A victim of the system in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | व्यवस्थेचा बळी

Featured Books
Categories
Share

व्यवस्थेचा बळी

मनोगत

'व्यवस्थेचा बळी' माझ्या साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरी. मला कादंबरी लिहिणं फार आवडतं. त्याच दृष्टीकोणातून मी कादंब-या लिहित आहे. याआधीही मी ब-याच कादंब-या लिहिल्या. त्यात मला चांगला प्रतिसादही मिळालेला आहे. आता ही नव्याने एक वेगळा विषय घेवून मी नवीन कादंबरी आपल्या दैनंदिन जीवनात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातच ही कादंबरी आपल्या पसंतीस किती उतरेल हे आपणच ठरवावं.
कादंबरी लेखन साहित्यीक सहसा करीत नाही. ते लेखन करणं तेवढं सोपंही नाही. कारण त्यात कस लागतो. लेखक पुर्ण ताकदीनं आपला जीव त्यात ओतून कादंबरी लेखन करतात. पण त्याच्या कादंब-या जेव्हा वाचल्या जात नाही, त्यावर जोपर्यंत फोन येत नाही, तोपर्यंत त्याला बरं वाटत नाही. माझ्याही बाबतीत असं बरेचदा घडलेलं आहे.
माझी जवळपास या पुस्तकाला धरुन पन्नास पुस्तकं झाली असून त्यात कादंब-या बावीस आहेत. त्यातच दोन हिंदीही आहेत. माझ्या लेखनाची आजपर्यंत कोणी दखल जरी घेतली नाही. मात्र ई साहित्य प्रतिष्ठानला मी मानेल की त्यांनी माझ्या जवळपास पंधरा कादंब-या ऑनलाइन प्रसिद्ध केल्या. त्यात त्या कादंब-या वाचल्यानंतर मला भरपूर फोनही आलेत. त्यात अत्त दिप भवं, चर्मयोगी, शिक्षण, संयोगीता, राजा दाहिर, कामगार, घटस्फोट, मार्ग, माळीण ते गोसेखुर्द, लेखक व भुताटकी ह्या कादंब-या फारच गाजल्या. नुकतीच लिहिलेली गोविंदा गोपाळ गायकवाडंही लोकांना आवडत आहे. त्यातच राजा दाहिर या कादंबरीचं हिंदी रुपांतरण होवू घातलेलं आहे.
'व्यवस्थेचा बळी' या कादंबरीचं कथानक थोडक्यात सांगतो. एक गणेश नावाचा व्यक्ती. तो परिस्थीतीशी लढून शिक्षक बनतो. पुढं मुख्याध्यापक. परंतू मुख्याध्यापक बनल्यानंतर त्याला काय काय त्रास होतो आणि तो व्यवस्थेचा बळी कसा ठरतो? तसेच या कादंबरीत शेवटी काय होते? हे कादंबरी वाचल्यावरच समजेल. आपण ही कादंबरी वाचावी. रसग्रहण करावी बोध घेता येईल तर घ्यावा. जबरदस्ती नाही. एवढीच माझी इच्छा आहे. तसेच या कादंबरीच्या रुपानं मला आशिर्वादही प्रदान करावा एवढीच माझी इच्छा आहे. जेणेकरुन उत्तरोत्तर माझ्या हातून भरपूर कादंब-या निर्माण होवू शकतील.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर
९३७३३५९४५०

******************************************

व्यवस्थेचा बळी
प्रकाशक अंकुश शिंगाडे १२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपूर ४४००३५ मो नं ९३७३३५९४५०
मुखपृष्ठ - कु. अनुष्का
प्रथमावृत्ती - ३१/१२/२०२१
मुल्य - ७५ ₹
सर्व व्यवस्थेचे बळी ठरलेल्यास सादर समर्पीत


**********************************************


व्यवस्थेचा बळी (कादंबरी)

त्याला फारच त्रास होत होता. कारण तो नुकताच मुख्याध्यापक बनला होता. ते मुख्याध्यापक पद मिळण्यापुर्वी त्याला मुख्याध्यापक पद सहज सोपं वाटत होतं. पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे याप्रमाणे ते पद म्हटल्यास तारेवरची कसरत वाटत होती.
ते त्याचं प्रभारी पद होतं. ज्याप्रमाणे राज्यकारभाराची घडी राज्य सांभाळतांना व्यवस्थीत बसवावी लागते. अगदी तशीच परिस्थीती त्याच्या आयुष्यात आली होती.मिळत काहीच नव्हतं आणि मिळणारही काहीच नव्हतं. अर्थात ज्या सुट्या कायमस्वरुपी मुख्याध्यापकाला मिळतात. त्या त्याला नव्हत्या. तसेच वेतनही जे त्याला पूर्वी मिळत होतं, तेच होतं. त्यात वाढ झाली नव्हती.
रोजची पत्र येत होती. कधी शिक्षकांची तर कधी शासनाची. रोजची भांडणं होत होती. कधी शिक्षकांशी कधी पालकांशी तसेच संचालक तर त्याच्या पाचवीलाच पुजलेला होता.
गणेश एक सात्वीक व्यक्ती होता. जीवनभरच्या हयातीत त्यानं इमानदारीनं काम केलं होतं. तसा तो इमानदार असल्यानं त्याची ख्याती सर्वदूर पसरली होती.
गणेश लहान होता. तेव्हापासूनच तो जिद्दी स्वभावाचा होता. आपल्या सवंगड्यासोबत फिरतांना त्याचं कधीच कोणाशी पटत नसे. लहाणपणी तसं पाहता त्याची मित्रमंडळी हे चिडून खेळत व जाणूनबुजून त्याचेवर डाव आणत असत. परंतू खेळात झालेली बेईमानी लक्षात येताच गणेश चिडखोर भुमिकेतून समोर येत असे. पुढे हाच त्याचा स्वभाव बनला होता.
आज त्याला सरकारी नोकरी लागली होती. त्या सरकारी नोकरीवर त्यानं कधीच इच्छा केली नव्हती की त्याचं प्रमोशन होईल. परंतू दैवयोगानं त्या सरकारी कार्यालयातील एक व्यक्ती अचानक मरण पावला जो अधिकारी होता. तो अचानक मरण पावल्यानं त्याची बरीचशी कामं ही थांबलेली होती. काही कामं ही अधूरी होती. त्यानंतर सेवाजेष्ठतेनुसार तोच मुख्याध्यापक बनला.
गणेश मुख्याध्यापक बनला खरा. परंतू ते मुख्याध्यापक पद हे स्थायी नव्हतं. केवळ दुसरा मुख्याध्यापक त्या जागेवर स्थायी स्वरुपात बसेपर्यंत ते पद होतं. त्या पदाला पाहिजे तेवढं काम नसेल असा विचार करुन गणेशनं ते पद घेतलं.
ते प्रभारी पद........त्या प्रभारी मुख्याध्यापक पदावर खुप सारे कामं होते. त्या सरकारी कामाची घडी बसवणं हे त्याचं काम होतं. प्रभारी पदावर असतांना मागील मुख्याध्यापकांची अधुरी असणारी कामंही गणेशला करावी लागत होती. नव्हे तर पुढील मुख्याध्यापकांसाठी अद्ययावत स्वरुपात व्यवस्था करुन ठेवायची होती. तसं पाहता त्याला वाटत होतं की तो सेवाजेष्ठ असल्यानं त्यालाच ते पद मिळेल. तसं पाहता गणेश त्या कामानं त्रस्त झाला होता.
गणेश मुख्याध्यापक बनला. परंतू त्याचं मुख्याध्यापक बनणं संस्थाचालकाला आवडलं नाही. कारण त्याला आपल्या नातेवाईकाला मुख्याध्यापक बनवायचं होतं. त्यातच गणेश मुख्याध्यापक बनताच संस्थाचालकाचे धाबे दणाणले. त्याला काय करु आणि काय नाही असं होवून गेलं. त्यातच आवविचार न करता त्या संचालकानं शाळेतील सर्व रेकॉर्ड आलमारीसह लांबवला. एकपण आलमारी ठेवली नाही.
गणेशला शिक्षणविभागाकडून मुख्याध्यापक पदाचा पदभार आज मिळणार होता आणि याच दिवशी त्याच्या मागल्याच येवून संस्थाचालक सर्व रेकॉर्ड लांबवीत होता. तशी त्या रेकॉर्ड लांबविण्याची कल्पनाही गणेशला नव्हती.
दुसरा दिवस उजळला. गणेश नेहमीप्रमाणं शाळेत आला. तसा एक कटाक्ष त्यानं शाळेवर टाकला. तसं त्याला त्याचं मागील आयुष्य आठवलं. ते दिवस आठवले. ज्या दिवसात अख्ख्या रात्रीच्या रात्री उपासातापासात काढल्या होत्या. त्याला त्याची पत्नी आणि त्याची मुलंही आठवत होती. ती मुलंही बिचारी उपाशीपोटी पाणीच पिवून झोपी जात होती. पण कशाचीही कुरकूर करीत नव्हती. त्याला ती पत्नी आठवत होती. तिही काही बोलत नव्हती. तर निमुटपणे आपल्या पतीच्या खांदा लावून चालत होती.
मागील मुख्याध्यापक आज जगात नव्हते. ते दिवंगत झाले होते. त्यांच्याच काळातील तो त्रास. प्रसंग फक्त वरीष्ठ श्रेणी लावण्याचा होता. वरीष्ठश्रेणी लावून देतो म्हणून मागील मुख्याध्यापकानं लाच म्हणून काही पैसे घेतले होते. परंतू अद्यापही पाच वर्ष होवूनही त्यांनी वरीष्ठ श्रेणी लावून दिली नव्हती. म्हणूनच त्याच गोष्टीवरुन त्यांचं भांडण झालं होतं. भांडण एवढं विकोपाला गेलं की त्यातून एकमेकांना मारहाण झाली व त्याचाच परिणाम म्हणून पोलिसस्टेशनला तक्रार व न्यायालयातही मुकदमा दाखल. मग काय गणेशचे वेतन बंद.
तो काळ.......तो काळंच मुळात अंधकाराचा होता. वेतन बंद होतं. ते केव्हा निघेल हे काही सांगता येत नव्हतं. वेतन अनिश्चीत काळासाठी बंद होतं. मुख्याध्यापक म्हणत होते की मी मरुन जाईल, पण वेतन काढणार नाही. मुख्याध्यापक गणेशला वारंवार धमक्याही देत होता. त्यातच काय करावं सुचत नव्हतं.
आज न्यायालयात मारहाणीचा खटला सुरु होता. त्यातच वेतन जाणुनबुजून बंद केलं होतं मुख्याध्यापकानं. उलटा चोर कोतवाल को दाटे अशी स्थिती झाली होती.
ते दुहेरी संकट होतं. एक संकट म्हणजे मारहाणीची तक्रार सुरु होती तर दुसरं संकट म्हणजे वेतन बंद होतं. काय करावं सुचत नव्हतं. अशातच गणेश दोन्ही खटले लढत होता. परंतू या दोन्ही खटल्यापैकी एका खटल्यात तो बारकाईनं लक्ष देत होता. कारण तो वेतनासंबंधीचा खटला होता तर दुसरा खटला पाहिजे त्या प्रमाणात जोर देवून तो लढत नव्हता. कारण तो मारहाणीचा खटला होता. वेतनाचा संबंध पैशाशी होता. तो जिंकणे भागच होते. परंतू मारहाणीच्या खटल्याचा संबंध पैशाशी नसल्याने तो नाहीही जिंकता आला, तरी पाहिजे त्या प्रमाणात फरक पडणार नव्हता. सरतेशेवटी गणेश मारहाणीचा खटला हारला. परंतू वेतनासंबंधीचा खटला तो जिंकला होता.
गणेश मुख्याध्यापकाच्या दृष्टिकोणातून एक वाईट विचाराचा माणूस झाला. मुख्याध्यापक त्याचा राग करु लागला. तसा अनन्वीत छळही करु लागला. काय करावं हे आता गणेशला सुचत नव्हतं. कारण मुख्याध्यापक दिवसेंदिवस अत्याचाराचे आकडे वाढवीत होता. त्यातच त्याचं नाव आता अतिरिक्त शिक्षकाच्या यादीत टाकण्यात आलं.
गणेशचं नाव अतिरिक्त शिक्षक यादीत येताच गणेश खुश झाला. त्याला वाटलं की जर तो अतिरिक्त शिक्षक म्हणून या शाळेतून गेलाच तर त्याला दुसरी शाळा मिळेल व त्याच्यावरील अत्याचार दूर होईल. तसा तो त्या गोष्टी काही सोबतीच्या कर्मचा-यांजवळ बोलून दाखवत होता.
आज त्याच गोष्टी गणेशच्या बोलण्यानं त्या गोष्टी मुख्याध्यापकाच्या कानावर गेल्या. त्याचा परिणाम हा झाला की मुख्याध्यापकानं त्या अतिरिक्त शिक्षकाच्या यादीत जरी नाव टाकलं असलं तरी त्याला मुख्याध्यापकानं आकसापोटी पाठवलं नाही वा तसा आदेशही काढला नाही.
आज त्या गोष्टीला तीन वर्ष झाली होती. तो अतिरिक्त शिक्षकच होता आजही. परंतू ज्या मुख्याध्यापकानं त्याला शाळेतून अतिरिक्त केलं होतं. तोच मुख्याध्यापक या जगातूनच अतिरिक्त झाला होता. अर्थात हे जग कायमचे सोडून गेला होता.
मुख्याध्यापक हे जग सोडून जाताच व ती बातमी माहित होताच गणेश फारच खुश झाला. तसं क्षणातच त्या आनंदावर विरजण पडलं. तसं त्याला थोडं दुःखही झालं. त्याला विचार आला की तो मुख्याध्यापक गेला, ठीक झालं. परंतू त्याचा परीवार.........जो त्याचेवर अवलंबून होता. त्यांचं पालनपोषण कोण करणार. त्यांची काळजी कोण घेणार. त्यांना आधार कोण देणार. दैवानं त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली, ठीक आहे. परंतू त्यात त्यांचा दोष काय? त्यांना कशाला हवी होती अशी शिक्षा?
गणेश केवळ विचारच करीत राहिला. त्याला आज बरं वाटत नव्हतं. त्याच त्या भविष्यवेधाच्या गोष्टी त्याला येत होत्या. त्यातच त्याला ते जुने दिवसही आठवत होते.
मुख्याध्यापक मरण पावताच त्याचं पद रिक्त झालं. संचालकानं दुस-याला मुख्याध्यापक बनवलं. परंतू ती महिला तेवढी सक्षम नसल्यानं तिनं ते पद नाकारलं. त्यातच दोन महिने निघून गेले. तसं वेतन नसल्यानं सर्व कर्मचारी त्रस्त होतेच. ते शिक्षणाधिकारी साहेबांकडे गेले व त्यांना विनवणी करु लागले. तशातच शिक्षणाधिकारी साहेबानं त्यांचं ऐकून घेवून गणेशला पदभार दिला व आज गणेश एक मुख्याध्यापक म्हणून शाळेच्या दारात उभा झाला. आज त्याला वाटत होतं की ही दिवंगत मुख्याध्यापकाचीच देण आहे. जर दिवंगत मुख्याध्यापकानं आपल्याला अतिरिक्त ठरविल्यानंतर ताबडतोब आपल्याला या शाळेतून हाकललं असतं तर चित्र काहीसे वेगळे असते. मी आजही शिक्षक म्हणून दुस-याच शाळेत एखाद्या मुख्याध्यापकाच्या हाताखाली त्यांच्या हातचा कळसुत्री बाहूला बनून राहिलो असतो.

****************************************
गणेशनं मनोमन शाळेला वंदन केलं. तसा त्यानं त्या शाळेच्या दरवाज्यात पाऊल ठेवला. त्याला थोडं रडू आलं. तोच एका शिक्षकानं विचारलं,
"काय झालं?"
त्यानं आपले अश्रू पुसले व तो म्हणाला,
"काही नाही."
तो आत गेला. उभा राहिला. तोच एका शिपायानं त्याला खुर्ची दिली व तो म्हणाला,
"बसा सर."
तसा तो बसला व विचार करु लागला की काल जे आपल्या विरोधात होते. ते आजपासून चांगले वागणार.

