Urmila in Marathi Mythological Stories by Ankush Shingade books and stories PDF | उर्मीला

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

उर्मीला

मनोगत
'उर्मीला' ही माझी साहित्य विश्वातील एक्कावनवी पुस्तक असून पंचवीसवी कादंबरी आहे. ही कादंबरी वाचकांपुढं ठेवून मी या माध्यमातून एका पौराणिक विषयाला हातात घेतलं आहे. कादंबरी फारच सुंदर झालेली असून ही कादंबरी लिहिण्याचाह विषय माझे मित्र सुनील वाडेनी सुचविला. तसेच यावर दुसरी चर्चा माझे पंढरपूरचे वाचक मित्र संतोष चौंडावार यांच्याशी झाली आणि वाटलं की आपण उर्मीला कादंबरीच्या रुपानं एक पौराणिक विषय हातात घ्यावा.
ही कादंबरी लिहितांना काही अडचणीही आल्या. त्या विशेष करुन मांडाव्याशा वाटतात नव्हे तर मांडणं गरजेचं आहे. पहिली अडचण म्हणजे रामायण घडलंच नाही असे मानणा-यांची आली. कारण जे रामायण मानत नाही. त्यांच्या ग्रुपवरुन एका जवळच्या व्यक्तीनं यातील काही भाग टाकला. संबंधीत काही व्यक्तींनी त्यातील भाग वाचलाच नाही. परंतू हा भाग दृश्य स्वरुपात आल्यामुळं आक्रंदन सुरु झालं. शेवटी मला मधात पडून हार न मानता ह्या कादंबरीची उकल करावी लागली. परंतू तरीही समजून न घेणा-यांना हा विषय पटलाच नाही नव्हे तर समजलाच नाही.
उर्मीला कादंबरीच्या रुपानं माझे मत मी मांडले. ते कुणाला पटेलच असे म्हणता येतस नाही. तो कलाविष्कार आहे. त्याकडे कलेच्या दृष्टिकोणातूनच पाहावं. फालतू वाद घालू नये.
मला या कादंबरीच्या रुपानं हे मांडावसं वाटलं की उर्मीला ही या रामकालखंडातील एक महत्वपूर्ण स्री. ती जर नसती तर आज रामालाही कोणी ओळखू शकलंस नसतं. कारण जिथे रामच उरला नसता, तिथे बाकीच्यांचं अस्तित्व काय? रामायणातही राम, सीता व लक्ष्मण यावरच जास्त प्रकाश टाकलेला आहे. परंतू उर्मीलेला उपेक्षीत ठेवलेले होते. हीच उर्मीला मी या कादंबरीतून श्रेष्ठ दाखवली आहे. ती कशी रामकालखंडात श्रेष्ठ होती. हे मी माझे ममोगतातून सांगत नाही. त्यासाठी ती कादंबरीष वाचन करावी लागेल. तेव्हाच तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. असो.
ही कादंबरी माझ्या साहित्यविश्वातील इतर कादंब-यांपेक्षा सरस असून ही कादंबरी लिहितांना मी सर्व चित्त ओतलं आहे. तसेच ही कादंबरी लिहित असतांना त्या दरम्यान कोणत्याही वर्तमानपत्रात कोणतेही लेख लिहिले नाहीत आणि विशेष सांगायचं म्हणजे ही कादंबरी दसरा दि. (१५/१०/२१) ते दिवाळी (०५/११/२१) या दरम्यान पुर्ण केली. ही कादंबरी दि.२०/१०/२१ ला सुरु करुन दि.०१/११/२१ ला संपवली. म्हणजेच केवळ तेरा दिवसात पूर्ण केली. कारण मनात उद्देश होता की उर्मीलेच्या उपेक्षीत जीवनाला आजच्या परीस्थीतीत न्याय मिळवून देणे.
खरं सांगायचं म्हणजे लेखक, पत्रकार, कवी हे उपेक्षीत लोकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच जगत असतात. ते आपल्या लेखनीतून त्यांना न्याय मिळवून देण्याचाही प्रयत्न करीत असतात. यात काहींशी नक्कीच मतभेदही होतात. परंतू हे लेखक, कवी, पत्रकार त्या गोष्टींची पर्वा करीत नाही. ही कादंबरी साकारण्यामागे मी एका विशिष्ट धर्माची बाजू घेतलेली नाही. मी एक लेखक म्हणून ही कादंबरी लिहिलेली आहे. मी गोविंदा गोपाळ गायकवाड, तसेच चर्मयोगी, अत्त दिप भवंही लिहिलेलं आहे, संघर्ष नावाचं उपन्यासदेखील लिहिलेलं आहे. तसेच चंदूबाबासुद्धा लिहिलेलं. त्यातच राजा दाहिर आणि बाप्पा रावलही. काही कादंब-या ह्या हिंदू धर्माच्या बाजूनं झुकतात तर काही कादंब-या बौद्ध धर्माच्या. पण मी प्रत्येक कादंबरीकडे धार्मीक दृष्टिकोणातून पाहात नाही. प्रत्येकच विषय हा तेवढ्याच ताकदीनं लिहिण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला कोणत्याच धर्माशी बांधील ठेवावेसे वाटत नाही. फक्त व्यक्त होणे हे कर्तव्य समजून जिथे अन्याय झालेला आहे असे वाटते, त्या भागावर हात घालतो. मग मी धर्माचा विचार करीत नाही.
उर्मीला ही कादंबरी एक सरस कादंबरी असून आपण ही कादंबरी नक्की वाचा व समजून घ्या उर्मीलेचा इतिहास. तसेच समजून घ्या की तिनं काय केलं, कशासाठी केलं, त्यामागे कोणती तिची भावना होती. शेवटी तिचं काय झालं! ह्या सर्व संभ्रमाच्या गोष्टी.
माझ्या इतर कादंब-यांना जशी आपण दाद दिली. तशीच यााही कादंबरीला दाद द्याल असे वाटते. फक्त विनंती एवढीच की ह्या कादंबरीत काही भाग काल्पनिक आहे. त्यासाठी बाकीच्या गोष्टी सोडून केवळ मतितार्थ समजून घेण्यासाठीच कादंबरी वाचा. वाद करण्यासाठी नाही. कारण प्रत्येक गोष्टीला नाण्याच्या दोन बाजू असतातच.हे लक्षात घ्या. तसेच किमान कादंबरी वाचून एक फोन अवश्य करावा ही विनंती.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे
९३७३३५९४५०


उर्मीला (कादंबरी)

ती अतिशय सुंदर होती. तिलाही तो आवडला होता. म्हणूनच तिनं त्याचेशी विवाह केला होता. पण तिला काय माहित की असंही जीवन तिच्या नशीबात असेल. तेच जीवन तिच्या नशीबात आले होते. आज ती पतीवियोगानं तडपत होती.
आयुष्याची ही चौदा वर्ष अतिशय दुःखात काढले होते तिनं. तिला सुचत नव्हतं काय करावं. पण तिनं पतीला जे वचन दिलं होतं, त्याच वचनाची परीपुर्ती करण्यासाठी ती रात्रंदिवस ते दुःख सहन करुन जगत होती. आपला दिवस गोड करीत होती.
ते त्यांचं विस्तारीत कुटूंब. त्या विस्तारीत कुटूंबातील राणी बनलेली ती यौवना. सगळे केवळ आज्ञा आणि वचन पाळणारे, मग तो कितीही मोठा का असेना. तसेच मोठ्यानं आज्ञा मोडू नये म्हणून लहानाचं त्यांच्यापुढचं वागणं. आज जो तो स्वतःला लहानच समजत होता. जणू ती थोरल्या मातेची आज्ञा पालन करण्यासाठी. जी माताही आजपर्यंत मोठ्या आविर्भावात आनंदानं राहात होती. त्या मातेनं एका क्षणात सर्वांना दुःख सागरात लोटवून टाकलं. सर्वांनी त्या मातेच्या शब्दानं दुःख झेललं. पण जिला सर्वात जास्त दुःख झेलावं लागलं, तिचं नाव होतं उर्मीला. जी लक्ष्मणाची पत्नी होती. जिने राजा राम आपली प्रिय बहिण सीतेसोबत वनात जाणार असल्याचे कळताच लक्ष्मणाने तिला सहज सोडून जावे म्हणून साजश्रृंगार केला होता. तिला वाटत होते की तिच्या साजश्रृंगाराने लक्ष्मण क्रोधीत होईल व तो तिचा त्याग करेल व तो सहजच रामासोबत वनात जाईल.
कैकेयी बोलून गेली होती. तिनं राजा दशरथाला तीन वर मागीतले, पहिला म्हणजे भरताला राज्य व दुसरा म्हणजे रामाला चौदा वर्ष वनवास व तिसरा राज्याची शान परत आणणे. तसं पाहता तिची इच्छाही नव्हती त्या तीन वरदानांची पुष्टी करुन घेण्याची. पण तिला तिची दासी मंथरानं भडकवलं होतं. त्यानुसार ती वागू लागली आणि तिनं दशरथासमक्ष आपला शब्द टाकला की राजा दशरथाने तिला दिलेले तीन वरदान आता पुर्ण करावेत. त्यासाठी राणी कैकेयी सरसावली होती. मंथराच्या म्हणण्यानुसार भरत राजा बनावा व कैकेयी राजमाता असं कैकेयीला वाटत होतं. म्हणूनच तिनं वरदान पुर्ण करण्याबाबत राजा दशरथाला डिवचलं होतं.

****************************************

उर्मीला.........तिचं विवाहाचं वय झालं होतं. ती नाबालीग नव्हती. परंतू विवाह करण्याची तिची इच्छा नव्हती. तिला वाटत होतं की आपल्या बहिणीचाच विवाह व्हावा व ती सासरी जावी. आपण नंतर करु. कारण विवाहासाठी केवळ रामाचाच प्रस्ताव आला होता. लक्ष्मणाचा नव्हताच.
रामानं विवाहास होकार देताच संपूर्ण जनकपुरीत आनंद पसरला. सर्व जनकपुरी सजविण्यात आली. सीतेचे गोडवे गाणे सुरु झाले. तशा तिच्या दास्या तिच्याभोवती गोळा झाल्या. तोच एक दासी धापा टाकत टाकत आली. उसासा टाकत टाकत म्हणाली,
"अभिनंदन राजकुमारी उर्मीलाजी. आपलं अभिनंदन."
ती दासी. त्या दासीचं धापा टाकत टाकत धावत धावत येणं. तसेच अभिनंदन उर्मीलाजी म्हणणं. ह्या गोष्टी आश्चर्य करणा-या होत्या. त्यातच अभिनंदन सीता म्हणणं ठीक होतं. पण अभिनंदन उर्मीलाजी. हे उर्मीलाबाबतचं बोलणं कुठंतरी बाकीच्यांना खलण्यासारख्या होत्या.
ती रोपवाटीका दैदिप्यमान वाटत होती. त्यातच त्या रोपवाटीकेत सीतेसह उर्मीला, मांडवी व श्रुतकिर्तीही होती. तसं आश्चर्य वाटताच सर्व हसल्या. तशी सीता म्हणाली, "दासी, काय झालं? असं अभिनंदन तेही उर्मीलाचं? कशासाठी? असं काय घडलं की तू अभिनंदन देतेस?"
"अभिनंदनच उर्मीलाचं. ती अभिनंदानासच पात्र आहे."
"म्हणजे?" सर्वांनी एकमेकांकडे पाहात म्हटलं. तशी उर्मीला म्हणाली, "कालनयना, असं काय घडलंय की तू माझं अभिनंदन करतेय."
"उर्मीलाजी असंच घडलंय. एक फारच आनंदाची बातमी आहे."
"मग सांग ना. वेळ कशाला घालवतेस?"
तिनं खाली मान टाकली. क्षणभर थांबली. तशी आणखी एक लांब श्वास घेत ती बोलली.
"अशी सांगणार नाही. काहीतरी द्यावं लागेल. वार्ता आनंदाची आहे आणि फायद्याचीही."
कालनयना सांगत होती आपल्या प्रिय युवराज्ञींना. तशी उर्मीला म्हणाली,
"ए सांगना, अशी काय करते. सांगणं."
"नाही नाही. मला काही द्या. त्याशिवाय मी सांगणार नाही."
कालनयना काही सांगणार नाही. असा विचार करुन ती आनंदाची गोड बातमी ऐकायला उतावीळ झालेली उर्मीला......तिनं आपल्या गळ्यातील सुवर्णमाळ उतरवली व ती तिला देत म्हणाली,
"आतातरी सांगशील ना कालनयना."
"होय. आता नक्कीच सांगेन."
गोड बातमी सांगणारी कालनयना आपल्या प्रिय सखीला ती आनंदाची बातमी सांगू लागली. तसे कान टवकारत त्या रोपवाटीकेतील सीतेसह सर्वजणी बोलल्या,
"सांग, सांग कालनयना. अशी लाजवू नको उर्मीलाला."
"हो सांगतेय तर ऐका."
"हे बघा सख्यांनो, उर्मीलाही आपल्या युवराज्ञी सीतेसह विवाहबंधनात अडकणार आहे. तिला पाहायला एक सुकूमार राजकुमार तयार आहे."
"सुकूमार राजकुमार!"
"होय, सुकूमार राजकुमार."
"म्हणजे?"
"उर्मीलाचा विवाह होणार आहे, विवाह."
"ए कालनयना, असली फाजील गंमत करु नकोस." उर्मीला म्हणाली.
"युवराज्ञीसाहेबा, मी गंमत करीत नाही.,अगदी खरं सांगतेय."
"उर्मीला, अशी निराश होवू नकोस. विवाह ना. कधी ना कधी झालाच असता ना. मग आता झालाच तर काय होणार. कधीतरी होण्यापेक्षा आताच झालेला बरा." सीता म्हणाली. तशी मांडवीही बोलली.
"कालनयना, तो राजकूमार कोण आहे? जरा कळेल काय आम्हास?"
"होय कळेल ना. पण........."
"पण काय गं?"
"उर्मीला ताई म्हणतील तर......."
उर्मीला गप्प होती. तिला काय होत आहे हे कळत नव्हतं. तशी सीता म्हणाली,
"सांग सांग कालनयना. माझा आदेश आहे तुला."
"नाही नाही जेष्ठ ताईसाहेबा. उर्मीला ताई म्हणतील तरच सांगणार."
कालनयनाचा हट्ट पाहून त्या रोपवाटीकेतील सर्वजणी उर्मीलाला मनवू लागल्या. कारण त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यांना उर्मीलाचा होणारा पती जाणून घ्यायचा होता. जो पती तिला कालसदृश सुख देणार होता.

****************************************

रोपवाटीकेतील तो तिसरा प्रहर. ते थंडीचे दिवस होते. तशी कालनयनानं आणलेली गोड बातमी. बातमी तर माहित झाली होती. पण होणारा भरतार कोण असेल! सा-याच जणी विचारात पडल्या होत्या.सीतेचा पती माहित पडला होता. पण उर्मीलाचा! सारेच संभ्रमात होते. तसे सर्वजण तिला विनवीत होते. त्यातच ते सर्व पाहून उर्मीला म्हणाली,
"प्रिये सांग ना. कोण आहेत ते?" उर्मीलाचा तो आवाज.अत्यंत हळू आणि गोड आवाज. तो कालनयनाला स्पष्ट ऐकूही आला. परंतू न ऐकल्यासारखं करीत कालनयना म्हणाली,
"उर्मीलाताई, जरा मोठ्यानं बोला."
"आता माझा काय अंत पाहणार काय?"
उर्मीला जोरानं म्हणाली. तशी कालनयना सांगू लागली.
"ते दुसरे तिसरे कोणीही नसून आपल्या सीतेचेच दिर आहेत. ज्यांचं नाव लक्ष्मण आहे. जे रामाचे अनुज आहेत."
कालनयनानं भराभर ते सगळं सांगून टाकलं आणि ती चालली गेली.
सायंकाळ झाली होती. अंधार पडणार होता. तशी त्या रोपवाटीकेत हिंस्र श्वापदांची भीतीही होतीच.तोच थंड वाराही सुटला आणि उर्मीलेसह सर्वजणी महालाच्या दिशेनं चालू लागले.मात्र उर्मीलेच्या मनात तोच विचार होता. श्रीरामअनुज लक्ष्मण कसे असतील.
उर्मीलाचा विचार रास्त होता. तिनं लक्ष्मणाला पाहिलं नव्हतं. त्यातच कालनयनानं सांगीतलेला निरोप. आता तिचंही तरुणवय झालं होतं. कारण तिही सीताएवढीच होती.
राजा जनकाला पुष्कळ काळपर्यंत पुत्र नव्हता. तो दुःखी होता. त्यातच एकदा त्याच्या राज्यामध्ये महाभयंकर दुष्काळ पडला.
सीता........जनकराजाची मुलगी. सीताजन्माच्या अनेक गोष्टी प्रचलीत असतीलही कदाचित. पण एक गोष्ट नक्की की ती म्हणजे मिथीला राज्यातील. मिथीला राज्यात भयंकर दुष्काळ पडल्याची. ज्याला पाहून राजा जनक फार दुःखी झाला होता. त्यातच त्यानं काही ऋषीमुनींना बोलावून त्यातून निघण्याचा मार्ग विचारला. तेव्हा त्या तपस्वींनी सांगीतलं की राजा जनकाला एक यज्ञ करावा लागेल. त्यातच ज्यावेळी यज्ञ समाप्त होईल, तेव्हा त्यानं अंतिमसमयी राज्यातील जमीनीवर स्वतः नांगर चालवावं. ज्यातून त्यांच्या राज्याची दुःखातून मुक्तता होईल.
तो काळ.......तो काळच मुळात सत्याचा मानण्यात येत होता. त्यातच राजा जनकाला मिळालेला ऋषींचा सल्ला, त्यांचं मन त्या सल्ल्यानं मोहून टाकलं होतं. त्यातच त्या ऋषीच्या सल्ल्यानं राजा जनकानं राजसुर्य यज्ञ करण्याचं ठरवलं.
तो राजसुर्य यज्ञ........गावोगावचे अनेक ऋषीमुनी त्या यज्ञात समाविष्ट झाले होते. त्यातच तो यज्ञ काही दिवसातच संपन्न झाला आणि ठरल्याप्रमाणे शेवटच्या दिवशी राजा जनकानं आपल्या राज्यातील शेतीत नांगर चालवला. त्यातच त्या नांगराच्या फाळात एक लहान मुल आलं. ते रडत होतं. प्रथम पाहताक्षणी राजा जनकाचा विश्वासच बसला नाही. परंतू राजा जनकाने सुक्ष्म निरीक्षण करताच ते सोन्याच्या पानात गुंडाळलेलं बाळ दिसलं. राजा जनकानं त्या बाळाला उचललं व त्याचं निरीक्षण केलं असता ती मुलगी निघाली. त्यानं त्या कन्येला स्पर्श करताच त्याच्यात त्या बालिकेबद्दल प्रेम निर्माण झालं. त्यातच त्यानं त्या मुलीला आपली मुलगी मानून तिचा सांभाळ केला. तिचं नामकरण झालं. नामकरण करतांना ऋषींनी सांगीतलं की ती नांगराच्या फाळात सापडली. म्हणून तिचं नाव सीता ठेवावं. कारण नांगराच्या फाळाला सीता म्हणतात.
सीतेच्या जन्माबाबत आणखी एक कहाणी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे लंकापती रावण यांची. मानलं जातं की सीता ही लंकापती रावण व मंदोदरी यांची मुलगी होती. जिचं पुनर्जन्मातील नाव वेदवती होतं.
वेदवती सीता जन्मापुर्वी विष्णूची परमभक्त होती. त्यांची पत्नी बनण्याची तिची फारच इच्छा होती. ती तपस्या करीत असतांना रावण तेथून जात असतांना त्याला वेदवती दृष्टीस पडली. तो मोहित झाला. त्यातच तिच्या रुपावर खुश होवून तिला आपल्या सोबत चालण्याविषयी विनवले. परंतू वेदवतीनं त्यास स्पष्ट नकार दिला. ते पाहताच रावण क्रोधीत झाला. त्यातच त्यानं तिच्यासोबत दृष्ट व्यवहार करणं सुरु केलं. त्यांना तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परंतू रावणाने तिला स्पर्श करताच तिनं स्वतःला जाळून घेतलं. परंतू जाळून घेण्यापुर्वी तिनं रावणाला शाप दिला की पुढील जन्मात मी तुझीच पुत्री बनेल व तुझ्या मृत्यूचे कारण बनेल.
वेदवतीनं मृत्यूनंतर मंदोदरीच्या पोटात जन्म घेतला. रावणाला मोठा आनंद वाटला. परंतू त्याला त्याचा इतिहास आठवला. त्याला भीती वाटली की आपल्या काळाने आता जन्म घेतलेला आहे. त्यामुळं की काय, त्यानं सीतेला त्यागण्याचा विचार केला व तिला समुद्रात फेकून दिले.
वेदवती समुद्रात गेली. परंतू त्या सागराने तिला नदीला सोपवले. जिचं नाव वरुणी होतं. ह्या सागरदेवी वरुणीनं तिला पृथ्वी मातेच्या हवाली केलं. पृथ्वी मातेनं तिला राजा जनकाच्या फाळेत टाकलं. ज्यात ती राजा जनकाला नांगराच्या फाळात सापडली होती.
काही ठिकाणी अशी कहाणी आहे तर काही लोकं तोंडी कहाणीही मुखोद् गत करतात. ती कहाणी म्हणजे राजा रावण हा फार अहंकारी होता असं मानलं जातं. एकदा तो कैलासपती भगवान शिवाला भेटायला गेल्याचा उल्लेख आहे. त्यातच त्यानं कैलासपर्वत उचलण्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न आज पुराणात प्रसिद्ध आहे.
रावणाने एकदा कैलास उचलण्याचा प्रयत्न केला. परंतू शिव भगवानही काही कमजोर नव्हते. ते त्याची परीक्षा पाहात होते. शेवटी कैलास उचलून न झाल्यानं शेवटी रावणानं शिवाला माफी मागीतली. त्यातच भगवान शिवानं त्याला माफही केलं. त्यातच रावणावर प्रसन्न होवून भगवान शिवानं त्याला चंद्रहास खडग बक्षीस दिलं. परंतू रावण त्यावर संतुष्ट झाला नाही.,त्यानं भगवान शिवाला म्हटलं की मला आपण एक सहचारीणी मिळवून द्यावी.
भगवान शिव स्वभावानं भोळे होते. त्यातच ते तथास्तू म्हणायचे. मग पश्चाताप व्हायचा. त्यातच आता रावणानंही तेच केलं. त्यानं भगवान म्हणून गणल्या गेलेल्या शिवाला महाराणा अर्थात पत्नी मागीतली व भगवान शिवानं आवविचार न करता तथास्तू म्हटलं. मग काय भगवान शिवाला विचार पडला की आपण तथास्तू म्हणून रावणाला वचन तर दिलं. परंतू आता करावे काय? त्यातच त्यांना सुचलं की आपण ह्याला मंदोदरी द्यावी.
भगवान शिवानं रावणाला सहचारीणी म्हणून मंदोदरी दिली. मंदोदरीला मिळवून घेतल्यानंतर काही काळ रावण कैलासवरच राहिला. मग काही दिवसानं तो माघारी फिरला.
मंदोदरी गरोदर राहिली. त्यातच तिच्या पोटात असलेलं पुत्ररत्न कैलासावर होवू नये. ते आपल्या राज्यातच व्हावे म्हणून रावण मंदोदरीला घेवून माघारी फिरला. तसं त्या काळात पायीच चालावं लागत असल्यानं रावण आणि मंदोदरी ती वाट पायीच चालत जात होते. अशातच ते जनकाचं राज्य लागलं. ज्या ठिकाणी सुका दुष्काळ पडला होता.
ते जनकाचं राज्य. राज्यात कोरडा दुष्काळ अशातच मंदोदरीला तहान लागली. ती रावणाला म्हणाली,
"मला फार तहान लागलेली असून प्यायला पाणी हवं."
मंदोदरीला बाळंतकळा येत होत्या. तेव्हा मंदोदरी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते. मंदोदरी रावणाची पत्नीच होती. मग तिनं मांडलेली ती व्यथा. रावण तिला पिण्यासाठी पाणी आणायला गेला. त्यातच मंदोदरी प्रसूत झाली. तिनं सुंदर कन्येला जन्म दिला. तोच तिनं विचार केला की हिला आपण इथेच कुठेतरी सुरक्षीत ठिकाणी ठेवावं. जेणेकरुन तिचं रक्षण होईल.
तिनं विचार केला. तोच तिला आठवलं की राजा जनक राजसुर्य यज्ञ करीत आहे. तो आज आपल्या राज्यातील जमीनीवर नांगर चालविणार आहे. ज्या शेतात आपट्याचं झाड असेल.
तिचा मनात विचार सुरु असतांना तिला त्याच शेतात एक आपट्याचं झाड दिसलं. त्या झाडाची गार सावली जमीनीवर पसरली होती. मंदोदरीनं ते सर्व पाहिलं व तिनं त्या बाळीला त्या आपट्याच्या पानात गुंडाळलं आणि तिला ठेवून दिलं. त्या मातीच्या धुळीत. मातेची ममता गोठवून. कारण तिला ती वेदवतीच्या पुनर्जन्माची कहाणी माहित होती. जिने मागील जन्मी मरतांना रावणाला शाप दिला होता की मी तुझीच कन्या बनून येवून तुझ्या मृत्युला कारणीभूत ठरेल. तिला वाटत होतं की रावणाला कन्या झाल्याचं माहित होताच तो तिचा वध करेल व आपल्या हातून कन्या भ्रृणहत्येचं पाप होईल.
मंदोदरी मयदानव मायासूर आणि अप्सरा हेमा यांची कन्या असल्याचा उल्लेख पौराणिक आहे. तिला हिंदू धर्मात एक पंचकन्या मानल्या जाते. ती महर्षी कश्यप पुत्र मायासूर यांची गोद घेतलेली संतान. मायासुरानं आपल्याला मिळालेल्या वरदानाचा वापर करुन मंडोर नामक एक नगरी स्थापन केली होती. जिथे हेमा राहात होती. ज्यावेळी रावण एकदा मायासूरला भेटायला गेला. तेव्हा पहिली नजर त्याची मंदोदरीवर पडली. तिला पाहून त्यानं मायासूरसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. परंतू रावणाच्या कपटी स्वभावाला पाहून हेमानं नकार दिला. शेवटी भगवान शिवाच्या हस्तक्षेपाने मायासूराच्या प्रयत्नाने रावण आणि मंदोदरीचा विवाह संपन्न झाला होता.
रावणानं दिती पुत्र मय ज्याला मायासूर म्हणत. त्याच्या कन्येशी म्हणजे मंदोदरीशी विवाह केला. तसेच कुंभकर्णानं प्रसिद्ध पुत्र विरोचनची नात अर्थात बलीपुत्री वज्रज्वलाशी विवाह केला. तसेच गंधर्वराज महात्मा शैलुषची कन्या सरमाशी विभीषणानं विवाह केला होता. रावण, कुंभकर्ण व विभीषण हे केकसी व पुलस्य ऋषी पुत्र महर्षी अगष्टचा भाऊ विश्रवाचे पुत्र होते. जी केकसी राक्षसराज सुमाली व ताडकाची मुलगी होती. मंदोदरी हीच मधुरा होय असा पुराणात उल्लेख मिळतो.
एकदा मधूरा नामक एक अप्सरा कैलास पर्वतावर पोहोचली. ज्या ठिकाणी भगवान शिव निवास करीत होते. भगवान शिवाला ती आकर्षीत करीत होती. ज्यावेळी पार्वती तिथे नव्हती. परंतू ज्यावेळी पार्वती तिथे पोहोचली. तिनं पाहिलं की भगवान शिवाला लागलेलं भस्म तिच्याही शरीराला लागलं आहे. ते पाहताच ती क्रोधीत झाली. ते पाहताच तिनं तिला शाप दिला की तू बेडकी बनून बारा वर्ष विहिरीत निवास करशील. शापानुसार मधूरा एका विहीरीत बारा वर्ष निवास करु लागली. शापानुसार मधुराच्या ती चूक लक्षात येताच ती पार्वतीच्या पाया पडू लागली व पार्वतीला तिची दया आली. तिनं विचार करुन भगवान शिवाच्या विनवणीवरुन तिला उशाप दिला की बारा वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर तू पुन्हा स्री जन्मात येशील.
उशापानुसार बारा वर्ष पुर्ण होताच मधुरा मेंढक रुपातून स्री रुपात आली. तशी ती त्या विहिरीतून स्वतःला सुरक्षीत करण्यासाठी आवाज देत होती. तो स्रीचा आवाज त्या ठिकाणावरुन जात असलेल्या हेमा व मायासुरानं ऐकला. त्यांनी विहिरीत पाहिलं. त्यांना ती विहिरीतील ती बारा वर्षाची बालिका दिसली. त्यांना वाटलं की ही बालिका विहिरीत पडली असेल, हिला वाचवायला हवं. त्यांनी तिला विहिरीतून बाहेर काढलं. तिला नाव विचारलं. परंतू तिला आता तिचं नाव सांगता येईना. त्यातच मायासूर व हेमानं तिला दत्तक घेतलं आणि तिचं नाव मंदोदरी ठेवलं. हे भगवान शिवाला माहित होतं. त्यानुसार भगवान शिवानंच पुढे तिचा विवाह मायासुराला तयार करुन लावून दिला असं मानलं जातं.
**********************************************

