illusion in Marathi Horror Stories by सागर भालेकर books and stories PDF | मायाजाल

Featured Books
Categories
Share

मायाजाल

मायाजाल


ही कथा काल्पनिक असून ह्याचा योगायोगाशी काहीही संबंध नाही आहे. आणि त्यामुळे माझा अंधश्रद्धा पसरवण्याचा काहीही हेतू नाही. 

        आज अमावस्या होती आणि अशोकच्या आईने घरावरून नारळ ओवाळून काढला आणि तो तिट्यावर जाऊन फोडला. आता तुम्ही म्हणाल, अशोक म्हणजे कोण? अशोक हा २५ विशीतील मुलगा. पातळ केस, उंच बांधा, रंग गोरापान, दिसायला देखणा आणि हुद्दयानें तलाठी होता. कमी वयातच त्याने खूप यश मिळवले होते. आई व वडिलांची अभिमानाने मान त्याने आपल्या कर्तृत्ववाने उंचावली होती. आणि ह्या गोष्टीचा त्या दोघांना खूप गर्व होता. त्यामुळे गावातील लोक त्याला आपुलकीने मान देत असे. त्याचे आई वडीलही गरीब परिस्थितीतून वरती आले होते. त्यांनी अशोकलाही ह्या गोष्टीची जाणीव करून दिली होती, की खडतर परिस्थिती वर मात करून आपण आपली आयुष्याची लढाई जिंकायची असते.अशोकला एक भाऊ आणि एक बहीण. मोठ्या भावाचे लग्न झालेले तो आपल्या वडिलांना शेतीकामात मदत करत असे. दुसरा अशोक त्याच्याही लग्नाचा ह्या वर्षी बार उडवायचा बेत होता. त्याला शोभणारी, साथ देणारी, घराला एकत्र ठेवणारी मुलगी अशोकचे आई व वडील शोधत होते. आता तिसरा नंबर होता तो अशोकच्या बहिणीचा. ती अगदी खट्याळ, मस्तीखोर पण तेवढीच जिद्दीने अशोकच्या पावलांवर पाऊल ठेवणारी होती. आणि अभ्यासात खूप हुशार. 

       रात्रीची वेळ होती. अशोकची आई आणि वाहिनी जेवण करण्यामधे व्यस्त होते. कारण खूप दिवसांनी अशोक आज घराकडे येणार होता. त्यानिम्मतीने त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले जात होते. विशेषतः जिलेबी. जी त्याला अतिशय प्रिय अशी होती. लहानपणी तो चोरून जिलेबी खात असायच्या. तेव्हा वडिलांनी बहुतेक वेळा त्याला पकडले होते. वडिलांनी त्या गोष्टीवरून त्याला खूप वेळ सुनावले होते. पण त्याने कधीच चोरून जिलेबी खाण्याचा अट्टाहास सोडला नाही. पण त्याना त्याच्याबद्दल प्रेम आणि जिव्हाळाही तितकाच होता. रात्रीचे दहा वाजले होत अजूनही अशोकचा काही पत्ता लागत नव्हता. सर्व जेवणासाठी अशोकची आतुरतेने वाट बघत थांबले होते.अशोकच्या आईच्या मनात विचित्र घालमेल सुरू होती. कारण संध्याकाळी तिने दिवा लावला पण तो सारखा विझत होता.म्हणून त्याविचारत तिला आठवले फोन लागला तर सांगा. उशीर झालेला चालेल पण shortcut नको धरुस.वडील अशोकला सारखे फोन करत होते. काही केल्या फोन लागत नव्हता.थोड्यावेळेने त्यांनी परत प्रयत्न केला, तेव्हा फोनची रिंग वाजली. आणि अशोकने फोन उचलला. 

" अरे! अशोक कुठे आहेस. सर्व तुझी वाट पहात आहे.".कधी येणार आहेस.
" बाबा मी आता निघालो आहे. इथे मोबाईलला नेटवर्क नसल्याने मी फोन करू शकलो नाही. सॉरी मला यायला अजुन ३ तास तरी लागेल". वडिलांनी अशोकचा हा निरोप घरच्यना सांगितला. त्यामुळे सर्वजण हिरमुसले.पण वडिलांनी आईचा निरोप सांगण्यास विसरले.


