Aayushy - 1 in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | आयुष्य - भाग 1

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

आयुष्य - भाग 1

आयुष्य या पुस्तकाविषयी

ती एक शाळा. त्या शाळेतील दहावीला असणारे ते विद्यार्थी. ज्यात चारु, राजेश, मनोज, अमोल, गजानन, प्रशांत, अंकुश, अतुल, दिपक, शैलेश, अखिल, योगेश, अरुण, विकास, विनोद, प्रदीप, राकेश, सोनलाल, रमेश, अविनाश, संदीप व प्रशांत इत्यादी मुलं तर मुलींमध्ये योगीता, अर्पू, संगीता, भारती, छाया, पदमा, जया, आरती, नीता, मालू, सुषमा, राखी, वैशू या मुली होत्या. तशीच एक समीक्षा नावाची मुलगी ग्रुपवर आली होती की जिनं त्याच शाळेतील एका मुलासोबत विवाह केला होता.
ती सर्व मुलं तब्बल तीस वर्षानंतर भेटली होती आणि त्यानंतर त्यांनी एक ग्रुप बनवला होता. ज्यात त्यांनी आठवणी शेअर केल्या होत्या गतकाळातील. त्याच आठवणीच्या जोरावर आनंदनं लिहिलेली ही पुस्तक. ही पुस्तक नसून गतकाळातील मुलांच्या वेदनाच आहेत. ज्या पुस्तकाचे नाव 'आयुष्य' आहे.
'आयुष्य' नावाची ही पुस्तक वाचकांना देतांना अतिशय आनंद होत आहे. या पुस्तकातील नायिका ही त्याच शाळेतील एक मुलगी आहे. पात्रांचे नाव बदललेले आहेत. तसेच काही प्रसंग जरी खरे असले तरी काही प्रसंग काल्पनिक आहेत. या पुस्तकात काल्पनिक प्रसंग व वास्तविक प्रसंग यांची खास बांधणी केली आहे. ज्याला सांगड हे नाव शोभून दिसेल.
या पुस्तकात मित्रांचं महत्त्व वर्णीत आहे. ते जर मिळाले नसते तर कदाचित ही पुस्तक मला लिहिताच आली नसती. ते मित्र की ज्या मित्रात मिश्कीलपणा होता. राग होता, परंतु तोही तात्पुरता. तोच घेतलेला आढावा. आपण ती पुस्तक वाचावी व स्वतःचं मनोरंजन करुन घ्यावं ही विनंती.

आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

आयुष्य (कादंबरी) भाग एक
अंकुश शिंगाडे

ते गाव........गाव मग ते कोणतंही असो, आपल्याला आपलं गाव तेवढंच महत्वाचं वाटतं. मग ते खेडगाव असलं तरीही. एखादा व्यक्ती जर खेडेगावात राहात असेल तर त्याला गाव बरं वाटत नाही. तसाच एखादा व्यक्ती शहरात राहात असेल तर त्याला खेडेगाव बरं वाटत नाही.
शारदा अशीच मुलगी. सुसंस्कृत कुटूंबातील. तिचे आईवडील शिकलेले होते. उच्चशिक्षीत घराणं. त्यातच ती शहरात राहात होती आणि तिचं बालपण अगदी आनंदात जात होतं. तिनं विचारही केला नव्हता की आपल्याला शहर सोडून खेडेगावात राहायला जावं लागेल. तेथीलच मातीशी आपलं नातं जोडावं लागेल. तेथील मातीत राबावं लागेल आणि त्याच मातीला गोड मानून आपलं गतकाळातील अस्तित्वही तिथंच विसरावं लागेल.
शारदा आज खेड्यात होती. तिचा विवाह सामान्य कुटूंबात झाला होता. पती चांगला होता. त्याचा तिला कोणताच त्रास नव्हता. परंतु आज तिला एक शल्य जाणवत होतं. ते म्हणजे शहराचं. तिला वाटत होतं की काश! आपल्या मायबापानं आपल्याला शहरातच दिलं असतं तर........
आज तिचा विवाह होवून तब्बल पंचवीस वर्ष झाले होते. तसा तो बालविवाहच होता. अगदी कमी वयात झालेला. कारण तिच्या घरी चार बहिणी असल्यानं नियतीसमोर काय चालणार तिचं. तशी ती सर्व बहिणीवरुन मोठीच होती. त्यानंतर बाकीच्या.
शारदेचा विवाह म्हणजे एक सामंजस्याचा करारच होता. नियतीसमोर तिनं आपलं शल्य लपवलं होतं. तिच्याही मनात वेदना होत्या. त्या वेदना आठवल्या की जीव भारीच होवून जायचा. वाटायचं की काय हे प्रारब्ध. आपल्याच नशिबाला यायचं.
शारदा आज शेतात काम करीत होती. कधीकधी तिला आठवायचे ते जुने दिवस. ज्या दिवसात ती शहरात शाळा शिकत होती. ज्या दिवसातील दोन चार मैत्रीणीसोबत तिची मैत्री होती. आजही त्या मैत्रीणी तिच्याजवळ टिकल्या होत्या. त्यांचे मोबाईलच्या काळात दररोज संभाषण व्हायचं. आनंद वाटायचा.
शारदेच्या दोन मैत्रीणी होत्या. त्या जीवलग होत्या. एकीचं नाव सुषमा होतं तर दुसरी योगेश्वरी. दोघ्याही चांगल्या सुस्वभावीच होत्या. योगेश्वरीनं विवाहानंतर आपलं नाव बदलून योगीता ठेवलं होतं. ती भरल्या परीवारातील होती. अर्थात एकत्र कुटूंब पद्धती होती. साऱ्यांची सेवा करता करता योगीताचा दिवस कसा जायचा ते कळायचंच नाही. तरीही ती बोलायची वेळात वेळ काढून आपल्या जीवलग मैत्रीणीशी. ज्या तिच्या मैत्रीणी होत्या. ती फारच सुखी होती आणि तेवढीच नशीबवानही. कारण तिला सबंध परीवाराची मदत होत असे. तशीच ती शहरातच वास्तव्यास असल्यानं ती स्वतःला भाग्यवान समजत होती.
शारदेची दुसरी मैत्रीण होती सुषमा. सुषमा एका अर्थानं भाग्यवान होती. कारण ती शहरात होती. तिलाही दुःखच होतं. ते म्हणजे तिचा पती. तिचा पती चांगला होता. परंतु त्याच्या कामाचं स्वरुप हे वेगळच असल्यानं त्याला बाहेर बाहेरच राहावं लागायचं. अशातच तिची व तिच्या लेकरांची होत असलेली ससेहोलपट तिच्या जिव्हारी लागत होती.
शारदा कधीकधी एकटीच असायची घरात. पती शेतावर जायचा. मुलंही शाळेत जायची. तेव्हापर्यंत घरातील सर्व कामं होवून जायची. तेव्हा ती घरात एकटीच राहात असे. त्यावेळेस तिला मैत्रीणींची आठवण येत असे विरंगुळेसाठी. तिला वाटायचं की आपल्यालाही आनंद मिळावा. म्हणूनच ती आपल्या जीवलग मैत्रीणींना फोन करीत असे. हालचाल खुशहाली विचारत असे. परंतु कधीकधी तिचा मैत्रीणींना फोन लागत नसे किंवा त्या फोन उचलत नव्हत्या. तेव्हा ती विचलीत होत असे. त्याचवेळेस तिला आठवायचे ते शाळेचे दिवस. ज्या काळात ती शहरातीलच एका शाळेत शिकली होती. ज्या शाळेत ती लहानाची मोठी झाली होती व ज्या शाळेतून तिनं भविष्याचे स्वप्न रंगवले होते.
तो पाचवा वर्ग. शारदा शाळेत आली होती. लहान होती. तशीच बारीकही. ते तिचे अस्ताव्यस्त केसं. त्यातच तिचं ओबडधोबड वागणं. ते पाहून शिक्षकांनी तिला म्हटलं,
"तुम्ही आता पाचवीत गेलात. आजपर्यंत चाललं असं. आता असं चालणार नाही. आता सुधारायचं. सुधारायचं नसेल तर शिकायचंच नाही."
ते शिक्षकांचं बोलणं. ते बोलणं भारावण्यागतच होतं. तसा दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवशी शारदा अतिशय कडक वेषात शाळेत आली. छानसे नवीन कपडे. तेही शर्टींग केलेले. तसं पाहता सर्वच विद्यार्थी शाळेत नवीनच कपड्यात आले होते. हिरवा स्कर्ट आणि पांढरा सदरा. तरीही शिक्षकांनी टोकलं. आज टोकण्याचं कारण होतं वेण्या. मुलींच्या दोन वेण्या नव्हत्या.
आज शाळेचा दुसरा दिवस होता. प्रार्थना झाली व सर्व मुलं रांगेने शाळेत गेली. तसे थोड्या वेळानं शिक्षक आले. म्हणाले,
"पोट्ट्यांनो, तुम्हाला कालच सांगीतलं होतं ना की अप टू डेट यायचं."
अप टू डेट शब्द. सर्व एकमेकांच्या थोबड्याकडं भिरभिर पाहात होते. काहींना तो शब्द समजला असेल. काहींना नसेल. त्यामुळंच ते त्या मुलांचं आश्चर्यानं पाहाणं. तसं पाहिल्यास त्या पाहण्यावर आश्चर्य व्यक्त करीत शिक्षक म्हणाले,
"काही समजलं का, मी काय म्हटलं ते. ती मागची मुलगी. जरा लक्ष आहे का? तिथं बोलून राहिली. लक्ष तरी आहे का?"
ज्या मुलीला उद्देशून शिक्षक बोलले होते. त्या मुलीकडं सर्व विद्यार्थ्यांनी विस्फारलेल्या नजरेनं पाहिलं. तशी ती मुलगी बाजूच्या एका मुलीसोबत बोलत होती. तसे शिक्षक पुन्हा म्हणाले,
"ए पोरी. जरा उभी हो बरं?"
ते शिक्षक. ते उंचीचं मोठे होते. तशी त्यांची भीतीच वाटायची. तेव्हा शिक्षक म्हटलं तर वेगळाच दरारा होता. आताच्या शिक्षकांसारखे नव्हते त्यावेळचे शिक्षक. थोडंसं काही चुकलं की एका एका हातावर दहा दहा छड्या. वाटायचं की त्या शिक्षकांचा हातच पकडावा किंवा म्हणावं, 'मारता कशाला? तोंड काय पाहण्यासाठी आहे की काय?' परंतु हिंमत व्हायची नाही. कारण आदर होता व आदरयुक्त भीती. ते छडीचे फटके विद्यार्थी अगदी सहज सहन करायचे.
ती मुलगी. ज्या मुलीला शिक्षकांनी उभी हो म्हटलं. ती उभी झाली भेदरल्या नजरेनं. तिच्या मनात वाटायला लागलं की आपण फार मोठा गुन्हा केलाय. तशी तिची मान खाली होती व हात गुंडून ती उभी होती. तसं शिक्षकांनी विचारलं,
"काय नाव तुझं?"
शिक्षकांचा तो प्रश्न. तरीही ती गप्प होती. ते पाहून पुन्हा शिक्षक म्हणाले,
"बहिरी आहे की काय? मी काय म्हटलं, ते कळत नाही का तुला? काय नाव तुझं? असं म्हटलं मी."
त्या मुलीला तसं विचारताच मुलगी उत्तरली,
"सर, मी.......मी शारदा."
"शारदा. कोण शारदा? आडनाव वैगेरे आहे की नाही?"
"शारदा........शारदा रामटेके." ती मुलगी म्हणाली व गप्प झाली.
ती शाळा शहराच्या मध्यभागी असलेली. त्या शाळेला विस्तारीत असं मैदान होतं. त्या मैदानात शाळेच्याच आवारात असलेली महाविद्यालयातील मुलं खेळायची. तसं पाहिल्यास त्या शाळेत शिकणं अभिमानास्पद वाटत होतं.
शारदानं आपलं नाव आणि आडनाव सांगीतलं. तसे शिक्षक म्हणाले,
"हे बघ, उद्यापासून बोलायचं नाही असं मधामधात आणि त्या तुझ्या झिपऱ्या. त्या झिपऱ्या दाखवत यायचं नाही शाळेत."
शिक्षकांनी आपलं बोलणं बंद केलं. तशी शारदा काय समजायचं ते समजून गेली. मात्र दुसऱ्या दिवशीपासून ती व्यवस्थीत वेणी घालून येत होती.