****************************************

काही दिवस निघून गेले होते. गणेशनं जो विचार केला होता. अगदी तसंच घडत होतं. सगळे त्याची प्रशंसा करीत होते. फक्त एकदोन कर्मचारीच विरोधात होते. मात्र संस्थाचालक विरोधात होता. तसं पाहता शासनही वेगवेगळे परीपत्रक काढून त्रासच देत होते नव्हे तर मागील ब-याच दिवसापासूनची कामं दिवंगत मुख्याध्यापकानं केलेली नसल्यानं ती शिल्लक होती. ती कामं पुर्ण करणं अगत्याचं होतं. तसेच वर्तमानकाळातील कामंही रेकॉर्डविणा पुर्ण करावी लागत होती. जी पुर्ण करतांना त्रेधातिरपीट उडत होती. धाबे दणाणत होते. पण काय करणार गणेश ती सर्व कामं शिक्षकांचे वेतन काढता यावे यासाठी पुर्ण करीत होता. राबत होता. आपल्या जीवाचे रान करीत होता. कोणत्याही स्वरुपाचा अतिरिक्त मोबदला न घेता...........
गणेश ग्रामीण भागातून शहरात आलेला व्यक्ती. त्याचं संपूर्ण शिक्षण हे ग्रामीण भागात झालं होतं. त्याला शिक्षणाबाबत तळमळ होती. कदाचित तो ग्रामीण भागात राहात असल्यानं त्याला चांगलं शिक्षण मिळालं नव्हतं नव्हे तर पुरेशा सोयी नसल्यानं त्याला उच्च शिक्षणही घेता आलं नव्हतं. त्यातच आज त्याला वाटत होतं की ग्रामीण भागातील मुलं शिकायला हवी.
गणेश जेव्हा लहान होता. तेव्हा त्याचे शिक्षकही त्याला शिकवीत नव्हतेच. ते शिक्षक रोजच काहीतरी लिहितांना दिसत असायचे. मुलांचा वेळ मग गोष्टी करण्यात जात असे किंवा दंगामस्ती करण्यात जात असे. परंतू गणेशच्या मनात शिकायची इच्छा असल्यानं तो कसाबसा शिकला व शहरातील एका मोडक्या तोडक्या शाळेत तो शिक्षक म्हणून रुजूही झाला.
आजचा काळ हा तरुणाईचा काळ आहे. आता लोकांना लवकर निकाल हवा असतो. त्यांना कसे म्हणून थांबायला वेळ नाही. दिवसभर मोबाईलवर राहणे, टिव्ही पाहणे ही कामं आता तरुणाई करु लागली आहे.
ज्याप्रमाणे तरुणाईला झटपट निकालाची गरज असते. त्याप्रमाणे शासनालाही झटपट निकालाची घाई असते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्यांना त्या घाईतून काय निष्पन्न होवू शकेल यांचं काही एक सोयरसुतक नसतं.
गणेश असाच एक गृहस्थ. आपलं साधं जीवन जगत होता तो. योगायोग असा जुळून आला की तो सरकारी नोकरीवर लागला. त्यातच तो खाजगी शाळेत शिक्षक म्हणून काम करु लागला. काही दिवसानं तो मुख्याध्यापकही बनला.
गणेश शाळेत काम करीत असतांना त्याला मुख्याध्यापक काम सांगायचे. तेव्हा त्याला विचार यायचा की मुख्याध्यापकाची ही कामं, पण मुख्याध्यापक आपल्या अंगची कामं टाळून ती आम्हाला सांगतात. त्याला त्या जीवनाचा कंटाळा यायचा. वाटायचं की शिक्षकाला निव्वळ शिकवायचं काम असावं. अशा फालतूच्या गोष्टी नकोत. परंतू असे होत नव्हते. शासन रोजची कामं आणत होते. ती कामं मुख्याध्यापक आपल्या सहका-यांची मदत घेवून पुर्ण करीत असे. तसं पाहता मुख्याध्यापकालाही पुरेसा वेळ मिळत नसे.
आज सरकार साक्षरता म्हणत होतं. शंभर प्रतिशत विद्यार्थीसंख्या साक्षर व्हायला हवी असं सरकारलाही वाटत होतं. पण गणेशच्या मनात प्रश्न होता तो म्हणजे लोकं शंभर टक्के साक्षर कशी होणार? कारण त्याच्याजवळ सरकारी कामं करतांना शिकवायला पुरेसा वेळच मिळत नव्हता. तो नेहमी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड भरण्यात व्यस्त असायचा.
आज सरकारच्या दररोजच्या सरकारी रेकॉर्ड खातर गणेशलाच नाही तर संपूर्ण देशातीलच शिक्षकांना शिकवायला पुरेसा वेळ मिळत नव्हता. सरकार म्हणत होते की शंभर प्रतिशत विद्यार्थी साक्षर करा. पण ते साक्षर कसे करणार. प्रश्न होता. पूर्णतः साक्षरतेची बोंब होती. परंतू सरकारच्या दृष्टीकोणातून कामासाठी कागदपत्राची पुर्तता करणे गरजेचे होते.
गणेशला सरकारबाबत खरी गोष्ट लक्षात आली होती. ती म्हणजे पुर्तता. सरकारला खरी साक्षरता हवी नव्हती तर कागदपत्रावरील साक्षरता हवी होती. त्यासाठीच ते दररोजच कागदपत्रावर विद्यार्थ्यांचे गोषवारे मागत होते. जे गोषवारे तयार करतांना शिक्षक तसेच मुख्याध्यापकांना पुरेसा वेळ मिळत नव्हता नव्हे तर खरे शिक्षण मुल्यहिन ठरलं होतं.
आज त्याला त्याचं बालपण आठवत होतं. आपल्यालाही आपले शिक्षक शिकवीत नसून ते असं काहीतरी दिवसभर लिहित असल्याचं आठवत होतं. ते लिहिणं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सरकारी रेकॉर्ड व गोषवारेच होते हेही त्याला आज पटत होतं. यातूनच आपलं नुकसान झालं ही खंत आज त्याच्या मनात होती. ज्या खंतेतून त्याच्या मनात उणीव निर्माण झाली होती. ती उणीव आज कधीच भरुन निघणारी नव्हती. कारण ख-या साक्षरतेची खिल्ली उडाली होती नव्हे तर सरकारी कामाच्या व्यस्ततेनं बोंबाबोंब झाली होती.
मुख्याध्यापक शाळेचा कणा असतो. मुख्याध्यापक शाळा वाढविण्याचा केंद्रबिंदू असतो. मुख्याध्यापक शाळेचा अमुक असतो, तमुक असतो. सर्व विधाने मुख्याध्यापकाची प्रशंसा वाढविणारे. खरंच मुख्याध्यापक शाळेचा कणाच. तो नसेल तर शाळा चालत नाही नव्हे तर चालूच शकत नाही. त्याचे कारणंही तसेच आहे. मुख्याध्यापक हा शाळा, प्रशासन, विद्यार्थी, संस्थाचालक, शिक्षक व पालक यामधील मध्यबिंदू असतो. सतत येणारी शाळेची पत्र, त्या पत्राच्या अनुषंगानं मुख्याध्यापकाला सतत डोळे उघडे ठेवून राहावे लागते. त्यातच शासनाच्या आलेल्या पत्रावर अंमलबजावणी करणं हे मुख्याध्यापकाचं काम असतं. त्यातच विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे, पालकांच्या समस्या सोडविणे, तसेच शिक्षकांच्या समस्या सोडविणे, इत्यादी कामे ही मुख्याध्यापकाला करावी लागतात. तसेच मुख्याध्यापक ती कामे करतोही. पण काही समाजकंटक घटक हे मुख्याध्यापकानं कितीही कामं केली, तरी त्या मुख्याध्यापकाच्या कामावर ताशेरे ओढत असतात. त्यात संस्थाचालक, काही शिक्षक, काही पालक आणि काही अधिकारीही असतात.
काही काही शिक्षक हे स्वतःला थोर समजत असतात. ते मुख्याध्यापकाच्या आदेशाचं पालन करीत नाहीत. काही काही शिक्षक हे संस्थाचालकाचे जवळचे नातेवाईक असतात. तेही मुख्याध्यापकाचे आदेश पाळत नाहीत. काही काही पालक असे असतात की तेही मुख्याध्यापकांचे ऐकत नाही तसेच काही काही असे अधिकारी असतात की ते मुख्याध्यापकाला जाणूनबुजून त्रास देत असतात. यातही संस्थाचालकाचा तर त्रास हा जीवघेणाच असतो.
संस्थाचालक हा खरा तर या शिक्षणाच्या प्रक्रियेत महत्वाचा घटक असतो. तो चांगला तर ती शाळा चांगली. त्याचे लाखमोलाचे सहकार्य त्या शाळेला पुढे नेण्यास कारणीभूत ठरत असते. परंतू तो जर विचित्र स्वभावाचा असेल, तर मात्र शाळेच्या अधोगतीला सुरुवात होते.
आज शिक्षणप्रक्रियेत काही बदल घडत आहेत. नवनवे शिक्षणात धोरणं येत आहेत. ते स्विकारणं हे मुख्याध्यापकाचं आद्य कर्तव्य आहे. परंतू या शिक्षणप्रक्रियेत काही संस्थाचालक याला विरोध करतात. ते नवे बदल स्विकारत नाहीत. ते बदल मुख्याध्यापकालाही स्विकारु देत नाही. त्यातच मुख्याध्यापकाच्या कार्याला मर्यादा पडतात.
मुख्याध्यापक हा शिक्षणाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणारा घटक. पण या संस्थाचालकाच्या मर्यादापणामुळं अशा मुख्याध्यापकांना मर्यादा पडल्यानं तो लाचार झाल्यागत संस्थाचालकाच्या हातातील कळसुत्री बाहूल्याप्रमाणे वागायला लागतो. त्यातच तो काय करतो हे त्यालाही कळत नाही. मग संस्थाचालक जे म्हणेल तसं तो वागतो. त्यातच तो वाहवतही जातो.
काही काही संस्थाचालक संस्था स्थापन करतांना त्यांना शाळेचं काही लेनदेन नसतं. त्यांचा केवळ संस्थेच्या माध्यमातून पैसा कमविणं हाच उद्देश असतो. मग असा पैसा कमविण्यासाठी असे संस्थाचालक मुख्याध्यापकांकरवी शाळेतील शिक्षकांकडून देण म्हणून पैशाची मागणी करतात. काही काही मुख्याध्यापक ते कार्य निमुटपणे करतात. काही काही त्याला विरोध करतात. जे विरोध करतात, त्या ठिकाणी मुख्याध्यापक आणि संचालकाची भांडणं होतात. त्यातच मुख्याध्यापकावर अफरातफरीचे आरोप लावले जातात. ज्या शाळेतील मुख्याध्यापक संस्थाचालकाचे असे वागणे सहन करुन आपल्या शिक्षकांना पैशाची मागणी करतात. जर ते शिक्षक पैसे देत नसतील तर असे मुख्याध्यापक शिक्षकांनाही त्रास देतात. अशावेळी ते शिक्षकही मुख्याध्यापकाचं ऐकत नाही. त्यातही काही काही शाळा ह्या अशाच भांडणातून लयास जातात.
आज बहुतेक शाळेत अशीच भांडणं दिसत आहेत. बहुतेक शाळा संस्थाचालक शाळा सडवत आहेत. ते तर शिक्षकांना मुख्याध्यापकाच्या माध्यमातून अतिशय त्रास देत आहेत. देण गोळा करीत आहेत. गब्बर बनत आहेत. जे मुख्याध्यापक अशा संस्थाचालकाचे ऐकत नाहीत. शिक्षकांकडून देण मिळवून देत नाहीत. अशांनाही त्रास देत आहेत.काही काही संस्खाचालकांनी अशाच शाळा सडवलेल्या आहेत.
महत्वाचं म्हणजे शाळा ह्या शिक्षणाच्या केंद्रबिंदू आहेत. शाळेकडे तात्वीक दृष्टिकोणातून पाहावं. कारण शाळेच्या वर्गखोल्यातून देशातील आदर्श नागरीक घडत असतात. मग ते मुख्याध्यापक असो की संस्थाचालक असो की कोणीही असो. प्रत्येकानं आपली आदर्श भुमिका अदा करावी. पैसे कमविणे हा उद्देश नसावा. मुख्याध्यापकानंच नाही तर संस्थाचालकानंही शिक्षणक्षेत्रात सेवा करावी. तसेच मुख्याध्यापकांनी संस्थाचालकापुढं लाचारपणानं वागू नये. संस्थाचालकानंही मुख्याध्यापकांना लाचार बनवू नये. जेणेकरुन शिक्षणक्षेत्र पवित्र होईल व शिक्षणाचा विकास करता येईल तसेच आदर्श विद्यार्थी घडवता येतील व विद्यार्थ्यांतून आदर्श नागरीक घडवता येईल. ज्यातून देशाचा विकास होईल. देश सुसंस्कृत बनेल व जगात आपल्या देशाचे नाव होईल हे तेवढंच खरं आहे.
श्यामपूर नावाचं शहर. त्या शहरात ती एक लहानशी शाळा. ज्या शाळेचं नाव रामभाऊ प्राथमिक शाळा होतं. त्या शाळेतील शिक्षक हे सुखी नव्हते. ते गुलाम असल्यागत मुख्याध्यापकाच्या मनाने चालत होते. मुख्याध्यापक महोदय हे स्वतःला शहंशाह समजत होते. त्यात कारणही होतं.
त्या शाळेला एक मालकही होता. ज्याला संचालक म्हणत असत. त्याचा उद्देश फक्त पैसा कमविणे होते. त्यासाठी तो कोणत्याही स्तराला जावू शकत होता नव्हे तर आपल्या शाळेतील शिक्षकांवर आरोप लावू शकत होता. ते आरोप लावून त्यानं कितीतरी कर्मचारी नोकरीवरुन काढून टाकले होते.
मुख्याध्यापक हा संचालकाचा नातेवाईक होता. तो संचालक महोदयाच्या मतानं चालत होता. वागत होता. तो संचालक महोदयाच्या म्हणण्यानुसार शाळेतील शिक्षकांकडून पैसा उकळत होता. आपल्या शाळेतील शिक्षकांना वेठीस धरत होता. गुलामागत वागवत होता.
गणेश हाही त्याच शाळेत शिक्षक होता. त्याला वाटत होतं की मुख्याध्यापक विनाकारण त्यांना त्रास देतोय. त्याला माहित नव्हतं की यात संचालक महोदयाचा सिंहाचा वाटा आहे. तसं त्याला पत्र येताच तो त्यांनाही त्रास देत होता. त्या मुख्याध्यापकाची मानसिकता खराब करीत होता.
दिवसामागून दिवस जात राहिले. काळ सरकता झाला व निसर्गाच्या विधीनुसार मुख्याध्यापक मरण पावला व त्या ठिकाणी त्या शहरातील बड्या अधिका-यानं त्याची नियुक्ती संचालकाचं न ऐकता मुख्याध्यापकपदी केली व तो मुख्याध्यापक बनला.
गणेश मुख्याध्यापक बनला खरा. परंतू त्यानं मनाशी ठाणलं होतं. आपण कोणाला त्रास द्यायचा नाही. कोणाला अपशब्द बोलायचे नाही. तो शांत होता. संयमी होता. परंतू त्याला त्या शाळेतील काही शिक्षक जळत होते. जे संचालक महोदयाचे जवळचे नातेवाईक होते.
गणेशचं चांगलं वागणंही त्यांना खपत नव्हतं. संचालक त्याला सहकार्य करीत नव्हता. तसे ते नातेवाईकही त्याला त्रास देत होते. त्याच्यावर वेगवेगळे आरोप लावून वेगवेगळ्या आरोपाचे पत्र पाठवीत होते. कारण त्यांना संचालक महोदयांनी पदाची लालसा दाखवली होती. त्याच माध्यमातून आता त्याला त्या पदावरुन दूर करण्याचे प्रयत्न सुरु होते.
गणेशला आता पुर्वीचा काळ आठवत होता. ज्या काळात त्याचा मुख्याध्यापक त्यांना त्रास देत होता. आता त्याला कळलं होतं की तो मुख्याध्यापक त्याला का बरं त्रास देत असेल.
गणेशला आता पदाचं महत्व समजलं होतं. त्याला त्रास होत होता. त्यातच त्यानं परीस्थीतीनुसार आपला स्वभाव बदलवला होता. परंतू आता त्याला कळलं होतं की जे सरळ आहेत. आदेश ऐकतात. त्यांचं ठीक. परंतू जे ऐकत नाही त्यांना वठणीवर आणणे.
आज गणेशही दिवंगत मुख्याध्यापकासारखा शहंशाहच बनण्याची स्वप्न पाहात होता. या स्वप्नात संचालक त्याला वेळोवेळी घाबरत होता नव्हे तर त्याचे सहाय्यक सहकारीही त्याला घाबरत होते. जणू परिस्थीतीनंच त्याला ते सगळं शिकवलं होतं आणि हेही शिकवलं होतं की सरळ बोटानं तूप निघत नाही. त्यासाठी करंगळी वाकडी करावी लागते. तसेच आता सरळ वागण्याचा काळ नाही. परिस्थीतीनुसार बदलावंच लागतं. परंतू ते स्वप्न होतं. त्यात किंचीतही वास्तविकता नव्हती.
गणेश जेव्हा मुख्याध्यापक बनला. तेव्हा सरकारी योजना येत. गणेश त्या योजनांवर अंमलबजावणी करीत असे. अशातच कोरोना काळ आला. शाळा बंद झाल्या. विद्यार्थी शाळेत येणं बंद झालं. लाकडाऊन लागलं व सगळी पालकमंडळी घरी बसली. त्यातच हाताला काम नसल्यानं पालकांची उपासमार व्हायला लागली. यातच पालकांनी एक उपाय शोधून काढला. शाळा बंद असल्यामुळे तो उपाय हमखास चालणार होता.
पालकांनी या कोरोना काळात ज्या शाळेत मुलं शिकत होती. त्या शाळेला टिस्या न मागता आपल्या मुलांची नावं प्रतिज्ञापत्रावर व गुणपत्रीकेवर दुस-या शाळेत टाकली. दोन्ही शाळेचे ऑनलाइन अभ्यास पुर्ण केले. पुस्तकाही उचलल्या. त्यातच तांदूळही. ह्याच गोष्टी शासनाच्या लक्षात आल्या व पुढे शासनानं आधारकार्ड अनिवार्य केलं. कारण त्यांना नेमकी मुलं कोणत्या शाळेत जातात हे शोधायचं होतं.
तांदूळ देणे, अनूदान देणे, शिष्यवृत्या देणे या शासनाच्या योजना. या योजनांचा लाभ घेवून कोट्याधीश झालेले संचालक आज कमी नाही. मागे एकदा पटपडताळणी झाली होती. ती शासनानं केली होती. त्यात असे आढळले होते की काही शाळा कागदावरच होत्या. त्या स्थावर स्वरुपात अस्तित्वातच नव्हत्या. आजही तीच स्थिती होती, सरकारच्या मालावर डल्ला मारणा-या संचालकांनी असा पैसा कमविण्यासाठी वेगळा मार्ग शोधला होता. तो म्हणजे एकच एक विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेत दाखवून. त्यातच या कोरोना काळात त्यांना लाभही झाला. जो विद्यार्थ्यासाठी तांदूळ आला. तोच तांदूळ पालकांनी आपल्या मुलांच्या मार्फत दोनचार शाळेतून गोळा केला. तो विकला व शासनाच्या पैशाचा सर्रास अपहार झाला. कारण कोरोनाच्या महामारीच्या काळात शाळा बंद होत्या. कोणता विद्यार्थी कोणत्या शाळेत जातो तेच कळत नव्हते. म्हणून ही आधार योजना.
कोरोना महामारीचा काळ. या काळामध्ये एकीकडे सरकार जास्त गर्दी करु नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा इत्यादी सुचना देत होते तर दुसरीकडं सरकारचे धोरण राबविणारी यंत्रणा शाळेत शिकणा-या विद्यार्थी वर्गाला आधारकार्ड काढायला लावत असून यामुळे निदान आधारकार्ड काढणा-या केंद्रावर तरी प्रचंड गर्दी होणार होतीे.
आधारकार्ड असणे ही एक चांगली योजना आहे. तसेच ती नंबरं अपडेट करणं प्रत्येक शाळेला बंधनकारक असावं. कारण आज एकच विद्यार्थी या कोरोनाच्या काळात दोन दोन, तीन तीन शाळेत शिकत असतांना दिसून येत असून सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळं अशी स्थिती दिसून येत आहे. सरकारनं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होवू नये म्हणून त्यांनी शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जरी शाळेला नाही दिलं तरी त्यांचा शाळेत प्रवेश होवू शकतो. या आधारावर विद्यार्थी आपला प्रवेश संबंधीत प्रमाणपत्र नाही मिळाले तरी पालकांच्या प्रतिज्ञापत्रावर वा गुणपत्रिकेवर एकापेक्षा जास्त शाळेत प्रवेश घेतलेला होता. हे केवळ आधारकार्डच्या द्वारे शासनाला विद्यार्थी पोर्टलच्या माध्यमातून कळलं. त्यातच आजच्या काळात पटसंख्येची मारामार असलेल्या शाळांनी असे विद्यार्थी प्रवेश नोंदवले व आपला पट वाढवला हेही शासनाच्या लक्षात आलं होतं. काही शाळेनं या कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांचे मोबाइल नंबर मिळवून शाळा प्रवेश केले आणि ऑनलाइन शाळेला विनंती पाठवून शाळा सोडण्याच्या प्रमाणपत्राची मागणी केली. परंतू त्यात त्यांचा निर्णय फसल्याची चिन्ह दिसली. कारण पालकांना ही नवीन शाळा माहितच नव्हती. शिवाय पालकांना त्यांच्या मुलांना जुन्याच शाळेत ठेवायचे होते. त्यांनी कोणत्याही स्वरुपाचे टिसी काढण्याचे अर्ज केलेले नव्हते.
कोरोनाचा हा संक्रमीत काळ. बरीचशी मुलं ही ज्या शाळेत होती. त्याच शाळेत शिकत होती. काहींनी घरं जरी बदलवली तरी शाळा बदलवली नाही. बरीचशी मुलं स्थानांतरीतही झाली नाही. त्यातच ब-याचशा मुलांच्या पालकांनी हुशारी करुन दोन्ही शाळेत नाव टाकलं. दोन्ही शाळेतून आपल्या मुलांसाठी शासनानं पाठवलेला तांदूळ उचलला. त्यातच दोन्ही शाळेतून पुस्तकाही उचलल्या. त्यातच काही खाजगी समाजसेवकांनी शाळेतील मुलांना सेवेचं दान म्हणून दिलेल्या योजनांचा लाभ उचलला. पण हे काही लक्षात येत नव्हतं. हे आधारकार्डच्या माध्यमातून लक्षात आलं. अशा कितीतरी शाळा अशा दिसल्या की त्या शाळेत असा एकच विद्यार्थी दोन रुपात आढळला. त्यावरुन विद्यार्थ्यांचं आधारकार्ड शाळेला अनिवार्य असावं असं वाटलं. त्याचं एकमेव कारण म्हणजे हा शासनाच्या योजनांचा शाळेच्या बाबतीत होणारा अपहार. त्यातच सरकारच्या पैशाचं नुकसान. कारवाई शिक्षकांवर......पालकांवर की अजाण बालकांवर........असे प्रश्न निर्माण झाले. त्यातच काही महाभाग म्हणाले की आधारकार्ड हे या कोरोना काळात सक्तीचे करु नये. विद्यार्थ्यांचे वय लहान आहे. त्यांचंही बरोबर आहे. कारण कोरोना हा कोणाला सोडत नाही. लहान मुल असो की मोठी माणसं. तो एखाद्याला झाला की अख्खा प्रदेश व्यापतो. ठीक आहे. तेही बरोबर आहे. परंतू हे जरी खरं असलं तरी आगामी काळात अशा पालकांवर कार्यवाही व्हावी असं गणेशला वाटत होतं. ज्या पालकांनी एका शाळेतून आपल्या मुलाचं नाव न कापता शासनाच्या योजनांचा अपहार करण्यासाठी दुस-या शाळेत नाव दाखल केलं. मग ते प्रतिज्ञापत्रानं का असेना की गुणपत्रिकेनं का असेना. संकटकाळात अपहार झालाच ना. मग ती वसूली व्हायला नको का? आज विद्यार्थ्यांचं आधारकार्ड शाळेला विद्यार्थी पोर्टलच्या नावावर जोडायला लावल्यानं हा घोळ सापडला. नाहीतर असाच घोळ अजूनही कायम राहिला असता आणि तो अद्यापही शासनाच्या लक्षात आला नसता असं म्हणायला काहीच हरकत नाही.
अलिकडे काँन्व्हेंटचं प्रस्थ वाढलं. त्यातच कोरोना वाढला आणि लाकडाऊन लागलं. त्याचा परीणाम पालकावर झाला. चांगले चांगले उद्योग बुडाले. काही पालक वेठबिगार ठरले. मग काय काहींनी आपल्या मुलांना काँन्व्हेंटमधून काढून साध्या मराठी शाळेत आणून टाकलं. कारण उपाय नव्हता. तसेच पालकही काय करणार होते. पैसाच नव्हता.
मुलांचा शाळेत प्रवेश झाला. आधीच विद्यार्थ्यांची वानवा असल्यानं शाळेनं त्यांचा प्रवेशही करुन घेतला. ते सरकारचं धोरण होतं. प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे. दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. तसा प्रवेश झाला. कारण त्यांना शाळेत प्रवेश करण्यासाठी कोणत्याच कागदपत्राची मारामार नव्हती. परंतू यात एक समस्या निर्माण झाली ती म्हणजे त्या मुलाचा रितसर प्रवेश.
सन दोनहजार वीसमध्ये कोरोना रौद्ररुप घेवून आला. तसा काँन्व्हेंटच्या शाळेला विचार आला की शाळा चालवायची कशी? त्यातच काही पालकांनी पैसे भरले नाहीत. मग पुन्हा प्रश्न चिघळला. त्या शाळेतील शिक्षकांनी जगायचं कसं? तसे संस्थाचालक मालदार. त्यांना वाटलं आपलं नुकसान होतंय. त्यामुळं की काय, त्यांनी आपली बाजू न्यायालयात मांडली व न्यायालयानं निकाल दिला की अशा काँन्व्हेंटच्या शाळेनं फी वसूल करावी.
आधीच गरीबीतील काही पालक. त्यांनी पोटाला चिमटा देवून कसंतरी आपल्या पाल्यांना काँन्व्हेंटला टाकलं. उच्च शिक्षण घेता यावं. परंतू कोरोनाच्या या काळात चांगली चांगली कमावती मंडळी मरण पावली. घरची सर्व जबाबदारी ही त्या घरच्या महिलांवर आली व ती हतबल ठरली.
कोरोनाच्या या परिस्थीतीत न्यायालयानं मातब्बर शिक्षण सम्राटांचा विचार केला. परंतू त्या शाळेत पोट कापून शाळेत पैसे भरणा-या पालकांचा विचार केला नाही. त्यातच आर टी ईच्या कक्षेत गरीबांच्या मुलांना बसवलं गेलं नाही. खोटी खोटी उत्पन्नाची प्रमाणपत्र बनवून पालकांनी आपली मुळ इनकम लपवून आर टी ई चा फायदा घेतला. पण ज्या पालकांना खरंच गरज होती. ते पालक मंडळी अशा प्रकारच्या सवलतीपासून वंचित राहिले. शेवटी प्रश्न त्यांच्यासाठीच उभे राहिले. सरकारी शाळेनं सांगीतलं की आम्ही प्रवेश देतो. पण हा तात्पुरता प्रवेश असेल. कायम स्वरुपी नाही. टिसी आणावीच लागेल. पालकाच्या होकारानंतर शाळा प्रवेश झाला. परंतू वर्ष संपलं तरी त्या मुलांच्या टिस्या आल्या नाहीत. प्रवेश तर झाले होते. शेवटी प्रवेश जरी झाले असले तरी टिसी न आल्यानं विद्यार्थ्यांचं नाव विद्यार्थी पोर्टलवर चढलं नाही. मग फार मोठी समस्या. मुलांना वरच्या वर्गात पाठवायचं कसं? त्यातच आधार कार्डची सक्ती. काय करावं सुचत नव्हतं.
आधारकार्डमध्येही शाळांनी घोळ केले. एकच आधारक्रमांक वेगवेगळ्या शाळेत दिसला. तसाच त्याच नावाचा विद्यार्थी त्या शाळेत दिसला. यावरुन पुन्हा समस्या. एकच मुलगा धान्य मिळविण्यासाठी कोरोनाच्या काळात वेगवेगळ्या शाळेत जातो. सर्व पालकाचा प्रताप. पण ते तरी काय करणार. कारण कोरोना काळात आर्थीक उपासमार. तिचा सामना कसा करावा यासाठी पालकांनी तोडगा काढला. परंतू काँन्व्हेंट शाळेच्या शुल्काचं काय? न्यायालयाच्या आदेशानुसार शुल्क दिल्याशिवाय टिसी देत नाही. तिथंच पालक अडकले. काहींचे पती मरण पावल्यानं महिला हतबल ठरल्या. त्यातच विद्यार्थी मागं पडले. त्यांचं शिक्षण ख-या अर्थानं पुढं सरकू शकलं नाही. यात दोष कोणाचा?
दोष न्यायालयाचा की सरकारचा की पालकांचा की कोरोनाचा. सर्वजण पुढे त्या विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानावर पाय झटकणार आहेत. दोष कोरोनावर लावणार आहेत. कारण ते मनुष्य आहेत. ते म्हणतील की आम्ही मनुष्यप्राणी. चुका होणारच. कोरोना यायलाच पाहिजे नव्हता. परंतू मला म्हणायचं आहे की कोणतीही परिस्थीती ही सांगून येत नाही. सुखानंतर दुःख येतं. दुःखानंतर सुख.समजा एखादा व्यक्ती अचानक गरीब झाला. त्याचा व्यापार अचानक बुडाला. तर अशांचे पालक काँन्व्हेंच्या शाळेचं शुल्क भरु शकतील काय? त्याचं उत्तर नाही असंच आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करावं? ही विचार करायला लावणारी बाब आहे.,खरं तर त्या विद्यार्थ्यांचे पैसे माफ करुन शासनानं पुढचा मार्ग काढावा. परंतू शासनही मला काही लेनदेन नाही असा विचार करुन चूप बसतं. त्यातच विद्यार्थ्यांचं,नुकसान होतं. शेवटी तो विद्यार्थी कितीही हुशार असला, कितीही त्याची शिकायची इच्छा असली तरी तो मागे पडतो. शाळा सोडतो व वाममार्गाला लागतो नव्हे तर विचार करायलाही भाग पाडतो.
अशीच एक मुलगी. तिच्या पालकावर आर्थिक संकट आलं. त्यांनी गुणपत्रिकेच्या आधारावर त्या मुलीचा प्रवेश साध्या सरकारी शाळेत केला. मात्र तीन वर्ष होवूनही तिची टिसी त्या मुलीला मिळाली नाही. ती त्या शाळेत टिसी मागतच राहिली. पण ती शाळा न्यायालयाच्या आदेशानुसार आपले शुल्क मागत राहिली. आता ते शुल्क भरायला ती मुलगी सक्षम नाही. त्या मुलीला शिकायची इच्छा आहे. तशी ती हुशारही आहे. पण ती सरकारच्या अशा वागणूकीपुढं विचार करतेय. त्या मुलीचं नुकसान होणारच. कारण ती काँन्व्हेंटचे पैसेच भरु शकत नाही. वरीष्ठांनाही विचारलं असता तेही टोलवाटोलवीचं उत्तर देतात.
शिक्षणात टोलवाटोलवीची उत्तरं. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. असं डॉक्टर बाबासाहेब म्हणतात. पण आजच्या काळात अशा काँन्व्हेंट शाळेतील शुल्काच्या मुजोरीनं कसं मिळणार? अर्थातच आज शिक्षण हे गरीबाचं राहिलेलं नाही. ते धनिकांचीच मक्तेदारी झालेली आहे. तसं पाहिल्यास सर्व शिक्षणतज्ञ शिक्षणाबाबत वेगवेगळी समीकरणं मांडतात. पण ती समीकरणं बंद कम-यातून तयार केली जातात. तसेच जो अभ्यासक्रमाचा आकृतीबंध तयार केला जातो. तोही बंद कम-यातून. वास्तविक जीवनातून नाही. असा अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी व समीकरणं मांडण्यासाठी साधारणतः वास्तविक जीवनात जे जगतात. अशा शिक्षणतज्ञाची गरज असते. ती गरज सरकार पुर्ण करु शकत नाही. त्यामुळं अशा शैक्षणिक धोरणात उणीवा राहतात व उणीवा निर्माण होतात हे तेवढेच खरे आहे.
ते पावसाचे दिवस होते. गणेश घरातून बाहेर पडला. तोच त्याची आई म्हणाली,
"बापू अंदर हो."
गणेशनं ते ऐकलं. परंतू तो काही आतमध्ये झालाच नाही. तोच त्याचा बाप एक काठी घेवून बाहेर निघाला. तोच गणेशला त्यानं पायावर काठी मारताच गणेशचा जीव तळमळला व तो आतमध्ये झाला.
गणेशला मायबापाचा राग आला होता. गणेशच्या मायबापाचं बरोबर होतं. कारण पावसात भिजताच प्रकृती खराब होणार होती. त्यासाठी मायबाप ओरडले होते.
गणेशला मायबापाचा राग आला. तसं त्याला वाटलं, आपण गुरुजी व्हावं. कारण आपले बाबा गुरुजीचं ऐकतात. सारे विद्यार्थीही गुरुजीला मानतात. तेव्हा शिक्षक बनावं.
आपण शाळेत जावं. असा विचार करुन आता तो शाळेत जावू लागला. चांगला अभ्यास करुन तो बारावीला गेला. तशी त्यानं बारावीची परीक्षा दिली.
ते उन्हाळ्याचे दिवस होते. गणेश बारावीला होता. आज त्याचा बारावीचा निकाल लागला होता. तसा गणेशनं बारावीचा निकाल हाती घेतला व तो पुढील शिक्षणासाठी फार्म भरण्यास रवाना झाला. तोच त्याला त्याचा एक जुना मित्र भेटला. म्हणाला,
"गणेश काँग्रेच्युलेशन. पास झालास."
"धन्यवाद मित्रा." गणेश म्हणाला.
"आता काय करणार?"
"काय म्हणजे? कॉलेज करणार. दुसरं काय?"
"नको."
"का बरं?"
"अरे नोकरीचं बघ."
"म्हणजे?"
"अरे डी एड कर. मास्तर हो."
"का बरं?"
"मास्तरकी बरीच चांगली. लवकर नोकरी लागते आणि लवकरच पगार सुरु होतो. एवढंच नाही तर सुट्ट्याही भरपूर. मजाच मजा. त्रासच नाही."
गणेशला मित्राची गोष्ट पटली. तसं त्यानं मास्तर बनावं असं ठरवलं होतं. त्यानं मित्राचं ऐकलं व त्यानं डी एडला प्रवेश घेतला व थोड्याच दिवसात तो एका खाजगी शाळेचा मास्तर झाला.
काही दिवस बरे गेले. पण काही दिवसातच मास्तरकी त्याला जड जावू लागली. तिथे वेगळाच त्रास सुरु झाला. त्या शाळेचा मुख्याध्यापक संचालकाशी संगनमत करुन त्याला पैशासाठी त्रास देत होता. तसं आता वाटत होतं की मुख्याध्यापक बरा असतो. त्याला त्याच्या मनमौजीपणानं वागता येतं.
शाळा........वाटत होतं की शाळेत सुखाचे दिवस असतील. पण तेथील होत असलेले अत्याचार पाहून अगदी जीव वैतागला होता. काय करावे सुचत नव्हते. मरणप्राय वेदना होत होत्या. अगदी वैताग आला होता केवळ पत्राचा. रोजची पत्र येत होती. त्यामुळं जीव अगदी घायाळ झाला होता. त्याला असं वाटत होतं की आपण मुख्याध्यापक बनावं. मुख्याध्यापक बनलो तर आपल्याला आपल्या मनासारखं वागता येईल.
गणेश विचार करीत असतांना अचानक त्या शाळेचा मुख्याध्यापक मरण पावला व गणेश मुख्याध्यापक बनला. तसं त्याला हायसं वाटलं.
गणेश मुख्याध्यापक बनला खरा. पण तो पदाला न्याय देवू शकत नव्हता. त्याला त्या पदाबाबत वाईट वाटत होतं. कारण तो मुख्याध्यापक हा त्या शाळेतील संस्थाचालकाला चालत नव्हता. त्याचं कारणही तसंच होतं.तो काही संचालकाचा नातेवाईक नव्हता.
गणेश मुख्याध्यापक बनला. परंतू त्याला संचालकाने मुख्याध्यापक बनवले नसल्याने आज त्या शाळेचे कुलूपंच उघडत नव्हते नव्हे तर त्याला शाळा संचालक चाबीही देत नव्हता. एवढंच नाही तर तो शाळा संचालक त्याला शाळेचा रेकॉर्डही देत नव्हता. पत्रे मात्र काळजीनं पाठवत होता. तसेच त्या पत्रात आपण चार्ज घेत नाही असं खोटंच लिहित होता. त्यातच संचालकाच्या मर्जीतील काही मंडळीही त्याला काहीबाही बोलून त्याचा अपमानच करीत होते. त्यातच काय करावं आणि काय नको असं त्याला होवून जात होतं.
ते पावसाळ्याचे दिवस होते. वरुण देव सारखा कोसळत होता. त्यातच शिक्षक हे ओलेही होत होते. त्याची चिंता गणेशला पडत होती. तो शिक्षकांना ओले होत पाहू शकत नव्हता. त्यातच त्याला जुने दिवस आठवत होते की आपण शिक्षकच बरे होते. निव्वळ आपल्यामुळं या शाळेतील शिक्षकांना त्रास होत आहे. यासाठी त्याच्या डोळ्यातून आसवे निघत होती.
शिक्षकांना एकीकडे त्रास होत असतांना व त्याचा त्रास गणेशला होत असतांना संचालकाच्या नात्यातील काही लोकं हे आपल्या आपल्या मर्जीनं वागत होते. ते संचालक जे म्हणेल तसे करीत होते नव्हे तर ते गणेशला पत्रही पाठवत होते. म्हणत होते की आम्हीही तुमचं ऐकू. मात्र तुम्ही आमची व्यवस्था उत्तमप्रकारे करावी.
गणेश व्यवस्थेचा बळी ठरला होता. तो कोणालाही चांगली सोय करुन देवू शकत नव्हता. त्याचं कारण होतं. ते म्हणजे संचालक. त्याला वाटत होतं की एखाद्या बापानं एखाद्या मुलाला घरातून हाकलल्यास व त्या घरावर संकट आल्यास आणि त्यांना रस्त्यावर राहायची पाळी आल्यास त्याच्या पत्नीनं त्याला व त्याच्या लेकराला रस्त्यावर सोडून मायबापाच्या घरी जावं. असे संचालकाचे काही नातेवाईक त्याच आविर्भावात वागत होते. मात्र गणेश शांतपणे ते सगळं सहन करीत होते. तसं पाहता गणेश हा उच्चतम सर्वच अधिका-यांना पत्र लिहित होता.
गणेश परेशान होता. तसे ते शिक्षकही. तो पाऊसही फितूर झाला होता. परंतू नियती कोपली नव्हती. ती सर्व पाहात होती. संचालकाचा रोषही नियती सहन करीत होती.
असंच ताटकळत उभं राहात असतांना एक दिवस पोष्टमेन शाळेत आला. तो संचालकाला विचारु लागला. त्यानं संचालकाच्या हातात एक लिफाफा थोपवला. वाटत होतं की काहीतरी सरकारी आदेश आहे.
संचालकानं लिफाफा फोडला आणि वाचून तो आश्चर्यचकीत झाला. गणेशच्या पत्राची दखल वरच्या स्तरावर घेतली गेली होती. सरकारी माणसं येणार होती.
दोनचार दिवसातच सरकारी माणसे आली. त्यांनी संचालकाला न जुमानता दरवाजाची कुलूपं तोडली. तसं पाहता सर्व रेकॉर्डही मिळवून दिला.
सरकारी माणसं. त्यांची अरेरावी. ती अरेरावी पाहून संचालक चिडला. त्यानं त्यांची तक्रार न्यायालयात नेली. काही दिवस खटला चालला व एक दिवस न्यायालयाचा निकाल आला. ती शाळा त्या संचालकाकडून काढून एका चांगल्या शाळेत न्यायालयानं हस्तांतरीत केली होती.
आज शिक्षक खुश होते. कारण नवीन संचालक चांगल्या स्वभावाचा होता. तो गणेशच्या अंगातील चांगल्या गुणांचा पुरेपूर उपयोग घेत होता. मात्र आज जुना संचालक पश्चाताप करीत होता. त्याच्याच करणीनं आज त्याच्या हातून एक चांगली शाळा निघून गेली होती. गणेशसारख्या इतर कलावंत शिक्षकांसह.......
शिक्षक.......शिक्षक हा सहनशील व्यक्तीमत्वाचा धनी आहे. त्याचेवर संचालक, मुख्याध्यापक, प्रशासन, पालक व विद्यार्थी यासारखे सर्वच घटक अत्याचार करीत असतात. तरीही तो ते अत्याचार निमुटपणे सहन करीत असतो. बदल्यात त्याला काहीही मिळत नाही.