       पाऊस खूप मुसळधार पडत होता.अशोकची गाडी भरधाव वेगाने घराकडे येण्यासाठी निघाली होती. अशोकने घरी लवकर जाण्याच्या नादात नेमका shortcut रस्ता पकडला होता. का कोणास ठाऊक अशोकला आज खूप विचित्र वाटत होते. जणू काही भल्या मोठ्या रस्त्यावर तो एकटाच गाडी चालवत आहे. रस्त्यावर पूर्ण गडद अंधार, काळोख होता. आणि रस्त्याच्या दुतर्फा उंच आणि मोठाले झाडे जणू अशोकला डोकावून पाहत आहे असा अशोकला भास होत होता.तेव्हाच अशोक च्या मोबाईल ची रिंग वाजली. तो मोबाईल घेणार तितक्यात तो हातातून निसटून खाली पडला. मोबाईल उचलण्यास खाली वाकला तोच त्याला धम्म असा आवाज ऐकू आला आणि तितक्यात त्याने गाडीचा जोरात ब्रेक दाबला. बघतो तर काय समोर एक मुलगी तिच्या सामान सहित पडली होती. ती दिसायला देखणी, गोरीपान, लांब केस, घारे डोळे, ओठाला लाल लाली, सारी घातलेली होती. अशोक गाडीमधून ऊतरून तिला मदत करण्यास पुढे सरसावला. बघतो तर काय तिच्या पायामधून भरपूर रक्त वाहत होते. हे पाहून अशोक खूप घाबरला. त्याने तिला उचलण्यास मदत केली आणि सामान सहित तिला गाडीत बसण्यास सांगितले. ती काही न बोलता गाडीत बसली. ती ज्या जागेवर बसली होती तिथून गाडीचा आरसा स्पष्ट दिसत होता. आरशात तिची प्रतिमा दिसत नव्हती. हे घाई गडबडीत अशोकच्या लक्षात आले नाही. त्याने आपली गाडी थेट इस्पितळात थांबवले आणि तिला हॉस्पिटलध्ये admit केले.
    आता अशोक बरोबर जी मुलगी आहे ती नक्की कोण आहे. आणि अशोकच्या आईची घालमेल ह्याचा काही संबंध आहे का?

दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहचतात आणि मलमपट्टी करून थोडा वेळ तिथेच डॉक्टरच्या सल्यानुसार बसतात. नंतर ती मुलगीच विषय काढते, माझं घर इथून भरपूर लांब आहे तर आता मी माझ्या घरी कशी जाऊ. त्यावर अशोक म्हणतो, तुझी हरकत नसेल तर आजच्या रात्री माझ्या घरी थांबू शकतेस. माझी पूर्ण फॅमिली असते माझ्याघरी. तुला तिथे कसलाही त्रास होणार नाही. ती त्याच प्रतीक्षेत असते, आणि तिच्या चेहऱ्यावर मोठे स्मीतहास्य दिसू लागते. त्यानंतर अशोकच्या आधाराने ती मुलगी गाडी मध्ये बसते. आणि दोघेही घरचा रस्ता गाठण्यास सुरुवात करतात.


"माफ करा, मी तुमचं नाव विचारायला विसरलो".

"मोहिनी"

वाह! तुमच्या रूपाप्रमाणे तुमचं नावं देखील घायाळ करणार आहे.

"धन्यवाद, तुम्ही पण खूप चांगले आहात, नाहीतर एखादा असता तर माझी मदत करण्यास सुद्धा पुढे आला नसता."

अशोक विचारतो, तुम्ही कुठे राहतात. त्यावर मोहिनी आपली दयनीय कथा सांगण्यास सुरुवात करते.

