यशोगाथा : “स्त्री” भरारीची, लढाई तिच्या अस्तित्वाची
प्रस्तावना
आज आपण पाहतो की पुरुषांप्रमाणे स्त्रिया ही देशाच्या सर्वांगीण विकासात हातभार लावत आहेत स्त्रियांची मर्यादा फक्त घरच्या आणि मुलांच्या संगोपणा एवढीच न राहता त्यांचे अस्तित्व सिद्ध करून स्वतःची एक वेगळी ओळख समाजामध्ये निर्माण करीत आहेत.
आज आपण प्रगतीच्या मार्गावर आहोत तिथे स्त्रियांना मोलाचे स्थान दिले जात आहे एवढेच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही असलीच पाहिजे यासाठी शासनाने ही काही प्रमाणात स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवलेल्या आहेत स्त्रियांकडून एक मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे एकाच वेळी अनेक कामावर लक्ष केंद्रित करणे (Multi-Tasking) आजची नारी ही घरासोबतच (General Motors) सारखी नामांकित कंपनी चालवत आहे यातूनच स्त्रियांचा कौशल्य दिसून येतं.
आज आपण अशाच एका भारतीय वाघिणीची कामगिरी पाहणार आहोत जिला कोणत्याही पद्धतीचे कौटुंबिक मदत व पाठिंबा मिळाला नाही तरीही ती स्वतःच्या हक्कासाठी व स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी लढली व एवढ्या हालकीच्या परिस्थितीतून आज फक्त तिच्या तालुक्याचीच नव्हे फक्त तिच्या जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण भारताची व एलआयसी ऑफ इंडिया या जगप्रसिद्ध व नामांकित विमा क्षेत्रातील कंपनीची सर्वोत्कृष्ट रणारगिनी विमा अभिकर्ता हा किताब मिळविला.
चला तर मग पाहूया सो मनीषा मुळीक यांचे यशस्वी यशोगाथा
सौ मनीषा मुळीक यांचा प्रवास हा २००८ सालापासून सुरू होतो या प्रवासात त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले अनेक अडथळे आले पण आपलं अस्तित्व निर्माण करायचा आहे ही मनाशी खूणगाठ बांधली होती त्यामुळे मागे वळून पाहण्याचा प्रश्न निर्माण होत नव्हता.
कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात त्याप्रमाणे…
“असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानांचे लिहून अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर” !
सौ मनीषा मुळकी ह्या मूळच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरी हे त्यांचं जन्मस्थळ त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण याच गावातून पूर्ण केले नंतर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गावाकडच्या शाळेत शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना गावातून बाहेर यावं लागलं गावापासून लांब असलेले रहिमतपूर हे गाव उच्च शिक्षण घेण्यासाठी निवडलं यादरम्यान लक्ष प्राप्तीच्या वाटेवर असताना खूप गोष्टी असतात की ज्या आपल्याला आपल्या ध्येयाच्या वाटेवरून लांब करण्याचा प्रयत्न करतात तसेच काही सौ मनीषा मुळीक यांच्या बाबतीत घडलं महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच त्या त्याच गावातील छोटेसे किराणा दुकान चालवत असणाऱ्या श्री आप्पासाहेब मुळीक यांच्याशी त्यांची ओळख झाली ओळखीतून मैत्री झाली व काही काळाने मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले अनेकदा आयुष्यात आपल्याला हवं तसं घडत नाही आणि जे घडतं त्याच्याशी जुळून घेणे याचा विचार आपण कधीच केलेला नसतो.
सौ मनीषा मुळीक यांच्या प्रेमाच्या प्रवासात त्यांच्या कुटुंबीयांचा साफ नकार होता तरीसुद्धा सौ मनीषा मुळीक यांनी समोर आलेल्या परिस्थितीला झुंज देत आपल्या प्रेमाचा बळी नाही गेला पाहिजे तसेच आपण कोणालातरी फसून आयुष्यात पुढे जातोय हा विचार सौ मनीषा मुळीक यांना कधीच मान्य नव्हता व दिलेल्या शब्दाची जाणीव ठेवता सौ मनीषा मुळीक यांनी श्री आप्पासाहेब मुळीक यांच्याशी विवाह केला तेवढ्यात त्यांचे बारावी शिक्षण पूर्ण झालेले होते आणि आयुष्याचा सर्वात खडतर प्रवास इथूनच सुरू झालेला होता.
