आज सायली सकाळ पासून अस्वस्थ च होती. आठ दिवसांवर दिवाळी आली, पण दिवाळीच्या तयारीत तीच मन च लागत नव्हतं. आणि त्यात,
मुलं ही मागे लागले होते. बाजारात जाऊन कपडे,फटाके, दिवाळी
ची खरेदी करू? म्हणून. मुलांचा हट्ट. पण दरवर्षी प्रमाणे सायली उत्साही नव्हती.
का कोणास ठाऊक आज तीच मन जुन्या आठवणीत च रमुन गेलं, पहिला दिवाळ सण.....तिच्या डोळ्या समोर सगळ्या आठवणी एक एक करत येऊ लागल्या.
लग्ना नंतर ती ची ही पहिली दिवाली, सासूबाई सोबत, खरेदी करायला खूप उत्साहाने बाजारात गेली होती,सगळ्यांच्या आवड निवड लक्षात घेऊन खरेदी केली. कोणाला काय हवं . ते सगळ सासूबाई घेतलं.पण मला काय आवडत?
विचारलं च नाही.माझ्यासाठी म्हणून काहीच खरेदी केली नाही.
एकदा वाटलं आपण बोलव. आवडलेली साडी बद्दल. पण मला मात्र जाणवत होत माझ्या कडे मुद्दाम दुर्लक्ष होतंय.
त्यात त्यांची एकलूती एक लाडकी लेक, तीचा पण दिवाळ सण. मग तिच्या आवडीचं काय हवं नको.ते सगळे खरेदी केल त्याच वेळीस , एक सुंदर मोत्याची नथ सायली ला आवडली तिने ती नाकात घालून पहिली....
पण नको दोनदा हातात घेऊन परत ठेवली, आणि सासूबाई सोबत परत खरेदी ला लागली. असच दोन तीन दिवस खरेदी सुरु च होती.
मी माझ्या आवडीच्या रंगाचे कपडे बघायची, सासूबाई नां दुसरा च रंग आवडायचं.मग मीं परत ठेऊन दयायची.कदाचित माझी आवड त्यांना योग्य वाटत नव्हती.
तीनचार दिवसांच्या खरेदी नंतर .घरातली सम्पूर्ण तयारी. पुजेची , रांगोळी.डेकोरेशन. दिवाळीचा फराळ.घरातील साफ सफाई. नं थकता नेटाने उत्सहाने...
सगळं व्यवस्थित पणे शिस्त ने करायच्या.मला जमेल तशी मी मदत करायची.आणि सासूबाई सांगितलं ते सगळे काम करायचं प्रयत्न सुरु होता. आणि त्यांच्या हातात खाली....
हळूहळू मी शिकत होती. घराच्या जवाबदाऱ्या ही.आणि दिवाळीचा लक्ष्मीपूजन चा दिवस आला. सकाळ पासून कामाची घाई गडबड.
दिवाळीच लक्ष्मी पूजन पण
झालं,नणंद,
नणंदेच सासरचे, जावई सगळे जण आले होते.दिवाळ सणाला.
दुपारच्या जेवणाची सगळी जय्यत तयारी झाली. नणंदेचं आवडते सगळेच पदार्थ बनवून झाले. खास करून. तिला आवडत तेच.
आणि सगळे जेवायला बसले. सासूबाई नीं माझं आणि अवी च पान ही सोबतच वाढल. नाही नाही म्हणत सासूबाई नी अवी ला मला पहिलं दिवाळ सण म्हणून त्यांच्या सोबत आम्हाला जेवायला बसवल.
ताटा भोवती रंगोली. आणि सुगंधित उदबती. आणि वेगवेगळ्या पदार्थ चा सुवास मनं कस भरून गेल होत. आणि आम्ही सगळे जेवायला बसलो.
नणंदेच्या पानात तिला आवडती म्हणून खास ओल्या नारळच्या करंज्या घरी केलेल्या. आणि सुरळीच्या वड्या. वाढल्या. नंतर..
सासूबाई नी माझं ही पाना वाढलं.माझ्या आवडीचे पदार्थ चिरोटे आणि पनीर ची भाजी वाढली. आणि हळूच मायेने माझ्या पाठीवरून हात फिरवत आरामात जेव. तूझ्या आई बनवते तशी नसेल जमली मला पण. तुझी आई ज्या प्रेमाने तूझ्या करिता बनवते त्यांचं प्रेमाने भाजी बनवली" आहॆ मीst
आणि मला काही च कळत नव्हतं. सासूबाई नीं हें सगळे पदार्थ केव्हा बनवले? , त्यांना कशी कळली माझी आवड?
सगळ्यांचे जेवण आटोपले. आणि हात धुवायला उठणार. तेवढ्यात सासूबाई नीं हातात हलदी कुंकू घेऊन आल्या नवीन कपडयांना हळद कुंकू लावून मला आणि नणंदेला एका ताटात दिवाळीचा आहेर दिला .