**********************************************************

आज तब्बल तीस वर्ष झाले होते. शारदा एका व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जुळल्या गेली व ती आनंदला दिसली. कारण ती ज्या ग्रुपवर आली होती. त्याच ग्रुपचा आनंद सदस्य होता व ती त्या ग्रुपवर आल्यानं त्याला आनंदीआनंद झाला होता व त्याला गतकाळाची आठवण झाली. तसा तो तिच्याशी बोलायला लागला. त्याला राहावंसं वाटत नव्हतं. तो एवढा आनंदीत झाला होता की त्याचा आनंद गगनात मावेनासाच होता.
तो बोलत होता ग्रुपवर. कारण त्याच्या जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या होत्या. त्या आठवणी ओठात मावत नव्हत्या. त्या आठवणी ओठातून बाहेर निघत होत्या. त्यातच रात्र केव्हा व्हायची ते कळायचं नाही आणि हाही विसर पडला होता की आपण एका ग्रुपवर बोलतोय. ज्या ग्रुपमध्ये वेगवेगळे सदस्य आहेत व वेगवेगळे सदस्य वेगवेगळ्या विचारांचे आहेत. अशातच दोन दिवस कसे निघून गेले हे त्याला कळलंच नाही.
दोन दिवस झाले होते. अशातच एक फोन आला आनंदला. मित्रच बोलत होता.
"आनंद, किती बोलणार. रात्र रात्र बारापर्यंत. त्याही पलीकडे. हे तुझं त्या ग्रुपवर मुलींशी बोलणं बरोबर नाही. तुला पत्नी वैगेरे नाही का रे. एवढा बोलतोस तू. बोलायचं असेल तर पत्नीशी बोल. त्या मुलींशी तेवढा नकोसच बोलू. कारण आता तू प्राध्यापक आहेस."
मित्रानं फोन कट केला. तसा आनंद काय समजायचं ते समजला. परंतु त्याला विचार आला. गतकाळातील जीवनाबाबत. ही गतकाळातील मित्र आणि त्या मैत्रीणी. त्या मैत्रीणी आल्या होत्या ग्रुपवर. म्हणूनच बोलायची इच्छा झाली होती आणि आजच नुकतंच छायाला जोडलं गेलं होतं. त्यामुळंच तर आनंद अपार होता व आनंदाला सीमाही नव्हती.
छाया.......छाया नावाची ती मुलगी. ती जोडली जाताच आनंदला झालेला अपार आनंद. कारण शालेय जीवनात त्याच छायानं आणि तिच्या मैत्रीणीनं त्याला मदत केली होती. छाया ग्रुपवर येताच आनंद पुन्हा ग्रुपवर लिहिता झाला,
"मला आठवण आहे की छायाच्या घरी मी लहानपणी जायचो रेसटीप खेळायला. आज तिथं मोठा रस्ता झालाय व छायाचं घरच दिसत नाही. छाया माझ्या बालपणात सावलीसारखीच उभी होती आणि आपण सर्वच. म्हणूनच आज लेखक बनलो. या लेखकी जीवनाला अमोल व गजानननं फुलवलं. कारण मी आठवी ते बारावीच्या काळात दोन पुस्तका पुर्ण केल्या. ते अमोल व गजाननाचीच कृपा. मात्र आज गजाननला राग येतो व तो ग्रुपमधून निघून जातो. हे शल्य असतं मनात. आपण सर्व मित्र आणि मैत्रीणी माझ्यासाठी भाग्याच्या आहात. एकेक व्यक्तीमत्व जेव्हा जुळते ना. तेव्हा अगदी आनंद वाटतो. प्रदीप आणि दिपकची अक्षरं आजही आठवतात. प्रदीप लिहितांना संबंधीत अक्षर खाली घ्यायचा. तसा दिपक नाही. तो आडवी रेषा द्यायचा. हेच एकदा प्रदीपनं सांगीतलं होतं. आज तो धार्मिक असल्याचं ऐकायला येतंय. आनंद वाटतो. भेटण्याची इच्छा होते. परंतु केव्हा योग येईल हे माहीत नाही. वाटतं की सतत या मित्रांशी बोलतच राहावं. परंतु मर्यादा असतात. तुम्हाला आणि मलाही. तरीही वेळात वेळ काढून बोलतोच.
ते जीवन.......ते जीवन तुम्हीच घडवलं मित्रांनो. तुम्हीच फुलवलंय. कुणी मला जेवन देवून. कारण वसतीगृहात चांगलं जेवन मिळायचं नाही. मायबापही दूरच राहायचे माझे. फक्त तुमचा आसरा होता. आधारच समजा. संगीता, छाया, पदमा, जयश्री, अमोल माझ्यासाठी जेवणाचा डबा आणायचे व जबरदस्तीनं जेवायला लावायचे. त्यातच आरती अन् मालुही. तसंच मला रमता यावं म्हणून करमत नसेल त्याला, असं वाटून अमोल घरी न्यायचा. मग लहान असतांना विद्या, छाया, पदमा, जयश्रीच्या घरी खेळायचो मी. मला आजही आठवतो योगेश्वरीच्या नाकावरचा राग. योगेश्वरी कॅप्टन असतांना मुलं गोंधळ करायची. तेव्हा ती चिडायची व बडबड करायची. मला आठवतं आजही जयश्री, अमोल व छायाचं घरचं जेवन. आज असं वाटतंय की साऱ्याच मैत्रीणी मित्र जुळावेत या समुहात व उतार वयात का होईना आपल्याला आपल्याशी बोलण्याचा मानसिक आधार मिळावा. जो त्या काळात आपण दिला होता. संगीताचं मला सायकल चालवता येत नसल्यानं सायकलवरुन ट्युशनला नेणं आठवतं. आज मीच नाही तर सर्व मित्र मोठमोठ्या औढ्यावर आहेत. ते बोलतही नाहीत. कारण कामात व्यस्त आहेत. बोलायला सवड नाही. आज तुमच्या कृपेनं व आशिर्वादानं मी लेखक झालोय. अठ्ठ्यांशी पुस्तकं लिहिलीत व महाराष्ट्रातील भरपूर पेपरला लिहून येतं. तुमच्यासारखी मुलं जर मला मिळाली नसती तर माझ्यातील लेखक केव्हाच संपून गेला असता कायमचा. त्याबद्दल आभार. माझे काही बोलतांना चुकत असेल तर माफ करावे. कधी कधी आनंद वाटावा. म्हणून कधीकधी वात्रटही बोलतो. परंतु ते बोलणे माझे ह्रृदयातून नसतेच. तुमच्याच कृपेनं मी मुख्याध्यापक सुद्धा झालो होतो हेही विशेष आहे." आनंद बोलून गेला.
आनंद आज एका महाविद्यालयात प्राध्यापक होता. तो मोठमोठ्या मुलांना शिकवीत होता. शिवाय आज तो एक मोठा लेखकही बनला होता. तसा तो मोठमोठे विचारपीठं गाजवत होता. त्यातच त्यानं प्राचार्य पदही गाजवलं होतं.
आनंद बोलून गेला आज जे ग्रुपवर. ते सत्य होतं. कारण ज्यावेळेस तो लहान होता. त्यावेळेस त्याच मुलांनी आनंदचं आयुष्य फुलवलं होतं. त्याच्या भावना जपल्या होत्या. टिपल्या होत्या.
आनंद लहानपणी वसतीगृहात राहात होता. त्याचे मायबाप त्याच्याजवळ नव्हते ना कोणी रिश्तेदार त्याच्याजवळ होते. तसं पाहता मोठी दयनीय स्थिती आनंदची होती. ना धड त्या लहानग्या वयात आनंदला खायला मिळायचं. त्यामुळंच की काय, विद्यार्थ्यांना दया यायची व ते त्याला जेवनाचा डबाही पुरवायचे.
छाया ग्रुपवर आली होती. छाया ग्रुपवर येताच त्याचा गतकाळ त्याचेसमोर तरळायला लागला. त्याला छायाच नाही तर छायासह अमोल, गजानन, संगीता, पदमा, जयश्री, सुषमा, योगीता, आरती, भारती व शारदा आठवायला लागल्या. आठवायला लागलं की तीच मुलं होती. म्हणूनच तो घडला होता.
आनंदनं आता त्या फोनवर झालेल्या संवादानुसार आपलं बोलणं ग्रुपवर बंद केलं. त्यानंतर तो पुर्णतः खजील झाला व त्यानं काही काळ का असेना, चूप बसला.

************************************************

पावसाळ्याचे दिवस सुरु झाले होते. तसं पाहता उन्हाळा अगदी उकाड्याचा होता. परंतु आज पावसानं त्याच्या तरल मनाला थंड केलं होतं. तसं पाहिल्यास त्याला त्याच पावसाळ्यात त्याला शारदा आठवली व तो प्रसंग आठवला. प्रसंग होता शारदेला लागण्याचा.
तो एकदाचा दिवस. आनंद आठवीत होता. त्यावेळेस शाळेच्या विस्तारीत मैदानावर धपाधपीचा खेळ सुरु होता. तसा तो खेळ रोजच सुरु असायचा आणि रोजच कोणाला ना कोणाला तो चेंडू लागायचा. या धपाधपीच्या खेळ खेळतांना मुलगी जर जवळ असली तर तिला तो चेंडू मारायला मजा यायची. त्याचं कारण होतं, मुलींचं विव्हळणं.
मुली या नाजूक होत्या. त्यातच त्यांना चेंडू लागताच त्या विव्हळायच्या. कारण त्यांना त्रास व्हायचा. तरीही त्या खेळायच्या. अशातच शाळेतील मैदानावर खेळणाऱ्या एका मुलाच्या हातात चेंडू आला व त्यानं इकडं तिकडं पाहिलं. तशी त्याच्या पुढ्यात शारदा उभी.
शारदानं समोर पाहिलं. समोर चेंडू काळासारखा उभा होता. तो वाट पाहात होता शारदेचा वेध घेण्याचा. तो भक्ष टिपणारच होता आणि ती मागं सरत होती. ती मागं सरकतच होती. तोच तिचा पाय एका तारावर पडला. तसा तो तार तिला टोचला. मग काय, चेंडू मारणारा अतिशय घाबरला. तो चूप झाला आणि त्यानं चेंडू मारलाच नाही. कारण शारदेच्या पायातून भळाभळा रक्त वाहात होतं. ती रक्तबंबाळ झाली होती. त्यातच तिला सांत्वन देण्यासाठी जो तो येवून पाहात होता. तसे ते सर्व मित्र तिला पाहायला येत असतांना तिलाही फारच छान वाटत होतं. असं वाटत होतं की हेच मित्र आपले तारणहार आहेत. आपले केवळ मित्रच नाहीत तर आपले मायबाप सुद्धा आहेत.
शारदा आज काळाच्या ओघात सर्वांच्या नजरेतून ओझल झाली होती. ती कोणाला पुसटशीही आठवत नव्हती. फक्त ती आठवत होती योगेश्वरीला. कारण योगेश्वरीला तिच्याच घराजवळ दिलं होतं.
शारदा घरी विशेष लाडाची होती. तिची आई तिच्यावर फार प्रेम करायची. तिला काही लागलेलं तिच्या आईला आवडायचं नाही. अशातच प्रारब्धच ते. तिच्या पायाला जखम झाली. तार तर निघाला. परंतु पायाला बँडेज होतं.
ते शिकण्याचं वय. त्याकाळात लागणारच. कारण मुलं खेळत होतीच. शिवाय सायंकाळी ती जेव्हा घरी गेली. तेव्हा तिच्या आईनं पाहिलं. तिला फारच लागलं होतं. तसं तिच्या आईने विचारलं,
"काय झालं बाळ. हे कसं लागलं?"
शारदा आईची लाडकीच. तसं शारदेनं रडणं सुरु केलं. तशी आई म्हणाली,
"नगं रडू, काय झालं हे तरी सांग?"
आईचा तो प्रश्न. तसा तो शाळेतील प्रसंग तिच्या डोळ्यासमोर तराळला. वाटलं सांगावं आईला. तो डोळ्यासमोरचा चेंडू. तो मारणारा मुलगा. सारंच सांगावं आईला. परंतु क्षणातच तो विचार विरला. वाटलं नको, तो प्रसंग सांगूच नये. नाहीतर आई ओरडेल. परंतु आई तर तगादाच धरुन होती. काय करावं. तसे तिच्या कानावर पुन्हा आईचे ते बोल पडले. 'कसं लागलं तुला?'
आईचा तो प्रश्न. तो प्रश्न ऐकताच शारदा म्हणाली,
"आई, पडले मी. जास्त जखम खोल नाहीच. फक्त खरचटलं."
शारदा बोलली. तिनं स्पष्टीकरण दिलं. परंतु आईचं मन मानेना. ती म्हणाली,
"नाही नाही. आपण दवाखान्यात जावूया."
आईचा तो आग्रह व तो आग्रह पाहून व ती जबरदस्ती पाहून शारदा दवाखान्यात गेली.