उर्मीलाला आलेली कालनयनाकडूनची सुवार्ता तिचं जीवन बदलून टाकणारी वाटली. तिला मनोमन आनंद झाला. तसं पाहता पती कसाही असो, त्याला पाहण्याचं धाडस त्या वेळच्या कन्येत नव्हतं. तो कसाही का असेना, मुलींना स्विकारच करावा लागायचा. ती काहीही म्हणू शकत नव्हती.
ती जणू स्वप्न पाहात होती. तिच्या चांगूलपणाची. तिला काय माहित होते की त्या राजघराण्यात राजा दशरथाने आपल्या कैकेयी नामक राणीला असेही दोन वरदान दिलेले आहेत. ज्या वरदानाच्या पुर्तीने तिच्या बहिणीसकट तिच्याही आयुष्यात भोगमान येणार आहे. पण ते जणू विधीलिखीतच होतं.
राजा जनकाला नसलेलं मुल. त्यानंतर विवश झालेला राजा जनक. सीता नांगराच्या फाळात सापडल्याबरोबर अगदी खुश झाला होता. त्यातच आनंदाची पर्वणी की काय, त्याच वर्षी त्याला आणखी एक पुत्री झाली, जिचं नाव उर्मीला ठेवण्यात आलं. जणू यज्ञाचा परीणाम की काय, राजा जनकाला व सुनयनाला एकाच वर्षात दोन आनंदाच्या पर्वण्या प्राप्त झाल्या.
राजा जनकाला जरी उर्मीला नावाची मुलगी झाली असली तरी त्यानं सीतेला अंतर दिलं नाही. अगदी पोटच्याच गोळ्याप्रमाणं अगदी लाडालोभात तिचं पालन पोषण केलं होतं.
ज्यावेळी उर्मीलेचा जन्म झाला. त्याचवेळी त्याचा भाऊ कृतध्वज यालाही दोन मुली झाल्या. त्यांचाही नामकरण विधी संपन्न झाला. एकीचं नाव मांडवी तर दुसरीचं नाव श्रृतकिर्ती ठेवण्यात आलं.,अशा या चारही बहिणी राजमहालात लहानाच्या मोठ्या होवू लागल्या.
लहानपणी सीता आणि उर्मीला दोघ्याही बहिणी अगदी आनंदानं खेळत. त्यांना खेळतांना कंटाळवाणं वाटत नसे. ज्यावेळी राजा जनक युद्धावर जात. त्यावेळी अगदी सीता व उर्मीला आईच्या जवळ बसून राज्यकारभाराचं शिक्षण घेत. सुनयनानं आपल्या हयातीत या दोन्ही मुलींना मोठं करतांना अगदी जपलं होतं. राज्यातील अराजकतेचा त्यांचेवर परीणाम होवू दिला नव्हता.
सात आठ वर्षाच्या असतांना सीता व उर्मीलाला शिक्षण देण्यात आलं. त्यांच्या शिक्षणासाठी विशेष अशी सोय नसल्यानं त्यांची आईच सुनयना त्यांना शिकवीत होती. सर्वात मोठं शिक्षण म्हणजे सहनशिलता. संकटाला धैर्यानं तोंड कसं द्यायचं याच गोष्टी आवर्जून सुनयना आपल्या बाळांना शिकवीत होती. त्यामुळं त्या शिक्षणानं कठीण काळातही तोल न जावू देता कसं उभं राहावं याचं तात्वीक शिक्षण उर्मीला तसेच सीता शिकत होत्या. सीता मोठी होती तसेच उर्मीला लहान होती.
सीता आणि उर्मीला ज्यावेळी समजदार बनल्या, त्यावेळी त्या आईला म्हणायच्या,
"आई असल्या संकटाच्या गोष्टी आम्हाला का सांगतेस? आम्ही राजमहालातील मुली. राजा जनकाच्या राजकन्या. आमचा विवाह राजप्रासादातच होईल. आमची सेवा करायला असंख्य दास दास्या असतील. तेव्हा आमच्यावर कसलं संकट येणार."
त्यावर सुनयना त्यांना समजवायची.
"बेटा, संकटाला कोणीही सोडलेलं नाही. संकट येतच असते. मग तुम्ही राजमहालात राहा की अरण्यात राहा. तेव्हा असं संकट आल्यास आपण वेळीच सावध असलेलं बरं. तेव्हा संकटापासून दूर पळू नये तर संकटांशी दोन हात करावेत. त्यानेच माणसाचे धैर्य वाढते व अनुभवही वाढतो. जो अनुभव आपल्या पुढील आयुष्यात कामात येत असतो."
सुनयनाचं बरोबर होतं. कारण उर्मीला आणि सीता जरी त्या राजप्रासादात राहात असल्या, जरी त्यांची सेवा करायला महालात दास दास्या असल्या तरी आईनं दिलेलं शिक्षण त्यांना पुढील काळात कामात आलं. ते एवढं कामात आलं की दोघींना त्यांच्या आयुष्यात त्यांच्या आत्मविश्वासापासून ढळू दिलं नाही.

****************************************

सीता व उर्मीला सख्ख्या बहिणी होत्या. दोघींचंही एकमेकांवर निरतिशय प्रेम होतं. कधी कधी राजा जनक त्यांना वेळात वेळ काढून भेटायला येत असे. त्यांना अंगाखांद्याववर खेळवतांना राजा जनकाला अगदी भरुन येत असे. त्यांना जणू स्वर्ग प्राप्त झाल्याचा आनंद होत असे. एवढं त्याचं आपल्या मुलींवर प्रेम होतं. त्या मुली त्याला ब-याच वर्षानंतर झाल्यामुळं त्याचं त्या मुलींवर जीवापाड प्रेम होतं. त्यांना थोडसंही दुःख राजप्रासादात राजा जनकानं होवू दिलं नाही. अगदी दास दास्या अगदी लहानपणापासूनच त्यांच्या सेवेला लावून दिल्या होत्या.
उर्मीला कधी कधी विचार करायची की हेच सुख तिला शेवटपर्यंत राहिल का? ती कधीकधी आपल्या लाडक्या बहिणीला म्हणजेच सीतेला त्याबद्दल विचारच असे. तेव्हा सीता तिला सांगत असे की असंही होवू शकते. आई सुनयनाचं बरोबर आहे की संकटापासून सावध असलेलं बरं. तसेच संकटाशी दोन हात करण्याची आपली तयारी नेहमीच असलेली बरी. कारण काही काही संकटं असे असतात की त्यापासून स्वतःची सुटका करुन घेताच येवू शकत नाही. तेव्हा आपली जर त्यासाठी आधीपासूनच तयारी असेल तर आपण त्या संकटावर यशस्वी मार्ग काढू शकतो आणि जर अशी तयारी नसली तर आपण त्यावर मार्ग काढू शकत नाही. मग आपण असल्या संकटातून खचून जातो व अशावेळी आपलं धैर्य खचतं, आत्मविश्वास ढळतो आणि मग त्याची परियंती आत्महत्येत होते."
सीतेनं सांगीतलेला उपदेश..........उर्मीलाच्या डोक्यावरुन जात होता. परंतू ते सत्य होतं. कारण पुढील आयुष्यातील भींती त्याच उपदेशावर आधारीत होत्या.
आज उर्मीला घडत होती आपल्या आईच्या उपदेशानं. तसेच आपल्या बहिणीच्याही मार्गदर्शनानं. आज संकट काय असतं, ते हळूहळू उर्मीलाला समजायला लागलं होतं. त्यातच ते घडत चालली होती, अगदी स्थितप्रद एखाद्या तपस्वीसारखी. ऐनवेळी संकट आल्यास काय करावं याचा जणू तिनं आपल्या मायबापाच्याच घरी अभ्यास केला होता.
लहानपणी दासीसोबत खेळतांना उर्मीलाला मजा वाटत असे. ती रोपवाटीका तिला आवडत असे. त्या रोपवाटीकेत असलेली झाडं झुडपं, त्या रोपवाटीकेत स्वच्छंद विहार करणारे पशूपक्षी प्राणी तसेच ते मृग तिला आवडत असे. त्याचसोबत सीतेलाही ते आवडायचेच. तसेच प्रसंगी तिला त्यात रममाण झाल्यासारखं वाटायचं. त्यांच्याशी बसण्यात व तासन् तास बोलण्यात उर्मीलाला तिचा दिवस कसा जायचा, ते कळायचं नाही. आपल्या मुलींची आवड पाहून राजा जनकानं रोपवाटीका सुंदर सजवली होती. त्यामुळं की काय, उर्मीला आणि सीता राजप्रासादांऐवजी त्या रोपवाटीकेतच जास्त वेळ हुंदळत असायच्या.
उर्मीला व सीता ह्या दोन बहिणी. दासदासींबरोबर त्या रोपवाटीकेत मुक्त विहार करायच्या. त्यातच कधीकधी कृतध्वजाच्या मुलीही मिथीला नगरीत येत व त्याही बरेच दिवस तिथं राहात असत. त्यामुळं त्यांच्यावरही ज्याप्रमाणे सीता आणि उर्मीलावर संस्कार झाले, तेच संकार होत होते अगदी बालवयापासूनच.
ज्यावेळी या चारही बहिणी विवाहयोग्य झाल्या. त्यावेळी त्यांच्या मनात विवाहयोग्य राजकुमारानं जरी जागा घेतली असली तरी आपला विवाह एवढ्या लवकर होईल असं त्यांना वाटत नव्हतं. त्यातच एकाच राजघराण्यात होईल असंही वाटत नव्हतं. तसेच ज्यावेळी सीतेचा विवाह जुळला, त्यावेळीही बाकीच्या तीनही बहिणी अनभिज्ञ7 होत्या. त्यांना सीतेच्याच जोडीदाराबाबत गोडी होती. आपल्या बहिणीचा विवाह होत अाहे. याचा त्यांनाही आनंदच होता.
दिवसामागून दिवस जात होते.. राजप्रासादातील ही पाखरं आता मोठी झाली होती. ती आता उडणारच होती. कधी त्या उडण्याचा दिवस येतो ते काही कळत नव्हतं. अशाचवेळी अचानक सीतेला कोणीतरी पाहायला आलं हे कळलं. तसेच त्यानं सीतेसाठी होकारही दिला असल्याचं कळलं आणि पाल चुकचुकली की आता सीतेनंतर आपल्यालाही कधीतरी विवाह करुन आपल्या मायबापाला सोडून सासरी जावं लागणार. त्याचा त्यांना आनंदही होता. तसंच मायबापांना आणि त्या राजप्रासादांना आणि त्या सर्व मित्रमैत्रीणी व सवंगड्यांना तसेच त्या रोपवाटीकेला सोडून जाण्याचं दुःखही होतं. ज्या राजप्रासादात नव्हे तर रोपवाटीकेत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या.
रोपवाटीका आज ओस पडली होती. कारण तिलाही त्याचं अतिव दुःख झालं होतं. काय करावं सुचत नव्हतं. अशातच उर्मीलाला आलेला तो कालनयना दासीकडून निरोप. एकाएकी दोन्ही बहिणी आपल्या प्रियजण मायबापाला सोडून जाणार! पण विवाहच तो. नारीजातीला एकदा तरी त्या प्रसंगाला सामोरे जावेच लागत होते. त्यात उर्मीला तरी काय करणार होती.
उर्मीला सुंदर होती. तिच्या लावण्याची चर्चा पंचक्रोशीत होती. पण स्वयंवरात मोठी टाकून लहाणीला कसं उभं करणार? प्रश्न होता आणि तो प्रश्न विचित्र होता.

****************************************

तो काळ अत्यंत शिताफीचा होता. त्या काळात मुलीही शिकलेल्या राहात असत. त्यांना बाणकौशल्य हस्तगत असायचं. त्यातच उर्मीला आणि सीताही शिकलेल्याच होत्या. त्यांनाही बाण चालवता येत होते नव्हे तर त्यांनाही बाणकौशल्य हस्तगत होतंच.
लहानपणी लाडालोभात वाढलेल्या दोघी आता चिरतारुण्यात अतिशय सुंदर वाटत होत्या. मोठी सीता ही थोडी लठ्ठ होती तर लहान शरीरयष्टीनं बारीक होती. तिचा चेहराही निमुळता अर्थात बारीकच होता.
ती रोपवाटीका........आज ती रोपवाटीका प्रसन्न वाटत होती. कारण ज्या रोपवाटीकेत सीता विहार करीत होती. त्याच रोपवाटीकेत सीताही गेली होती. दोघांनीही त्याच रोपवाटीकेत एकमेकांना पाहिले होते. तसेच एकमेकांशी ते बोललेही होते. परंतू उर्मीला.......उर्मीला काही बोलू शकली नव्हती. त्याचं कारणही तसंच होतं.
ज्यावेळी रोपवाटीकेत विहार करण्यासाठी राम आला, त्यावेळी सीतेला कळून चुकलं होतं की हाच तिचा होणारा भरतार आहे. पण अद्यापही उर्मालाला माहित न झाल्यानं ती लक्ष्मणापासून अनभिज्ञ होती. तसं पाहता उर्मीला आणि मांडवी तसेच श्रुतकिर्तीनं लक्ष्मणाची खिल्लीही उडवली होती. त्यातच तो क्रोधीतही झाला होता.
सीतेचा स्वयंवर घोषीत झाला होता. अट होती की जो कोणी जनकपुरीत असलेला शिवधनुष्य तोडेल. त्याच्यात गळ्यात सीता वरमाला घालेल. मग तो राम असो की अजून कोणी. ज्यांच्यामध्ये पराक्रम असेल, त्याला सीता मिळेल. त्यातच विश्वामित्रानं त्यांना त्रास देण्यासाठी येत असलेल्या दानवांना संपूर्ण प्रमाणात नष्ट करण्यासाठी राम आणि लक्ष्मणाला सोबत नेलं होतं. याच राम आणि लक्ष्मणानं संपूर्ण वन दानवमुक्त केलं होतं.
विश्वामित्रानं सीतेचा स्वयंवर असल्याची वार्ता ऐकली होती. त्यांना रामाच्या पराक्रमाची ख्यातीही होती.
त्यातच त्यांनी ठरवलं की आपणही सीता स्वयंवरात राम आणि लक्ष्मणाला घेवून जावं. जर त्यांच्यात ताकद असेल तर सीतेचं स्वयंवर राम जिंकेल.
वसिष्ठ आश्रमात शिकलेले चारही बंधू. अगदी लहान लहान वयापासून आश्रमात शिक्षणासाठी गेले होते. त्यातच राम, लक्ष्मण, भरत शत्रुघ्न हे चारही भाऊ म्हणजे कर्तव्यनिष्ठाचे मुर्तीमंत उदाहरण होते. त्यांना संपूर्ण अवधपुरीच नाही तर संपूर्ण भारतवर्षही ओळखत असायचं. त्यातच आदर आणि संस्कारात चारही भाऊ अग्रेसर होते. शुरवीरतेच्या अनेक गोष्टी या चारही भावांनी आत्मसात केलेल्या होत्या.
त्यातच त्यांचं धाडस व पराक्रम त्याचे गुरु वशिष्ठ यांनी अगदी जवळून पाहिला होता. अगदी जन्मजातच त्यांच्याजवळ पराक्रमाचे गुण होते. ज्याप्रमाणे हे गुण वसिष्ठ ऋषींनी जवळून अभ्यासले होते. तसेच ते गुण विश्वामित्रांनीही अभ्यासले होते.कारण विश्वामित्र कधी समारोह प्रसंगी या ठिकाणी भेट देत. त्यातच ते पडताळून पाहात असत की कोण किती प्रमाणात बलसंपन्न आहे.
****************************************

त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यातच त्या शिक्षणातून ते शिक्षण किती प्रमाणात मुलांमध्ये उतरला हे पाहण्यासाठी एक परीक्षाही झाली होती. त्या परीक्षेमध्ये चारही राजकुमार पराक्रमी ठरले होते.
आज ते चारही मुलं पराक्रमी ठरले होते नव्हे तर ते राज्यकारभार करु शकणारे ठरले होते.
एक दिवस विश्वामित्र अयोध्येत आले. त्यांनी दशरथाला विनवणी केली की त्यांना एक यज्ञ करायचा आहे. हा यज्ञ आमच्या वनातील राक्षसांची शक्ती क्षीण करण्यासाठी असून आम्हाला तो यज्ञ संपन्न करण्यासाठी आपल्या एका पुत्राची गरज आहे. तेव्हा आपण आपल्या एका मुलाला आमच्यासोबत पाठवावे. त्यातच त्यांना लक्ष्मण उतावीळपणे म्हणाला,
"मी देखील तुमच्यासोबत येणार. कारण मी माझ्या वडीलबंधूंना एकटं सोडू शकत नाही. मी हक्कानं सांगतोय की जर आपण मला न्याल नाही, तर मी माझ्या वडील बंधू रामालाही तुमच्यासोबत नेवू देणार नाही. त्यातच रामही तसेच बोलला. शेवटी विश्वामित्रानं लक्ष्मणालाही सोबत नेण्याचं आश्वासन दिलं.
ठरल्याप्रमाणं विश्वामित्रानं लक्ष्मणाला सोबत घेवून तो वनाच्या दिशेनं चालू लागला. त्यातच विश्वामित्रासोबत राम लक्ष्मण चालत असतांना वाटेत येणा-या अनेक राक्षसांचा वध त्या दोघांनी केला. त्यातच विश्वामित्रानं यज्ञविधी संपन्न केला.

*********************************************

यज्ञविधी संपन्न झाला होता. त्यातच विश्वामित्रानं स्वयंवराची माहिती झाल्यानं त्या दोघांनाही मिथिलापुरीला आणलं होतं.
स्वयंवरात शिवधनुष्य उचलायचा होता. जो शिवधनुष्य परशुराम आणि सीतेशिवाय कोणालाच उचलता येवू शकत नव्हता. जो शिवधनुष्य सीतेनं उचलल्यानं परशुरामानं तिला जणू बक्षीस देवून तो विंध्य पर्वतावर तपश्चर्या करायला गेला होता.
स्वयंवराचा विधी सुरु झाला होता. राजा जनक आपल्या सिंहासनावर विराजमान झाले होते. त्यातच गुरुदेव वशिष्ठ व विश्वामित्रही आपआपल्या जागी सिंहासनावर स्थानापन्न झाले होते. काही राजेही आपआपली जागा घेवून होते. रावणही त्याला सीता त्याची पुत्री असल्याचे माहित नसल्यानं तोही या ठिकाणी विराजमान झाला होता. त्यातच स्वयंवर सुरु झालं.
स्वयंवराचे वेळी एकेक राजा आपल्याआपल्या जागेवरुन उठून शिवधनुष्याजवळ येत होता. त्याजवळ येताच मिशांना पीळ देत होता. दंड थोपटत होता. परंतू तो जेव्हा शिवधनुष्य उचलायचा, तेव्हा त्यांचेे दंड थोपटणे कामात येत नव्हते. त्यांची ताकदही कामात येत नव्हती. अशातच एकएक करीत सर्व राजे संपले. शेवटी राजसी पोशाख नसलेला, तपस्वी भाषत असलेला वनात राहातो असे दिसणारा एक नवयुवक उभा झाला. त्यानं आपल्या सोबत आलेल्या विश्वामित्राला आज्ञा मागीतली. विश्वामित्रानं आज्ञा देताच त्यानं वशिष्ठ ऋषीचीही आज्ञा मागीतली. त्या दोघांनीही आज्ञा दिल्यावर तो त्या शिवधनुष्याजवळ आला. त्यानं शिवधनुष्याला मनोमन हात जोडले व विनवणी केली की त्यानं आपला वज्रपणा कमी करावा. मनोमन प्रार्थना करुन त्यानं शिवधनुष्यास हात लावला व त्यानं शिवधनुष्य एका झटक्यात उचलला. त्यातच त्याला वादी लावण्यासाठी त्याला वाकवलं. पण आश्चर्य असं की तो धनुष्य तुटला. तोच त्या धनुष्याच्या तुटण्यानं आसमंतात खडबड झाली. मग काय पृथ्वीही हालायला लागली. त्यातच ही गोष्ट परशुरामाला माहित झाली.
परशुराम लागलीच जनकपुरीत दाखल झाला. त्याची आख्यायीका अशी होती की त्यानं पृथ्वी क्षत्रीयमुक्त करण्यासाठीच जन्म घेतला होता. त्याला वाटले असा शिवधनुष्य तोडणारा व्यक्ती हा दुसरा तिसरा कोणीही नसून तो क्षत्रीयच असू शकते.
परशुराम जनकपुरीत दाखल होताच सर्वजण घाबरले होते. त्यांचा क्रोध आसमंतात चढला होता. तो काहीबाही बोलत होता. तोच लक्ष्मणाला राग आला व तो म्हणाला,
"भ्राता, मला आज्ञा करा. मी यांचं मस्तक कापून आपल्या चरणावर समर्पीत करु इच्छितो."
त्यावर राम बोलला की तो कोणी तपस्वी असेल. म्हणूनच तो इथवर येवून आपला क्रोध जाहिर करीत आहे. जोपर्यंत त्यांची ओळख पटत नाही, तोपर्यंत लक्ष्मणानं असं व्यक्तव्य करु नये.
लक्ष्मणाला ती गोष्ट पटली होती. त्यातच तो शांत झाला. तसे वशिष्ठ ऋषी म्हणाले,
"आपला शिवधनुष्य तोडून आपल्या आज्ञेची अवहेलना केली गेली नाही. हा धनुष्य तोडणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून ते प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आहेत. जो आपल्यासारखाच विष्णूचा एक अवतार आहे. ही पृथ्वी एकदा राक्षसापासून राक्षसमुक्त करण्यासाठी त्यांनी जन्म घेतला आहे."
वशिष्ठ गुरुंचे समजवायचे बोल ऐकताच परशुराम शांत झाले व ते माघारी फिरुन विंध्य पर्वतावर परत गेले. ते पुन्हा तपश्चर्येत लीन झाले.
स्वयंवर झाला होता. स्वयंवरात शिवधनुष्य तोडून रामानं सीतेच्या मनावर ताबा मिळवला होता. ती त्याची पत्नीही झाली होती. परंतू एक प्रश्न होता. जर विवाह करुन आपण ही कन्या अयोध्येला नेली तर.......तर कदाचित राजा दशरथ क्रोधीत होईल. त्यापेक्षा आपण त्यांना बोलावणं पाठवायला हवं. वशिष्ठ ऋषींनी या गोष्टी हेरल्या होत्या. त्यानुसार त्यांनी राजा दशरथाला बोलावणं पाठवलं व सांगीतलं की सोबत त्यांनी राजकुमार भरत व राजकुमार शत्रुघ्नलाही आणावं. तेच बोलणं विश्वामित्राचंही होतं.
निरोप घेवून एक दुत अयोध्येत गेला. त्यानं आपला निरोप राजा दशरथाला कथन केला आणि सांगीतलं की त्या दशरथानं राजकुमार भरताला व राजकुमार शत्रुघ्नला सोबत आणावं.
दुताकरवी वशिष्ठ ऋषीचा निरोप मिळताच राजा दशरथ वेळ न दवडता मिथीलानगरीत दाखल झाला. तिथंच एका शामियानात राजा दशरथाच्या राहण्याची व्यवस्था केली गेली.
राजा दशरथ ज्याठिकाणी थांबले. तिथेच जावून वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्रासह जावून स्वयंवराविषयी सांगीतलं आणि विनंती केली की त्यानं रामाच्या विवाहाला संमती द्यावी. त्यातच लक्ष्मणासाठीही राजा जनकाची दुसरी मुलगी उर्मीला मागून घ्यावी. तसा होकार असल्यास आपण उर्मीलेचा प्रस्ताव राजा जनकापुढं ठेवूू. होकार आल्यास आपण उर्मीलेला लक्ष्मणासाठी मागून घेवू.
वशिष्ठ ऋषींचा प्रस्ताव राजा दशरथाला पटला. तोच त्याचा होकार मिळताच वशिष्ठानं एक दासीकरवी राजा जनकाकडे घाईगडबडीचा निरोप पाठवला. ठरल्याप्रमाणे वशिष्ठ राजा जनकाकडे गेले. त्यांनी आपला निरोप सांगीतला आणि निरोपातूनच त्यांनी लक्ष्मणासाठी उर्मीलेला मागून टाकले. तोच प्रसंग कालनयना टिपत होती व तिनं अगदी लपून छपून दुस-या दिवशी उर्मीलाला तो संदेश ऐकवला. ज्या संदेशाबाबत उर्मीला अनभिज्ञ होती.

