनर्मिलनाचा. त्यानंतर मुलांनी जुन्याच काळातील इकडच्या तिकडच्या गप्पा केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा निरोपाचा संबंध आला व सर्वजणं निरोप घेवू लागले. तेव्हा दहावीच्या वर्गातील निरोप समारंभ आठवत होता. ज्यावेळेस तेवढं कळत नव्हतं. परंतु आज मन भरुन आलं होतं.
तो आनंदाचा सोहळा होता, पुनर्मिलनाचा. तो सोहळा सायंकाळपर्यंत थाटामाटात पार पडला होता. एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली होती. तशी सायंकाळ झाली व मावळतीला घरी जाण्याचे वेध लागले. पक्षी घरट्यात परतु लागले होते. गाईगुरंही घरी यायला लागली होती. तसं मुलांनाही वाटत होतं की आपणही घराकडं जावं. परंतु पावले वळत नव्हती. ती थांबून होती. असं वाटत होतं की एखादी नववधूच आपल्या माहेरच्या मंडळींचा निरोप घेत आहे की काय?
सर्वजण घरी जाण्यासाठी निघाले होते. एकमेकांचा निरोप घेत होते ते. सर्वांच्या डोळ्यात अश्रु होते. त्याला आनंदाश्रूच म्हणता येईल. कारण आज दिवसभरच त्यांनी आनंद उपभोगला होता आणि आता त्या आनंदाला सोडून जाण्याचं दुःख होतं. त्यामुळंच ते अश्रू. आनंद मात्र रडत नव्हता. तसे सर्वजण निरोप घेवून रवाना झाले. मात्र आनंद..........तो तिथंच होता सर्वांच्या पाठमोऱ्या आकृतीकडं स्तब्ध पाहात.
सर्वजण निरोप घेवून तेथून निघाले. त्यांच्याजवळ त्यांच्या गाड्या असलेल्या. ते क्षणातच ओझल झाले डोळ्यासमोरुन. कारण सायकलची जागा आता गाड्यांनी घेतली होती.
आनंदच्याही डोळ्यात आतापर्यंत अश्रू नव्हते. परंतु तो गेला नाही ती जागा सोडून. तो थांबला होता बराच वेळ. त्या मुलीही गेल्या होत्या. ज्यात शारदाही गेली होती. छाया, पदमा आणि सर्वचजण. त्यात सुषमा आणि योगीताही होती. तशीच समीक्षा अन् आरतीही. बराच वेळ झाला होता. तसा तो बसला. त्याच शाळेतील गुलमोहराच्या संगतीत बऱ्याच वर्षापासून वाट पाहात असलेल्या व स्थितप्रज्ञ स्वरुपात असलेल्या दगडावर. आज ती शाळा बंद झाली होती. त्या ठिकाणी दुकानाची चाळ उघडली होती.
बराच वेळ झाला होता. रात्र बरीच झाली होती. आनंद बसला होता त्याच दगडावर. अचानक त्याचं लक्ष त्या शाळेकडं गेलं. त्याच गुलमोहराच्या पर्णझाडीतील दगडावरुन. ती शाळा त्याला पाहून हसत होती आणि खुणावत होती की मी आज तुमचं जरी जीवन घडवलं असलं, आयुष्य जरी फुलवलं असलं तरी आज मी तुमची नाही. तशी क्षणातच पुन्हा एकदा त्याला त्याच्या मित्रांची आठवण झाली. तशा त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा कोसळायला लागल्या. तो हुंदके देवून रडू लागला. आज त्याच्या अश्रुधारांचा वेग जास्तच होता. तशी त्याला संगीता आठवायला लागली. अन् आठवायला लागले त्या काळातील एकेक प्रसंग. वाटत होतं की ते मित्र. स्वार्थी मित्र. आज ते लवकर गेलेत. मुलींचं जावू द्या. परंतु ते मित्र. पुरुष असले तरी. तेही गेलेत लवकर. एवढ्या लवकर की आता कधीच भेटणार नाहीत एकमेकांना.
आनंद हुंदके देत रडत होता. तो खाली मान टाकून बसला होता. त्याला आठवत होती संगीता. संगीता आज जगात नव्हतीच. परंतु जगण्याची उमेद देवून गेली होती. आयुष्यात तिनं जरी हार मानली असली तरी. तिनं त्याला प्रेरणा दिली होती की आयुष्यात कधीच हारायचं नाही. नव्या उमेदीनं जगायचं. दरवेळेस नवं पाऊल टाकायचं.
काही वेळ रडण्यातच गेला. तो खाली मान टाकूनच होता. त्यानंतर तो एकेक प्रसंग आठवायला लागला. तसा कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. वाटलं संगीताच असेल आणि ती संगीताच होती. ती बोलत होती.