घरच्यांचा कोणत्याही प्रकारचा आधार नसल्याने त्यांना एक वेगळी सुरुवात करावी लागली आणि याच परिस्थितीने त्यांना जाणीव करून दिली जे काही आहे ते आपणच आहोत आणि आपणही काहीतरी करू शकतो याची जगाला जाणीव करून दिली पाहिजे आणि त्यांच्या याच विचारसरणीला साथ दिली ती म्हणजे त्यांच्या आयुष्यातील जोडीदार श्री आप्पासाहेब मुळीक यांनी सौ मनीषा मुळीक व श्री आप्पासाहेब मुळीक लग्नानंतर कोरेगाव येथे स्थायी झाले एका अनोळखी शहरांमध्ये स्वतःच्या उतरनिर्वासाठी काहीतरी करायला हवं यासाठी श्री आप्पासाहेब मुळीक यांनी चहाची छोटीशी टपरी सुरू केली सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांना खूप साऱ्या आव्हानांना सामोरे जावे लागले व्यवसाय असो किंवा कुटुंब त्या परिस्थितीला झुंज देत पाच वर्ष चहाची टपरी चालवली व्यवसाय हा लहान असो किंवा मोठा शेवटी तो स्वतःचा मालक असतो यामधून किती उत्पन्न मिळत आहे याचा विचार न करता याच व्यवसायाचा विस्तार कसा होईल याबद्दल विचार केला पाहिजे व्यवसायाची जागा ही मोक्याची व गर्दीच्या ठिकाणी असल्याकारणाने लोकांच्या नजरेत असेल अशी होती त्यामुळे चहाच्या टपरीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत होताच परंतु आर्थिक टंचाई जाणवत होती त्यामुळे बाजारात असेल किंवा शेजारी ऑफिसमध्ये तसेच फिरून चहा विक्रीला सर्वात केली. नंतर २००८ साली कोरेगाव येथे एलआयसी ऑफ इंडिया याची पहिली शाखा स्थापन झाली तेव्हा इन्शुरन्स एजंट (विमा प्रतिनिधी) यांच्या भरतीची जाहिरात जागोजागी चिटकवण्यात आली होटी तेव्हा सौ मनीषा मुळीक या जाहिराती बद्दल माहिती घेण्यासाठी एलआयसी ब्रांच ऑफिसला गेल्या त्यांना फक्त संधी हवी होती ज्यामुळे त्या स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतील आणि हीच संधी एलआयसीच्या माध्यमातून मिळणार होती ब्रांच मध्ये जाताच विकास अधिकारी श्री बापट साहेब हे भेटले आणि एलआयसी व इन्शुरन्स याबद्दल सर्व माहिती सांगितली या माध्यमातून रोजगाराची संधी कशी निर्माण होते तसेच इन्शुरन्स एजंट हा जॉब नसून एक व्यवसाय कसा आहे हे समजावून सांगितले त्यानंतर सौ मनीषा मुळीक यांना विकास अधिकारी श्री बापट साहेब यांचे म्हणणे पटले व चालून आलेल्या संधीचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला तसेच त्यांच्या या निर्णयाचा सन्मान त्यांचे पती श्री आप्पासाहेब मुळीक यांनी केला काम करण्याची परवानगी मिळताच त्यांनी दुसऱ्याच दिवशी एलआयसी ब्रांच ऑफिस मध्ये जाऊन विकास अधिकारी श्री बापट साहेब यांना भेटल्या व एलआयसी इन्शुरन्स एजन्सी घेण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली काही काळातच त्यांना एजन्सी देण्यात आली एजन्सी घेतल्यानंतर त्यांचा विमा क्षेत्रातील संघर्ष सुरू झाला.
बाजारपेठेत उतरून रोज वेगवेगळ्या लोकांना भेटणे त्यांच्याशी संवाद साधणे त्यांना एलआयसीच्या पॉलिसी बद्दल सांगणे व गुंतवणुकीस प्रोत्साहित करणे हे ऐकायला जेवढे सोपे वाटते तेवढेच प्रात्यक्षिक करण्यात अवघड असते समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतो किंवा कोणत्या मनस्थितीत आहे याचा अंदाज घेऊन काम करावे लागते.
