Sujata in Marathi Mythological Stories by Ankush Shingade books and stories PDF | सुजाता

Featured Books
  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

Categories
Share

सुजाता

मनोगत

'सुजाता' नावाची कादंबरी वाचकांच्या हाती देतांना अत्यंत आनंद प्राप्त होता आहे. कारण सुजाता ही कादंबरी नाही एक मार्गदर्शन आहे. ते एक व्यक्तीचित्रण नाही तर ते परीवर्तन आहे.
सुजाता लिहिण्यामागची माझी भुमिका थोडक्यात सांगतो. त्यात दोन कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की मी गौतम बुद्ध चरीत्र वाचले. त्यात सुजाताचा उल्लेखही होता. परंतू तो उल्लेख पाहिजे त्या प्रमाणात नव्हता. त्यातच इतरांनी सुजाता नावाची पुस्तक लिहिली की नाही ते मला माहित नाही. परंतू मला वाटते की तिच्यावर वैयक्तीक पुस्तक लिहिलं नसेल. म्हणून मी तिच्यावर वैयक्तीपणे लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यात ब-याच गोष्टी वास्तविक आहेत. त्यात काही काल्पनिकही भाग टाकला. त्याबद्दल क्षमस्व. दुसरं कारण म्हणजे गौतम बुद्धाचं चरित्र वाचतांना सुजाता ही त्याची प्रेरणा वाटली. कारण तिनं जर त्याला उपवासाच्या एकोणपन्नासव्या दिवशी खीर चारली नसती, नव्हे तर गौतमाला जबरदस्तीनं खीर चारली नसती, तर गौतम बुद्ध ज्ञानप्राप्ती होण्यापुर्वीच मृत्यूच्या समीप गेले असते व जगाला बुद्ध दिसलाच नसता. गौतम बुद्धाच्या चरीत्रावरुन सांगतो की तिनं बुद्धाला म्हटलं, 'भगवन, आपण असाच उपवास करुन तपश्चर्या केली आणि निर्वाणगतीस प्राप्त झाले तर आपल्याला बोध झालेले तत्वज्ञान जगाला कळणार नाही. त्यासाठी आपल्याला जगायलाच हवं. आपल्याला प्राप्त होणारं ज्ञान जेवढं महत्वाचं आहे. तेवढंच आपलं जगणंही महत्वाचं आहे. कृपया आपण खीर खावून घ्यावी.'
सुजाताचं बोलणं हे तथागतासाठी मार्गदर्शन ठरलं. त्यांनी एकोणपन्नास दिवसाचा उपवास सोडला व त्याला ख-या अर्थानं तेथूनच मध्यममार्ग समजला.
विशेष म्हणजे सिद्धार्थाचे गौतम बुद्ध बनलेही असतील, परंतू त्यासाठी सुजाताचे योगदान काही कमी नाही. तीचं सुसंपन्न घराणं. अल्लड असणारा तिचा स्वभाव. परंतू ज्याप्रमाणे सुजातानं सिद्धार्थाचं आयुष्य फुलवलं. तसंच आयुष्य सिद्धार्थानंही सुजाताचं फुलवलं. त्यातच सुजाता ही सिद्धार्थाची गुरु वाटते. परंतू तिनं तसा अहंभाव बाळगला नाही. विशेष म्हणजे तिनं सिद्धार्थाला मानलं व पुढील काळात तिनंही बौद्ध धम्माची दिक्षा घेतली.
सुजाताचे विचार हा फार मोठा संघर्ष आहे. म्हणूनच ही कादंबरी. ह्या कादंबरीच्या रुपानं तिच्या जीवनातील काही गोष्टीवर नक्कीच प्रकाश टाकण्याचा मी अल्पशः प्रयत्न केला आहे. आपण ती वाचावी. किंतू परंतू मनात ठेवू नये. कारण सुजाताच्या जीवनावरचं साहित्य तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाही. जे काही उपलब्ध होतं. त्यावर आधारीत असलेल्या काही माझ्या आकलनातील गोष्टीवरुन मी ही कादंबरी लिहिली आहे. कादंबरी माहितीपर असून वाचनीय झाली आहे. मात्र एकच विनंती आहे की आपण ही कादंबरी वाचून एक फोन अवश्य करावा.
आपला नम्र अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

SUJATA (kadambari)
सुजाता (कादंबरी)
प्रकाशक - सौ निर्माला शिंगाडे १२२ बी गजानन नगर भरतवाडा कळमना मार्केट रोड नागपूर ४४००३५
लेखक - अंकुश शिंगाडे मो. नं. ७२७६८१७१९७
प्रथमावृत्ती - १६ मे २०२२
मुखपृष्ठ - कु.अनुष्का
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धास सादर समर्पीत

सुजाता (कादंबरी)