"कशाला मनाला लावून घेतोस? खंबीर राहा. मी तुझ्याजवळच आहे. तुला धीर देत आणि बहिणीचं कर्तव्य निभावीत. तुला तुझ्या बहिणी परक्या झाल्या ना. परंतु ही संगीता तुला कधी परकं होवू देणार नाही. ही सदैव तुला मदतच करेल. आयुष्यभर. सतत, निरंतर आणि अविरतपणे."
त्याला जशी संगीता आठवली व बोललीही. तसं त्यानं मान वर करुन समोर पाहिलं. परंतु समोर संगीता नव्हती. समोर होते तेच मित्र. जे बऱ्याच वेळेपुर्वी गेले होते निरोप घेवून. ते परत आले होते. ज्यात सर्व मुलं व मुलीही होत्या. ज्यात राजेश आणि छाया, पदमा आणि इतर सर्वच होते. अन् त्याच एका मुलीचा हात खांद्यावर होता. जी संगीता नव्हतीच. परंतु तीच बोलत होती त्याला. बहिण बनून. तिनं त्याला वचन दिलं होतं परकं होवू न देण्याचं आणि मित्र म्हणत होते. कशाचा विचार करतोय. आम्ही आहोत ना व्हाट्सअप ग्रुपवर.
आज सर्व मित्रमंडळ म्हातारं झालं होतं. सर्वांच्या मुलांचे विवाह झाले होते. सर्वांचे मुलं आपआपल्या संसाराला लागले होते. आता व्हाट्सअप ग्रुप होता. परंतु आता कोणीच चॅट करीत नव्हते. काहींच्या डोळ्यानं दिसत नसल्यानं तर काहींचे कासरे त्यांच्या जावयांच्या आणि मुलांच्या हातात असल्यानं. आठवण येत होती त्या आयुष्याच्या अंतिम वळणावरही. कधी वाटायचं त्याच दहावीतील जुन्या मित्रांशी बोलावं. परंतु मोबाईल हातात मिळायचा नाही. कधी मिळालाच, तर नातवंड दुसऱ्याच क्षणाला घेवून जायचे. मग बोलायचा जो विचार असायचा मनामध्ये. तो तुर्तास खंडीत होवून जायचा. कधी बोलायला लागलेच तर ती सुनबाई ओरडायची. म्हणायची की म्हातारचाळे लागले की काय? मग भ्रमनिराश व्हायचा. त्यातच रडू कोसळायचं. वाटायचं की काय हे आयुष्य. आपल्या दहावीच्या मित्रांशीही भेटणं दूरच. परंतु साधं बोलूही देत नाही.
आनंदही म्हाताराच झाला होता. त्याला एकच मुलगी होती. ती आपल्या संसारात खुश होती. आनंदही खुशच होता. परंतु तो आपल्या मुलीजवळ राहात नव्हता. त्याला कोणाच्या दबावात राहाणं आवडत नव्हतं. थोडंसं दुःख होतं. मुलगी जवळ नसण्याचं. ते तेवढं दुःख जर सोडलं तर तो खुश होता.
आजही शारदा बोलत होती आनंदशी. तिनं त्याला निरोप समारंभात वचन दिल्यानुसार ती बोलत होती. तिची मुलंही तिला बोलायला नाकारत नसत. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत शारदा आनंदशी बोलली होती.
संगीता आज जगात नव्हती. ती देवाघरी निघून गेली होती केव्हाचीच. परंतु तिची आठवण आनंदच्या ह्रृदयात होती. ती आठवण आठवत होती आनंदला.
आनंद लेखकच नाही तर कवीदेखील होता. संगीता जेव्हा मरण पावली. तेव्हा त्यानं तिच्यावर पोवाडा बनवला होता. त्याचं कारण होतं एका शाहीरानं त्याला लिहून दे म्हणणं.
आनंदनं संगीतावर पोवाडा लिहीला व तो त्या शाहीराला दिला. त्यानंतर तो, तो प्रसंग विसरला. तसं एकदा त्याला शाहीर परीषदेचं आमंत्रण आलं व त्या परीषदेत तो उपस्थीत झाला.
ती शाहीर परीषद. ती शाहीर परीषद भरली होती. त्या शाहीर परीषदेत गावोगावची बरीच मंडळी आली होती. त्यातच तो शाहीरही आला होता. ज्यानं संगीतावर आधारीत पोवाडा गायला होता. तो आनंदजवळ आला. ओळख केली. रामरुमाई घेतली व म्हणाला,
"साहेब, सांगाल नको येथील शाहीर मंडळींना की मीच या शाहीराला पोवाडा लिहून दिला."
आनंदला त्या शाहीरानं म्हटलेली गोष्ट आवडली नाही व तो म्हणाला,
"मी समजलो नाही. नेमकं काय झालं ते."