ते म्हणतात ना की यशाची पहिली पायरी ही अपयश असते हेच वाक्य सौ मनीषा मुळीक यांच्या जीवनात प्रात्यक्षिक घडलं एजन्सी सुरू झाल्यापासून एक वर्षाच्या कालावधीत बारा पॉलिसी व एक लाख प्रीमियम एवढा किमान व्यवसाय एका वर्षामध्ये आणावा लागतो तरच ती एजन्सी टिकून राहते सुरुवातीच्या काळात बाजारपेठेत नवीन असल्या कारणाने व जास्त ओळख नसल्याने सुरुवातीच्या ११ महिन्यांमध्ये त्यांच्याकडून एकही पॉलिसी झाली नाही त्यावर विकास अधिकारी श्री बापट साहेब यांनी एजन्सी टिकवण्याची अट सांगितली जी की एक लाख प्रीमियम व बारा पॉलिसीज आहे. त्यानंतर राहिलेल्या एका महिन्याच्या कालावधीत जर का आपण एजन्सीची अट पूर्ण केली नाही तर आपली एजन्सी जाऊ शकते हे समजताच त्यांनी कामाला सुरुवात केली अधिक प्रभावी प्रयत्न व जास्तीत जास्त लोकांशी संपर्क वाढवला सौ मनीषा मुळीक यांचे पती श्री आप्पासाहेब मुळीक यांच्यासोबत मिळून शेवटच्या महिन्यात बारा पॉलिसी व एक लाख प्रीमियम हा पहिला व्यवसाय आणला ही त्यांच्या कामाची सुरुवात होती.
ग्रामीण भागातून काम करत असताना त्यांना अनेक अडथळे आले अनेक नकाऱ्यांना त्यांना सामोरे जावे लागले त्यामध्ये गावकऱ्यांचा विश्वास संपादन करणे हे फार महत्त्वाचे होते कारण गावाच्या ठिकाणी गुंतवणुकीला प्रोत्साहन नसते व एक स्त्री म्हटलं की घरची जबाबदारी आलीच अशा अवस्थेत स्वतःच्या लहान मुलाचे योग्य संगोपन करणे हे खूप महत्त्वाचे होते विमा क्षेत्र म्हटले की कामात सातत्य असलंच पाहिजे हे वाक्य लक्षात असायला हवं त्यासाठी गावोगावी फिरावे लागायचे व वेगवेगळ्या परिस्थिती बदलणाऱ्या वातावरणामध्ये लहान मुलाला सोबत घेऊन वावरणे केवळ अशक्य होते त्यासाठी सौ मनीषा मुळीक स्वतःचे लहान मूळ शेजारच्या काकूंकडे सांभाळायला देऊन रोज पॉलिसी साठी फिरत असायच्या कित्येकदा लोक तोंडावर नकार द्यायचे तर काही लोक ऐकूनही घेत नसत या सगळ्यातून निराश न होता त्यांनी कामाची जिद्द सोडली नाही यासोबतच त्यांनी “विमा ग्राम” ही मोहीम हाती घेतले यामध्ये कोणत्याही गावात शंभर पॉलिसी पूर्ण झाल्या किंवा त्यापेक्षा अधिक पॉलिसीज पूर्ण झाल्या असतील तर त्या गावाला एलआयसी ऑफ इंडिया कडून “विमा ग्राम” असे घोषित करण्यात येते विमा ग्राम म्हणजे ज्या गावात विमा ही संकल्पना समजलेली आहे व विम्याच्या बाबतीत गावातील सर्व रहिवासी जागरूक आहेत अशी ही विमा ग्राम संकल्पना आहे व विमा ग्रामची अट पूर्ण झाल्यास त्या गावास सन्मानाच्या स्वरूपात एलआयसी कडून काही निधी गावाच्या विकासासाठी मिळतो हे सर्व करत असताना सौ मनीषा मुळीक यांचे गावातील प्रतिष्ठा तसेच लोकांच्या ओळखी वाढल्यावर ज्या वेळेला पहिल्यांदा “नागझरी” गाव हे “विमा ग्राम” झाले तेव्हा सौ मनीषा मुळीक यांचे सामाजिक कार्य दिसून आले व त्यांच्या याच कार्याला प्रोत्साहन म्हणून नागझरे गावाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला व याच कामाचा आधार घेऊन तेथील ग्रामस्थांनी सौ मनीषा मुळीक यांना नागझरी गावाचे उपसंपंच हे मानाचे स्थान मिळवून दिले. त्याचबरोबर एलआयसी ऑफ इंडिया यांच्याकडूनही त्यांच्या कामाला प्रोत्साहन दिले जात होते वेगवेगळे अवॉर्ड्स वेगवेगळे कॉम्पिटिशन जिंकत असल्यामुळे वेळोवेळी त्यांचा यथोचित सन्मान केला जात असेल सन २०१० साला पासून प्रत्येक वर्षी त्या एम डी आर टी हे पद मिळवत गेल्या हे पद मिळवण्यासाठी जवळपास एक कोटी हा प्रीमियम आणावा लागतो असे सलग नऊ वर्ष काम केले व एमडीआरटीचा मान मिळवला त्यानंतर २०१९-२० साली सी ओ टी झाल्या की जी पोस्ट एमडीआरटी पेक्षा मोठी असते त्याच सोबत गॅलेक्सी आणि कॉर्पोरेट क्लब मेंबरशिपही मिळवली या सगळ्या प्रवासामध्ये कौटुंबिक सातही फार महत्त्वाचे असते आणि ती पुरेपूर त्यांना लाभली.