सुजाता एका जमीनदाराची मुलगी होती. तिचा विवाह झाला होता. एका राजपुत्राशी. जो बकरौर राज्याचा गणाधिपती होता. जो अनाथपंडीताचा पुत्र होता. राजपुत्र ब-याच काळापर्यंत पुत्रविरहित होता. त्यामुळं तिला नवश फेडायचा होता. ज्या देवाला तिनं नवश केला होता.
झाडं........झाडांनाही मायबाप असतात. पती असतो आणि परीवारही असतो. असे म्हटल्यास कोणी नक्कीच वेड्यात काढतील. परंतू आपल्या डोक्यावर अधिक ताण दिल्यास नक्कीच असे वाटायला लागते की झाडांनाही मायबाप असतात. पतीही असतो आणि परीवारही.
माणूस हा विचारशील प्राणी आहे. या माणसाचा जेव्हा जन्म होतो. तेव्हा त्याला माहित नसतं की त्याची आई कोणती आहे. जेव्हा ती महिला त्याला आपल्या स्तनाला लावत असते. तेव्हा त्याला कळतं की ही माझी आई असेल. त्यावेळी तो लहान असतो. त्याला कळत नसतं की आई म्हणजे काय? त्याला बोलताही येत नाही. परंतू जसजसा तो मोठा होतो. तसतशी त्याला आई समजते. तिचा स्पर्शही कळतो. त्यातच आई कोण आहे तेही. तो तेव्हा रडतो. जेव्हा तो दुस-याजवळ जातो. हळूहळू त्याला बापही कळायला लागतो. जेव्हा काही दिवस निघून जातात आणि त्याला हळूहळू त्याचे नातेवाईकही कळतात.
झाडांचंही असंच आहे. त्यांनाही मायबाप असतात. पण नेमके मायबाप कोण असा प्रश्न सर्वांनाच पडत असतो. तर झाडांची माय माझ्या मतानुसार माती आणि बाप पाणी असू शकते. कारण जी जन्म देते, ती आपली आई असते. यावरुन झाडांना माती जन्म देते. त्यामुळे ती त्याची आई. तसेच आई ही सदोदीत बाळाच्या जवळ राहते. तशी मातीही रोपट्याला अंतर देत नाही. आई जशी बाळाला अंतर देत नाही तशी. ती त्याला अंतर देत नाही. प्रसंगी बाप वेळोवेळी बाळाजवळ न राहता बाहेर कामाला जात असतो. तो त्याचेजवळ नसतो.
बाप जसा आपल्या बाळापासून कामासाठी दूर जातो. अगदी तशीच रोपट्याच्या बाबतीत झाडांची अवस्था असते. पाणीही प्रत्येकवेळी मातीजवळ वा रोपट्याजवळ नसते. ते पाणी सुकून जाते. तेव्हा मुळं ही आपल्यामध्ये जमीनीतील ओलावा धरुन ठेवत असतात. याचाच अर्थ असा की माती ही बाळाची आई व पाणी हा पिता आहे.
झाडाचे इतरही नातेवाईक असतात. जसे आपल्याला काका, मामा, मावश्या असतात. हे मामा, मावशी, काका, आत्या झाडांनाही नसतात असे नाही. त्यांनाही काका काकी, मामामामी असतात. सर्वच नातेवाईक असतात. त्यांचे नातेवाईक म्हणजे पशू पक्षी......जे पशू त्या झाडांच्या सावलीत राहात असतात. तसेच जे पक्षी त्याच्या फांद्यांवर घरटे बांधत असतात. तसेच मुंग्या, माकोडे हेही त्यांचे नातेवाईक असतात. ज्याप्रमाणे नातेवाईक हे माणसाला संकटात मदत करतात. तशीच मदत ह्या मुंग्या, माकोडे झाडांना संकटात करीत असतात. कोणी त्यांना कापायला आलेच तर त्यांना चावून त्यांना झाड कापण्यापासून परावृत्त करण्याचे काम ह्या मुंग्या करीत असतात.
विशेष सांगायचं म्हणजे आपले जसे शत्रू असतात. तसेच झाडांचेही काही शत्रू असतात. जसे आपल्या शत्रूचे प्रकार आहेत. आपसी शत्रू व बाहेरचे शत्रू. आपले आपशी शत्रू असतात. ते आपल्या जवळ जवळ अगदी प्रेमानं राहून आपल्या पाठीत सुरा खुपसतात तर बाहेरचे शत्रू हे आपल्या जवळ राहात नाही. ते आपल्या जवळ न राहता दूर राहून वैमनस्यानेच वागतात. तसं झाडाचंही आहे. झाडांनाही आपसी शत्रू आहेत आणि बाहेरचेही शत्रू आहेत. झाडांचे आपसी शत्रू म्हणजे अमरवेल व बांडगुळ सारख्या वनस्पती. ह्या वनस्पती त्या झाडावरच उगवतात व त्याच झाडातून त्याचं रक्त शोषून जगत असतात. नव्हे तर त्या झाडांना संपवत असतात. तसेच ज्याप्रमाणे आपल्याला बाहेरचे शत्रू असतात. त्याप्रमाणे झाडांचे बाहेरचे शत्रू म्हणजे लाकुडतोड करणारी मंडळी. हे शत्रू केव्हा धोका करतील आणि केव्हा संपवतील हे सांगता येणे अशक्य आहे.
झाडांना पतीही असतो. ज्याप्रमाणे आपल्याला पती असतो. तसाच पती. तो पती म्हणजे उडणारे फुलपाखरु. हे फुलपाखरु या झाडांना येणा-या फुलरुपी मुलींना छळतात. याचाच अर्थ म्हणजे झाडांची मुलगी म्हणजे त्याची फुलं.
विशेष सांगायचं म्हणजे झाडांना मायबाप असतात. नातेवाईक, परीवार. शत्रू आणि पतीही शिवाय मुलंही........झाडांना भावनाही असते. ती झाडं आत्महत्या देखील करतात. मुख्यतः झाड पूर्ण स्वरुपात संपलं नसलं तरी त्याच्या काही फांद्या वाळल्या दिसतात. हे अचानक अवयव वाळलेलं सापडणं ही त्या झाडांवरील फांद्याची आत्महत्या आहे. कधी कधी अख्खं झाडंच वाळतं. कोणी त्याला किडा लागलेला असेल असंही मानतं. ते खरंही असतं. कारण असे किडे झाडांच्या मुळांना लागतात. परंतू काही झाडांना असे किडे लागलेले दिसत नाहीत. त्यातच ते झाड वाळतं. ती आत्महत्याच असते झाडांची. परंतू आपल्याला ते कळत नाही.
झाडांना नातेवाईक असतात असे म्हटल्यास सर्वजण हसतील. परंतू झाडांनाही भावना असते असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण झाडांना भावना असते हे आधीच सिद्ध केलं जगदीशचंद्र बोस यांनी. त्यांनी लाजाळूच्या झाडावर प्रयोग केला. त्यात एक सुई त्यांनी लाजाळूच्या झाडांना लावली होती. तसेच त्या सुईला एक वायर लावून तो वायर इलेक्ट्रीक बोर्डात टाकला होता. त्यातच त्या इलेक्ट्रीक बोर्डातील स्विच सुरु होताच लाजाळूच्या झाडाला करंट लागत असे व ते झाड पानं मिटवीत असे. यावरुन झांडांनाही भावना असतात हे त्यांनी सिद्ध केले. यावरुनच एक सांगावेसे वाटते की झाडांनाही मायबाप असतात. नातेवाईक पण असतात. तसेच शत्रूही असतात. यात शंका नाही. तसेच ते आत्महत्याही करतात हे तेवढेच खरे आहे.
ते बकरौर नावाचं गाव. त्या गावात सुजाता नावाची ती महिला आपले दिवस कंठत होती. त्यातच तिचा विवाह होवून बरेच दिवस झाले होते. परंतू तिला अजूनही पुत्ररत्न प्राप्त झाले नव्हते.
सुजाताचा विवाह ज्या गावात झाला. त्या गावातच नाही तर आजूबाजूच्या परीसरात एक प्रकारची अंधश्रद्धा होती. ती अंधश्रद्धा म्हणजे त्या गावचं झाड.
झाडं हवा देतात. फळ देतात. पाणी देतात. नव्हे तर अन्न वस्रही देतात. हे सर्वदूर प्रसिद्ध होतं. परंतू झाडं मुलं देतात. स्रीयांचे नवशं पूर्ण करतात. हे काही अजून ऐकलं नव्हतं. परंतू ती त्या गावातील आख्यायीका. ते बहूतेक पिंपळाचंच झाड होतं.
वडा पिंपळाच्या झाडावर भूतं असतात हे ब-याच वर्षापासून लोकांनी ऐकलं होतं. त्यामुळं की काय, भूतं देवी देवतांना घाबरतात. म्हणून बकरौर गावच्या लोकांनी त्या वडा पिंपळाच्या झाडात एक दगडं मांडली होती. लोकांना वाटत होतं की या वडा पिंपळाच्या झाडात कोणताही भूत भटकणार नाही व आपली भूतांपासून सुरक्षा होईल.
भूत......पुर्वीचे लोकं भूताला फार घाबरत असत. भूत ही संकल्पनाच घाबरविणारी होती. भूत कुठेही असू शकते असं लोकांना वाटत असे.
ज्याप्रमाणे गावात भूतांना मानत असत. त्याचप्रमाणे गावात ही भूतं काढणा-या मांत्रीकांनाही मानत असत. हे मांत्रीक आपल्या मंत्र आणि तंत्रविद्येच्या सहाय्याने लोकांच्या अंगातील भूतं काढत असत. त्याचप्रमाणे लोकांच्या मनात भूताविषयीच्या संकल्पना भरत असत.
भूत असणे वा दिसणे ह्या संकल्पना खोट्या होत्या. त्या अंधश्रद्धा होत्या. तरीही त्या अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम हे मांत्रीकच करीत असत. कारण यात त्यांचा फायदा होता. समजा कुणाच्याही घरी भूत लागलाच तर तो काढत असतांना हे मांत्रीक तो भूत काढण्यासाठी मोबदला म्हणून काही धान्य घेत. तर काही कोंबडा, बकरा तर काही भरजरी वस्र घेत.
भूतं ही सर्वत्र असतात असा कयास होता. जास्तीत जास्त प्रमाणात भूतं वडाच्या झाडावर, पिंपळ, आंबा, बोर, उंबर आणि चिंचेच्या झाडावर असतात. असं मानत असत. तसेच कडूनिंबाच्या झाडापासून कोसो दूर असतात असा कयास होता लोकांचा. समजा एखाद्याला भूतबाधा झालीच तर त्याला कडूनिंबाची पानं चारत असत. त्या कडूनिंबाची पानं खाताच भूत चर्रदिशी पळतो असा समज लोकांचा होता.
कडूनिंब.........कडूनिंबाची पानं ही फारच कडू असतात हे सर्वांना माहित आहे. ते पान सर्वच लोकं खात नाहीत. ती पानं खाताच काहींना उलट्याही होतात. तशाच उलट्या त्यावेळीही व्हायच्या. त्यावेळी मांत्रीक म्हणायचा. 'बघा, आता भूत निघत आहे.'
भूत अंगात भरणे वा भूत अंगात येणे ह्या निव्वळ थोतांड संकल्पना होत्या. तरीही लोकांना त्यातील सत्य माहित नसल्यानं व काही लोकं त्यावर विश्वास ठेवत असल्यानं आजही त्या संकल्पना चालीरीतीनुसार अजूनही चालत आहे. आजही काही भागात, जे भाग शिक्षणापासून वंचित आहेत. तिथे भूत असणे, भूतबाधा होणे ह्या गोष्टी नित्य घडत आहेत. तसेच त्यावर उपाय करणारे मांत्रीक त्यांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेवून त्यांना फसवत आहेत. कधीकधी तर गुप्त धन काढून देतो असे म्हणत त्या गुप्त धनासाठी लोकांच्या लेकराचा जीव घेणारेही मांत्रीक या जगात आहेत. एवढंच नाही तर मुलाला वंशाचा दिवा समजून मुलीला त्या दगडाच्या देवासमोर बळी देणारे महाभाग या जगात काही कमी नाहीत.
आज देश वैज्ञानिक क्षेत्रात उच्चपदी पोहोचलेला असून या उच्च पदस्थ झालेल्या गोष्टीही आज अशा लोकांना समजत नाही की काय, अशी शंका येते. ज्या चंद्र सुर्याला येथील माणूस देव मानायचा. ते चंद्र सूर्य देव नाहीत. हे विज्ञानानच सिद्ध केलं. तरीही आमचा आजचा समाज या विज्ञानाला देव न मानता अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून अंधश्रद्धेचे बळी ठरतात.
जे वडाचं पिंपळाचं झाड सर्वात जास्त प्रमाणात ऑक्सीजन देतं. त्याच वडाच्या झाडावर व पिंपळाच्या झाडावर भूतं असतात म्हणून लोकांना ऑक्सीजनपासून वंचित करणारे मांत्रीक किती हूशार असावेत याची कल्पना आपण करायला हवी. तसेच जर आपल्या शरीरात ऑक्सीजन गेला नाही. शुद्ध ऑक्सीजन गेला नाही, तर कोणकोणते आजार पसरतात? ह्याचाही विचार आपण करायला हवा. परंतू आपण आपली बुद्धी त्या प्रमाणात लावत नाही. जिथे बुद्धी लावायची. तिथे बुद्धी गहाण टाकतो आणि जिथे नाही लावायची. तिथे फुकटच लावतो. ज्या मांत्रीकाला आपण हुसकून लावायला हवे. त्या मांत्रीकाला आपण जवळ करतो आणि ज्या वड, पिंपळाच्या झाडात जावे, खेळावे, शुद्ध ऑक्सीजन घ्यावा. त्याच्या दूर जातो. हीच वास्तविकता आहे. ही वास्तविकता मनामनात भरली आहे लोकांच्या. आजही लोकं अशा अंधश्रद्धेपासून दूर जात नाही. तरीही शिक्षण घराघरातील अंधश्रद्धापण दूर करीत आहे.
