Kimiyagaar - 17 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 17

Featured Books
Categories
Share

किमयागार - 17

तो व्यापाऱ्याचा निरोप न घेताच निघाला. त्याला इतर लोक तिथे असताना रडणे नको होते. त्याला या जागेची आणि इथे शिकलेल्या गोष्टींची नेहमीच आठवण येणार होती. आता त्याला पहिल्यापेक्षा जास्त आत्मविश्वास आला होता. आणि आपण जग जिंकू शकू असे त्याला वाटत होते.
किमयागार -शकुन की योगायोग?
तो मनात म्हणाला, ' पण मी तर मला माहित असलेल्या ठिकाणी चाललो आहे. माझ्या कळपात परत जाऊन मेंढ्यांची काळजी घेणार आहे.'
हे जरी तो मोठ्या खात्रीने बोलला असला तरी तो त्याच्या निर्णयाबाबत समाधानी नव्हता. तो जे स्वप्न खरे करण्यासाठी वर्षभर झटला होता, ते आता त्याला विशेष महत्वाचे वाटत नव्हते. कारण खरेतर ते त्याचे स्वप्नचं नव्हते.
खरेचं क्रिस्टल व्यापाऱ्याप्रमाणे वागणे योग्य आहे का?. मक्का येथे कधीच जायचे नाही पण जीवन तेथे जायचे आहे असे म्हणत घालवायचे!
तो स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होता, विचारात गढून गेला होता.
पण ज्या क्षणी खिशातले उरीम थुम्मीम हातात घेतले त्याचक्षणी राजाची इच्छा शक्ती व ताकद त्यांच्यामध्ये आल्या सारखे त्याला वाटले. योगायोगाने किंवा हा पण एक शकून असावा, तो त्याच हॉटेल मध्ये पोहचला होता जिथे तो पहिल्या दिवशी गेला होता. तो चोर तिथे नव्हता. हॉटेल मालक चहा घेऊन आला.
किमयागार -विचारचक्र -
मुलाच्या मनात विचार आला की, आपण मेंढपाळ होण्यासाठी कधीही परत जाऊ शकतो.
मी मेंढ्यांची काळजी कशी घ्यावी हे शिकलो आहे आणि ते मी कधीच विसरणारही नाही. पण मला इजिप्त मधील पिऱ्यामिडला जाण्याची परत संधी मिळेलच असे नाही. म्हाताऱ्या राजाच्या अंगावर सोन्याचे जाकीट होते. त्याला माझा भूतकाळ माहित होता.
तो खरेच चांगला व बुद्धिमान राजा होता.
अंदालुसियाच्या टेकड्या फक्त दोन तासांच्या अंतरावर होत्या तर पिऱ्यामिड पर्यंत पोचण्यासाठी संपूर्ण वाळवंट पार करावे लागणार आहे.
मुलाला वाटले की, याकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहू शकतो, आपण खजिन्यापासून फक्त दोन तासांच्या अंतरावर आहोत. आता हे दोन तास म्हणजे एक वर्ष ठरले ही वस्तुस्थिती आहे.
मला माझ्या कळपाकडे जायचे आहे हे खरं आहे. मी मेंढ्यांना चांगले ओळखतो आणि त्यांच्याशी माझी चांगली मैत्री होते.
आणि एकीकडे वाळवंटाबद्दल मला माहिती नाही.
वाळवंट मित्र होउ शकते का?. आणि अशा या वाळवंटात मला खजिना शोधायचा आहे. मला जर तो सापडला नाही तर घरी कधीही परत जाता येईल.
आता माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत व वेळ पण, मग कां नको?. त्याला अचानक समाधान वाटू लागले.
तो मेंढपाळ कधींही होऊ शकत होता , तो परत क्रिस्टल विक्रेता बनू शकत होता. जगात अनेक गुप्त खजिने असतील. पण त्याला एक स्वप्न पडले होते. त्याची राजाची भेट झाली होती.
" असे प्रत्येकाच्या बाबतीत घडत नाही !"
किमयागार -नवीन योजना
मुलगा हॉटेल मधून बाहेर पडताना त्याच्या मनात काही योजना आखत होता.
त्याला आठवले की क्रिस्टल व्यापाऱ्याला माल देणाऱ्या व्यापाऱ्यांपैकी एक व्यापारी वाळवंटातून जाणाऱ्या तांड्यांकडून माल वाहतूक करित असे.
त्याने उरीम, थुम्मीम हातातचं ठेवले होते, कारण त्यांच्या मुळेच तो परत एकदा खजिन्याच्या दिशेने वाटचाल करणार होता. राजा म्हणाला होता की, " जेव्हा एखादा माणूस आपले भाग्य आजमावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मी नेहमीच त्याला सहाय्य करतो."
तो विचार करत होता की , त्या व्यापाऱ्याला जाऊन विचारावे ' पिऱ्यामिड खरेच किती दूर आहेत?'.
किमयागार -इंग्रज व्यापारी
तो इंग्रज व्यापारी एका गोदामवजा गोठ्यात बाकावर बसला होता. तिथे धूळ व घाणीचे साम्राज्य होते.
तिथे प्राण्यांचे वास येत होते.
तो एक केमिकल जर्नल वाचत विचार करित होता, मला कधीचं वाटले नव्हते की, मी या अशा जागेत पोहोचेन.
दहा वर्षे विद्यापीठात शिकल्यानंतर या गोठ्यात बसलो आहे.
पण जीवन असेच असते. त्याचा शकुनांवर विश्वास होता. त्याच्या जीवनाचे ध्येय सृष्टीची भाषा शिकणे होते. त्याने प्रथम एस्परांटो भाषेचा अभ्यास केला होता. आता तो रसविद्येचा अभ्यास करत होता.( तांबे वगैरे मेटल पासून सोने बनवणे. ) पण अजून किमयागार बनला नव्हता.
तो अनेक गुढ प्रश्नांची उत्तरे शोधण्यात यशस्वी झाला होता. त्याने किमयगारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणी त्याला मदत करण्याची तयारी दाखवली नाही. कदाचित ते "परीस" शोधण्यात अयशस्वी ठरले असतील.