******************************************

श्यामपूर नगरातील ती एक शाळा. त्या शाळेत गणेश एक मुख्याध्यापक होता. तो मुख्याध्यापक इमानदार होता. असा इमानदार की त्याचं कोणाशीच त्या इमानदारीवरुन पटेना. त्यातच त्याच्या इमानदारीवरुन त्याचं त्या शाळेतील संचालकाशी पटत नव्हतं. त्यातच ती अशीही शाळा की ज्या शाळेतील तो मुख्याध्यापक शाळा संचालकाला त्रासून अगदी वैतागून मरण पावला.
मुख्याध्यापक मरण पावला खरा. पण त्या मुख्याध्यापकावर संचालकाकडून होत असलेला अत्याचार हा तेथील शिक्षकांनी अगदी जवळून पाहिला होता. त्यामुळं की काय, आता त्या शाळेत गत मुख्याध्यापकाच्या मृत्यूनंतर कोणीही मुख्याध्यापक बनायला तयार नव्हतं. त्यातच संचालक महोदयानं एका जेष्ठ शिक्षीकेच्या नावाची परवानगी आणून तिला मुख्याध्यापिका बनवले.
ती जेष्ठ शिक्षीका. ती मुख्याध्यापिका बनली खरी. पण तिला मुख्याध्यापक बनणे आवडत नसल्यानं तिनं पदभार स्विकारला नाही. त्यातच तिनं तो पदभार नाकारला. परंतू तिचं पदभार नाकारणं त्या शाळेतील संचालकाला मान्य नव्हतं. त्यामुळं की काय, संचालक तिच्यावर दबाव टाकत होता.
रोजच संचालकाचे दबाव टाकणे सुरु असल्यानं वाद चिघळत गेला. त्यातच चिघळता वाद लक्षात घेवून त्याच नगरातील त्या शाळेत एक शिक्षक पुढे आला. त्याचं नाव होतं गणेश.
गणेश हुशार होता. शिवाय तो त्यापुर्वी संचालकाशी पत्रानं लढलाही होता. त्याला संचालकाशी कसं लढावं याचा अनुभव होता. तो पुढं येत म्हणाला,
"मी तयार आहे मुख्याध्यापक बनायला. पण एक अट आहे. जर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहात असाल तर. तसं पाहता मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही."
गणेशचं बोलणं सर्वांनी ऐकलं. त्यातच सर्वांनी त्या गोष्टीला होकार दर्शवला व संचालकाला काहीही माहित होवू न देता योग्य ती कारवाही करुन घेवून गणेश मुख्याध्यापक बनला.
गणेश आता मुख्याध्यापक बनला होता. त्याची कल्पना संचालकाला नव्हतीच. तशी जेव्हा संचालकाला याची माहिती मिळाली. तेव्हा संचालकाला जबर धक्काच बसला. त्यातच त्याला काय करावं आणि काय नको हे सुचेनासे झाले. त्यातच तो बावचळला. तो आता गणेश विरुद्धचे बारकावे शोधू लागला. त्यातच त्या सर्व शिक्षकांचे. जे शिक्षक गणेशच्या बाजूला उभे होते.
ती श्यामपूर नगरातील शाळा. त्यातच बावचळलेला संचालक. तो संचालक आता गणेश व त्या शिक्षकांविरोधात शिक्षणविभागाला पत्रावर पत्र देवू लागला. त्यातच त्याला त्याचेच काही नातेवाईक मदत करु लागले. कारण त्याने त्यानंतर आपल्या नातेवाईकांना मुख्याध्यापक बनविण्याचे आश्वासन दिले होते.
शाळेचा तो संचालक. ती शाळा त्या शिक्षकांच्या भरवशावरच त्यानं बांधली होती. त्या शिक्षकांच्या देणगीतून येणा-या पैशानं तो माजून गेला होता. त्यातच रोजच्या पत्राच्या फैरी पाहून शिक्षकही बावचळून जात होते. त्यातच संचालक महोदयानं एक युक्ती काढली. तो त्यांना शाळेच्या बाहेर ठेवू लागला. त्यामुळं शिक्षकांना काय करावं ते कळत नव्हतं. तरीही ते त्रास सहनच करीत होते. तसेच ते शाळेच्या बाहेरच उभे राहात होते.
रोजच शिक्षकांचे ताटकळत उभे राहणे, रोजच पावसाचा मारा सहन करणे, रोजच शौचालयाचा त्रास सहन करणे आणि रोजच संचालकाच्या वर्तणुकीचे बळी होणे शिक्षकांना अतिशय वेदना देवून जात होते. रोजचा त्रास. त्यातच होणारी दमछाक. शिक्षकांना जगावेसे वाटत नव्हते. गणेशलाही काही सुचत नव्हतं. शिक्षणाधिका-यांनाही तक्रारी देवून पाहिल्या. पण काही उपयोग झाला नाही. शाळा काही खुलत नव्हती. शिक्षक रोजच त्रस्त होत होते. मार्ग निघत नव्हता. रमाकांतला मात्र पदोपदी विचार येत होता.
गणेश कधीकधी विचार करायचा की या संचालकाला मारुन टाकावे. जेणेकरुन सर्व शिक्षकांना दिलासा मिळेल. मला प्रसंगी कैद होईल. पण सगळे शिक्षक सुखी तर होतील. परंतू तो त्यावरील उपाय नव्हता. मात्र शिक्षकांचे होणारे हे हाल निसर्गदेवता पाहात होती. त्या शिक्षकांचे पावसात भिजणेही निसर्गदेवता पाहात होती.
अशातच झिका व्हायरसचा देशात शिरकाव झाला. बघता बघता झिका व्हायरस राज्यात आला आणि आता तो त्या नगरातही. ज्या नगरात तो संचालक आग ओकत होता.
कोरोनाचा काळ होता. सगळीकडे शाळा बंद होत्याच. त्यातच शाळेत पन्नास टक्क्यानीच शिक्षकांनी शाळेत यावे असे सरकारचे आदेश सुरु होते. तरीही केवळ पोटासाठी या शाळेतील शिक्षक शाळेत येतच होते. पोटाची गरज मोठी होती. त्यांनाही झिका व्हायरसची भीती होतीच. तरीही शाळा बंद असली तरी शाळेचे कुलूपं उघडत नसले तरी ते शिक्षक केवळ पोटासाठी शाळेत येतच होते.
झिका व्हायरस श्यामपूर नगरात आला. तो त्या शाळेकडे भटकला. त्यानं घडत असलेला प्रकार न्याहाळला. त्यानं परिस्थीती न्याहाळली. त्याला सत्य उमगून आले व तो संचालकाच्या घरी गेला.
आज संचालक आपल्या परीवारासह झिका व्हायरसनं बाधीत झाला होता. त्याला सर्वकाही आठवत होतं. केलेला प्रकारही आठवत होता. पण आज उपाय नव्हता. कारण आज संचालकाला त्यानं केलेल्या पापाची शिक्षा द्यायला झिका व्हायरस सज्जगतेनं त्या ताटकळत असलेल्या शिक्षकांना मदत करायला आला होता. तसेच त्या माजलेल्या संचालकाला धडा शिकवायला आला होता.
संचालक झिका व्हायरसनं त्रस्त होता. परीवारही खजील झाला होता. पण परीवारानं त्या झिका व्हायरसच्या संक्रमणानं बोध घेतला होता की चांगले कर्म हीच आयुष्याची शिदोरी आहे.
आज शाळेचे कुलूपं उघडले होते. त्या शाळेची भरभराट झाली होती. कारण त्या शाळेला संचालकाचा परीवार आवर्जून मदत करीत होता. गणेशही खुश होता. परंतू संचालक अद्याप खुश नव्हता. तो वारंवार पत्र लिहित होता. त्याच्या पत्राने शिक्षणाधिकारीही त्रस्तच होता.
*************************

कोरोना व्हायरस आला आणि त्याचा परीणाम जनजीवनावर झाला. त्यातच लाकडाऊन लागलं आणि शेकडो लोकांचे रोजगार बुडाले.
कोरोना व्हायरसचा परीणाम ज्याप्रमाणे लोकांवर झाला. त्याचप्रमाणे तो विद्यार्थ्यांवरही झाला. त्यातच त्यांच्या शिक्षणावर. त्यानंतर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास लक्षात घेवून सरकारने ऑनलाइन अभ्यासाचा पर्याय काढला. त्यातच शिक्षकांनी मागील वर्षी ऑनलाइन अभ्यास शिकविण्यास प्रारंभ केला.
यावर्षी मात्र कोरोनाच्या साथीचा विचार करुन सरकारने ऑनलाइन शाळा सुरु केली. त्यातच पन्नास टक्के उपस्थीतीची अट टाकली. मग अभ्यासक्रम सुरु झाला व शिक्षकही शाळेत जावू लागले. त्यातच काही शिक्षणाधिकारी साहेबांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा विचार न करता शाळा दुपारी ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांना शाळेत भेटी द्यायच्या होत्या. तसेच ग्रामीण भागात शाळा दूर दूर असल्यानं व सुविधा नसल्यानं तसेच तालुकास्तरीय कार्यालय हे दुपारीच असल्यानं त्यांनी आपली सुविधा विचारात घेवून शाळा ठेवल्या. परंतू यात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. असे म्हणायला हरकत नाही.
काही जिल्ह्यामध्येही हाच प्रकार झालेला असून मा. उपशिक्षणाधिकारी साहेबांनी दुपार पाळीचा आदेश काढलेला. वास्तविक तो आदेश विशेषतः ग्रामीण भागासाठी होता. परंतू यात असाही एक शाळा संचालक आहे की तो याच अध्यादेशाचा गैरफायदा घेत असून आपल्या शाळेतील शिक्षकांचे हित लक्षात न घेता तसेच विद्यार्थ्यांचे हित लक्षात न घेता आपल्या शाळेतील शिक्षकांना धारेवर धरत होता. तो संबंधीत शाळा दुपार पाळीत बोलावत असून त्याच्या आदेशाला त्या शाळेतील शिक्षकांनी केराची टोपली दाखवली होती. ते ताटकळत शाळेच्या समोर सकाळी सात पासून तर दुपारी बारापर्यंत उभे राहात व शाळेच्या समोरच विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईलवर ऑनलाइन शिकवत. परंतू शाळा संचालक शाळेचे कुलूपं उघडायला खाली नव्हता.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा अनेक शाळा होत्या की ज्या खाजगी होत्या. त्यातच काही काही शाळा संचालक हे मनमानी कारभार करीत होते. त्यांचा त्यात उद्देश होता, तो म्हणजे शिक्षकांना घाबरविणे व शिक्षकांना घाबरवून त्यांच्याकडून पैसा उकळणे. त्यासाठी ते मुख्याध्यापकांकरवी शिक्षकांना त्रास देत असत. त्याही शाळेतील शिक्षक असेच की ते शिक्षक विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून दुपारी यायला तयार नव्हते. ते आपल्या मुख्याध्यापकासह शाळेच्या समोरच ताटकळत उभे राहत.