जिथे शिक्षण आहे. तिथे अंधविश्वासाला थारा नाही असं आपण म्हणतो आणि मानतोही. परंतू हे खरं आहे का? याबाबतीत मागे वळून पाहिल्यास बरेचशी शिकलेली मंडळीही अंधश्रद्धा पाळतांना दिसतात. त्यांना अंधश्रद्धा का पाळतो आपण ते कळायला मार्ग नाही. ज्या शरीराला आपल्या मनुष्ययोनीमध्ये आपला स्वतःचा जीव वाचवता येत नाही. ते शरीर संपल्यावर व त्याचं प्रेत बनल्यावर, खरंच ते प्रेत देव कसं होणार! हं, एक आत्मीयता असते आपल्याला त्या शरीराबाबत. म्हणून त्या आत्मीयतेमुळे त्या शरीराला मानणं ठीक आहे. परंतू त्या शरीराकडे, ते शरीर संपल्यावर आपण आत्मीयतेच्या दृष्टिकोणातून न पाहता आपण केवळ श्रद्धेच्या दृष्टीनं पाहतो हे बरे नाही. कारण आत्मा, परमात्मा या जगात नाहीत. हे आपलेच काही तत्ववेत्ते सांगून गेलेत.
विशेष सांगायचं झाल्यास आत्मा, परमात्मा या जगात नाहीत. भूतंही नाहीत आणि देवंही नाहीत. देव असेलही कदाचित या जगात. परंतू तो जीवंत माणसात असेल. मृत शरीरात वा दगडधोंड्यात अजिबात नसेल. खरा देव तिथेच दिसेल. जिथे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत नसेल. तसेच जिथे रंजल्यागांजल्यांची सेवा होत असेल.
आज अंधश्रद्धा कोणीही पाळू नये. मांत्रीकांवर विश्वास ठेवू नये. वडाच्या, पिंपळाच्या झाडात भूतं असतात असंही कोणी मानू नये. तसेच मृत शरीरात भूत असतात वा मृत शरीर देव बनतो असंही कोणी मानू नये.
मेलेलं शरीर हे जीवंत असतांनाच कोणाच्या कामात येत नसेल, तर तेच शरीर मृत झाल्यावर कोणाच्या कामात येणार. ज्या शरीराला जीवंतपणीच कोणाची सेवा करणं जमलं नाही. तेच शरीर मृत झाल्यावर कोणाची सेवा कशी करु शकणार. हे सत्य आहे. असे असतांना कितपत अंधश्रद्धा पाळाव्यात हे आपण आपल्याच स्वतःशी ठरवायला हवं. भूतबाधा, भूत पिशाच्च ह्या गोष्टी थोतांड असून याबाबतीतील अंधश्रद्धा आपण सोडायला हव्यात. त्या पाळू नये. जेणेकरुन नवीन पिढी तरी अंधविश्वास बाळगणार नाही व देश विकासाच्या क्षेत्रात आघाडीवर जाईल हे तेवढंच खरं आहे.
सुजाताचा विवाह झाला खरा. परंतू ब-याच वर्षापासून तिला मुलबाळ नसल्यानं ती बेचैन होत होती. काही सुचत नव्हतं. त्यातच गावातील काही मांत्रीक मंडळी तिला काही काही उपाय सांगत व ती पुत्रप्राप्तीसाठी काही काही उपायही करायची.
भारताची ही भुमी. या भुमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेतला. ते महान झाले. कारण त्यांनी सृष्टीमध्ये लपलेल्या गोष्टी बाहेर काढल्या व त्या गोष्टी जगासमोर मांडल्या. त्यांनी सामान्य मनुष्य रुपात जन्म घेवून जीवनाची ती कसोटी पार केली की ज्या उंचीपर्यंत कोणीही पोहोचू शकत नाहीत. त्यातच काहींना लोकांनी महान बनवीत धर्मगुरु मानलं. त्यानुसार या देशातच नाही तर जगात धर्म प्रस्थापीत झाला.
भगवान गौतम बुद्धाचे वास्तवीक नाव सिद्धार्थ होतं. त्याची आई बालपणातच मरण पावताच त्याची मावशी गौतमी हिनं त्याचं पालनपोषन केलं. त्यामुळं त्याला गौतम असंही म्हणतात. त्यातच राजा शुद्धोधनही आपल्या मुलाकडे जातीनं लक्ष देत असे. आपल्या बाळाला कोणताच त्रास होवू नये म्हणून राजा शुद्धोधन काळजी घेत असे. परंतू जेव्हा राजा शुद्धोधनाच्या अनुपस्थितीत सिद्धार्थ आपल्या सारथ्यामार्फत नगरभ्रमणासाठी निघाला. तेव्हा ते नगरभ्रमण करीत असतांना त्याने जीवनातील तीन प्रसंग पाहिले. जे तीन प्रसंग पाहताच त्याला जीवन दुखमय वाटलं व त्या दुःखावर समाधान मिळविण्यासाठी अगदी सर्व राजपाट सोडून सिद्धार्थ चालता झाला आपल्या राज्यातून.
ते तीन प्रसंग. पहिला प्रसंग म्हणजे वयोवृद्ध व्यक्तीस पाहणे, हा व्यक्ती जराजर्जर झाला होता. त्याचे दात तुटले होते. केस पीकले होते. शरीर वाकलं होतं. त्याच्या हातात एक वाकडी काठी होती व तो थरथरत रस्त्याने चालला होता. त्यानंतरचा दुसरा प्रसंग म्हणजे स्मशानभूमीत जाणारं प्रेत पाहणे. चार लोकं त्या प्रेताला स्मशानभूमीत नेत होते. त्या प्रेताच्या मागं अनेक माणसं होती. कोणी रडत होते. तर कोणी छाती पीटत होते. तसा तिसरा प्रसंग म्हणजे आजारी व्यक्ती. हा रोगी असा की त्याचा श्वास फुलला होता. पोट फुगले होते. हात पाय सुकले होते. तसेच चेहराही पिवळा पडला होता. त्यानंतर त्यानं चौथा प्रसंग पाहिला. तो म्हणजे संन्यासी माणूस.
सिद्धार्थ गौतम, ते प्रसंग पाहताच विचलीत झाला. त्याचं कारण होतं की त्यानं आतापर्यंतच्या काळात नगरातही तसे प्रसंग पाहिले नव्हते. त्यातच सिद्धार्थ विचार करु लागला. काय करावं सुचेनासं झालं. विचाराअंती त्याला मार्ग सुचला. तो मार्ग म्हणजे आपण ह्या संसाराचा त्याग करायचा. हा राजपाट सोडायचा आणि संन्यासी जीवन व्यतीत करायचं. कारण त्यानं जो चवथ्यावेळा संन्यासी पाहिला होता. तो संन्यासी त्याला अगदी आनंदी दिसला होता. त्या संन्यासी व्यक्तीजवळ काहीही नव्हते. परंतू तो खूश होता.
सिद्धार्थ विचार करीत होता. तसं त्यानं ठरवलं की आपण या संसाराचा त्याग करायचा. आपण आपला परीवार सोडायचा. परंतू परीवार सोडणार कसा? जर आता दिवसा परीवार सोडलाच तर हा परीवार आपल्याला सोडून जावू देणार नाही. कारण ज्यावेळी त्याचे मनात परीवाराला सोडण्याचे विचार आले. त्यावेळी यशोधरा अगदी तारुण्यात होती आणि त्याचा मुलगा राहूल हा दुधावर होता. अर्थात दूध पीत होता.
विचार करता करता मध्यरात्र उलटली. तसं आज त्याचं जेवणही झालं नाही. तो बरोबर जेवलाही नाही. तसा तो रात्रीचा प्रहर. आजुबाजूला कुत्री भूंकत होती.
आज शुद्धोधन राजाही राज्यात नव्हता. तो कोणत्यातरी कारणानिमित्यानं बाहेर गेला होता. तशी ती मध्यरात्र ओसरत चालली होती. झोप काही येत नव्हती. तसा तो उठला. त्यानं आपल्या पत्नीकडं पाहिलं. पत्नी गाढ झोपली होती. तिच्याजवळच अगदी बिलगून राहूलही झोपला होता. तसा एक कटाक्ष त्यानं आपल्या पत्नीकडं टाकला. तद्वतच त्यानं आपल्या मुलालाही पाहिलं. तसा तो उठला. त्यानंतर तो आपल्या पत्नीला कळणार नाही. अशारितीनं तिच्या पायावर नतमस्तक झाला व तो निघाला.
तो रस्ता.........तो रस्ताच मुळात निर्जन होता. रात्रीचा तो प्रहर होता. आज दुपारीच गौतमानं ते प्रेत पाहिलं होतं. तोच तो रस्ता.......अगदी भयाण वाटत होता तो रस्ता. नगराच्या बाहेरची ती स्मशानभुमी. आज ती स्मशानभुमी धन्य झाली होती. ऐन मध्यरात्री सिद्धार्थाचे पाय या स्मशानभुमीला लागले. ते प्रेत जळत होते. त्या प्रेतातील लाकडाचं रुपांतर आता राखेत झालं होतं. काही भागात लाकडं अजूनही जळतच होती.
ती भयाण वाट सिद्धार्थ चालत होता. त्याला काही सुचत नव्हतं. अशातच सिद्धार्थाला दिसलेलं ते जळतं प्रेत. कोल्ह्याची कुईकूईही दुरुन ऐकायला येत होती.
ते जळतं प्रेत. तसा सिद्धार्थ त्या प्रेताजवळ क्षणभर थांबला. त्याला किंचीतही त्या प्रेताची भीती वाटली नाही. क्षणभर त्यानं ते प्रेत न्याहाळलं. त्या प्रेताच्या हाडांचा चुरा झाला होता. तसं त्याला वाटलं, 'हे प्रेत........जेव्हा जीवंत असेल, तेव्हा किती लोभ असेल या प्रेतात. परंतू आज अगदी निरामय होवून जळत आहे हे प्रेत.'
सिद्धार्थनं क्षणभर त्या प्रेताचं निरीक्षण केलं आणि तसा तो उठला आणि पुन्हा झपाझप पावले टाकत तो अगदी निश्चींत मनानं मार्गक्रमण करु लागला.
सिद्धार्थनं मार्गस्थ होवून आपलं नगर सोडलं. काही वेळातच तो आपल्या राज्याची सीमा ओलांडत राजगृहला पोहोचला. ज्यावेळी तो राजगृहला पोहोचला. त्यावेळी त्याला भूक फार लागली होती. त्यातच त्यानं राजगृह येथे भीक्षा मागीतली. त्यानंतर पुन्हा तो मार्गस्थ झाला. नव्हे तर फिरता फिरता सिद्धार्थ आलार कामान उद्दक रामपुत्र यांच्याकडे पोहोचला. तिथे त्याने समाधी कशी लावावी. योग साधना कशी करावी इत्यादी गोष्टी हस्तगत केल्या. त्यानंतर सिद्धार्थ पुन्हा मार्गस्थ होवून उर्वेला इथे पोहोचला. तिथेच त्याने दुःखातून समुळ मानवजातीची मुक्ती करण्यासाठी तपश्चर्या करण्यास आरंभ केला.
सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी तपश्चर्या सुरु करण्यापुर्वी तीळ आणि तांदूळ खाल्ले. त्यानंतर त्यानं संपूर्ण जेवनच बंद केले. त्याला वाटत होते की आपण जर जेवन त्यागलं तर आपल्याला लवकरच ज्ञानप्राप्ती होईल.
सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी समुळ जेवन करणं बंद करताच त्यांचं शरीरही बारीक झालं. शरीर हडकुळं झाली. चेह-यावर कांती राहिली नाही. चेहरा निस्तेज दिसायला लागला.
ते सुरुवातीचे दिवस. ते दिवस अत्यंत जड जात होते. ज्ञानप्राप्ती काही होत नव्हती. अशातच त्याच्या कानावर काही शब्द पडले. 'वीणाच्या तारांना एवढं सैल सोडू नये की त्यातून स्वर निघणार नाही. तसेच वीणाच्या तारांना एवढंही कसू नये की ती तारच तुटून जाईल.'
सिद्धार्थ गौतमानं ते शब्द ऐकले व त्यांना मध्यम मार्ग सापडला. ती गोष्ट त्याला पटली. परंतू एवढ्यानंच त्याचं समाधान झालं नाही. त्याला अजूनपर्यंत दुःखातून मुक्ती कशी मिळवता येईल? याचा मार्ग अजूनपर्यंत सापडला नव्हता.
सुजाता नावाची ती महिला. पुुत्रप्राप्तीसाठी ती अंधश्रद्धेच्या आहारी जावून तिनं त्या पिंपळाच्या झाडात असलेल्या दगडाच्या देवाला नवश केला की मला जर पुत्र प्राप्त झाला तर मी तुला खीर चारणार. कारण तिनं त्या वृक्षात असलेल्या दगडाच्या देवाचा चमत्कार ऐकलेला होता. त्यातच कोणीतरी तिला त्या झाडाची महती सांगीतली होती नव्हे तर तिनं कोणाकडून तरी त्या झाडाची महती जाणली होती. त्यामुळं तिनं नवश केला होता की पुत्रप्राप्ती होताच त्या वृक्षाला खीर देणार.
तिचे ते बोललेले शब्द.......कावळा फांदीवर बसणार आणि फांदी तुटणार किंवा एखादा बोलून जाणार की आज पाऊस पडणार आणि पाऊस पडायचा. असे ते शब्द झाले. तिनं त्या वृक्षाला केलेला नवश आणि ती गरोदर राहिली. सुजाता गरोदर राहिली व लवकरच तिनं बाळाला जन्म दिला.
आपण आपल्या बाळाला दिलेला जन्म पाहून सुजाताला अतिशय आनंद झाला होता. त्यातच तिला तो नवश आठवला की मला जर मुलबाळ झालंच तर मी तुला खीर चढवणार. तशी आठवण येताच सुजातानं आपल्या दासीला त्या पिंपळाच्या झाडाकडे पाठवलं.
ते वडाचं झाड. दासी पुर्णा त्या झाडाजवळ आली होती. तिनं त्या झाडात एक व्यक्ती पाहिला. जो अस्थीपंजर झाला होता. तसेच तो त्या वडाच्या झाडात सतत तपश्चर्या करीत होता. त्याच्या चेह-यावर अलौकिक तेज होतं. ते तेज निहारत होतं. विशेष म्हणजे त्या झाडात आता तो असलेला दगडाचा देव दिसत नव्हता.
दासी विचारात पडली. या ठिकाणी असलेला देव कुठे गेला असेल? कदाचित या दगडाच्या देवानं तर चमत्कार दाखवला नसेल. कदाचित हा दगडाचा देव मनुष्यरुपात तर आला नसेल? वैगेरे प्रश्न तिच्या मनात उद्भवले होते. कदाचित हा मनुष्य देवरुपातच आला असेल असं तिला वाटलं. तशी ती पुरती निघून गेली आपली प्रिय राणी सुजाताला सांगायला. जिनं तो परीसर निरीक्षण करायला व त्या जागेची कार्यक्रमासाठी स्वच्छता करायला पाठवलं होतं.
************************************************************************************************