की मी सध्या एकटीच राहते, त्या जुन्या डोगरापलीकडे. घरावर भरपूर कर्ज आहे. माझे आई वडील एक कार अपघातात मुर्त्यमुखी पडले. परंतु आमच्यावर कर्ज असल्याकारणाने नातेवाईकांनी आमच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. त्यामुळे मला कित्येक प्रसंगाचा एकटीने सामना करावा लागला. अशोक आणि मोहिनी बोलण्यामध्ये एवढे गुंग झालेले असतात, की पाठीमागून येणाऱ्या गाडीचा विसर पडतो. तेव्हाच पाठीमागून एक हॉर्न ऐकायला येतो. अशोक त्यांची गाडी बाजूला थांबवतो आणि मागील गाडीला पुढे जाऊन देतो. ती गाडी पुढे जात असताना, त्यातील गृहस्थ बोलतो, अरे, काय माणूस आहे एकटाच बडबडतो आहे आणि गाडीसुद्धा किती हळू चालवतो आहे. त्यावर अशोक विचार करतो असं कसा बोला असेल तो गृहस्थ. त्यावर मोहिनी बोलते, लक्ष नका देऊ आणि स्मितहास्य करते.

थोड्यावेळाने दोघेही घरी पोहचतात.सर्वांच्या चेहऱयावर प्रश्नचिन्ह दिसते. पण त्याआधीच अशोक आपल्याबरोबर घडलेला प्रसंग सांगतो. त्यावर घरातले अचंबित होतात, आणि विचारतात कुठे घडला हा प्रसंग.ह्यावर अशोक म्हणतो, शॉर्टकट रस्ता, टेकडीच्या अलीकडे. त्यावर घरातले घाबरतात आणि म्हणतात, की तिथे हडाळचा सहवास असतो म्हणून. अशोकने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. आणि मोहिनीला घेऊन तो त्या घरात आला.

चला, दोघेही हातपाय धुवून घ्या आणि देवाचं दर्शन घेऊन जेवायला बसा.मोहिनीने ह्या सर्व प्रसंगाकडे दुर्लक्ष केले आणि आजाराचं कारण सांगून बेडवरतीच झोपून राहिली.आई जेवणाचं ताट घेऊन मोहिनीच्या रूममध्ये गेली, तेव्हा बघते तर,काय त्याठिकाणी मोहिनी दिसण्याऐवजी पाल दिसली. ते पाहून आई घाबरली आणि ताट टेबलावर ठेवून पळाल्या.

अशोक अशोक करत आई ओरडू लागली. अशोकने आईला विचारलं "काय झालं एवढं घाबरायला"??

तेव्हा ती म्हणाली, अरे मोहिनी त्या रूमध्ये दिसत नाही आहे. तिच्याऐवजी मला भलीमोठी पाल दिसली.

अगं, आई असेल इथेच कुठेतरी चल दोघेजण बघू.

आई आणि अशोक दोघेही रूममध्ये शिरतात, तेव्हा मोहिनी त्यांना बेडवरती जेवत असताना दिसते. हे पाहून मात्र आईची तारांबळ उडते.

"अगं! तू इथे कशी."

मी तर इथेच होती. थोड्यावेळापूर्वी तुम्हीच तर माझ्या खोलीत जेवणाचं ताट घेऊन आलात विसरलात कि काय तुम्ही.

आई पूर्णपणे ओळखून चुकलेली असते काहीतरी गडबड नक्कीच आहे. ती काही न बोलता तिथून निघून जाते.

आई जेवून झोपायला जाते तरीपण तिच्यामनात शंकेची पाल चुकचुकत असते. म्हणून ती एकदा मोहिनीच्या रूममध्ये बघण्यास जाते. तर काय मोहिनीने तिचे मूळरूप धारण करून बसलेली असते. हा घडलेला प्रकार सगळ्यांना सांगायला जाते, बघते तर काय मोहिनी मुलीचं रूप घेऊन सगळ्यांसमोर गप्पा मारत बसलेली असते. बस आईला धक्का बसतो, आणि कळून चुकते ही मोहिनी मुलीचं रूप घेऊन आपल्या घरी जखिणच आपल्या घरी वावरत आहे. हे तिला सर्वाना पटवून द्याचे आहे म्हणून ती मोहिनीला कडक शब्दांत सांगते.

