Kimiyagaar - 16 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 16

Featured Books
Categories
Share

किमयागार - 16

मुलगा पहाटेपुर्वीच उठला. त्याला आफ्रिका खंडात येऊन अकरा महिने नऊ दिवस झाले होते. त्याने खास या दिवसासाठी आणलेले पांढरे अरबी कपडे घातले.
डोक्यावरील टोपी नीट करून त्याला उंटाच्या कातडीने बनवलेली रींगने घट्ट केली व नवीन चप्पल घालून तो पायऱ्या उतरला.
सारे शहर झोपलेले होते. त्याने स्वतः साठी सॅन्डविच बनवले व क्रिस्टल ग्लास मधून चहा घेतला व नंतर अंगणात तो हुक्का पित बसला. तो शांतपणे हुक्का पित होता.
मनात कोणताही विचार नव्हता, फक्त वाऱ्याचा आवाज येत होता व वाऱ्याबरोबर वाळूचा वास येत होता. नंतर त्याने खिशात हात घातला व खिशातील वस्तू चा विचार करत शांत बसला.
खिशात पैशाचे बंडल होते, ते पैसे एकशेवीस मेंढ्या, परतीचे तिकीट आणि त्याच्या देशात आफ्रिकेहून वस्तू आयात करण्यास लागणारे लायसन्स घेण्यास पुरेसे होते.
व्यापारी दुकान उघडे पर्यंत तो बसून राहिला. त्यानंतर दोघे चहा घ्यायला गेले.
मुलगा म्हणाला " मी येथून जाणार आहे. माझ्याकडे मेंढ्या घेण्याईतके पैसे जमले आहेत व तुमच्या कडे मक्केला जाण्याईतके".
व्यापारी काही बोलला नाही. तुम्ही मला आशिर्वाद द्याल ना? तुम्ही मला खूप मदत केली आहे.
व्यापारी म्हणाला मला तुझा गर्व वाटतो. तू माझ्या क्रिस्टल दुकानाला नवीन रूप दिलेस. तुला हे माहित आहे की मी मक्केला जाणार नाही जसे तुला माहित आहे की तू मेंढ्या विकत घेणार नाहीस.
मुलगा चकीत होऊन म्हणाला तुम्हाला असं का वाटले ?. "मक्तूब ". व्यापारी म्हणाला आणि त्याने मुलाला आशिर्वाद दिला.
किमयागार - निघण्याची तयारी
मुलगा आपल्या खोलीत गेला व त्याने सामान बांधायला घेतले. ते तीन बॅग इतके झाले.
तो बाहेर पडत असतानां त्याला खोलीच्या कोपऱ्यात त्याची मेंढपाळ असतानांची पिशवी दिसली. तो ती विसरलाचं होता. त्यातून त्याने जाकीट काढले व ते कुणाला तरी देऊन टाकू असा विचार करत होता इतक्यात त्यातून दोन दगड पडले. ते उरिम व थुम्मीम होते.
त्याला राजाची आठवण आली, आपण हे विसरलोच होतो याची जाणीव झाली. गेले वर्षभर तो नेटाने काम करत होता आणि त्याच्या मनात पैसे गोळा करून स्पेनला अभिमानाने जाणे एवढाच विचार होता.
' स्वप्ने पाहणे बंद करू नको, शकून चिन्हे ओळख व त्याप्रमाणे वाग ' राजा म्हणाला होता. मुलाने दगड उचलले
आणि त्याला राजा आसपास असल्याचा भास झाला.
मी पूर्वी जे काम करत होतो तेचं करण्यासाठी मी परत चाललो आहे. मला मेंढ्या अरबी बोलायला शिकवू शकत नाहीत पण मी त्यांच्या कडून हे शिकलो आहे की, जगात एक अशी भाषा आहे जी सगळ्यांना समजते,
जी दुकान सुधारतांना वापरत होतो
ती म्हणजे ' उत्साहाची , इच्छा पूर्ण होताना बघण्याची, नविन व विश्वासार्ह शोधण्याची'. जेव्हा तुम्हाला काही हवे असतें तेव्हा वैश्विक शक्ति तुम्हाला मदत करत असतें राजा म्हणाला होता. पण राजाने लुटले जाणे, न संपणारे वाळवंट, असे लोक जे स्वप्न बघतात पण प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, पिऱ्यामिड म्हणजे दगडांचे ढीग आहेत याबाबत सांगितले नव्हते. आणि त्याने हे सांगितले नव्हते की, तुमच्या कडे असलेल्या कळपापेक्षा जास्त मेंढ्या घेण्याइतके पैसे असतील तेव्हा त्या घ्याव्यात.
मुलाने पिशवी उचलली आणि इतर सामानात ठेवून दिली. तो खाली उतरला, त्याला दिसले की, व्यापारी एका विदेशी जोडप्याला सेवा देत होता. तसेच इतर दोन ग्राहक क्रिस्टल ग्लास मधून चहा पित होते.
तो जेथे उभा होता तिथून तो व्यापाऱ्याकडे पाहत होता, तेव्हा त्याच्या लक्षात आले की, व्यापाऱ्याचे केसही राजासारखे होते. त्याला त्याच्या टॅंझिअरमधील पहिल्या दिवसाची आठवण झाली. मिठाई विक्रेत्याच्या चेहऱ्यावरील हास्य अगदी राजाच्या हास्यासारखेच होते.
त्या दिवशी त्याच्याकडे काही खायला पण नव्हते आणि कुठे जायचे तेही कळत नव्हते. आणि त्याच्या मनात आले की दोघांपैकी कोणीच राजाला
भेटलेले नव्हते. आणि राजा म्हणाला होता की जे आपले भाग्य मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या समोर मी हजर होत असतो.