सिद्धार्थ गौतम बुद्ध जेव्हा त्या ठिकाणी आले. तेव्हा तो परीसर पाहून ते आनंदीत झाले. त्यांचं मन तिथंच रमलं. त्यांना शांत वाटायला लागलं.
तो परीसरच छान रमणीय होता. आजुबाजूला हिरवळ पसरली होती. तिथं एक वडाचं झाड होतं. ते झाड डेरेदार असून हिरवंकंच होतं. त्याच वडाच्या बाजूतून एक नदी वाहात होती. त्या नदीचं नाव त्याला माहित नव्हतं.
आजुबाजूला असलेलं जंगल........त्यातच ती नदी पाहून मोहित झालेल्या सिद्धार्थानं आणखी एक गोष्ट पाहिली. ती म्हणजे तो दगडाचा देव. तसं पाहता त्यानं जीवनातील सर्व आशा सोडली होती. त्यामुळं देव, दानव, भूत, पिशाच्च याचबरोबर हिंस्र प्राणी याचीही त्याला भीती वाटत नव्हती.
सिद्धार्थ गौतम बुद्ध ज्यावेळी तिथे पोहोचले. त्यावेळी हिच जागा आपल्या तपश्चर्येसाठी चांगली असा विचार करुन त्यानं स्वतः तो परीसर स्वच्छ केला. सर्वप्रथम त्या झाडातील दगडाचा देव जवळच्या नदीत फेकून त्यानं परीवर्तनाचं पहिलं पाऊल पार पाडलं. त्यानंतर तो त्याच झाडात तपश्चर्या करायला बसला.
दररोज तो त्या परीसराची स्वच्छता करीत असे. त्यातच तो पोटाची भूक भागविण्यासाठी अन्न म्हणून जवळच्या गावात माधुकरी मागत असे. तोच त्याचा नित्यक्रम असायचा. म्हणतात की गौतमानं सर्वात प्रथम तिळ आणि तांदूळ खावून तपश्चर्या आरंभ केली होती.
दिवसामागून दिवस जात होते. तसा सिद्धार्थ गौतम आंघोळ आणि प्रातःविधीची सर्व कामं झाली की तपश्चर्या करीत असे. त्यातच त्याच्या मनात तपश्चर्या करीत असतांना लाखो विचार येत.या विचारात काही विचार हे वाईटंही असत. काही चांगले असत. वाईट विचार येताच ते विचार तो त्यागत असे आणि चांगले विचार येताच ते विचार तो आत्मसात करीत असे. अशा चांगल्या विचारावर तो विचारमंथन करीत असे आणि त्यातच तो त्यातून जे चांगलं निघत असे. ते मुखोदगत करीत असे. हा त्याचा रोजचाच क्रम होता.
सिद्धार्थ गौतम जेव्हा तपश्चर्येला बसत असे. तेव्हा समुद्रमंथनासारखं या विचारांचं मंथन करीत असतांना व तासनतास या विचारांशी खेळत असतांना त्याची तहानभूक हरवत असे. त्यातच त्याला भूकही लागत नसे.
ती तपश्चर्या.......ती तपश्चर्या नव्हती तर ते विचारांचं भूत होतं. जे भूत असंख्य विचारानं सिद्धार्थाला छळत होतं. त्यातच त्याच्या शरीरात त्या विचारानं अन्नाचा कणही जात नव्हता. त्यामुळं की काय, त्याची कांती ढळत चालली होती. कारण त्याचा परीणाम शरीरावर गंभीर होत होता. परंतू मार्ग काही सापडत नव्हता.
ब-याच दिवसापासून तपश्चर्या करीत असतांना मार्ग सापडत नाही असा विचार करुन आज सिद्धार्थानं ठरवलं होतं की आपण आता मार्ग सापडल्याशिवाय अन्नग्रहणच करायचं नाही.
सिद्धार्थनं ज्ञानप्राप्तीसाठी आपल्या शरीराला क्लेष देत अन्नदान त्यागलं. तो डोळे मिटून अगदी शांत मनानं तपश्चर्येला बसला. अशातच सुजाताची ती दासी त्या परीसरात आली. जिथं तिच्या प्रिय सखीनं अर्थात राणी सुजातानं नवश केला होता. तिनं सर्वप्रथम जेव्हा त्याला पाहिलं. तेव्हा ती अतिशय घाबरुन गेली. जणू तो पिंपळाच्या झाडात बसलेला व्यक्ती देव आहे की भूत आहे हे तिला कळायला मार्गच उरला नाही. शेवटी त्याच घाबरलेल्या अवस्थेत ती आल्यापावली परत फिरली. सिद्धार्थ गौतमाला त्याबद्दल काहीही कळू न देता...........आज सुजाताला बौद्ध धम्मात अलौकिक असं स्थान आहे. कारण ती खीर. त्या खीरीनं अस्थीपंजर झालेल्या शरीरात नवचैतन्य निर्माण केलं. जी खीर त्याला सुजातानं दिली होती.
ती पुर्णा नामक दासी, जेव्हा तिनं तथागत गौतमाला त्या अस्थीपंजर अवस्थेत पाहिलं. तेव्हा तिला भीती वाटली व ती मागे फिरली. तशी ती परत राजवाड्यात गेली व तिनं आपली आपबीती राणी सुजाताला सांगीतली.
सुजातानं ते ऐकलं. तिही आश्चर्यचकीत झाली. तिला वाटलं की कदाचित प्रत्यक्ष वृक्षदेवच त्या वडाच्या झाडाखाली येवून प्रगटला असेल. कदाचित तो आपल्याला दर्शन द्यायलाच आला असेल. असेच वाटून सुजाताही त्याला पाहण्यासाठी आकर्षीत झाली.
************************************************************************************************

सुजाता उर्वेला प्रदेशात सेनानी नावाच्या गावात राहणारी एक साधारण स्री होती. ती सुंदर होती. तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचा विवाह एका राजघराण्यात होईल.
लहानपणापासूनच तिचा भाव दयाळू होता. परंतू वाडवडीलांच्या पावलावर पाऊल टाकून सुजाताही अंधश्रद्धेच्या विळख्यात पोहोचली होती. त्यामुळं सुजाताला देव आणि भूत यातील फरक समजत होता.
संपूर्ण सेनानी गाव पूर्णतः अंधश्रद्धेच्या विळख्यात होता. गावात तंत्र मंत्र, जादूटोणा आणि तत्सम प्रकारच्या गोष्टी चालत असत. त्यातच भूत काढणे आणि अंगात भूतं भरणे या गोष्टीलाही गावातून तिलांजली नव्हतीच. करणी, जादूटोणा या गोष्टीच्या विळख्यात सुजाता लहानाची मोठी होत होती.
ते सुजाताचं बालपण. तिचं ते अल्लड वागणं. त्या रानात लहान लहान मुलांसोबत खेळणं हे तिला आवडत होतं.
पुर्णा सुजाताची दासी होती. तिनंच सिद्धार्थला वडाच्या झाडात अस्थीपंजर अवस्थेत पाहिलं होतं.
ती रात्र पौर्णीमेची होती. त्या रात्री सिद्धार्थनं स्वप्न पाहिलं होतं. त्यातच आज महात्मा बुद्ध ज्ञानप्राप्तीसाठी या वृक्षाखाली बसलेले असतांना त्यांच्या शरीरातून दिव्य आभा निघाली होती. पुर्णा दासी सिद्धार्थला पाहताच परत गेली. तशी ती सुजाताजवळ जाताच तिला म्हणाली,
"महामई, आज वृक्षदेवता अगदी प्रसन्न झाल्यासारखे वाटत आहेत."
"म्हणजे असं काय घडलं पुर्णा?"
"महामई, त्या वृक्षाखाली प्रत्यक्षात देवच बसले असावेत असं वाटलं."
"अर्थात?"
"महामई, त्या वृक्षाखाली एक व्यक्ती अस्थीपंजर अवस्थेत बसलेला दिसला."
"हो का?"
"म्हणजे प्रत्यक्षात भगवानच त्या झाडात प्रगटला असेल."
"चल बरं पाहू. कोण आहे तो."
सुजातानं पुर्णाची गोष्ट ऐकली. ती गोष्ट ऐकताच तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं. त्यातच तिला त्याला भेटण्याचं आकर्षण निर्माण झालं. त्यातच ती पुर्णाला घेवून निघाली.
पुर्णा तिची दासीच नाही तर ती तिची बालपणाची मैत्रीणही होती. पुर्णा गरीब होती. परंतू सुजाता श्रीमंत होती. तिचे वडील सेनानी गावचे जमीनदार होते. असे जमीनदार, त्या जमीनदारीपणानं सेनानी गावात तिच्या वडीलाचा रुतबा निर्माण झाला होता.
घरी खुप मोठ्या प्रमाणात श्रीमंती असल्यानं सुजाता जरी दयाळू स्वभावाची असली तरी तिच्यात अल्लडपणा निर्माण झाला होता.