***************************

सरकार शाळेचं व विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेवून काही अध्यादेश काढत असते. परंतू काही काही शाळा अशाच असतात की त्या शाळा या अध्यादेशाचा चांगल्या चांगूलकीच्या दृष्टीकोणातून विचार करीत नाहीत. ते त्या अध्यादेशाचा गैरफायदा घेण्यासाठी विचार करतात. त्याच दृष्टीनं ते पावले टाकत असतात.
आता प्रश्न उठतो की सकाळी दुपारी शाळा.......तर यादृष्टीनं विचार केल्यास शाळा ह्या कर्मचा-यांच्या सोईनं ठेवू नयेत. त्या विद्यार्थ्यांच्या सोईनं ठेवाव्यात. जेणेकरुन त्यांचा विकास साधता येईल.
शाळेमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यात बरेचसे पालक हे सामान्यतः गरीब आहेत. ते दिवसभर कामाला जातात. त्यांच्या कामाच्या वेळा ह्या सकाळी साडे दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत असतात. ते जेव्हा सायंकाळी घरी येतात. तेव्हा ते मद्य प्राशन केलेले असतात. त्यातच ते घरी आल्यावर जास्त बडबड करीत असतात. त्यातच विद्यार्थ्यांचा अभ्यासही होत नाही. तसेच काही घरातील पालक जेव्हा घरी येतात. तेव्हा त्यांची मुलं ही झोपी गेलेली असतात. त्यातच विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही.त्यामुळं सकाळी जर ऑनलाइन अभ्यासाची सोय असली तर सकाळी दहा वाजेपर्यंत मुलं मोबाईलवर चांगला अभ्यास करु शकतात. त्यानंतर त्यांचे पालक तोच मोबाइल कामावर नेवू शकतात. शिवाय मुलांचे वयही लहान असतं. त्यामुळं त्यांचेजवळ पालक सकाळी बसून व्यवस्थीत अभ्यास घेवू शकतात. कारण त्यावेळी ते नशेत नसतात. एवढच नाही तर दुपारी शाळा जर ठेवली तर मुलांना अभ्यास करायला मोबाइल मिळू शकत नाही. कारण तो मोबाइल पालक मंडळी आपल्यासोबत घेवून जात असतात. त्यातच विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं नुकसान होत असतं. पर्यायानं सांगायचं झाल्यास विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेवून शाळा संचालकानं शाळा दुपारीच ठेवण्याचा हेका धरु नये. शाळा सकाळीच ठेवावी. तसेच कोणीही कोरोनाच्या अशा महामारीत असे जल्लादी आदेश काढू नयेत. जेणेकरुन संचालक फायदा घेतील व विद्यार्थ्यांचे अपरीमीत नुकसान करतील. जे कधीही भरुन निघणार नाही.

*****************************************

गणेश एक गावातील मुलगा होता. त्यानं शिक्षण शिकतांना अपार कष्ट केले होते. तसा अभ्यास करतांनाही भयंकर त्रासच सहन केला होता. तसा तो गरीबच. त्याची घरची परिस्थीती जेमतेम होती. तसं पाहता कसातरी तो शिक्षक झाला.
शिक्षक होण्यामागं त्याचा उद्देश होता. त्याला वाटत होतं की शिक्षक हा सुखी असतो. त्याला ब-याच सुट्ट्या असतात. त्याला जास्त काम नसतं अर्थात मजूरांसारखं बारा बारा तास काम करावं लागत नाही. तसेच तो पवित्र पेशा आहे.
गणेश शिक्षक झाला खरा. तसं त्याला शिकवावसं वाटायचं. तो मन लावून शिकवायचा. परंतू ज्या पेशाला तो चांगले समजत होता. त्या पेशात जावे त्याच्या वंशा याप्रमाणे भयंकर त्रासच होता. तसं पाहता या शिक्षकी पेशात असतांना मकरंदला झोप लागत नसे. कारण तो मुख्याध्यापकाचा त्रास. मुख्याध्यापक त्याला भयंकर त्रास देत असे. त्यातच मुलांना शिकविणे, लेखन करणे, गोषवारे तयार करणे या सा-या गोष्टी. ती शेंबडी मुलं शिकवितांना ती मुलं बरोबर शिकत नव्हती. कितीही ओरडू ओरडू सांगीतलं तरी वर्ग चवथीच्या वर्गातही काही काही मुलांना लेखन वाचन येत नव्हतं. शिवाय मुख्याध्यापक जेव्हा वर्गनिरीक्षण करायचे. तेव्हा त्यांना गणेशच्या शिकविण्यात न्युनगंड दिसायचे. ते त्याला नोटीस द्यायचे. त्यामुळं त्याला राग यायचा व वाटायचं की आपणही मुख्याध्यापक बनावं.
गणेशला ते सर्व पाहून व नोटिसचं उत्तर देतांना मुख्याध्यापक बनावं वाटणं साहजीक होतं. त्यातच त्याची इच्छा निसर्ग शक्तीनं ऐकली व पुढील काळात तो ज्या शाळेत होता. त्या शाळेतील मुख्याध्यापकाचं आकस्मिक निधन झालं व तो मुख्याध्यापक बनला.
तो मुख्याध्यापक बनला खरा. पण मुख्याध्यापक पदावर असतांनाही भयंकर त्रासच होता. शिक्षकांचे वेळेवर वेतनबिलं तयार करणे, वर्गनिरीक्षण करणे, पालकांची मर्जी राखणे, विद्यार्थी सांभाळणे या सर्व गोष्टी त्याला कराव्या लागत होत्या. त्यातच ही सर्व कामं करतांना वेळ कसा निघून जात होता ते कळत नव्हतं. त्यातच शिक्षकांना लवकर सुटी व्हायची. पण मुख्याध्यापक या नात्यानं त्याला शाळेत थांबावंच लागत असे. तसेच शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या लागायच्या. पण मुख्याध्यापकाला त्याही सुट्ट्या मिळत नव्हत्या. त्यातच कधी कधी त्याच्या कामात अपुरेपणा राहिलाच तर पालक, शिक्षणविभाग तसेच संचालकही ओरडत असायचे. संचालक तर नेहमी तो अडचणीत यावा यासाठी हस्तक्षेप करायचा.
संचालक, पालक, गावकरी, शिक्षण विभाग तसेच विद्यार्थी यांची मर्जी राखता राखता गणेशचं जीवन जात होतं. एक एक पाऊल त्याला फुकून चालावा लागत होता. ते मुख्याध्यापकाचं जीवन खडतर वाटत होतं. तो प्रवास कठीण होता. ते जीवनही व्यर्थ वाटत होतं. जे जीवन गणेशला पुर्वी आनंददायी वाटायचं. ते जीवन आज निरस वाटत होतं. त्या जीवनात काहीच रस उरला नव्हता नव्हे तर आज त्याला मुख्याध्यापकाचे पद घेतल्याचा पश्चाताप होत होता.
मुख्याध्यापक पदाचं ते पाऊल उज्वल जरी असलं तरी त्याच्या प्रत्येक पावलात काटे होते. जे काटे अनकुंचीदार होते. परंतू आज त्यावर उपाय नव्हता. परंतू गणेशला आज वाटत होतं की ज्याप्रमाणे काट्यावर जसा एक दिवस गुलाब उगवतो. तसा गुलाब एक दिवस आपल्याही जीवनात उगवेल व आपल्याही मुख्याध्यापकीय जीवनाचं सार्थक होईल. याच आशेनं तो आपले कार्य करीत होता. पदोपदी भयंकर त्रास असला तरी.........

****************************************

कोरोना सध्या कमी झालेला दिसत असून ज्या ज्या जिल्ह्यात कोरोना नाही. त्या त्या जिल्ह्यात शाळा सुरु करण्यात याव्या असा विचार सुरु असतांना तिसरी कोरोनाची लाट येण्याच्या भीतीनं तुर्तास तरी शाळा बंदच होत्या. त्यातच ही तिसरी लाट महाभयंकर असल्याचेही सुतोवाच होते. ह्या तिस-या लाटेचा धोका तसं पाहिल्यास लहान मुलांनाच जास्त असल्यानं पालक आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून शाळेत पाठवायला तयार नव्हते. त्यातच त्या मुलांचं शिक्षण ऑनलाइन होत होतं आणि ऑनलाइन शिक्षण हे त्या त्या शाळेतील शिक्षक शिकवीत होते.
ऑनलाइन शिक्षण.......त्याबाबत सांगायचं झाल्यास अलिकडे काँन्व्हेंटचं प्रस्थ वाढलेले होतेे. लोकांनी आपल्याही मुलांना इंग्रजी लिहिता वाचता यावं. म्हणून मुलांना काँन्व्हेटला टाकलं. मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी असूनदेखील लोकांना शिक्षणाच्या बाबतीत काँन्व्हेंटचं शिक्षण आवडलं. पालकांचा ओंढा मराठी माध्यमाकडून काँन्व्हेंटकडे वळला. मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडल्या. अशावेळी कोरोनानं दस्तक दिली.
कोरोना आला असला तरी मराठी माध्यमाच्या शाळेप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळेनंही शाळा बंद असल्यानं ऑनलाइन शिक्षणाची योजना आखली. त्यातच शिक्षकही शिकवायला लागले. अशातच लाकडाऊन लागलं.
लाकडाऊन लागलं खरं. पण या लाकडाऊनच्या काळात लोकांच्या हातांना काम मिळालं नाही. पैसा येण्याचे मार्ग बंद झाले. जवळचा होता नव्हता तोही पैसा निघून गेला. त्यातच पोटाची गरज भागवता भागवता लोकांनी मुलांच्या शिक्षणासाठीही ठेवलेला पैसा खर्च केला. त्यातच काँन्व्हेंट खाजगी असल्यानं व त्याला सरकारचं कुठल्याही स्वरुपाचं अनुदान मिळत नसल्यानं काँन्व्हेंटला मिळणारा लोकांचा पैसा, ज्या पैशानं काँन्व्हेंटचा खर्च चालतो. तो पैसा लोकांना आपली पोटाची गरज भागवितांना बंद करावा लागला. त्यातच काँन्व्हेंट चालवता यावं, म्हणून काँन्व्हेंटनं आपले शुल्कही कमी केले. परंतू मुलांचं नुकसान लक्षात घेवून ऑनलाइन शिकवणं बंद केलं नाही.
काँन्व्हेंट असो की मराठी शाळा. सर्वच शाळेवाल्यांनी आपले शिक्षण सुरु ठेवले. त्यातच कोणी आफलाईन शिकवीत होतं. तर कोणी ऑनलाइन. परंतू शिक्षक शिकवीत होते. त्यांनी आपल्या शिकविण्यात खंड पडू दिला नाही. त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं.
काँन्व्हेंटच्या शाळेनं लोकांचे हित तसेच विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून शाळेत घेतलं जाणारं शुल्क कमी केलं. परंतू लोकं ते. काँन्व्हेंटनं जरी शिकविण्याचं शुल्क कमी केलं असलं तरी भरपूर लोकांनी आपल्या मुलांना ऑनलाइन तर अभ्यासाला उपस्थीत ठेवलं. परंतू शुल्क भरण्यास टाळाटाळ केली. त्यातच मुलांना शाळेतील ऑनलाइन अभ्यास नीट समजत नाही हे गृहीत धरुन कोरोनाचा धोका पत्करुन त्याला जबरदस्तीनं जवळच्या शिकवणी वर्गाला पाठवले. त्यातच त्या शिकवणी वर्गाचं अतिरिक्त शुल्कही भरलं. परंतू काँन्व्हेंटचं शुल्क भरलं नाही. ही शोकांतिका झाली. कारण यात सरकारचे स्पष्ट आदेश होते की काँन्व्हेंटचं शुल्क नाही भरले तरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं शाळेनं नुकसान करु नये. याचाच फायदा लोकांनी घेतला. ब-याच लोकांनी काँन्व्हेंटचं शुल्क भरलंच नाही.
काँनव्हेंटचं शुल्क........ते भरलं गेलं नसल्यानं सरकारचं नुकसान झालं नाही. त्यांना वीज, पेट्रोल, गैस इत्यादी वस्तूच्या करातून पैसा मिळाला. पण जे काँन्व्हेट विद्यार्थ्यांचं भविष्य घडवते. त्याच काँन्व्हेंटला शुल्क न मिळाल्यानं जे शाळेतील शिक्षक होते, जे कर्मचारी होते. त्यांना वेतन मिळाले नाही. त्यातच त्यांची उपासमारही होवू लागली. त्यांना शाळेत नोकरी करणं शक्य होत नव्हतं. ते मागील वर्षी घडलं.
मागील वर्षी तरी ब-याच लोकांनी पैसा भरला. पण हे वर्ष निराळं निघालं. यावर्षी तर अनेक पालकांनी शाळेचं शुल्क भरलेलं नाही. त्यांनी वीज शुल्क भरलं, नळ शुल्क भरलं, गैस भरला. पेट्रोलची समस्या त्यांना आली नाही. पण शाळेच्या शुल्काचीच समस्या आली. त्यांनी शुल्क भरतांना आपल्या पाल्यांना शिकविणारे शिक्षक दिसले नाहीत. त्यांचे गुगल मीटवर शिकविणे दिसले नाही. त्यांना विद्यार्थ्यांना सकाळी उठून शिकविण्याची मेहनत घेणारा शिक्षक कधीच गवसला नाही. त्यांचं पोट दिसलं नाही. त्यांची होत असलेली उपासमार दिसली नाही. इतकच नाही तर त्या शिक्षकांचे हालही दिसले नाही. त्यामुळं साहजिकच त्यांच्यावरही आत्महत्येची वेळ येवून ठेपलेली असून ते सुज्ञ असल्यानं सर्व सहन करीत आहेत. ते आरडाओरडही करु शकत नाहीत. कारण ते शिक्षक असल्यानं संयमी व सहनशील आहेत. त्यांच्यावर आजच्या वर्तमानपरिस्थीतीत विद्यार्थी, पालक, प्रशासकीय अधिकारी, शाळा संचालक यासारखे सर्व घटक अत्याचारच करीत असतात. तरीही ते बिचारे चूप बसतात.
आज आमच्या देशातील ब-याच लोकांची परिस्थीती चांगली आहे. जे काँन्व्हेंटमध्ये आपल्या पाल्यांना शिकवितात. काही पालक निव्वळ दाखवतात की त्यांच्यावर कोरोनानं प्रभाव टाकला. पण असं काहीच घडलं नाही. कोरोना त्यांना शिवलाही नाही. तरीही पैशाबाबत बोंबाबोंब आहे. त्यांना कोरोनानं हतबल केलं, त्यात शिक्षकांचा कोणता दोष? ते तर विद्यार्थ्यांना बरोबर शिकवितात ना. मग त्यांना वेतन मिळायला नको का? तरीही त्यांना ते वेतन मिळत नाही. ही शोकांतिका आहे. याचे कारण आहे. लोकांचे शुल्क न भरणे.
आज लोकांना सरकारी सुविधा म्हणून धान्य तरी मिळाले. पण या काँनव्हेंटला शिकविणा-या शिक्षकांना तेही मिळाले नाही. बिचा-यांना कोरोना पुर्वीच्या काळातही वेतन पाहिजे त्यापेक्षा कमीच मिळत होते. आता मात्र तेही मिळायला मार्ग नव्हता. अशावेळी काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलेला होता. आत्महत्या करणे हा मार्ग नव्हता. हे त्यांना माहित होते. तेव्हा आम्हालाही वेतन द्या हो असा प्रश्न त्या शिक्षकांसमोर उभा होता व त्याची ओरड ही सुरु होती. तेव्हा पालकानं तरी यावर विचार करुन मुलांच्या भवितव्यासाठी तसेच शिक्षकांच्या हितासाठी तरी शाळेचं शुल्क भरणं गरजेचं होतं. तसेच सरकारनं तरी काही नियमात स्थगीती देवून अशा शिक्षकांच्या भवितव्यासाठी काही तरतूद करावी. असं काँन्व्हेंटच्या शिक्षकांना वाटत होतं. जेणेकरुन शिक्षकांची उपासमार होणार नाही व शिक्षकांनाही शिकविण्याचा मोबदला मिळेल व ते ऑनलाइन किंवा आफलाईन अभ्यास आणखी चांगल्या प्रकारे शिकवू शकतील यात शंका नव्हती. सरकारनं तरी यावर शक्य झाल्यास विचार करावा हे तेवढंच खरं होतं. याचीच याचीका संचालकांनी न्यायालयात टाकली होती. त्यातच न्यायालयानं निकाल दिला होता की पालकांनी काँन्व्हेंटचं शुल्क भरणं अनिवार्य आहे. त्याचाच फायदा पुढे संचालकांनी घेतला व गरीब विद्यार्थ्यांना पुढे त्यांनी त्रास देणे सुरु केले होते. जे काँन्व्हेंटला तर शिकत होते. परंतू त्यांचे मायबाप कोरोना महामारीत मरण पावले होते. ज्यांचे कोणीच वाली नव्हते व जे काँन्व्हेंटचं शुल्क भरु शकत नव्हते. अशांचं मात्र या न्यायालयाच्या आदेशानं नुकसानच होणार होतं.

******************************************

खटले हे वास्तविकतेवर आधारलेले असतात. पण काही काही खटले हे वास्तविकता सोडूनही असतात. या खटल्यात खटला दाखल करणारे पक्ष हे खरे असतात असे नाही. ती मंडळी निव्वळ द्वेषभावनेतून भांडण करतात व खटले दाखल करतात. हे खटले अगदी वैताग आणतात. कारण न्यायालयाची वेळखावू पद्धत. न्याय देणा-या न्यायाधीशांजवळ पुरेसा एवढाही वेळ नसतो की ते खटले ऐकून घेवू शकतील. मग तारीख वर तारीख करीत ते खटले वर्षोगणती सुरु असतात. या खटल्यामध्ये काही तथ्यही नसतं. पक्षकार मरुनही जातात. त्यांचा परीवारही खटले चालवायला तयार नसतो. त्यांचा वकीलही तारखेवर उभा होत नाही. तरीही खटले सुरुच असतात. ज्यात आरोपींचा गुन्हाही नसतो. तरीही जे खटले सुरु असतात. त्यात आरोपींना अतिशय त्रास होत असतो.
अशीच ही गोष्ट. या गोष्टीमध्ये ही शाळा. त्या शाळेतील मुख्याध्यापक हा शिक्षकांवर वारंवार अत्याचार करीत होता. मुख्याध्यापक अहंकारी होता. त्या मुख्याध्यापकाला अगदी वाटत होते की आपल्याला अतिरिक्त पैसा मिळायला हवा. त्यासाठी तो विचार करीत होता त्या बाबतीत. परंतू त्याला मार्ग सुचत नव्हता. शेवटी एक मार्ग सापडला. तो म्हणजे शिक्षकांना लुटणे. पण शिक्षक काही बुद्धू नव्हते. ते अत्यंत हुशार होते. त्याने त्यांना तसे पैसे मागूनही पाहिले. परंतू तो त्यात यशस्वी ठरला नाही. तो शेवटी हरला. पण त्यानं काही हार मानली नाही. त्याचं नाव अधिरथ.
अधिरथला असे शिक्षकांकडून पैसे मिळाले नसल्याने त्याचा पारा चढला. तो विचार करु लागला की काय करावे. शेवटी सतत विचार करता करता त्याला मार्ग सापडला. आपण शिक्षकांना घाबरंवायचं.
अधिरथनं विचार केला की आपण शिक्षकांना घाबरवायचं. मग काय तो शिक्षकांना वेगवेगळे प्रयोग करुन घाबरवू लागला. कोणाची वार्षीक वेतनवाढ न लावणे. कोणाला वरीष्ठ श्रेणी न लावणे, कोणाला वेतन स्लीप न देणे वा कोणाचे कर्ज पास न करणे इत्यादी गोष्टी ते करु लागले. त्यातच काही काही शिक्षक घाबरले व ते त्याला पैसे देवू लागले.
अधिरथ ज्या शाळेचा मुख्याध्यापक होता. त्याच शाळेत अाणखी काही शिक्षकही होते. ते काही त्या अधिरथच्या कोणत्याच गोष्टीला घाबरत नव्हते. त्यातील काही लोकं हे चांगल्या विचारांचे होते. त्यांना वाटत होते की मुख्याध्यापकाला पैसे देणे म्हणजे चांगली कृती नाही. ती वाईट कृती आहे. शेवटी ती मंडळी त्याला देण म्हणून पैसा देत नव्हती. त्यातच अधिरथला वाटलं की मी या शिक्षकांना असेच सोडून दिले तर उद्या बाकीचे शिक्षक हे मला देण म्हणून पैसे देणार नाही. तेही शिरजोरच बनतील. शेवटी त्याने त्या शिक्षकांना धमकावू लागला. काही शिक्षकांचे वेतन बंद करु लागला. अशातच एक दिवस एका शिक्षकासोबत बाचाबाचीही झाली..,मग काय ती तक्रार पोलिस स्टेशनला गेली.
शिक्षक आणि मुख्याध्यापकाची तक्रार. पोलिसांनी दोघांना समजावून पाहिले. दोघंही ऐकायला तयार नव्हते. त्यातच ज्या शिक्षकासोबत बाचाबाची झाली होती. त्याला चांगलं लागलंही होतं. शेवटी कोणीही मागं पाऊल न घेतल्यानं पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली.
पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. चार्जशीट बनवली व मुख्याध्यापकाच्या विरुद्ध खटला न्यायालयातही गेला. परंतू यामध्ये अधिरथ हा अहंकारी असल्यानं माझं कोण का बिघडवते म्हणत त्यानं त्या शिक्षकाचं वेतन बंद केलं.
त्या शिक्षकाचं नाव गणेश होतं. काही दिवस बरे गेले. पण काही दिवसानंतर गणेशला फरक पडू लागला. गणेशचं वेतन बंद होताच त्याची उपासमार होवू लागली. कार्यालयही त्यावर काहीच तोडगा काढू पाहात नव्हतं. कार्यालयालाही देण म्हणून पैसे देत असल्यानं कार्यालय गणेशच्या वेतनाबाबत चूप बसलं. शेवटी काय तर गणेशला आपली मारहानीचा खटला लढता आला नाही. कारण त्याला महत्वाचा प्रश्न होता पोटाचा प्रश्न सोडविणे. तो पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी लढत होता. तसेच दोन दोन ठिकाणी त्याला पैसे लावणे शक्य नव्हते.
दोन खटले. त्यातच मारहानीप्रकरणातील काही साक्षीदार. ते साक्षीदार शाळेतीलच होते. काहींनी तर साक्षी दिल्याच नाही. त्यातच त्या साक्षीदारावर दबाव टाकून मुख्याध्यापकानं त्यातील ब-याच लोकांना आपल्याकडे वळवले. शेवटी एकच साक्षीदार उरला. त्यानं मात्र साक्ष दिली.
एका शिक्षकाची ती साक्ष. त्यावर खटला टिकू शकला नाही. शेवटी गणेशला तो खटला हारावा लागला.
खटल्यात पराभव झाला. परंतू त्यात गणेशला वाईट वाटलं नाही. कारण त्याने दुसरा खटला जिंकला होता. तो म्हणजे पोटाचा. पोटाचा प्रश्न त्याने सोडवला होता.
खटले निपटले. तसा गणेशला आनंद झाला. तसे सहा महिने पुरते निघून गेले.
एक दिवस पोष्टमेननं गणेश व त्या खटल्यातील साक्षीदार चारुदत्तला एक पत्र दिलं. त्यात लिहिलं होतं की त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आलेला असून मुख्याध्यापकानं तो खटला दाखल केलेला आहे. त्या खटल्यानुसार त्या दोघांनीही संगनमत करुन खोटी तक्रार दाखल केलेली होती. त्यामुळे मागील खटल्यातील दोष त्याचेवर नसून त्यामध्ये दोष चारुदत्त व गणेशचाच आहे.
मुख्याध्यापकानं दाखल केलेला खटला. आरोपी पाच जण होते. त्यात दोन पोलिसवालेही होते. त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी चुकीच्या पद्धतीनं चौकशी न करता गुन्ह्याची नोंद केली.
मुख्याध्यापकानं तो खटला दाखल केला. त्यात त्यांचा फायदाच होता. तो शाळेतील शिक्षकांना म्हणत असे.मला खटल्याला पैसे लागतात. पैसे द्या. शाळेतील शिक्षकांचाच खटला लढतो आहे. नाही देत असाल तर वेतन बंद करतो नव्हे तर ही धमकीही तो खरी करुन दाखवत असे. ज्याने विरोध केला. त्याचे वेतन कार्यालयाशी संगनमत करुन दोन दोन वर्षापेक्षा जास्त अवधीसाठी अर्थात अनिश्चीत कालावधीसाठी बंद करीत असे. त्यामुळे त्याच धाकानं बाकीची शिक्षकमंडळी त्याला पैसे देत होती.
आज खटला सुरु होता. पण वर कोणतातरी विधाताही अधिरथच्या कृत्यावर नजर ठेवून होता. तोच दिवस उजळला व अधिरथ कोरोनाच्या मृत्यूसत्रात अधिरथ जगाचा निरोप घेत चालता झाला. त्यामुळं सर्वजण म्हणत होते की खटला संपला. परंतू खटला संपला नव्हता.
ही वेडीवाकडी केस.......खरं तर यात चारुदत्त व गणेशचा कोणताच गुन्हा नव्हता. गुन्हा होता अधिरथचाच. त्यानं पैसे कमविण्यासाठी चारुदत्त व गणेशवर खटला दाखल केला होता. हे न्यायाधीश महोदयांनाही कळत होतं. तरीही न्यायाधीश महोदय खटला संपवायला तयार नव्हते नव्हे तर तारीख वर तारीख करुन अजूनही तारखा सुरुच होत्या. खटल्याचा पक्षकार स्वतः मरण पावला तरी. जणू असं वाटत होतं की कदाचित या खटल्यात जणू दुसरा वारस उभा होण्याची न्यायाधीश नाच तर पाहात नसावेत.
आज अधिरथ मरण पावला होता. नियतीनं त्या दोघांनाही अधिरथच्या त्रासातून मुक्त केले होते. परंतू अजूनही त्यांचा त्रास सुरुच होता. तो म्हणजे तारीख वर तारीख. ती तारीख संपण्याची चिन्हं दिसत नव्हती. असं वाटत होतं की आपणही अधिरथसारखं एक दिवस संपून जावू. पण न्यायालयाची तारीख वर तारीख कधीच संपणार नाही की काय की या खटल्याचे दुरगामी परीणाम न्यायालयाच्या तारीखवर तारीख नुसार त्यांच्या वारसांनाही भोगावे लागतील की काय? जणू ह्या खटल्यात काही तथ्य नसलं तरी चारुदत्त आणि गणेशला त्या तारीखवर तारखेच्या वेदना सहन कराव्या लागत होत्या. प्रचंड मनातील दुःख सहन करुन.........
**********************