या सगळ्या प्रवासात घर व्यवसाय आणि त्याच सोबत व्यवसायातील किंवा संबंधित क्षेत्रातील बदल आत्मसात करणे हे देखील महत्त्वाचे असते त्यामुळे कामाचा वेळ साधून त्यांना नवीन प्लॅनसाठी किंवा वेगवेगळ्या मीटिंगसाठी वेळ काढावा लागत होता, ज्ञान अद्यावत असेल तरच आपण बाजारपेठेत उतरू शकतो हे वाक्य विकास अधिकारी श्री बापट यांचे होते कामाची सुरुवात करतानाच हे वाक्य त्यांनी सांगितले होते व याच वाक्याचा आधार घेऊन त्या आजही कार्यरत आहेत.
सौ मनीषा मुळीक यांचे सर्व काम ग्रामीण भागातून झालेले आहे आतापर्यंतच्या प्रवासात जवळपास २० हून अधिक गावे फिरल्या आहेत व तेथे विमा या विषयाचा प्रसार केला व त्यामधील पंधराहून अधिक गाव हे “विमा ग्राम” केली आहेत त्यामुळे सौ मनीषा मुळीक यांच्या कामासोबतच समाज सेवाही तितकीच घडली आहे यामध्ये त्यांना त्यांच्या सहकार्य विकास अधिकारी, शाखा अधिकारी, प्रदेश अधिकारी व झोनल अधिकारी यांची खूप महत्त्वाची साथ मिळाली त्यांची आजही काम करण्याची पद्धत सारखीच आहे सकाळी लवकर घर सोडायचे व रात्री उशिरा घरी यायचे सकाळी लवकर घर सोडण्याची कारणे एकच कारण की गावातल्या भागामध्ये गावातील लोक हे सकाळी लवकर कामावरती जातात व संध्याकाळच्या वेळेस परत त्यामुळे कोणाला पॉलिसी संघाचे असेल तर त्यांच्या कामाच्या वेळेत ते शक्य होत नसत त्यामुळे संध्याकाळ आणि सकाळ या दोन वेळा ठरलेल्या असत व किमान दिवसातून एक तरी पॉलिसी करायची हा निश्चय आणि त्यामुळेच आज भारतातील एलआयसी ऑफ इंडिया या नामांकित कंपनीच्या १२ लाख पेक्षा जास्त विमा प्रतिनिधी मधून सर्वात जास्त पॉलिसी करणाऱ्या पहिल्या एकमेव महिला विमा प्रतिनिधी भारतातून असण्याचा मान मिळाला तसेच सर्वात अधिक व्यवसाय आणून देण्याचाही रेकॉर्ड केला व विमा प्रतिनिधींमध्ये एक वेगळे रेकॉर्ड निर्माण केले सौ मनीषा मुळीक यांचे पुढील ध्येय टीओटी म्हणजे एका वर्षात पाच वेळा सी ओ टी होणे हे आहे.
सौ मनीषा मुळीक यांनी आज जगाला दाखवून दिलं की घेतलेला प्रत्येकच निर्णय हा चुकीचा नसतो मनाची जिद्द असेल तर यशाचे शिखर खूप छोटे आहे आणि एवढ्यावरच न थांबता त्या आज तागायत कार्यरत आहेत व एका वर्षाला १००० हून अधिक पॉलिसी त्यांच्या नावे आहेत.
एलआयसी ऑफ इंडिया किंवा विमा क्षेत्र यामध्ये करिअरची संधी
एलआयसी एजंट काय करतो?
बहुतेक लोकांचा विमा कंपनीची पहिल्या संपर्क विमा विक्री एजंट द्वारे होतो हे कामगार व्यक्ती कुटुंबे आणि व्यवसायांना विमा पॉलिसी निवडण्यात मदत करतात जे त्यांचे जीवन आरोग्य व मालसारख्याठी सर्वोत्तम सुरक्षा प्रदान करतात विमा विक्री एजंट हे केवळ एक विमा कंपनीसाठी काम करतात त्यांना कॅप्टिव्ह एजंट म्हणून समजले जाते स्वतंत्र विमा एजंट किंवा दलाल अनेक कंपन्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम दर व कव्हरेज देणाऱ्या कंपनीकडे विमा पॉलिसी ठेवतात दोन्ही बाबींत एजंट अहवाल तयार करतात रेकॉर्ड ठेवतात नवीन क्लाइंट शोधतात आणि नुकसान झाल्यास पॉलिसीधारकांना त्यांचे विविध दावे निकाली काढण्यास मदत करतात वाढत्या प्रमाणात काही त्यांच्या क्लायंटला आर्थिक विश्लेषण किंवा क्लाइंट जोखीम कमी करण्याच्या मार्गाबद्दल सल्ला देखील देतात.