************************************************************************************************

बालपण माणसाला फार आवडत असते. कारण बालपण एकदाच मिळत असते आणि ते रम्य असते.
अलिकडे मोबाईलचा काळ अाहे. या काळात लहान मुलं ही खेळण्याऐवजी फक्त मोबाईल पाहण्यात जास्त वेळ घालवत असतात. या लहान मुलांच्या मोबाईल खेळण्याच्या नादामुळं त्यांचे मायबापच नाही तर लहान मुलंही जास्त परेशान असतात. ते लहान मुलांवर ओरडतात. तरीही ते ऐकायला तयार नसतात. तरीही ते अल्लड जीवन सर्वांना आवडत असतं.
आम्ही जेव्हा लहान होतो. जेव्हा आम्हाला कोणी आमच्यावर ओरडलेलं आवडत नसे. आम्हाला त्यावेळी असं वाटायचं की मोठेपण चांगलं असतं. परंतू आम्ही जेव्हा मोठे झालो आणि जेव्हा आमच्यावर जबाबदारी आली. तेव्हा कळलं की मोठेपण चांगलं नाही तर लहानपणच चांगलं असतं.
आमचं लहानपण अतिशय रम्य होतं. ते रम्य बालपण आम्हाला आजही आठवतं. त्या लहानपणातील ते दिवस अजूनही आठवतात. अन् आठवतात लहानपणीच्या आठवणी. ज्या आठवणी आज आठवता आठवता संपत नाहीत.
त्या आठवणी रम्यच होत्या. कारण त्या आठवणी आजही जीवनात ओलावा आणत असतात. तशाच त्या आठवणी मन अगदी प्रसन्न करुन टाकतात.
आम्ही जेव्हा लहान होतो, त्यावेळी मोठी शिकोटी बांधून राणातल्या चिचबिलाई आणि चिंचा तोडायला आम्ही जात होतो. त्यातच त्या चिचबिलाईची झाडे एखाद्या शेतक-याच्या शेतीला लागून असल्या की बस ओरडण्यासारखी स्थिती व्हायची. कारण त्या चिचबिलाई तोडता तोडता केव्हा शेतमालक यायचा आणि आम्हाला त्या झाडाला बांधून ठेवायचा ते कळायचं नाही. सायंकाळ होताच आम्ही घरी यायचो. परंतू ही गोष्ट आम्ही कदापिही मायबापाला सांगत नव्हतो. कारण ते माहित होताच बाप एवढा मारायचा की अंगावर वळं यायचे. आई मग रात्री झोपतांना त्या वळांना तेल लावून द्यायची आणि समजवायची की उद्यापासून काही चिचबिलाया तोडायला जायचं नाही. परंतू त्या आईनं कितीही समजावलं तरी त्या चिचबिलाया तोडायचा नाद जायचा नाही. दुसरा दिवस उजळला की पुन्हा मायबाप कामाला जाताच परत चिचबिलाया तोडायला जायचं म्हणजे जायचं. हा आमचा नित्यक्रमच झाला होता.
चिचबिलाया तोडणं, चिंच तोडणे अन् आंबे तोडणे हा आमचा बालपणाचा उद्योग. आंबेही तोडायचे असले की सगळं मित्रमंडळ मिळून रानात जात होतो. त्यात काही मुलीही असायच्या. घरातलं तिखट मीठ घेवून अगदी रानात जात होतो. कै-या तोडत होतो आणि त्या कै-या तिखट मीठासोबत आवडीनं खात होतो. त्या खातांना दाताची पुरती वाट लागायची. दातं आंबट होत.,खावंसं वाटत नव्हतं. तरीही त्या खात होतो. अगदी त्या बाल्यावस्थेत मैत्रीणीसोबत. ते मैत्रीणीवरचं निरतिशय प्रेम असायचं. परंतू त्या प्रेमात संदर्भ नसायचे. कारण आमच्या भावना मेलेल्या असायच्या.
संत्र, बोरं अशी चोरुन तोडण्यात मजा वाटायची. त्यातच काटे रुतत असतांनाही त्या चिचबिलाईच्या झाडावर अगदी शेंड्यावर आम्ही चढत होतो. त्यातच मालक येताच अगदी वरुनच खाली उड्या मारत होतो. त्यात अंगालाही खरचटत असे. परंतू त्याचं काहीच वाटायचं नाही.
लहानपणी ज्याप्रमाणे आंबे, चिंचा तोडण्याची मजा वाटायची. त्याचप्रमाणे कंचे, भोवरा, टायर चालविण्यात आमचा वेळ कसा जायचा ते कळायचं नाही. त्या खेळण्यात आमची तहान भूक हरवून जायची. भूक लागायची नाही. त्यातच भूक लागलीही, तरी ती जाणवायची नाही.
आम्हा सर्वांची आई चांगली होती. आई आमच्या पाठीमागं फिरायची. शोधायची. परंतू आम्ही सापडत नव्हतो. सापडायला आम्ही गावात नसायचो. आम्ही तर रानात गेलेलो असायचो. कशासाठी तर कै-या आणि चिचबिलाई तोडण्यासाठी. त्यावेळी आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नव्हती. साप आणि भूत म्हणजे काय, ते जाणवायचं नाही. मात्र हे जेव्हा आमच्या मायबापाला माहित व्हायचं. तेव्हा ते साप आणि भूताची भीती दाखवायचे.
लहानपण ते........त्या बालपणात माकडं हाकलण्यात मजा यायची. पंधरा पंधरा भड्यांचा कळप यायचा. भडे म्हणजे नर माकडं. त्या माकडांना गुलेरच्या साहाय्यानं दूर दूर हाकलून लावण्यात आम्ही पटाईत होतो. काही मुलं तर त्यांना दगडं मारत.
दगडं मारण्यात आम्ही पटाईत होतो. आमचे दगडाचे निशाणे अगदी निशाणावर जात. आम्ही या दगडाच्या निशाणानं आंबे पाडण्याचा पराक्रम करायचो. तोच पराक्रम आम्ही माकडं हाकलण्यात करीत होतो.
लहानपणचे हे आमचे पराक्रम. केव्हा बालपण सरलं आणि केव्हा तरुणपण आलं ते समजलंच नाही.
आजही आठवतं ते बालपण. परंतू ते बालपण परतून येणार तरी आहे का? निश्चीतच नाही. हे आम्हाला माहित आहे. त्यावेळी मायबाप जरी आमच्यावर ओरडत असले तरी स्वतंत्र्य होतो आम्ही. मायबाप कितीही रागावत असले तरी थोडेसे रडलो की ते अगदी जवळ घ्यायचे. लाड करायचे आमचा. सर्व राग आवळून. कारण त्यांना वाटायचं की आमची मुलं चोर निघू नयेत. इमानदार निघावेत. ते त्यांचे संस्कार होते.परंतू त्यावेळी ते समजायचे नाहीत. आज मात्र सगळं समजतं. म्हणून आता वाटतं की लहानपण अजून एकदा मिळावं. परंतू कसं मिळेल? म्हणून देवालाही नित्य मागतो आम्ही की लहानपण देगा देवा. परंतू देव ते ऐकेल तेव्हा ना. कारण आज जगात देवच नाही. देवाचा दगड उरला आहे देव्हा-यात केवळ.
हेच आमचं बालपण. अगदी रम्य होतं. म्हणून सांगावसं वाटतं की ह्या मोबाईल युगात रमण्यात काही अर्थ नाही. मोबाईलच्या सतत वापरानं सारं नुकसानच आहे. डोळ्यांचे आजार होतात. कर्णबधीरपणा येतो नव्हे तर रक्ताभिसरण न झाल्यानं ह्रृदयाचे रोग होतात. आज लहान लहान मुलांना लकवा, पक्षाघात व इतर अनेक प्रकारचे रोग होतात. कारण व्यायाम होत नाही. मैदानी खेळ बंद झाल्यानं व व्यायाम बंद झाल्यानं सळसळतं रक्त नाही. जे सळसळतं रक्त असायला पाहिजे ते नसल्यानं आज लहान लहान मुलांचं अकाली निधन होतं.
विशेष म्हणजे लहान मुलांनी तरी मस्त आणि मुक्तपणे खेळायला पाहिजे. व्यायाम करायला पाहिजे. परंतू ते कसे करणार व्यायाम. त्यात त्यांचा नाही तर आमचा दोष आहे. आम्हीच त्यांना मोबाईल देतो खेळायला. कारण आम्हाला त्यांना कुठेतरी गुंतून ठेवावसं वाटतं. कारण आम्हीच आज मोबाईलमध्ये गुंतलेले असतो आणि आम्हाला डिस्टर्ब होवू नये म्हणून त्यावर आम्हीच हा ती मुलं अगदी लहान असतांना उपाय काढलेला असतो. हळूहळू ती आमच्या या महान उपायामुळं त्यांना मोबाईलची सवय लागलेली असते. मग ती सवय अशी जडते की पुढे आम्ही त्यांना मोबाईल नको पाहा म्हटले तरी ती आमचं ऐकत नाहीत. मग आमची फजीती होते.
महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही आज मुलांना सुधरविण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा आमच्या स्वतःतच सुधारणा करायला हवी. आम्हीच स्वतः व्यायाम करायला हवा. तसेच आम्हीच मोबाइल कमी पाहायला हवा. जेणेकरुन ती आमचं अनुकरण करणार नाही व मोबाइल कमी पाहतील तसेच टिव्हीही. कारण लहान मुलं ही अनुकरणीय असतात. विशेष म्हणजे मुलांवर संस्कार करतांना प्रथम आम्हीच संस्कारी आहोत हे त्यांना दाखवायला हवं. जेणेकरुन ती स्वतःच संस्कारी बनतील. जे संस्कार त्यांना कधीच शिकवावे लागणार नाही. ते स्वतःच शिकतील यात काही दुमत नाही.
सुजाताही बालपणी अशाच स्वभावाची होती. तिला तिच्या मैत्रीणीसोबत खेळतांना फारच मजा येत असे. त्यातच तिचा बाप हा जमीनदार असल्यानं तिला घरी कोणत्या गोष्टीची काही कमी नव्हती.
त्यावेळी दासीप्रथा अस्तित्वात होती. प्रत्येक श्रीमंत व्यक्तीच्या घरी दास दास्या असत. ज्यावेळी त्यांचे विवाह व्हायचे. त्यावेळी त्यांच्यासोबत दास दास्या दिल्या जात. ज्या दास्या लहानपणच्या त्यांच्या मैत्रीणी असायच्या.
पुर्णा अशीच दासी की सुजाता जेव्हा लहान होती. तेव्हा ती तिच्यासोबत राहायची. पुर्णा गरीब होती. ज्यावेळी तिचा विवाह झाला. तेव्हा तिनं पुर्णाला आपल्यासोबत आपली दास बनवून नेलं. परंतू तिला सांभाळतांना कधी तिनं भेदभाव केला नाही. अगदी स्वतःची धाकटी बहिण म्हणूनच सांभाळलं. तिला अंतर दिलं नाही.
बालपण सरुन जातं आणि केव्हा तरुणपण येतं. ते कळत नाही. तरुणपण येताच सारे संदर्भ बदलतात. अवयवात आणि शरीरात बदल होतो. मग तरुणांना तरुणाईचं आकर्षण वाटायला लागतं. तरुणींनाही असंच वाटायला लागतं. यातच तरुण तरुणी एकमेकांवर प्रेम करायला लागतात. ते प्रेम त्यांनाही माहित नसतं की ते एकमेकांवर का बरं होत आहे.
सुरुवातीला तरुण तरुणी एकमेकांशी बोलायला लागतात. त्या बोलण्यातून मग ते एकमेकांवर प्रेम करायला लागतात. त्यातच ते एवढे प्रेमात गुरफटून जातात की ते एकमेकाच्या शिवाय राहू शकत नाहीत. ते आकर्षण इतकं महाभयंकर असतं की ते मागचा पुढचा विचार न करता असे निर्णय घेतात की ते निर्णय मायबाप व आबालवृद्धांना सांगतही नाहीत. कारण सांगीतल्यावर ते काही म्हणतील अशी त्यांना भीती वाटते. त्यातच काही मुलं मुली पळूनही जातात मायबापांना न सांगता. ते कुठे गेले कुठे नाही हा थांगपत्ताही नसतो. मग काय ते अवेळीच असे निर्णय घेवून फसतात. कारण यामध्ये मुलं या शारिरीक आकर्षणानं पळून तर जातात आणि मुलं पैदा करतात. परंतू जेव्हा जबाबदारी अंगावर येते, तेव्हा मात्र अशी मुलं हतबल ठरतात. मग कुटूंबात रोजची भांडणं होतात. काही मुलं तर सोडून जातात मुलींना. मुलं पैदा करुन. काहींना जबाबदारी पेलवत नाही. म्हणून ते आत्महत्या करतात. तर काही कामालाच जात नाहीत. शेवटी उपासमारीची वेळ येते. शेवटी काय तर नाईलाजानं मुलींना कामाला जावंच लागतं. आपल्या पैदा केलेल्या मुलांना पोसण्यासाठी.
पुर्वीचा काळ एकप्रकारे बरा होता की त्या काळात मुलामुलींचे बालविवाह होत. अगदी वयात येण्यापुर्वी मुला मुलींचे मायबाप विवाह करुन देत. याचाच अर्थ असा की मुलं वयात येण्यापुर्वीच लहानपणीच विवाह होत असल्यानं मुलांना तरुणपणातील आकर्षणाची गरज राहायची नाही. त्यातच ते पळूनही जायचे नाही. तसाच त्यांचा संसारही व्यवस्थीत चालायचा.
लहानपणीच विवाह होत असल्यानं मुलांवर संस्कारही चांगले पडत. मुलं मुली मायबापाच्या व वडीलधा-यांच्या छत्रछायेखाली वाढत. त्यामुळं त्यांचा त्यांच्यावर धाक राहायचा. ती मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या वडीलधा-यांची आज्ञा मोडत नसत.
तो बालविवाह....... त्या बालविवाहात संदर्भ नसायचे. सगळे घरातले कामावर जात. त्यातच मायबाप कितीही मोठे झाले तरी म्हाता-या मायबापांची सेवा करीत. वेगळं राहण्याची वा निघण्याची प्रथा नव्हती. कुटूंबनियोजनाचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्याचं कारणही तसंच होतं. कारण त्यावेळी युद्ध होत व युद्धात प्रचंड मोठ्या प्रमाणात सैन्य मरत. कित्येक मुली लहानपणीच विधवा होत. त्यातच त्यांना बालपणापासूनच वैधव्याची समस्या सतावायची. मात्र लोकसंख्या या युद्धामुळं नियंत्रीत असायची.
एका एका माणसाला दोनच्या वर पत्नी असायच्या. त्या अनेक पत्नी करण्यामागे उद्देश होता. तो उद्देश म्हणजे मुलं पैदा करणे. कारण युद्धाला अनेक मुलं सैनिक म्हणून हवे असायचे. परंतू जसजसा काळ बदलला. तसतशी परिस्थीतीही बदलली. युद्ध बंद झालं.
बदलत्या काळानुसार युद्ध बंद झाल्यानं लोकसंख्या वाढली. या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी तरुणतरुणींच्या विवाहाचं वय वाढलं. त्याचबरोबर शारिरीक आकर्षण वाढलं. त्याची परियंती प्रेम करण्यात झाली. तेही लपूनचोरुन प्रेम करण्यात. त्यातच त्याची परियंती पळून जाण्यातही झाली.तेही मायबापांना माहित होवू न देता. याला जबाबदार कोण ठरला. युद्ध की युद्धविराम......
पुर्वीच्या काळात जेही युद्ध व्हायचे. त्या युद्धात जो नरसंहार व्हायचा. तो नरसंहार त्या काळातील तत्ववेत्यांनी पाहिला. त्यांनी त्यांना शांतीचा मार्ग सांगीतला. तोच अष्टांग मार्ग.
त्या काळातील असा शांतीचा संदेश देणारा तत्ववेत्ता म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्धाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. कारण गौतमानं जो मार्ग सांगीतला. तो अहिंसेचा होता. हिंसेला त्यांनी वावच दिला नाही. अहिंसा धर्म जपला. हेच तत्व जेव्हा त्यानं आपल्या धम्माचा प्रसार करतांना जेव्हा बुद्धानं वापरले. तेव्हा मोठमोठे राजे त्यांना शरण गेले. काहींनी तर बुद्ध धर्माला राजाश्रयच दिला. काही राजे सुरुवातीला विरोधक होते. परंतू तद्नंतरच्या काळात त्यांनाही ते तत्व पटलं व त्यांनी युद्धाला विराम देवून सामोपचाराचा मार्ग पत्करला.
केवळ जगाच्या कल्याणासाठी बुद्धानं मांडलेले अहिंसेचे तत्व आज लोकसंख्या वाढविण्यास कारणीभूत ठरले असले तरी बुद्धाच्या जन्मानंतरही आजपर्यंत जगात युद्ध झालं.,अजुनही युद्ध होतच आहेत. परंतू आज पाहिजे त्या प्रमाणात युद्ध होत नाहीत. परंतू आज विवाहाचं वय वाढलं आहे. बालपणात झालेल्या वा होत असलेल्या विवाहांना आज अत्याचार समजले जाते.
बुद्धानं मांडलेलं अहिंसा तत्व. त्या तत्वांना आज सर्व जगानं स्विकारलं असलं तरी तसेच त्यांची आज गरज असली तरी असं विवाहाचं वय वाढविल्यानं तरुण तरुणीच्या शारिरीक आकर्षणाचं काय? त्यातच त्या तरुणपणाच्या आकर्षणातून मुलामुलांचं पळून जाण्याचं काय? तसेच त्या पळून जाण्यातून पुढे उद्भवणा-या समस्यांचं काय? हे तिनही प्रश्न विचार करायला लावणारेच आहेत. तेव्हा या गंभीर बाबींची दखल घेणंही तेवढंच गरजेचं आहे.
या तरुण पणाच्या आकर्षणाला बुद्ध तत्व जबाबदार नाही. त्यांनी फक्त अहिंसा परमोधर्म सांगीतला. पळून जाण्याचा मार्ग सांगीतला नाही.
महत्वपूर्ण वस्तुस्थिति अशी की शारिरीक आकर्षण प्रत्येकाला असतं. असावं. परंतू याचा अर्थ असा नाही की मायबापांना विश्वासात न घेता पळून जावं. हे असं पळून जाणंही एकप्रकारे हिंसाच आहे. हिंसा म्हणजे केवळ कत्तल करणे नाही तर आपल्या वागण्यातून जर कोणाच्या भावना दुखत असतील, आपल्या बोलण्यातून जर कोणाचं अहित होत असेल तर त्यालाही अहिंसाच म्हणावी लागेल हे तेवढंच खरं आहे. त्याचे परीणामही गंभीर होत असतात आणि ते गंभीर परीणाम प्रत्येकाला भोगावेच लागतात. तेव्हा प्रत्येकानं असं पळून जातांना विचार करावा. प्रेम करण्यापुर्वी सावधान असावं. तसेच पळून जातांनाही सावधानच असावं. पळून जातांना दहावेळा विचार करावा. जेणेकरुन कोणालाच गंभीर तसेच दुरगामी परीणाम भोगावे लागणार नाही व प्रत्येकाचा संसार व्यवस्थीत व सुरळीत होईल हे तेवढेच खरे आहे.
सुजाता जमीनदाराची मुलगी असल्यानं अगदी अल्लड वागत होती. परंतू ती ज्यावेळी विवाहयोग्य झाली. तेव्हा अगदी तिला न समजण्याच्या वयातच तिच्या वडीलानं तिचा विवाह करुन दिला. तिचा विवाह बकरौरच्या राजघराण्यात एका साजेशा तरुणाशी करुन दिला. जो त्या राजघराण्याचा वारस होता.