**********************************************************

शारदा दवाखान्यात गेली. तशी डॉक्टरांनी तात्पुरती जखमेला बांधलेली पट्टी सोडली व जखम तपासली. तशी जखम तिक्ष्ण होती. चांगला बोट जाण्याएवढा खड्डाच पडला होता जखमेत. तसे डॉक्टर म्हणाले,
"कुठे गेली होती?"
"खेळत होते आणि अचानक पायाला तार रुतला."
"बरं बरं. मी इंजेक्शन देतोय. दोन चार गोळ्या देतोय. बँडेज आमच्या सिस्टर करुन देतात. काळजी करण्याचं कारण नाही. मात्र पाण्यात दोन चार दिवस पाय टाकू देवू नका. तसं दो चार दिवसानं दाखवायला आणा."
दोनतीन दिवस झाले. तशी ती लंगडत लंगडत चालत होतीच. ती काही दोन चार दिवस शाळेत आली नाही.
दोनतीन दिवस झाले. तशी ती लंगडत लंगडत चालत होतीच. ती काही दोन चार दिवस शाळेत आली नाही.
ती शाळेत दोनचार दिवस आली नाही म्हणून शाळेतील मुलं चिंतेत होते. एक दिवस मुलांनी विचार केला आणि ठरवलं की आपण जावूया का शारदेच्या घरी. तिच्या पायाला लागलं. कशी जखम आहे ते अजून कळलं सुद्धा नाही. त्यानंतर सर्व मुलं तिला भेटायला तिच्या घरी गेल्या. तशी ती भेटली. मात्र तिला सर्व मित्रमंडळ घरी आल्यावर बरं वाटत होतं.
मित्रमंडळ घरी आलं. तसा संवाद साधल्या गेला व शारदेनं खंत व्यक्त केली.
"मला लागलं त्याचं मला दुःख नाही. दुःख आहे अभ्यासाचं. माझा अभ्यास बुडतोय. त्याचं दुःख होतंय मला."
शारदेचं ते बोलणं. तसा मनोज म्हणाला,
"चिंता करु नको. सगळं बरोबर होईल. मी उद्या आणून देतो माझ्या वह्या. आता तरी चिंता सोड."
मनोज जे बोलायचं ते बोलून गेला. त्यानंतर त्यानं शारदेला वह्या दिल्या अभ्यासाच्या. त्या अभ्यासाच्या वह्यावरुन तिनं आपला अभ्यास पुर्ण केला होता.
आज आठवत होता शारदेला आपला वर्ग आणि त्या वर्गातील ती मुलं. आज ती पायातील जखमही आठवत होती. त्याठिकाणी आजही व्रण होता. जो व्रण आजही मिटला नव्हता. तो व्रण आज त्याच वर्गातील मुलांची आठवण देत होता. ज्या वर्गातील मुलांचा अनुभव तिला स्वतःच्या भावागत आला होता. ती वर्गातील मुलं तिलाही अगदी मायबापागत वाटत होती. ज्याप्रमाणे आनंदला आठवत होते वर्गातील प्रसंग. तसेच प्रसंग शारदेलाही आठवत होते.
मध्यंतरीचा शारदेचा काळ अतिशय विलापातच गेला. कारण कोणीही संपर्कात आलं नव्हतं. दहावीनंतर कोण कुठं आहे आणि कोण कसा आहे हे तिला माहीत नव्हतं. तिला वाटत होतं की ही मुलं मुली केव्हा मिळतात आणि केव्हा नाही. अशाच क्षणाची ती वाट पाहात होती आणि तो एक दिवस उजळला. योगेश्वरीनं एका वर्गमित्राच्या मदतीनं ग्रुप जोडला व ग्रुपमधून शारदेसह बाकी मुलांना जोडलं. आता शारदेच्याही गतकाळातील आठवणी ताज्या झाल्या होत्या. त्याचबरोबर आनंदच्याही. कारण आनंद तिचा अतिशय जवळचा मित्रच नाही तर एक अतिशय जवळचा वर्गबंधू होता.
तो दिवस पार पडला होता. शिक्षक बोलून गेले होते. अस्ताव्यस्त नको राहूस. अपडेट राहा. तशी शारदा अपडेट झाली व ती शिकू लागली. तशी ती पाहायला चांगली जरी असली तरी अभ्यासात पाहिजे त्या प्रमाणात तेजतर्रार नव्हतीच. शिवाय तिला हुशारकीही मारता येत नव्हती. तशी ती समोरसमोरही करीत नव्हती. त्यामुळं ती कोणाच्या लक्षातही आली नाही व राहिलीही नाही. त्यातच ती कधी चूकत नसल्यानं कोणाचीही नजर तिच्याकडं गेली नाही. मायबाप जे बाळकडू पाजत होते. त्यानुसार ती वागत होती. आज ती आठवीत गेली होती व तरुण झाली होती. तसं तिचं सौंदर्य खुललं होतं.
तो आठवीचा वर्ग. सारेच मुलं दिवाळखोर झाले होते. मस्त्या करीत होते. काल सातवीत असलेली मुलं आज आठवीत आली होती. ज्यात आनंदही होता. आनंद वर्गातील अतिशय हुशार मुलगा होता. तसा त्यानं सातवीत दुसरा क्रमांक मिळवला होता. मात्र तो जेव्हा आठवीत गेला. तेव्हा तोही मस्त्या करायला लागला होता आणि याच आठवीच्या वर्गात ती मुलं हुशार बनली होती. जी मुलं सातवीपर्यंत हुशार नव्हती. ज्यात राजेश व मनोज होते. ती मुलं हुशार म्हणून ओळखले जात होते.
तो आठवीचा वर्ग. त्या वर्गात काही मुलं हुशारीनं ओळखले जात होते. आनंद आपल्या लेखनीनं प्रसिद्ध होता. त्याच्या लेखनीची धार काही मुलांना माहीत होती. तशीच वर्गात काही मुलं बुद्धूही होती. तिही मुलं प्रसिद्धच होती. परंतु शारदा? शारदा साधारण असल्यानं तिच्याकडं कोणाचंच लक्ष गेलं नाही. तशीच शारदा ही कोणत्याच खेळात भाग घेत नसल्यानं आणि तरुण झाल्यावरही तिनं कोणावर प्रेम न केल्यानं कोणालाच ती आठवणीत राहिली नाही.
आज ती ग्रुपवर जेव्हा आली होती. तेव्हा तिला कोणीही ओळखत नव्हतं. परंतु प्रसिद्धीचाही एक सिद्धांत असतो. त्यानुसार प्रसिद्धी ही ती वेळ आल्याशिवाय मिळत नाही. तेच घडलं शारदेच्या जीवनात.
शारदाही इतर मित्रांसमवेत प्रसिद्ध होणार असं आनंदला वाटत होतं. ती प्रसिद्ध तर होणारच, परंतु वेळ आल्यावर, असं आनंदला वाटत होतं.
प्रसिद्ध तर होणारच, परंतु वेळ आल्यावर? हा काय प्रकार आहे. कोणाच्या तो प्रकार लक्षातच येणार नाही. कारण आजच्या काळात लोकं प्रसिद्धीच्या एवढे मागं लागले आहेत की त्यांना वाटतं, मी मागं तर पडणार नाही. परंतु त्यांची अवस्था ही पितळेसारखी असते. पितळाला जसं स्वतः चमकण्यासाठी स्वतःला दहा वेळा पॉलीश करावं लागतं. ती अवस्था सोन्याची नसते. सोना हा सोनाच असतो. कारण तो चकाकतो. मात्र लोकं सोन्याचं अस्तित्व दिसू नये अर्थात सोन्याला चोरु नये. म्हणूनच सोन्याला लपवून ठेवतात. तरीही चोर बरोबर त्याचा शोध घेत त्याला चोरतातच. तसंच आहे प्रसिद्धीचं. हिरा जरी कोळशाच्या कितीतरी पटीनं आत लपला असला तरी त्याला कोळसेव्यापारी शोधतातच. तसाच एखादा व्यक्ती विचारवंत असेल आणि त्याचे विचार समाजाला चांगले वाटत असतील वा समाजाच्या अतिशय उपयोगाचे वाटत असतील तर ते विचार कोणी कितीही दडपून ठेवले, तरी ते बाहेर येणारच. उदाहरण द्यायचं झाल्यास सॉक्रेटिसचं देता येईल. सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिला गेला. कारण त्याचे विचार दडपून टाकायचे होते. आज त्यांचे विचार जनमताचा वेध घेतात. तेच घडलं मुन्शी प्रेमचंदच्या आयुष्यात. त्यांच्याबाबतही एक कथा प्रसिद्ध आहे. मुन्शी प्रेमचंदनं भरपूर साहित्य लिहिलं. परंतु ते त्यांना आपल्या हयातीत प्रसिद्ध करता आलं नाही. त्यासाठी कित्येक काळ जावा लागला. जसं म्हणतात की मुंन्शी प्रेमचंदनं साहित्य निर्माण केलं. ते साहित्य कपाटात ठेवलं गेलं. त्यानंतर ते साहित्य त्याच्या मुलाच्याही काळात तसंच राहिलं. पुढं नातू झाला व नातू मोठा झाल्यावर त्याचा एक संपादक मित्र त्यांच्या घरी आला. संपादक हा साहित्याशी संबंधीत होता. मग मुन्शी प्रेमचंदच्या नातवाला वाटलं. ही काय माझ्या आजोबाची कटकट. आपण हे साहित्य या संपादकाला देवून टाकू. हे साहित्य तसं पाहिल्यास आपल्या काही कामाचं नाही. मुन्शी प्रेमचंदच्या नातवानं ते साहित्य त्या संपादकाला दिलं. संपादकानं ते साहित्य क्रमाक्रमानं छापलं व आज त्यांचं साहित्य घराघरात आहे.
प्रसिद्धीचं असंच आहे. कोण केव्हा प्रसिद्ध होईल हे सांगता येत नाही. जरी कोणी कोणाचे प्रसिद्धीच्या रस्त्यावर पाय खेचत असले तरी.
लोकं पाय कसे खिचतात? याबाबत एक प्रसंग सांगतो. मुलाखत सुरु होती. मुलाखतीदरम्यान संवाद सुरु होता. मुलाखतकार एकाएकाला प्रश्न विचारत होते की त्यांनी साहित्यात योगदान कसं दिलं? तशीच काही प्रश्नावली होती व मुलाखत देणारे दोनतीन जण होते. एक मुलाखतकार बोलत होता. त्याला काहीतरी बोलायचं होतं. तो बोलणारच होता. परंतु त्याच्या हातातून माईक घेवून त्याला बोलू न देता दुसराच बोलता झाला. जसं त्याला वाटत असेल की शेजारच्यानं आपल्या कार्याचं योग्य स्पष्टीकरण दिलं तर तो प्रसिद्ध होईल व मी मागे पडेल आणि काय बोलला, तो म्हणाला,
"मुन्शी प्रेमचंद गुणवान होता. त्याचे गुणसुत्र त्याच्या मुलात उतरले व त्यानंतर तेच गुणसुत्र त्याच्या नातवात. मग त्याच्या नातवाला सुद्धा साहित्य लिहिता आलं. आता साहित्याचा, गुणसुत्राचा व नातवाचा मुन्शी प्रेमचंदच्या नातवाच्या जीवनात कोणता संबंध. कारण तो नातू साहित्यच लिहित नव्हता.
प्रसिद्धी.......अलिकडच्या काळात लोकं निव्वळ प्रसिद्धीच्या मागं धावत आहेत. तरीही ते प्रसिद्ध होत नाही. काही लोकं मात्र काहीही न करता प्रसिद्ध होतात. जसे, एका साहित्य संमेलनात सचीवपदी असलेला व्यक्ती त्याला राग आल्यानं तो उपस्थीतच नव्हता, तरीही शिल्ड, स्मरणीकेवर, बॅनर, पोस्टर सर्व गोष्टींवर त्याचं नाव होतं. कोण ओळखत होतं त्याला. तो का बरं नाही आला म्हणून. आज प्रसिद्धीच्या नादान लोकं विचीत्र पद्धतीनं वागत आहेत. याचा फायदा अनेक हौसे, नवशे व गवशे घेत आहेत. ते काही रुपये मागतात. त्यातील काही रुपयाचा पुरस्कार देतात व काही आपल्या जेबात टाकतात आणि प्रसिद्धीच्या नावावर व्यापार करतात. अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, मुख्य अतिथी स्थान पैशानुसार ठरलेलं असतं. मात्र काही लोकं हे प्रसिद्धीच्या कोसो दूरच असतात. त्यांनाही प्रसिद्धी आवडत नाही असं नाही. परंतु त्यांना वाममार्गानं प्रसिद्ध होता येत नाही. कारण ते इमानदार असतात. ते प्रसिद्धीसाठी कोणाला एक छदामही फेकून मारत नाही. जशी आजच्या लोकांना सवय आहे. फोटो निघाली पाहिजे म्हणून ते विचारपीठावरच राहतात. राहिली मग बाकीची कामं. कारण विचारपीठावरील लोकांचे फोटो काढले जातात. त्यात ते फोटो वर्तमानपत्रात टाकले जातात व छापून येतात. त्यानंतर ते फोटो छापून आले की आपल्या ओळखीच्या माणसांना सांगता येतं. नातेवाईकांना सांगता येतं की हा माझा फोटो पेपरात छापून आला. परंतु त्या फोटो छापून येण्याचा आनंद फक्त त्यालाच होत असतो. ज्याचा फोटो छापून येतो. कारण बाकीचे त्याचा द्वेषच करीत असल्यानं ते त्याच्या प्रसिद्धीला दिखाव्यापुरती दाद देतात. मनातून दाद देत नाहीत. ही वास्तविकताच आहे. मात्र काही लोकं कुणाच्या मधामधात काही मिरवीत नाहीत. अशाही स्वभावाचे असतात. ते ना विचारपीठावर असतात. ना प्रसिद्धीच्या मागं धावत असतात. ते सदैव, अविरत आपले कार्य करीत असतात. मग कोणी त्यांच्या कार्याला चांगलं म्हणो की न म्हणो. त्यांना त्यांच्या कार्यात काहीच फरक पडत नाही. ते कार्य करीत असतांना फक्त एवढाच विचार करतात की त्यांचं कार्य फक्त नि फक्त समाजाभिमुख व्हावं. ते कार्य समाजाच्या उपयोगात यावं. त्याच गोष्टीचा विचार करुन प्राचीन काळातील साहित्य लिहिल्या गेलं. ते साहित्य परकीय तसेच मुस्लीम साम्राज्याच्या काळात टिकून राहावं म्हणून ते साहित्य जमीनीच्या भुगर्भात गाडलं गेलं. तसं पाहता ते साहित्य भोजपत्र, ताडपत्र यावर लिहिल्या गेल्यानं नष्ट होईल म्हणून ते साहित्य ताम्रपत्र वा सुवर्णपत्रावर लिहिलं गेलं व ते जमीनीत पुरलं गेलं. कदाचीत त्यांच्याही डोक्यात त्यावेळेस आलंच असेल की ज्यावेळेस जमीन खोदण्यात येईल. तेव्हा हेच ताम्रपत्र सापडेल व आपल्यातील चांगल्या विचारांचा लोकांना फायदा होईल. हाच विचार करुन साहित्य टिकवल्या गेलं. कारण त्यावेळचे राज्यकर्ते विद्यापीठंची विद्यापीठं जाळत होती. जसं कर्नाटकमध्ये कल्याण राजानं अनुभव मंटपाला दहाव्या शतकात आग लावून अनमोल साहित्य जाळलं. ते जाळण्यापुर्वीच काही लेखकांनी तेथून काही पुस्तकं पळवली व ती पुढं जमीनीत गाडली. तीच कृती पुढं तेराव्या शतकात बख्तियार खिलजीनं केली. त्यानं तर पुर्णतः नालंदा विद्यापीठालाच आग लावून दिली. जे विद्यापीठ तीन ते चार महिने सतत जळतच होतं.
आज आपल्याला ताम्रपत्र व इतर साहित्य सापडत आहेत. घर बांधतांना जे पायवे खोदतो त्यात. त्यामुळंच उघड होत आहे त्या काळातील लिहिलेलं साहित्य. खरंच त्या काळातील लोकांनाही कल्पना नसेल की आपले वंशज आपल्या ताम्रपत्राला शोधून काढतील. उदाहरण द्यायचं झाल्यास मुकूंदराजाचं देता येईल. मुकूंदराजाने विचार केला नसेल की माझंही विवेकसिंधू तब्बल आठशे वर्षानंतर सापडेल व मी आठशे वर्षानंतर प्रसिद्ध होईल. कारण मुकूंदराजांनी बाराव्या शतकात लिहिलेला विवेकसिंधू आज छापील स्वरुपात प्रसिद्ध झाला आहे. तेच घडलं आहे इतरही लेखकांच्या बाबतीत.
महत्वपुर्ण बाब ही की माणसाला केव्हा प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. त्यासाठी प्रसिद्धीमागं धावू नये. काळाच्या ओघात चांगलं कार्य हे अस्तित्वात येईलच. जेव्हा वेळ येईल. त्यासाठी घाबरुन जायची व स्वतः लाज वाटून घ्यायची गरज नाही की मी स्वतः माझी प्रसिद्धी केली नाही तर उद्या माझं कार्य इथंच संपेल. तसं वाटणंही साहजीकच आहे. कारण आज प्रसिद्धीसाठी वेगळे असलेले व्यवहार करीत असलेले लोक. आजची मंडळी स्वतःच्या मायबापालाच विचारत नाही, ती काय आपल्याला आपल्या मरणानंतर प्रसिद्ध करेल. ही लोकांना भीती वाटत असते. म्हणूनच अशी मंडळी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न करीत असतात. परंतु ते जरी खरं असलं तरी ज्याचा कोणी नसतो त्याचा विधाता असतो. त्याप्रमाणेच तुमचं कार्य जर चांगलं असेल ना तर ते काळाच्या ओघात नक्कीच पुढं येईल. फक्त तुमच्या कार्यात तेवढा दम पाहिजे. हे तेवढंच खरं. ते जर दमदार असेल तर कोणाला काहीच करण्याची गरज नाही यात शंका नाही. त्यामुळंच आपण प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता आपण आपलं कार्य करीत राहावं म्हणजे झालं. कारण कार्य अशी एक गोष्ट आहे की जे कोणीही कितीही लपवलं तरी ते अगदी कोळशात लपलेल्या हिऱ्यासारखं पुढं येतं. त्यासाठी स्वतःचा उदोउदो करुन घेण्याची गरज नाही.
आनंद आज लेखक असल्यानं त्याला शारदेबद्दल लिहावसं वाटलं. कारण होतं तिचा निष्कलंकपणा आणि तिची मर्यादा. ती सीतेसारखी पवित्र होती आपल्या ऐहिक मनातून. जे मन आनंदला खुणावत होतं व म्हणत होतं की आनंद, हीच तुझ्या पुस्तकाची नायिका ठरु शकते. तू हिच्यावरच लिह. तसं पाहिल्यास शारदा नशिबवानच होती. कारण वर्गात एवढ्या साऱ्या मुली होत्या. मुलंही होती. परंतु आनंदच्या लेखनीला केवळ शारदाच दिसली. त्याची लेखनी शारदेसमोर नतमस्तक झाली जणू ब्रम्हस्वरुपिणा शारदेसारखीच. हळूहळू शारदेबद्दलचे शब्द त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागले. ते शब्द फेर धरुन नाचू लागले. तशीच ती अक्षर कागदावर उतरली व शारदेचा पुस्तक रुपानं जन्म झाला होता तेही आनंदच्या लेखनीतून. आज शारदा खऱ्या अर्थानं प्रसिद्ध होणार होती आनंदच्या अर्थपुर्ण लेखनीतून. जिचा आनंदला अभिमान होता.