****************************************
आपल्या दोन्ही मुली राजा दशरथानं आपल्या मुलांसाठी मागून घेतल्याचा आनंद गगणात मावणारा नव्हता. तोच तिथं राजा जनकाचा भाऊ कृतध्वजही हजर होता. तोही वशिष्ठ ऋषींना म्हणाला,
"स्वामी, मला माफ कराल तर मी एक विनंती करु."
"बोला, काय आहे आपलं म्हणणं?" वशिष्ठ म्हणाले.
"मलाही दोन मुली आहेत. मी ऐकले आहे की राजा दशरथाला आणखी दोन मुलं आहेत. तेव्हा मोठ्यासाठी मांडवी व लहानासाठी श्रृतकिर्ती मागून घेतली तर बरं होईल. दोघ्या बहिणीसोबत माझ्याही दोन्ही मुली आनंदानं एकाच राजवाड्यात सुखानं संसार करतील. तसा माझा प्रस्ताव राजा दशरथांना सांगावा म्हणजे झालं."
वशिष्ठ ऋषींनी होकार दिला व तसा प्रस्ताव त्यांनी राजा दशरथासमोर ठेवला व दशरथाचा होकार येताच त्या चारही मुली अयोध्येतील नरेशाने मागून घेतल्या व विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला.
स्वयंवर झाला होता. स्वयंवरात शिवधनुष्य तोडून रामानं सीतेच्या मनावर ताबा मिळवला होता. ती त्याची पत्नीही झाली होती. परंतू एक प्रश्न होता. जर विवाह करुन आपण ही कन्या अयोध्येला नेली तर.......तर कदाचित राजा दशरथ क्रोधीत होईल. त्यापेक्षा आपण त्यांना बोलावणं पाठवायला हवं. वशिष्ठ ऋषींनी या गोष्टी हेरल्या होत्या. त्यानुसार त्यांनी राजा दशरथाला बोलावणं पाठवलं व सांगीतलं की सोबत त्यांनी राजकुमार भरत व राजकुमार शत्रुघ्नलाही आणावं. तेच बोलणं विश्वामित्राचंही होतं.
निरोप घेवून एक दुत अयोध्येत गेला. त्यानं आपला निरोप राजा दशरथाला कथन केला आणि सांगीतलं की त्या दशरथानं राजकुमार भरताला व राजकुमार शत्रुघ्नला सोबत आणावं.
दुताकरवी वशिष्ठ ऋषीचा निरोप मिळताच राजा दशरथ वेळ न दवडता मिथीलानगरीत दाखल झाला. तिथंच एका शामियानात राजा दशरथाच्या राहण्याची व्यवस्था केली गेली.
राजा दशरथ ज्याठिकाणी थांबले. तिथेच जावून वशिष्ठ ऋषींनी विश्वामित्रासह जावून स्वयंवराविषयी सांगीतलं आणि विनंती केली की त्यानं रामाच्या विवाहाला संमती द्यावी. त्यातच लक्ष्मणासाठीही राजा जनकाची दुसरी मुलगी उर्मीला मागून घ्यावी. तसा होकार असल्यास आपण उर्मीलेचा प्रस्ताव राजा जनकापुढं ठेवूू. होकार आल्यास आपण उर्मीलेला लक्ष्मणासाठी मागून घेवू.
वशिष्ठ ऋषींचा प्रस्ताव राजा दशरथाला पटला. तोच त्याचा होकार मिळताच वशिष्ठानं एक दासीकरवी राजा जनकाकडे घाईगडबडीचा निरोप पाठवला. ठरल्याप्रमाणे वशिष्ठ राजा जनकाकडे गेले. त्यांनी आपला निरोप सांगीतला आणि निरोपातूनच त्यांनी लक्ष्मणासाठी उर्मीलेला मागून टाकले. तोच प्रसंग कालनयना टिपत होती व तिनं अगदी लपून छपून दुस-या दिवशी उर्मीलाला तो संदेश ऐकवला. ज्या संदेशाबाबत उर्मीला अनभिज्ञ होती.

****************************************
आपल्या दोन्ही मुली राजा दशरथानं आपल्या मुलांसाठी मागून घेतल्याचा आनंद गगणात मावणारा नव्हता. तोच तिथं राजा जनकाचा भाऊ कृतध्वजही हजर होता. तोही वशिष्ठ ऋषींना म्हणाला,
"स्वामी, मला माफ कराल तर मी एक विनंती करु."
"बोला, काय आहे आपलं म्हणणं?" वशिष्ठ म्हणाले.
"मलाही दोन मुली आहेत. मी ऐकले आहे की राजा दशरथाला आणखी दोन मुलं आहेत. तेव्हा मोठ्यासाठी मांडवी व लहानासाठी श्रृतकिर्ती मागून घेतली तर बरं होईल. दोघ्या बहिणीसोबत माझ्याही दोन्ही मुली आनंदानं एकाच राजवाड्यात सुखानं संसार करतील. तसा माझा प्रस्ताव राजा दशरथांना सांगावा म्हणजे झालं."
वशिष्ठ ऋषींनी होकार दिला व तसा प्रस्ताव त्यांनी राजा दशरथासमोर ठेवला व दशरथाचा होकार येताच त्या चारही मुली अयोध्येतील नरेशाने मागून घेतल्या व विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला.
सीतेसह उर्मीलाचाही विवाह संपन्न झाला होता. त्यासोबत मांडवी आणि श्रुतकिर्तीही विवाहबद्ध झाली होती. विश्वामित्र तसेच वशिष्ठ ऋषींनी आपल्या आपल्या भुमिका अदा केल्या होत्या. त्यांना वाटत होतं की सुर्यवंशी असलेलं राजघराणं. या राजघराण्याची भरभराट व्हावी. सर्व नववधू अयोध्येत आल्या होत्या. त्यातच अख्ख्या अयोध्येनगरीनं त्यांचं स्वागतही केलं होतं.
सीतेसह उर्मीलाचाही विवाह संपन्न झाला होता. त्यासोबत मांडवी आणि श्रुतकिर्तीही विवाहबद्ध झाली होती. विश्वामित्र तसेच वशिष्ठ ऋषींनी आपल्या आपल्या भुमिका अदा केल्या होत्या. त्यांना वाटत होतं की सुर्यवंशी असलेलं राजघराणं. या राजघराण्याची भरभराट व्हावी.
सर्व नववधू अयोध्येत आल्या होत्या. त्यातच अख्ख्या अयोध्येनगरीनं त्यांचं स्वागतही केलं होतं. अशातच काही दिवस सुखात गेले होते.
काही दिवस सुखात गेले. काही दिवसानंतर राजा दशरथाला वाटलं की आपण राज्यकारभाराची बागडोर आपल्या जेष्ठ पुत्राला म्हणजेच रामाच्या हातात द्यावी व आपण संन्यास घेवून सुखद जीवन व्यथीत करावं. त्यानुसार त्यांनी एक दिवस भर दरबारात तशी घोषणा केली.
राज्यकारभाराच्या धुरेची घोषणा होताच सर्वजण खुश झाले. त्यातच राणी कैकेयीही. परंतू ती घोषणा होताच जिचा या राजघराण्याशी काहीही संबंध नव्हता. ती एक व्यक्ती नाखुश होती.ती म्हणजे मंथरा. मंथराला वाटत होतं की राम राजा बनू नये. त्याजागी भरत राजा बनावा. मंथरा....... महाराणी कैकेयीची जेष्ठ दासी होती मंथरा.
पुर्वीच्या काळी राजघराण्यातील राजकुमारींचा जेव्हा विवाह होत असे, तेव्हा तिच्यासोबत राजघराण्यातील काही दास्या देण्यात येत असत. त्याचा उद्देश असा असे की आपल्या कोणत्याही पुत्रीला कोणतीही समस्या येवू नये, कोणताही त्रास होवू नये. तिला सासरमध्ये राहतांना अगदी आनंदानं राहता यावं. तिला कंटाळवाणं वाटू नये. याच उद्देशातून दासी देण्याची प्रथा सुरु झाली. कधीकधी या दास्यांकडून एखाद्या कठीण प्रसंगी सल्लेही घेतले जात असत तर कधीकधी त्या दास्या स्वतःहोवून अशा कठीण प्रसंगात सल्लेही देत असत.
ज्यावेळी कैकेयीचा विवाह झाला. त्यावेळी तिच्यासोबत तिच्या सेवेसाठीही काही दास्या आल्या होत्या. त्यातील मंथरा एक. रामाच्या राज्यभिषेकाचा संदेश ऐकताच महाराणी कैकेयी खुश झाली. कारण तीच जास्त प्रमाणात रामावर प्रेम करीत होती. परंतू मंथरेला राम आवडत नव्हता. अगदी त्यानं जन्म घेतला, तेव्हापासूनच तो तिला आवडेनासा झाला होता.
रामाचा राज्यभिषेक होणार असल्याची वार्ता संपूर्ण राज्यात पोहोचली होती. सगळे आनंदात होते. परंतू मंथरा आनंदात नसल्यानं ती महाराणी कैकेयीला भडकवीत होती. तिलाच वाटत होते की भरत राजा बनावा.
महाराणी कैकेयी ही मंथराला समजावीत होती की तिनं असा रामाचा द्वेष करु नये. परंतू ती समजण्याच्या पलीकडे होती. त्यातच तिच्या बोलण्यावर जेव्हा महाराणी कैकेयीनं कटाक्ष टाकला, तेव्हा तिलाही वाटलं की मंथरा अगदी खरं बोलतेय. तिलाही वाटायला लागलं की आपला भरतच राजा बनावा. शेवटी तिनं ठरवलं, आपण काहीही करु, पण रामाचा राज्यभिषेक होवू देवू नये.
ठरल्याप्रमाणं तिनं त्याबाबतीत बेत आखला होता. तसं पाहता तिच्या तरुणपणात राजा दशरथ एक युद्ध लढले होते.

************************************************

लंकापती रावणाचं व राजा दशरथाचं एकदा युद्ध झालं. त्यावेळी रामाचा जन्मही नव्हता. राक्षसराज रावणानं ज्यावेळी चारही दिशा जिंकल्या, त्या नंतर त्यानं अयोध्येवर चढाई केली. हे दशरथ व रावणाचं युद्ध होय. या युद्धात स्वतः ब्रम्हदेवानं मध्यस्थी केली. त्यात ब्रम्हदेव दशरथाला म्हणाले,
"राजन, तो दशानन आहे. त्याला परास्त करणे कठीण आहे. त्याला परास्त करण्यासाठी त्याला ठार करणं गरजेचं आहे. परंतू त्याला ठार करण्याची वेळ काही आता आलेली नाही. त्याच्या मृत्यूला वेळ आहे."
त्यावर दशरथ म्हणाला,
"पण याचं संकट?"
"मी त्याला समजावून परत पाठवेन." ब्रम्हदेव म्हणाले.
दशरथाचंं बोलणं झाल्यावर ब्रम्हदेव रावणाकडे गेले. म्हणाले,
"रावणा, तू अजिंक्य आहेस. तू देवालाही जिंकले आहेस. मग अशावेळी या तुच्छ मानवाला जिंकून काय करतोस? आपली किर्ती धुळीस मिळवतोस का? ज्यानं देवांना जिंकलं. त्यांच्यासमोर ह्या दशरथासारखी तुच्छ व्यक्ती जिंकणं कठीण नाही. तू लंकेत परत जा आणि सुखानं राज्य कर."
ब्रम्हदेवानं म्हटल्याप्रमाणे रावण परत गेला.तसा त्यानं अयोध्येवर आक्रमण करण्याचा नाद सोडून दिला होता. त्यापुर्वी देवासूर संग्राम घडला होता. त्या युद्धात दशरथाला महाराणी कैकेयीमुळं विजय मिळाला होता. त्या युद्धात तिनं दशरथाला दोन वर मागीतले होते नव्हे तर त्यानं दोन वर दिले होते. ते वर मागून घ्यावी अशी इच्छा त्यानं केली होती. परंतू कैकेयीनं त्यावेळी ते वर मागीतले नाही. ती ते वर नंतर मागणार असं म्हणून टाळून गेली.
राजा दशरथाचे त्यांच्या जीवनात अनेक युद्ध झाले. त्यातील तीन युद्ध बरेच गाजले. पहिला म्हणजे देवासूर संग्राम, दूसरा म्हणजे बाली दशरथ युद्ध व तिसरा रावण युद्ध. बाली युद्ध झालं होतं. या बालीला एक वर प्राप्त होता. तो म्हणजे तो ज्यांच्याशी लढत असे, त्या प्रतिद्वंद्वीची अर्धी शक्ती त्याला प्राप्त होत असे. त्यामुळं तो युद्ध साहजीकच जिंकत असे. असंच एकदा राजा दशरथासोबत बालीचं युद्ध झालं. त्यात त्याला तो वरदान प्राप्त असल्यानं बाली जिंकला. त्यावेळी बालीनं राजा दशरथाला बंदी बनवलं व महाराणी कैकेयीला सांगीतलं की जोपर्यंत ह्याचा मुकूट मला मिळणार नाही, तोपर्यंत हा माझ्याकडे बंदी असेल.
महाराणी कैकेयीला प्रश्न पडला. प्रश्न असा पडला की राजाचं मुकूट म्हणजे त्या राज्याची शान. ते बालीला देणं म्हणजे राज्याची शान गहाण ठेवणं. पेच चांगलाच निर्माण झाला. काय करावं सुचत नव्हतं. परंतू राणी कैकेयी शुरवीरच नव्हती तर अतिशय हूशार होती. तिनं ती अट कबूल केली व आपल्या पतीला सोडवून घेतलं. मुकूट मात्र बालीनं स्वतःकडे ठेवून घेतला.
राजा दशरथ राजधानीत परतला होता. परंतू तो चिंताग्रस्त असायचा. कारण राज्याची शान बालीच्या राज्यात गहाण होती. हे फक्त महाराणी कैकेयीलाच माहित होते. त्यातच तिनं त्याला बंदीलयातून सोडविल्यानं तिचे उपकार राजा दशरथावर होते. त्यामुळं तो महाराणी कैकेयीवर जास्त प्रेम करु लागला होता.
बाली युद्धानंतर रावणानं युद्ध थोपवलं असलं तरी त्यात ब्रम्हदेवानं मध्यस्ती केल्यानं ते युद्ध झालं नाही. रावण माघारी फिरला. परंतू तो अयोध्येतून आपल्या राज्यात जात असतांना बालीचं रावणाशीही युद्ध झालं. त्यातही रावण हा अजेय असल्यानं व त्याला कोणी पराजीत करु शकत नसल्यानं दोघांचाही पराभव अटळ होता. त्यातच रावणाला त्याची कल्पना असल्यानं त्यानं बालीशी युद्ध करण्याऐवजी तिथे असलेला राजा दशरथाचा राजमुकूट पळवून आपल्या देशात घेवून गेला. अशातच देवासूर संग्राम घडला.
देवासूर संग्राम म्हणजे राजा दशरथाची तिसरी लढाई. यातही महाराणी कैकेयी राजा दशरथासोबत युद्धात गेली होती. राजा दशरथाला माहित होते की एकेकाळी याच महाराणीनं आपल्याला बालीच्या बंदीलयातून बाहेर काढलं. म्हणून याही संग्रामात त्यानं महाराणी कैकेयीला आपल्यासोबत नेलं होते. या युद्धात महाराणी कैकेयी राजा दशरथाचं सारथीपण करीत होती.
देवासूर संग्रामातील खलनायक असलेला शंभ्रमासूर हा दंडक वनात राहात होता. तो कित्येक वर्षापासून या वनात शासन करीत होता. त्यातच त्याचं अनेक वर्षापासून देवराज इंद्रासोबत लढाई सुरु होती. परंतू त्यात विजय प्राप्त होत नसल्यानं देवराज इंद्रानं राजा दशरथाची मदत मागीतली. कारण राजा दशरथ पृथ्वी वर महाप्रतापी सम्राट होता. त्याचा सहजासहजी पराभव करणं कठीण आहे हे इंद्राला माहित होतं. तसं पाहता शंभरासूर मायावी राक्षस असून तो अनेक युद्धकला जाणणारा होता. त्यामुळं देवता पराभूत होत होत्या.
देवासूर संग्राम.......त्यात सहभागी झालेला राजा जनक. त्यातच समोर मायावी शक्ती प्राप्त असलेला शंभरासूर. शंभरासूरचा रथ अचानक राजा दशरथापुढं आला. त्यानं युद्ध सुरु केलं. त्यात मायावी शक्तीनं शंभरासूरनं राजा दशरथाला बेशुद्ध केलं. राजा दशरथ याही वेळी मरण पावला असता, परंतू ऐनवेळी सारथी बनलेल्या कैकेयीनं शस्रे हाती उचलले व
तिनं शंभरासूराशी युद्ध केलं. त्यातच शंभरासूराच्या मायावी विद्येचा अंदाज घेवून तिनं आपला रथ दुसरीकडे सुरक्षीत स्थानाकडे वळवला. त्यातच राजा दशरथाचे प्राण वाचले. राजा दशरथ ज्यावेळी होशात आले, तेव्हा त्यांना इतरांकडून कळलं की त्यांचे प्राण महाराणी कैकेयीमुळंच वाचले होते. म्हणून की काय, राजा दशरथावर महाराणी कैकेयीचे दुसरे उपकार झाले होते.
दुहेरी उपकाराच्या ओझ्याखाली दबलेला राजा दशरथ, जेव्हा बेशुद्धावस्थेतून बाहेर आला. तेव्हा तो अत्यंत खुश झाला. कारण त्या बेशुद्धावस्थेदरम्यान महाराणी कैकेयीनं त्याची सेवाही केली होती. तसा तो म्हणाला,
"महाराणी कैकेयी, तू केलेल्या कार्यावर मी अत्यंत खुश असून तुझ्या मुळंच मला जीवदान मिळालेले आहे. तसं पाहता मी तुला काहीही देवू शकत नाही. परंतू एक विनंती करतो तुला, तुला काय मागायचे ते माग."
महाराणी कैकेयीनं त्यावर विचार केला. म्हणाली,
"महाराज, मला आज काही नको. आज माझ्याजवळ सर्व काही आहे."
"तरीही तू मागून घे. तुला कामात येईल असे."
"तर मग ठीक आहे. मी तुम्हाला तीन वर मागते."
"तीन!"
"हो, तीन वर! का बरं! घाबरलात ऐकून."
"नाही नाही. सांग कोणते ते?"
"त्या वरदानाची पुष्टी आज नको व्हायला. आज मला काहीही नको. जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा मी मागून घेईल."
"ठीक आहे." राजा दशरथ म्हणाला.
कैकेयी चाणाक्ष होती. तिनं अतिशय गंभीरपुर्वक विचार करुन ते तीन वर मागून घेतले. त्या तीनही वरानं तिला कोणता फायदा होईल, ते काही आज तिला समजत नव्हतं. त्या वराची आठवणंही ती आज विसरुन गेली होती. अशीच वर्षामागून वर्ष जात राहिली.

****************************************
राजा दशरथ आज तरुण वयात पदार्पित झाले होते. त्यांचे पिता महाराज अज व त्यांची आई महाराणी इंदूमती यांनी त्यांचा विवाह करण्याचं ठरवलं.
राणी कौशल्या राजा सुकौशलची मुलगी होती. तिच्या आईचं नाव अमृतगाथा होतं. राजा सुकौशल कौशल देशात राहात होता. जे कौशल राज्य आज छत्तीसगडला समजलं जातं.
कौशल्या जेव्हा तरुण झाली. तेव्हा राजा कौशलला तिच्या विवाहाची चिंता वाटू लागली. त्यातच त्यांनी चारही दिशेला तिच्यासाठी वर शोधायला आपले दूत पाठवले. याच दरम्यान सुकौशल राजानं साम्राज्यविस्ताराचं धोरण स्विकारलं. त्यातच काही काही राजांनी त्याचं मांडलिकपण स्विकारलं. परंतू राजा दशरथाने काही त्यांचं मांडलिकपण स्विकारलं नाही. त्यांनी युद्धाचा स्विकार केला.
राजा दशरथाच्या पराक्रमाची किर्ती ही पंचक्रोशीतच नाही तर चारही दिशांना होती. ती सुकौशल राज्याच्याही कानावर होतीच. त्यातच दशरथाचा पराक्रम पाहून राजा सुकौशल भयभीत झाला. परंतू ते न दाखवता त्यानं आपल्या मुलीच्या विवाहाचा प्रस्ताव त्याचेसमक्ष ठेवला व राजा दशरथानं त्या प्रस्तावाचा स्विकार केला. त्यातच काही दिवसानं त्यांचा विवाहही संपन्न झाला.
महाराणी बनलेली कौशल्या........तिला बरेच दिवस मुलबाळं झाली नव्हती. म्हणून राजा दशरथानं तिच्यासमोर दुस-या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तसं पाहता त्यावेळी स्रियांना पाहिजे त्या प्रमाणात स्थान नव्हतं. वंशवाढीसाठीही स्रियांचा वापर होत असे.
कौशल्यासमोर आलेला राजा दशरथाच्या विवाहाचा प्रस्ताव. त्यातच त्याला मिळालेला महाराणी कौशल्याचा होकार.......राजा दशरथानं लवकरच दुसरा विवाह केला तो म्हणजे कैकेयीशी. ही कैकेयी केकेय देशाची राजा अश्वपती यांची कन्या होती.
राजा दशरथ यांनी विवाहाबद्दलचं एक निवेदन राजा अश्वपतीला पाठवलं. राजा अश्वपतीनं त्या निवेदनाचा स्विकार केला. त्यातच त्यांनी राजा दशरथाला आमंत्रण पाठवलं. राजा अश्वपतीचा निमंत्रण प्रस्ताव येताच राजा दशरथ केकेय राज्यात गेला. तिथं त्याचं महाराज अश्वपतीनं चांगलं स्वागत केलं.
केकेय राजा अश्वपतीनं राजा दशरथाकडून कबूल करवून घेतलं की कैकेयीचा त्याचेसोबत विवाह होईल. परंतू त्या एक अट आहे. ती म्हणजे त्याला अयोध्येचं सम्राटपद कैकेयीच्या पुत्रालाच द्यावं लागेल. ही अट होती. राजा दशरथानं यावर विचार केला व ही अट राजा दशरथ कबूल करताच महाराणी कैकेयीशी विवाह संपन्न झाला व ती अयोध्येत आली.
महाराणी कैकेयीही विवाह होवून अयोध्येत आली होती. परंतू तिलाही कोणतेच पुत्ररत्न प्राप्त न झाल्यानं राजा दशरथानं पुन्हा दुसरा विवाह करण्याचं ठरवलं. त्याची परवानगीही त्यानं कैकेयीला मागीतली. तेव्हा त्याला परवानगी देत कैकेयीनं म्हटलं की यदीकदाचित तिला दुस-या पत्नीच्या मुलांच्या जन्मानंतर मुलं झालीत. तरीही राज्याच्या वारसगादीवर तिच्याच मुलाचा हक्क असेल. तसेच तिलाच त्याची प्रिय राणी म्हणून राजदरबारात स्थान द्यावं लागेल. त्याशिवाय दुसरा होणार नाही. राजा दशरथानं होकार देताच महाराणी कैकेयीनं दुस-या विवाहास संमती दिली व राजा दशरथानं मुलासाठी तिसरा विवाह केला.