 


"हे मुली तुझा हा खेळ बंद कर, आणि आताच्या आता आरशासमोर उभी राहा." हे ऐकून सर्व घाबरतात आणि म्हणतात,काय झाले आहे तू बरं वाटत नाही आहे का???

मोहिनी आरशासमोर उभी नाही राहणार ह्याची तिला खात्री असते, म्हणून ती सर्वाना विश्वासात घेऊन गुरुजींना फोन लावते. आणि आपल्या घरावरील घडलेला सर्व प्रकार सांगते. हे ऐकून गुरुजीना सुद्धा जखिणीनेच घरात प्रवेश केला आहे ह्याची खात्री पटते. काही तासानंतर गुरुजींचे घरी आगमन होते, गुरुजी जसे घरात प्रवेश करतात, त्याची चाहूल मोहिनीला लागते. घरात प्रवेश केल्यानंतर गुरुजी काही मंत्र बोलण्यास सुरुवात करतात. तेव्हा मोहिनी हळूहळू आपले मूळ रूप धारण करते. तिचे ते मूळ रूप बघता घरातील सर्वजण घाबरतात. तेव्हाच गुरुजी तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात करतात.

" मला माहित आहे, तू जखीण आहेस ते" मला सांग तू इकडे का आणि कशासाठी आलीस आहेस ते???

प्रथम मोहिनी काही सांगण्यास नकार देते, पण गुरुजींच्या शक्तिशाली मंत्रापुढे मोहिनी सगळं सांगण्यास सुरुवात करते.

खूप वर्षांपूर्वी मला मुलगा बघण्यास मी माझी आई व बाबा आम्ही तिघे गाडीने जात होतो. आम्ही सर्वजण खूप खुश होतो. बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात शहनाई वाजणार होती. माझे आई वडील खूप चिंतेत असायचे, कारण काहीकेल्या माझं लग्न होत नव्हतं. थोड्याच दिवसात मला शहरातून एका चांगल्या मुलांची मागणी आली. त्यांना आमचं स्थळ खूप आवडलं. त्यादिवशी अमावस्या होती. आम्ही तिघेही मुलाला बघण्याकरिता निघालो. रात्रीची वेळ होती. गडद अंधार होता. त्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस. लवकर शहरात पोचण्यासाठी माझ्या वडिलांनी शॉर्टकटचा रस्ता निवडला. पण पूढे काय होणार होत ह्याची आम्हाला थोडीसुद्धा कल्पना नव्हती. त्यादिवशी एका कार अपघातात आम्हा तिघांचा मुर्त्यू झाला. माझी सगळी स्वप्न धुळीस मिळाली. मला खूप वाटायचं माझं लग्न व्हावं, माझं स्वतःच असं घर असावं. माझं अर्धवट राहिलेले स्वप्न मी पूर्ण करण्यास इकडे आले आहे. त्याशिवाय माझ्या आत्मयाला शांतता लाभणार नाही. 

"हे बघ, तू जखीण आहेस आणि मी तुला ह्या घरात प्रवेश करून देणार नाही". तुझं अर्धवट राहिलेले स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तेव्हा तू इथून निघून जा. काही केल्या जखीण इथून जात नसते.

शेवटी अशोकची आई जखीण म्हणजेच मोहिनीपुढे खूप विनवण्या करते. तुझ्या बाबतीत जे घडले त्याचा आम्हला खूप खेद आहे. असं तुझ्या बाबतीत नको व्हायला हवं होत. पण आता तू एक जखीण आहेस आणि तू आता कोणत्याही प्रकारच नातं पृथ्वीवरच्या माणसाशी जोडू शकत नाही. कृपया करून माझ्या अशोकचा पाठलाग सोडून दे. एक आई आज तुझ्यापुढे भीक मागते आहे. एक आईच सर्व समजू शकते, तुझ्या इच्छा, आकांशा.

हे ऐकल्यानंतर जखीण म्हणजेच मोहिनी हिला आपल्या आईची आठवण येते. आणि ती अशोकच्या आईच ऐकते आणि लगेचच ते घर सोडून निघून जाते. काहीवर्षांनी अशोकचे सुद्धा लग्न होऊन तो आपला एक सुखी संसार थाटतो.