************************************************

शारदाला जखम झाली होती. ती गोष्ट तिच्या आईलाही माहीत झाली होती. परंतु ती आजच्या आईसारखी नव्हती की ती शिक्षकांना धमक्या द्यायला जाईल. त्यातच आपल्या मुलीचं आयुष्य उध्वस्त करेल. आजची आई जर असती तर तिनं आपल्या मुलीला झालेल्या जखमेचा जाब शाळेतील शिक्षकांना विचारला असता व शाळेतील शिक्षकांना आपलंसं केलं असतं.
ती शाळा.......त्या शाळेत मारकुंडे मानले जाणारे शिक्षक भरपूर होते. ते एका एका हातावर दहा दहा छड्या मारत असत. आनंदला आठवत होते शाळेतील शिक्षक की जे त्यालाच नाही तर सबंधीत सर्व मुलांना मारत असत. एक चित्रकलेचाही शिक्षक होता की त्या शिक्षकानं चित्र काढले नसल्यानं एका एका हातावर दहा दहा छड्या मारल्या होत्या.
अलीकडील काळात पालकांच्या धमक्या कुसंस्काराला बळ देतात. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्याचं कारण तसंच आहे. पालक चक्कं शाळेत येतात व मुलांसमोर शिक्षकांना वेगवेगळ्या स्वरुपाच्या धमक्या देत असतात. परंतु आनंदच्या शाळेत असं चालायचं नाही. कोणताही पालक कोणत्याही शिक्षकाला धमक्या देत नसे.
पुर्वी पालक हे सुज्ञतेनं वागायचे. धमक्या द्यायचे नाहीत. उलट म्हणायचे की सर हा अभ्यास करीत नाही. आपण याला चांगला चोप द्या. मग काय शिक्षकांचा रुळ आणि मुलांची पाठ. त्यानंतर ती पाठ सुजलीच म्हणून समजा. त्यातच कोणी सांत्वनाही देत नसत. शारदेचीही आई कधी गेलीच नव्हती शिक्षकांना सांगायला की त्यांनी तिला चांगलं शिकवावं. चांगला अभ्यास करायला लावावा.
तीच एक शाळा होती व त्या शाळेत हिंदीचे शिक्षक काही चुकले तर बेदम मारायचे. त्यांच्या जवळ एक पिशवी होती. त्याच पिशवीत एक लहानशी काठी होती. त्या काठीला ते शिक्षक टप्पू म्हणत असत. एखाद्या विद्यार्थ्यांचं काही चुकलं रे चुकलं की बस. अशातच एक दिवस शारदा मुलींशी बोलत होती. त्यांचं शिकवणं सुरु असतांना. मग काय, तेच पाहिलं त्या शिक्षकानं. त्यांना वाटलं की त्या मुलीचं चुकलं. मग काय तिला त्या शिक्षकांनी धू धू धुतला. ती जशी जशी रडायची. तसे तसे ते शिक्षक तिला जास्त मारत होते. मग तिचाही आवाज वाढला आणि शिक्षकांचा मारण्याचाही. शेवटी काय? काय झालं म्हणून बाजूच्या वर्गातील शिक्षक त्या वर्गात आले. त्यांनी त्या शिक्षकांना समजावलं व शिक्षकांनी मारणं बंद केलं. असं होतं त्या काळातील शिक्षकांचं मारणं. त्यावर घरीही काही कोणी म्हणत नसत. घरीही मार पडायचा.
ती गोष्ट शारदेनं काही आपल्या घरी सांगीतली नाही. कारण तिलाही धाक असेल. धाक हा असेल की मी जरी घरी लाडाची असली तरी मला माझे वडीलही अभ्यासात व्यत्यय आणल्यामुळं चांगलाच चोप देतील. हे त्यावेळच्या शारदेचे विचार. आजची शारदा राहिली असती तर तिनं आपल्या घरी ती गोष्ट सांगीतली असती व दुसऱ्या दिवशी आपल्या आईला घेवून शाळेत आली असती व तिच्या आईनं शिक्षकांना विविध धमक्या दिल्या असत्या. कारण आज तसं नाही. शारदा जरी बाकी विषयात साधारण असली तरी गणित आणि इंग्रजीत तिला पैकी पैकी पैकीच गुण असायचे हे विशेष होतं.
पुर्वीचे पालक साधे चित्रकलेचे जरी असले तरी एका एका हातावर दहा दहा छड्या द्यायचे. त्यांची तासीका असली की सबंध वर्ग चिडीचूप राहायचा. कोणीच बोलायचा नाही. साधं एक दिवस चित्र काढलं नव्हतं शारदेनं, म्हणून तिच्या हातावर दहा दहा छड्या मारणारा चित्रकलेचा शिक्षक आज शारदेला आठवत होता आणि आठवत होते त्या काळातील सर्व शिक्षक. मग ते मराठी, इंग्रजी, विज्ञानाचे का असेना. त्यांनी तिलाच नाही तर आनंदसह सर्वांनाच शिकवलं होतं. म्हणूनच आज त्या वर्गात सुसंस्कार फुलले होते. कुसंस्कार नाही.
आज तसं नाही. आजचे पालक शिक्षकांनी एक जरी छडी त्यांच्या पाल्यांना मारली तर ते शाळेत येत असतात. धमक्या देत असतात आणि ती धमकी मुलांसमोर शिक्षकांना देत असल्यानं मुलंही वात्रट वागत असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास एका शाळेचं देतो. त्या शाळेत आरक्षण असलेला एक विद्यार्थी बसत होता. त्याला एकदा शिक्षिकेनं मारलं. जास्त मारलंही नव्हतंच. कारण अलीकडील काळ हा जास्त मारण्याचा नाही. त्यानंतर त्या मुलानं सायंकाळी घरी जाताच आपल्या आईला सांगीतलं की त्याला संबंधीत शिक्षिकेनं बेदम मारलं. मग काय, दुसरा दिवस उजळला व त्या मुलासोबत त्याची आई शाळेत हजर झाली व शिक्षकांना धमकी देवू लागली? प्रकरण काय आहे हे न विचारता तंबी देवू लागली की यानंतर माझ्या मुलाला मारलं तर याद राखा. ॲक्ट्रासिटी ॲक्टनं अंदर टाकीन.
त्या मुलाच्या आईची धमकी. त्या धमकीनंतर संबंधीत शिक्षक घाबरले. मुलगा स्वतःच इतर मुलांशी भांडण करु लागला. तो स्वतःच भांडण करायचा आणि स्वतःच आईला बोलावून आणण्याचा बहाणा करायचा. त्याला शिक्षक समजवायचे. परंतु तो काही ऐकायचा नाही. तसं पाहता दोन तीन वेळा त्यानं आपल्या आईला आणलं होतं. त्यामुळंच शिक्षकही काही म्हणत नव्हते त्याला. हळूहळू वय वाढलं. आज तो सातवीत होता व त्याला त्याच्या कृतीनं अ चं ढं ही येत नव्हतं. पुढं तो नक्कीच गुंड प्रवृत्तीचा बनेल असं भाकीत त्या शाळेतील शिक्षक व्यक्त करीत होते.
असाच दुसरा मुलगा. हा मुलगा दुसरीत होता. लहान असतांना त्यानं एका मुलाला मांडीवर पेनाचं टोक मारलं. त्यानंतर त्याची तक्रार शिक्षकानं त्याच्या आईवडीलाला केली. आईवडील काही बोलले नाही. परंतु काही वेळानं फोन आला. फोनवर आजी बोलली. म्हणाली की आपण माझ्या नातवाला दाटलं, त्यामुळंच त्याला ताप आलाय. त्यानंतर शिक्षक नरमले. ते त्या मुलाला काहीच म्हणत नव्हते. कारण तोही शिक्षकांवर केस करण्याची धमकी देत होता. शाळेत तसाच परीसरात मस्त्या करीत होता आणि आजीच्या लाडानं त्याला कोणी काहीही म्हणत नव्हतं. आज तो मुलगा युवक बनला आहे व एक गुंड म्हणून पुढे आला आहे.
शाळेतील मुलांचं वागणं. त्यावर पालकांचं शिक्षकांशी वागणं. कायद्याचा धाक आदी सर्व बाबी बालकांच्या व्यक्तीमत्वाला घडवीत नाहीत. पालकांच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांसमोरच दिल्या जाणाऱ्या धमक्या त्या धमक्यांनी शिक्षकांची कसोटी पणाला लागते. तो कितीही चांगल्या पद्धतीनं शिकवीत असला तरी त्याचं शाळेत मन रमत नाही. कुठंतरी त्याच्या शिकविण्यात बाधा उत्पन्न होते व त्याचा परिणाम त्याच्या शिकविण्यावर होतो. या पालकांच्या धमक्यांमुळच आजची पिढी वाया जात आहे. आपलं अख्खं जीवन उद्ध्वस्त करीत आहे. परंतु त्याचं त्या पालकांना काही घेणंदेणं नाही. त्यांना फक्त शिक्षक त्यांच्या मुलांवर काही ओरडत असेल तर ते चालत नाही. आज अशाही काही शाळा आहेत की त्या शाळेतील सातवीचे विद्यार्थी एकमेकांवर चाकूचे वार करतात व मारुन टाकतात आपल्या संवंगड्यांना. त्याला तुरुंग, कैद वा शिक्षा त्या वयात कळतच नाही. बालसुधारगृह असतं. परंतु तिथंही काहीच शिक्षा नसते. मग संस्कार कसे फुलतील विद्यार्थ्यात? हा प्रश्न आहे. कालपर्यंत या गोष्टी नव्हत्या. कालचा कोणताच अल्पवयीन विद्यार्थी शाळेत तरी आपल्या सवंगड्यांवर चाकूचे वार करीत नव्हता. आज मात्र चौथीचा मुलगाही आपल्या सवंगड्यांवर चाकूचे वार करीत असतो. याला जबाबदार कोण? असा प्रश्न कोणी केल्यास निश्चीतच त्याचा दोष पालकांनाच देता येईल. तसंच पालकही शाळेतील शिक्षकांवर त्यांची मुलं शिकवून उपकार केल्यागतच वागत असलेले दिसतात. त्याचं कारण आहे. आजचं लोकसंख्या नियंत्रण तत्व व कुटुंबनियोजन तत्व. अलीकडील काळात हम दो जरी असले तरी हमारा एक वा दोनचं तत्व आल्यानं अलीकडील काळात मुलं पालकांच्या अतिशय लाडाची बनलेली आहेत. त्यामुळंच मुलांना काहीही म्हणता येत नाही. याचाच परिणाम आजच्या एकंदर परिस्थितीवर झालेला असून मरण अतिशय स्वस्त झालेलं आहे. लोकांची मुलं शाळेतून जेव्हा मोठी होतात, ती लाडानं मोठी झालेली असल्यानं पुढील काळात संकटमयी हातात आलेलं शिवधनुष्य पेलवू शकत नाही. त्यामुळंच आत्महत्या सत्र वाढलेलं आहे. आता कोणीही अगदी सहज आत्महत्या करतांना दिसतात. जे पुर्वीच्या काळात दिसत नव्हतं. कारण आव्हान पेलण्याचं सामर्थ्य पुर्वी वर्गावर्गातूनच छडीच्या माध्यमातून शिकविलं जात होतं. जे आज शिकविलं जात नाही.
महत्वपुर्ण बाब ही की आज संस्कार दूर पळालेला आहे. मुलं शिक्षकाला दबत नाहीत. निव्वळ शाळेत गोंधळ करतात. त्यातून मुल्य मरत चाललेली आहेत. संस्काराची हत्या होत आहे. त्यातच त्याची परियंती आत्महत्येतून होत आहे हे तेवढंच खरं. विशेष गोष्ट ही की मुलांवर संस्कार जर करायचे असेल तर पालकांनी शिक्षकांना धमक्या देवू नये. शिक्षक काही विद्यार्थ्यांचे शत्रू नसतात की जे विद्यार्थ्यांचा जीव घेतील. शिवाय आजपर्यंतच्या काळात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा जीव घेतल्याची उदाहरणे आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा जीव घेतल्याची उदाहरणे नाहीत. हेही तेवढंच खरं. म्हणूनच पालकांची याच गोष्टी लक्षात घेवून शिक्षकांना अभय देवून विद्यार्थ्यांना निर्भयपणाने शिकवू द्यावे. जेणेकरुन विद्यार्थीरुपी लहान बालकं उद्याच्या उज्ज्वल देशाचे सक्षम नागरीक बनतील व देशाला विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर नेवू शकतील यात शंका नाही. महत्वपुर्ण गोष्ट ही की पालकांच्या धमक्या ह्या मुलात होणाऱ्या कुसंस्काराला बळ देत असतात. मुलांमध्ये कुसंस्कार फुलवीत असतात. ते होवू नये म्हणून पालकांनीच खबरदारी घेवून वेळीच जागं व्हावं व शिक्षकांना अपमानदायक वागणूक देवू नये. धमक्या तर देवूच नये आपल्या पाल्यांसमोर. जेणेकरुन पाल्यात सुयोग्य, सकारात्मक बदल होतील व पालकही संतुष्ट व प्रफुल्लीत होतील.
शारदेला शाळेत जे बाळकडू मिळाले होते. त्या बाळकडूचा तिला तिचं जीवन जगतांना फायदाच झाला होता. जेव्हा तिच्यासमोर एक मोठं संकट उभं राहिलं होतं.
ते संकटच होतं. मोठं संकट की तिचा विवाह अतिशय कमी वयात झाला होता. तशीच तिनं जी स्वप्न रंगवली होती आयुष्याची. ती स्वप्न. त्या स्वप्नांवर पाणी पडलं होतं. तिलाही वाटत होतं कि तिला शहरातील एक राजबिंडा मिळावा. परंतु काय करणार. तो राजबिंडा तिच्या जीवनात आलाच नाही. आला तो खेड्यावरील एक तरुण. जो स्वभावानं जरी चांगला असला तरी सुरुवातीला आवडत नव्हता.
दुधाचे ओठ सुकलेच नव्हते, त्या वयात. त्या वयात तिचा विवाह झाला व तिला गावात देण्यात आलं. त्यावेळेस पुर्ण अपेक्षा फोल ठरल्या. शिकायची इच्छा मावळून गेली. कारण ते जे गाव होतं. ते गाव शहरापासून कितीतरी दूर होतं. ना तिथं गाड्या जात होत्या ना पायी चालायला बरोबर रस्ता होता. कितीतरी दूर पायदळी रस्ता तुडवत जावं लागायचं. पावसाळ्यात तर हाल बेहालच होते. असं वाटायचं की घरातून बाहेर निघावंच नाही.
ते तिच्या पतीचं गावातील वास्तव्य. पती शिकला होता. त्याचं उच्च शिक्षण झालं होतं. तो नोकरीची वाट पाहात होता. परंतु देशात बेरोजगारी एवढी होती की नोकरी कुणाकुणाला मिळेल. शेवटी त्यानंही नोकरीचा नाद सोडला व तो शेती करु लागला.
शारदेला वाटलं होतं की माझ्याशी विवाह करणारा एखादा सुंदर राजकुमार विवाहानंतर माझ्या जीवनात येईल. जो नोकरीवर असेल व मला शहरातच राहायला मिळेल. परंतु तो तिच्या स्वप्नातील विचार होता. आता तिचा विवाह खेड्यात झाला असल्यानं तसाच तिचा पती शेतावर कामास जात असल्यानं तिलाही पदर खोचून पतीबरोबर कामावर जावं लागलं शेतात. आता ती शेतावर जात असे व शेतीतील बरीच कामं करीत असे.
शारदा विचार करायची की आपलं अख्खं आयुष्य असंच जाईल काय? विचारांती ती विचार करायची की आपण असं आयुष्य जगायचं नाही. आपण आपल्या आयुष्याला पालटवायचं. कलाटणी द्यायची आपल्या आयुष्याला. परंतु आयुष्यच ते. ते आयुष्य पालटंवायचं कसं? तिला पदोपदी विचार यायचा व ती विचार करायची. त्यावेळेस तिला तिचं बालपण आठवायचं व बालपणात शिक्षकांनी तिला पाजलेले बालकडू आठवायचे.