****************************************

सुमीत्रा असं नाव होतं त्याच्या तिस-या पत्नीचं. ती कोणी म्हणतात सामान्य स्री होती. तिचा संबंध राजघराण्याशी नव्हता. पण हे धांदात चूक असून ती काशी नरेश याची कन्या होती. परंतू ती लहानपणापासूनच साधी सरळ असल्यानं तिनं दशरथाच्या राज्यकारभारात लक्ष दिलं नाही. ती महाराणी कौशल्याची सेवा करीत राहिली. तसेच राजा दशरथाने कैकेयीला तिस-या विवाहाच्या वेळी दिलेल्या वचनानुसार तो कैकेयीवरच प्रेम करीत राहिला. सुमीत्राला त्यानं नाममात्र राणी बनवून ठेवलं होतं.
दशरथ राजाच्या तीन राण्या. त्या तीनही राण्यांना एकही पुत्र प्राप्त न झाल्यानं त्यानं आता चवथा विवाह करण्याऐवजी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचं ठरवलं. त्यानुसार राजा दशरथानं पुत्रकामेष्टी यज्ञ केला.
राजा दशरथाला पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा होता. त्यातच तो विचार करीत होता की कोणाच्या हस्ते पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा. त्यातच काही सल्लागारांनी सुचवलं की श्रुंगेश्वरला एक श्रुंगी ऋषी राहतात. ते पुत्रकामेष्टी यज्ञ करतात. तेव्हा राजा दशरथानं त्याचेकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करवून घेतला. त्यानुसार महाराणी कौशल्याला प्रथम पुत्र जन्माचे स्थान मिळाले. त्यानंतर काही वेळानं सुमीत्रेनं लक्ष्मणाला जन्म दिला. त्यानंतर काही वेळानं कैकेयीनं भरताला जन्म दिला व शेवटीही कैकेयीनं आपल्या पोटातून शत्रुघ्नला जन्माला घातलं.
राजा दशरथाच्या चारही मुलांचे विवाहसोहळे आटोपले होते. त्यातच मंथरानं त्या घराणेशाहीत अंगार टाकली आणि त्यातच महाराणी कैकेयीला वाटायला लागलं की आता आपल्याला देवासूर संग्रामात जे तीन वर द्यायचं वचन राजा दशरथानं दिले. ते मागून घ्यावेत.
रामाचा राज्यभिषेक जाहिर होताच कैकेयीच्या कक्षात आलेल्या राजा दशरथाला महाराणी कैकेयी म्हणाली,
"मी राजा रामाच्या राज्यभिषेकाला तयार नसून आपण माझ्या वडीलाला म्हटल्याप्रमाणे आपण रामाचा राज्यभिषेक न करता माझ्या भरताला राजगादीवर बसवावं."
राजा दशरथानं ते बोलणं ऐकलं. त्याच्या कानाला शब्दरुपी बाण टोचून गेलेत. तसा राजा दशरथ बोलला,
"कैकेयी, हे तू काय बोलतेस! तुला तरी कळतेय का?"
"होय, मला अगदी चांगलं कळत आहे. मी काही अनभिज्ञ नाही. माझ्या भरताला राज्य हवं म्हणजे हवं."
"ते शक्य नाही."
"ठीक आहे. तुम्ही आपल्या वचनाला मुखरले. त्याचं मला काय? मी समजत होते की इक्वांशू वंशातील राजे हे आपल्या वचनाला मुखरत नसावेत. माहित आहे आपल्या पुर्वजांनी जीव दिला वचनासाठी. पण त्यांनी वचन मोडलं नाही. आपण जर असं वचन मोडणार असाल तर उद्या तुमच्या इतर घराण्यावर वा वारसावर कोण विश्वास ठेवेल. तुम्ही हारलात राजे. मुखरलात वचन पूर्ण करण्यात."
"नाही महाराणी मी वचनाला मुखरलो नाही. परंतू......"
"काय परंतू? जर असं वाटत असेल तुम्हास तर मला तुम्ही जे तीन वचन दिलेत, ते वचन पूर्ण करा."
"कोणते तीन वचन?"
"आठवा तीन वचन. असे तर मोठमोठ्या डिंगा मारत फिरता अन् वचनाला मोडता."
"तीन वचन! तीन वचन."
"हो, तीन वचन. एक वचन माझ्या भरताला राज्य. दुसरं वचन रामाला चौदा वर्ष वनवास आणि तिसरं वचन म्हणजे राज्याची शान परत आणणं."
"राज्याची शान परत आणणं..........अर्थात?"
"कोणीही माझ्या भरताला राज्य करतांना लांच्छन लावायला नको."
"अर्थात?"
"अर्थात राजमुकूट. तुमचा राजमुकूट बालीजवळ आजही गहाण आहे. माहित आहे का तुम्हास?"
"होय, आठवणीत आहे. पण तो कसा परत आणता येईल?"
"राम आणेल. रामाला मी सांगणार. आदेश देणार. मग तर आणेल."
"तू तुझे वचन परत घे महाराणी."
"नाही घेणार. तुम्हाला माझ्या वचनाची वचनपुर्ती करावीच लागणार."
"ठीक आहे. तू भरताला राजगादीवर बसव. परंतू माझ्या रामाला चौदा वर्ष वनवास नको देवूस."
"नाही. त्याला चौदा वर्ष वनवासच द्या. कारण तो जर राज्यात राहिला तर माझ्या मनात शल्यवाची भावना असेल. मी जगू शकणार नाही."
"पण मीही जगू शकणार नाही महाराणी, त्याचं काय?"
"तुम्ही आपलं पाहा. मी त्यात काहीही बोलू शकत नाही. तुम्ही काय करायचं ते करा. पण वचनाची पुर्ती करा."
"हे मी राजा रामाला सांगू शकत नाही. माझी तेवढी हिंमत नाही. तूच सांग. ठीक आहे."
"ठीक आहे. मीच सांगणार. बोलवा रामाला."
"तूच बोलव. मी नाही बोलवू शकत." अत्यंत विवशतेनं राजा दशरथ म्हणाला.
सर्व राज्यात रामाच्या राज्यभिषेकानं आनंदीआनंद होता. त्यावेळी भरत मामाच्या गावी म्हणजेच आजोळी गेला होता.
रामावर दशरथानं निरतिशय प्रेम होतं. तो जेष्ठ असल्यानं त्यालाच राजा बनवावं ही त्याची मनोमन इच्छा होती. तसं त्यानं जाहिरही केलं होतं. परंतू आता राजा दशरथापुढे महाराणी कैकेयीच्या बोलण्यानं मोठा प्रसंग उभा राहिला होता. काय करावे हे राजा दशरथाला सुचत नव्हते. त्यातच महाराणी कैकेयीनं एका दासीकरवी अत्यंत महत्वाचं काम आहे असा संदेश पाठवून बोलावून घेतलं.
राम महाराणी कैकेयीनं बोलावल्यानुसार तिच्या कक्षात पोहोचला. त्यातच त्यानं पाहिलं की त्याचे पिता डोळे लावून झोपलेले आहेत. त्यातच त्यांची प्रकृती ठीक नाही असं वाटत होते. तशी ती आपल्या पित्याची स्थिती पाहून राम म्हणाला,
"काय झालं? पिताश्री असे झोपले का? प्रकृती ठीक तर नाही."
"रामाचा आवाज ऐकताच राजा दशरथ म्हणाला,
"राम."
"बोला पिताश्री." राम म्हणाला.
राजा दशरथ विवश होता. तो बोलू शकला नाही. तोच त्यानं डोळे लावले. तशी रामाला चिंता पडली. तो कैकेयीला म्हणाला,
"माते, असं काय घडलं की पिताश्री बोलत नाहीत. असं काय झालं?"
रामाच्या बोलण्यावर राजा दशरथ काही बोलू शकली नाही. तशी कैकेयी म्हणाली,
"तुझ्या पिताश्रीला भरताला राजा बनवायचं आहे. तसेच तुला चौदा वर्ष वनवास. तसेच बालीकडून तुझ्या पिताश्रीचं हिरावलं गेलेलं मुकूट."
राम ते ऐकून गप्प होता. काही वेळ विचार केल्यावर तो म्हणाला,
"ठीक आहे, पिताश्रीची अशी इच्छाच आहे तर बनवावं भरताला राजा. मी वनवासात जायला तयार आहे आणि मुकूटही आणायला. ठीक आहे. आतातरी पिताश्रीला उठा म्हणावं."
"ते उठणारच आहेत. पण........."
"पण काय माते?"
"भरत येणारच आहे परत अयोध्येत. पण तो येण्यापुर्वीच तुला हे राज्य सोडून जायला हवं. उद्याचा सुर्यही तू राजधानीतील पाहू नये अशी माझी इच्छा आहे."
"ठीक आहे माते." रामही विवशतेनं म्हणाला.
"आणि तेही राजसी कपडे न घालता. केवळ साधू वा तपस्वीचेच कपडे घालून तुला जावं लागेल. तसेच चौदा वर्षपर्यंत तुला त्याच पोशाखात राहावं लागेल. पादूकाही वापरु नयेत."
कैकेयी बोलून गेली खरी. पण राम विवश होता आपल्या बापासारखा. ती मातेची आज्ञा होती. महाराणी कैकेयीलाही तो माताच समजत होता. आपल्या आई कौशल्यापेक्षाही कितीतरी जास्त प्रेम करीत होता आपल्या आईवर. आपल्या मातेनं असा डाव कसा रचला असावा असा खोल विचार तो करीत होता. परंतू त्याला कारण कळत नव्हतं. तसा अत्यंत विवश होवून तो आपल्या कक्षात पोहोचला. जिथे सीता होती. त्यातच तो आपले राजसी कपडे काढू लागला. तपस्वींचे कपडे परीधान करु लागला. डोक्याचे केसंही बांधून घेतले. जणू तो एखादा मुनी बनला होता. ते पाहून सीता म्हणाली,
"काय झालं? आपण असा मुनीवेश का धारण केला आहे?"
"मला वनवास यात्रेला जायचं आहे. आपल्या मातेची व पित्याची इच्छा आहे."
"अर्थात?"
"अर्थात आपली आई माता कैकेयीची इच्छा आहे की मी चौदा वर्ष वनवासाला जावं. हे राज्य भरताला द्यावं व बालीकडून आपल्या पिताश्रीचा हिरावलेला मुकूट आणावा."
सीतेनं ते ऐकलं. तिलाही काही कळेना. नुकताच तिचा विवाह झाला होता. आपल्या पतीवर आपल्या विवाहानंतर असे दिवस येतील याचा विचार तिनं कधी केला नव्हता. तसेच तिनं विचार केला की जिथं पती असतील, तिथं आपण असावं. तशी ती म्हणाली,
"ठीक आहे. मीही तुमच्यासोबत येणार."
"नाही सीते, तू येवू शकणार नाहीस. मीच जातो एकटा. तू सुकूमार आहेत. जनकपुरीत तू अगदी सुखात राहिली आहेस. माझ्या आईच्या म्हणण्याचा तुला त्रास कशाला? मीच जातो वनवासात."
"नाही नाही. मीही येते. जी पत्नी आपल्या पतीसोबत राहू शकत नाही, ती पत्नी कसली?"
सीतेनं हट्ट धरला. ती हट्ट काही सोडेना. तसा राम तयार झाला व तो तिला आपल्यासोबत न्यायलाही तयार झाला होता.
*********************************************

लक्ष्मणाला जेव्हा माहित झालं की राम आणि सीतेला माता कैकेयीनं चौदा वर्षाचा वनवास दिला. तेव्हा त्याच्या मनाचा तीळपापड झाला. त्याला माता कैकेयीचा राग आला. परंतू तो तरी काय करणार. तोही विवश होता. तसा वेळ न दवडता तो रामाच्या कक्षात गेला. त्याला समजवू लागला. पण राम काही ऐकायला तयार नव्हता. सीतेलाही समजवू लागला. पण तिही ऐकायला तयार नव्हती. त्यातच तो माता कैकेयीलाही काहीबाही बोलू लागला. त्यावर राम म्हणाला,
"आपण ज्याप्रमाणे सुमित्रा आणि माता कौशल्याची लेकरं. तसेच आपण कैकेयीचेही लेकरं आहोत. मातेच्या आज्ञेचे पालन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तेव्हा तू कितीही समजावलं. तरी आम्ही वनात जाणारच."
त्यावर लक्ष्मण म्हणाला,
"जर तुम्ही ऐकणार नसाल तर मिही तुमच्यासोबत येणार. तुम्ही नाही म्हणू नका."
रामानं लक्ष्मणाला त्यावर बरंच समजावलं. पण लक्ष्मण ऐकायला तयार नव्हता. तेव्हा नाईलाजानं रामाला लक्ष्मणाला सोबत नेण्यासाठी तयार व्हावं लागलं.

****************************************

ज्याप्रमाणं लक्ष्मणाला वनवासाची गोष्ट माहित झाली. तशी उर्मीलेलाही ती गोष्ट माहित झाली. त्यातच उर्मीला नववधूसारखी नटून थटून बसली होती. तिच्या मनात वनवासात जाणं नव्हतं. त्यात राजसी ऐषआराम भोगणं हा उद्देश नव्हता. त्याचं कारणंही वेगळंच होतं. तिला वाटत होतं की जर ती वनवासात गेली तर ती वनवासात जाता बरोबर महाराणी कौशल्या आणि महाराणी सुमित्राही दुःख करीत करीत मरुन जातील. तसेच पूर्ण राज्याची वाट लागेल. त्यामुळं तिला वाटत होतं की ती नववधूसारखी सजली तर तिच्यावर लक्ष्मण क्रोधीत होईल व तिला लक्ष्मण अरण्यात नेणार नाही व तिला महाराणी कौशल्या व महाराणी सुमित्राची सेवाही करता येईल.
तिचा विचार करणं बरोबर होतं. कारण ज्यावेळी लक्ष्मण तिच्या कक्षात आला, तेव्हा लक्ष्मणानं पाहिलं की त्याची राणी नववधूसारखी सजलेली आहे. तसा त्याला उर्मीलेचा राग आला. तो क्रोधीत झाला. तसा तो आपल्या राणीला म्हणाला,
"राज्यात एवढा मोठा अतिप्रसंग सुरु असतांना तू अशी नववधूसारखी सजली आहेस. तुला थोडीशी लज्जा वाटत नाही असे करायला."
लक्ष्मणानं तसं म्हणताच तिनं राजसी वस्र उतरवले व तिही म्हणाली की तिही वनवासात येत असून तिलाही लक्ष्मणानं वनात आपल्या सोबत घेवून जावं. परंतू यावर लक्ष्मण म्हणाला,
"तू जर अशी माझ्यासोबत आली तर माता कौशल्या व माता सुमित्राची सेवा कोण करणार. त्या तर अशाही दुःख सहन करीत करीत मरुन जातील. तू त्यांची सेवा कर आणि इथंच राहा. तसेच माझी एक विनंतीच नाही तर आज्ञा आहे की तूला कितीही दुःख वाटलं तरी आपल्या डोळ्यातून एकही अश्रू गाळायचा नाही. आपला चेहरा सदोदित आनंदी दाखवायचा."
पतीची इच्छा. त्या पतीच्या इच्छेपुढं राणी उर्मीलाचं काहीही चाललं नाही. तिला ते दुःख सहन करुन व मनावर ताबा ठेवून अयोध्येतच थांबावं लागलं. तेही अश्रू न गाळता व चेह-यावर कितीही दुःख असलं तरी इवलंसही दुःख न दाखवता..........
****************************************
पतीवियोग आणि तोही उर्मीलेला. मांडवीच्या डोळ्यासमोर भरत राहणार होता. श्रुतकिर्तीच्याही डोळ्यासमोर शत्रूघ्न राहणार होता नव्हे तर सीताच्याही डोळ्यासमोर राम. पण सर्वात जास्त दुःख हे उर्मीलेलाच होणार होतं. कारण उर्मीलेच्याग डोळ्यासमोर तिचा पती लक्ष्मण राहणार नव्हता. असा तसा नाही तर जवळपास चौदा वर्ष.
ती तरुण होती. विवाहाला काही दिवसच झाले होते. त्यातच तिच्या नशिबी विरहाचे भोग आले होते. काय करावं सुचत नव्हतं. उपाय नव्हता. असे दिवस जाणारही होते. पण कसे कापावे हे उर्मीलालाही समजत नव्हतं. ती अभागन होती. तिची अवस्था एखाद्या पंख छाटलेल्या पाखरागत झाली होती.
सर्वजण कैकेयीला दोष देत होते. पण राम काही दोष देत नव्हता. तो तिच्या आदेशाला कर्तव्यपालन समजत होता. कारण त्याला त्याचं कारण माहित होतं. माता कैकेयीचा त्याला वनात पाठविण्याचा उद्देश हा अयोध्येतील शान आणि बाण परत आणणं हा होता हे तो ओळखून होता. कारण तिनं सांगीतलं होतं की वनात गेल्यावर त्याला त्याच्या वडीलाचं हिरावलेलं मुकूट परत आणायचं आहे. जे मुकूट बालीनं जबरदस्तीनं हिसकावून ठेवलं आहे.

****************************************

ती रात्र तशीच गेली. कुणालाही झोप आली नाही. तशी पहाट झाली. पक्षांची किलबिल ऐकायला येत होती. सारी अयोध्यानगरी जागीच होती. परंतू रामाला वाटत होतं की त्यानं वनवासात रात्रीच निघावं. जेणेकरुन अयोध्यानगरीतील लोकं त्याचेसोबत येणार नाही. म्हणून की काय, तो पहाटेलाच निघाला. परंतू ते अयोध्येतील मंडळी. जी त्याचेवर निरतिशय प्रेम करीत होती. ती कशी ऐकणार.,शेवटी तेही रामासोबत वनवासात जायला निघाले.
वनवासाचा तो मार्ग. दिवसभर ते चालले होते. त्याचबरोबर प्रजाजननंही. ते दिवसभर चालून थकले होते. तशी रात्र झाली.
दिवसभराच्या थकव्यानं तसेच रात्री झोप न झाल्यानं प्रजाजन झोपले होते. परंतू लक्ष्मण जागा होता. त्याला जागे राहणे भाग होते.कारण तो जर जागणार नाही तर त्याचे वडीलबंधू राम व सीतेला कोण सांभाळणार. तसं पाहता त्या वनात मोठमोठे राक्षस होते. जे राक्षस त्या तिघांनाही क्षती पोहोचविणार होते. अशातच निद्रादेवी आली.
निद्रादेवी ही निशेची देवी होती. ती लक्ष्मणाजवळ आली. त्या निद्रादेवीला पाहताच लक्ष्मणानं हात जोडले. तशी ती म्हणाली,
"हे लक्ष्मणा, मला जागा दे. मला तुझ्याजवळ राहायचेय."
त्यावर लक्ष्मण नतमस्तक झाला व तिला हात जोडून अतिशय नम्रपणे म्हणाला,
"हे निद्रादेवी, तू माझ्याकडे येवू नकोस. माझ्याजवळ राहू नकोस. मी तुला ठेवायला सक्षम नाही. मी जर तुला माझ्याजवळ ठेवलेच तर माझ्या या वडीलबंधूचं व माझ्या या सुकोमल वहिणीचं रक्षण कोण करणार."
"मग मी कुठे जावू? कोणाला ना कोणाला तुझ्या वाट्याची निद्रा घ्यावीच लागेल की नाही. मग मला अशी व्यक्ती सांग की जी माझ्या वाट्याची निद्रा घेईल."
"ठीक आहे. मग तू माझी पत्नी उर्मीलाकडे जा. जी माझ्या वाट्याची निद्रा घेवू शकेल."
"ठीक आहे. मी तिच्याकडे जाते. जर ती तयार झाली नाही तर मी तुझ्याकडेच परत येईल. मग नाही म्हणू नकोस."
"ठीक आहे." लक्ष्मण म्हणाला. तशी निद्रादेवी उर्मीलेकडे गेली व तिला तिच्याकडे येण्याचा हेतू कथन करु लागली.
****************************************
निद्रादेवीचं आगमण झालं होतं. उर्मीला महाराणी कौशल्याच्या कक्षात होती. ज्या कक्षात सुमित्राही होती. तिथे कौशल्याचे ती पाय चेपीत होती. कौशल्या आणि सुमित्राही जाग्याच होत्या. सुमित्राही त्या कक्षात महाराणी कौशल्याचे पाय चेपीत होती. तशी निद्रादेवी तिथं येताच ती उर्मीलाला म्हणाली,
"उर्मीला, मी लक्ष्मणाकडून आलेय. मला तुझ्याजवळ राहायचे आहे. लक्ष्मणाची इच्छा आहे की मी त्याचेजवळ नको. कारण मी जर त्याचेजवळ राहिले तर तो आपल्या वडीलबंधूचं रक्षण करु शकणार नाही. तसेच त्याच्या सुकोमल वहीणींचंही रक्षण करु शकणार नाही. तेव्हा मला तुझ्याजवळ जागा दे."
निद्रादेवीनं तिचं कथन कथन करताच उर्मीलेनं विचार केला. जर मी हिचा स्विकार केला नाही आणि ही आपल्या पतीकडं गेली तर उद्या आपले पती आपल्या बहिणीचं व आपल्या बहिणोईचं रक्षण करु शकणार नाही. म्हणून हिच्या प्रस्तावाचा स्विकार करणं आवश्यक आहे. तशी ती म्हणाली,
"हे निद्रादेवी, तू अगदी निश्चींत मनानं माझ्याजवळ राहू शकतेस."
उर्मीलेनं होकार देताच निद्रादेवी उर्मीलेकडे राहायला तयार झाली. तसंच तिनं चौदा वर्षासाठी आपल्या जोखडातून लक्ष्मणाला मोकळं केलं होतं. त्याचा वडीलबंधू राम व त्याची वहिनी सीतेसाठी. जी सुकोमल होती. नव्हे तर त्याचे निःपक्ष प्रेम होते त्याच्या वडीलबंधूवर. ज्या वडीलबंधूवरील प्रेमाखातर तो आपल्या सर्व सुखसोयी सोडून अरण्यात आला होता. ते राजसी सुखही त्यानं त्यागले होते.

****************************************

उर्मीलेनं निद्रादेवीचं आमंत्रण स्विकार करताच की निद्रेच्या स्वाधीन झाली. तशी पाय चेपत चेपतच ती कौशल्याच्या पायावरच निद्रीस्त झाली. ती दिवसरात्र झोपत असे. मात्र जेव्हा जेव्हा तिला जाग येत असे. तेव्हा तेव्हा ती आपल्या हातानं महाराणी कौशल्याची सेवा करीत असे. तसेच मांडवी सुमित्राची काळजी घेत असे तर श्रुतकिर्ती कैकेयीची सेवा करीत असे.
अर्धी रात्र उलटली होती. तसा राम झोपेतून जागा झाला. त्यानं पाहिलं की लक्ष्मण जागा आहे. तसा त्यानं लक्ष्मणाला आदेश दिला. 'आपण सकाळ होण्यापुर्वीच निघायला हवं. नाहीतर हे अयोध्येतील प्रजाजन आपल्याला जावू देणार नाहीत.'
वडीलबंधूचा आदेश ऐकताच लक्ष्मण तयार झाला व त्या भयाण रात्री ते तिघेही जण अयोध्येतील जनतेला झोपेतच ठेवून पुढील प्रवासाला निघाले. त्यांना माहित नव्हते, ते कुठे जात आहेत. जिकडे रस्ता मिळेल, त्या रस्त्याने ते जात होते. अगदी निश्चींत मनानं.,आज त्यांच्या मनात कोणत्याही स्वरुपाचा किंतू परंतू नव्हता. तसेच कोणत्याही स्वरुपाचा राग, द्वेषही नव्हता.
निद्रादेवीच्या आगमनानं उर्मीला झोपेतच राहायची. त्यातच कधी उठलीच तर ती कौशल्याची सेवाही करायची. परंतू त्यानं तिचं जीवन कटत नव्हतं. लक्ष्मणाला जावून आज एक मास उलटला होता. कधीकधी ती एकांतात असायची. तेव्हा मात्र तिला तिच्या पतीची आठवण यायची आणि वाटायचं की ते कसे असतील.
दिवसामागून दिवस जात होते. परंतू ते दिवसामागून दिवस जात राहिले तरी त्यात रुष्टता होती. तिला ते दिवस घालवणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. जेव्हा ती एकांतात राहायची, तेव्हा तिला वाटायचं की मी उर्मीला अन् माझ्या वाट्याला हे असं जीवन. हेही जीवन. रामाला वनवास झाला खरा. पण खरा वनवास तर मला आणि माझ्या पतीला आहे. रामाची पत्नी त्याचे जवळ आहे. भरताचीही पत्नी त्याचेजवळ आहे आणि शत्रुघ्नचीही. पण माझ्याजवळ कोण आहे. मीही एकटीच आणि माझे पतीही एकटेच. फक्त सेवा आणि सेवाच करायची. बदल्यात काय तर काहीच नाही. मी सुंदर यौवना. नुकतीच विवाह झालेली. या नवनवीन विवाहाच्या काळात कोण्याही स्रीला तिचा पती तिच्याजवळ राहावा असं वाटतं. पण मी भयंकर पाप केलं असेल, म्हणून नशिबानं मला त्यांच्यापासून दूर केलं असेल कदाचित. खरे भोगमान तर आम्ही दोघंही भोगत आहोत.
मी अभागन. आज माझ्या वाट्याला दुःख जरी आलं असेल, मला रडावसं जरी वाटत असेल तरी मी रडू शकत नाही. माझं दुःख दूर करु शकत नाही. अशा या जीवनाचा काय उपयोग. मला जगावसं वाटत नाही. पण काय करु. मला जगावच लागेल. समजा मी नाही जगले तर उद्या माझ्या मृत्यूनंतरही मला दोष लागेल. कारण निद्रादेवी मी नसल्यानं माझ्या पतीकडं जाईल आणि ती त्यांच्याजवळ राहिल. यामुळं त्यांना निद्रा येईल व ते आपल्या वडीलबंधूचं व माझ्या ताईचं रक्षण करु शकणार नाहीत. कशी जगू मी? मला हे जगणंही असह्य होत आहे.
कदाचित मी रडून माझं दुःख दूर केलं असतं. पण मला रडणं आज कठीण झालंय. माझ्या पतीनं मला तंबी देवून ठेवलीय की तू रडायचं नाही. चेह-यावर किंचीतही दुःख दाखवायचं नाही. नेहमी हसतखेळत राहायचं. तसेच माझ्या बहिणीनंही मला तीन शक्त्या प्रदान केल्या. त्यामुळं मला एकाचवेळी तीन कामं करता येणंही शक्य आहे. परंतू त्या तीन वरदानाचा मला काय उपयोग. आज ते तीनही वरदान मातीमोल ठरत आहेत.
माणसाचं दुःख त्याच्या अश्रूतून निथळून पडत असतं. पण जिथं अश्रूच सुकलेले, तिथं मी कशी काय जगू शकेल एवढे दिवस. अजून मला चौदा वर्ष काढायचे आहेत.
उर्मीलाचंही बरोबर होतं कारण खरं दुःख तिलाच जाणवणार होतं. तिला रडता येणार नव्हते तसेच चेह-यावर दुःखही जाणवू द्यायचं नव्हतं. ते सगळं तिला एक नारी जरी असली तरी सहन करावंच लागणार होतं आणि लक्ष्मणासाठी नाही तर तिला राम आणि तिची बहिण सीतेसाठी जगावं लागणार होतं.

