ह्या विचित्र आणि विकृत तन्मय कडे एक पंखावर लाल
खुणा असलेले काही पक्षी होते त्यात काही पोपट ही होते. ह्या पक्ष्यांची आणि Josephine कडे असणाऱ्या पक्ष्यांची फार घट्ट मैत्री होती. ते सतत Josephine chya बाल्कनी chya शेड वर यायचे.
त्याचप्रमाणे तन्मय कडे एक कुत्रा होता जो अव्याहतपने भुंकायचा.
त्यांचे फालतू उद्योग सुरू होते,
पण देवाला ते ही पाहावल्या गेलं नाही. त्यांच्या ह्या उद्योगाची खबर Josephine राहायची त्याच्या वरच्या घरात राहणाऱ्या बाईला लागली.
त्या बाईने सगळ्यांना सांगून ह्याबद्दल सावध केलं. त्यामुळे Josephine,तन्मय आणि अनिल chya चालत्या उद्योगाला खिळ लागली.
ते पाहून त्या तिघांना भलता राग आला. त्यांनी ठरवलं की आता आपण ह्या बाईला अद्दल घडवायचीच. झालं, त्यांच्या तिघांच्याही डोक्यात घाणेरडे किडे जोरजोरात वळवळायला सुरू झाले आणि प्रकट झाली एक घाणेरडी आणि फालतू आयडिया ती म्हणजे आता आपण ह्या बाईचे सगळे गॅजेट्स,मोबाईल फोन इंटरनेट कनेक्शन हॅक करून मॉनिटर करायचे तसेच तिचे फोन tap करायचे.
एवढंच नव्हे तर आजूबाजूच्या लोकांना एकाचे दोन लावून सांगून त्यांचे मत त्या बाई बद्दल कलुषित करायचं असे करून त्या बाईला त्रास द्यायचा प्रयत्न करत राहायचा असं त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे तसे करण्यास सुरू ही केले.
झालं दिवस न रात्र त्यांचा तोच उद्योग सुरू झाला. ती बाई उठते कधी?, झोपते कधी?,बाहेर जाते कधी?,घरी येते कधी? एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाते केव्हा? काही बोलते केव्हा? फोन हातात घेते केव्हा? फोन वर काय काय activity करते? ह्या सगळ्याकडे ते तिघे डोळ्यात तेल घालून लक्ष देऊ लागले. साइड बाय साईड त्यांनी त्यांच्या ज्या काही ओळखी होत्या त्यात एकाचे दोन लावून त्या बाई बद्दल मत कलुशित करने सुरू केले. त्यापैकी जे लोकं हलक्या कानाचे आणि हलक्या डोक्याचे होते त्यांनी त्यांचं ऐकलं पण जे आपण बरे आपले काम बरे असे होते त्यांच्यावर ह्या चांडाळ तिकडीचा काही प्रभाव चालला नाही.
जे हलक्या डोक्याचे होते ते आणि चांडाळ तिकडी ह्यांनी मिळून ठरवले की वेगवेगळे आवाज करून बाईला भंडावून सोडायचे. मग त्यात ते दार जोरात आपटण्याचा आवाज करायचे. Josephine आणि अनिल सारखे drilling मशीन चे कामं करायचे, काहीतरी ठोकत राहायचे,काहीतरी कुटत राहायचे, कुठल्यातरी बुलडोझर सारख्या मशीन चा आवाज फोन मधून काढत राहायचे.
ती बाई बाथरूम मध्ये गेली की गाडीच्या हॉर्न चा आवाज काढ, ती बेडरूम मध्ये आली की पक्ष्यांचा पोपटाचा आवाज काढ, कुत्र्याच्या भूंकण्याचा आवाज काढ, रात्री ती बाई झोपली की मोठमोठे आवाज करणाऱ्या वाहनांचा आवाज काढ,फटाक्यांचा आवाज काढ, लिफ्ट फुल्ल झाली तरी मुद्दामच त्यात घुसण्याचा प्रयत्न कर, त्या बाईने फोन केला कोणाला तर तिचे बोलणे ऐक, तिच्या फोणवरच्या activities बघ असे एक ना अनेक फुटकळ उद्योग सुरू केले.