कोरोना काळ. काही दिवस न्यायालयही बंद राहिलं. आता काही दिवसापुर्वी न्यायालय सुरु झालं. सुनावण्या सुरु झाल्या. लोकं यायला लागले. त्यातच गर्दी वाढू लागली. तसं पाहता आज कोरोना जरी असला तरी न्यायालयात गर्दी आहे.
न्यायालयात खटले आजही प्रलंबीत आहेत. त्यातच त्या खटल्यात वाढ होतांना दिसत आहे. त्यात घट होतांना दिसत नाही. त्याचे कारण काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्कीच पडू शकतो.
न्यायालयातील प्रलंबीत खटल्यांच्या कारणाचा शोध घेतांना एक गोष्ट नक्कीच सापडली की न्यायालय ठोस पुराव्याशिवाय खटले संपवायचे नावच घेत नाही. या संदर्भात एक खटला सांगतो.
गणेशचा हा खटला. या खटल्यात तक्रारदार मरण पावला. त्यातच त्या तक्रारदारानं टाकलेली तक्रार. त्या तक्रारीत कितपत सत्यता होती हे त्यालाच माहित. कारण काहीकाही खटल्यात जुलूम हा आरोपीवरही होत असतो. जसा गणेश वर झाला. मुख्याध्यापक काळाच्या ओघात मरण पावला. त्यातच त्याला झालेल्या अपघाताविषयी वर्तमानपत्रात बातमी आली. त्या बातमीची एक सांक्षांत्कित प्रत गणेशनं न्यायालयात लावली. परंतू न्यायालय तो तक्रारदार मरण पावल्याचं ऐकत नव्हतं. पुढे तर गणेशनं न्यायालयात मृत्यूचीही सांक्षांत्कित प्रत लावली. परंतू तिही न्यायालयानं अस्विकार केली. न्यायालयाचं म्हणणं होतं. मुळ प्रत आणा.
तक्रारदाराच्या मृत्यूची मुळ प्रत गणेश कशी आणणार. कारण मृत्यू प्रमाणपत्र हे स्वतःच्या मुलाबाळ व पत्नीव्यतिरीक्त कोणालाही देता येत नाही. त्याचं कारणंही तसंच आहे. सध्याचं जग हे स्वार्थानं भरलेलं आहे. लोकं मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवतात व त्याच आधारावर मालमत्ताच्या मालमत्ता हस्तगत करतात. त्यातच न्यायालय तर असं म्हणत होतं की सदर व्यक्ती जीवंत असून अशा बातम्याही खोट्याच छापल्या जातात. पण हे जरी खरं असलं तरी ज्यावेळी अशी बातमी खोटी निघाली तर आरोपीला दोषी करार देवून त्याला केव्हाही आरोपीच्या पिंज-यात टाकता येतं.
खटलाच तो. आता मुळ मृत्यू प्रमाणपत्र आरोपींना कुठून मिळेल. त्यातच आरोपी त्रस्त. केव्हा केव्हा खटला बंद होतो आणि केव्हा केव्हा नाही. असं आरोपींना वाटणारच. वाटल्यास या खटल्यात आरोपींच्या म्हणण्यानुसार न्यायालयानं संबंधीत प्रकरणाची पोलिसांतर्फे चौकशी करायला हवी होती. परंतू न्यायालय तसं करीत नव्हतं. म्हणून खटला प्रलंबीत.
न्यायालयात असे बरेच खटले होते. जे अशाचप्रकारच्या वेगवेगळ्या कारणानं प्रलंबीत होते. ही एक चिंतेची बाब होतीे. यातूनच न्यायालयात गर्दी वाढतांना दिसणार नाही तर काय? आज न्यायालयात प्रलंबीत खटल्याची संख्या वाढत होती. तसेच खटल्यांचीही संख्या वाढत होतीे. पण ते खटले संपायचे नाव घेत नव्हते वा त्यात घट होण्याची चिन्हही दिसत नव्हती. हे असे प्रलंबीत खटले........ जे संपायचं नावच घेत नव्हते. यावरुन असं जाणवत होतं की न्यायालय हे न्याय देण्यासाठी आहे की त्रास देण्यासाठी. पण कोणीही यात बोलू शकत नव्हता. कारण न्यायालयाविरोधात काहीही बोलणं म्हणजे न्यायालयाचा अवमान असतो. जो कोणालाही करता येत नाही. त्यातच न्यायालय हे जनतेच्या सेवेसाठी असते. प्रत्येकाला न्याय मिळायलाच हवा. मग तो मृत व्यक्ती का असेना. हे तेवढंच खरं होतं.

*****************************************

कोरोना व्हायरस आला व त्यानं मनात धडकी भरवली. मरणा-यांच्या संख्येत वाढ झाली. तो एवढा वाढला की स्मशानातही रांगा लावाव्या लागल्या. त्यातच तो पसरु नये म्हणून लाकडाऊन. आताही भीती आहेच. मरणा-यांची संख्या कमी झाली असली तरी डेल्टा प्लसचं आगमण होणार. असं भाकीत वर्तवलं जात आहे.
सध्याच्या जीवनशैलीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता ऑनलाइन शिक्षणाला महत्व आलेलं आहे. त्यातच मागीलवर्षीसारखीच यावेळीही परिस्थीती आहे. लाकडाऊन तर आहेच. शिवाय विद्यार्थ्यांनाही त्रास आहे. याहीवर्षी विद्यार्थ्यांजवळ मोबाईल नाहीत. ज्यांच्याजवळ आहेत. त्यांचे नेटवर्क बरोबर काम करीत नाहीत. त्यातच नेटवर्कच्या समस्या असल्यानं विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही.
अभ्यासाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तो आफलाईन असायला हवा. गुगल मीटवर थेट अभ्यास असू नये वा झुमवर थेट अभ्यास असू नये. कारण यात ज्यांच्याकडे नेटवर्क नसतं. ती मुलं कितीही हुशार असली तरी ती मुलं ऑनलाइन अभ्यासाला उपस्थीत राहू शकत नसल्यानं त्यांचं अतोनात नुकसान होत असतं. ते झालेलं नुकसान कधीही भरुन निघणारं नसतं.
आफलाईन अभ्यासात दिलेला अभ्यास हा त्या विद्यार्थ्यांना केव्हाही पाहता येवू शकतो. कारण काही काही मुलांची परिस्थीती ही विपरीत असते. त्यांचे वडील हे कामाला जात असतात. त्यांच्या कामाच्या वेळा ह्या वेगवेगळ्या असतात.
वर्गात जे काही विद्यार्थी असतात. त्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांचे पालक हे सकाळी कामावर जातात. काहींचे पालक हे दुपारी कामावर जातात. त्यातच विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अभ्यासाच्या वेळा ज्यावेळी त्यांच्या पालकांची कामावर जाण्याची वेळ असेल. त्याचवेळी जर असेल, तर तेही विद्यार्थी या अभ्यासाला उपस्थीत राहू शकत नाही. तसेच विपरीत परिस्थीती मध्ये दोन किंवा तीन मुलं असतील. त्या दोघांचीही वेळ एक असल्यास त्या दोन्ही मुलांना एकाच वेळेत अभ्यास करता येत नाही. अशावेळी मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होते.
महत्वाचं म्हणजे पालकांच्या कामाला विचारात घेवून त्यांना सवड मिळेल त्यावेळी त्यांना आपल्या पाल्यांकडून अभ्यास करुन घेता यावा. तसेच ज्यांच्याघरी दोन तीन मुलं असतील आणि मोबाइल एकच असेल, त्यांनाही अभ्यास करता यावा. यासाठी शिकविण्याची पद्धत आफलाईनच असावी. जेणेकरुन एकच मोबाइल धारक परीवारातील सर्व मुलांना अभ्यास करता येईल व शालेय अभ्यासाबाबत कोणाला चिंता राहणार नाही. हे तेवढंच खरं.
गणेशच्या हातात शाळेची चाबी मिळाली नव्हती. त्यामुळं तो निश्चीतच चिंताग्रस्त होता. तो संचालकाला शाळेची चाबी मागत होता. परंतू संचालक ते द्यायचे टाळत होता. तो शिक्षणाधिकारी महोदयांनाही पत्रव्यवहार करीत होता. परंतू तेही सुस्तावलेले होते. काय करावं सुचेनासं झालं. अशातच शिक्षणमंत्र्यांनी आठवीपासून शाळा सुरु करण्याचा आदेश काढला.
शिक्षणमंत्र्यांनी काढलेला आदेश. तो आदेश गणेशसाठी नव्हताच. कारण तो एक ते सात याच वर्गाचा मुख्याध्यापक होता. परंतू त्या आदेशानं गणेशच्या मनात धडकी भरली होती. जर आपली शाळा पुढे सुरु झाली तर आपण काय करायचं असा विचार त्याला येत होता.

*****************************************
ब-याच दिवसापासून कोरोना सुरु असला तरी कोरोनाचा वेग मंदावला होता. तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येवू शकते हे भाकीत सांगीतलं होता. याचा असर निश्चीतच लहान मुलांवर राहणार होता. हे गृहित धरुन अद्यापही लहान बालकांच्या शाळा सुरु झालेल्या नव्हत्या. त्या सुरु होतील काय की कोरोना अजून मुंडकं वर काढेल हे काही सांगता येत नव्हतं.
हे सर्व लक्षात घेवून वर्ग सुरु करायचे की नाही अशा संभ्रमात सरकार होतं. परंतू अद्यापही सरकारनं या विषयावर पावले उचलली नव्हती. त्यातच विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान व पालकांची ओरड लक्षात घेवून प्रशासनानं आठवा वर्ग सुरु केला. कोरोनाचा वेग मंदावलेला पाहून.
आज आठवा वर्ग सुरु झालेला होता. मुलं शाळेत येवू लागलेली होती. सगळं सुरळीत सुरु होणार अशी चिन्ह दिसत होती. पालकांमध्ये आनंद होता. विद्यार्थ्यांतही होता. मात्र शिक्षकांमध्ये आजही भीती होती. समजा या विद्यार्थ्यांच्या संपर्कातून कोरोनानं आपल्याला जखडलं तर.........
शिक्षकांचंही बरोबर होतं. कारण या शिक्षकांनी पिढ्याच्या पिढ्या एवढ्या वर्षापासून पाहिल्या होत्या. परंतू त्यांच्या उभ्या आयुष्यात कोरोना आलेला नव्हता. तसेच कोरोनासारखा गंभीर आजारही आलेला नव्हता. त्यामुळं की काय, त्यांना कोरोनासारख्या आजाराची झळ पोहोचलेली नव्हती. पण या दोन वर्षात त्यांनी पाहिलं आणि अनुभवलं की अगदी घरातील आणि अगदी जवळच्या नात्यातील माणसं पटापट कोरोनानं मरण पावली. त्यांना अंतिम समयीच्या अंत्ययात्रेलाही केवळ दहशतीनं जाता आलं नव्हतं. म्हणून ही भीती. जी आज शिक्षकांना लागलेली होती. तरीही ते अगदी जीव धोक्यात घालून आजही कोरोनाशी लढणार होते. कोणासाठी, तर आपल्या वर्गातील या इवल्या इवल्या बोबड्या बोलाच्या विद्यार्थ्यांसाठी. ज्यांच्यावर ते पोटच्या मुलांपेक्षाही कितीतरी जास्त प्रेम करत होते.
शाळा सुरु होणे गरजेचे होते. कारण या कोरोनानं ब-याच मुलांचं भविष्य अंधारात ठेवलं होतं. अंधकारमय बनवलं होतं. जी मुलं निष्णांत हुशार होती. ती मुलं या कोरोनाच्या कहरानं मंदबुद्ध बनली होती अर्थात सर्व ज्ञान विसरली होती. आजही मुलांना साधे पाढे जरी विचारले, तरी ते नीट येत नव्हते. बेरजा वजाबाक्या दूरच. शिक्षकांनी कोरोनाच्या भीतीनं ऑनलाइन शिकवलं होतं. त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला होता. परंतू त्यातून फक्त मोजक्या मुलांचा फायदा झाला. ज्यांनी तो अभ्यास पाहिला. त्यावर अंमलबजावणी केली. इतरांनी मात्र तो अभ्यास सोडा, साधा मोबाईलही उघडून पाहिला नव्हता.
शाळा सुरु होणे गरजेचे होते. कारण कोणती मुलं नेमकी कोणत्या शाळेत आहेत. ते कळायला मार्ग नव्हता. त्यांची हजेरी, हजेरीपटावर लागत नसल्याने ते प्रत्यक्षात आपल्या शाळेत आहेत की नाही हे कळत नव्हतं. तसेच त्यांच्या नोंदीही ते सतत संपर्कात असल्यानं कळत नव्हत्या. त्यांची काठीण्यपातळीही कळत नव्हती. तसेच त्यांचा स्तरही तपासता येत नव्हता. त्यांचे मुल्यांकनही करता येत नव्हते.
शाळा सुरु होणे गरजेचे होते. कारण विद्यार्थ्यांचं यामुळं अतोनात नुकसान होत होतं. जे कधीच भरुन निघणार नव्हतं. त्यांच्या विकासाच्या अवस्था खुंटत चाललेल्या असून जो शारीरिक, बौद्धीक विकास शाळा सुरु असतांना होत असतो. तो विकास शाळा बंद असतांना होवूच शकत नव्हता.
हे सर्व लक्षात घेता आज आठव्या वर्गाच्या शाळा सुरु झाल्या होत्या. उद्या पाचवी व पुढे पहिलीच्या सुरु होतील. पण कोरोनानं मुंडकं वर काढलं नाही तर....... नाहीतर शाळा सुरु होणे गरजेचे समजत लोकं विधान करीत बसले असते व कोरोना संपायचे लक्षणच दिसले नसते हे तेवढंच खरं होतं.
गणेश ज्या शाळेत मुख्याध्यापक होता. ती शाळा मराठी माध्यमाची होती. त्यातच काँन्व्हेंटचं प्रस्थ वाढलं होतं. मराठीच्या शाळा ओस पडत चालल्या होत्या. त्याचं कारणंही तसंच होतं. गणेशला याचा विचार येत होता.
मराठी माध्यमाच्या शाळा आज ओस पडत चाललेल्या होत्या. पटसंख्या कमी होत चाललेली होती. त्यातच शिक्षकांना चिंता लागलेली होती की मराठी शाळा बंद होणार तर नाही.
सगळा विद्यार्थ्यांचा ओंढा मराठी माध्यमाकडे न झुकता तो इंग्रजी माध्यमाकडे जातांना दिसत होता. त्यातच शिक्षकांची वणवण भटकंती वाढलेली होती. तसेच आपली शाळा टिकावी यासाठी स्पर्धेची चढाओढ लागली होती. एका एका विद्यार्थ्यांसाठी शिक्षक तसेच मुख्याध्यापक रस्सीओढणीचा खेळ खेळत होते नव्हे तर एक एक विद्यार्थी मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते.
मराठी शाळा बंद पडणार की काय, अशी भीती निर्माण झालेली असून जो तो काँन्व्हेंटच्या पाठीमागे लागला होता. त्यातच सरकारनंही काँन्व्हेंटमध्ये मराठीचा एक विषय सक्तीचा करुन जणू काँन्व्हेंटला एकतर्फी मान्यताच दिलेली होती. यातूनच मराठी शाळेबद्दल शिक्षकांच्या मनात भीती निर्माण होणार नाही तर काय, त्यातच शिक्षकांना आपल्या नोक-या धोक्यात आल्या आहेत असे वाटायला लागले होते.
मराठी शाळेची दुर्गती झाली होती. त्याची कारणंही तशीच होती. मराठीच्या शाळेत शिकविणारे पालक हे जास्त शिकलेले नव्हते. त्यातच ते अत्यंत गरीब होते. जे आपल्या मुलांवर शिक्षणासाठी पैसे लावू शकत नव्हते. तसेच ते शिकवण्याही लावून देवू शकत नव्हते. अन् ते कोणाकोणाला शिकवण्या लावून देतील! अज्ञानामुळं अशी मंडळी जास्तीत जास्त मुलं पैदा करीत असून त्यांना पुरेसं खायलाही देवू शकत नव्हते. याऊलट काँन्व्हेंटमध्ये शिकविणारे पालक हे जास्त शिकलेले होते. ते सुशिक्षितच नाही तर श्रीमंतही होते. ते आपल्या पाल्यांना काँन्व्हेंटमध्ये टाकत. व्यतिरिक्त घरीही त्यांचा अभ्यास घेत. त्याशिवाय आपल्या पाल्यांच्या शिकविण्याही लावून देत. अशी शिकलेली पालक मंडळी एक किंवा दोन मुलांव्यतिरिक्त जास्त मुलं पैदा करीत नव्हते. त्यामुळं मुलं शिकवायला जास्तीत जास्त पैसा उरत होता. जो पैसा त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी कामात येत होता.
****************************************
मराठी शाळेत अशा सुविधा नसतात की ज्यातून विद्यार्थ्यांचा विकास होवू शकेल. मुलांना शिकवायला योग्य असा पर्याय मराठी शाळेतील पालक मिळवून देवू शकत नाहीत. ते आपल्या पाल्यांसाठी पैसे लावू शकत नाही. आपल्या पाल्यांना शिकवणी लावून देवू शकत नाही. आपल्या पाल्यांचा अभ्यास घरी बसवून शिकवू शकत नाही. त्यामुळं मराठी शाळा मागे पडणार नाही तर काय?
आज मराठी शाळा मागे पडत चाललेल्या होत्या. जो तो काँन्व्हेंटलाच टाकत होता. कारण त्यांना वाटत होते की मुलं काँन्व्हेंटमध्येच हुशार होतात. परंतू विशेष सांगायचं म्हणजे ज्या सुविधा इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मिळत. त्या सुविधा मराठी माध्यमाच्या मुलांना मिळत नसल्यानं मराठी माध्यमाची मुलं मागं पडत होती. परंतू यामध्ये त्या घटकांचं कौतूक करण्यासारखं होतं. तो घटक म्हणजे या मराठी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक. एवढ्या असुविधा असूनही या मराठी माध्यमातील शिक्षक तारेवरची कसरत करत नव्हे तर पालक कोणतेच सहकार्य करीत नसूनही ते अत्यंत चिकाटीने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत. जर काँन्व्हेंटसारख्या सुविधा मराठी माध्यमाच्या मुलांना असत्या तर तिही मुलं आज पुढंच राहिली असती.
मराठी शाळेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी होती. ती म्हणजे याच मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्र घडवलं होतं. काल हिच मराठी माणसं लढली होती आणि देश स्वतंत्र्य केला होता. हा इतिहास होता. पण असे जरी असले तरी आज मराठी माध्यमातील मुलं मागं पडत चाललेली होती. शिक्षक अजूनही तग धरुन होते. ते आपल्या नोक-या वाचविण्यासाठी आवाहन करीत होते. वणवण भटकंती करीत होते. मराठी शाळा वाचवा म्हणत होते. पण त्यांच्या या प्रयत्नानं मराठी शाळा वाचणार का? हा यक्षप्रश्न अजूनही मनामनात शिल्लक होता. जो मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय होता.
आज हे सर्व पाहता मराठी माध्यम संपण्याच्या मार्गावर असून मराठी माध्यमाच्या शाळा संपणार की काय किंवा मराठी शाळा बंद होणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. त्यातच मराठी माध्यम बंद होवून काँन्व्हेंटला प्राधान्य देवून नवी पाश्चात्य विचारधारा निर्माण होवून या देशातील मराठीची संस्कृतीच संपते काय? अशीही भीती पर्यायानं निर्माण झाली होती.
एकदा व्हाट्सअपवर एक बातमी येवून धडकली. ती बातमी साहसिकची होती. गणेशनं ती वाचली. त्याला अतीव दुःख झालं.