****************************************
भरत.........भरत आजोळमधून परत आला होता. अयोध्येत येताक्षणी त्यानं लोकांमध्ये उदासीनता पाहिली. आनंद आणि उत्साहाच्या ठिकाणी लोकांचा तिरस्कार पाहिला. त्यातच इथं काहीतरी घडलं असेल असंही त्याला वाटलं. त्यातच त्यानं सारथ्याला विचारलं,
"काय झालं? असं काय घडलं की अयोध्येतील वातावरण तंद्रेचं आहे. प्रत्येकजण नाक मुरडून जात आहेत."
त्यावर सारथी काहीच बोलला नाही. तसं त्यानं दबाव देत विचारताच सारथी म्हणाला,
"महाराज मला त्यातील काहीही सोयरसुतक माहित नाही. त्यामुळं मी काही सांगू शकत नाही."
सारथी बोलून मोकळा झाला. तसा तो राजप्रासाद आला.
राजप्रासादाजवळ येताक्षणीही त्याला काहीच समजलं नाही. तसा तो सुमंतच्या कक्षात गेला. त्याला विचारणा केली. त्यातच सुमंतजींनी सत्य कथन केलं. ज्यानुसार भरताला आपल्या आईचा तीव्र राग आला. रागारागातच तो आपल्या आईच्या कक्षात गेला. आता तिच्यावर रागावणार. तोच त्यानं पाहिलं की त्याचे पिता त्या कक्षात मरुन पडलेले आहेत. त्यांच्या सभोवताल त्याच्या सर्व राण्या बसलेल्या आहेत. तसेच त्यांच्या इतर स्नुषाही. सर्वजण विलाप करीत आहेत.
राजा दशरथ........ ते पुत्रविरहानं मरुन पडलेले होते. सर्वजण रडत होते. परंतू उर्मीला आणि कैकेयी रडत नव्हती. त्यांना रडता येत होते. परंतू त्या रडत नव्हत्या. त्यातच भरताला वाटलं की यामध्ये दोष आपली आई कैकेयी व आपली भावजय उर्मीलाचा असावा.
उर्मीलाचा त्यात कोणताच दोष नव्हता. परंतू ती मजबूर होती. दोष कैकेयीचाही नव्हता. तीही मजबूरच होती. दोष होता मंथराचा. ती मात्र तिथं दिसत नव्हती. कारण राम वनात जाताच लोकांनी तिची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यामुळं ती आपल्याच कक्षात जीव सांभाळून रडत बसली होती.
भरताचं अगदी लहानपणापासून त्याचा भाऊ रामावर अतिशय प्रेम होतं. कारण अबोध अशा वयात जेव्हा ते गुरुच्या आश्रमात विद्या ग्रहण करायला गेले होते. तेव्हा त्यांनी प्रत्यक्ष रामाच्या रुपातच देव पाहिला होता. त्या रामानं त्यांना झोपू दिलं होतं आणि प्रत्यक्ष स्वतः रात्र न् रात्र आपल्या धाकट्या बंधूंची सेवा करीत करीत रात्र काढल्या होत्या. त्यांच्या जीवाला आपल्या प्राणापेक्षाही जास्त जपलं होतं. त्या आश्रमात त्या सर्वांचे माता आणि पिता नव्हते. राम हाच त्यांचा पिता आणि माता झाला होता. त्याच उपकाराची जाणीव म्हणून आज ते मोठे झाल्यावर आपल्या वडील भावाची काळजी घेत होते. त्याचा मानसन्मान करीत होते.
भरत आपल्या आजोळमधून परत येताच त्याला काही वेळातच माहिती पडलं की आपल्या आईनंच आपल्या प्रिय भावाला वनवासात पाठवलं आहे. त्यातच आपला पिता ही आपल्या आईमुळंच मरुन पडलेला आहे. जेव्हा त्याला ह्या गोष्टी त्याला माहित झाल्या, तेव्हा त्याला त्याच्या आईचा भयंकर राग आला. परंतू त्यावर काही उपाय नव्हता. त्याला आपल्या पतीचा अंत्यविधी उरकविणे आवश्यक होते.
भरतानं आपल्या पित्याचा अंत्यविधी उरकवला. परंतू एक गोष्ट नेमकी केली. ती म्हणजे आपल्या आईला धडा शिकवणे, त्यातच तो आपल्या आईच्या कक्षात गेला व आपल्या आईला वास्तव बोलणे बोलत म्हणाला की तो तिला त्याची माता मानत नसून तिनं त्याला पुत्र म्हणू नये. आजपासून तो तिच्याशी कधीच बोलणार नाही. तसेच त्याला राज्याचा लोभ नसून तो आपल्या प्राणप्रिय बंधू रामाला परत आणेल व जेव्हापर्यंत त्या रामाला राजगादीवर बसविणार नाही, तोपर्यंत तो सुखी असणार नाही.
त्यानं कैकेयीला म्हटल्यानुसार तो आपल्या प्राणप्रिय भावाच्या शोधात निघाला. त्यातच त्याला लवकरच त्या जंगलातील निर्जन स्थळी रामाची भेट झाली. तसा राम म्हणाला की माता कैकेयी देखील त्याचीच माता असून तो केवळ आपल्या मातेची आज्ञा पूर्ण करण्यासाठीच वनात आला आहे. भरतानं अयोध्येत परत जावं व निदान चौदा वर्ष तरी राज्य करावं. तसा भरत म्हणाला,
"बंधो, मी भरत आपला अनुज आपल्याला विनंती करतो की मला हे राज्य नको आहे. त्यावर आपण मार्गदर्शन करावे. आपण जर अयोध्येत परत फिरणार नाही तर मीच स्वतःला संपवून घेईल. तुमच्यावाचून या जगण्याचं सारस्य काय?" तसा राम म्हणाला,
"भरता, माझ्या अनुजा, तू असा भावनाविव्हळ होवू नकोस. संयम राख. तूनं जर असं स्वतःला संपवून घेतलं तर ही अयोध्या कोणाकडे पाहिल. या अयोध्येत आज तू आणि शत्रुघ्न व्यतिरीक्त कोणीही नाही. आज राज्याची अशी स्थिती पाहून एखादा शत्रू अयोध्येवर आक्रमण करेल व अयोध्येला आपल्या राज्यात जोडून टाकेल. तेव्हा ही प्रजाही गुलाम होईल. भरता, एक बाब लक्षात घे, की या प्रजेनं आपल्या शिवाय कोणाकडे पाहावं? मी आणि लक्ष्मण माताआज्ञेने बंदीस्त आहोत, अशावेळीही तू या प्रजेचं रक्षण करीत नसेल तर प्रजेनं जावं तरी कुठे? सांग भरता, प्रजेनं जावं तरी कुठे?"
भरत रामाच्या मार्गदर्शनानं चिंताग्रस्त झाला. तसा तो परत म्हणाला,
"बंधो, माझी राज्य करण्याची हिंमत होत नाही."
"ठीक आहे. असं जर आहे तर हा माझा आदेश समज. मग तर झालं."
भरत विचार करु लागला. परंतू त्याला काही सुचेना. तसा तो म्हणाला,
"ठीक आहे. असं जर आहे तर माझी एक अट आहे."
"कोणती अट आहे?"
"तुम्ही आपल्या पादूका मला द्याव्यात. जेणेकरुन त्या गादीवर ठेवून मला सुखानं राज्य करता येईल."
भरतानं बोललेले शब्द. तसा राम विचारात पडला. तसा तो म्हणाला,
"ठीक आहे. पण पादूका! मला मातेनं अनवाणी पायानंच यायला लावलं. मग मी पादूका कशा देवू?"
"बंधो, मीच त्यासाठी पादूका आणल्या. आपण यात पाय घालावेत व त्या मला परत कराव्यात. तुमच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या पादूका मी गादीवर ठेवेल व सुखानं आपली वाट पाहात पाहात चौदा वर्ष कापेल. आता या गोष्टीलाही नाही म्हणू नका."
राम परत विचार करु लागला. तसा म्हणाला,
"ठीक आहे. जशी तुझी इच्छा."
रामानं तसं म्हणताच भरतानं पादूका आणल्या. त्या रामानं पायात घातल्या. त्या पुन्हा काढून दिल्या. तसा जड अंतःकरणानं भरत त्या पादूका घेवून माघारी फिरला. परंतू आता त्याचे पाय चालत नव्हते. त्याचे मनात वाटत होते की आपणही लक्ष्मणासारखे रामासोबत वनवासात जावे. परंतू त्याचेसमोर उपाय नव्हता. कारण त्याचेसमोर रामाच्या अनुपस्थितीत संपूर्ण अयोध्येच्या संरक्षणाची जबाबदारी होती. जी जबाबदारी त्याला पार पाडायची होती. नव्हे तर रामाच्याच अनुपस्थितीत अयोध्यानगरी त्याचीच वाट पाहात होती. जणू चातकासारखी. तोही ग्रहण लागलेल्या सुर्यासारखा राज्य करणार होता. राम परत येईपर्यंत.......

****************************************

भरत रामाला भेटून आल्या पावली परत फिरला. तो अयोध्येत परत आला होता. पण तो राजगादीवर बसला नाही. त्यानं अयोध्या नगरीच्या बाहेर दूर अशा ठिकाणी एक कुटी बनवली. त्या कुटीमध्ये सिंहासन बनवलं. त्यावर पादूका ठेवून तो ब्रम्हचर्याचं पालन करीत राज्य करु लागला. दररोज तो त्या पादूकाला नमन करीत असे व राज्यकारभाराची सुरुवात करीत असे. जणू त्यानं प्रतिज्ञा घेतल्यागत तिथे त्याच्या पत्नीलाही प्रवेश नव्हता. तसेच त्यानं या काळात राजसी पोशाखही टाळला होता. नव्हे तर त्यानं मुनीवेष धारण केला होता. एवढंच नाहीतर तो कोणत्याही राजगादीवर वा सिंहासनावर घेवून निर्णय न घेता त्याच रामाच्या पादूकाच्या बाजूला एक लहानसं बसण्याचं आसन बनवून तो त्यावर बसून निर्णय घेत असे. जेवणही तो जमीनीवर बसून करीत असून ते जेवनही राजसी नव्हतं तर स्वतः वनात जावून कंदमुळं आणून तेच तो खात होता.
ते त्याचं रामप्रेम सा-या जगाला दिसत होतं नव्हे तर बंधूही असावा तर असा असं त्याच्याबाबतीत दिसत होतं.
सर्वात जास्त त्याग उर्मीलेचा होता. कारण उर्मीलानं अगदी तरुण वयात आपल्या नेत्रातून एकही अश्रू न टपकवता केवळ पतीच्या आज्ञेचं पालन करीत करीत दिवस काढले होते. कुणाला वाटत नाही की विवाहानंतर आपल्या पतीजवळ राहू नये. आजची मुलगी जर असती तर ती आपल्या पतीचं घर सोडून परपुरुषासोबत पळून गेली असती. परंतू उर्मीलेनं तसं काहीच केलं नाही.
लक्ष्मणाची स्तुती जितकी करावी तितकी कमीच होती. तो राजसी राजभोग टाळून तसेच आपली स्वतःची पत्नीही त्यागून निव्वळ बंधूप्रेमानं तो रामासोबत वनवासात गेला होता. हे जरी बरोबर असलं तरी भरतानंही रामासाठी दिलेलं योगदान काही कमी नाही. त्याने चौदा वर्ष कसे काढले असतील हे त्यालाच माहित. अतिशय सात्वीक दृष्टिकोणातून हे राज्य माझं नसून रामाचंच आहे असा विचार करीत करीत तो राज्य करीत राहिला.
अलिकडच्या काळात असं बंधूप्रेम कधीही पाहायला मिळत नाही. आज बंधूप्रेम महाग झालं आहे. बंधूप्रेमाला लोक पारखे झालेले आहेत. त्यातच रामायणाला लोकं थोतांड समजतात. ते तर घडलच नाही असंही मानणारी मंडळी आज आहेत. पण ते जरी खरं असलं आणि या महाकाव्याला आपण एक कथानक समजत असलो तरी त्यापासून आज आपण कसं वागावं यासाठी बोध घेता येण्यासारखं आहे.
राम वनात फिरत होता. वणवण भटकत होता. कंदमुळं खात होता. अशातच ते दंडकारण्य आलं. तसा त्याचे मनात विचार आला. आपण एखाद्या पाण्याची सोय असलेल्या जागेत एक कुटी बनवावी व तिथंच वास्तव्य करावं. त्यासाठी तो बेत त्यानं आपल्या प्रिय बंधूला म्हणजे लक्ष्मणाला सांगीतलं. त्यानुसार त्यांनी याच दंडकारण्यात एक कुटी बनवली व ते तिथं राहू लागले. तसेच आयुष्याची चौदा वर्ष कापू लागले.
काही दिवस बरे गेले. पुढे त्यांच्याही जीवनात वळण आलं. एके दिवशी रावण आला व त्यानं काही कारणास्तव सीतेला पळवून नेलं. त्यातच त्या सीतेचा शोध घेता घेता त्याची भेट सुग्रीवशी झाली. जो वानरवीर बालीचा भाऊ होता.
वानववीर सुग्रीव. सुग्रीव त्रस्त होता आपल्या भावाच्या अन्यायीपणानं. कारण बालीनं त्याची प्रेयसी हिरावून घेतली होती. तसेच बाली राज्यकारभार अन्यायग्रस्त करीत होता.
बालीला भरपूर ताकद होती. कारण त्यानं तपश्चर्या करुन एक वरदान प्राप्त केला होता. तो वर म्हणजे तो ज्याचेशी युद्ध करेल, त्याची अर्धी ताकद त्याला प्राप्त होत असे. त्यातच त्यानं मोठमोठे युद्धही जिंकले होते. त्यानं रामाचे पिता राजा दशरथाचा पराभव करुन त्याला बंदी बनवलं होतं. त्यातच त्यानं महाराणी कैकेयीवर नजर टाकली होती. एवढंच नाहीतर त्यानं दशरथाला बंदीतून सोडवितांना जबरदस्तीनं त्याचा मुकूट हिरावून घेतला होता नव्हे तर हस्तगत केला होता.
बालीनं निव्वळ राजा दशरथालाच जिंकून बंदी बनवलं नव्हतं तर त्यानं रावणाशीही युद्ध करुन त्यालाही बंदी बनवलं होतं. परंतू रावण छल करुन त्याच्या बंदीपाशातून निघून गेला होता आणि जातांना राजा दशरथाचा राजमुकूट अर्थात अयोध्येची शानही आपल्यासोबत घेवून गेला होता.
रामाची सुग्रीवाशी भेट होताच त्यानं आपल्या भावाबद्दलची कथना कथन केली. तो राज्यात कसा काय अराजकता पसरवतो हेही सांगीतलं. त्यातच रामाला साहजीक वाटलं की हीच योग्य वेळ आहे बदला घेण्याची. तो बदला नाहीतर आपल्या राज्याची गेलेली शान परत आणता येईल. आपल्या वडीलाचा राजमुकूट आपल्याला वानरवीर बालीच्या ताब्यातून मिळवता येईल. पण हे सहजासहजी शक्य नाही. वानरवीर बाली काही सहजासहजी तो मुकूट आपल्याला देणार नाही. त्यासाठी युद्ध करावं लागेल. बालीला ठार करावं लागेल. परंतू तेही शक्य नव्हतं. बालीला मिळालेल्या वरदानामुळं बालीला प्रतिस्पर्ध्याची अर्धी ताकद येत असल्यानं त्याचेशी प्रत्यक्ष युद्ध करणं सहज शक्य नव्हतं. त्यामुळं प्रतिस्पर्ध्यांची हार निश्चीत होती. तसं रामाला माहित होतं की अजेय असलेला रावण जिथे बालीला हरवू शकत नाही, तिथे त्याची काय मजाल. त्यालाही पराभव पत्करावाच लागेल, जर प्रत्यक्ष युद्ध झालंच तर........ तसं सुग्रीवालाही वाटत होतं की त्यानं राजा बनावं व कल्याणकारी राज्य करावं. तसं पाहता बालीला जरी तुफान ताकद असली तरी त्याच्या मनात आज त्या ताकदीचा गर्व निर्माण झाला होता. तो गर्वही नष्ट करणे आवश्यक होते.
सुग्रीवाची भेट होताच ठरल्याप्रमाणे त्यांनी बेत आखला. बेताची परीयोजना होती की आपण बालीला ठार करावं. पण प्रत्यक्ष नाही तर त्या बालीशी युद्ध सुग्रीवानं करावं. त्यातच कोण्या झाडाचा आधार घेवून रामानं लपून बसावं आणि पर्णझाडीतून बाण सोडावा, म्हणजे तो बाण बालीला लागेल व बाली ठार होईल. आपल्याला आपल्या पित्याचा राजमुकूट मिळेल अर्थात अयोध्या राज्याची शान परत मिळवता येईल. तसेच सुग्रीवाला राज्य. परंतू राम विचारी होता. तसेच हुशारही. तो ओळखून होता. रावण अजेय आहे. त्याला प्रत्यक्ष हारवणं कठीण आहे. त्यासाठी आपल्याला सुग्रीवाची मदत मागावी लागेल. त्याशिवाय आपली ताकद वाढणार नाही. त्यासाठी तसा करार केलेला बरा. असा विचार येताच राम म्हणाला,
"महाराज सुग्रीव, आपण जर उद्या क्रिष्किंधाचे राजे बनले तर आपल्याला माझी सीता मिळविण्यासाठी मला मदत करावी लागेल. जर आपण मला तशी मदत करीत असाल तर ठीक आहे. मीही आपल्याला वानवीर बालीच्या अत्याचारापासून मुक्त करायला मदत करतोय. जर माझी ही अट मान्य असेल तर मी पुढचं पाऊल टाकतो. त्याशिवाय नाही."
रामानं मनातलं बोलून टाकलं. त्यावर सुग्रीव विचार करु लागला. तसा तोही अस्वस्थच होता वानरवीर बालीच्या अत्याचारापासून. बालीनं सुग्रीव अनुजबंधू असूनही बराच त्रास दिला होता. त्याला त्या अत्याचारापासून पुर्णपणे मुक्त व्हायचं होतं. त्यामुळं त्यानंही होकार दिला व बेत ठरला.
बेताच्या निर्णयानुसार राम झाडाच्या गर्द पानाआड लपून बसला. तसा सुग्रीव बालीच्या राजगुफेजवळ आला. त्यानं बालीला युद्धाची चेतावणी दिली. त्यातच त्याला काहीबाही बोलून त्याला युद्धाला चेतविले. त्यातच बाली गुफेच्या बाहेर आला. दोघांचं घनघोर युद्ध झालं. बालीनं सुग्रीवाला कलाटणी देत खुप मारलं. कारण त्याची अर्धी ताकद बालीला आली होती. रामालाही सुग्रीव ओळखणे कठीण झाले. कारण दोघंही सारखेच वाटत होते. रामाच्या बाबतीत नेमका सुग्रीव कोण हे ओळखणे कठीण झाले होते. त्यातच समजा सुग्रीव मारला गेलाच तर विपरीत होईल. आपला उद्देश यशस्वी होणार नाही असं रामाला वाटलं व रामानं बाण चालवला नाही. तसा त्याचा सुग्रीवाला भयंकर राग आला. रामाच्या बाण न चालविल्यानं या युद्धात सुग्रीवाला पराभव पत्करावा लागला.
अतिशय लहूलुहान करीत अर्धमेलेल्या अवस्थेत सोडून बाली गुफेत निघून गेला. तोच झाडीत लपलेला राम धावतच त्याचेजवळ आला. तसा सुग्रीव म्हणाला,
"व्वा राम व्वा. तुम्ही आदर्श आहात. सत्यवीर आहात, हे बरेचदा ऐकलं. पण ते फोल ठरलं. तुम्ही सत्यवीर नाही. बरं झालं की मी आज वाचलो. नाहीतर माझ्या भावानं आज माझा प्राणच घेतला असता."
विचार करीत तत्क्षणी राम बोलला,
"मित्रा, मला माफ कर. माझी तुला ओळखण्यात भुलचूक झाली. तुमची दोघांची शरीरयष्टी एकच असल्यानं नेमका सुग्रीव कोण हे मला ओळखता आले नाही. आपण विवश होवू नका. पुढील वेळी आपण दुसरा बेत आखूया. जेणेकरुन तुम्हाला ओळखता येईल. आपण असे भावनातिरेकानं विव्हळ होवू नका. मी तुमच्या सोबतच आहे. तुम्ही स्वतःचा उपचार करा. लवकर लवकर दुरुस्त व्हा. मग आपण काय करायचं ते पाहू."
रामाच्या सांत्वनेनं सुग्रीवाला बळ आलं. तसा त्यानं स्वतःवर उपचार करवून घेतला. त्यातच लवकरच तो दुरुस्त झाला व तो पुढील युद्धासाठी सज्ज होवून युद्धाचा बेत आखू लागला. ते बालीसोबत पुन्हा सुग्रीवाचं द्वंद्व होणार होतं. त्यासाठी सुग्रीव सज्ज होता. बालीला केव्हा केव्हा ठार करतो असं त्याच्या मनात होवून गेलं होतं. तसा तो आज रामासोबत बसून योजना ठरवीत होता. तसा राम म्हणाला,
"सुग्रीवा, मागील वेळी तुला ओळखता आलं नाही. कोण सुग्रीव अन् कोण बाली असा भेदही करता आला नाही. यावेळी आपण असं करुया की तुला ओळखता येईल. तेव्हा असं सुचव की तुला ओळखणे सोपे जाईल."
सुग्रीव विचार करु लागला. परंतू त्याला काही सुचेना. रामालाही काही सुचेना. तेव्हा जांबवंत म्हणाला,
"महाराज सुग्रीव, तुम्हाला काही सुचत नसेल तर मी एक युक्ती सुचवू."
जांबवंत सुग्रीवाचा मंत्री होता. तोही अतिशय हूशार असून नावाजलेला मंत्री. सुग्रीवाच्या दरबारातील नवरत्नापैकी एक. तसा त्यानं सुग्रीवाला उपदेश देताच सुग्रीव बोलला,
"मग वेळ कशाची आहे. सांगा ना. कोणती युक्ती आहे ते?"
सुग्रीवानं तसं म्हणताच जांबवंत सांगू लागला.
"महाराज सुग्रीव, आपण गळ्यात एक मोठ्या फुलांचा हार घालावा. म्हणजे नक्कीच सुग्रीव कोण व बाली कोण हे रामाला ओळखता येईल."
युक्ती नामी होती. जांबवंताची युक्ती सर्वांनाच आवडली. तसं रामानंही त्यास दुजोरा देत म्हटलं,
"ठीक आहे.चांगली युक्ती आहे. आपण तसंच करुया."
योजना ठरली. त्या योजनेनुसार सुग्रीवानं पांढ-या फुलाचा हार गळ्यात घातला.तो पुन्हा बालीच्या गुफेजवळ आला व तिथं येवून त्याला युद्धासाठी आव्हान देवू लागला. त्याचवेळी रामही झाडाच्या आड जवळच लपून बसला.
ठरल्याप्रमाणं युद्धाचं आव्हान दिल्यानुसार वानरवीर बाली गुफेतून बाहेर आला. दोघांचंही घनघोर युद्ध झालं. आता नेमका सुग्रीव कोण व बाली कोण हे रामालाही ओळखता येत होते. त्यातच बाली सुग्रीवाला कलाटणी देवू लागला. तिच संधी पाहून रामानं तर्कशातून बाण काढला आणि तो बाण तुफान ताकदीनं बालीच्या दिशेनं सोडला. त्यातच तो बाण बालीला लागला व बाली क्षणार्धात कोसळला. तसा राम धावतच बालीजवळ आला. म्हणाला,
"बाली, मला माफ कर. मी काही तुझा वैरी नाही. मी दशरथ पुत्र राम आहे. मला तुझ्याकडून माझ्या वडीलाचा हिरावलेला सन्मान परत घ्यायचा होता. जे सहजासहजी शक्य नव्हते.म्हणून मी तुला ठार केले."
बालीला राम काय बोलत आहे. ते कळलं नाही. तसा तो म्हणाला,
"राम असं गोत्यात बोलू नकोस. तू वीर आहेस हे ऐकलं होतं. परंतू तू मला कपटानं मारलं. नियती तुला कधीच माफ करणार नाही. "
तसा राम म्हणाला,
"बाली तुझ्या ओठातून अशी भाषा शोभा देत नाही. तूही माझ्या पित्याला असं कपटानंच हारवलं आणि माझी माता कैकेयीवर अत्याचार केला. एवढंच नाहीतर तू माझ्या पित्याचा राजमुकूट आपल्या जवळ जबरदस्तीनं ठेवून घेतला. तसेच तू आपल्या भावाचीच पत्नी जबरदस्तीनं आपल्या जवळ ठेवून घेतलीय. ह्यात तू किती चांगला आहेस हे जगाला दिसतंय. परंतू आता मरतासमयी तुझ्याजवळ पुण्य कमवायची संधी आहे. तो राजमुकूट मला परत दे आणि स्वतःला मोहपाशातून व पापविनाशातून मुक्त करुन घे. यासाठीच मी तुझ्यावर बाण चालवला आहे. शिवाय माझी सीताही मला रावणापासून मिळवायची आहे. जी त्यानं कपटानं पळवून नेली आहे."
"अरे रामा, तू हे जर मला आधी सांगीतलं असतं तर मी एका झटक्यात तुला सीता मिळवून दिली असती. तसंही मला रावणाशी युद्ध करायचंच होतं. पण तशी संधी येत नव्हती. रामा, तू वेळ केलास. रावणानं जशी तुझी सीता पळवून नेली, तसा माझ्या अख्यत्यारीत असलेला तुझ्या पित्याचाही मुकूट त्यानं कपटानंच पळवून नेला. मी त्याला बंदी बनवले होते. परंतू तो छल करुन माझ्या तावडीतून निसटला व जातांना राजमुकूट नेला. आता तुला तो राजमुकूट रावणाचा पराभव करुनच परत मिळवावा लागेल."
राम काय समजायचं ते समजला.,थोड्याच वेळात बाली गतप्राण झाला. त्याचा अंत्यविधी सुग्रीवानं यथोचित संस्कार करुन उरकवून घेतला व तो आपल्या गुफेत परतून राज्यकारभाराची घडी व्यवस्थीत बसविण्यासाठी सज्ज झाला.