************************************************************************************************

मुलं ही आपली संपत्ती आहे. ज्याला जास्त मुलं. तो तर फारच श्रीमंत. तसेच ज्या लोकांच्या घरी मुलगा, तो तर अति श्रीमंत समजला जातो. अन् अशी दोन चार मुलं असतील तर, त्या कुटूंबाएवढा श्रीमंत जगात नाही.
कितीही कोट्यवधीचा पैसा असेल आणि घरात मुलं नसतील, तर त्याच्या एवढा जगात गरीब दुसरा कोणीही नसतो. काही लोकं एक बेटी धनाची पेटी मानतात. यावरुन पुत्र वा पुत्री का असेना, पुत्र जन्माला किती महत्व अाहे.
मुलं होण्याला लोक भाग्यशाली समजतात. ते काही अंशी खरंही आहे. कारण कितीही तपासण्या केल्या आणि हार्मोन्स जरी बरोबर असले तरी मुलं जन्मास येत नाही. मुलांबाबतीत सांगायचं झाल्यास उचलली जीभ आणि लावली टाळूला असं होत नाही. त्या जन्माचा काळ ठरलेला असतो. त्याला मग तुमचं नशीब समजा की अजून काही. ती वेळ येण्यापुर्वी कोणालाच पुत्रप्राप्ती होत नाही. मग तुम्ही कितीही नवशं करा. व्रतवैकल्ये करा. उपवास करा.
एका पुराणाच्या ग्रंथामध्ये एका दंतकथा आहे. चांगोला नावाची एक राणी. राज्यात धनधान्य विपुल प्रमाणात असते. परंतू पुत्र नसते. तेव्हा ती मंडळी पुत्रप्राप्तीसाठी नवशही करतात. त्यातून त्यांच्यावर भगवान शिव प्रसन्न होतात आणि म्हणतात,
"चांगोला माग, तुला जो वर मागायचा तो माग."
चांगोला राणी त्यावर त्यांना पुत्र मागते. म्हणते,
" देवा एकतरी पुत्र द्या."
भगवान शिव त्यावर तथास्तू म्हणतात. परंतू त्यापुर्वी एक अट सांगतात,
"मुलगा बारा वर्षाचा जेव्हा होणार. तेव्हा त्याच्या मस्तकाचं जेवन त्यांना चारावं लागेल. मंजूर आहे का? मंजूर नसेल तर जावू दे."
पुत्रप्राप्ती.........ती इथे महत्वाची. त्यासाठी वाट्टेल ते. चांगोलाला वाटते की भगवान शिव काय तेव्हा येणार आहे वर पुर्ण करुन घ्यायला. तेव्हाची तेव्हा पाहू. ती होकार देते आणि तिला पुत्रप्राप्ती होते. नित्यनेमानं पुत्र बारा वर्षाचा होतो आणि भगवान शिव एका भिक्षेकरीच्या रुपानं तिच्या दारात येतो. चांगोला त्याला धनधान्य आणून देते. परंतू तो भिक्षूक ते सगळं नाकारतो. म्हणतो,
"मला तुझ्या पुत्राच्या मस्तकाचं जेवन हवंय."
सुरुवातीला ती नकार देते. तेव्हा तिला तिनं ते पुत्रप्राप्तीपुर्वी दिलेलं वचन आठवायला सांगतो. त्यातच ती स्वतःचा मुलगा आपल्या वचनपुर्तीसाठी बळी देते.
यामध्ये जेवन बनल्यावर भगवान शिव जेवन करतात. त्यांनाही जबरदस्तीनं जेवणास भाग पाडतात. जर ते जेवले नाही तर आपण असेच निघून जावू म्हणतात. शेवटी ती जेवणाला बसते. पण ते चांगोलाला खाणं होत नाही. परंतू अतिथी देवो भवं म्हणत ती जेवन करते. शेवटी तो जायला निघतो. तेव्हा चांगोला त्याला म्हणते,
"देवा, आपण जाण्यापुर्वी एक वचन आठवा. जे मला दिलंय. आपण म्हटलं होतं की जर मी वचनाची पुर्ती केली तरच माझा पुत्र टिकेल. त्या वचनाचं काय?"
यावर भगवान शिव बुचकळ्यात पडले. त्यातच त्यांनी बाळाला आवाज दिला. "चिडीया"
'चिडीया' बाळाचं नाव. चिडीया नाव घेताच बाळ लवकरच धावत आला. जसा झोपेतून अचानक व्यक्ती जागा होतो तसा.
चांगोलाची ही कहाणी. सत्य आहे की नाही माहित नाही. परंतू पुत्रप्राप्तीवर धडधडीत अंजन आहे. या कथेतून सांगीतलं आहे की पुत्रप्राप्तीसाठी किती परीश्रम उपसावे लागतात. पुत्र काही सहज भाग्यात लाभत नाहीत.
रामायण कथेतही पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केल्याचा उल्लेख इथे उल्लेखनीय आहे. काही राजांना तर पुत्र नसल्यानं पुत्र दत्तकही घ्यावे लागलेत. झाशीची राणी त्यापैकीच एक. तिनं दामोधरला दत्तक घेतलं होतं. काहींना असे पुत्रप्राप्तीसाठी नवशं करावे लागले. त्यानंतर पुत्र झालीत. तसेच अशा पुत्रप्रीप्तीची आणखी एक कथा नागद्वारला जाणारी भत्त मंडळी सांगत असतात. ती कथा श्रवणाबाळाची आहे. या कथेमध्ये तिला नागाचा नागस्वामी पुत्रप्राप्तीचा वर देतो. त्यातच तो सांगतो.
"बाळ होताच नागाला कुंकू लावावे लागेल." या कथेमध्येही चांगोलासारखं ती मैनावंती होकार देते. परंतू पुत्रप्राप्तीनंतर तिला विसर पडतो.
सुरुवातीला नाग अगदी लहान रुपात तिच्यासमोर येतो. परंतू ती नजरअंदाज करते. तो तर विषारी साप. त्याच्या दंश करण्याचा नेम नाही. कुंकू लावेल कोण? यातच तो सुक्ष्म रुपातील नाग जातो. मग थोड्या मोठ्या रुपात येतो. असं करता करता त्याचं शरीर वाढत जातं. तो कात टाकून मोठमोठ्या रुपात येत असतो आणि कुंकू लाव म्हणत असतो. परंतू ती काही कुंकू लावत नाही. शेवटी कंटाळून तो श्रवणबाळाला वेढा घालतो. त्याच्या इवल्या इवल्या शरीराला पिळगाळतो. परंतू त्या नागाच्या दंश करण्याच्या भीतीनं मैनावती तिच्या पुत्राला नाग पिळगाळून टाकत असतांनाही त्याला कुंकू लावत नाही. शेवटी त्यात बाळ श्रवणचा जीव जातो आणि ते पाहून तिही मरण पावते. यामध्ये ती अशी मरण्यापेक्षा तिनं कुंकू लावलं असतं तर बरं झालं असतं की नाही. परंतू या प्रसंगामध्ये भीती.........ही भीती अतिशय महत्वाची आहे.
अलिकडे भीतीला जास्त महत्व आहे. भीती जर असेल तर त्याचा गर्भधारणेवरही परीणाम होत असतो. जसा ध्रृतराष्ट, विदूर आणि पांडव जन्माचे वेळी झाला. वेद व्यासाचा अक्राळविक्राळ चेहरा पाहून घाबरलेली सत्यवती. त्या समागमातून ध्रृतराष्ट्र झाला. कारण समागमावेळी तिनं आपले डोळे गच्च लावले होते. त्यातच त्याला दुस-या समागमाच्या वेळी सत्यवती स्वतःला कमजोर वाटून घेत होती. ती तयार नव्हती. त्यातून पांडव झाला तर तिस-या वेळी घाबरुन तिनं आपल्या एका दासीला पाठवलं. त्यातून विदूर झाला.
मुलांच्या जन्मासाठी वाट्टेल ते. ते करण्याची तयारी मुल होण्यापुर्वी काही लोकं करीत असतात. परंतू मुलं होताच ते करता येणे शक्य नसल्याचा हवाला ते देत असतात. जसं मैनावंतीनं केलं.
आज काहींना मुलं नको असतात तरीही मुलं होत असतात. जसं मुलगी कुवारी असतांना तिचं अचानक प्रेम जडते. त्यातच त्या प्रेमातून पुत्रप्राप्ती होते. अशी पुत्रप्राप्ती की ज्यातून त्यांची बदनामी होते व अशी बदनामी होवू नये म्हणून नाईलाजानं त्या मुलांना जीवंतपणी ठार करावं लागते. त्यातूनच आताची परिस्थीती पाहिली तर अशी अर्भकं विहिरीत पडलेली दिसतात.
काही लोकांना मुलं लवकर राहात नाहीत. मग नवशं करावे लागतात. काहींनी नवशंही केले तरी पुत्र होत नाहीत. अर्थात त्या स्रिया गरोदर राहात नाही. मग कितीही पुर्वी बालविवाह होवो.
काही लोकांचा बालविवाह होतो. तरीही बरेच दिवस त्यांना मुलं होत नाही. या कारणांचा शोध घेतांना काही कारणं नक्कीच पुढे येतात. ती कारणं आपल्याला लक्षात घ्यावी लागेल.
१)लेकरं होणं ही अनुवंशिकताही असते. सर्वांना लेकरं होणं सौभाग्याचं लक्षण असतं. परंतू त्याच्या पिढीमध्ये कोणाला पुत्र झाली नसतील तर याही पिढीत पुत्र होणार नाहीत हे लक्षात घ्यायला हवे.
२)काही मुलं ही विवाहापुर्वीच कुवारपणी अफेअर करतात. त्यावेळी त्या मुली आपल्याला गर्भ राहू नये म्हणून गोळ्या खात असतात. ज्या गोळ्या शरीरात अति उष्णता वाढवितात. त्यातूनच विवाहानंतर गर्भ राहात नाही. कारण या गोळ्यांचा परीणाम गर्भाशयावर झालेला असतो. काही मुली तर चक्क गर्भपात करवून घेतात. त्यातून गर्भाशय आकुंचन पावते व मुलं होत नाहीत.
३)काही काही मुली लहानपणापासून उष्णतावर्धक पदार्थ खात असतात. अशावेळी त्यांनाही गर्भ राहात नाही.
४) काही स्रिया गर्भ राहण्यासाठी पोषक वातावरण ठेवत नाहीत. ज्यावेळी समागम होतं. तेव्हा सतत चिडचिड असते. पुत्रप्राप्तीची इच्छा नसते. सतत मनामध्ये तिरस्कार आणि भांडणाचा मुळ असतो. त्यामुळंही गर्भ राहात नाही.
५) काही स्रिया गर्भधारणेसाठी पोषक असणारे पदार्थ खात नाहीत. तर जे गर्भधारणेसाठी पदार्थ पोषक नसतात ते खात असतात. जसे अंडे, बर्गर, पिज्जा इत्यादी. गर्भधारणेसाठी पालक व हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खावं लागतं.
मुल पाहिजे असं सर्वांना वाटत असते. विशेष गोष्ट ही की मुल पाहिजे ही गोष्ट नक्कीच सर्व विवाहीत जोडपे करतात. परंतू त्यांना मुलं जेव्हा होत नाही. तेव्हा ते नवशंही करतात. तरीही त्यांना मुलं होत नाही. मग ते दैवाला दोष देवून मोकळे होतात. इतरही मंडळी त्यावर हरहळत असतात. परंतू यामध्ये दोष हा त्या पतीपत्नीमधील एकाचा असतो. तो दोष म्हणजे त्यांचं कर्म. विवाहापुर्वी काही स्रिया तरुणांमध्ये प्रेमसंबंधात अडकतात. मग समागम आणि त्या समागमातून गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर. कसा राहिल गर्भ? गर्भाशय आकुंचन पावले असते ना. यामध्ये केवळ स्रीचाच दोष असतो असे नाही. दोष पुरुषांचाही असतो. पुरुषांच्या समागमातून ती गरोदर राहते.यातच तिला गर्भ राहताच तो तिच्याशी विवाह करण्यास नकार देतो. मग तिला भयंकर राग येतो. ती तर त्या बाळाची योग्य विल्हेवाट लावते. जशी आपण आपल्या घरातील कच-याची विल्हेवाट लावतो तशी. परंतू तिच्या त्या वाणीतून शापवाणी निघते. ती शापवाणी त्याला लागते. कारण ती शापवाणी तिच्या अगदी अंतरात्म्यातून निघालेली असते. यामध्ये कधी कधी जीवंतबाळ विहिरीत फेकले जाते. कच-याच्या ढिगा-यात फेकले जाते. जिथे त्या जीवंत बाळाचे जीवंतपणीच कुत्रे अवयव तोडत असतात. ज्यात बाळाचा किंचीतही दोष नसतो. पाप त्याच्या मायबापांनी केलेलं असतं. ते बाळ जखमांनी विव्हळत असतं. परंतू ते हतबल व दुर्बल असतं. काहीच करु शकत नाही. ते बाळ विचारही करु शकत नाही. नवजात असतं. परंतू त्यालाही मन असतं. ते मन शापवाणी उच्चारीत असतं. त्यातूनच पुढे त्यांनी विवाह केल्यास त्यांना बाळ होत नाहीत. मग ते नवशं करोत वा न करोत. कारण त्यांनी वाईट कर्म केलेलं असतं.
महत्वपूर्ण वस्तुस्थिति ही की ते बाळ मरते. तडपू तडपू मरते. यात दैव असो की नसो. परंतू जो अंतरात्मा आहे. ज्याला आपण निसर्ग म्हणत असतो. कोणी दैव म्हणतात. ते दैव ते सगळं पाहात असते. तोच आपण केलेल्या कृत्याची शिक्षा आपल्याला देत असतो. म्हणून सांगावेसे वाटते की आगामी काळात चांगला पुत्र पाहिजे आहे ना. मग विवाहापुर्वी चांगले वागा. चांगले कर्म करा. कोण्या मुलींच्या जिंदग्या बरबाद करु नका. कारण त्याचे वाईट परीणाम आपल्याला आज नाही, परंतू कधी ना कधी भोगावेच लागतात. तसेच मुलींनाही माझं सांगणं आहे की त्यांनी असं मुलांवर विवाहापुर्वी प्रेम करु नये. जी मुलं विवाहापुर्वी तुम्हाला भाळवतात. इशारे करतात. ते काही चांगले नसतात. चांगल्या घरच्या मुलांना वा चांगल्या स्वभावाच्या मुलांना या विवाहापुर्वीच्या प्रेमात आनंद वाटत नाही. ते प्रेमच करीत नाही कोणत्याच मुलींवर. ते प्रेम करतात आपल्या करीअरवर. ते आपलं करीअर बनविण्याला प्रथम प्राधान्य देतात. कारण करीअर महत्वाचं असतं त्या काळात, प्रेम नाही. विशेष म्हणजे तुम्हीही आपलं करीअर बनवा. प्रेमाकडे लक्ष देवू नका. कोणाच्या भुलथापांना बळी पडू नका. कारण ती मुलं आहेत. आपली इच्छा भुलथाप देवून पुर्ण करतीलही कदाचित. परंतू त्याचे परीणाम त्यांना भोगावे लागणार नाही. ते तुम्हालाच भोगावे लागतील. तुम्ही तुमची स्वतःची बदनामी होवू नये म्हणून त्याला दोष देत देत आपल्या बाळाला तर जन्माला घालाल विवाहापुर्वी. परंतू निव्वळ बदनामीच्या धाकाने त्याला कच-यासारखे फेकून द्याल एखाद्या विहिरीत. त्यातच ते बाळ तडपू तडपू मरेल. ते बाळ दोष देईल. त्याला तर देईलच देईल. परंतू त्याचा दोष तुम्हाला जास्त लागेल. कारण तुम्ही बाळाची आई असाल. ते बाळ तुम्हालाच म्हणेल. जर माझा सांभाळ करायचा नव्हता तर कशाला जन्माला घातलं? ते बाळ तडपू तडपू मरेलही कदाचित. परंतू ते मरतांना त्याला ज्या यातना होतील ना. त्या यातनेचे पाप तुम्ही शतजन्मातही फेडू शकणार नाही. तुम्हाला कदाचित पुढील आयुष्यात मुलंच होणार नाही. मग तुम्ही कितीही नवशं केले तरीही........म्हणून सांगतोय की विवाहापुर्वी प्रेम करुच नका. करीअर बनवा. त्यातच तुमचं भलं आहे. खरं प्रेम विवाहानंतरच होतं, विवाहानंतर नाही. हे निदान आवर्जून लक्षात असू द्या.

************************************************************************************************

सुजाता आधीपासूनच अल्लड होती. त्याचप्रमाणं तिचं वागणंही अल्लडच होतं. त्यातच तो जमीनदार असल्यानं त्यानं आपल्या मुलीचा विवाह करण्याचं ठरवलं. परंतू त्याच्या मुलीचा विवाह जुळत नव्हता. कारण गावोगावी तिची ती अल्लड असल्याची चर्चा होती. त्यामुळे तिचा विवाह जुळणं कठीण जात होतं. शेवटी एक रिश्ता आला. अनाथपंडीता ह्यांच्या घरचा. बकरौरचा राजा अनाथपंडीत तिला मागणी घालायला आला होता. त्यातच अत्यंत धामधुमीत तिचा विवाह जमीनदार सेनानीनं अनाथपंडीताच्या मुलाशी लावून दिला.
सुजाताचा अनाथपंडीताच्या मुलाशी विवाह झाला खरा. परंतू ती आधीपासून वडीलाच्या घरी अगदी लाडालोभात वाढली असल्यानं तिचं पतीशी पटत नव्हतं. नेहमी खटके उडत असत. अशातच अनाथपंडीतही अगदी बेचैन होवून जात असे.
त्याचा मुलगा आज्ञाकारी होता. त्याची चर्चा पंचक्रोशीत होती. तो राजघराण्यातील होता. परंतू त्याची सुन काही चांगली निघाली नसल्यानं त्याला विचार यायचा. वाटायचं की सोडून द्यावं हिला. परंतू कसं सोडणार! तिला जर सोडलं तर राज्याची बदनामी होईल. शेवटी परिस्थितीशी जुळवून घेत घेत सुजाताचा पती तिच्यासोबत वावरत होता.(संदर्भ अंगुत्तर निकाय ७;५९ चतुर्थ ९१-९४) तिच्या त्याच अल्लडपणामुळं की काय, ती गरोदरच राहात नव्हती. शेवटी पती आणि सास-याच्या म्हणण्यानुसार तिनं त्या वडाच्या देवतेला नवश केला व ती गरोदर राहिली.