************************************************

ते बालपण. त्या बालपणात जे शिक्षक होते तिला शिकवायला. ते कडक होते. ते जेवढे कडक होते. तेवढेच ते प्रेमळ होते. ते आनंदच्याच गावाकडील शाळेत होते. एकदा ते आनंदला म्हणाले होते की मी तुमच्याच गावाकडील शाळेत शिकवीत होतो व तेथील अभ्यास मला आहे. मग काय, आपल्याच गावाकडील शिक्षक म्हणून आनंदला आनंद वाटायचा व माहेरचा व्यक्ती जसा नववधूच्या आयुष्यात येतो. तसंच आनंदला वाटलं व आनंद अतिशय मन लावून अभ्यास करु लागला. शिक्षक कडक होते. परंतु ते फक्त बुद्धू विद्यार्थ्यांसाठी कडक होते. हुशार विद्यार्थ्यांसाठी नव्हते. ते लाड करायचे हुशार विद्यार्थ्यांचा. एकदा सहावीला असतांना तिमाही परीक्षेत आनंदचा पहिला क्रमांक आला होता. तेव्हा मन भरुन शिक्षकांनी आनंदचं कौतुक केलं होतं. तेव्हा आनंदला भरुन आलं होतं.
जी गत आनंदची होती. तीच गत शारदेचीही होती. शारदेचाही असाच परिचय व संवाद झाला होता त्या शिक्षकांशी व त्यांनीच बाळकडू पाजलं होतं तिलाही आणि सांगीतलं होतं की जीवनात कितीही मोठं संकट का येईना. घाबरुन जायचं नाही. त्यामुळंच तिचा विवाह जरी खेड्यावर झाला असला तरी ती घाबरुन गेली नाही. ती हिरीरीनं काम करीत होती. अशातच ते पावसाळ्याचे दिवस आले.
ते पावसाळ्याचे दिवस. बाहेर धो धो पाऊस पडत होता. सगळा परीसर जलमय झाला होता. पावसानं अक्राळविक्राळ रुप धारण केलं होतं. काय करावं सुचत नव्हतं. तो पाऊस तब्बल आठ दिवस राहिला होता. सगळी पीकं करपून गेली होती. जवळचं होतं नव्हतं ते सारं वाहून गेलं होतं. आता शेतामध्ये दुसऱ्या बिजांचं बिजांकुरण करायला पैसा नव्हता. त्यातच कसेतरी उधार पैसे घेतले व शेतीची पेरणी केली.
दरवर्षीच पावसाळा यायचा व दरवर्षीच पावसाळ्यात पेरणी केली जायची व दरवर्षीच पावसानं शेतीची मोड व्हायची. दुबार पेरणी केली जायची. बरंच नुकसान व्हायचं. कधीकधी उपवासाचे फटके पडायचे. परंतु ते सगळं नुकसान सहन करीत शारदा आणि तिचा पती आयुष्य कंठत होते. तिचा पती कल्पक नव्हता तो जरी जास्त शिकला असला तरी. परंतु शारदा कल्पक होती. तिला वाटायचं की आपण आपलं जीवन बदलंवायचं. परंतु कसं बदलवणार. विचार होता. अशातच तिच्या मनात एक विचार चमकून गेला. तो विचार होता आपण शेतीच करु नये तर शहरात जावं. तशी ती शहरातील असल्यानं तिला करमत नव्हतंच. त्यामुळं तिचा विचार रास्त होता.
तो तिच्या मनातील विचार. तसा विचार तिनं केला. परंतु तिची हिंमत होत नव्हती. तो विचार आपल्या पतीसोबत शेअर करायची. अशातच ती संधी शोधत होती. तिनं सांगितलंही असतं आपल्या पतीला. परंतु तो रागावणार अशी तिला भीती होती. तशी तिला एक दिवस संधी चालून आली. तीच फार मोठी बाकी संधी होती.
तो पावसाळा. बाहेर धो धो पडणारा पाऊस. तो पाऊस आज साधारणतः आठ दिवसापासून सुरु होता. सगळी मंडळी घरातच होती. पावसानं तर एवढा कहर मांडला होता की काय करावं सुचत नव्हतं. दुष्काळानं एवढा दगा दिला होता की बिचाऱ्या लेकरांना उपाशीच झोपवावं लागलं होतं. तशी रात्र फार झाली होती. शारदेनं एक कटाक्ष आपल्या लेकरांकडे टाकला व तिच्या डोळ्यासमोरुन पाणी तराळलं. तसं तिनं ठरवलं. आता बोलायचं. हिंमत करायची. पतीसमोरच बोलायचं. म्हणायचं की आता पुरं झालं खेड्यात राहाणं. आता आपण शहरात राहायला जायचं.
शारदाचा तो विचार. त्यानंतर ती त्याच दिवशी संधी साधून आपल्या पतीला बोलली,
"आपण शहरात राहायला जावूया."
"का?"
"इथं माझा जीव घुटमळतोय."
"परंतु इथं शेती आहे आपली. आपली खास हक्काची. इथं आपलं पोट भरु शकतं. शहरात मी कोणती कामे करणार?" पती म्हणाला.
"कोणतंही काम करु. भीक मागू. पण शहरात जावूच."
शारदेचा तो आग्रह. शेवटी तिचा पती कंटाळला व कंटाळून जोरातच म्हणाला,
"शहर काय जादूची कांडी आहे की काय? की फिरवल्याबरोबर आपलं सगळं भागेल. कोण आधार देईल आपल्याला. कोणीच देणार नाही. त्यापेक्षा इथं राहाणं बरं."
ती गप्प झाली. तसा तिच्या पतीचा वाढलेला आवाज तिच्या सासूसासऱ्यांना ऐकायला आला. तसं काय झालं म्हणून ते पाहायला आले. त्यात त्यांना कळलं की सुनबाई शहरातील असून तिचा जीव या खेड्यात घुटमळतोय. तिला मोकळा श्वास घ्यायचा आहे कदाचित.
सासु सासऱ्यांच्या मनात शंका येताच सासऱ्यानं विचारलं,
"काय झालं सुनबाई?"
"..........." ती गप्प होती. तसा तिचा पती म्हणाला,
"तिला शहरात जायचं आहे."
तिचा पती बोलला. तसा थोडा वेळ शुकशुकाट होता. तसा सासरा म्हणाला,
"मग जाणं. तिलाही घेवून जा. मोकळा श्वास घ्या."
"ती अशी जायला तयार नाही."
"म्हणजे?"
"कायमचं जायचं आहे शहरात."
"मग जाणं. कायमचं जा. सुनबाईला करमत नसेल तर कायमचं जा."
"पण तुमचं? मी तुमचा एकुलता एक मुलगा. मग तुमचं काय आणि तिथं जावून काय गोटे खाणार."
सासरा विचारात पडला. थोड्या वेळाचा अवकाश. थोड्या वेळानं म्हणाला,
"मी समदं पाहून घेईल इथलं. तू चिंता करु नकोस."
सासऱ्याचं बोलणं संपलं. तशी ती म्हणाली,
"मामंजी, माझे आईबाबा आहेत. मी म्हटलं, त्यांच्या आधारानं जावू. पहिलं कमाई करु. परिस्थिती चांगली झाली की तुम्हाला घेवून जावू. जरा सांगा यांना."
शारदेच्या सासऱ्यानं ते सगळं ऐकलं. तसे ते म्हणाले,
"बरोबर तर बोलतेय सुनबाई. तू शहरात जा. या मातीत काहीच ठेवलं नाही. शेती पीकत नाही. लोकं आत्महत्याग्रस्त आहेत. कर्जावर कर्ज चढतं. तू शहरात जा. कमाई कर. मग आम्ही येतोच तिकडं."
ते सासऱ्याचे बोल. त्या बोलण्यानं शारदेला धीर आला व ती शहराकडं यायला तयार झाली. आता तिचा पतीही शहरात यायला तयार झाला होता.
शारदा आता शहरात आली होती. ती येथील वातावरणाशी स्वतःला जुळवून घेत होती. परिस्थिती तिची नाजूकच होती.
शारदा शहरात आली होती. परंतु तिनं आपल्या वडीलांचा सहारा घेतला नाही. ती आपल्या वडीलांच्या आधारानं जगली नाही. कारण ती खऱ्या अर्थानं स्वाभीमानी होती. शिवाय ती मोलमजूरी करीत होती आणि ताठमानानं जगत होती.
शारदेत कल्पकता होती. त्याच कल्पकतेच्या जोरावर तिनं ब्युटीपार्लरचा कोर्स केला. कारण तिला वाटत होतं. आपण दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं नाही. स्वतःच्याच ओंजळीनं पाणी प्यायचं. तिनं मोलकरणीचीही कामे केली. परंतु त्यातही स्वाभीमान होता. लाचारी नव्हतीच. दिवसभर ती कामे करायची व सांजच्याला ती ब्युटीपार्लरचा अभ्यासक्रम शिकायला जायची.
आज तिचा ब्युटीपार्लरचा कोर्स पुर्ण झाला होता. परंतु आता तिला व्यवसाय करायला भांडवल नव्हतं. काय करावं ते सुचत नव्हतं. परिस्थिती साथ देत नव्हती. ती लीला पाहात होती.
ब्युटीपार्लरचा कोर्स तर शिकून पुर्ण झाला होता. परंतु पुरेसं भांडवल नसल्यानं तिच्या त्या शिकण्याचा काही उपयोग नव्हता. तिचा पती शहरात आल्यानंतर कामाला जात होता. परंतु त्याचीही मजूरी अल्पच होती. तो शिकला होता. उच्चविद्याविभूषित होता. परंतु परिस्थितीमुळं त्या शिकलेल्या ज्ञानाचा काही उपयोग होत होता. तसं तिनं ठरवलं. आपण आपल्या मैत्रीणीला मदत मागावी.
योगीता.......तिची जीवलग मैत्रीण होती. तिनं योगीताकडं मदत मागीतली. तिला आपली परिस्थिती सांगीतली.
योगीता.......तिला शाळेत योगेश्वरी म्हटल्या जायचं. ती कॅप्टन होती शाळेत. अतिशय योग्यप्रकारे ती सर्व वर्गातील मुलांना सांभाळून घेत असे. शिवाय ती मदतही करीत असे सर्वांना. तिचं ऐकत असत सर्वजण.
योगीता शारदेच्या आईच्या घराजवळच राहायची. योगीता शारदेला अर्पू म्हणायची. कधीकाळी तिचा विवाह होण्यापुर्वी योगीताला शारदेनं मदत केली होती. योगीता अभ्यास करायला शारदेच्या घरीही जायची. दहावीचा अभ्यास दोघी मिळून पुर्ण केला होता.
शारदा आपल्या मायबापांनाही मदत मागू शकत होती. परंतु तिच्या स्वाभीमान आड येत होता. तिला आपल्या पायावर उभं राहायचं होतं, आईवडिलांची मदत न घेता. ती योगीताच्या घरी गेली. म्हणाली,
"योगीता, मला तुझी मदत हवी."
"मदत? बोल कशाची हवी आहे मदत तुला?"
"पण मी कशी सांगू. माझी हिंमत होत नाही."
"बोल. अगदी निःसंकोचपणे बोल. कशाची हवी मदत तुला?"
"पैशाची? पैशाची हवी आहे मदत मला. देशील का उसने पैसे? मी लवकरच परत करीन."
"पैशाची मदत हवी. किती हवेत?"
शारदेनं पैसे सांगीतले व योगीतानं अगदी निःसंकोचपणे शारदेला मदत केली. तेव्हा तर शारदेच्या डोळ्यात पाणी तराळलं होतं.
शारदेनं पैसे घेतले व ती घराकडे आली. त्या पैशातून तिनं लवकरच आपल्या घरी ब्युटीपार्लर उघडलं व व्यवसाय सुरु केला. त्या व्यवसायातून तिला चांगली कमाई होवू लागली. लवकरच तिनं योगीताचे पैसे परत केले व ती आपल्या व्यवसायाकडे लक्ष देवू लागली होती.
आज तिचा त्या व्यवसायात जम बसत चालला होता. परंतु एवढा पैसा त्या व्यवसायातून येत नव्हता की घर चालेल. तरीही ती त्यातून पैसा वाचवीत होती. तिचा पतीही कामाला जायचा. तिच्या पतीने कमविलेले पैसे तो बेरोजगारीवर मात करण्यासाठी वापरायचा. तो आवेदनपत्र भरायचा नोकरीचे. कारण त्याला नोकरी लागावी असं वाटत होतं. त्यामुळंच त्यांचा पैसा पुरत नव्हता. तसं पाहता तिची मुलंही शिक्षणाची झाली होती. मुलांचं नाव शाळेत घातलं होतं.
मुलं शिक्षणाची झाली होती. त्यातच घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळंच की काय दोघंही पती पत्नी कामाला जात असत. अशातच मुलांना शाळेत कसं पाठवायचं? कोण नेवून देणार हा प्रश्न होता. म्हणूनच की काय? मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांना शाळेत नेवून देण्यासाठी शारदेनं आपल्या सासू व सासऱ्याला आणलं. आता तिची सासू मुलांवर लक्ष ठेवू लागली होती.
सारे प्रश्न संपत चालले होते. परंतु परिस्थिती काही केल्या निवळत नव्हती. सासू साथ देत होती. सासराही मदत करीत होता. मुलांचं शिक्षण होत होतं. परंतु पैसा पुरत नसल्यानं प्रश्न होता. अशातच तो एक दिवस उजळला.
तो एक दिवस. त्या दिवशी अचानक पोष्टमेन दारात आला. त्यानं पत्र हातात दिलं व स्वाक्षरी घेतली. पत्र हातात मिळताच ते फोडलं. निरीक्षण केलं. पडताळणीही केली व तपासून पाहिलं. ते पत्र नोकरीचं होतं. शारदेच्या मिस्टरांच्या नोकरीचं ते पत्र होतं. त्यांना पुण्याला नोकरी लागली होती.
तो नोकरीचा आर्डर. ते स्वप्नच वाटत होतं तिला. परंतु नंतर कळलं आपण स्वप्नांच्या विश्वात नाही. आपण वास्तविक जगात आहोत. आपल्या मिस्टरांना नोकरी लागलीय.
तो पहिला दिवस. तोच तिच्या मिस्टरांच्या नोकरीचा. ते नोकरीवर रुजूही झाले नव्हते. पत्र हातातच होतं. तसं ते वाचताच डोळ्याला झरझर धारा लागल्या. एकीकडं दुःख होतं. ते दुःख की जे दुःख मागील गतकाळात भोगलं होतं आणि दुसरीकडं असं सुख येणार होतं की ज्या सुखाची तिनं कल्पनाही केली नव्हती. येथूनच तिचे दिवस पालटणार होते.
आता तिला आठवत होती ती तिच्या जीवलग मैत्रीणीनं तिला केलेली मदत. तिनं ऐन संकटाच्या काळात तिला मदत केली होती. तिनं केलेली मदत ती विसरु शकणार नव्हती. आता तिनं ठरवलं की आपले दिवस पालटणार. आपण आपल्या मैत्रीणीच्या समोर जाणार. पैशा पाण्यानं आणि सर्वच गोष्टीनं. परंतु आपण आपल्या मैत्रीणीला विसरु नये. जिनं ऐन संकटात मदत केली होती. तसाच दुसरा एक प्रसंग आठवत होता शाळेतील. ज्या बालपणाच्या वेळेस शाळेत असतांना तिच्या पायाला खरचटलं होतं व ती गंभीर जखमी झाली होती. त्यावेळेस घरच्या भावाबहिणीसारखं मित्रांनीच मदत केली होती. अभ्यासाच्या वह्या पुरवून. आज ते मित्र नसते तर कदाचीत तिला आपला डोलारा सावरता आला नसता.
लवकरच शारदेच्या मिस्टरांना नोकरी लागली व शारदेचे मिस्टर पुण्याला पोस्टींगवर रुजू झाले. नवनवीन असलेली शारदा पतीसोबत या गावी त्या गावी फिरत राहिली. त्यातच कधीकधी वेळेवर बदली व्हायची व मुलाबाळाच्या शिक्षणाची आबाळ व्हायची. मग ठरवलं आपण एकाच ठिकाणी स्थायी व्हायचं व तसं ठरवताच ती आपल्या जन्मगावीच कर्मभुमीत स्थायीक झाली. काही दिवस सुखात गेले. काही दिवस जाताच शारदेला वाटलं. आपलं शिक्षण अधुरं झालं. आपण शिकावं. उच्च शिक्षण घ्यावं व उच्च शिक्षीत व्हावं. तोच विचार अनुसरून शारदेनं आपल्या पतीला म्हटलं की मला शिकायचं आहे. उच्चशिक्षीत व्हायचं आहे. आपण परवानगी द्यावी. मग काय, ज्या पत्नीनं त्याला ऐन संकटाच्या वेळेस मदत केली होती. तिच्या शिक्षणासाठी ते परवानगी देणार नाही तर काय? त्यांनी परवानगी दिली व आज ती एम एस डब्लू करुन सोशल वर्कर बनली होती.
शारदेला शिक्षण शिकायची परवानगी मिळाली व ती एम एस डब्लू करुन सोशलवर्करही बनली. परंतु तिच्यासमोर पेच होता. तो पेच गतकाळातील घडलेल्या घटनांचा. आजही तिला आठवत होत्या त्या गतकाळातील घटना. अशीच एक घटना तिच्या डोळ्यासमोरुन तरळून गेली. ती घटना होती फॅशन डिझायनर अभ्यासक्रम शिकण्याची.
शारदेनं जेव्हा ब्युटीपार्लर उघडलं. तेव्हा काही पैसा वाचवून तिनं आपल्या पतीला ऑटो घेवून दिला. कारण तो जेव्हा कामाला जायचा. तेव्हा त्याला बरोबर काम लागायचं नाही. म्हणूनच ऑटो. शेवटी तो ऑटोचा धंदा चांगला चालायला लागला होता. परिस्थिती जेमतेमच होती. त्याच परिस्थितीत तिनं त्याला म्हटलं की तिला फॅशन डिझायनरचा अभ्यासक्रम करायचा आहे.
ती तिची जिद्द. ती जिद्द पाहून परिस्थिती जेमतेमच असतांनाही तिच्या पतीनं तिला जवळचे काही पैसे दिले व ते पैसे भरुन तिला कोर्स पुर्ण करता आला.
आज ते दिवस आठवले की शारदेच्या अंगावर शहारे येत होते. आयुष्यात आयुष्य जगतांना तिच्या काळजाला अगदी पीळ घालणारं वातावरण. त्यातून वाट काढत एक एक पाऊल पुढं टाकत शारदा भवसागर पार करुन जात होती.
ते शहरातील जीवन शारदेला लाभदायक वाटत होतं. आता तिची परिस्थिती सुधरली होती. तिला आज तिच्या या परिस्थितीत आनंद वाटत होता. वाटत होतं की असंच जीवन आपलं व्यवस्थीत सुरु राहावं.
शारदेची परिस्थिती पार बदलली होती. तिनं फॅशन डिझायनर अभ्यासक्रमाचा कोर्स केला होता. त्यातच ती अधिक श्रीमंत बनली होती. आता तिच्या जीवनात कोणताच दृष्काळ नव्हता. आता तिला आठवत होते, ते शेतीतील जीवन. तिला वाटत होतं की ज्या शेतीतून आपण दुष्काळाचा परिणाम अनुभवला. त्या शेतीत अधिक लक्ष द्यावं.
तो पती.......तो पती पुर्वी पुण्याला होता. आता तो जवळच्याच गावात आला होता. त्यामुळंच तिला आता आपल्या शेतीत लक्ष देता येत होतं. तसं पाहता आज बर्‍याच वर्षानं ती शेतीवर गेली होती.
शारदा शेतीवर गेली. तिनं पाहिलं की ती शेती. त्या शेतीत उंच उंच गवत वाढलेले होते. मोठमोठ्या बाभळी वाढलेल्या होत्या. शिवाय काही असेही झाडं होती की जी काट्याकुट्ट्यांची होती.
शारदेनं ठरवलं. ही आपली शेती. आपण या शेतीला स्वच्छ करावं. ती आपली माऊलीच आहे. त्या माऊलीची आपण सेवा करावी. तिला न्हाऊपिवू घालावं.
लागलीच विचारांची देवाणघेवाण तिच्या मनाला आकार देवू लागली. तिनं लागलीच त्या बाभळी कापल्या. त्यानंतर गवत कापलं. जागा स्वच्छ व साफसुथरी केली व त्या जागेवर एका कोपर्‍यात एक प्रशस्त बंगला बांधला. त्यानंतर तिनं त्याच बंगल्याच्या एका बाजूला एक विहीर खोदली. ज्यामध्ये पाणी भरपूर प्रमाणात होतं.
आज तिला शेती कराविशी वाटत नव्हती. परंतु शेतीशी नातं जपत होती ती. तिला शेती आवडत नव्हती. परंतु ज्या शेतीनं तिला दगा दिला होता. त्याच शेतीचं तिनं नंदनवन करण्याचं ठरवलं होतं.
ती शेती. ती शेती साफ करुन शारदेनं त्या शेतीत बागा विकसीत केल्या होत्या.
शारदेनं ठरवलं की आपण आपल्या शेतीबरोबरच इतरही ठिकाणाला वा इतरांच्या शेतीला सुगीचे दिवस आणावे. त्यासाठी प्रयत्न करावा.
तिनं तसं ठरवताच ती शेतीत सुधार करण्याचा विचार करु लागली. तसे हळूहळू तिला मार्गही सापडू लागले. शारदेला कधीकधी विचार यायचा त्याच तिच्या बेतलेल्या जीवनाचा. तिला आठवायचे ते शाळेतील मित्र.
शाळेतील ते धपाधपीचे चेंडू आठवायचे तिला. परंतु आठवण नव्हतं तिनं कोणावर केलेलं प्रेम. तिला प्रेम करावंच वाटलं नाही. कदाचीत ते प्रेम चांगलं वाटत नसावं तिला.
मायबापानं तिला चांगल्या गोष्टीच शिकवल्या होत्या आणि सांगीतलं होतं की प्रेम कुणावरही करशील नको विवाहापुर्वी. विवाहापुर्वी कोणाचंच कुणावर प्रेम नसतं.
चाकोरीबद्ध पद्धतीनं वागत असलेली शारदा. आपल्या जीवनात परिस्थितीचा सामना करता करता लहानाची मोठी झाली होती. तिनं पाहिलं होती अखिल आणि वर्षाचं झालेलं प्रेम. ते वृद्धिंगत चाललेलं प्रेम. परंतु त्याप्रमाणे वागणं तिला एकप्रकारचा गुन्हाच वाटत होता.