****************************************

आज एक वर्ष झाला होता. सुग्रीव विसरुन गेला होता की आपण रामाला काही वचन दिलं आहे. तो आपल्या राण्यांसोबत ऐषआरामात व्यस्त होता. त्याचं रामाकडं व रामाची सीता मिळवून देण्याकडं काहीच लक्ष नव्हतं.
सुग्रीव आपल्याला दिलेलं वचन विसरुन गेला आहे. ही गोष्ट रामाला समजली. लक्ष्मणाच्याही ते लक्षात आलं. त्यातच लक्ष्मण म्हणाला,
"दादा, सुग्रीव आपलं वचन विसरुन गेला आहे. त्याच्या हेही लक्ष्यात नसेल की आपण कोणाला वचन दिलं आहे. तो मस्त ऐषआराम भोगत आहे."
तसा राम म्हणाला,
"येईल आठवण कधीतरी. तेव्हा सुग्रीव स्वतःच येईल आपल्याकडे."
"नाही दादा, आपण हाच विचार करीत आलो आजवर. आज एक वर्ष उलटला. जर आपण आज त्याला टोकलं नाही तर उद्या तो आपल्याला मदत करणार नाही. आपण त्याला त्यानं दिलेल्या वचनाची आठवण करुन दिलीच पाहिजे नव्हे तर द्यायला हवी."
"ठीक आहे लक्ष्मणा, तुला जर तसं वाटते तर तू तसा निर्णय घे आणि जा त्याचेकडे. अन् विसरला असेल तर त्याला आठवण दे."
"ठीक आहे." लक्ष्मण म्हणाला व चालता झाला.
लक्ष्मण सुग्रीवाच्या गुफेत पोहोचला होता. त्यानं पाहिलं की सुग्रीव भोगविलासात दंग आहे. तो सिंहासनावर बसलेला असून त्याच्या पुढ्यात नाचगाणे सुरु आहेत. तसं पाहता तो आठवणही विसरला असेल रामाला दिलेल्या वचनाची असं वाटत होतं.
लक्ष्मणानं ते दृश्य पाहताबरोबर विचार केला की आपण सुग्रीवाला जाणीव द्यावी. तसा तो त्याला जाणीव देवू लागला. परंतू सुग्रीवाचं तिकडे लक्ष नव्हतं. तो आपल्याच मस्तीत गुल होता. तसा लक्ष्मणानं सुग्रीवाला उमग देण्यासाठी
सुग्रीवाला क्षती पोहोचणार नाही असा गुफेत बाण मारला. त्याचबरोबर सुग्रीव ऐषआरामातून जागा झाला. म्हणाला,
"लक्ष्मणा, ये. ये बैस. तूही मनोरंजनाचा आनंद घे."
तसा लक्ष्मण म्हणाला,
"महाराज सुग्रीव, मी मनोरंजनासाठी आलो नाही. मी तुम्हाला तुम्ही दिलेल्या वचनाची आठवण द्यायला आलोय. तुम्ही विसरलात की काय! आज एक वर्ष झाला आहे. माझे दादा आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी आपली चातकासारखी वाट पाहात आहेत. पण आपण त्या गोष्टीची आठवण न करता केवळ मनोरंजनात व्यस्त आहात. आठवलं का वचन?"
"हो, आठवलं लक्ष्मणा. तू जा. मी आलोच."
काही वेळानं लक्ष्मण निघून गेला. तसे काही दिवस निघून गेले. काही दिवस निघून जाताच एक दिवस सुग्रीव रामाला भेटायला आला. त्यातच तो विचारविमर्श करु लागला. आपल्या लाडक्या मित्राच्या पत्नीला रावणाच्या कैदेतून सोडविण्यासाठी नव्हेतर रावणाला अद्दल घडविण्यासाठी.
रामानं सुग्रीवाशी विचारविमर्श केला. त्यातच योजना आखली गेली. तसं सैन्यदळ सज्ज करुन महाराज सुग्रीवानं चारही दिशेला सैन्य पाठवले. त्यातच माहिती पडलं की सीता ही दक्षिण दिशेला आहे. त्यानुसार सीतेच्या शोधार्थ राम सुग्रीवासह दक्षिण दिशेला निघाला.
ते उंच उंच पर्वत रामाला आव्हान देत होते. तो सागरकिनाराही रामाला वाट मोकळी करुन देत नव्हता. कसा काय तो महोदधी पार करावा याची चिंता रामाला लागली होती. त्यातच ते सर्वजण विचार करु लागले.
ती वानरमंडळी.......त्यांना जंगलातील वस्तूंची खडान् खडा माहिती होती. त्यातच कोणते दगड पाण्यावर तरंगतात आणि कोणते नाही याचीही माहिती त्यांना होती. महोदधी पार करणे ही काही साधी सुधी गोष्ट नव्हती. राम काही देव नव्हता. तोही त्या वानरांसाठी साधारण व्यक्ती होता. परंतू त्या वानरजातीला राम त्यांच्यासाठी खास प्रतिनिधित्व करणारा आहे हे दाखविणे आवश्यक होते. त्यातच रामानं काही हूशार वानरांना सोबत घेवून सल्लामसलत केली. अशातच जांबवंत म्हणाला,
"आमच्या क्रिकिंधा वनात असाही एक भाग आहे की जेथील दगड पाण्यावर तरंगतात. आपण ते आणून पाण्यात एकमेकांवर ठेवून पुल बांधला तर........तर कदाचित आपण हा महोदधी पार करु शकू."
"योजना ठीक आहे. पण ते आणणार कोण?"
रामानं प्रश्न केला. तसा सुग्रीव बोलला,
"मित्रा, कोण म्हणजे? माझी वानरसेना आणेल."
"परंतू त्यात राम भरावा लागेल." जांबवंत म्हणाला.
"म्हणजे?" राम म्हणाला.
"त्या दगडाच्या तुकड्यावर राम लिहावं लागेल."
"याचा फायदा?"
"याचा फायदा असा की त्या वानरजातीला या राम नावामुळं शक्ती येईल."
"शक्ती! कशी काय?"
"शक्ती, महत्वाकांक्षेनं येईल शक्ती. त्यांच्यात आत्मविश्वास भरावा लागेल. म्हणावं लागेल की राम हा देव आहे. तेव्हाच ती मंडळी आत्मविश्वासानं काम करतील. ते एवढे काम करतील की त्या आत्मविश्वासानं त्यांना काम केल्यासारखंही वाटणार नाही. तसेच थकवाही जाणवणार नाही."
जाबवंत बोलून गेला. त्याचं म्हणणं रामाला पटलं. त्यानुसार ते कार्य करु लागले. साहजीकच राम नावानं त्या संपूर्ण वानरजातीत नवा उत्साह निर्माण झाला.हर एक दगड हलका वाटू लागला. तो पाण्यावर तरंगू लागल्यानं दगड पाण्यावर तरंगतो हे माहित नसलेल्या वानरांना ते आश्चर्य वाटू लागलं. त्यातच रामाचं कार्य केल्यानं शक्ती येते अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली. नवउत्साहाचं वातावरण निर्माण झालं. त्याचा उपयोग असा झाला की ती वानरजात राम राम करु लागले. राम नाम जपू लागले. हा एकंदर राम नामाचा नाहीतर आत्मविश्वासाचा परीणाम होता.
संपूर्ण सेतू बांधला गेला होता. त्या सेतूला नावंही दिलं गेलं होतं. त्यातच त्या सेतूवरुन ती वानरसेना आज लंकेत पोहोचली होती. त्यातच एक शेवटची संधी म्हणून रामानं लंकेच्या रावणाकडं दूत पाठवला. तसा दूत रावणाकडं गेला व संधीच्या गोष्टी करु लागला.
राम वनात गेला होता. तसा लक्ष्मणही रामासोबत वनात गेला होता. त्यातच त्यानं उर्मीलेला म्हटल्यानुसार उर्मीला राजवाड्यात थांबली होती. ती दुःखी होती.
उर्मीला दुःखी आहे हे पाहून राजा जनक दुःखी होत होता. त्यातच सुनयनाही. उर्मीला दुःखी आहे हे पाहून तिचे मायबाप जनक व सुनयना तिला न्यायला अयोध्येला आले. त्यातच राजा जनक उर्मीलेला म्हणाला,
"उर्मीला, चल आपल्या माहेरी. काही दिवस राहा. तुला बरं वाटेल."
त्यावर उर्मीलानं नकार दिला. तिनं माहेरी जाण्याचं टाळलं. आपण अशा दुःखाच्या समयी आपल्या सासरच्यांना असं दुःखात सोडून जाणं तिला बरं वाटलं नाही. तिनं स्पष्ट नकार देताच तिचे मायबाप माघारी फिरले. आपल्या मुलीला दुःख सागरात लोटवून.
आज तिला लक्ष्मणाचे काही किस्से आठवत होते. ज्यावेळी लक्ष्मणाचा जन्म झाला. त्यावेळी तो ओरडत होता. त्याचं रडणं बंद होत नव्हतं. त्याला दूध पाजलं. पाळण्यात टाकलं. तरीही तो रडणं थांबवत नव्हता. अशातच त्याला रामाच्या बाजूला झोपवलं व त्याचा रडण्याचा आवाज बंद झाला. त्याचा अर्थ राजज्योतीषाला विचारण्यात आला. राजज्योतीषानं सांगीतलं की पुढे चालून लक्ष्मण रामाशिवाय राहू शकणार नाही. तो प्रसंगी आपली पत्नीही सोडून देईल.
आज तिला तेच आठवत होते. लक्ष्मण आज तिला सोडून फक्त रामासाठीच तिला सोडून गेला होता. त्यानं तिला आपल्या सोबत नेलं नव्हतं.
आपले दुःख आपल्या मनात घोळवत ठेवत उर्मीला जगत होती. त्यातच ती लक्ष्मणाच्या हिस्स्याची झोप घेत होती. तिला वाटत होते की लक्ष्मणाला झोप येवू नये. कारण लक्ष्मणाला झोप न आल्यास तो बरोबर आपल्या राम आणि सीतेवर लक्ष ठेवू शकेल. तसेच त्यांची सेवाही करु शकेल.
उर्मीलाला लक्ष्मणाच्या हिस्स्याची झोप घेण्यामागे दोन कारणं होती. पहिलं म्हणजे राम आणि सीतेची लक्ष्मणाकडून सेवा व्हावी व दुसरं म्हणजे मेघनाथचा वध करणे.
मेघनाथ हा रावणाचा जेष्ठ पुत्र होता. उर्मीला जाणून नव्हती की मेघनाथाचा वध तिच्यामुळं होणार. परंतू तरीही ती त्या गोष्टीसाठी लक्ष्मणाला सहकार्य करीत होती. आज तिच्याचमुळं मेघनाथ मारला जाणार होता.
रावणामध्ये अहंकार निर्माण झाला होता. तो अजेय असल्यानं त्याला अापल्या ताकदीवर विश्वास होता. अशातच रामाने पाठविलेला दूत त्याचेजवळ पोहोचला. त्यानं रामाचा संदेश त्यास ऐकवला. तसा तो म्हणाला,
"आमचा राम शुरवीर आहे. तो सहज तुम्हाला युद्धात जिंकू शकेल. परंतू त्यांची इच्छा आहे की युद्ध नको. युद्धानं हिंसाचार होतो. नाहकच निष्पाप जीवांचे बळी जातात. तेव्हा त्यांची इच्छा शिरोधार्य पकडून आपण ह्या निष्पाप जीवांच्या हत्येच्या पापाचे भागीदार न होता आपण संधी करावी आणि त्यांची सीता त्यांना परत द्यावी. तसेच त्यांच्या वडीलांचा राजमुकूटही. जर अशी संधी केली नाही तर युद्ध अटळ आहे."
रामाचा दूत म्हणून रावण दरबारी गेलेला अंगद. त्याला पाहताच आणि त्याचं कथन ऐकताच रावण म्हणाला,
"म्हणजे युद्धाच्या पुर्वी तुझ्या रामाला माझी भीती वाटली तर......."
तसा अंगद म्हणाला,
"तसं नाही महाराज."
"मग कसं? तो मृत्यूला घाबरतो की काय?"
"महाराज घाबरायचं असतं तर ते इथवर आलेच नसते. आता शेवटचं सांगतोय की आपण संधी करीत आहात की नाही."
"हे दूता, तू एक तुच्छ दूत आहेस, हे विसरु नकोस. आमच्या राज्यात दूताला तेवढा मान नसतोच. अन् जा आता ब-या बोलानं, अन् जावून सांग तुझ्या भेकड रामाला की रावण कधी कुणाशी संधी करीत नाही. युद्ध करतो युद्ध. समजलं."
"तर मग ठीक आहे. युद्ध तर युद्धच खरं. आमचं यात काही नुकसान नाही. नुकसान तुमचंच आहे. तरीही शेवटचं सांगतो. मी गेल्यानंतरही जर तुमच्या मनात संधी करायची इच्छाच झाली तर अवश्य सांगावं. राम तुम्हाला केव्हाही माफी द्यायला तयार आहे."
अंगद बोलला खरा. तसा तो तेथून निघाला. तसे दोन दिवस खाली गेले. राम वाट पाहू लागला. परंतू रावण काही संधी करायला आला नाही. ते पाहून शेवटी रामाला युद्धाचा शंखनाद करावा लागला. कारण नाईलाज होता. त्यातच त्याला सीता मिळवायची होती. त्याचबरोबर राजमुकूटही. जो दशरथाचा राजमुकूट आजही रावणाच्या ताब्यात होता.
रावण बाहेर येत नाही हे पाहून रामानं शंखनाद केला व त्यानुसार युद्ध सुरु झालं. त्यातच मोठमोठे वर प्राप्त असलेले रावणवंशीय लोकं मारले जावू लागले. तसेच मोठमोठे वर प्राप्त असलेले रावणाचे पुत्रही. त्यातच रावणाचा भाऊही धराशायी झाला होता. आता उरला होता मेघनाथ. जो रावणाचा जेष्ठ पुत्र होता. ज्याला एक वर प्राप्त झाला होता. तो म्हणजे जो व्यक्ती चौदा वर्ष कधीच झोपणार नाही. तोच व्यक्ती त्याला ठार करु शकेल. त्यातच मेघनाथला वाटलं होतं की असा कोणताच व्यक्ती नाही की जो चौदा वर्ष जागा राहू शकेल, पुरेशी झोप घेणार नाही.
****************************************

उर्मीला केवळ झोपेतच राहात होती. तिला आता त्या झोपेमुळं आपल्या सासूची सेवा करणेही कठीण जात होते. ती आपल्या सासरची सेवा करण्यासाठी आपल्या माहेरालाही गेली नव्हती. परंतू ती एक महत्वपूर्ण कार्य करीत होती. ती म्हणजे झोप घेणे. ती लक्ष्मणाच्या हिस्स्याची जी झोप घेत होती. त्याच झोपेमुळे आज लक्ष्मण जागा होता. तोही गत चौदा वर्षापासून. त्यामुळं मेघनाथला मिळालेला वर फोल ठरणार होता. कारण त्याला मिळालेल्या वरदानानुसार लक्ष्मण चौदा वर्षापासून कधीच झोपला नव्हता. हं, त्याला शक्ती नक्की लागली होती. परंतू तो बेशुद्ध होता त्यात. झोपला नव्हताच. आज उर्मीलामुळंच लक्ष्मण मेघनाथाला ठार करु शकणार होता.
मेघनाथाचं युद्ध हे खरं परीक्षात्मक युद्ध होतं. मेघनाथाला माहित नव्हतं की लक्ष्मण हा चौदा वर्ष झोपला नाही. त्यातच त्याला आपल्या शक्तीचा गर्वही झाला होता त्याच्याच वडीलाप्रमाणे. म्हणून की काय, तो अति अहंकारानं युद्ध करीत होता. शेवटी ती वेळ आलीच.
ती शेवटची वेळ. मेघनाथाला प्राप्त असलेला वर. जो व्यक्ती बारा वर्षापासून ब्रम्हचारी अाहे. अर्थात स्री मुखाकडे पाहणारा नाही. जो व्यक्ती बारा वर्षापासून जेवन केलं नाही. तसेच ज्या व्यक्तीनं बारा वर्षापासून झोपही घेतली नाही. असाच व्यक्ती मेघनाथाला ठार करणार होता.. त्याचे कारणही तसेच होते.
देवासूर संग्रामात देवराज इंद्रानं केलेली रावणाची नालस्ती. रावणाला इंद्रानं बंदी बनवलं होतं. त्यातच मेघनाथ आपल्या पित्याच्या मदतीला धावून आला.
रावणाला आपल्या पुत्रावर गर्व होता. कारण मेघनाथानंही आपल्या पित्यासारखीच तपश्चर्या केली होती. त्याचेजवळही मायावी शक्ती होती. त्यातच अशी मायावी शक्ती की जी देवांनाही परास्त करेल. त्याचबरोबर ब्रम्हास्र, नारायणास्र व पशुपतीनास्र देखील त्याचेजवळ होते. त्यामुळं त्यानं इंद्रावर विजय मिळवला व त्याला लंकेत आणलं.
इंद्रावरचा राग पाहून रावण व मेघनाथानं त्याला ठार करण्याची योजना बनवली. तसे ते त्याला मारणार. तोच ब्रम्हदेव त्याच्या मदतीला. धावून आले. त्यांनी इंद्राला रावणाच्या कैदेतून सोडवलं. एवढंच नाही तर त्याला इंद्रजीत ही उपाधीही दिली. त्यातच त्याला अमरत्वाचा वरही दिला. जो कोणी बारा वर्षपर्यंत ब्रम्हचारी असेल, जो कोणी बारा वर्षपर्यंत जेवणार नाही.. जो कोणी बारा वर्षपर्यंत झोपणार नाही. तोच मारणार. तसेच हेही सांगीतलं होतं की देवी निकुंबरा हिची युद्धवेळी पुजा करावी लागेल, ती यज्ञपुजा सिद्ध झाल्यास देवी निकुंबरा त्याला दिव्य रथ देईल. तो रथ जेव्हापर्यंत त्याचेजवळ असेल, तेव्हापर्यंत मेघनाथाला मरण नव्हतं. परंतू हेही सांगीतलं होतं की जो कोणी अशी निकुंबरा देवीची पुजा करतांना विघ्न आणत असेल व ही पुजा धुळीस मिळवत असेल, त्यापासून सावध राहावं. कारण असाच व्यक्ती त्याच्या मृत्यूचं कारण बनेल.
मेघनाथाला वाटलं की जगात बारा वर्ष न झोपणारा, बारा वर्ष न जेवणारा व बारा वर्ष न जेवणारा कोणताच व्यक्ती राहू शकत नाही. त्यातच तो बारा वर्षपर्यंत न झोपणार, न जेवणारा व स्री मुखाकडे न पाहणारा व्यक्ती जरी निर्माण झाला. तरीही निकुंबरा देवीची पुजा तो निरर्थक करु शकणार नाही. त्यामुळं आपण अमरच आहो आणि अमरच राहूही शकणार. म्हणून तो लक्ष्मणच नाही तर कोणालाही घाबरत नव्हता.
मेघनाथ शक्तीनं काही कमजोर नव्हता. प्रसंगी रावण पहिल्या दिवशीच्या युद्धात रामाकडून परास्त झाला. परंतू मेघनाथ नाही.. रावण इंद्राकडून परास्त झाला. पण मेघनाथ नाही.ज्यावेळी पहिल्या दिवसाचं युद्ध झालं, त्यावेळी मेघनाथानं नागफाशानं लक्ष्मणाला बंदी बनवलं. त्यात लक्ष्मण बेशुद्ध पडला. त्यावेळी हनुमानानं गरुडाला आणून त्या नागपाशातून लक्ष्मणाला सोडवलं. दुस-या दिवशी लक्ष्मणाला शक्ती लागली. त्यातूनही हनूमानानं वाचवलं. त्यातच तिस-या दिवशीचं युद्ध झालं. त्या दिवशीच्या युद्धात जर लक्ष्मणानं निकुंबरा देवीच्या पुजेचा यज्ञ धुळीस मिळवला नसता तर कदाचित चित्र वेगळं असतं. कदाचित लक्ष्मणही मेघनाथाला परास्त करु शकला नसता. तसं मेघनाथाला वाटलं होतं की जगातील कोणताच व्यक्ती स्रीच्या चेह-याकडे न पाहणारा सापडणार नाही. परंतू लक्ष्मणानं आपली पत्नीच नाही तर सीताकडेही पाहिलं नव्हतं. अगस्त. ऋषीनं ही गोष्ट जेव्हा रामाला सांगीतली. तेव्हा रामानं लक्ष्मणाला असं कसं घडलं याबाबत विचारलं. तू तर सीताकडे पाहातच असशील ना. हेही विचारलं. त्यावर लक्ष्मण म्हणाला,
"बंधू, मी फक्त माता सीतेचे पाय पाहिले. चेहरा पाहिला नाही. आपण जेव्हा दंडकारण्यात सीतामाईचा शोध घेतांना विचारलं होतं की लक्ष्मणा हे दागीणे सीतेचे आहेत का?तेव्हा मी त्या दागीण्यातून फक्त सीतामाईच्या पायातील दागीणे ओळखले. बाकीचे दागीणे ओळखू शकलो नाही." त्यातच सुरपंखेचं नाक कसं कापलं चेहरा न पाहता. हे रामानं विचारताच तो म्हणाला,
"बंधू, मी सुरपंखेच्या शरीरावर न पाहताच वार करणार होतो.. परंतू त्यात नाक कापलं गेलं. जर मी तिच्याकडे पाहून वार केला असता, तर मी नाक नाही, मानच कापली असती तिची." जेवणाबाबत विचारतांना लक्ष्मण म्हणाला,
"बंधू, आपण मी आणलेल्या कंदमुळाचे तीन भाग करायचे. आपण म्हणायचे की लक्ष्मणा, हे फळ घे. खा म्हणायचे नाही. मग मी आपल्या आज्ञेत असलेला व्यक्ती ती फळ कशी खाणार! ती मी तिथेच ठेवून द्यायचो. अशाप्रकारे मी चौदा वर्ष न जेवताच राहिलो. त्यातच झोपेबाबत रामानं विचारताच लक्ष्मण म्हणाला,
"बंधू मी निद्रादेवीला बाणानं बंदीस्त केलं होतं. ज्यादेवी निद्रादेवी यायची.. तेव्हा मी तिला पहारा देत असलेला दिसायचो. त्यामुळं ती जवळ येत नव्हती."
रामानं लक्ष्मणाचं ऐकलं. तो काय समजायचं ते समजला व निश्चींत झाला.
मेघनाथचा जन्म मुळात किस्सात्मक रितीनं झाला. रावण हा शुरवीर, पराक्रमी व अजेय होता. तसेच ज्योतीष विद्येतही पारंगत होता. रावणानं मेघनाथाला जेव्हा जन्माला घातलं. तेव्हा त्यानं सर्व ग्रहांना अकराव्या स्थानी आणून बसवलं होतं. फक्त शनी हा एकच ग्रह होता की जो बाराव्या स्थानावर विराजमान होता. हे जेव्हा रावणाला माहित झालं. तेव्हा त्यानं शनी ग्रहाला आपल्या पायदळी तुडवलं होतं. असे म्हटले जाते की ज्यावेळी मेघनाथचा जन्म झाला, त्यावेळी त्याच्या रडण्याचा आवाज हा वीज कडाडल्यासारखा होता.
विश्वविजय करुन रावण परत लंकेत आला होता.. त्याच्या चेह-यावर आनंदीआनंद होता. परंतू मंदोदरी उदास होती. तसं रावणानं मंदोदरीला विचारलं,
"महाराणीसाहेबा, आपल्या निराशेचं कारण मला समजू शकेल काय? मी अजेय, अमर. या जगात मला कोणी हरवू शकत नाही आणि तू निराश?"
त्यावर मंदोदरी म्हणाली,
"प्राणनाथ, अजूनही माझी आई रावणाच्या ताब्यात आहे. त्यामुळं आपल्या विश्वविजयाचा मला काय उपयोग?"
"ठीक आहे. मी ताबडतोब इंद्रनगरीवर आक्रमण करुन तुझ्या आईला परत आणतो."
रावणानं आपल्या पत्नीचं दुःख हेरलं व तिच्या प्रसन्नतेसाठी त्यानं भारी सैन्य घेवून देवतांवर आक्रमण केलं. यात भीषण युद्ध झालं व सरतेशेवटी इंद्रानं मंदोदरीची आई हेमाला मेघनाथाच्या हवाले केलं. यात इंद्रालाही मेघनाथानं कैद केलं होतं. त्यातच ब्रम्हाच्या कृपेनं इंद्र रावणाच्या कैदेतून सुटला.. परंतू या घटनेमुळे इंद्राचा जीव तिलमिला झाला. तो बदल्याची वाट पाहू लागला. त्यातच त्यानं विश्वामित्राला हाताशी धरुन योजना बनवली. विश्वामित्रानंही राम आणि लक्ष्मणाला त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं. त्यातच त्याची परीयंती म्हणून परीक्षा घेत असतांना राम द्वारा ताडकाचा वध केल्या गेला. इंद्राचा उद्देश होता की रावणाचा वध करणे, त्यातच वेळोवेळी इंद्र योजना बनवीत होता. त्यातच तो विश्वामित्रलाही हाताशी धरीत होता. हे रावणालाही माहित होते. परंतू रावण वरदान प्राप्तीनं अहंंकारी बनल्यानं त्याचा विनाश होणे अटळ होते. एवढंच नाही तर शेवटच्या वेळीही रामानं संधी करण्याचा प्रयत्न केला. परंतू रावण त्यावरही ऐकला नाही.
आज मेघनाथ मरण पावला होता. त्याचं मस्तक एका बाणानं लक्ष्मणानं छिन्नविछिन्न करुन टाकलं होतं. आज मेघनाथसोबतच्या युद्धाचा तिसरा दिवस होता.
आज मेघनाथाशी युद्ध करण्याचा तिसरा दिवस. लक्ष्मणाला विभीषणानं सांगीतलं की मेघनाथ अमर होवू पाहात आहे. तो ब्रम्हाच्या सुचनेनुसार निकुंबरा देवीचा यज्ञ करणार आहे. ज्यातून त्याला एक दिव्य रथ प्राप्त होईल. तो दिव्य रथ जोपर्यंत त्याचेजवळ असेल, तोपर्यंत त्याला मारणे कठीण होणार आहे. तेव्हा आपल्याला हा यज्ञ पूर्ण होण्यापुर्वीच तो विफल करावा लागेल. जेणेकरुन तो विफल होताच त्याला ठार करता येईल. तसंच विधीचं विधान आहे.
लक्ष्मणानं विभीषणाच्या बोलण्याकडं लक्ष देत तो यज्ञ विफल केला. त्यातच मेघनाथ चिडला व तो लक्ष्मणावर बाणावर बाण चालवू लागला. परंतू लक्ष्मणही काही कमजोर नव्हताच. तोही मेघनाथावर बाण चालवू लागला. परंतू त्याच्या बाणाचा मेघनाथावर काहीही परीणाम होत नव्हता. शेवटी लक्ष्मण चिडला व त्यानं बाणाला प्रतिज्ञेत गोवलं. जर मी सत्यानं वागलो असेल, जर मी मेघनाथाला मारण्यासाठी सक्षम असेल, जर मी माझ्या भावाशी प्रामाणीक पणानं वागलो असेल, जर माझ्या भावाचं चरीत्र निष्कलंक असेल आणि जर सीता माई माझ्या भावाला परत मिळवून द्यायची असेल तर या बाणानं मेघनाथाचं मस्तक कापले जाईल. त्याशिवाय हा बाण परत येवू नये.
तो बाण..........तो बाण अभिमंत्रीत केलेला. त्यातच तो बाण मेघनाथाच्या दिशेनं गेला. त्या बाणासमोर मेघनाथाचं काहीही चाललं नाही. अशातच त्या बाणानं मेघनाथाचं मस्तक भेदलं. ते मस्तक धडापासून वेगळं केलं. त्यातच मेघनाथ मरण पावला. ज्यावेळी मेघनाथ मरण पावला, तेव्हा लक्ष्मणालाही अतीव दुःख झालं होतं. कारण तो रावणापेक्षाही पराक्रमी वीर होता नव्हे तर ज्याप्रमाणे लक्ष्मण रामभक्त होता. रामाची आज्ञा पाळत होता. त्याचप्रमाणे मेघनाथही पित्याच्या आज्ञेत होता. तोही आपल्या पित्याची आज्ञा पाळत असून पितृभक्त होता.
मेघनाथाचा अंत्यसंस्कारविधी पार पडला. रावण तो देह पाहून फार विचलीत झाला होता. त्याला काय करावं आणि काय नको असं होवून गेलं होतं. त्याला आता युद्धाचं महत्व लक्षात आलं होतं. खरंच आपण रामासोबत संधी करायला हवी होती असं त्याला वाटत होतं. पण आता वेळ गेली होती. त्यातच आता रावणानं ठरवलं, 'आपण असं जगण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य संपविलेलं बरं.' तसं पाहता तो युद्धासाठी तयार झाला.