************************************************************************************************

सुजाताला पुत्र झाला होता. त्यातच ती आनंदीत झाली होती. त्यातच तिनं साफ सफाई करण्यासाठी पुर्णा नावाच्या दासीला पाठवलं. परंतू दासी परत येताच आणि तिनं सत्य कथन करताच ती आश्चर्यचकीत झाली व ती दासीला घेवून त्या ठिकाणी आली. जिथे ते वडाचे झाड होते.
ती त्या स्थळी येताच तिनं पाहिलं की सिद्धार्थ त्या वडाच्या झाडात अगदी ध्यानमग्न अवस्थेत बसलेला आहे. तशी ती आश्चर्यचकीत झाली. तसं तिला वाटलं की देव साक्षात आपल्या समक्ष प्रगटला आहे.
तिला तसं वाटताच ती त्या झाडाजवळ गेली. तिनं विधीवत पुजा केली त्या तपश्चर्येसाठी बसलेल्या तथागताची. तशी ती म्हणाली नव्हे तर स्वतः बोलली,
"हे भगवन, आपण माझी इच्छा पूर्ण केली. म्हणून मी आणलेली खीर प्राशन करावी. मी ही खीर सहस्र गाईपासून काढलेल्या दुधापासून बनवलेली आहे. मी आपल्याला दिलेल्या वचनानुसार आपल्यासाठी खीर आणलेली आहे.
मी नवश करतांना म्हटलं होतं की मी शंभर गाईपासून काढलेल्या दुधाची खीर बनवून तुम्हाला चारणार. मी दिलेल्या वचनानुसार आपण ही खीर प्राशन करा भगवन आणि मला कृतार्थ करा."
ते सुजातानं बोललेली वाणी. ध्यानमग्न अवस्थेत असलेल्या सिद्धार्थनं ते शब्द ऐकले. तसा त्याच्या तपश्चर्येचा तो एकोणपन्नासवा दिवस होता. तथागत आजपर्यंत जेवलेच नव्हते वा पाणीही प्राशन केलं नव्हतं त्यांनी. तरीही ते जीवंत होते. त्याचं कारण होतं योगसाधना आणि पुण्यकर्म. तथागताला जगाच्या समुळ दुःखाच्या निराकरणासाठी दुःखातून मुक्ती मिळविण्याचा मार्ग शोधायचा होता. त्यातच आज एकोणपन्नासवा दिवस उजळला होता. ज्या दिवशी सुजाता स्वतः आली होती आणि तिनं त्याला वनदेवता समजून खीर अर्पण केली होती.
ते तिचे शब्द........ ध्यानमग्न असलेल्या सिद्धार्थनं ते शब्द ऐकले व तसे सिद्धार्थनं आपले डोळे उघडले.
डोळे उघडताच त्यांनी आपल्या समोर सुजाताला पाहिलं. त्यातच आपल्या पुढ्यात सोन्याचं पातेलं पाहिलं. ज्या पातेल्यात दुधव्याप्त खीर होती.
सिद्धार्थानं डोळे उघडले. त्याचबरोबर त्याला त्याच्या समोर दुधाचं पातेलं दिसलं. तेही दूध सोन्याच्या भांड्यात. तसेच त्याला त्याच्यासमोरच विधीवत त्याची पुजा केलेली आढळली. त्याच्या समोरच त्याचे डोळे मिटलेले असतांना अगरबत्ती, बेलपत्र आणि हळद कुंकूम तसेच अक्षदा वाहिलेल्या दिसल्या. तसं त्याला समजलं की या स्रीनं आपली पुजा केलेली दिसते. ही अंधश्रद्धा आहे. हा अंधविश्वास पसरविण्याचा मार्ग आहे.
सिद्धार्थ देवाला आणि भुतालाही मानत नव्हता. हे देव अन् भूत त्याच्या जवळून कोसो दूर पळाले होते. ते स्थान जंगलातच असतांना व त्या स्थानाच्या बाजूलाच एक निरांजना नदी असतांना त्या नदीवर कितीतरी हिंस्र श्वापदं पाणी प्यायला येत व ते पाणी पिवून जात. त्यातच ते प्राणीही सिद्धार्थाला पाहात असत. परंतू त्या प्राण्यांनी सिद्धार्थला काहीही केलं नाही. त्यातच तो जिथे बसला होता. त्या आसनस्थ भागात कितीतरी साप, विंचू सारखे प्राणी त्याच्या अंगाखांद्यावर खेळत. परंतू ना त्यांना सिद्धार्थ घाबरत असे, ना ते प्राणी. अगदी खेळीमेळीचं वातावरण समजून ते प्राणी सिद्धार्थाजवळ बसत. त्यातच ती जागा स्वच्छ असल्यानं काही हिंस्र प्राणीही तिथे येवून बसत.
सिद्धार्थानं ज्याप्रमाणे देवीदेवता व भूताचे भय ठेवले नाही. त्याचप्रमाणे त्यानं मृत्यीचेही भय पाहिले नाही. तो मृत्यूला घाबरत नसे. मृत्यू येईलच. त्याला आपण थांबवू शकत नाही. परंतू कालसापेक्ष येणार नाही वा अकाली येणार नाही. त्याची वेळ ठरलेली असेल. तेव्हा त्याला घाबरण्याचे कारण नाही. हे ज्यादिवशी तथागत घरुन निघाला, तेव्हाच ठरवलं होतं.
सिद्धार्थानं तो सर्व प्रकार पाहिला. तो प्रकार विचित्र वाटला. तसा तो सुजाताला अत्यंत प्रेमस्वरुप वाणीत म्हणाला,
"कोण आपण?"
तो वडाच्या झाडातील अस्थीपंजर झालेला जीव......सुजाता त्याला देव समजत होती. तो जीव मनुष्यवाणीनं बोलू लागताच सुजाता क्षणभर घाबरली. तिला तो देव नाही तर मनुष्यच असल्याचा भाष झाला. परंतू तरीही त्याला अवतारी पुरुष समजून ती म्हणाली,
"मी..........मी जवळच्या ग्रामातील राणी आहे."
"कशासाठी आलात?"
"भगवन आपल्याला खीर चारायला."
"खीर.........! अर्थात?"
"माझा नवश पूर्ण व्हावा म्हणून."
सिद्धार्थला तिचं बोलणं समजलं नाही. तसं त्यानं पुन्हा म्हटलं,
"मला काही याचा अर्थ समजला नाही. जरा मला समजावून सांगाल का?"
"मी.........मी नवश केला होता. या वडाच्या झाडातील देवाला की मला पुत्र द्यावा. जर मला पुत्र झाला तर मी तुम्हाला सहस्र गाईच्या दुधापासून बननलेली खीर अर्पण करणार. तेव्हा स्वामी, ही खीर आपण ग्रहण करावी.
"खीर! ही खीर आपण माझ्यासाठी बनवली नाही आणि ही खीर या वडातील देवासाठी बनवली असेल. जो मी इथे येण्याच्या पुर्वी होता."
"मग तो देव तुम्ही नाही का?"
"नाही. मी मनुष्य आहे. तपश्चर्या करीत आहे."
"कशाबद्दल?"
"दुःखातून समुळ मानवजातीस मुक्त करण्यासाठी."
"म्हणजे?"
"मानवांच्या कल्याणासाठी कल्याणकारी मार्गानं तपश्चर्या करतोय."
"काय मिळणार तपश्चर्येनं?"
सुजाता तशी पाहता लहानपणापासूनच अल्लड होती. तिला कोणाशी काय आणि कसं बोलायचं ते कळत नव्हतं. त्यातच ती बोलून गेली.
सुजाता........जी स्री अंधश्रदाळू होती. ती तपश्चर्येबाबत अशी बोलून गेली. ते तीक्ष्ण शब्द. ते शब्द तथागताच्या काळजावर वार करुन गेले. तसे ते म्हणाले,
"तपश्चर्येनं ज्ञानप्राप्ती होईल. जगाचं कल्याण करता येईल."
सिद्धार्थाची ती अस्थीपंजर अवस्था. ती अवस्था सुजातानं पाहिली. तशी ती म्हणाली,
"आपण किती दिवसापासून तपश्चर्या करता आहात?"
"आज एकोणपन्नासवा दिवस आहे."
"काही खाल्लं का?"
"काहीच नाही."
"का बरं?"
"मला ज्ञानप्राप्ती मिळवायचीय. जगाचं कल्याण करण्यासाठी."
"बरं, काही खाणार का?"
"नाही."
"का बरं?"
"ज्ञानप्राप्ती होणार नाही."
"भगवन, एक सल्ला देवू. ऐकाल."
"ठीक आहे."
"मला सांगा आपण मला वाटते एकोणपन्नास दिवसापासून काहीच खाल्लेलं दिसत नाही हे खरं आहे का?"
"होय, अगदी खरं."
"हे इश्वरीच काम दिसतं."
"मी त्याला मानत नाही."
सुजाताला त्याचा उद्देश चांगला वाटला. तशी ती म्हणाली,
"भगवन, आपणास एक मोलाचा सल्ला देतो. कृपा करुन ऐका अशी माझी इच्छा आहे."
"कोणता सल्ला?"
"आपण ही खीर खावून टाका."
"नको, ज्ञानप्राप्ती होणार नाही."
"परंतू असं ज्ञान मिळवून काय उपयोग की जे ज्ञान तुमच्यापुरतंच सीमीत राहिल."
सिद्धार्थ विचारात पडले. तसे ते परत म्हणाले,
"पुन्हा बोला."
"मी म्हणाले की जर तुम्हाला या अस्थीपंजर अवस्थेत ज्ञानाची प्राप्ती झालीच आणि तुमच्या शरीरात आणि पायात काहीही न खाल्यानं चालण्याचं बळ राहिलं नाही. वाणीत बोलण्याचं बळ राहिलं नाही तर तुम्ही तुमचं मिळविलेलं ज्ञान कोणत्या कामाचं? जन्म आणि मृत्यू ठरलेले आहेत. या जन्ममृत्यूच्या चक्रातून कोणीही सुटणार नाही. तेव्हा हे लक्षात घ्या की या काळात आणि अशा हालतीत अर्थात परिस्थीतीत तुम्हाला ज्ञान मिळालं आणि तुम्ही समजा मरण पावलेच तर हे तुम्हाला मिळालेलं ज्ञानही तुमच्याबरोबर मृत्यू पावेल. हे खरं आहे की नाही."
सिद्धार्थनं ते ऐकलं. एक अनपढ अज्ञानी महिला.........जे बोलून गेली. त्यावर अगदी बारकाईनं विचार करण्यालायक होतं. तसा तो क्षणभर गप्प राहिला. ते पाहून सुजाता पुन्हा म्हणाली,
"भगवन, ते ज्ञान जगाला वाटण्यासाठी तुम्हाला अन्न खावं लागेल. पाणीही प्यावं लागेल. जीवंत राहावं लागेल. अंगात, पायात, वाणीत बळ आणावं लागेल. तेव्हाच तुम्ही ख-या अर्थानं तुम्हाला प्राप्त ज्ञानाचा प्रसार करु शकाल."
"..........."
सुजाता क्षणभर गप्प राहिली. तशी त्याला गप्प पाहून सुजाता पुन्हा म्हणाली,
"भगवन, आपण ही खीर खावून घ्या. असं समजा आपणच माझे भगवन. आपणामुळंच माझं कल्याण झालं असं समजा."
सिद्धार्थ काय समजायचं ते समजला. त्याला त्या जेवणाचा अर्थ समजला. त्यालाही वाटलं,
'सुजाता जे बोलत आहे. ते अगदी बरोबर आहे. कारण मला प्राप्त झालेलं ज्ञान जर माझ्या या अस्थीपंजर शरीरात ताकद नसेल, पायात ताकद नसेल, वाणीत ताकद नसेल तर मला प्राप्त ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही आणि जर मी, मला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मरण पावलोच तर मला प्राप्त झालेले ज्ञान मी जगाला वाटूच शकणार नाही. मग मला प्राप्त ज्ञानाचा उपयोग काय?'
तसा तो म्हणाला,
"ठीक आहे. मी खीर प्राशन करणार."
तो एकोणपन्नास दिवसाचा उपवास. तो उपवास त्याला सुजाताच्या उपदेशापुर्वी सोडावासा वाटत नव्हता. परंतू सुजाताचं बोलणं एवढं प्रभावी ठरलं की त्या बोलण्यानं तथागताचे डोळे उघडले व सुजाता ही त्याची गुरु ठरली.
आलाम उद्दल तथागताचे गुरु. त्या गुरुंनी सिद्धार्थला तपश्चर्या, योगसाधना कशी करायची हे शिकवले होते. परंतू सुजातानं तर त्याला खरा जीवन जगण्याचा अर्थच समजावून सांगीतला. तिच्या त्या दोन मार्गदर्शनाच्या ओळी का असेना, तथागत भारावून गेले. त्यांनी एकोणपन्नास दिवसाचा उपवास सोडला व सुजाताचं मनोधैर्य स्विकारलं.
तो दिवस तसाच निघून गेला. तिनं सिद्धार्थाला खीर चारली. ती खीर त्याच दिवशी चारली नाही तर ती आता आपल्या दासीकरवी रोजच सिद्धार्थासाठी खीर पाठवू लागली. ती केवळ खीरच पाठवत नसे तर सिद्धार्थाला मार्गदर्शन देखील करीत असे. सिद्धार्थ देखील तिचं ऐकायचा. त्याचं कारण त्यालाच समजलं होतं.
सिद्धार्थ कल्याणकारी कार्य करीत आहे. याची कल्पना सुजाताला आली होती. खरं तर ती त्याची गुरुच होती. परंतू ती स्वतःला त्याची शिष्या समजीत होती. कधीकधी त्याच वडाच्या झाडाखाली बसल्यानंतर सिद्धार्थ जेव्हा त्याला प्राप्त झालेले विचार त्या बकरौर ग्रामातील लोकांना सांगायचा. तेव्हा ते भारावून जायचे. यातच सुजाताचे सासरे आणि काही गावकरी सिद्धार्थाचे अनुयायी बनले होते.
सुजाता जशी सिद्धार्थासाठी खीर पाठवायची. तशीच ती कधी कधी सिद्धार्थशी बोलायला यायची. चर्चा व्हायची. त्यातच चर्चेदरम्यान सिद्धार्थचे उपदेश किती मोलाचे अाहे हे सुजाताला वाटायचे.
सुजाताला आणखी एक गोष्ट वाटायची, ती म्हणजे सिद्धार्थनं अधिक काळ जगावं. त्याला जगाचं कल्याण करता यावं. म्हणून ती त्याला अगदी त्याची बहिण असल्यासारखी जपायची. त्याच्या प्रकृतीची काळजी घ्यायची. तशीच त्याच्या जीवाचीही. त्यातच सिद्धार्थ देखील तिची प्रत्येक गोष्ट ऐकायचा नव्हे तर सुजाताही त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायची.