मीं तो आहेर हातात घेतला.हातात धुवून. सासूबाई च्या पाया पडली नंतर आहेर उघडून पाहिला. आणि माझ्या डोळ्यात पाणी च आलं.
दिवाळीचा खरेदी करताना मला आवडलेली पर्स आणि अजून काही गोष्टी होत्या.
सोबत माझ्या आवडीचा रंगाची ची साडी आणि दुकानात आवडलेली मोत्याची नथ पण मला घेऊन दिली.......पण मला मात्र काही च कळू दिल नाही. थांब पत्ताही लागू दिला नाही. किती सहजतेने सासूबाईंनी माझी आवड जपली.
आणि दर वर्षी मला त्या एक नवीन साडी आठवणी नीं दिवाली ला आवर्जून घ्यायचंय. गेले दहा वर्ष त्यांनी दिलेली साडी माझ्या मानाचा ताज होता. घरच्या लक्ष्मीचा मान होता. आणि नात्यातलं प्रेम होतं.
लक्ष्मी म्हणून..कागदी नोटा, पणत्या, दागिने, झाडू, वही पेन,सगळ्यांची पूजन करायचं. निर्जीव आहेत माहित असूनही मग मग घराच्या गृहलक्ष्मी च पूजन का नाही करायचं?
म्हणूनच दिवाली ला घरच्या लक्ष्मी चा मान तेवढ्या च मोठा अश्या विचाराच्या त्या होत्या. त्यांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजन चा अर्थ घराच्या स्त्रियां चा मान. म्हणजे लक्ष्मी चा सन्मान असा होता.
आणि त्यांची ही परंपरा आणि विचार दिवाळी सणाचा अर्थ सांगतो.
आणि सायली आठवणीतून बाहेर निघाली, आज तिच्या सासूबाई तिच्या सोबत नव्हत्या. त्याना जाउन आता एक वर्ष होईल. आणि ही दिवाली आता सासूबाई नं शिवाय मनावायची.आणि तीही आता....
एक एक काम उरकायला लागली आणि दिवाळीच्या तयारीला लागली.बघता बघता दिवाली चा
लक्ष्मी पूजनाचा दिवस आला.घरात पूजा झाली. मुलांनी फटाके उडवले. फराळाचे पदार्थ बनवले नवीन कपडे घेतलं मुलांसाठी .
आणि नेहमी प्रमाणे सासऱ्या ती च्या पाया पडायला त्यांच्या खोलीत गेली.
सासऱ्यांनी तिला आशीर्वाद दिला.दिवाळीचा शुभेच्छा दिल्या आणि कपाटात ठेवलेली साडी
तिच्या हातात दिलेली , तिला आवडती ती मिठाई ही तिच्या हातात ठेवली.
सायली च्या डोळ्यात पाणी आलं तिचे अश्रू अनावर झाले.
. तुझी सासू नाही ज्या जगात. पण तिने मला सगळं शिकवलं, व्यवहार आणि घराच्या गृहलक्ष्मी चा मान कसा जपायचा. आणि तिचा सन्मान कसा ठेवायचा.
जिथे गृहलक्ष्मी चा आदर असतो तिथे लक्ष्मी चा वास असतो. तिची ही शिकवण आणि परंपरा आज मीं जपतोय आणि तिचा हया घरातल आदर असाचं कायम असावा.
तिची परंपरा आहे ही तीच मी पूर्ण करतो.ती नसली तरी हया जगात तरी पण तिच्या हया परंपराने ती कायम आपल्या जवळ च आहे.
आणि पुढे तुला ही परंपरा जपयाची आहॆ.
घरात आलेली नवीन सून तिला समजवून घ्यायचं आहॆ. तूझ्या सासूने तुला सून म्हणून कधीच अंतर दिल नाही आणि तू पण तिला सासू म्हणून कधीच समजलं च नाही. माय लेकीचं हें नात्यांची" परंपरा "तुला पुढे सांभाळ्याची आहॆ.
ही कथा काल्पनिक असली तरी नातं जपणारी आहॆ. आईची जागा कोणाला ला देता येत नाही सुनेला मुलगी समजण शक्य च नाही पण अशक्य च नाही. दृष्टिकोन बदलता आला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता आला पाहिजे. एकमेकींच्या चुका सहजपणे सांगता आला पाहिजे . आपली चूक असेल तर ती मान्य करून मोठ्या मनाने माफ करून आपला आयुष्य सुकुर करता येते. आणि आनंदी पण...
नात्यांत एकमेकांना समजवून घेतलं. तर घराच वृंदावन होईल.आणि काही चांगल्या परंपरा आपण च निर्माण करायच्या.
l