****************************************

रावण युद्धभुमीवर आला होता. आज त्याची युद्ध करण्याची इच्छा नव्हती. परंतू औपचारीकता म्हणून युद्ध करणं भाग होतं. त्यासाठीच तो आज हिमतीनं युद्धभुमीवर आला होता.. तसा त्यानं युद्धाचा शंखनाद केला. म्हणाला,
"रामा, तू माझे प्रिय पुत्र मारले म्हणून माझा धीर खचला असं समजू नकोस. आजही मी तसाच उभा आहे युद्धासाठी अगदी ताजातवाना होवून. हे वनवास्या तुझी लायकी नाही मला मारायची. हं, एक सल्ला आहे की तू माघार घेवू शकतोस. हा रावण तुला माफ करुन टाकेल."
तसा राम म्हणाला,
"अरे रावणा, तू मला काय समजवतोस. तूलाच मी एक पाऊल मागे सरकण्याची संधी देत आहे. हवं तर तू एक पाऊल मागं घे. मी तुला आजही माफ करेल."
"हे भेकड रामा, तूझ्या वाणीतून वाटते की तू अति घाबरला आहेस. हवं तर संधी कर आणि सुखानंं जा अयोध्येला."
"संधीची आवश्यकता तुलाच आहे. ,अरे रावणा, माझी सीता व माझ्या वडीलाचा राजमुकूट मला दे आणि पुन्हा या लंकेचं राज्य कर."
रामानं दिलेला सल्ला रावणाला आवडला नाही. तसा रावण म्हणाला,
''रामा तू असा ऐकणारा वाटत नाही. तूझ्याशी युद्ध करुन तुला धुळीस मिळवणं आज गरज झाली आहे. तेव्हा तू सावधान हो आणि युद्धासाठी तयार हो."
रावणानं सावधान म्हटलं व तो युद्धासाठी तयार झाला. त्याचबरोबर रामही युद्ध करायला तयार झाला. तसं दोघात घनघोर युद्ध झालं.
रावणाला नाभीत बाण लागला होता. तसा रावण मरण पावणार होता. त्यातच रावण आता मृत्यूसय्येवर होता.
रावण मृत्यूसय्येवर जरी असला तरी तो आपल्या पत्नीवर निरतिशय प्रेम करीत होता. त्यानं यापुर्वीही आपल्या पत्नीच्या इच्छेनं आपल्या पुत्राकरवी इंद्रनगरीवर आक्रमण केलं होतं. त्यातच इंद्रनगरीतून मंदोदरीच्या आईला परत आणलं होतं. आज त्याला मृत्यूसय्येवर असतांना वाटत होतं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या पत्नीचं कसं होणार. तिचे हालहाल होणार. तसा तो विचार करीत होता. तसे रामासह पूर्ण त्याचा आप्तपरीवार त्याचेजवळ बसला होता. तसा रावण मृत्यूसय्येवर असतांना बोलत होता. मार्गदर्शनही करीत होता.
रावण लक्ष्मणाला म्हणाला,
"लक्ष्मणा कधीही आपल्या माणसावर विश्वास ठेवू नये. तेच आपल्याला धोका देतात."
तसा तो रामाला म्हणाला,
"हे राम, मी माझं भाग्य समजतो की मला तुझ्या हातून मरण आलं. आता तू या राज्यातून आपल्या पित्याचा राजमुकूट घेवून जा व सीतेलाही घेवून जा. सीतेवर लांच्छन लावू नकोस. सीता पवित्र आहे."
रामाशी बोलणे झाल्यानंतर त्यानं आपला मोर्चा विभीषणाकडं वळवला. म्हणाला,
"हे विभीषणा, तू माझ्या मृत्यूपरांत माझ्या पत्नीशी विवाह करावा आणि तिला लंकेची महाराणी बनवून ठेवावं."
त्याच्या मोठ्या भावाने त्याला उपदेश देताच विभीषण बोलला,
"बंधू, आपली आज्ञा शिरोधार्य आहे. हे राज्य माझं नाही. हे आपलंच आहे. मी आपल्याच नावाने राज्य करेल. तसेचब मी मंदोदरीची इच्छा असेल तर तिच्याशी विवाह करेल, त्यासाठी तिची इच्छा असायला हवी."
विभीषणाचं बोलणं होताच रावण मंदोदरीला म्हणाला,
"मंदोदरी, माझ्या प्रिय महाराणी, मी आता जगणार नाही. मी आता लवकरच मरणार. तेव्हा माझी तुला विनंती आहे की तू माझे मरणोपरांत माझे अनुज बंंधू विभीषणाशी विवाह कर व या लंकेची महाराणी बनून राहा."
मंदोदरीनं मानेनच होकार दिला. तशी ती आपल्या पतीच्या मृत्यूसय्येवर रडतच होती. तिला हो म्हणणंही आवडत नव्हतं. पण ती मजबूर होती आपल्या पतीच्या इच्छेपुढं. तशी तिला महाराणी ताराची आठवण झाली. जी बालीची पत्नी होती. तिनंही महाराज बालीच्या इच्छेनुसार बालीच्या मरणोपरांत महाराज सुग्रीवाशी विवाह केला होता.
काही क्षण रावण जीवंत राहिला. पण लवकरच तो मरण पावला. त्याचे मरणानंतर महाराणी मंदेदरीनं रावणाच्या इच्छेनुसार त्याचे लहान बंधू विभीषणाशी विवाह केला व लंकेची महाराणी बनून सुखानं संसार केला.
आज मंदोदरीचा विभीषणाशी विवाह झाला असला आणि ती लंकेची महाराणी बनली तरी खुश नव्हतीच. जेव्हा जेव्हा तिला एकांतवास मिळत असे. तेव्हा तेव्हा ती आपला पुर्व पती रावणाची आठवण काढून रडत असे. तेव्हा पाठीमागून विभीषण येत असे आणि तो तिच्या खांद्यावर हात ठेवीत असे. तसे पानावलेले डोळे पुसून ती विभीषणाकडे पाहात असे. तसा विभीषणही अश्रूभरल्याच डोळ्यानं तिचे अश्रू पुसत असे नव्हे तर तिला समजावीत असे. म्हणत असे, 'महाराणीसाहेबा, आपण आता लंकेच्या महाराणी आहात.' त्या प्रेमळ बोलण्यानं चिरतरुणता आल्यासारखी मंदोदरी हळूच ती रावणाची आठवण विसरुन विभीषणासोबत चालत असे. मनात भविष्याचे अनंत विचार करीत.

***********************************************

मेघनाथ मरण पावला होता. तसा रावणही. तशी ती बातमी पंचक्रोशीत पोहोचली. तशी ती उर्मीलेजवळही. दूत सांगत होता की लक्ष्मणानं मेघनाथाला ठार केलं. तशी उर्मीला मनोमन खुश झाली. तिला हायसं वाटलं. त्यातच त्या दूतानं सांगीतलं,
"महाराणी साहेबा, हे सगळं आपल्यामुळं घडलं."
तशी उर्मीला म्हणाली,
"ते कसे काय?"
"म्हणतात की मेघनाथाला तोच व्यक्ती मारणार होता, जो बारा वर्ष झोपला नाही, जो बारा वर्षपर्यंत ब्रम्हचारी होता, ज्यानं बारा वर्ष जेवणही केलं नाही. आपल्या लक्ष्मणानं हे सगळं केलं."
"म्हणजे?"
"म्हणजे महाराज लक्ष्मण बारा वर्ष झोपले नाही. बारा वर्ष जेवले नाही अन् बारा वर्षपर्यंत कोणत्याही स्रीचं मुखंही पाहिलं नाही. म्हणतात की हे सर्व तुमच्यामुळंच साध्य झालं."
"अर्थात?"
"म्हणतात की आपण महाराज लक्ष्मणाच्या हिस्स्याची झोप घेतलीय. म्हणून महाराज लक्ष्मणाला बारा वर्ष न झोपता जागता आलं."
दूत बोलला खरा. त्यानंतर तो निघून गेला. तशी उर्मीला विचार करु लागली.

**********************************************

उर्मीलाला दूत गेल्यावर आनंद झाला खरा. पण ती तिच्या पुर्वाश्रमीच्या आयुष्यावर चिंतन करु लागली.
'माझी बहिण सीता दुःखी आहे. पण मी तरी या चौदा वर्षात कोणतं सुख भोगलं. मला तर एकएक दिवस कठीण जात होता. काय करावं सुचत नव्हतं. त्यावेळी वाटत होतं की मी कशी जगेन. पण जगले माझ्या सासरच्या या लोकांच्या प्रेमानं. मी दुःख सहन केलं. पतीविरहाचं. तरुण असूनही पतीचा विरह आला माझ्या जीवनात. पण मीच या काळात दुःखी होते असे नाही तर माझी बहिण मांडवीही दुःखी होती. बिचारीचा पती होता तिच्या नजरेसमोर. फक्त नजरेसमोर. तो तिच्याजवळ नव्हता. तिची अवस्था तर एखाद्या म्हाता-या वारुसारखीच होती. चने होते पण दात......... दात नाही अशासारखी. ती एका साध्वी रुपानं या राजप्रासादात राहिली. वचनासूर माझे भासरे अयोध्येत नाही तर नंदीग्रामला राहिलेेत आणि मांडवी श्रीरामाच्या सन्मानार्थ अयोध्येत. अयोध्येत राहून आपल्या पतीच्या प्रत्येक कार्यात समर्थन दिलं तिनं. अगदी ब्रम्हचर्य तत्वाचं पालन करीत. तिला तसं वागतांना कसं वाटत असेल. अन् ती श्रुतकिर्ती. तिही आपला स्वार्थ न पाहता आपल्या पतीच्या आज्ञेनं परीवाराची सेवा करीत राहिली. तिनं त्या कैकेयीची सेवा केली. जिनं राम अन् सीताला चौदा वर्षाचा वनवास दिला. त्यावेळी तिला तिची सेवा करतांना कसं वाटत असेल.
उर्मीला ज्याप्रमाणे महाराणी कैकेयीबाबत विचार करीत होती. तशी मंथराबाबतही. मंंथरा अशी स्री होती राजप्रासादातील की जिच्यामुळं रामाला कैकेयीनं चौदा वर्षाचं वनवास दिला होता.
बृहद्शव........ राजा अश्वपतीचा भाऊ होता. त्याला रेखा नावाची मुलगी होती. ही रेखा पाहायला खुुप सुंदर होती.
रेखा जशी पाहायला सुंदर होती. तसं तिला तिच्या सौंदर्याबद्दल अहंकारही होता. परंतू अहंकार जास्त दिवस चालत नाही. तशी रेखाची अवस्था झाली. तिला काळाच्या ओघात असाध्य रोगानं घेरलं. त्यातच औषध घेता घेता तिच्या शरीराच्या तीनही भागाच्या नसा बंद झाल्या. त्यातून रक्तप्रवाह बंद झाल्याने ख्याल अवयवाची वाढ खुंटली व ती कुबडी झाली. ती कुबडी होताच तिचं नाव मंथरा ठेवण्यात आलं.
रेखा ही कैकेयीची केवळ चुलत बहिणच नाही तर एक चांगली मैत्रीण होती. ती कुबडी जरी झाली असली तरीस कैकेयीचं तिच्यावरील प्रेम काही कमी झालं नाही. त्यावेळी कैकेयीचा विवाह राजा दशरथाबरोबर व्हायचाच होता. पण जेव्हा विवाह झाला. तेव्हा कैकेयीनं मंथराला आपल्यासोबत अयोध्येत आणलं. तिनं तिला दासी मानलं नाही वा तिला दासीसारखी वागणूक दिली नाही.,एक मैत्रीण म्हणून तिचं ती ऐकत गेली. त्यातच कोणताही विचार न करता तिच्या सल्ल्यानं वागत गेली.
आज रामाला चौदा वर्ष वनवास देण्यामागे तिचाच हात होता. ती जरी कुबडी असली तरी तिचे विचार चांगले होते. तिलाही माहित होतं की दशरथ बाली युद्धात राजा दशरथाचा मुकूट बालीनं जबरदस्तीनं हिरावून नेलाय. तो मुकूट राज्याची शान आहे. तो मुकूट परत यावा आणि तो रामच आणू शकतो असं तिला माहित असल्यानं तिनं त्या वनवासाचा काय परीणाम होईल याचा विचार न करता रामाला वनवासाला पाठविण्यासाठी कैकेयीला प्रेरीत केलं व कैकेयीनं दशरथाला. म्हणूनच राम चौदा वर्ष वनवासात गेला. तिला असंही वाटत होतं की राम क्रिंष्किंधाला जाईल व बालीचा वध करेल. पण झालं उलटंच. राजमुकूट बालीकडून रावणानं नेला असल्यानं तसेच रावणानं सीताही पळवून नेली असल्यानं पुढं राम रावण युद्ध घडलं. त्यातच माझी सासू सुमित्रा. बिचारीनं आपला पुत्रविरह सहन केला. मी आपला पती जरी सोडला असला तरी माझ्या सासूनं सहन केलेला पुत्रविरह हा वाखाणण्याजोगा आहे. जेव्हा लक्ष्मणजी वनात गेले असेल, तेव्हा तिला कसं वाटलं असेल. त्यातच माझी मोठी सासू कौशल्या. तिचा तर पोटचा जीव अन् सुन वनात गेली. तिनं दुःख कसं सहन केलं असेल. शिवाय कैकेयी. जिनं मंथरासोबत मिळून जिनं रामाला वनवास तर दिला. परंतू त्यानंतरचं प्रेम पाहून तिला कसं वाटलं असेल.
उर्मीला विचार करीत होती, त्या राजघराण्यातील सर्व स्रीयांबाबत. तशी ती विचार करता करता सोचून गेली की माझ्याहीपेक्षा या राजघराण्यात दुःखी लोकं आहेत. मी एकटीच दुःखी नाही.

*********************************************

उर्मीलेनं केलेला विचार हा रास्त जरी असला तरी त्या विचारांना उर्मीला मुर्त रुप देत होती. आज अयोध्येत बाकीच्यांनी जेवढं सहन केलं होतं. त्यासारखंच दुःख उर्मीलानंही सहन केलं होतं. ती जर नसती तर मेघनाथ मारला गेला नसता अन् मेघनाथ जर मारला गेला नसता तर रावणावर विजय मिळवणंही अशक्य होतं. आज रामानं रावणावर विजय मिळवला होता. त्याचं जास्त श्रेय उर्मीलाला जात होतं.
आज राम परत येणार होता लंकेतून. लंकेत त्यानं आपल्या उपस्थीतीत विभीषण व मंदोदरीचा विवाह (पाट) लावून दिला होता. त्यातच विभीषणाला राजगादीवर बसवून तो अयोध्येत परतला होता. तशी अयोध्या जवळ आली. त्यातच तो थेट अयोध्येत न येता काही मैलाच्या अंतरावर थांबला. त्यानं हनूमानाजनळ पुरता निरोप पाठवला की श्रीराम अयोध्येत आले आहेत.
श्रीरामाचे नाव ऐकताच सारी अयोध्या नगरी हर्षोल्लीत झाली. त्याच्या चौदा वर्षाच्या वनवासातून परतताच त्यांनी आपल्या घराची सजावट करवून घेतली. दिव्याची आरास लावली. रांगोळ्या घातल्या. आरत्या सजवल्या. त्यातच वाद्ये वाजविणे सुरु केले. त्यातच त्या वाद्याचा गजर चारी दिशात घुमला. चारही दिशेला लामणदिवे लावले गेले. रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या.
हनुमानाचा निरोप ऐकताच राम अयोध्येची वाट चालू लागला. त्यातच त्याच्या कानावर दुरुनच मंगलवाद्य्याचा गजर पडला. काही अंतर चालू लागताच ती दिव्याची रोशनाई त्यांना दिसली. त्यातच रांगोळ्या आणि त्या फुलपाकळ्या. आज अयोध्या नगरी अगदी दैदिप्यमान वाटत होती.
राम परत आला होता. त्यातच सर्व अयोध्या नगरी उत्साहित झाली. लोकांनी अयोध्या सजवली नव्हे तर अयोध्येत दिवाळी साजरी झाली. त्यातच रामाचा सत्कारही झाला. तसं सुमंतनं चौदा वर्षाचा रामाचा वनवास संपला असं जाहिर केलं. तशी रात्र होत आली.
रात्रीचा तो प्रहर......उर्मीलेलाही आनंद झाला होता. तिचा पती रामासोबत अयोध्येत आला आहे हे ही तिला माहित झालं होतं. त्याला भेटण्याचीही तीव्र इच्छा तिच्या मनात होती. परंतू एक मन म्हणत होतं, 'उर्मीले तू भेटायला जावू नकोस. तो येईल तुला भेटायला उतावीळपणानं. वाट पाहा.'
उर्मीला लक्ष्मणाची वाट पाहातच होती. एवढ्यात लक्ष्मण कक्षात टपकला.
हडकुळा झालेला चेहरा. गाल आतमध्ये गेलेले. मास हाडाला चिकटलेलं. वेडावाकडा चेहरा झालेला. अगदी कुपोषीत असलेला लक्ष्मण. तो प्रत्यक्षात उर्मीलासमोर आला. तशी उर्मीला घाबरली. म्हणाली,
"कोण आहात. बाहेर व्हा."
लक्ष्मण.........उर्मीलेनं त्याला गत चौदा वर्षापासून पाहिलं नव्हतं. त्यातच लक्ष्मणानं चौदा वर्षपर्यंत ना झोप घेतली होती, ना अन्न ग्रहण केलं होतं. त्यामुळं त्याचा चेहरा हडकुळा होणारच. शेवटी ती त्याचा अक्राळविक्राळ चेहरा पाहून घाबरली. तसा लक्ष्मण म्हणाला,
"मी लक्ष्मण. तू मला ओळखलं नाहीस?"
"तुम्ही लक्ष्मण. लक्ष्मण आहात तुम्ही. पण तूम्ही एवढे बारीक कसे?" उर्मीला म्हणाली.
उर्मीलेनं लक्ष्मणाला तरुणपणातच पाहिलं होतं. त्यावेळी तो हट्टाकट्टा होता. अंगकाठीही जाडसरच होती. परंतू आता चौदावर्षानंतर जेवन न केल्यानं अंगकाठीत फरक पडला होता. तसा लक्ष्मण म्हणाला,
"अगं, मी लक्ष्मणच. चौदा वर्ष वनवास भोगला. काही खाल्लं पिल्लं नाही. झोप नाही. सतत युद्ध केलं. मग बारीक होणार नाही तर काय? मी लक्ष्मणच आहे तुझा."
त्या लक्ष्मणानं ओळख दाखवताच तिनं त्याच्या गालाला हात लावला. हातानं पूर्ण चेहरा न्याहाळला. तसं तिनं त्याला ओळखलं व घट्ट मिठी मारली. त्यानंही तिला घट्ट पकडून घेतलं. तसे तिच्या डोळ्यातून आज ते दुःखाश्रू झरझर निघू लागले. तसा लक्ष्मण म्हणाला,
"प्रिये, रडू नकोस. मी आलो आहे ना आता."
"नाथ, आता असं बोलू नका. मला आज मुक्तपणे रडू द्या. नाथ, मी आजपर्यंत तुम्हाला दिलेल्या वचनानुसार कधीच रडली नाही. आता रडावसं वाटतं."
ती मनसोक्त रडत होती. लक्ष्मणानंही तिला मुक्तपणे रडू दिलं. तिला अडवलं नाही. ती आज मनसोक्त रडली होती.
रात्र झाली होती. तसं जेवन झालं व ते दोघंही त्या चांदण्या रात्री बाहेर फिरायला गेले. चांदण्या पाहू लागले. तशी उर्मीला म्हणाली,
"नाथ, माहित आहे, कधीकधी मी एकटी या ता-यांकडे पाहात असे. त्यात तुम्हाला शोधत असे. पण तुम्ही दिसत नव्हते मला. माहित आहे. मी या चौदा वर्षातील एकएक दिवस कसा काढलाय तो. बाकीच्यांचे पती तरी त्यांच्याजवळ होते आणि मी अभागी. माझा पती कोसो दूर. तो राम सीताची सेवा करीत होता. मला हे चौदा वर्ष कापणे किती कठीण झाले होते माहित आहे!"
"आणि मलाही तुझी आठवण येत होती चौदाही साल. तू तर झोपून आपलं दुःख कमी करु शकली. पण मी तर तेही करु शकत नव्हतो. कारण मी निद्रा देवीला माझ्या बाणानं बंधमुक्त केलं होतं. मी तर जागलो चौदा वर्ष अहोरात्र. राम अन् सीतामाईची सेवा करीत. तुझी आठवण काढत काढत जगलो चौदा वर्ष."
"बरं, ते जावू द्या. थकले असाल. चौदा वर्षाचा प्रवास केलाय तुम्ही. चला आता झोपूया."
तसा लक्ष्मणही माघारी फिरला. ते राजप्रासादात आले व अंथरुणावर पहूडले. तसं पाहता पहूडताक्षणी झोप कशी लागली ते कळलंच नाही. कारण निद्रादेवी त्याच प्रसंगाची जणू वाट पाहात होती.

**********************************************

उर्मीला लक्ष्मणाची पत्नी नसती, तर तिचं दुर्लक्षित होणं स्वीकारार्ह झालं असतं कदाचित. श्रावणबाळाच्या आई-वडिलांनी दशरथ राजाला दिलेला शापही, त्याला कल्याणकारी ठरेल असाच होता. एवढं एकच उदाहरण हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. याच आदर्श मापदंडात बसण्यासाठी मग उर्मिलेला आदर्श विरहिणीच्या रूपात त्यांनी उभी केली. विशेष असं की वाल्मीकी रामायणाचा अभ्यास करताना एकदा उर्मीलेला विरहिणी ठरवल्यानंतर नंतरच्या संपूर्ण रामकथेमध्ये वाल्मीकींनी उर्मीलेकडं पूर्णपणे दुर्लक्षच केलेलं दिसतं. राम-सीता, लक्ष्मण-उर्मिला, भरत-मांडवी, शत्रुघ्न-श्रुतकीर्ती यांची लग्नं झाली. सगळी जणं अयोध्येला परतली. कौतुकसोहळे सुरू झाले, संपले आणि रामाच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली.
मंथरेच्या सततच्या सांगण्यावरुन कैकयीनं दशरथ राजाकडे भूतकाळात दिलेले दोन वर पूर्ण करण्याचा हट्ट केला आणि रामाला वनवासात पाठवायचं ठरलं. आनंदाचा माहोल दु:खात बदलला. आदर्श पुत्राच्या संकेतानुसार रामाने पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानली. आदर्श पत्नीत्वाच्या संकेतानुसार सीतेनं रामासोबत वनवासात जायचं ठरवलं आणि आदर्श बंधुत्वाच्या संकेतानुसार लक्ष्मणानंही रामासोबत वनवासात जायचं निश्चित केलं. या ठिकाणीच एकच विचार मनात येतो, की बंधुप्रेम किंवा बंधुप्रेमाचा आदर्श निर्माण करण्याच्या नादात इथं लक्ष्मण, आपल्याला एक नवपरिणीत पत्नी आहे आणि तिच्या प्रती आपलंही काही कर्तव्य आहे हे विसरला. आता हे लक्ष्मण विसरला, म्हणजे लक्ष्मण स्वत: विसरला नाही, तर बंधूप्रेमाची आड आलं. विशेष म्हणजे रामाचा सीतेसह आणि लक्ष्मणाला सोबत घेऊन वनवासात जाण्याचा प्रसंग. पण उर्मीला सहन करीत होती. उर्मीलेच्या वाट्याला आलेली ही इतकी प्रचंड उपेक्षा ना लक्ष्मणाच्या लक्षात आली, ना रामाच्या, ना सीतेच्या आणि ना कौसल्येच्या वा सुमित्रेच्या. राम वनवासाला जाणार असं एकदा समजल्यावर त्याच्यासोबत जाण्यासाठी सीतेनं रामाशी केलेला संवाद, आपलं त्याच्यासोबत जाणं कसं संयुक्तीक आहे, हे दाखविणारं तिचं संभाषण कौशल्य, तिनं केलेला प्रचंड हट्ट, रामाची आज्ञा पाळण्यासाठी दिलेला साफ नकार, क्वचित रामाची केलेली निर्भर्त्सना, तो एकटा वनात गेला तर प्राणत्याग करण्याची दिलेली धमकी आणि त्यानंतर रामानं तिला सोबत नेण्यासाठी दिलेला होकार. या ठिकाणीही एक प्रश्न असा उभा राहतो की, प्रत्यक्षात राजकन्या नसतानाही ज्या आत्मविश्वासाने सीता रामाजवळ आपली बाजू मांडते, तो आत्मविश्वास प्रत्यक्ष पोटची पोर असूनही जनकाने उर्मीलेला दिला नव्हता का? अशी शंका यावी इतपत उर्मीला लक्ष्मणाने वनात जाण्याच्या प्रसंगाबद्दल मौन राखून होती. एक वेळ मान्य की, रामासोबत आयुष्यभर त्याचा पाठीराखा बंधू म्हणून राहण्याचा लक्ष्मणाचा निश्चय होता आणि त्या निश्चयाच्या पूर्तीसाठी त्यानं रामासोबत वनात जायचं ठरवलं आणि याबद्दल उर्मीलेला काही विचारायची किंवा सांगायचीही त्याला गरज वाटली नाही. पण उर्मीलेचं काय? आपल्या वैवाहिक आयुष्यात एवढी मोठी उलथापालथ होते आहे, हे बघूनसुद्धा उर्मीलेनं त्याबद्दल चकार शब्द काढला नाही. सीता रामाला जेव्हा आपल्याला वनात नेण्याबाबत वाद घालत होती, तेव्हा तिच्या तोंडी एक श्लोक आहे- पतिहना तु या नारी न सा शक्ष्यति जीवितुम्।
काम मेनं विद्यं राम त्वया मम निदर्शित म् ।। (अयोध्याकाल, सर्ग - २९, श्लोक-७)
या श्लोकाचा अर्थ असा, की सीता श्रीरामाला म्हणते- हे श्रीरामा आपल्या पतीशी वियोग झाल्यावर कोणतीही पतिव्रता स्त्री जीवित राहू शकत नाही, ही बाब आपणच माझ्या निदर्शनास आणून दिली आहे. मग आता या श्लोकाचा वदतो व्याघात असा समजायचा का की पतीपासून वियोग झाल्यावरही जी स्त्री जिवंत राहते ती पतिव्रता नाही आणि हाच संकेत जर ग्राह्य धरला, तर उर्मीलेचं काय? ती पतिव्रता नव्हती? एखाद्या नवपरिणीत वधुनं आपल्या तारुण्याची १४ वर्षं पतीचा वियोग सोसत विरहात काढायची ही कल्पनेपेक्षाही भयंकर गोष्ट आहे.
लक्ष्मण रामासोबत वनात निघाला तेव्हा 'मी पण तुमच्या सोबत येते' असा उर्मिलेनं हट्ट धरला नसेल? वाल्मीकींची प्रतिभा याबद्दल कोणतंच विधान करत नाही. पण प्रक्षेपीत रामायणं असं सांगतं की उर्मीलेनं येण्याचा हट्ट केल्यावर लक्ष्मणानं तिला 'तू सुनेच्या धर्माचे पालन करत, सासू-सासऱ्यांची सेवा करत इथंच राहा' असं सांगितलं आणि उर्मीला नाईलाजानं तिथंच राहिली. लक्ष्मणाचा विरह सोसत आणि उपेक्षीत म्हणून जगत राहिली. आदर्श विरहिणीचं जीवन व्यतीत करत राहिली. याला लक्ष्मणाच्या आदर्श बंधुत्वाचा चमत्कार की उर्मीलेच्या उपेक्षित नशिबाचा साक्षात्कार म्हणावा तेच कळत नाही.
***********************************************