************************************************

आनंद मात्र शारदेसारखाच होता. त्याला वय होताच प्रेम करावसं वाटत होतं. परंतु करणार कुणावर. ज्या वयात मुलीवर प्रेम करु असा त्यानं विचार केला होता. त्याच वयात त्याला त्याच्या वडीलानं सांगीतलं होतं. बापू, पहिलं आपलं करीयर बघायचं. मुली तर भरपूर मिळतील. प्रेम लग्नापूर्वी होत नाही. खरं प्रेम हे विवाहानंतरच होत असतं.
तशी वर्गातील एका मुलीची गोष्ट. त्या मुलीला शेजारच्या वर्गातील मुलानं अगदी अलगद उचलूनच नेलं होतं. ती मुलगी आनंदचीच एक वर्गबहिण होती. त्याला ती सायकलवर बसवून नित्य न्यायची. कारण ते त्याच्या मित्राचं तिच्यासोबत असलेलं एकतर्फी प्रेम होतं. ते प्रेम तो घाबरट असल्यानं त्याला उजागर करता येत नव्हतं. तेव्हा तो मुलगा आनंदचा आधार घेवू पाहात होता. परंतु आनंदनं त्याला फटकारलं होतं. त्यातच जेव्हा तिनं आनंदच्याच समोर तिच्या मित्राला गळ्यातील साखळी बक्षीस म्हणून दिली. तेव्हा त्याला कळलं की माझी वर्गबहिण प्रेम ही दुसऱ्याच व्यक्तीवर करते. जो व्यक्ती आपल्याला पसंत नाही. एखाद्या वेळेस हीच आपली बहिण नक्कीच गोत्यात येईल. तसं पाहिल्यास त्याला तशा तरुण तरुणीच्या प्रेमाच्या गोष्टी आवडतच नव्हत्या, ना त्याच्या वर्गातील इतर मित्र कोण्या मुलीवर वाकडी नजर टाकणारे. शेवटी त्यानं त्या वर्गबहिणीचं तसं वागणं त्याला दिसताच तो मुलींच्या दूरदूर राहू लागला होता. जसा तो सातवीत असतांना सर्वच मुलींशी बोलायचा. त्यांच्यासोबत खेळायचा. आज आठवीत गेल्यावर व पुढं नववीत गेल्यावर त्यानं जे प्रेम पाहिलं आपल्या वर्गबहिणीला फसवणारं. त्यानुसार तो मुलींच्या सातफुट दूरच राहायला लागला होता.
आपलं हे वय प्रेम करण्याचं नाहीच असं ठरवून ती बहिण असलेली मुलगी आपली बहिण होवूच शकत नाही. असं त्याला वाटत असल्यानं त्याला राधेचं क्रिष्णासोबत झालेलं प्रेम आठवत होतं. परंतु राधेचा क्रिष्णासोबत झालेला विवाह आठवत नव्हता.
आनंदनं ठरवलं. आपण स्थितप्रज्ञ राहायचं. जावू दे जिला बहिण मानलं ती मुलगी गेली तर........आपण दुसऱ्या एका वर्गबहिणीचीच वाट पाहू.
तो वाटच पाहात होता वर्गबहिणीची. परंतु त्याला आजपर्यंत वर्गबहिण गवसली नव्हती. तसा तो वाटत पाहात होता. ज्याला तब्बल तीस वर्ष जावी लागली. ज्याला त्याच्या आयुष्यात रुख्मीनीसह सत्यभामाही भेटली होती. पण वर्गबहिण? ती मात्र कोसो दूरच गेली होती.
योगी शाळेत अख्ख्या वर्गाची कॅप्टन होती. आज तिनं ग्रुप बनवला होता व ग्रुपवर बोलता बोलता त्याची शारदेशी ओळख झाली. दोन तीन दिवस बोलणं झालं तर बोलता बोलता सहज लक्षात आलं की हिच ती मुलगी. जिची तो कितीतरी वर्षापासून वाट पाहात होता. जिच्यासाठी त्यानं तब्बल तीस वर्ष वाट पाहिली होती. ती अगदी एका झटक्यात मिळाली. आता त्यानं ठरवलं होतं शारदेलाच वर्गबहिण बनवायचं. परंतु एक विचार होता. खरंच शारदा आपल्या वर्गबहिणीच्या यादीत फिट तरी बसते का? त्यानं तिची ताबडतोब परीक्षा घेतली. ज्या परीक्षेत ती चपखल बसली व तद्नंतर त्यानं ठरवलं. आपण शारदेलाच वर्गबहिण बनवायचं. परंतु शारदा वर्गबहिण म्हणून आपल्याजवळ टिकणार कशी?
राधा दूर कोसावर निघून गेली होती क्रिष्णापासून. ती दुसऱ्याचीच झाली होती अनंतकालासाठी. आपल्याला थोडं ना राधा शोधायची आहे. आपल्याला बहिण शोधायची आहे, वर्गबहिण. जी राधेसारखी आपल्या डोळ्यासमोरुन ओझल होणार नाही. जी टिकून राहिल आयुष्यात अनादीकालापर्यंत. तसं वाटताच त्यानं शारदेलाच वर्गबहिण बनवलं व ती आपल्याच सदोदित डोळ्यासमोरच राहावी. म्हणूनच तो पुस्तक लिहू लागला तिच्यावर. उद्देश होता ती जरी दूर असली तरी ती पुस्तक रुपानं आपल्याजवळ राहिल एक वर्गबहिण म्हणून.