विमा विक्री एजंट सामान्यतः विमा उद्योगात उत्पादक म्हणून ओळखले जातात एक किंवा अधिक प्रकारचे विम्याची विक्री करतात जसे की मालमत्ता आणि अपघाती जीवन आरोग्य अपंगत्व आणि दीर्घकालीन काळासाठी मालमत्ता आणि अपघाती विमा अशा पॉलिसी विकतात ज्या व्यक्ती आणि व्यवसायांना ऑटोमोबाईल अपघात आग चोरी वादळ आणि मालमत्तेचे नुकसान करू शकणाऱ्या इतर घटकांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसान पासून संरक्षण करण्यात मदत करतात.
लाईफ इन्शुरन्स एजंट पॉलिसी विकण्यात बाहेर असतात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यावर लाभार्थ्याला पैसे देतात पोलीस सिधारकाच्या परिस्थितीनुसार कॅश व्हॅल्यू पॉलिसीची रचना सेवानिवृत्तीनंतर चे उत्पन्न मुलांचे शिक्षण किंवा इतर फायदे देण्यासाठी केले जाऊ शकते लाइफ इन्शुरन्स एजंट वार्षिक विमा विकतात ज्यात वैद्यकीय सेवांचा खर्च आणि आजारपण किंवा दुखापती मुळे होणारे उत्पन्न कमी होते ते दंत विमा आणि अल्पकालीन अपंगत्व विमा पॉलिसी देखील विकू शकतात.
प्रशिक्षण
एलआयसी इन्शुरन्स एजन्सी घेतेवेळी संबंधित भविष्यकालीन विमा प्रतिनिधीला प्रथमतः विमा व एलआयसी कंपनी याबद्दलचे सविस्तर मार्गदर्शन व २५ दिवसांचे ट्रेनिंग सेशन पूर्ण करावे लागते त्यानंतर संबंधित अभिकर्ता एजन्सी पात्रता परीक्षेसाठी पात्र ठरतो व त्यानंतर कम्प्युटर बेस्ट परीक्षा होते व परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर काही दिवसांमध्ये एजन्सी कोड दिला केला जातो जो की इन ऍक्टिव्ह असतो एजन्सीची पहिली पॉलिसी करत असतो वास्तवात ऍक्टिव्ह होतो व आपण कामास सुरू करू शकतो
करिअर
एजंट ज्या दिवसापासून सिस्टम मध्ये शामिल होतो त्याच दिवसापासून करिअरच्या विकासावर भर दिला जातो जरी त्याच्या किंवा त्याच्या विकास अधिकाऱ्यांशी वैयक्तिक बैठका घेतल्या तरी एजंट व्यवसाय विकास आणि करिअर वाढीशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करू शकतो विमा उद्योगात करिअर घडवण्याच्या दृष्टीने संस्थेकडून आलेल्या अपेक्षांवरही चर्चा केली जाते.
व्यवस्थापनामध्ये आत्मसात करणे हा एलआयसी मध्ये प्रदान केलेला करिअर वर्धित करण्याचा आणखी एक पर्याय आहे हा कार्यक्रम एजन्ट संस्थेत विकास अधिकारी म्हणून पूर्णवेळ करिअर तयार करण्यास मदत करतो एजंट ची टीम व्यवस्थापित करण्यासाठी आणि वैयक्तिक विकासासाठी मोठी क्षमता प्रदान करतात.
निष्कर्ष
आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट मिळवायचे असेल तर प्रयत्नांमध्ये सातत्य व मनाचे जिद्द असणे तितकेच महत्त्वाचे असते जितकी ओढ आपली स्वप्नपूर्तीची असते स्वप्नपूर्तीच्या काळामध्ये घेतलेले प्रत्येकाच निर्णय कदाचित बरोबर नसतील परंतु एखादा चुकीचा निर्णय हे आपण कसा बरोबर करू शकतो याच्याकडे लक्ष दिले पाहिजे एका अपयशाने खचून न जाता प्रयत्नांची साखळी अखंडित ठेवली पाहिजे.