पण त्याचा परिणाम त्यांना हवा तसा होईना. त्या बाईवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ती मजेत, गाणे गात आपले आयुष्य जगत होती. जेवढी ती मजेत राहत असे तेवढी ह्या तिघांचा खकाना (चीरांग होणे किंवा मन जळणे) होत असे ते आणखी त्यांचा वॉच ठेवणे वाढवत असत त्यामुळे झालं काय की त्या बिचाऱ्या तिघांना त्यांचे आयुष्य च राहिले नाही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्यांना ती बाई आणि फक्त ती बाईच दिसू लागली.
सतत तिच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करता करता त्या तिघांच्या मेंदूवर परिणाम होऊ लागला. त्यांची दिवसाची चैन आणि रात्रीची झोप हराम होऊ लागली.
रात्री बे रात्री Josephine रागाने त्वेषाने फुटबॉल खेळू लागली पण हे करताना ती अर्धवट असल्याने हे विसरली की काहीही झालं तरी ती बाई तिच्या डोक्यावर बसलेली आहे तिला त्याचा केवढासा त्रास होणार? Josephine chya खाली राहणाऱ्या लोकांना मात्र त्याचा फार त्रास होत असे.
अश्या पद्धतीने ते तिघे रोज थोडे थोडे खंगु लागले. ते रोजच एकत्र बसून ड्रिंक्स घेऊ लागले, त्यांना दिवस रात्रीचे भान रहिनासे झाले. त्या मध्येतच Josephine ने तिच्या नात्यातील मुल दत्तक घेतले. काही दिवस तिला बरे वाटले पण त्यानंतर तिचे मूर्ख उद्योग पुन्हा सुरू राहिले.
त्या तिघांच्या डोक्यावर परिणाम झाला. ते तिघेही विचित्र वागू लागले,घरात घरात बसू लागले,त्यांना स्वतः ची लाज वाटू लागली,ते लोकांना घाबरु लागले अश्यातच एका ड्रिंक्स पार्टीमध्ये झालेल्या चुकीमुळे तन्मय आणि Josephine ला एका घाणेरड्या दुर्धर रोगाची लागण झाली ते पाहून त्या दोघांनी एक दिवस फास लावून आत्महत्या करून घेतली. इकडे अनिल वेडा झाल्यामुळे त्यालाही वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्यात आले.
त्यामुळे अर्थातच त्यांच्या बाळाची रवानगी पुन्हा ज्या नातेवाईकांकडून त्याला दत्तक घेतले तिथे झाली.
शेवटी त्या बाईला त्रास देण्याच्या भानगडीत त्या तिघांनी आपले आयुष्य मात्र उद्ध्वस्त केले. त्यांचे दैव एवढ्यावरच थांबले नाही. Josephine आणि तन्मय ह्यांनी आत्महत्या केल्याने त्यांची रवानगी पिशाच्च योनीत झाली.
Josephine आणि तन्मय पिशाच्च झाले. आजही त्या प्रसिद्ध सोसायटीच्या त्या 1002 फ्लॅट मध्ये Josephine चे पिशाच्च फिरत असते,आजही ते घरात वेगवेगळे आवाज करते. एकदा कोणी कुटुंब त्या फ्लॅट मध्ये राहायला आले तेव्हा त्यांना रात्री बारा वाजता Josephine उलटी लटकलेली दिसली. ती ही तिच्या त्या विचित्र चेशम्यासोबत. आजही रात्री बेरात्री त्या घरातून भेसूर रडण्याचा आवाज येतो.
इकडे तन्मय चे पिशाच्च तो राहायचा तिथे रात्री बेरात्री फिरताना दिसते काळे कपडे घालून जे बुजगवण्यासारखे अत्यंत भयानक दिसते. त्या घरातून रात्रीबेरात्री भुंकण्याचं, पक्ष्यांचा, असे चित्रविचित्र आवाज येत राहतात.