************************************************

सर्व मुलं पाचवीतून दहावीपर्यंत आले होते. सर्वांनी मस्त शालेय जीवनात मौजमजा केली होती. तसं नववीचं वर्ष आलं होतं. आनंद मात्र मुलींशी बोलत नव्हता. ती वर्गबहिण त्याला सोडून गेल्यानं. तशी एक मुलगी आनंदजवळ आली. म्हणाली,
"आनंद, जसा तू सातवीत असेपर्यंत आमच्याशी मनमोकळेपणानं बोलत होता. तसा आज का बोलत नाहीस?"
तो त्या मुलीचा प्रश्न. परंतु तो मौन बाळगून होता. तो त्या मुलीला काय उत्तर देणार. तो स्वतःच आपल्या वर्गबहिणीच्या दूर लोटविल्यानं त्रस्त होता. अशातच ती गोष्ट एका वर्गमित्राला माहीत झाली. त्यानंतर त्यानं त्याला बदनाम करायचं ठरवलं व त्याच्याच नावानं एक चिठ्ठी बनवली व तिला देवून म्हटलं,
"बापू खेड्यातून आलाय. जरा त्याची अशी मजा घे की तो घाबरायला हवा."
ती चिठ्ठी.......ती चिठ्ठी त्या मुलीनं घेतली व ती त्याचेसमोर आली. म्हणाली,
"सांग ही चिठ्ठी तूच लिहिली नं."
"नाही तर......."
"नाही, ही चिठ्ठी तूच लिहिली. मला माहीत आहे आणि आता याद राख. दुबारा अशी चिठ्ठी लिहिशील तर......."
ते त्या मुलींचं बोलणं. बोलणं संपलं होतं. परंतु ती आठवण अजूनही आनंदला येत होती. काट्यासारखी सलत होती त्याच्या डोळ्यात. कारण ती चिठ्ठी त्यानं लिहिली नव्हती तर त्याला बदनाम करण्यासाठी तो प्रकार त्या वर्गात जाणूनबुजून केल्या गेला होता. त्यानं कोणत्याही मुलींशी बोलू नये म्हणून.
आनंद घाबरला. त्यानं ती चिठ्ठी लिहिलेलीच नव्हती. तसं त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं हेही त्याला माहीत नव्हतं. आजही ते माहीत नाही. परंतु तो त्यावेळेस निश्चितच घाबरला होता अनुभव नसल्यानं. आज मात्र तो सक्षमपणानं उभा होता तटस्थपणानं.
आनंदलाही वाटत होतं की आपल्या वर्गमैत्रीणीशी वर्ग सातवीसारखं अगदी दिलखुलासपणानं बोलावं. परंतु त्या बोलण्याला कधीकधी वर्ग नववीसारख्याच मर्यादा येत होत्या. वाटत होतं की आताही त्याला कदाचित त्याच ग्रुपवर कोणी त्याच बनावट चिठ्ठीसारखं बदनाम तर करणार नाहीत. तसा त्याला दोन दिवसापूर्वीच फोनही आला होता आणि धमकीही. तसा तो त्याच फोनवर व धमकीवर विचार करु लागला होता की आताही राजकारण बदलतं की काय?
समाजात दोन प्रकारचे लोकं असतात. काही वाईट असतात तर काही चांगलेही असतात. आनंदचं जीवन असंच. त्याच्या जीवनात काही चांगलेही मित्र मंडळी आले की ज्या मित्रांची त्याला मदत झाली व काही शिकायलाही मिळालं होतं. तसंच त्याच्या शाळेतही तीच गोष्ट घडली. ज्यात काही मुलं आघाडीवर होती, ज्यात मुलींचाही समावेश होता, ज्यांनी त्याचं जीवन फुलवलं, घडवलदेखील होतं, तर काही वाईटही मित्र आले होते. ज्यांच्यामुळं त्याच्या जगण्यावरच अवकळा आली होती.
शारदा साधारण घरातील होती. परंतु तिचा मध्यंतरीचा काळ बराच वाईट गेला. त्यानंतर ती स्थिरावली व आज तिची परिस्थिती एवढी चांगली होती की विचारता येत नाही. घरी होणारी उपासमार थांबली होती तिच्या पतीला नोकरी लागल्यावर. त्यावेळेस आलेले आनंदाश्रू अजुनही आठवतात तिला. याउलट आनंदचं होतं. आनंदची परिस्थिती त्यावेळेस वाईटच होती.
आनंदचे मायबाप गरीब होते. शेती होती थोडीशी. ती बरोबर पिकत नव्हती. त्यामुळंच घरात विश्वकोटीचं दारिद्र्य होतं. त्याचे मायबाप निरक्षर होते. परंतु त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत झालं होतं. जेव्हा आजुबाजूची मुलं शाळेत जात.
आनंद लहान होता, तेव्हा त्याला शिक्षण म्हणजे काय हेही समजत नव्हतं. तो उनाडक्या करीत फिरायचा. परंतु तो उनाडक्या करीत फिरतो व आपणही घरी राहात नाही म्हणून त्याला शाळेत टाकलं. आता आनंद शाळेत जायला लागला होता.
ती गावची शाळा. लोकं म्हणतात की गावच्या शाळेत बरोबर शिकवलं जात नाही. परंतु ते चुकीचं असतं. ती गावची शाळा त्याच्या जीवनाला कलाटणी देवून गेली. त्याच शाळेत तो लेखन वाचन कला शिकला होता. तिथं एक शिक्षीका होती. ती त्याच्या अगदी जवळची होती. ती त्याला इतर मुलांसमोर चांगलं म्हणायची, कौतूक करायची. कौतूकाची थाप द्यायची. फार बरं वाटायचं त्याला. त्यानंतर तो स्वतःच अभ्यास करायला लागला. कारण त्या पुस्तकातील अक्षरं ना त्याच्या बापाला समजायचे ना त्याच्या आईला. त्यांच्यासाठी तर पुस्तकातील अक्षरे काला अक्षर भैस बरोबर असे होते.
आनंदला शहराच्या शाळेत टाकलं नसतं ना ही तो शहरातील शाळेत शिकू शकला असता. त्यामागंही एक कहाणी होती. आनंदच्या घराजवळ एक श्वान राहायचा. तसा घराजवळचा तो एक श्वान एका व्यक्तीनं पाळला होता. तो त्याला जेवन देत होता की नाही ते आनंदला माहीत नव्हतं. मात्र आताच्या परिस्थितीसारखी त्यावेळची परिस्थिती नव्हती. कारण आता शाळेतच मुलं जेवनाचा डबा नेत असतात. शाळा जवळची असली तरीही.
आनंदला मधली सुटी व्हायची, त्यावेळेस जेवायला तो घरी यायचा. त्यातच जे जेवन त्याची आई त्याच्यासाठी ठेवायची, ते त्याला मिळायचं. परंतु काही दिवसानंतर ते जेवन खाल्लेलं असायचं. जेव्हा ते आनंदच्या लक्षात आलं, तेव्हा आनंदनं ती गोष्ट आपल्या आईला सांगीतली. मग आईनं एक शिक्याची योजना बनवली व ती आता जेवन एका बादलीत ठेवून वर शिक्यावर ठेवल्यागत लटकावून ठेवू लागली. आता मात्र ते जेवन आनंदला जेवता येवू लागलं होतं. परंतु तो श्वानही काही कमजोर नव्हता. त्यानं कोणती योजना बनवली होती कुणास ठाऊक. तो आताही जेवनाचा डबा खावूनच टाकायचा. हळूहळू ती गोष्ट त्याच्या शिक्षिकेजवळ पोहोचली. शिक्षिका म्हणाली की त्याच्या आईनं त्याच्या जेवनाचा डबा शाळेत पाठवावा. मग काय आनंद आपल्या जेवनाचा डबा शाळेत नेवू लागला. परंतु त्या काळात शाळेत कोणीही जेवनाचा डबा आणत नसत. तिही लाजच वाटायची. शेवटी काय? तो कडकडीत दिवसभर उपाशी राहायचा. परंतु त्याला जेवन मिळायचं नाही.
काही दिवस गेले व काही दिवसानं मध्यान्हं जेवन म्हणून सरकारनं दूध देणं सुरु केलं होतं. मुलं मधल्या सुटीत ग्लास आणायला जात. आनंदही त्यात सहभागी होता. आता आनंदचा डबा श्वान खातो व त्याला उपाशी राहावं लागतं म्हणून त्याला दोन दोन ग्लास दूध मिळायचं. त्यामुळंच आता पोटाची चिंता नव्हती. ती मिटली होती.
आनंद आज चवथीत गेला होता. शिक्षणही चांगलं होतं. त्यातच पुढील शिक्षणही गावच्याच शाळेत होतं. तेही चांगलंच होतं आणि ती शाळाही नावाजलेलीच होती. जेवनाचा प्रश्न सुटलाच होता सातवीपर्यंतचा. कारण ती शाळा सातवीपर्यंत होती व सातवीपर्यंत दूध मिळणारच होतं. मुलंही हुशारच होते की ज्यात आनंदचाही समावेश होता. परंतु त्याला शहरात टाकण्यासाठी परिस्थितीनं असं कारण घडवून आणलं की ज्या कारणानं आनंदला शहरातील शाळेत टाकलं गेलं, ते कारण होतं आनंदची सुरक्षा.
आनंदच्या शेजारलाच एक व्यक्ती राहात होता. त्या व्यक्तीच्या घरी नुकतीच एक गाय विकत घेतली होती. तो आनंदच्या वडीलाचा द्वेष करायचा. केवळ भांडणं व्हायची घरातील जागेवरुन. ती बाब आनंदलाही माहीत होती. त्यालाही त्या व्यक्तीचा रागच यायचा. कारण भविष्यात ती जागा त्यालाच मिळेल असं वाटलं होतं. तसा तो एक दिवस अतिप्रसंग घडला.
आनंद आज घरी लवकर आला होता. आज त्याला लवकर शाळेतून सुट्टी झाली होती. दुपारचे चार वाजले होते, त्या दिवशी. तो व्यक्तीही घरीच होता.
आनंदाचे वडील शेतकरी होते. पावसाळ्यात गुराढोरांना चर्वण हवं म्हणून कडब्याच्या पेंढ्या वा वैरणाची सोय प्रत्येक शेतकरी घरी करुन ठेवत. आनंदच्याही घरी कडब्याच्या पेंढ्या होत्या व बाजूचा शेजारी व्यक्ती आनंदला कडब्याच्या पेंढ्या मागत होता. मात्र आनंदला माहीत होतं की त्या व्यक्तीशी त्याच्या वडीलाचं भांडण आहे. तो कसा काय त्यांना कडब्याच्या पेंढ्या देणार. त्यावरुनच वाद. तसं आनंदचं वय जेमतेमच होतं.
आनंदचं वय जेमतेमच असलं तरी त्याला माहीत होती अस्मिता. त्या अस्मितेनं त्यानं कडब्याच्या पेंढ्या द्यायला नकार दिला. परंतु ते त्याचं लहानसं वय. ते पाहून शेजाऱ्याला राग आला. त्याला एवढा राग आला की त्यानं चक्कं आनंदला मारलं व रात्री आपल्या बाबाला त्यानं सांगू नये म्हणून त्याला धमकीही दिली होती की त्यानं जर सांजच्याला वडीलांना सांगीतलं तर त्याला जीवच घेण्यात येईल. परंतु घटनाच ती. घटना कुठं लपणार. सर्व लोकांनी ती घटना पाहिलीच होती. जरी ती गोष्ट सांजच्याला आनंदनं त्याच्या वडीलांना सांगीतली नसली तरी त्यांना काही लोकांनी ती घटना सांगीतली होती. त्यामुळंच आनंदच्या वडीलानं ठरवलं की आनंदला शहराच्या ठिकाणी शिकवायचं. कारण आनंदला जर गावात ठेवलं तर द्वेषभावनेनं तो शेजारचा व्यक्ती कोणत्याही दिवशी आपल्या एकुलत्या एक मुलाचा जीवच घेवून टाकेल.
आनंदला शहरात टाकावं. आनंदच्या वडीलांचा निर्णय. तसे ते लखपती नव्हते की आनंदला एक स्वतंत्र्य किरायाचा कमरा उपलब्ध करुन देणार होते. ते शोधत होते आनंदच्या अधिवासाच्या गोष्टी.
आनंदचं नाव शहरातील शाळेत टाकावं हा तिढा सुटला होता. परंतु त्याला ठेवायचं कुठं हा तिढा सुटला नव्हता. अशातच गावचा एक मुलगा शहराच्या शाळेत शिकायला जाणार होता. त्याला वसतीगृहात टाकणार होते व त्याला वसतीगृहात टाकणार असल्याची माहिती आनंदच्या वडीलांनी ऐकली. त्यानंतर तशी माहितीही काढली व ठरवलं की आनंदला शहरातील शाळेत टाकावं व त्याच्या राहण्याच्या अधिवासाची सोय वसतीगृहात करावी. बस अधिवासाचा तिढा क्षणात सुटला व आनंद शहराच्या शाळेत दाखल झाला. जिथं शारदेसह सारीच मुलं मिळाली.
आनंद शहराच्या शाळेत आला. तो वसतीगृहात वास्तव्याला होता. त्याच्या गावच्या शाळेतील एका मित्राला अ वर्गात टाकलं होतं. आनंदला क वर्गात टाकलं गेलं होतं. आनंदला अ वर्ग आवडत होता. जावं कसं हा प्रश्न होता. कारण त्यावेळेस अ वर्गातील मुलं अधिक हुशार असतात. अशीच मान्यता होती तर ब वर्ग हा बदमाश वा बुद्धू तर क वर्गातील मुलं कच्ची अर्थात अति बुद्धूच असतात असंही मानलं जात होतं. ते लहान वय. त्या वयात काय समजायचं. त्यावरुनच अ वर्गात जाण्यासाठी एक कसरतच होती नव्हे तर आनंदसाठी एक आव्हानच. खरंच आनंदला अ वर्गात जाता आलं असेल काय? अन् गेला असेल तर कसा गेला असेल? हे प्रश्न कोणालाही माहीत नसतील. परंतु आनंदला पडलेला प्रश्न व त्याचं उत्तर त्यानं आपल्या कल्पकतेनं व हुशारकीनं सोडवलं. ज्यामुळं त्याचा संपर्क शारदेशीच नाही तर जया, पदमा, छाया, अमोल, संगीता, राजेश, गजानन आणि इतर साऱ्या मित्रांशी आला होता. तसाच तो विशेष म्हणजे जया, पदमा व छाया आणि संगीता यांच्यामुळेच घडला होता. शिवाय मुली कोणाला आवडत नाहीत. त्या मुली आनंदलाही आवडायच्या. त्या मुली त्याचं कौतुक करायच्या. त्याच्या केसालाही धक्का लागू द्यायच्या नाहीत. यात सिंहाचा वाटा पदमा आणि संगीताचा होता. याचा अर्थ असा नव्हता की मुलांचा त्याच्या घडण्यात व विकासात वाटा नसेल. साहित्यीक विकासात आघाडीवर अमोल आणि गजानन होता तर शैक्षणिक विकासात शैलेश व संगीताचा समावेश होता आणि भावनिक व मानसिक विकास पदमा, छाया व जयानं केला होता. आज ती सर्व मुलं विसरलीही असतील त्या विकासाच्या गोष्टी. ज्यांनी शारदा व आनंदला घडवलं. परंतु आनंद काही त्या गोष्टी आजही विसरला नव्हता. आज बर्‍याच दिवसानं पदमा व छाया मिळाली होती ग्रुपवर. आनंदनं प्रयत्नानं वारंवार विनंती करुन जया व पदमाला जोडायला लावलं होतं ग्रुपवर. त्याला स्वतःला आपलं अंतर्मन व्यक्त करायचं होतं जया, पदमा आणि छायाशी. परंतु त्या बोलत नव्हत्या आणि जया अजुनही आली नव्हती ग्रुपवर. ज्या त्रिकुटसह सर्वांनीच आनंद घडवला होता आणि घडवले होते शारदेसह वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं जीवन. जे आज मोठमोठ्या पदावरच नाही तर सुखात होते.