****************************************

सर्वच मुलं ही उच्चशिक्षण घेत असतात. मायबाप हे त्यांना उच्च शिक्षण शिकवीत असतात. ते शिकतात. मोठ्या हुद्द्यावर जातात नव्हे तर गलेलठ्ठ पैसाही कमवतात. तसेच जगात आपल्या नावाचा उदोउदो करवून घेतात.
ते उदोउदो करवून घेतात. विचारपीठावर भाषणे देतात आणि स्वतः पुण्यवान असल्याची ग्वाही देतात. ते प्रत्यक्षात तसे नसतात. परंतू स्वतः थोर असल्याचे दाखलेही देतात. त्यांच्या या चांगूलपणाला दुस-या भाषेत उलटा चोर कोतवाल को दाटे असंच म्हणता येवू शकेल.
तो साहसिक नावाचा व्यक्ती. तो पेशानं डॉक्टर होता. त्याची पत्नीही डॉक्टरच होती. त्यांना दोन मुलं होती. त्यांनी अगदी काबाडकष्ट करुन आपल्या मुलांना घडवलं. पेशानं दोघांनाही डॉक्टरच बनवलं. ह्या डॉक्टर मुलांचे विवाह करुन दिले. त्यांचे जोडीदारही पेशानं डाक्टरच. मुलं विदेशात स्थायीक झाली. त्यांना साहसिकनं विदेशात मोठमोठे बंगलेही घेवून दिले.
मुलं विदेशात स्थायीक झाली. ती आपली पत्नी व मुलाबाळात रमली. त्याचबरोबर ती मुलं आपल्या मायबापाला विसरली.
कालांतरानं काळ बदलत गेला. साहसिक म्हातारपणाच्या उंबरठ्यावर गेला. त्याची पत्नीही म्हातारी झाली. तशी त्यांना मुलांची आठवण आली. त्यांनी संपर्क साधला. परंतू त्या संपर्कानुसार मुलांनी त्यांना आधार दिला नाही. त्यातच साहसिकच्या पत्नीचं निधन झालं.
निधनाची बातमी साहसिकनं मुलांना दिली. परंतू मुलांना त्याचं काहीच वाटलं नाही. ती तिकडं फिरकली नाही.साधं दुःखही दाखवलं नाही. त्यातच साहसिक खजील झाला. त्याला अतिशय वाईट वाटलं. मी विनाकारणच त्यांना उच्चशिक्षण शिकवलं असंही क्षणभर त्याला वाटलं. यापेक्षा मी त्यांना निरक्षर ठेवलं असतं तर बरं झालं असतं असंही त्याला वाटलं. जर ती निरक्षर असती तर आज माझ्याजवळच राहिली असती असंही एका अर्थानं वाटत होतं.
साहसिकला तसं वाटणं साहजिक होतं. आज पत्नीच्या मृत्यूनंतर तो एकाकी झाला होता. त्याला मुलांची आणि पत्नीची आठवण येत होती. पण आता उपाय नव्हता. तो दिवसेंदिवस खंत करीत आयुष्य काढत होता.
आज तो अधिकच म्हातारा बनला होता. त्याच्यानं स्वतःचा स्वयंपाक बनवणं जमत नव्हतं. तसा तो वृद्धाश्रमात गेला.
वृद्धाश्रमात तो अतिशय वेदनेत राहात होता. ज्या वृद्धाश्रमात त्याच्या उच्चशिक्षणाचा फायदा होत नव्हता. त्या वृद्धाश्रमात त्याच्या उच्चशिक्षणाचे धिंडवडे निघत होते. शेवटी एक दिवस असाच वेदनेत दिवस काढता काढता तो मरण पावला. त्यातच त्याच्या मरणाची बातमी वृद्धाश्रम वासीयांनी त्याच्या मुलाबाळांना दिली. परंतू मुलंबाळं त्याच्या मयतीला आले नाही. त्यांनी मयत आटोपवून घ्या असा संदेश पाठवला. तसं पाहता वृद्धाश्रमवासीयांनी साहसिकची मयत आटोपवली.
आज मायबाप आपल्या मुलाबाळांना शिकवीत आहेत. उच्चशिक्षण शिकवीत आहेत. परंतू त्या उच्चशिक्षणातून मिळणारं फलीत काय? फलीत जर असं उलट निघत असेल तर त्या उच्चशिक्षणाचा फायदा काय? आज मुलं शिकतात. मायबाप कसोसीनं शिकवतात. परंतू आज शिकणारी मुलं आपला संसार पाहतात. आपली पत्नी व मुलाबाळात खुश होतात. परंतू ज्या मायबापानं शिकवलं. त्यांच्या मायबापाच्या मयतीला येणं दूरच. त्यांना साधं विचारत नाही. मग ह्या उच्चशिक्षणाचा उपयोग काय?
साहसिकच्या बाबतीत असंच झालं. त्यानं उच्चशिक्षण शिकवलं. मुलांना मोठं केलं. परंतू त्याच्या एवढ्या शिकवण्याचा फायदा काय झाला. काहीच नाही.
गणेश हळहळत होता. पितृपक्षाचे दिवस सुरु होते. तशी ती साहसिकची गोष्ट. तो साहसिक संपला होता. परंतू त्या साहसिकची ती गोष्ट आज वाचक वर्गाला बोध देत होती.
अलिकडं कोण कसा निघेल हे काही सांगता येत नाही. आज आदर्शपण उरलेलं नाही. त्यातच स्वार्थ एवढा बळावला आहे की कोणीही समाजसेवा करायला पाहात नाही. मायबापाचं मुलं तेवढंच ऐकतात. जेवढं त्यांना खपतं.
अलिकडे मुलं एवढी वात्रट झालेली होती की ती तसूभरही मायबापाचं ऐकत नाहीत. पाश्चात्य संस्कृती वाढीला लागली होती. त्याचा परीणाम की काय, ती मुलं मायबापाच्या तोंडाला तोंड देत असतात हे गणेश पाहात होता. त्यांचं काय करावं तेही त्याला सुचत नव्हतं.

****************************************

मुलांबाबतीत सांगायचं झाल्यास मुलं आज वात्रट झालेली आहेत असं म्हणण्यापेक्षा ती वात्रट बनवली गेली आहेत असं म्हणणं जास्त सोयीस्कर होईल. ती कोणं बनवली? या प्रश्नाचा शोध घेतांना एक कारण नक्कीच पुढं येते. ते म्हणजे पालक. पालक आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करीत असतात. त्यांचे सर्वच लाड पुरवीत असतात. ते पालक आपल्या पाल्याचे एवढे लाड करतात की त्यांना कळत नाही की आपला मुलगा वाईट लक्षणाला लागत आहे. मुलांचे होणारे एवढे लाड पाहून मुलं स्वतःच वाईट मार्गाला लागतात. मग त्या मुलांना तेही कळत नाही की त्यांच्या पालकांची स्थिती काय?
काही काही पालक हे सुसंपन्न असतात. त्यांची समाजात मोठी इज्जत आणि इभ्रत असते. परंतू ती आपल्या मायबापाची इभ्रत आणि इज्जत मुलांचे अति लाड झाल्यास त्यांना कळते पण वळत नाही. त्यातच अति पैशानं श्रीमंत असलेल्या पालकामुळे अशी मुले गर्वानं दाटतात. त्यांच्या मनात अहंकार वाढीला लागतो. मग गुन्हा घडतो. जो गुन्हा कधीच क्षम्य नसतो.
असा प्रकार अभिनेते शाहरुख खानच्या बाबतीत घडला होता. तसेच काही वर्षापुर्वी हाच प्रकार अभिनेते संजय दत्तबाबत घडला होता. त्या सेलिब्रेटींना त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप होता. परंतू तो पश्चाताप केव्हा झाला. घटना होवून झाल्यावर.
मुळात मुलांबाबत सांगतांना एक गोष्ट आवर्जून येते. ती म्हणजे पालक सावधान तर मुलं सुरक्षीत. पालक जिथे सावधानच नाही तर मुलंही सुरक्षीत असणार नाही. याबाबत आणखी एक घटना घडून गेली. ती दिल्लीच्या गाजीयाबाद शहरातील गुडगावची. बरेच दिवस झाले त्या घटनेला. एक मुलगी बोरवेलमध्ये पडली. तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. ऑक्सीजन पुरवलं गेलं. पण ती जेव्हा बाहेर आली. तेव्हा ती मृत पावलेली होती. मुलीचं नाव माही होतं. ज्या दिवशी माही बोरवेलमध्ये पडली होती. त्या दिवशी तिचा वाढदिवस होता. मायबाप वाढदिवस साजरा करीत होते. ते आनंदात होते. अशा आनंदात की त्यांचं मुलीकडेही लक्ष नव्हतं. अशातच लहानगी माही चालत जात जात बोरवेलमध्ये पडली. ती जेव्हा पडली, त्यावेळी अचानक एक व्यक्तीचं तिकडे लक्ष गेलं. म्हणून ती बालिका लक्षात आली व तिला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न झाले. जर या घटनेत पालक सावधान असते तर माही बोरवेलमध्ये पडलीच नसती व तिचा जीवही गेला नसता.
महत्वपूर्ण गोष्ट ही की आपल्या सभोवताल अशा घटना ब-याच घडत असतात. पण आपण त्या घटनावर दुर्लक्ष करतो. विचार करतो की ती आपली मुलं नाहीत. आपल्याला काय करायचंय. पण ती वेळ आपल्यावरही येते. तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
महत्वाचं म्हणजे आपल्याला सुधारायची संधी वारंवार मिळते. त्यासाठीच अशा घटना घडत असाव्यात. आपण सुधरावे. आपण आपल्या मुलांनाही सुधरवावे. आपण सावधान राहावे. आपण सावधान तर मुले सुरक्षीत. नाहीतर मुलंही वाममार्गाला लागल्याशिवाय राहात नाही.
आपल्याला माहित आहे की हा काळ धकाधकीचा आहे. महागाई वाढलेली आहे. या वाढत्या महागाईवर मात करायची असेल तर धावपळ केल्याशिवाय जमत नाही. परंतू एक मात्र नक्की की अशा धावपळीच्या जगात काही क्षण मुलांसोबतही घालवावे. लक्ष ठेवावे. जेणेकरुन मुलं बिघडणार नाहीत व त्यांनाही सुरक्षीत ठेवता येईल. हे तितकच सत्य आहे.