ते आनंदचं बोलणं. त्यावर तो म्हणाला,
"हे बघा, तुम्ही लिहून दिलेला पोवाडा मी शाहीर परीषदेत गायन केला व त्यावर मला पेंशन सुरु आहे. कदाचीत त्यांना हे कळलं तर माझी पेंशनच बंद होईल."
ते त्या व्यक्तीचे बोल. ते बोल आनंदवर प्रभाव टाकणारे होते. त्याला हायसं वाटत होतं की आपण लिहिलेल्या लेखणीतून कोणीतरी पोट भरीत आहे. जो गरीब तर आहेच. व्यतिरीक्त निरक्षरही. त्यामुळं आपली लेखणी अशाच लोकांसाठी चालवावी की जे त्यातून रोजगार मिळवू शकतील.
आज आनंद जिवंत नव्हता. काळाच्या ओघात आनंदही निघून गेला संगीतासारखाच. जणू आपल्याच अकाली गेलेल्या बहिणीला भेटायला. ते बंध प्रेमाचे होते. मैत्रीप्रेमही होतं आणि बहिणीवरचं प्रेमही.
वसंत नुकताच लागला होता. शिशीराची पाने झडतच होती. अशातच आनंद एके दिवशी दुपारी पहुडला होता घरी. तशी काळानं त्याच्या घराच्या दरवाज्यात दस्तक दिली. तो आनंदला म्हणाला,
"मी तुला न्यायला आलोय. विचार कर. तुला चालायचं आहे. आता तुझी अंतिम इच्छा जी कोणती असेल, तर ती पुर्ण करुन घे."
आनंद गाढ झोपेत होता. त्याचबरोबर स्वप्नातही. तो विचार करु लागला त्या स्वप्नांवर. विचार करु लागला की काय करावं. हे स्वप्न खरंच सत्य होईल काय? तरीही आयुष्य झालं आहे असा विचार करुन तो आपल्या दहावीच्या मित्राचा विचार करु लागला. त्याचबरोबर विचार करु लागला शारदेचा. त्यानं बरीच फोनं लावली आपल्या मित्रांना. परंतु काहींची फोनं लागत नव्हती तर काहींची व्यस्त जात होती. अशातच त्याला शारदेची आठवण झाली व त्यानं शारदेला फोन लावला. तोही लागला नाही. तशी फोन करीत असतांना अचानक त्याला भोवळ आली. मग काय, तो खाली पडला आणि पडताक्षणी तो गतप्राण झाला. मनातील इच्छा मनातच उरली. त्याला ना मित्रांशी बोलता आले, ना शारदेशी. जी त्याची बहिण होती.
काही दिवस गेले होते. शारदेला आठवण आली होती आनंदची. बरेच दिवस झाले होते. त्याचेशी बोलणं झालं नव्हतं. तसं वार्धक्यानं तिचंही बरोबर वागवत नव्हतंच. तशी तिला एक दिवस आनंदची आठवण येताच तिनं आनंदला फोन लावला. तसा तो फोन त्याच्या मुलीनं उचलला. म्हणाली,
"कोण?"
"मी शारदा. आनंदच्या दहावीच्या वर्गातील मुलगी. आनंद आहे काय?"
"नाही."
"कुठं गेलेत?"
"दूर गेलेत."
"दूर कुठे?"
"देवाघरी गेलेत."
"देवाघरी! म्हणजे?"
"मरण पावलेत बाबा."
"मरण पावले! पण केव्हा?"
आनंदची ती मुलगी. त्या समोरुन आलेल्या फोनवरुन ती बोलत होती. तिनं सर्व सांगीतलं त्या शारदाला. तसं तिला फार वाईट वाटत होतं. आजचा तिचा दिवस अतिशय वाईट जात होता. विचार येत होता की ज्या माणसानं माझ्यावरच पुस्तक लिहिली. त्याला परमेशानं एवढ्या लवकर न्यायला नको होतं.
आनंद आज जगात नव्हता. पण आज शारदेजवळ आनंदनं लिहिलेली पुस्तक होतीच. ती कधीकधी आपल्या परीवारात रमत असे. तिला आठवत असे आनंद. त्यातच कधीकधी परीवारात गप्पा रमत आणि रमत असत आनंदच्या त्या गोष्टी. अन् त्या दहावीच्या शाळेतील आठवणी. ज्या आठवणींनी आनंदला पुस्तक रुपानं मोठं केलं होतं. आज तो जगात नव्हता तरी त्याचं तत्वज्ञान जगात होतं. ते तत्वज्ञान आज जगाचा आरसा झाले होते नव्हे तर आयुष्य कसं जगावं आणि कसं नाही याचा जणू बोध देत होते.

*****************************************************************************समाप्त *************