आज आनंद मोठ्या पदावर विराजमान झाला होता. तो त्याच्या या बालपणातील मित्रांमुळेच. त्यांचं विकासाचं व प्रेरणेचं प्रेम आणि माया तो विसरु शकत नव्हता. अन् विकासाचं ते प्रेम मिळालं त्याच्या अ वर्गात येण्यानं. कदाचित तो अ वर्गात आला नसता तर कदाचित त्याच्यातील आनंद घडला नसता यात आतिशयोक्ती नाही. तो अ वर्ग. अ वर्गात त्या त्याच्या मित्राला टाकलं होतं. जो गावात शिकत होता. तो काळ की ज्या काळात रसायनशास्त्र, जीवशास्त्र व भौतिकशास्त्र पाचवीपासून होतं. काही विद्यार्थ्यांना त्या विषयाचं स्वतंत्र्य पुस्तक होतं व अभ्यासक्रम जड होता. कारण तीन तीन विषय शिकावे लागायचे. ते कठीण काम होतं आणि ते कठीण काम वर्ग अ मधील विद्यार्थी करीत होते. तसंच ब आणि क वर्गात जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय एकत्रीतपणे शिकवल्या जात होते. त्याची एकच पुस्तक होती. जी शिकायला कठीण जात नव्हती. आनंद क वर्गात बसला होता. त्याचं नाव क वर्गात शिक्षकांनी टाकलं होतं.
साधारणतः पंधरा दिवस झाले होते. शिकवणी सुरु झाली होती. दोनचार धडेही झाले होते. त्यातच एक दिवस शाळेचा शिपाही वर्गात आला. विचारलं,
"कोणाला जीवशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र घ्यायचं आहे का? अ वर्गातील एक विद्यार्थी ते विषय शिकायला नकार देत आहे. ज्याला घ्यायचं आहे. त्यांनी अमूक अमूक शिक्षकांना भेटावं."
शिपायाचे ते बोल. त्यानंतर शिपाही चालला गेला. तशी मधली सुटी झाली.
मधली सुटी झाली. तेव्हापर्यंत कोणीही त्या शिक्षकापर्यंत गेला नव्हता ना कोणाच्या मार्फत निरोप पाठवला होता. मधली सुटी झाली होती. तसा मधल्या सुटीत आनंद त्या शिक्षकाकडे गेला. म्हणाला,
"सर, मला जीवशास्त्र, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र घ्यायचं आहे."
विषय भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र घेण्याचा नव्हता. विषय होता अ वर्गात बसण्याचा. तसं पाहिल्यास पहिल्याच दिवशी जे विद्यार्थी शाळेत हजर झाले होते, त्याच विद्यार्थ्यांना विचारण्यात आलं होतं की त्यांना ते तिन्ही शास्र घ्यायचे असेल तर त्यांनी सांगावं. त्यानुसार ज्यांनी ज्यांनी होकार दिला. ती मुलं अ वर्गात बसत होती. बाकीच्यांना ब आणि क वर्गात टाकलं होतं.
ते आव्हान. ते आव्हान पेलविण्याचं सामर्थ आनंदमध्ये सुरुवातीपासूनच होतं. त्याच जोरावर तो अ वर्गात दाखल झाला होता. तो आधीपासूनच चिकित्सक बुद्धीमत्तेचा होता. तो फक्त शिकायचा प्रत्येकच व्यक्तीपासून. मग ते लहानसं मुल का असेना वा त्याचा वर्गमित्र वा वर्गमैत्रीण का असेना. जसा क्रिष्ण बालपणापासून आपली सखी असलेल्या राधेपासून शिकला होता. तसाच आनंदही त्याच राधारुपी आपल्या सर्व वर्गमैत्रीणींकडून शिकला होता आणि सोबतीला ते गोकुळातील मित्रांसारखे वर्गातील मित्र होतेच.
समाजात जीवन जगत असतांना सर्वच मंडळी चांगली असतात असं नाही. काही लोकं नक्कीच चांगली नसतात. तसेच आनंदच्या वर्गातील विद्यार्थीही. ते विद्यार्थी चांगले नव्हते. काही चांगले होते. परंतु काही नक्कीच वाईट होते. आनंद ज्या शाळेत शिकत होता व तो शिकत असतांना त्याला एक प्रसंग आठवत होता. प्रसंग होता एका शिक्षकाचा.
ते हिंदी शिकविणारे शिक्षक. ते फार मारायचे. हिंदी विषारद होते ते. त्यातच हिंदी लेखन कसं करायचं. पेपर कसा लिहायचा? तेही सांगायचे. तसा एकदाचा प्रसंग. ते वर्गात फिरुन फिरुन शिकवायला लागले. तसे ते नेहमीच फिरुन फिरुन शिकवायचे.
तो दहावीचा वर्ग. ते शिक्षक वर्गात शिकवीत होते, तेव्हा अचानक शिकवीत असतांना ते पाठमोरे झाले व ते पाठमोरे होताच दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कपड्यावर स्याहीच फेकली. ते त्यांना कळलं. त्यानंतर त्यांनी तब्बल आठ दिवस शिकवलंच नाही.
ते शिक्षक. ते चांगले शिकवायचे. रागवायचे देखील. तसं पाहिल्यास ते चांगले शिकवायचे. विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण व्हावा म्हणून त्यांचा प्रयत्न असायचा. परंतु ते शिकवणं काही मुलांना खपायचं नाही व त्यातूनच घडलं स्याही फेकण्याचं प्रकरण. शिक्षकांनी वर्गात विचारलं होतं की स्याही कोणं फेकली. ते बहुतेक विद्यार्थ्यांना माहीत होतं. त्याचबरोबर ते आनंदलाही माहीत होतं. परंतु सर्वांनी ती माहीती दाबून ठेवली होती. मात्र त्या घटनेनं स्याही फेकणारेच नाही तर सर्वच विद्यार्थी घाबरुन गेले होते.
काही काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी नकळत आपल्या हातून घडत असतात. त्या कशा घडत असतात. ते कळत नाही. आनंद एक लेखक बनला होता त्या शाळेतील. त्यानं काही पुस्तकं लिहिली होती. परंतु ती पुस्तकं आज वाचतांना त्या पुस्तकाचं कथानक त्याच्या मनातून कसं तयार झालं हे त्याला कळत नव्हतं. तीच गोष्ट घडली शारदेच्याही बाबतीत.
शारदेची निरीक्षण शक्ती फार मोठी होती. तिची तिक्ष्ण नजर तिला भलतंच काही दाखवत होती. जणू तो इश्वराचाच संकेत होता.
वर्गात काही बेंच होते. त्या बेंचवर कोण कोण बसायचं हे ठरलेलं असायचं. राजेश बसत होता कुठेही. मात्र काही काही मुलींचा बसायचा बेंच ठरलेला असायचा. या सर्व जीवलग व जीवाभावाच्या मैत्रीणी होत्या शारदेच्या.
राखी, आरती व मालू या तिन्ही मुली एकाच बेंचावर बसायच्या. शारदेची तिक्ष्ण निरीक्षण शक्ती. तिनं न्याहाळलं होतं की राखी पाचवीपासून ज्याही बेंचावर बसायची. त्या बेंचवर राम नावाचा शब्द लिहायची. राम याला इंग्रजीत RAM म्हटलं जायचं. आर चा अर्थ इंग्रजीत राखी असा होता. ए चा अर्थ आरती असा होता व एम चा अर्थ मालू असा होता. तिनं दहावीपर्यंत राम लिहिणं सोडलं नव्हतं. हेही निरीक्षण शारदेनंच केलं होतं.
आज राखी जगात नव्हती. ती आरतीला आठवत नव्हती ना आठवत असेल मालूही. परंतु तिनं लिहिलेला राम शब्द आज तीस वर्षानंतरही शारदेला आठवत होता. जणू तिनं राम अक्षराचा वापर सहाही वर्ष केल्यानं रामानंच तिला आपल्या स्वतःत विलीन करुन टाकलं होतं.
आनंदला आठवत होते त्याला शिकविणारे शिक्षक. त्यांचं वागणं. तशी मुलं हुशारच होती व ती मुलं शिक्षकांनाही नावबोटं ठेवायला मागं पाहात नव्हती. शिक्षक शिक्षीका थोडे बोलतांना दिसले की नावबोटंच ठेवायची. त्यातच शाळेत एक शिक्षिका होती की जी ब वर्गाला शिकवीत होती. ती देखणी होती. ती सतत अ वर्गातील शिक्षकाशी बोलायची. आपल्या काही समस्या विचारायची. परंतु विद्यार्थी ते. ते कुणाला घाबरणार. ते त्यांच्यावर लांच्छनास्पद बोलायचे. परंतु ते त्यांना माहीत होवू न देता. असेच एक शिक्षक की ज्यांना डोक्यावर केस नव्हते. आता त्यात गुन्हा शिक्षकांचा नव्हता. गुन्हा होता निसर्ग किंवा अनुवांशिकतेचा. परंतु त्या शिक्षकालाही मुलं त्याचं नाव घेवून म्हणायची अमूक अमूक चॉटी हॉप. याचा अर्थ असा होता की त्या शिक्षकाच्या डोक्यावर अर्धे केसं आहेत व अर्धे केसं नाहीत.
विद्यार्थी जरी त्यांना नावबोटं ठेवत असले तरी शिक्षक त्यांना काहीही म्हणत नसत. उलट ते विद्यार्थ्यांचा लाडच करीत असत. त्यातूनच एक सक्षम पिढी घडणार आहे असंच चित्र त्यावेळेस जाणवत होतं.
आज आनंदला तब्बल तीस वर्षानंतर चित्र दिसत होतं. जी मुलं त्या शिक्षकांनी घडवली होती. विद्यार्थ्यांचं जीवन चांगलं व्यथीत व्हावं म्हणून. ते चित्र आज स्पष्ट झालं होतं. कारण आज तेच विद्यार्थी उत्तम प्रकारे पोट भरत होती. ते त्यांनी निःस्वार्थपणाने केलेल्या कार्याचं फलीत होतं. आज ते शिक्षक कुठे होते. हे त्यांना माहीत नव्हते. कदाचित त्यातील काही मरणही पावले होते. परंतु त्यांनी शिकविलेलं ज्ञान आजही विद्यार्थ्यांना जीवन जगण्यासाठी कामात पडत होतं. जरी त्यांना विद्यार्थ्यांनी दुषणं दिली होती तरी........
आज मुली तब्बल तीस वर्षानंतर भेटल्यावर मुलांमध्ये गतकाळातील तरुणाई आली होती. त्यांना वाटत नव्हतं की आपण म्हातारपणाच्या उंबरठ्यावर आहोत. ते सारेच भिडले होते बोलायला. तसं पाहिल्यास आनंदनं बोलकं केलं होतं सर्वांना. म्हणूनच ते बोलणं. गंमत घेणंही. कारण भावना व्यक्त होत होत्या त्यांच्या.
त्या मैत्रीणी व ते मित्र अगदी आनंदानं बोलत होते एकमेकांशी. दुःख जाणवू देत नव्हते. परंतु ते अंतर्मनातून दुःखी होते असं वाटत होतं त्यांच्या बोलण्यातून. मुलं तर बादशाहाच बनल्यागत दर्शवत होते. स्वतःला व्यक्त करीत होते.
ती बादशाही......ती बादशाही पाहून आनंदला वाटत होतं की मुलींसमोर बादशाहीपणा सोडून स्वतःच अहंपण दाखवू नये. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात व त्यांच्या विचारांचं स्वागत करावं. स्वतःच्या अंतरंगातच खुश होवू नये. कारण कुणीही आपलं दुःख दाखवत नाहीत. मग ते कितीही दुःख असलं तरी आपण आनंदीत आहोत असंच सांगतात. विशेष करुन मुली. कारण तसा एक किस्सा शालेय जीवनात घडला होता. तो किस्सा होता पादत्राणे न घालण्याचा.
आज आनंदची परिस्थिती सुधारली होती. परंतु ते बालपण. त्या बालपणात आनंदला आठवण होती काही विद्यार्थ्याच्या परिस्थितीची. ती परिस्थिती नाजूकच होती. आनंदची तर होतीच. त्यापेक्षा इतरही मुलं होती की जी अशाच नाजूक परिस्थितीनं त्रस्त होती. शिवाय आणखी काही मुली होत्या की त्यांचीही परिस्थिती नाजूकच होती. ती मुलं आपल्याच परिस्थितीनुसार वागत होती. त्यांना कधी बरोबर कपडे मिळायचे नाहीत तर कधी पायात चप्पल. ते कधी कधी अनवाणी पायांनी व फाटलेल्या वस्राला शिवून ते घालून यायचे. पण एक विद्यार्थी त्याही काळात असा होता की त्याची परिस्थिती चांगली असूनही तो अनवाणी पायानं शाळेत आला होता. तेव्हा पायात पादत्राणे न घालणं ही लाजीरवाणी गोष्टच वाटायची. जेव्हा तो शाळेत आला. तेव्हा प्रथमदर्शनी त्याला कोणी काहीही म्हटलं नाही. परंतु नंतर त्याला विचारलं तेव्हा त्याचं लक्ष त्याच्या पायाकडं गेलं व तो खजील झाला होता. त्याचं कारण होतं त्याचा अभ्यास. तो एवढा अभ्यासात गढून जायचा की त्याला भानच उरायचं नाही की आपण आपल्या पायात चप्पल घालावी की घालू नये. याबाबत एक थॉमस अल्वा एडीशनचा किस्सा आठवतो. त्यानं विजेचा शोध लावत असतांना तो कुठे आहे हे देहभान विसरला होता. ज्यातून आगगाडीला आगच लागली होती व त्याला रेल्वे नियंत्रण कक्षानं हाकलून दिलं होतं. शिवाय आपण काय करतो हे माहीत नसल्यानं त्यानं आपल्याच घरची धानाची चरत पेटवून दिली होती. आनंदचा तो मित्रही खऱ्या अर्थानं थॉमस अल्वा एडीशनची जणू बरोबरीच करीत होता.
आज वातावरणात उष्णता होती. शिशिर लागला होता. झाडांची पानं झडत होती. काही पानं झडणार होती. परंतु त्यांच्या जीवनात वसंत पुढं येणार होता. परंतु हीही गोष्ट दुर्लभ नव्हती की तब्बल तीस वर्षानंतर भेटलेल्या व शिशिराची चाहूल लागलेल्या या मुलांमध्ये आज वसंत फुलला होता व तो आव्हान देत होता की आम्ही आजचे शिशिर असलो तरी कालचे वसंतच आहोत. ते आपले दुःख विसरुन आज आपल्या जीवनात वसंत फुलवीत होते. शिशिर सुरु झाला असतांनाही........