****************************************

आज गणेशला कसमस वाटत होतं. सकाळचा दिवस आनंदात गेला होता. आनंद असा की एका शिक्षिकेनं त्याला एक मोठी पिशवी बक्षीस दिली होती. ती घेण्याची इच्छा गणेशची नव्हती. कारण त्याला कोणाच्या उपकारात दबणे आवडत नव्हते. त्याचं कारणही तसंच होतं.
गणेश या शाळेत लागण्यापुर्वी फारच खस्ता खात होता. अशावेळी तो एखाद्यावेळी कोण्या शिक्षीकेकडे जेवलाही असेल, परंतू ज्यावेळी त्यानं वेतनाची तक्रार पोलिस स्टेशनला टाकली, त्यावेळी पोलिसांना बयाण देत असतांना त्याच शाळेतील एक शिक्षीका म्हणाली होती की आम्ही यांना डबे पुरवले. अर्थात जेवन दिलं असं त्या शिक्षीकेचं म्हणणं होतं. त्या घटनेचा गणेशला रागही आला होता. परंतू तो सर्व राग विसरुन गणेशनं पुढील संकटाच्या काळात त्याच शिक्षिकेला मदत केली होती. त्यामुळं त्याच क्षणाची आठवण आल्यामुळं गणेश ती पिशवी नाकारत होता.
त्या शिक्षीकेनं आणलेली ती पिशवी. गणेश ती पिशवी घेण्यास नकार देत होता. परंतू सर्व शिक्षकांनी त्याला समजावले. म्हणून त्यानं ती पिशवी घेतली. आज सकाळपासून त्याच गोष्टीचा आनंद होता.
दुपार झाली होती. तसा एका शिक्षीकेचा त्याला फोन आला. तशी ती म्हणाली,
"माझ्या सेवापुस्तीकेचं काम कुठंपर्यंत आलं? ती द्या सर. नाहीतर माझ्याकडे पर्याय राहणार नाही. शेवटचा उपाय करावा लागेल. ती म्हणजे आत्महत्या."
गणेशला विचारलेला तो प्रश्न. गणेशला त्या गोष्टीचा भयंकर राग आला. आत्महत्या! अगदी सहज बोलला जाणारा शब्द.
आत्महत्या! आत्महत्या हा काही त्यावर पर्याय नव्हता. शिवाय तो तिचं काम करीतच होता. संस्थाचालकाला पत्र पाठवतच होता. परंतू संस्थाचालक त्याला शाळेची चाबी व रेकॉर्ड देतच नव्हता. यातच तो अपयशी ठरत चालला होता. त्याला त्यावर काय करावे सुचत नव्हते. शेवटी काय, तर तोही त्याबाबतीत परेशानच होता.
ती शिक्षीका या शाळेतून अतिरिक्त होवून दुस-या शाळेत निघून गेली होती. तसं पाहता ती ज्या शाळेत गेली, त्या शाळेनं एक महिन्यात सेवापुस्तिका आणेल, या अटीवर लिहून घेतलं होतं आणि सदर शिक्षीकेनं तसं लिहून दिलं होतं. परंतू संस्थाचालक ती द्यायला नकार देत होता. त्यातच तो ती सेवापुस्तिका देत नसल्यानं ती अस्वस्थ होती नव्हे तर ती अस्वस्थ होवून गणेशला फोन करीत होती. अशा आशयाच्या धमक्या देत होती.
सकाळचा आनंद....... तो आनंद या सर्व प्रकारापुढं फोन ठरला होता. त्यातच त्याला थोडा मानसिक तणावंही आला.समजा बोलल्याप्रमाणं सदर शिक्षीकेनं आत्महत्या केली तर....... मनात विचार होता. त्यामुळं तोही अस्वस्थ झाला होता. त्याला वाटत होतं की त्यानं तिला सेवापुस्तिका मिळवून देण्यासाठी बराच प्रयत्न केला होता. परंतू त्या प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नव्हता. जणू पालथ्या घड्यावर पाणी घेतल्यागत अवस्था........अशीच अवस्था झाली होती.
काही घटना ह्या अशा घडतात की त्या घडायला नको असतात. परंतू त्या घटना घडणेही अत्यावश्यक असते. त्याशिवाय कधीच कोणाला कोणते महत्व प्राप्त होत नाही.
आज असा काळ आला आहे की आजच्या काळात कोण केव्हा राजा बनेल आणि कोणाचा केव्हा रंक होईल, ते सांगता येणे कठीण आहे. आपण बरेचदा पाहतो की लहानपणी जो वात्रट असतो. तो मोठेपणी खासदार, आमदार बनतो वा नावारुपाला पोहोचतो. त्यातच कोणी म्हणतात की काल हा तर वात्रट होता. आज मात्र तो किती मोठ्या पदावर पोहोचला. खरं तर त्या गोष्टी आश्चर्यचकीत करणा-या असतात.
गणेश एक सद्गृहस्थ होता. त्याला ते पद मिळण्यापुर्वी काही लोकं वेडाही म्हणायचे. परंतू गणेशनं त्या गोष्टीकडं लक्ष दिलं नाही. तो आपलं काम इमानदारीनं करत राहिला. परंतू आज अचानक त्याला मुख्याध्यापक पद मिळालं. तेही प्रभारी......
तसं त्याला मिळालेलं प्रभारी मुख्याध्यापक पद खुप त्रासदायक वाटत होतं. आज सहा महिने होत आले होते, तरीही चार्ज मिळाला नव्हता. संस्था ही खाजगी स्वरुपाची असल्यानं त्याला तेवढं महत्व संस्थाचालक देत नव्हता.
पदच ते.........मग ते पद प्रभारी असो की कायम स्वरुपी. त्या पदाची गरीमाच तेवढी होती. अचानक मिळालेलं मुख्याध्यापक पद. जे संस्थाचालकाला कदापिही प्रिय नव्हतं. त्यातच संस्थाचालक ते पद मान्य करीत नसल्यानं त्यानं अजूनही चार्ज दिलेला नव्हता. त्या चार्जनुसार कार्यभार सोपवलेला नव्हता.
त्याला मिळालेलं पद व पदाचं महत्व शाळा संस्थालकाच्या दृष्टीकोणातून गौण होतं. परंतू ते गौण जरी असलं तरी ते पद इतरांसाठी आपलं महत्व टिकवून होतं.
पदाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास गणेशला जेव्हा पद मिळालं. तेव्हापासून त्याचं महत्व वाढलेलं होतं.तो जरी शाळेत संस्थाचालकाच्या अत्याचाराची झळ शोषत असला तरी त्याला शाळेतील इतर मंडळी वेगळंच महत्व देत होते. एवढंच नाही तर समाजातही मानाचं स्थान निर्माण झालं होतं. एका सामाजीक संस्थेने तर गणेश मुख्याध्यापक होताच त्याचा सत्कारही केला होता. तसेच समाजातीलही ब-याच संघटनांनी त्याला पुरस्कार प्रदान केला होता.
गणेश हा बोलण्यात संयमी व शांत स्वभावाचा असल्यानं शाळेतील इतर शिक्षक त्याच्या कार्यानं खुश होते. त्यातच एका शिक्षीकेनं आज त्याला एक पिशवीही बक्षीस दिली होती. ती पिशवी असेलही तुटपुंज्या पैशाची. पण त्या बक्षीससमोर ती रक्कम तुच्छ होती. परंतू ते सर्व पदाचं महत्व होतं.
गणेशला पद मिळण्यापुर्वी त्याला कोणी इज्जत देत नव्हता. त्याच्या अब्रूचे धिंडवडे निघत होते. आज जे त्याच्यासोबत होते, तेही एकेकाळी त्याच्या विरोधातच बोलत होते. दिवंगत मुख्याध्यापकाच्या सर्व कागदपत्रावर ते सह्या करीत होते. त्यातच ते दिवंगत मुख्याध्यापकाला मदत करीत होते. आज गणेशच्या मुख्याध्यापक बनण्यानं बाजी पालटली होती. काल जे कोणी त्याच्या विरोधात होते. ते आज गोड झाले होते आणि काल जे गोड होते ते आज कडू झाले होते. असा अनुभव त्यालाही प्रत्यक्ष येत होता.
गणेशच्या पदाच्या बाबतीत आज वक्तव्य करायचं झाल्यास त्याचं आजही महत्व नव्हतं. आज महत्व होतं त्याच्या पदाचं. जे पद नशीबातून चालत आलं होतं. आज त्याच पदामुळं गणेशचं महत्व वाढलं होतं व तो आज नावारुपाला आला होता.
काही काही पदं असे असतात की त्या पदांमुळं माणसाचं महत्व वाढत असतं. कोणताच व्यक्ती हा मोठा नसतो. जे पद त्याच्या कर्मानं त्याला प्राप्त होतं. ते पद त्याला मानमरातब व मानसन्मान मिळवून देत असते. गणेशच्या बाबतीतही तेच घडलं होतं. ते प्रभारी मुख्याध्यापकाचं पद मिळताच त्याचा मानसन्मान वाढला होता नव्हे तर समाजात त्याच्याबद्दल आदरही निर्माण झाला होता. तसेच दिवंगत मुख्याध्यापकाच्या कार्यकाळात त्याला वेडा म्हणणारे आज त्याला नमन करीत होते नव्हे तर त्याचा आदर राखत होते. तसेच पुरस्कारही प्रदान करीत होते.
कोरोना कोरोना कोरोना. सर्वत्र हाहाकार माजला होता. मग सारंच बंद होतं. उपासमारही सगळ्यांची होत होती. कोरोना आला आणि अजूनही सुरुच होता. त्यातच जे काही बंद होते. ते हळूहळू सुरु होत होते.
विद्यामंदीरं अजूनही सुरु झालेले नव्हते. फक्त आठवी ते बारावी प्रायोगीक तत्वावर सुरु झाल्या होत्या. परंतू अजुनही मंदीरं सुरु झालेली नव्हती. मंदीरं आठवीच्या शाळा सुरु झाल्यानंतर आठ दिवसानं सुरु झालीत. परंतू पुर्ण विद्यामंदीरं महाराष्ट्रात अजूनही सुरु झालेली नव्हती.
मंदीरं सुरु झालेली होती, त्यातच काहींनी त्यात आपले स्वतःचे नियम बनवले होते. इंजेक्शनचे दोन डोज झाल्याशिवाय प्रवेश द्यायचा नाही. हा नियम फक्त गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मंदीर प्रशासनानं आणला होता.
कोरोना येण्यापुर्वी मंदीरात गर्दी राहायची. सर्व मंदीरं गजबजलेली असायची. त्यातच गरबा खेळतांना गर्दीच व्हायची. परंतू ज्यावेळेपासून कोरोना आला होता. त्यावेळेपासून लोकांना भीती होती की आपण अशा गर्दीच्या ठिकाणी गेल्यास आपल्याला कोरोना होणार तर नाही? हाच यक्ष प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. म्हणूनच सर्वसामान्य लोकं अशा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळत. काही जात. ज्यांना भीती नव्हती. ते कोरोना आहे असं मानत नव्हते.
कोरोनाबाबतीत सांगायचं झाल्यास काही लोकं म्हणत की कोरोना नाही. सरकार कोरोनाबद्दल चुकीची अफवा पसरवत आहे. परंतू याबाबतीत सांगायचं झाल्यास गणेशला वाटत होतं की कोरोना हा रोग अस्तित्वात आहे. मात्र त्याची झळ ज्याला पोहोचली होती, त्यालाच कोरोना काय ते चांगलं कळलं होतं. इतरांना नाही.
कोरोना हा अति संसर्गजन्य रोग असून ह्या रोगाचे जंतू हे सर्वांच्याच शरीरात गेले होते. अजूनही ते सर्वांच्याच शरीरात होते. परंतू त्या रोगाचा प्रादुर्भाव प्रत्येकाच्या शरीरावर झाला नव्हता. त्याबद्दल गणेशही जनजागृती करीत होता.
प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळ्या डी एन ए नं बनलेलं असतं. त्यानुसार प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती ही वेगवेगळी असते. त्यामुळं आपल्या शरीरात जरी कोरोनाच्या जंतूनं प्रवेश केला तरी आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती ही चांगली असल्यानं आपल्याला कोरोना झाला नाही. होत नाही. कोरोनानं छळलं नाही. त्यामुळं आपल्याला म्हणायला रान मोकळं झालं की कोरोना अजिबात नाही.
कोरोनाचा चढता आलेख पाहून व स्मशानघाटातील मृत्यूचं तांडव पाहून काही दिवस सर्व बाबतीत आपण दक्षता घेतली. त्यानुसार देशातील काही गोष्टीच्या बंदला आपणही स्विकारलं आपली होणारी उपासमार सहन करुन. आजही मंदीरं बंद होती. शाळा बंद होती. काँन्व्हेंटच्या शाळेतील शिक्षकांचे हाल होत होते. त्याचबरोबर पुजा-यांचे हाल होत होते. पुजा-यांनाही वाटत होते की त्यांचंही पोट भरावं. त्यातच या मंदीरावर उदरनिर्वाह करणारे हारवाले, ठेलेवाले यांनाही त्यांचं पोट भरावं असंच वाटत होतं. परंतू ते भरणार कसं? कारण कोरोनाचं संक्रमण आज सरकारला धारेवर धरत होतं.
सरकारच्या आदेशानं मंदीर उघडलं. त्यातच मंदीर प्रशासनानं सावध भुमिका घेत कोरोना संक्रमणावर कडक निर्बंध लावले.
१) प्रत्येकांनी सानिटायझर हाताला लावावं.
२) तोंडाला मास्क असल्याशिवाय प्रवेश नाही.
३) दोन डोज घेतल्याशिवाय प्रवेश नाही.
४) गर्दी करु नका.
असे साधे साधे नियम मंदीर प्रशासनाचे. सगळे नियम पाळत मंदीरात प्रवेश सुरु झाला. त्यातच लोकांची आस्था पूर्ण होत होती. परंतू कितीही खबरदारी घेतली तरी कोरोना होणार नाही कशावरुन? ज्यांची ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली होती. त्यांना आजही कोरोना छळणार नव्हता. परंतू ज्यांची ज्यांची प्रतिकारशक्ती कमजोर होती. त्यांना त्यांना नक्कीच कोरोना छळणार होता हे मात्र निश्चीत. याचा अर्थ असा नव्हता की मंदीर कोरोना आहे, तेव्हापर्यंत बंद ठेवावं. तर याचं उत्तर नाही असेच होतं. जोपर्यंत सगळी मंडळी कोरोनाच्या संक्रमणाच्या कक्षेत येणार नाही. तोपर्यंत कोरोनाची भीती ही दूर होणार नाही आणि कोरोनाही दूर पळणार नाही. कोरोनाच्या व्हायरसला पळवायलाही आपली संघटन शक्तीच कामात येणार होती. विचार होता, किती मरणार? मुठभर! पण वाचणार किती? असा विचार केल्यास बरेच लोकं वाचणार होते.
कोरोनाबाबत एक उदाहरण गणेश वारंवार सांगायचा.
'आपण कोंबडे, बकरे प्रत्येकांनी पाहिले आहे. जेव्हा असाच या मुक्या प्राण्यांवर रोग येतो. तेव्हा बरेच कोंबडे बकरे मरतात. पण समाप्त होतात का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. तसेच पुर्वीपासून मानव जातीत अशाच साथी यायच्या. परंतू मानव प्राणी संपला का? तेव्हा तर औषधांचा जन्मही नव्हता. याचंही उत्तर नाही असंच आहे. मग कोरोनाला का घाबरावे. घाबरुन काही कोरोना पळणार नाही. त्याचा प्रतिकार करुनच कोरोना पळेल. सरकारच्या म्हणण्यानुसार मंदीर उघडं झालं. सर्वांना आनंदीआनंद झाला. कारण आस्था. मंदीरात देव नाही. देव जर असता तर त्यानं वाचवलं नसतं का कोरोनापासून? असे काही मंडळी म्हणतात. बरोबर आहे त्यांचं. कारण मंदीरात देव नाही. केवळ मुर्ती आहे, तिही दगडाची. पण हे जरी बरोबर असलं तरी तोच मंदीरपरीसर माणसाला आत्मीक बळ देत असते. मग तो मंदीर परीसर असो की मज्जीद परीसर असो, तो चर्च परीसर असो की गुरुद्वारा परीसर. ते बुद्धविहार असो की आग्यारी परीसर. फरक एवढाच की या सर्व ठिकाणची वास्तविकता वेगवेगळी आहे. भावना मात्र एक आहेत. धार्मीक स्थळं तुमची आस्था पाहून उघडलं गेलं आहे. त्या ठिकाणी अवश्य जा. मुक्तविहार करा. मनाई नाही. मात्र एक काळजी अवश्य घ्या. ती म्हणजे गर्दी करु नका. कुठेही स्पर्श करु नका. कुणालाही, कोणत्याही वस्तूला सध्यातरी हात लावू नका. हातात तसेच पायात हातमोजे घाला. जेणेकरुन कोरोनाचे जंतू तुमच्या शरीरावर शिरकाव करणार नाही अन् तसाही शिरकाव केलाच तर घरी येवून कपडे लवकरात लवकर बदलवून घ्या. ताबडतोब धुवून घ्या. तसेच विशेष सांगायचं म्हणजे मुक्कामाची धार्मीक स्थळं टाळा. त्यातच तुमचं भलं आहे.'
गणेशला वाटत होतं की कोरोना संपवावा. त्याला असंही वाटत होतं की मंदीर हेही गर्दीचं ठिकाण आहे. म्हणून तो मुख्याध्यापक जरी असला तरी शाळेतील पालकांचं प्रबोधन करीत होता. त्यांना मंदीरात जाण्याबद्दल सुचना देत होता. त्याला वाटत होतं की जर शाळा सुरुच झाल्या तर उद्या हेच पालक आपल्या पाल्यांनाही कोरोनाबाबत नियम शिकवूनच शाळेत पाठवतील. त्यामुळं कोरोना पसरणार नाही तर तो नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
आज शाळा सुरु होवो अगर न होवो, कोरोना कधीच संपणार नाही असं गणेशला वाटत होतं. ते प्रभारी मुख्याध्यापक पद गणेशला अतिशय जड जात होतं. कारण व्यवस्थाच तशी होती. रोजची कुणाची ना कुणाची पत्र येत होती. त्यातच त्या पत्राची परिपुर्ती करतांना गणेशला नाकीनव येत होतं. दिवंगत मुख्याध्यापकाने शाळेची बरीचशी कामं ब-याच वर्षापासून खोळंबवली होती. ती कामं करतांना त्याला वेळ कसा निघून जातो, याचं भान राहात नव्हतं. त्यातच काही शिक्षक त्याला मदत करीत होतेच. परंतू व्यवस्थेपुढे गणेशला हार मानावी लागत होती. कारण अशी कामं करीत असतांना त्याचेजवळ रेकॉर्ड नसल्यानं ती कामं करता येत नव्हती. त्यातच त्याला ती कामं करता न आल्यानं पश्चाताप होत होता.
सध्या निवडणूकीचा काळ आहे. जिल्हा परीषद व पंचायत समीतीची निवडणूक पार पडलेली आहे. त्या निवडणूकीत एका पक्षानं दुस-या पक्षाला धुळ चारलेली असून सध्या नगरसेवकाची निवडणूक जवळ येवून ठेपलेली आहे. त्याचबरोबर सगळेच झोपलेले घटक सक्रीय झाले असून ते प्रांगणात उतरण्यासाठी सज्ज झालेले आहेत. ते हळूहळू बिळातून बाहेर निघून या सर्व निवडणूकीच्या वातावरणात स्वतःला आजमावू पाहात आहेत. निवडणूक एकदाची झाली की पाच वर्षपर्यंत ते कदाचित दिसणारही नाहीत अशीच अवस्था आज राजकीय पक्षाची होवून बसलेली आहे.
जे आज स्थानिक स्तरावर आहे, तेच वरच्या स्तरावरही आहे.मात्र वरच्या स्तरावर जे आमदार, खासदार निवडून येतात. ते फक्त सह्या करतात. प्रत्यक्ष कार्य हा सनदी सेवक करीत असतो. ह्याच सनदी सेवकाद्वारा हे पक्षाचे निवडून आलेले खासदार आमदार शासकीय कामे आपल्या अख्यत्यारीत करुन घेत असतात. मग ती कामं करुन घेण्यासाठी हेच सनदी सेवक स्थानीक स्तरावर असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांकडून आपली कामं करवून घेत असतात.
स्थानीक स्तरावर ज्याप्रमाणे नगरसेवक असतो, त्याचप्रमाणे काही कर्मचारीही कार्यरत असतात. ते कर्मचारी वरच्या स्तरावरुन आलेले आदेश पाळत असतात. जे आदेश वरचे अधिकारी पारीत करीत असतात. सरकारी अधिकारी तसेच कर्मचा-यांना हे आदेश पाळायचे बंधन असते. तसं बंधन नगरसेवकांना नसते. ते आदेश न पाळल्यास सरकारी कर्मचा-यांवर कारवाही होवू शकते. त्या कारवाहीत निलंबन, बडतर्फ करणे वा मानसिक त्रास देणे यासारख्या शिक्षा होवू शकतात. यात नोकरीही जावू शकते.
स्थानीक स्तरावर ज्याप्रमाणे गावात ग्रामपंचायत असते. त्याचप्रमाणे शाळाही असतात. काही शाळा या जिल्हा परीषदेच्या असतात. काही शाळा या स्थानीक प्रशासनाच्या. ज्यात एक संचालक मंडळ असतं. ज्यामध्ये कोणतीही शाळा जनहितार्थ स्थापन झालेल्या व्यवस्थापन मंडळाला दिलेली असते. त्यामुळे कोणी एक व्यक्ती त्या शाळेचा मालक होवू शकत नाही. ज्या संचालक मंडळात एक व्यक्ती अध्यक्ष असतो. जो शासन नियमानुसार शाळा संचालन करणारा चालक असतो. त्यामुळे शासनही त्याचेमार्फत शासन अनुदान संस्थेला देत असते, व्यक्तीला नाही. परंतू हे जरी खरं असलं तरी शाळा संचालक हे स्वतःला मालक समजत असतात व वेतन अनुदान स्वतः लाटत असतात नव्हे तर त्याच्या अधिनस्थ असलेल्या मुख्याध्यापकामार्फत त्या शाळेतील शिक्षक कर्मचा-यांना त्रास देत असतात. त्यातच मुख्याध्यापक ऐकत नसेल तर त्यालाही त्रास देत असतात. जेणेकरुन अशा मुख्याध्यापकाने आपल्या शिक्षक कर्मचा-यांना त्रास द्यावा.
संचालन करणारा शाळा संस्थाचालक हा सरकारी कर्मचारी नसतो. तो व्यवस्थापन मंडळातील एक सदस्य असतो. परंतू तो शाळेतील कारभारात लक्ष देत असतो नव्हे तर ढवळाढवळ करीत असतो. तो इतका ढवळाढवळ करतो की शाळेतील संबंधीत सर्व रेकॉर्डही आपल्या घरी नेवून नष्ट करीत असतो. यातच त्या संस्था संचालकानं असा गैरप्रकार केल्यास संबंधीत मुख्याध्यापकाला संबंधीत कामे करताच येत नाही. अशावेळी सर्व कामे खोळंबतात.
मग शासनाची येणारी पत्र. त्यातच कराव्या लागणा-या गोष्टी त्या शाळेतील संबंधीत मुख्याध्यापकाला पुर्ण करता येत नाही. अशावेळी ती कामं पुर्ण न करता आल्यास त्या शाळेतील सरकारी व शासन निर्मीत असणारा मुख्याध्यापक हा व्यवस्थेचा बळी ठरत असतो. त्याला शासन धारेवर धरत असते. तसेच वरचे अधिकारीही धारेवर धरत असतात. त्यातच संस्थाचालकही उलटा चोर कोतवाल को दाटे अशी मिमांशा बाळगत धारेवर धरीत असतो.
महत्वाचं म्हणजे शासन शाळेला पुर्णतः अनुदान देत असतांना शाळा ह्या अशा संस्था चालकाच्या हातात का दिल्या तेच कळत नाही. शाळा ह्या खाजगी प्रशासनाला देणे गरजेचे नव्हते. परंतू त्या खाजगी प्रशासनाला दिल्या. त्याचं कारण म्हणजे राजकारण. राजकारणात निवडून आलेले प्रतिनिधी......त्या प्रतिनिंधींना पैसा कमवायचा होता. राजकारण करुन. म्हणूनच त्यांनीच शाळेचं खाजगीकरण केलं. ज्याची फलश्रृती म्हणून आजही शिक्षक मरणप्राय यातना भोगतांना दिसतात. संस्थाचालक हे मलाई खातात आणि जबाबदार धरल्या जातो तेथे काम करणारे कर्मचारी. ज्यांचा मुळात काहीही दोष नसतो.
संस्थेत काम करणे ठीक आहे. परंतू संस्था ही कामे मागत नाही तर फक्त पैसा मागते, तोही वेतनातला. जर असे वेतनातील पैसे न दिल्यास संस्थाचालक मुख्याध्यापकाकरवी त्रास देत असतो. असा त्रास की जो त्रास अजिबात सहनच होत नाही. कधी कधी आत्महत्याही करावाश्या वाटतात.
गणेश मुख्याध्यापक होता.त्याला संस्थाचालक कोणता त्रास देत असतात ते माहित होतं. त्यातच त्यानं त्यापुर्वीही असा त्रास भोगलाच होता. म्हणून की काय, तो संस्था संचालकाच्या बाजूने नव्हता. तर तो शिक्षकांच्या बाजूने होता. ज्याप्रमाणे यापुर्वी आपल्यावर दिवंगत मुख्याध्यापकानं अन्याय केला, तसा अन्याय आपण इतरांवर करु नये वा तसा अन्याय संस्था संचालक साहेबाकडून होवू देवू नये, यासाठीच तो दक्ष होता. तसा अन्याय त्याच्याकडून झाल्यास तो स्वतःला माफ करु शकणार नव्हता. आपल्यावर झाला इतरांवर होवू नये, म्हणून तो डोळ्यात तेल घालून काळजी घेत होता. त्यातच तो हळूहळू व्यवस्थेचा बळी ठरत चालला होता.
व्यवस्था अशी होती की काम नाही केले तरी चालेल, परंतू कागदी घोडे चालवायचे. त्यातच आता ऑनलाइनचा काळ होता. प्रत्येक गोष्ट लोकांना ऑनलाइन पाहता येत होती. त्यातच गणेशजवळ रेकॉर्ड नव्हता.
शासन स्तरावरुन आलेली पत्र........कोणीतरी आवाज उठवला होता की सर्वात जास्त भ्रष्टाचार शिक्षण विभागानं केला. शासनाची दिशाभूल करीत शालेय स्तरावर सरकारच्या पैशाबाबत गैरव्यवहार केला. त्यामुळं तो पैसा कशात खर्च केला. याचं विवरण प्रत्येक शाळेनं भरुन द्यावं.
तो आवाज. मग तो आवाज जनतेचा का असेना, त्यावर शासनानं अंमल करायचं ठरवलं. कारण शासनाला वाटतच होतं की यात भ्रष्टाचार झालाय. म्हणून शासनानं त्यानुसार प्रत्येक शाळेला पत्र पाठवलं आणि जेव्हापासून त्या योजना सुरु झाल्या, तेव्हापासून आलेल्या पैशाचं विवरण मागीतलं. तसेच तो पैसा कशाकशात खर्च केला, त्याचंही विवरण मागीतलं होतं. सरकारला वाटत होतं की या विवरणातूनच शाळेनं नेमकी रक्कम कुठे कुठे खर्च केली ते दिसेल. तसेच यातून भ्रष्टाचारही उघड होईल. ते विवरण म्हणजे इमानदारीचा व सेवेचा पुरावा होता.
गणेशलाही शासनानं माहिती मागीतली होती. परंतू गणेश ती माहिती देवू शकत नव्हता. त्याचं कारणही तसंच होतं. त्याचेजवळ विद्यमान अवस्थेतीलच रेकॉर्ड नव्हता. तसेच भुतकाळातीलही कोणतेच दस्तावेज नव्हते. मग तो कसा काय विवरण भरुन देणार! परंतू शासन काही माफ करणारं नव्हतं.
आजही शासन तोच मुख्याध्यापक असल्यानं त्यालाच धारेवर धरीत ते सर्व विवरण मागत होतं आणि त्यावर उत्तर म्हणून तोही त्यांना रेकॉर्ड नाही असं पत्र पाठवीत होता. परंतू त्या रेकॉर्डसाठी ना शासन कटिबद्ध होतं ना कोणीही त्याला मदत करीत होते.सर्वजण त्या संचालकासमोर लाचारीगत वागत होते. तसं गणेशलाही काही सुचत नव्हतं.