रामायणात रामाला विष्णूचा सातवा अवतार मानला जातो, लक्ष्मणाला शेषाचा अवतार तसेच भरत.....जो चौदा वर्षपर्यंत संन्यास घेवूनच राज्य सांभाळलं, तो सुदर्शन चक्राचा व शत्रुघ्न हा शंखाचा अवतार मानला जातो. परंतू त्यांच्याबाबत सांगायचं झाल्यास त्यांना अवतारी पुरुष समजण्याऐवजी त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टीकडे पाहावे.
वनवासाची शिक्षा होताच रामानं सुरुवातीला तमसा नदी ओलांडली. त्यानंतर गंगा नदी. याच ठिकाणी शृंगवेरपूर आहे.. तिथे निषादराज गुहाचे राज्य होते. गंगा नदी ओलांडल्यावर सिंगरौरला आले. त्या ठिकाणची नदी पार केल्यानंतर ते कुरई नावाच्या गावात थांबले. कुरईतून प्रयागला म्हणजे अलाहाबादला गेले. या ठिकाणी गंगा यमुनाचे संगम होते. त्यानंतर यमुना पार करुन ते चित्रकुटला पोहोचले. याच चित्रकुटला राम भरत भेट झाली. पुढं ते सतना इथे अत्री ऋषीच्या आश्रमात राहिले. त्यानंतर ते मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या जंगलात काही काळ राहिले. या भागालाच दंडकारण्य म्हणत. इथे ते चौदा वर्षापैकी दहा वर्ष राहिले.
दंडकारण्यातून राम अमरकंटक व जबलपूरला गेले. याच ठिकाणी सीताकुंड आहे. इथे सीता अंघोळ करीत होती असं म्हटलं जातं. हे शहर गोदावरी नदीकाठी आहे. पुढे याच भागात जटायू व रावणाचं युद्ध झालं असं म्हटलं जातं. त्या जटायूचे अवयव दंडकारण्यात पडले होते असंही मानलं जातं. त्यानंतर ते अनेक सरोवरे पार करुन अगष्ट ऋषीच्या आश्रमात आले. जे नाशिकजवळ आहे. या ठिकाणी अगष्ट मुनींनी काही शस्रेसुद्धा भेट दिली. नाशिकमध्ये गोदावरी तटावर पाच वृक्ष आहेत. याला पंचवटी देखील म्हणतात. येथे राम लक्ष्मणाने खर दुषणला ठार केलं. मारीचचाही वध याच आश्रमाजवळ झाला. तसेच शुरपंखाचे नाक इथेच कटले असं मानलं जातं. नाशिकापासून छप्पन किमी अंतरावर जटायूचं स्मारक आहे. याच भागात लक्ष्मणानं लक्ष्मण रेषा आखली होती.
आंध्रप्रदेशातील खम्माम जिल्ल्ह्यातील भद्राचलम येथे रावणाने सीतेला पुष्पक विमानात बसवले. त्याला सीताहरण स्थळ असं नाव दिलं आहे. त्यानंतर तृंगभद्रा व कावेरी पार करुन राम सीतेच्या शोधार्थ निघाले. त्यानंतर राम कबंध त्यांच्या भेटीसाठी ऋष्यमुक पर्वतावर गेले. त्यानंतर पंपा नदीजवळ शबरीच्या आश्रमात गेले. हा प्रदेश केरळमध्ये आहे.पंपा नदीवर आता हंपी शहर वसले आहे. या हंपी शहराला पुर्वी किष्किंधा म्हणत असत. त्यातच श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमुक पर्वतावर सुग्रीव व हनुममानाची भेट घेण्यासाठी गेले. या ठिकाणी एक नदी आहे. या नदीला चक्रतीर्थ म्हणतात. याच ठिकाणावरुन वालीचा वध करुन राम लंकेकडे रवाना झाले.
पुढे अनेक वने पार करुन राम समुद्रकिनारी आले. या ठिकाणावर म्हणजे तामिळनाडूतील कोडीकरई येथे श्रीरामानं वानर सैन्याला एकत्र केलं. या ठिकाणाहून समुद्र ओलांडणे कठीण असल्याचे लक्षात येताच ते रामेश्वरमला आले. या ठिकाणी समुद्र शांत असल्याने समुद्रावर पुल बांधणे शक्य होते. त्यामुळं या ठिकाणी असलेल्या धनुष्यकोडीवरुन पुल बांधण्यास सुरुवात केली. या ठिकाणाहून समुद्राची खोली लहान असून समुद्राचा तळ दिसतो.
रावणाचा महाल हा श्रीलंकेच्या मध्यावर होता. नुवारा एलीया पर्वतापासून नव्वद किमी अंतरावर बांद्रवेलाजवळ मध्य श्रीलंकेतील उंच पर्वतामध्ये अनेक भुयारे व गुहा आहेत. याच ठिकाणी रावण फाल, रावण गुहा, अशोक वाटिका, विभाषणाचा महाल आहे. त्यातच सीतेला कैद केलेला कोब्रा हूड केव्ह नावाचा परीसर आहे.
रावणाच्या मृत्यूनंतर केलानिया इथे विभीषणाचा राज्यभिषेक झाला. याच ठिकाणी असलेल्या केलनी नदीवर विभीषणाचा महाल आहे. तसेच सीतेची अग्नीपरीक्षा रामानं दिवूरुंपौला इथे घेतली. ती जागा आताही अस्तित्वात आहे. वर उल्लेखीत सर्व स्थळे आजही अस्तित्वात असून त्या ठिकाणी रामायणातील वेगवेगळे अवशेष आढळतात. यावरुन राम कालखंड अस्तित्वात होता हे सिद्ध होते. म्हणून रामायणाला थोतांड म्हणता येणे शक्य नाही. हं एक म्हणू शकतो की रामकालखंडातील पात्र हे अवतारी होते. राम विष्णूचा सातवा अवतार होते हे म्हणणे आपण आपल्या तर्कानं खोटं ठरवू शकतो. कारण आत्मा जन्म घेतो की नाही ते आपल्याला म्हणता येत नाही. तसेच आत्मा आहे की नाही तेही मानता येत नाही. तसेच आत्मा कोणीही पाहिलेला नाही. त्यामुळं राम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नला अवतारी पुरुष मानू शकत नाही. खरं तर राम कालखंड हा संशोधनात्मक पद्धतीचा असून पुल बांधण्याचं पहिलं संशोधन त्याच काळात झालं असं नक्कीच म्हणता येईल. त्यातच एकंदर सांगायचं झाल्यास त्या काळात झालेले नल व नील हे खरे संशोधक होते असं म्हणायला काहीही हरकत नसावी.
रामाला एक बहिणही होती. तिचं नाव शांता होतं. एकदा अंग देशाचा राजा रोमपद व राणी वर्षीणी अयोध्येत आले. त्यांना मुलबाळ नव्हते. त्यातच त्यांनी राजा दशरथाला तिला दत्तक देण्याविषयी विनंती केली. त्यातच राजा दशरथाने तिला त्या रोमपद राजाला दत्तक दिले. त्यांनी तिचा उत्तमप्रकारे सांभाळ केला. त्यातच जेव्हा दुस-यांदा सीता वनात गेली. तेव्हा त्याचा दोष रामावर लावून शांता रागे भरली होती. ह्या शांतेचं मंदिर हिमाचल प्रदेशात कुल्लूजवळ आहे. म्हणतात की राजा रोमपदाची पत्नी महाराणी वर्षीनी ही दशरथ पत्नी महाराणी कौशल्याची बहिण होती. ते एकदा अयोध्येत आले. त्यांना पुत्र नसल्यानं ते फार दुःखी वाटत होते. त्यांचं दुःख पाहावल्या जात नव्हतं. त्यामुळं कौशल्यानं आपली मुलगी त्यांना दत्तक दिली. तसेच असेही म्हणतात की राम हा झोपेत असतांना अर्ध्या रात्रीच उठायचा. त्यानंतर तो खुप रडायचा. तो रडणं थांबवायचा नाही. त्यातच कौशल्या सुमित्रेला म्हणायची,
"सुमित्रा याला चूप कर. हा तुझ्याच्यानंच चूप बसतो."
तेव्हा सुमित्रा स्वतः रामाला उचलून घेवून आपल्या सोबत न्यायची. आपल्या कुशीत झोपवायची. त्यातच राम अगदी चुप होवून शांतपणे झोपी जायचा.
शांतेचा विवाह हा ऋष्यशृंगशी झाला होता. त्याला श्रृंगी ऋषी म्हणत. ज्याने राजा दशरथाच्या पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करुन दिला होता.
श्रृंगी ऋषी हा विभाण्डक ऋषीचा मुलगा होता. तसेच कश्यपाचा नातू. त्याच्या माथ्यावर सींगासारखं उभार असल्यानं त्याला श्रृंगी नाव दिलं गेलं होतं. पुढे या ऋषीशी शांता विवाहबद्ध झाल्यानंतर शांता पुढे अंगदेशाची महाराणी बनली.
ऋषश्रृंग विभाण्डक तथा स्वर्गअप्सरा उर्वशी यांचा पुत्र होता. ऋषश्रृंगला जन्म देताच उर्वशीचं पृथ्वीवरील कार्य संपलं व ती स्वर्गात गेली. या घटनेमुळं विभाण्डक एवढे भडकले की ते स्री जातीशी घृणा करु लागले. त्यातच आपल्या मुलावर कोणत्याही स्रीची सावली पडू नये, यासाठी ते जपू लागले. त्यातच ते त्यासाठी आपल्या मुलाचं पालनपोषण अरण्यात करु लागले.
ते अरण्य अंगदेशाला लागून होतं. त्यातच ते तपही करु लागले. त्या तपाच्या सामर्थ्यानेच की काय, अंगदेशात कोरडा दुष्काळ पडला. पाऊस येईना. त्यातच त्यानं आपल्या देशातील राजज्योतीषांना त्याबद्दल विचारलं. तेव्हा माहित झालं की त्यासाठी ऋष्यश्रृंगला आपल्या देशात आणावं लागेल. त्याशिवाय हा दुष्काळ नष्ट करता येणार नाही. त्यातच अंगदेशाचा राजा रोमपद याने देवदास्यांची मदत घेतली.
रोमपद राजा तसेच वर्षीनीच्या विनंतीवरुन ऋष्यश्रृंग मुनी अंगदेशला आले. त्यांचं या देशात भव्यदिव्य स्वागतही झालं. त्यातच खुश होवून तसेच विभाण्डकच्या क्रोधावर विजय मिळविण्यासाठी राजा रोमपद याने ताबडतोब आपली मुलगी शांता ऋष्यश्रृंगला सोपवली व त्याचेशी विवाह लावून दिला. तिचाच शाप राजा दशरथाला लागला व त्यालाही बरेच दिवस झाले पुत्र प्राप्ती झाली नाही.
*****************************

राम एक व्यक्ती होता. त्यानं चांगलं काम केलं. त्यातच जी मंडळी सामान्य लोकांना त्रास देत होती. अशांचा बंदोबस्त लावला. कालांतरानं काही लोकांनी रामाला देव मानलं. जरी तो एक व्यक्ती असला तरी, त्यामुळंच त्यांचं माणूसपण संपलं. त्यातच काही लोकांनी रामालाही दुषणे लावणं सुरु केलं नव्हे तर रामायण घडलंच नाही, ते थोतांड आहे असंही मानलं. मुळात रामाला कोणी जरी पाहिलं नसेल तरी राम या भुमीवर झाला नाही असं म्हणता येत नाही. तो झाला. त्याचं अस्तित्वही आहे. पण जो मानत असेल त्यांच्यासाठी. मुळात राम झाला. रामायणंही घडलं. हे निर्विवाद सत्य आहे. ज्यांना तसं ठरवायचे मानायचे नसेल तर नका मानू. तसेच रामानं अमुक केलं, तमुक केलं असं म्हणण्याऐवजी आपण काय करतो ते पाहावं. कारण एक बोट दुस-यांना दाखवणं सोपं आहे. मात्र चार बोटं आपल्याकडं असतात ते कोणीही पाहात नाही. म्हणून मला म्हणावेसे वाटते की रामाला निदान एक देव म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून पाहावे. त्यावेळी रामाकडून घडल्याही असतील काही गोष्टी वाईट. परंतू त्या घटना त्या काळानुसार बरोबर होत्या. वाईट नव्हत्याच. हेही त्या काळानुसार सत्य आहे. तसंच उर्मीला बाबत सांगायचं झाल्यास उर्मीलाचा त्याग वाखाणण्याजोगा होता. ती उपेक्षीत राहिली वर्चस्वाच्या लिखानातून. कारण या वर्चस्वानं रामकालखंडातील बाकी सर्व पात्रांना मोठं केलं. पण उर्मीलेला तसंच ठेवलं गेलं. विशेष म्हणजे उर्मीला होती म्हणून अयोध्येचं वैभव अबाधीत राहिलं. तसेच राम सीतासह अयोध्येत दिवाळी साजरी करु शकला. हे चिरकाल अबाधीत सत्य आहे. आज उर्मीला जगात नसली तरी तिचा त्याग जगात आहे. लोकांना कालांतराने कळेल की उर्मीला जर नसती तर ना राम असता ना सीता असती, ना लक्ष्मण असता ना रामाला कोणी विचारणारे असते. खरं तर उर्मीलेमुळंच लंकेवर विजय मिळवता आला हे कोणालाही विसरता येत नाही. उर्मीलेचा त्याग हा कोणीही विसरून जावू नये.
उर्मीलेला नागदेवीचा अवतार मानण्यात येते. उर्मीला लक्ष्मणाच्या चौदा वर्षाच्या वनवासात एक दिवा अयोध्येतील राजवाड्यातील देवासमोर लावायची. तसेच पहिल्याही दिव्याला विझू द्यायची नाही. असा दिवा तिनं अखंड चौदा वर्ष लावला होता.
आज राम वनवासातून अयोध्येत आला होता. सारी प्रजा आनंदात होती.
वनवास पूर्णतः समाप्त झाला असला तरी काही लोकांच्या तक्रारीवरुन रामानं पुन्हा सीतेला वनवास दिला. त्यात त्या भयाण वनात सीता वाल्मीकी ऋषीच्या आश्रमात राहिली. तिनं लव व कुश अशा गोंडस बालकांना जन्म दिला होता.
उर्मीला मात्र राजमहालात राहिली. तिनंही दोन मुलांना जन्म दिला. एकाचं नाव अंगद व दुस-याचं नाव चंद्रकेतू होतं. मांडवीलाही दोन पुत्र झालेत तक्ष आणि पुष्कर तसेच श्रुतकिर्तीलाही दोन पुत्र झाले. त्यांचं नाव शत्रुघती आणि सुबाहू होतं. त्यांना विदिशाचं राज्य मिळालं. लक्ष्मण आणि उर्मीलाच्या मुलांनी अंगदीयापुरी व चंद्रकांतापुरी राज्य वसवलं. तसेच कुशनेे कुशावती व लवने शरावती. तर तक्षने तक्षशिला व पुष्करने पुष्कर शहर वसवलं.
अयोध्या नगरीची स्थापना इक्वांशूनं केली होती. हा इंक्वांशू मनूचा पुत्र होता. ज्यानं मनुस्मृती लिहिली होती. जैन धर्मातील चोवीस तिर्थकारापैकी आदिनाथ हे अयोध्येलाच जन्मास आले. राज्य करण्यासाठी अयोध्येचे पाच भाग पाडण्यात आले. पुर्व कोसल, दक्षिण कोसल, उत्तर कोसल, पश्चिम कोसल व मध्य कोसल.
आज उर्मीला म्हातारी होत चालली होती. तिला मागील दिवसाच्या आठवणी आठवायच्या. तिला बरं वाटायचं नाही. त्यातच ती तिची बहिण सीताही आठवायची.
सीता पृथ्वीत सामावून गेली होती. तिला बरेच दिवस झाले होते. त्यातच उर्मीलाला तिच्या बहिणीवरील आपबीती आठवत होती.
सीतेवरील आपबीती जेव्हा तिला आठवायची, तेव्हा ती व्यथीत व्हायची. त्यातच तिला वाटायचं की आपलंही अस्तित्व संपावं.
ते लक्ष्मणानं सांगीतलेले वनवासाचे प्रसंग. त्यातच सीता माईला पुन्हा वनवास देत असतांना लक्ष्मणानं पुन्हा तो प्रसंग उर्मीलासमोर कथन केला होता. लक्ष्मणाचा मोठा भाऊ रामानं लोकांच्या म्हणण्यानुसार सीतेला परत वनवासात पाठवलं होतं. त्याची जबाबदारीही लक्ष्मणाला सोपवली होती. तेव्हा सीतेला वनात सोडायची इच्छा लक्ष्मणाची नव्हती. पण बंधूआज्ञा........अत्यंत धीरगंभीरतेनं व वेदनेनं त्यानं सीतेला वनात सोडलं. त्यातच तिला स्वतःची काळजी घ्यायला लावली. यात सीतेचे हालहाल झाले असेल, असंही उर्मीलेला वाटलं. त्यातच सीता पृथ्वीत सामावली गेल्यानं ती दिवसेंदिवस व्यथीत होत राहिली. अशातच तिची कांतीही त्याच काळजीनं सुकत गेली व एक दिवस तिनं खाणंपिणं सोडलं.
तिच्या खाण्यापिण्याची काळजी अख्ख्या अयोध्येला लागली. राजवैद्य उपचार करु लागले. पण उर्मीला प्रतिसाद देईना. त्यातच एक दिवस उर्मीला जगाचा निरोप घेवून चालती झाली. त्यानंतर तिची सासू कौशल्या. त्यानंतर लक्ष्मण अतिशय दुःखात राहात असे. त्याला करमत नव्हते. त्यातच हळूहळू तिच्या पाठोपाठच मांडवी व श्रुतकिर्तीही.
आता अयोध्येतील राजघराण्यात महिला नव्हत्या. सर्व राम वंशजांचे विवाह झाले होते. त्यातच भरत लक्ष्मण व शत्रूघ्नच्या पत्नीही इहलोकात गेल्या होत्या. सीतामाई तर केव्हाच पृथ्वीत सामावून गेली होती. त्यातच उरलेल्या राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्ननांना करमत नव्हतं. राजपरीवारातील त्यांच्या माताही जीवंत नव्हत्या.
लक्ष्मणाला उर्मीलेची आठवण येत होती. अशातच काळ आला. तो रामाला म्हणाला,
"मला तुझ्याशी बोलायचं आहे. जरा वेळ देशील का?"
रामानं होकार दिला. तसा काळ म्हणाला,
"मला कोणाचाही व्यत्यय नको. ज्या कोणानं आपल्याला व्यत्यय केल्यास त्याला दंड म्हणून मृत्युदंड द्यावा लागेल. जर ही अट मंजूर असेल तर मी चर्चेला तयार आहे."
रामानं विचार केला व तो त्या काळाची ती अट मान्य करण्यास तयार झाला. तशी चर्चा सुरु झाली. त्याचवेळी रामाच्या सर्वात विश्वासू असलेला लक्ष्मण पहारा देत होता. एवढ्यात महर्षी दुर्वास अयोध्येत दाखल झाले. त्यावेळी रामाचा सर्वात विश्वासू असलेला लक्ष्मण पहारा देत असलेला महर्षी दुर्वासानं पाहिलं. त्यातच त्यानं लक्ष्मणाला म्हटलं की त्याला प्रभू श्रीरामाला याचक्षणी भेटायचं आहे.
दुर्वास ऋषी शिघ्रकोपी होते. त्यांना नकार देणं तेवढं सोपं नव्हतं. त्यातच मृत्युदंडाची अट लक्ष्मणाला माहित होती. पण लक्ष्मण कर्तव्यपरायण होता. त्यातच लक्ष्मणानं ओळखलं की दुर्वासाला नकार देणं म्हणजे राज्यावर संकट आणणं होय. तेव्हा आपल्याला मृत्यू आला तरी चालेल. परंतू आपण राज्यावर संकट येवू द्यायचं नाही. शेवटी लक्ष्मण आत गेला. त्यातच काळाला बोलतांना व्यत्यय निर्माण झाला. त्यातच काळानं म्हटलं,
"वचनानुसार रामा राजधर्माचं पालन कर. तू लक्ष्मणाला मृत्युदंड दे."
लक्ष्मण रामाचा अति प्रिय अनुज. पण आता उपाय नव्हता. त्याला मृत्युदंड देणं भागच होतं. कारण तसं करणं म्हणजे राजधर्माचं पालन करणं होतं. शेवटी नाईलाजानं रामानं आपल्या ह्रृदयावर एक धैर्याचा दगड ठेवला व तो निर्णय द्यायला तयार झाला. म्हणाला,
"लक्ष्मणा, तू राजधर्माचं पालन केलं नाही. तेव्हा तूला मृत्युदंड देण्यात येत आहे. उद्या पहाटेला तुला शरयूमध्ये बुडून मरावं लागेल."
ठरल्याप्रमाणं दुसरा दिवस उजळला. तशी पहाट झाली व जड अंतःकरणानं रामानं लक्ष्मणाला पुरता निरोप दिला व लक्ष्मण क्षणातच शरयूच्या जलात समाधिष्ठ झाला.
लक्ष्मण मरुन गेला होता. भरत आणि शत्रुघ्न जीवंत होते. ते आपआपले राज्य सांभाळून होते. ते भेटीसाठी रामाकडे येत. हालहवाल विचारुन जात. परंतू जवळ राहात नसत.
ते हालहवाल विचारुन जात. रामाला जपत असत अगदी तळहातासारखं. तरीही रामाला करमत नसे. त्याला सीता आणि लक्ष्मणाची आठवण येत असे. त्यातच उर्मीलेचा त्याग आठवत असे. त्यातच त्यानं ठरवलं आपण सर्वांना मृत्युदंड द्यायचा अर्थात आपला या भुमीवरचा अवतार संपवायला लावायचा आणि कोणी संपवीत नसेल तर आपणच आपला अवतार संपवायचा. आपण शरयूमध्ये कायमची बुडी मारायची आणि या संसारचक्रातून स्वतःला मुक्त करवून घ्यायचं.
तसा रामानं मृत्यूचा दिवस ठरवला. त्यातच तो दिवस उजळला. रामानं ती सुचना पूर्ण राज्यभर पसरवली. तसे ते सर्वजण रामासोबत शरयू तटावर आले.
शरयू तटावर येताच रामानं पुजाविधी उरकवला व शरयूला नमन करीत म्हटलं,
"हे शरयू, मला तुझ्या कुशीत सामावून घे. तसेच माझ्या हातून काही नजरचुकीनं चुका झाल्या असतील कदाचित. त्याही माफ कर. तसेच जे जे माझ्यासोबत येतील, त्यांच्याही चुका क्षमा कर."
असं म्हणत तो शरयूत उतरला. त्यानं घट्ट डोळे लावले. तसा हात जोडून एक एक पाऊल तो पुढे टाकू लागला. त्यातच ते पाणी कमरेपर्यंत आलं. पुढं गळ्यापर्यंत आणि आता पूर्ण डोकं........ अशातच श्वास गुदमरला गेला. त्यातच राम शरयूमध्ये समाधिष्ठ झाला. त्याचबरोबर भरत आणि शत्रुघ्नही. तसेच इतर अयोध्येतील प्रजाननही.
आज राम जगात नव्हता. पण त्यानं इतरांना दिलेले मृत्युदंड आजही आठवत होते. ताडका, बाली, कुंभकर्ण, रावण आणि शेकडो राक्षसांना दिलेले मृत्युदंड. तसेच लक्ष्मण ालाही दिलेला मृत्युदंड आठवत होता. त्यातच आठवत होते सीतेचे पृथ्वीमध्ये झालेले समायोजन. फक्त उर्मीला,, मांडवी श्रुतकिर्तीचा व शत्रुघ्नचा लोकांना विसर पडला होता. परंतू तोही काळाच्या ओघात आठवत होता मृत्यूदंडाच्याच रुपानं. ते मृत्युदंड नव्हते तर मृत्यू आणि दंड होते. प्रत्येकवेळी रामानं मृत्यूसाठी वेगवेगळे मापदंड वापरले होते.

****************************************
उर्मीला एक अयोध्येतील सेवाकर्ती होती नव्हेतर ती राज्यभक्त. राज्य वाचविण्यासाठी तिनं आपल्या स्वसुखाचा त्याग केला होता. वाटल्यास ती वनात सीता आणि राम लक्ष्मणासोबत जावू शकली असती. परंतू तिला वाटत होतं की राज्यातील माता कौशल्या व माता सुमित्रा ह्या आपल्या जाण्यासोबत अकालीच निधन पावतील. याच परीमर्षानं ती राज्यातच राहिली. कोणी तिला कैकेयीची जोडीदार समजत असत. हिनवत असत. परंतू त्याची तिनं तमा बाळगली नाही. लवलेशही केला नाही. बाऊही केला नाही.
आज उर्मीला जगात नव्हती. तिला काळ विसरला होता. परंतू काळानं पुन्हा रामकालखंडाचं परीक्षण केलं व उर्मीलेला सीतेसोबतच महान ठरवलं. रामानंं केलेली पतीव्रतेची व्याख्या फोल ठरवली. त्यातच जगानं उर्मीलेलाही पतीव्रता ठरवलं. ती होती म्हणून रावण युद्ध जिंकता आलं. ती जर नसती तर रावण युद्ध जिंकताच आलं नसतं. आज ती जगात जरी नसली तरी तिनं केलेला तारुण्याचा त्याग विसरता येत नाही. आजही ती जगाच्या इतिहासात अगदी ठामपणे उभी आहे आणि जगाला संदेश देत आहे की पतीव्रता स्रीचं खरं दैवत सासच असतं. माहेर नाही. मग कितीही संकट आले तरी. आजची उर्मीला जर राहिली असती तर जसं राम कालखंडात घडलं. तसं जर घडलं असतं तर त्या सासरच्याच लोकांना सोडून गेली असती. कायमची. चौदा वर्ष वाट पाहात बसली नसती आतूरतेने लक्ष्मण येण्याची.