भ्रष्टाचारयुक्त ती व्यवस्था. त्या व्यवस्थेचाच तो बळी ठरत चाललेला. काय करावं सुचेनासं. संचालन कर्ता हा एक खाजगी व्यक्ती. गणेशला त्याबाबतीत विचार आला. विचार होता की सगळं जर शासन देत आहे मग ह्या शाळा खाजगी प्रशासनाला का बरं दिल्या असाव्यात.
शाळा...... शिक्षणाची संकल्पना ज्यावेळपासून अंमलात आली, त्यावेळेपासून शाळेचा जन्म झाला. त्यातच राजाच्या मनात तसा विचार येताच शाळेबाबतची शिक्षण समीती राजाने स्वतः स्थापन केली आणि शाळेची व्यवस्था करणे व नियम बनवणे ह्या गोष्टी त्यांनी त्या समीतीला सुपूर्द केल्या. या शिक्षणसमीतीने मग हे शिक्षण शिकविण्यासाठी काहीतरी व्यवस्था पाहिजे म्हणून जागा आणि तो घटक यांचा शोध घेण्याचा विचार मांडला. तद्नंतर ते स्थळ व ते देणारे घटक शोधण्यात आले. त्यातच शाळा राज्यात नको अशा आशयाचा विचार अस्तित्वात आला.
शाळा राज्यात नको अशा आशयाचा विचार आल्यावर त्या का बरं राज्यात नको अशा आशयाचे विचार सर्वदूर पसरले. त्यावर खुप आक्रंदनही झालं. त्यातच कोणी सांगीतलं की राज्यात जर शाळा सुरु केल्या तर राजपुत्र शिक्षण शिकणार नाहीत. त्यांना वाटेल की ही शाळा आमच्या राज्यातील आहे. त्यामुळे अहंभाव वाढीस लागेल. त्यामुळे साहजीकच आज्ञापालन होणार नाही. तेव्हा शाळा राज्याच्या दूर निसर्गरम्य अशा भागात असावी. जेणेकरुन त्या निसर्गरम्य परीसराचा विद्यार्थ्यांच्या शिकण्यावर परीणाम व्हावा. मग त्या स्थळाचा व जागेचा शोध सुरु झाला.
स्थळ आणि जागेचा शोध घेत असतांना निसर्गरम्यतेवर जास्त भर देण्यात आला. त्यातच कोण शिकवेल याचाही विचार करण्यात आला. त्यातच त्यावेळच्या शिक्षणतज्ञांना डोंगरद-यात तपश्चर्या करणारे काही तपस्वी दिसले. त्यांना वाटलं की हे तपस्वीच खरे आपल्या राज्यातील राजपुत्रांना शिक्षण........खरे शिक्षण देवू शकतील.
शाळा नेमक्या कुठं असाव्यात यावर विचार करतांना झालेला जागेचा विचार, त्यातच जागाही शोधल्या गेल्या. शिक्षकही ठरवले गेले. कारण जे तपस्वी होते, त्यांना सेवा आवडत होती. त्यांना त्या राजपुत्रांना शिक्षण देणं म्हणजे एक अभिमानाची गोष्ट वाटली. ती सेवाच वाटली व त्यांनी होकार दिला. त्यांनी होकार देताच त्यावेळी जवळपासच्या राजांनी आपआपली मुलं ही त्या तपस्वींच्या स्वाधीन केली. त्यातच ती मुलंही ते शिक्षण शिकू लागले. त्यावर वचक म्हणून प्रत्येक राजा आवर्जून हिरीरीनं लक्ष देवू लागला. त्यातच त्या तपस्वींच्या पोटापाण्याची व्यवस्था म्हणून हेच राजे त्या शिक्षणाच्या बदल्यात काही मानधन देवू लागले. हेच मानधन म्हणजे आजचं शाळा अनुदान होय. त्यापुर्वी हे तपस्वी कोणत्याच राजांच्या मानधनावर जगत नव्हते. ते जंगलातच राहात व जंगलातीलच उपलब्ध झालेल्या अन्नद्रव्यावर ते आपला उदरनिर्वाह करीत असत. याला आश्रम म्हणत. हीच शासनाची पहिली शाळा ठरली.
ही शाळा निसर्गरम्य परीसरात भरत असे. ज्या ठिकाणी पुरेशी घरं नव्हती. ह्या ठिकाणी राजा प्रत्यक्ष घर बांधून देत नसे. ती व्यवस्थाच त्या काळी शिक्षण शिकविणा-या तपस्वींनी नाकारली होती. त्यामुळे राजेरजवाड्यांनीही त्या तपस्वींचा मान राखण्यासाठी त्या गोष्टीवर बारीक लक्ष दिलं नाही. नजरअंदाज केला. फक्त आपली मुलं घडावीत एवढाच उद्देश ठेवला.
ही आश्रम शाळा राज्यापासून दूर अशा ठिकाणी निसर्गरम्य भागात भरत असे. ज्या ठिकाणी हिंस्र प्राणी राहात असत. अशा हिंस्र प्राण्यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ले करु नये, म्हणून त्या ठिकाणी शिकणा-या राजपुत्रांकडून हे तपस्वी कामधंदे करुन घेत. यामध्ये घर बनविणे ही देखील व्यवस्था होती. त्या घराला कुटी म्हणत. त्या कुट्यांना वेगवेगळी नावंही दिली गेली होती.
हे तपस्वी निःस्वार्थपणे ज्ञानदान करीत. त्यातच हळूहळू त्यांचं नाव वाढत गेलं. त्यातच मुलंही वाढत गेली. ते नाव एवढं वाढत गेलं की या ठिकाणी शिकायला परराज्यातीलही राजपुत्र यायला लागली. त्यातच या तपस्वींनी भेदभाव न करता शिकवणं सुरु केलं.
त्यावेळी ह्या शिक्षणाच्या व्यवस्था ह्या खाजगीच होत्या. परंतू त्यामध्ये स्वार्थ नव्हता. शिकविणारे ऋषीमुनी हे वेगवेगळ्या जातीचेही होते. परंतू त्यावेळी जातीचा भेदभाव नव्हता. फक्त मुल्य पाहिली जात असत. परंतू कालांतरान यामध्ये भेदभाव निर्माण झाला. अपप्रचार झाला व जात आडवी आली. आजही तोच अपप्रचार सुरु आहे. त्यातच जात आडवी येत आहे.
आज शिक्षणाची व्यवस्था पाहतांना असे लक्षात येते की हे शिक्षण विशिष्ट वर्गासाठी किंवा जातीसाठी तर नाही. प्रत्येक शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश घेण्याच्या वयात जातच टाकली जाते. पुढे त्या जातीवर वादावाद होवू नये म्हणून त्या जातीचं जात पडताळणी प्रमाणपत्र बनवलं जातं. निव्वळ जातीवर राजकारण अन् असं राजकारण शाळेतही. कशाला हव्या शाळेत प्रवेशासाठी जाती? पण जात जर लिहिली नाही तर राजकारण्यांना स्वतःच्या स्वार्थाची पोळीच शिजवता येत नाही. म्हणून या जाती. अन् त्यामुळंच भ्रष्टाचारावर लगामही लावता येणे शक्य नाही.
दुसरी महत्वपूर्ण गोष्ट अशी की काल जसे राजेरजवाडे शिक्षण शिकविणा-या तपस्वींना त्यांचं पोट भरावं म्हणून अनुदान देत होते. तेच अनुदान आजही सरकार शिक्षकांना देतो. मग अशावेळी माध्यम म्हणून संचालक मंडळ का असावं? ही देखील विचार करायला लावणारी बाब आहे. कारण आज शाळेसाठी वर्गखोल्यांचा किराया, त्या शाळेत वर्ग शिकविण्यासाठी लागणारा किरकोळ खर्च त्यातच विद्यूतखर्च नव्हे तर एकुण सांगायचं झाल्यास इतर सर्व खर्च शासन देत असतांना हा संचालन करणारा संचालक.........हे माध्यम कशासाठी? देखरेखीसाठीच ना. देखरेख तर सरकारच करीत असतं. मग संचालक मंडळ का?
संचालन करणारं संचालक मंडळ हे जरी समाजसेवेसाठी असलं तरी ख-या अर्थानं ते मंडळ हे समाजाची सेवा करीत नाही तर मिळणा-या अनुदानाचा वापर आपला स्वतःचा विकास करण्यासाठी करतात. मिळणारे अनुदान हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी न वापरता त्या अनुदानातून स्वतःचा विकास करीत असतांना जो व्यक्ती किंवा व्यक्तीसमुदाय त्या गोष्टीला विरोध करीत असेल, त्या व्यक्तीला किंवा व्यक्तीसमुदायाला संपविण्याचा विचार असं संचालक मंडळ नेहमीच करीत असतं. कारण त्यांच्याजवळ अशा व्यक्ती किंवा व्यक्तीसमुदायांना संपविण्यासाठी शाळेच्या अनुदान रुपातून मिळालेला भरपूर पैसा असतो. संचालक मंडळ हे अनुदान शाळेतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च न करता त्या पैशाचा विनीयोग केवळ आणि केवळ विरोध करणा-या व्यक्तीसमुदायांना संपविण्यासाठी करतात. म्हणूनच हे अनुदान संचालक मंडळांना देवू नये असेच आजच्या काळात प्रकर्षानं जाणवते.
महत्वाचं म्हणजे संचालक मंडळ हे मुळात नसावंच. कारण सर्व खर्च आणि देखरेख सरकारच आपल्या सनदी अधिका-यांमार्फत करीत असते. कोणाला किती प्रमाणात अनुदान द्यावं हेही सरकारचे सनदी नोकरच ठरवीत असतांना असं अनुदान खाजगी संस्था स्थापन करणा-या संस्थांना देणं काही बरोबर नाही. असं करणं म्हणजे मुळातच भ्रष्टाचार वाढविणं होय. जर शाळेचा आणि शिक्षणाचा विकास करायचा असेल तर शाळा खाजगी व्यवस्थापन मंडळांना नकोच. त्या शाळा सरकारी मालकीच्याच असाव्यात व त्यावर देखरेख ठेवण्यासाठीही सरकारचाच प्रशासक असावा. जो खाजगी नसेल व सरकारला बांधील असेल.
गणेशचा विचार रास्त होता. अशा भ्रष्टाचारानं पोटं संस्थाचालकाची भरत होती आणि पिसल्या जात होता मुख्याध्यापक. जो सरकारी नोकर होता. जो भ्रष्टाचाराच्या कित्येक अंश दूर होता. संस्थाचालक हा कधीकधी शाळा चालविण्यासाठी शिक्षकांचीही नियुक्ती करायचा. त्यातच अशा नियुक्त्या करतांना उमेदवारांकडून लाखो रुपये मागणी करायचा. नियुक्तीवर सह्या मुख्याध्यापकाच्या असायच्या. ज्याला धुडगूस काहीही मिळायचं नाही. पण तेच अशा भ्रष्टाचारी व्यवहारात व्यवस्थेचे बळी ठरायचे.
प्राचीन काळातील तपस्वी हे आपले विद्यार्थी घडवितांना कधीकधी राजांचेही ऐकायचे नाहीत. अगदी बाळबोध वयापासून आश्रमाची दिक्षा घेवून राजपुत्र आपल्या मायबापांना केवळ शिक्षणासाठी सोडत. ते राज्यात तेव्हाच परत येत. जेव्हा ते प्रौढ होत अर्थात त्यांचं शिक्षण पूर्ण होत असे. त्यानंतर ते राज्यात येवून आपलं कौशल्य दाखवत. त्यानंतर राजा त्यांच्या हातात राज्यकारभाराची सूत्र देत आणि त्यांचा गौरव करीत. त्यानंतर असे राजे पुन्हा वनात जावून संन्यास घेत. ते पुन्हा कधीही परत येत नसत.
शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सुधारणा करण्यासह सर्वच प्रकारचे अधिकार हे गुरु अर्थात शिक्षकांना होते. राजे हे फक्त नामधारी होते. ते गुरुच्या आज्ञेत वागत असत. त्यामुळं ते कोणत्याही गुरुंचा अनादर करीत नसत. कधीकधी राज्यकारभार करीत असतांना ते राजे आपल्या गुरुंचाही सल्ला घेत. ज्यावेळी त्यांचा गुरु हा वयोवृद्ध होत असे. तेव्हा त्याला आपल्या डोळ्यासमोर ठेवत अर्थात राजधानीत ठेवत. ज्या राजधानीत त्यांच्यासाठी स्वतंत्र्य कक्ष असे. या काळात ते राजे त्यांची सेवा करीत. तसेच वेळप्रसंगी त्यांचा सल्लाही घेत असत.
वर्षामागून वर्ष जात राहिली. राजेशाही गेली. गणराज्य पद्धती अस्तित्वात आली. राजांचं राज्य जावून माणसांचं अर्थात लोकांचं राज्य आलं. शाळा ह्या राजांकडून निघाल्या. त्या शिक्षण सम्राटांच्या हातात गेल्या. मुल्य बदलली.विचारसरणी बदलली. त्यातच ज्या शिक्षकाला पुर्वी मान होता. तो मानही बदलला. शिक्षण बदललं आणि बदलत्या शिक्षणासोबत अर्थ बदलला. जो शिक्षक काल राजाला सल्ला देत असे. तोच शिक्षक या शिक्षणसम्राटांसमोर गुलामागत वागू लागला नव्हे तर हे शिक्षण सम्राट त्या गुरुला गुलामागत वागवू लागले. निंदा, नालस्त्यांचा काळ आला. चापलुस शिक्षकांची फौज तयार झाली. हे चापलुसी करणारे शिक्षक केवळ आपल्या स्वार्थासाठी आपल्या समकक्ष शिक्षकांचाही बळी घ्यायला मागेपुढे पाहात नव्हते. अशा या चापलूस शिक्षकांमुळेच शिक्षणसम्राटांची मक्तेदारी वाढली व ते इतर शिक्षकांना गुलामागत वागवू लागले. याचाच अर्थ असा की ज्या राजेशाहीच्या काळात शिक्षकाचा मानसन्मान होता. तो या लोकशाहीच्या काळात पुरता ढासळला असे म्हणायला काहीही हरकत नाही. या गोष्टीला काही अपवादही आहे. अपवाद म्हणजे धनानंद नावाच्या राजाने केलेल्या आर्य चाणक्याचा अपमान. हा अपमान म्हणजे अख्ख्या गुरुजातीचा अपमान होता. हे जरी खरं असलं तरी आज त्याच गुरुंचा पदोपदी अपमान होत आहे. बहुतःश शिक्षणसम्राट शिक्षकांचा अपमानच करीत आहेत. शासनही अशा शिक्षकांचा अपमानच करीत असून शिक्षकांना वेठीस धरुन धोरणे राबवीत आहेत. जी धोरणं कुचकामाची असतात. आज शिक्षकांच्या शिकविण्याला पुरेशी किंमत उरलेली नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यालाच किंमत आलेली आहे. जरी ऑनलाइन शिक्षणाचा काळ आहे तरीही. आज संस्था संचालकांची वाढती मुजोरी शिक्षण संपविण्याला कारणीभूत ठरत आहे. शिक्षणाचं खाजगीकरण होवू घातलेलं आहे. गरीबांना मुलं कशी शिकवावी हा विचार येत आहे. कारण स्पर्धेच्या या काळात जो जेवढा पैसा मोजेल, त्याचंच शिक्षण असे शिक्षणाचे महत्व वाढलेले आहे. मराठी गरीबांच्या शाळा बंद होत आहेत. शिकवणी वर्गाला अवास्तव महत्व आलेलं आहे. काँन्व्हेंटलाही अतिशय भाव आलेला आहे. सरकारी शाळेत कोणीही शिकवायला तयार होत नाहीत. त्यामुळं एकंदरीत सांगायचं झाल्यास शिक्षणाचा बट्याबोळ होत चालला आहे.
गणेशला याबाबतही चिंता होती. तो ज्या शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक बनला होता. ती काही काँन्व्हेंटची शाळा नव्हती. ती शहरातील एका खाजगी संस्थेच्या मालकीची शाळा होती. ज्या शाळेचा संस्थाचालक स्वतःला मालकच समजत होता. तो सेवा, सेवेचं मुल्य ह्या सर्व गोष्टी विसरुन गेला होता. त्यातच शिक्षकांना कसा त्रास देता येईल असाच तो विचार करीत होता.
गणेशची स्थलांतरीत झालेली शाळा. गणेशला सोडून इतरही शिक्षक खुश होते. पण गणेश काही खुश नव्हता. कारण त्याला आजही त्याच्या जुन्या शाळेसंदर्भात पत्र येतच होती. ती पत्र त्या संचालकामुळं येत होती. जो त्याच्या पुर्वीच्या शाळेचा संस्थाचालक होता.
संस्थाचालक हा नाखुश होता. कारण त्याची शाळा आज त्याच्या हातून निघून गेली होती. तो बावचळलाही होता. कारण आज त्याची एक शाळा बंद झाली होती. तो पराभवी ठरला होता. तसं पाहता तो ती शाळा बंद होण्याला जबाबदार स्वतःला नाही तर गणेशलाच समजत होता. त्यामुळं त्याला वाटत होतं की गणेशही सुखी राहू नये. म्हणून तो आजही गणेशविरोधात तशा आशयाचे पत्र शिक्षण विभागाला पाठवत होता आणि त्याच्या तक्रारीवरुन शिक्षणविभाग त्याला पत्र पाठवीत होते. त्याचा विचार होता की आपण गणेशचा बदला घ्यावा.
शिक्षणविभागही आज गणेश दुस-या शाळेत गेला असला तरी त्यालाच पत्र पाठवीत होते. त्याला त्रस्त करीत होते. त्याला सुखी राहू देत नव्हते. त्याचा त्या गोष्टीशी काहीही सोयरसुतक नसलं तरी. परंतू ती व्यवस्थाच तशी होती. डोळे नसलेल्या शरीरासारखी.
कंटाळलेला गणेश.........त्यातच त्या गणेशला ती येणारी वारंवार पत्र. ज्याचा त्याच्या जीवनाशी काहीही संबंध नसला तरी. तो अगदी त्या पत्रांनी वैतागून जात होता. काय करावं सुचत नव्हतं. शेवटी तो कंटाळला. त्याच्या मनात भलतेसलते विचार सुरु झाले. तो एकाकी बनला.
सततचा येणारा तो विचार. त्यातच त्याच्या मनात कुविचारही येवू लागले. ते कुविचार जणू आत्महत्येचेच होते. कुणालाही वाटत नव्हतं की गणेश आत्महत्या करेल. पण व्यवस्थाच तशी होती ती. तसे विचार येणे साहजीकच होते. ते विचार त्यानं कोणाजवळ बोलूनही दाखवले नाहीत. तसं पाहता त्या विचारानं त्याला रात्र न् रात्र झोपही येत नव्हती. जणू झोप उडाल्यासारखी.
आज असाच कुविचार गणेशच्या मनात सकाळपासून घोळत होता. त्याला सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. त्याच्या पत्नीनं त्याला त्याची तशी अवस्था पाहून विचारलं,
"आपली प्रकृती ठीक नाही का?"
"व्यवस्थीत आहे." तो म्हणाला.
सायंकाळी सर्वांची जेवणं झाली होती. सर्वजण ढाराढूर झोपी गेले होते. मात्र गणेश अजूनही झोपला नव्हता. त्याला नेहमीप्रमाणं आजही झोप येत नव्हती. तो आताही विचारच करीत होता. काय करावे सुचत नव्हते. कारण ती त्याच्या जगण्यातील आणि जीवनातील काळरात्र होती. जी काळरात्र ठरणार होती.
गणेशच्या मनातील तो विचार. तो उठला. त्यानं इकडंतिकडं पाहिलं. पत्नी व मुलांकडं एक कटाक्ष टाकला. तसं वरती पाहिलं. वर पंखा गरगर फिरत होता. तसा विचार आला, ' आपण या पंख्याच्या छताला अडकलो तर....... '
विचारांचा अवकाश त्यानं आपल्या पत्नीची ओढणी घेतली. तो बाजूच्या कम-यात गेला. तोंडावर घट्ट रुमाल बांधली. ओढणीचा एक शिरा पंख्याला बांधला. खाली टेबल ठेवला. तसा तो टेबलवर उभा झाला. दुसरा शिरा गळ्याला बांधला व टेबलवरुन खाली उडी मारली. तसा तो ओरडू लागला जीवांच्या आकांतानं. कारण त्याचा जीव तडफडू लागला. पण ती काळरात्रच. त्याचा त्यावेळी तो आवाज ऐकायला कोणीही तिथं नव्हतं. कोणालाच जाग आली नाही. सर्वजण अगदी आनंदात गाढ झोपेत झोपले होते. तसा क्षणातच श्वास गुदरमरला आणि गणेश गतप्राण झाला. तशी ती रात्र निघून गेली.
दुसरा दिवस उगवला. त्याची पत्नी अजूनही झोपलीच होती. मुलगी उठली होती. ती बाजूच्या कम-यात गेली. क्षणार्धात तिची नजर त्या फासावर लटकलेल्या पार्थीवाकडं गेली. तिचा बाप जीभ काढून आणि डोकं खाली टाकून लोंबकळत होता. पंख्याला ओढणी बांधलेल्या अवस्थेत. तशी ती घाबरली. ती तत्क्षणी पाठमोरी झाली. तशी ती आईजवळ आली. आईला धक्के मारुन उठवू लागली.
तिच्या धक्के मारण्यानं तिची आई उठली. तसं तिनं आईला ती गोष्ट सांगीतली. त्यातच तिची आईही वेळ न दवडता त्या कम-यात गेली. तिनं ते दृश्य पाहिलं व ती आपल्या पतीच्या त्या फासावर लटकलेल्या पार्थीवाला लपकली आणि हंबरडा फोडला.
तो हंबरडा ऐकून आजुबाजूचे लोकंही धावत आले. काय झालं त्यांनाही सुचेनासं झालं. तसं कोणीतरी सुचवलं, ' ही पोलिसकेस आहे. हात लावू नका.'
जी पत्नी त्याला लपकून होती. त्या पत्नीला कोणीतरी सोडवून घेतलं. तसा पोलिसांना कुणीतरी फोन केला. तसे ताबडतोब पोलिस घरी आले.
पोलिस घरी येताच त्यांनी त्या पार्थीवाला त्या पंख्यावरुन खाली काढलं. ते पार्थीव उत्तरीय तपासणीसाठी घेवून गेले. तपासात त्या पार्थीवाच्या एका खिशातून एक चिठ्ठी निघाली, त्यात आत्महत्येचं कारण लिहिलं होतं.
पोलिसांनी ती चिठ्ठी हस्तगत केली. तपासाची चक्रे फिरवली व त्यांनी संस्था चालकाला अटक केली. पार्थीव उत्तरीय तपासणीनंतर परीवाराच्या स्वाधीन केलं गेलं.
गणेश मृत्यू पावताच त्याच्या मृत्यूची बातमी वर्तमानपत्रात छापून आली. सर्वत्र परीचीतामध्ये हाहाकार उडाला. ज्याला गणेशचा स्वभाव माहित होता. तो तो प्रत्येक व्यक्ती पश्चाताप करीत होता. गणेश व्यवस्थेचाच बळी ठरला होता. कारण व्यवस्थाच तशी होती. त्या व्यवस्थेनंच त्याचा बळी घेतला होता.
पार्थीवाची क्रियाकर्मविधी आटोपला. तशी पोलिसांनी पुरावे म्हणून गणेशला आलेली काही पत्र हस्तगत केली. खटला सुरु झाला व लवकरच या केसचा निकाल लागला. गुन्हा सिद्ध झाला. अमाप पैसा असुनही संस्थाचालक आपल्यावरील आरोपाला लपवू शकला नाही. त्यातच त्याला म्हातारपणात तुरुंगवास झाला.
गणेश तर संपला होता. सर्व या संसारातील मोह, माया सोडून........पण आज संस्थाचालक जीवंत होता आयुष्याच्या शेवटच्या काळात त्याचेवर तुरुंगात खडे फोडायची वेळ आली होती. त्याच्याही मनात आज विचार होता की जर मी गणेशसारख्या निष्पाप जीवाला त्रास दिला नसता तर...... आज माझ्यावर ही वेळ आली नसती.
विचार करता करता त्याचीही मनस्थीती बरोबर राहात नव्हती. ज्यांच्यावर प्रेम केले, ते घरचे लोकं भेटायला येत नव्हते. एखाद्यावेळी समजा भेटायला आलेच तर ते त्याला काहीबाही बोलून मोकळे होत होते. तसे विचार यायचे की मी जे काही केलं, ते लेकरासाठीच ना. मग ते सगळं करुन, त्या निष्पाप शिक्षकांना त्रास देवून मी काय मिळवलं. याचं उत्तर त्याच्याजवळ नव्हतं. कारण नात्यातील माणसं दिसत नव्हती. जी नातवंड आपल्या कुशीत अंगाखांद्यावर खेळवायचं वय होतं. त्या वयात तो तुरुंगात होता. त्यानं अमाप संपत्ती शिक्षकांना त्रास देवून गोळा केली. परंतू आज त्या अमाप संपत्तीचा उपभोग दुसरेच घेत होते. त्याला तो उपभोग घेता येत नव्हता.
विचार करता करता तो आयुष्याचे शेवटचे दिवस काढत होता नव्हे तर इतरांना बोधही देत होता. काहीतरी लिहितही होता. काय लिहित होता ते त्यालाच माहित होते.
असाच विचार करता करता एक दिवस तो मरण पावला. अशा वेळी मरण पावला की जिथे त्याचे सगेसंबंधी कोणीही नव्हते, जिथे त्याला शेवटच्या दिवशी कोणीही थेंबभर पाणीही पाजलं नाही. अत्यंत जराजर्जर अवस्थेत तो मरण पावला होता.
संस्थाचालक मरण पावल्याचं कळताच त्याच्या मृत्यूची बातमी तुरुंगधिका-यानं त्याच्या परीवाराला कळवली. परंतू उत्तर आलं की त्याचं क्रियाकर्म उरकून घ्या. आम्ही येवू शकत नाही.
उत्तर येताच तुरुंगधिका-यानं त्याच्या पार्थीवाचा क्रियाकर्मविधी उरकवला. तसं त्यानं लिहिलेल्या टिपण्या वाचल्या. त्या वाचताच त्याच्याही डोळ्यातून पाणी आलं. संस्थाचालकानं आपलंच चरीत्र आत्मकथन केलं होतं. सत्य लिहिलं होतं की त्यानं आपल्या जीवनात कोणाकोणाला कसा कसा त्रास दिला आणि हेही लिहिलं होतं की त्या त्रासाचा परीणाम त्याच्या जीवनावर कसा काय झाला. तसेच भाकीतही लिहिलं होतं की त्याच्या मरणानंतर त्याच्या पार्थीवाचं काय होईल. तसेच तो हेही लिहायला विसरला नव्हता की असं कोणीही करु नये.
संस्थाचालक मरण पावला होता. परंतू तो बोध देवून गेला होता. शेवटी वाईटाची परीयंती वाईटच होते. असंच एक वाक्य लिहिलं होतं त्यानं पुस्तकात.
जे लिहिलं होतं, तेच सत्य ठरलं होतं. वाईटाची परीयंती वाईटच झाली होती त्याच्या जीवनात. कारण जे घडलं होतं संस्थाचालकाच्या बाबतीत, ते सत्यच घडलं होतं.
तुरुंगधिका-यानं त्या टिपण्या वाचल्या. तसं त्या संस्थाचालकाच्या मृत्यूनंतर त्या टिपण्या एकत्रीत करुन त्या टिपण्या तुरुंग प्रशासनाला दाखवल्या. तुरुंगप्रशासनानं त्या टिपण्यांचं पुस्तक काढायचं ठरवलं. जे पुस्तक इतरांना बोध देईल. ज्या पुस्तकातून संस्थाचालकांना बोध मिळेल. ते आपल्या संस्थेतील शिक्षकांना त्रास देणार नाहीत व ज्यातून गणेशसारखा कोणीही व्यक्ती मरणाला मिठी मारणार नाही. तसेच अधिरथसारखा व्यक्ती शिक्षकांना त्रास देवून बदनाम होणार नाही. आज अधिरथ व गणेश मरण पावले होते. परंतू त्यांचा मृत्यू व्यर्थ गेला नाही. त्यांच्या मरणातून संचालकाला बोध झाला. तो शिकला व त्यानं आपण केलेल्या पापाचं प्रायश्चीत म्हणून ती पुस्तक लिहिली. जी पुस्तक भविष्यात अजरामर होणार होती नव्हे तर संस्थाचालकांनी संस्था कशी चालवावी यावर मार्गदर्शन करणार होती.
****************************************

काही दिवस असेच विचारविनिमयात गेले. काही दिवसानं तुरुंगप्रशासनानं ती पुस्तक काढली. चमत्कार असा की त्या पुस्तकाच्या प्रतीही भराभर खपल्या. त्यातच त्या पुस्तका बहुतःश संस्थाचालकांनीही वाचल्या. त्यातच काही संस्थाचालक त्या पुस्तकापासून बोध घेवून सुधारले. परंतू काही मात्र आजही सुधारले नव्हते. कारण त्यांना अजुनही त्या गोष्टीची झळ पोहोचलेली नव्हती. ज्या झळीतून पुस्तक लिहिणा-या संस्थाचालकाचं उभं आयुष्य विस्कळीत झालं होतं.