सुजाताच्याच बोलण्यावरुन आज सिद्धार्थाचा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाला होता. खरी ज्ञानप्राप्ती त्याला याच बकरौरच्या वडाच्या वृक्षातच झाली. परंतू सुजातानं त्याला गावोगावी जावून धर्मप्रसार करा असं म्हटलं नव्हतं. म्हणून की काय, ते बकरौर क्षेत्र सिद्धार्थच्या ज्ञानप्राप्तीचं क्षेत्र ठरलं नाही.
तो काळच तसा होता. त्या काळात सर्व लोकं देवी देवता, देव, भूत मानणारे होते. ते प्रत्यक्ष माणसाला शिव्या हासडत. परंतू देवाची मनोभावे पुजा अर्चना करीत. एवढंच नाही तर ती मंडळी वृक्ष, दगड, प्राणी आणि काही नैसर्गिक घटनांना देव मानत असत. ती मानकं असायची देव अस्तीत्वात असल्याची.
तथागत जेव्हा झाले. त्यांनी लोकांच्या मनातून ही अंधश्रद्धेची पट्टी हटवली नव्हे तर त्यासाठी प्रयत्न केला. सर्वप्रथम तथागतानंच त्या वडाच्या वृक्षाखालचा देव नदीत शिरवून पहिली क्रांती केली. कारण सुजातानं कोणत्याही वृक्षाला देव मानून नवश केलेला नाही. तर ज्या वृक्षाखाली ती दगडाच्या देवाची का असेना, मुर्ती होती. त्याच वृक्षाला नवश केला. परंतू तथागतानं ती मुर्तीच हटवली व प्रत्यक्ष त्याच झाडाखाली बसून ते स्वतःच देव असल्याचं प्रमाणं दिलं. त्यातच त्या वेळच्या लोकांना ते कळलं नाही की तथागतानं काय केलं. त्यांनी तथागतांना मानलं. कारण त्यांचे उपदेश बरेच उपयोगाचे होते. त्यांनी तर लोकांना शांती कशी मिळवायची त्याचं ज्ञानामृत पाजलं. एवढंच नाही तर ज्या युद्धांमुळे नरसंहार व्हायचा. शेकडो स्रिया विधवा व्हायच्या. तसेच शेकडो शिलवान स्रिया स्वतः अग्नीत उडी मारायच्या. आपल्याला हिनतेचं जगणं जगावं लागू नये म्हणून. ह्या सर्वांचे प्राण केवळ सिद्धार्थामुळे वाचवता येवू लागले. त्यामुळं काही राजांचे अपरीमीत नुकसान झाले. कारण त्यांचा विश्वास ताकदीवर होता. त्यांना साम्राज्यविस्ताराचा लोभ होता नव्हे तर त्यांची ताकद त्याच बुद्धाच्या तत्वामुळं शीण होत होती. कारण त्यावेळचा युद्धाचा नियम.
युद्धामैदानात शस्र टाकलेल्या लोकांवर वार करु नये हा युद्धाचा नियम होता. असा नियम ज्या राजानं भंग केला तर त्या राज्यांना वाळीत टाकण्याचं काम त्यावेळचे राजे करीत असत. हे राजे वचनाचे अधिक पक्के होते. त्यांचा आपल्या ताकदीवर विश्वास होता.
तथागतानं जो शरणार्थी बाबत उपदेश केला. त्यानुसार त्यावेळच्या कितीही बलाढ्य राजांनी आपल्यापेक्षा कनिष्ठ राजांवर आक्रमण केलं तरी ते कनिष्ठ राजे शस्र हातात धरत नसत वा उचलत नसत. त्यामुळं मोठमोठी राज्ये ही आपोआपच धराशायी झाली. त्यांचा गर्व खचला. साम्राज्य विस्ताराचंही धोरण पार बुडलं. त्यामुळे की काय, अशी मोठमोठी राज्ये तथागतांचा तिरस्कार करु लागली.
सुजाता सिद्धार्थला अगदी जीवापाड जपत होती. तिला वाटत होतं. सिद्धार्थाच्या रुपानं जगाचं कल्याण व्हावं. म्हणून की काय, ती सिद्धार्थाला काही माहितीही ती देत असे. सिद्धार्थही तिला मानत असे. तिच्या उपदेशाचं पालन करीत असे. त्यातच एक दिवस ती त्याला भेटली. म्हणाली,
"भगवन, आपणाला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट बोलू."
सिद्धार्थनं तिच्याकडं पाहिलं. तसा काही वेळानं तो म्हणाला,
"बोल सुजाता, काय म्हणायचं ते बोल."
"भगवन, ही जागा तुमच्यासाठी सुरक्षीत नाही. येथील राजे आणि लोक तुम्हाला भजत नाही. इथे तुमचा सदोदित तिरस्कार चालतो. तुमचा इथे मृत्यूही होवू शकतो. तेव्हा तुम्ही हे स्थान हवं तर सोडलेलं बरं."
सिद्धार्थनं ते ऐकलं. तसा तो म्हणाला,
"मला मृत्यूचं भय नाही. मला साप, विंचवाची भीती नाही. मला वाघ सिंहाचीही भीती नाही."
"भगवन, तुमचं ठीक आहे. तुम्हाला भीती नाही, त्याचंही ठीक आहे. परंतू जगाचं काय? जग कोणाकडं बघेल, तुमच्यानंतर. तुम्हाला जे माहित होणार, ते आम्हाला माहित होणार नाही. कारण आम्ही मोहभोगी आहोत. तुम्ही नाही. तेव्हा तुम्ही जगणं आवश्यक आहे. तुम्ही जगायला हवं. म्हणून माझा हा खटाटोप.हे भगवन, माझं ऐका नव्हे तर ऐकावंच लागेल."
सिद्धार्थ ऐकत होता त्या सुजाताचं. ती सुजाता सांगत होती त्याला. तसा तो म्हणाला,
"सुजाता, तुला माहित आहे ते स्थान. जिथं सुरक्षीतता असेल. जिथे माझा जीव सुरक्षीत असेल आणि जिथे माझे उपदेश सुरक्षीत असतील."
"होय, मला माहित आहे ते स्थान. तिथे तुम्हाला कोणीच अस्वस्थ करणार नाही. जिथे तुम्ही सुरक्षीत असाल आणि तुमचे उपदेशही सुरक्षीत असतील."
"ठीक आहे तर. मग ते स्थान कुठे आहे ते सांग बरं. मला तर त्या स्थानाकडे लवकरच निघायला हवं." सिद्धार्थ आत्मीयतेनं म्हणाला. तशी ती त्या स्थानाचं वर्णन करु लागली. ते लक्ष देवून सिद्धार्थ अगदी बारकाईनं ऐकू लागला.
"तो उर्वेलाचा प्रदेश आहे. मी त्या स्थानाला चांगलं ओळखते. कारण माझा जन्मच मुळात उर्वेला प्रदेशातील. त्या स्थानाबाबत मला चांगली माहिती आहे. ते स्थान अगदी सुरक्षीत आहे तुम्हाला तपश्चर्या करायला. मी तिथे तुमच्या जेवनाखावणाची चांगली व्यवस्थाही करील. ते स्थान. घनदाट जंगलात आहे ते स्थान. ते स्थान फाल्गू नदीशेजारी आहे. तिथं एक पिंपळाचे वृक्ष आहे. तिथं आजुबाजूला जंगल असल्यानं तिथं कोणीही जात नाही. जावू शकत नाही. कारण आजुबाजूला जे जंगल पसरलेलं आहे. त्या जंगलात हिंस्र श्वापदाच्या धाकानं कोणताही मनुष्य येवू शकत नाही. पक्षीही पाय नाही ठेवू शकत अशी स्थिती आहे तेथील. परंतू तुम्हाला तिथे काहीच होणार नाही. कारण तुम्ही या विश्वातील अलौकीक जीव आहात. तिथं एक पिंपळाचं झाड आहे. त्या पिंपळाच्या खाली बसून तपश्चर्या करा."
सुजातानं त्या ठिकाणाचं वर्णन केलं. तसा सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणावर गेला. जे स्थान उर्वेला प्रदेशात आहे. तिथं असलेल्या पिंपळाच्या झाडात तो तपश्चर्या करु लागला. त्यासाठी त्याला सुजाताही जातीनं मदत करु लागली होती.
उर्वेला प्रदेशात फाल्गू नदीच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या करीत असतांना व एकटे असतांना विचारांचं काहूर सिद्धार्थच्या मनात उठत असे. अनेक प्रकारचे चांगले वाईट विचार यायचे त्यांच्या मनात. त्यातच त्या वाईट आणि चांगल्या विचारांशी लढता लढता सिद्धार्थ मार्ग शोधत असे. चांगली टिपणं अगदी डोक्यात फिट बसवून ठेवत असे. त्यातच याचप्रकारच्या संमीश्र विचाराचं उत्खनन करुन सिद्धार्थनं त्यातून काही तत्वे काढली. जी जगाला सांगीतल्यास त्यातून जगाच्या दुःखाचं निवारण होवू शकेल.
सर्व दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग म्हणजे निर्वाण. निर्वाणालाच प्रथम स्थान द्यावं. निर्वाण अवस्था प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी येतच असते.
निर्वाण अवस्था. ती प्रत्येकाच्या आयुष्यात येत असली तरी लोकं त्या निर्वाणाला महत्व देत नाहीत. त्यांना तर असं वाटते की त्यांच्या आयुष्यात निर्वाणच नाही. त्याच निर्वाणाची भीती न बाळगता ती लोकं जगत असतात आणि क्रमशः दुःख प्राप्त करीत असतात नव्हे तर दुःखी कष्टी होत असतात. ते संपत्तीचा संचय करीत असतात. जी संपत्ती निर्वाणानंतर मिळत नाही वा कोणीही घेवून जात नाही.
हे जीवन नश्वर असं जीवन आहे. या जीवनात जीवंतपणी शरीरात एक श्वास वास करीत असतो. तो श्वास म्हणजे त्याला कोणी आत्मा म्हणतात. कोणी त्याला देव म्हणतात, कोणी आणखी काही. ह्या श्वासाला तो आहे, तेव्हापर्यंत गर्व अर्थात अहंकार असतो.याच अहंकारापोटी हा श्वास राग, लोभ, द्वेषाच्या आहारी जात असतो.
राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर हे माणसाचे पाच शत्रू. हे सर्व शत्रू संपत्ती संचय करण्यातून निर्माण होत असतात म्हणजे एखाद्याला जेव्हा दुस-यांकडून संपत्ती मिळत नाही, तेव्हा राग येणारच. तसेच एखाद्याला पुत्र असतील, तर पुत्रप्राप्ती झाल्यानंतर लोभ सुटणारच आणि द्वेष........त्यात तुमचा स्वार्थच असतो. प्रतिस्पर्धा असते पुढे जाण्याची. ती प्रतिस्पर्धा नकोच आपल्या जीवनात कधी. ही अगाढ संपत्ती, ही वैभवसंपन्नता असली की गर्वही चढतो. हा गर्व म्हणजेच अहंकार. जो अहंकार हानीकारक असतो.
राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर हे आपले शत्रू. तसं पाहता जी आपल्याजवळ अगाढ संपत्ती असते, ती अगाढ संपत्ती आपली आपल्याजवळ टिकत नाही. तशीच ती वैभवसंपन्नताही. तिला टिकवायला जीवंत राहावं लागतं. परंतू प्रत्येक व्यक्ती हा जीवंत राहात नाही. तो कधी ना कधी मरण पावतोच. प्रत्येक जन्मणारा व्यक्ती हा मरण पावतोच. ही सत्यता आहे. ही सत्यता प्रत्येक जन्मणा-या जीवास माहित आहे. तरीही हा एवढा अहंकार. तरीही हा एवढा राग अन् तरीही हा एवढा लोभ. हे सर्व रिपू असून हे रिपू प्रत्येक जन्मणा-या जीवाची हानी करीत असतात.
जो मनुष्य या रिपूंची पर्वा करीत नाहीत. तेच महापरीनिर्वाणास पोहोचतात अन्यथा त्यांना मोक्ष प्राप्त होत नाही. आज सत्य हे आहे की व्यक्तीने कितीही लोभ करुन कितीही धनसंपत्ती संचय केली, तरी त्याचे म्हातारपणी त्याला सुख मिळेलच असे नाही. आज कितीही धनसंपत्ती असली तरी मोठे झाल्यावर पुत्र त्या संपत्ती धारकास विचारच नाहीत. तसेच कितीही संपत्ती असली तरी काही काही पुत्र त्या संपत्तीचाही त्याग करतात. पुर्वीही असंच होतं. कितीही कष्ट करुन पित्यानं कितीही मोठं राज्य तयार केलं असलं तरी त्याचे पुत्र साम्राज्य मिळविण्यासाठी प्रसंगी बापाची व भावाची हत्या करायला मागेपुढे पाहात नसत. त्यातच ती संपत्ती व तो साम्राज्यविस्तार त्या मेलेल्या बापानं अपार कष्टानं केला असला तरी ते राज्य त्याच्या मरणानंतर त्याच्या सोबत जात नसे. म्हणून असं दुस-यांना दुःख देवून साम्राज्यविस्तार करण्याऐवजी विशेष म्हणजे दुस-यांना सुखात ठेवले तरच खरं निर्वाणपद प्राप्त होवू शकते.
निर्वाणाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक चांगलं निर्वाण व दोन वाईट निर्वाण.
वाईट निर्वाण हे वाईट कर्मावर आधारीत असते. जर मनुष्याने चांगलं कर्मच केलं नाही. सतत राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर व गर्वच करीत राहिला तर त्याला निर्वाणपद हे वाईटच मिळणार. तसेच एखाद्यानं चांगलं कर्म केलं तर त्याला निर्वाणपद चांगलंच मिळणार. ज्याला चांगलं निर्वाणपद प्राप्त होते, तोच व्यक्ती महापरीनिर्वाणास प्राप्त होतो.
सिद्धार्थ गौतम बुद्धांनी हेच तत्व सांगीतलेले असून त्यांनी चांगल्या निर्वाणाचा मार्ग सांगीतला. जो मार्ग शांती प्रदान करणारा होता. ते म्हणत की फक्त चांगलं कर्मच आपल्या सोबत येतं. वाईट कर्म नाही. तसेच कितीही आपल्या जवळ संपत्ती असेल, तर ती आपल्यासोबत जात नाही. सर्व इथल्या इथंच राहातं. कोणी काहीही घेवून जात नाही. म्हणून माणसानं चांगलं कर्म करावं. वाईट कर्म करु नये.
आज सिद्धार्थ गौतमाचंच तत्व लागू पडतं. कारण आज एक पिता आपल्या पुत्रावर अपरंपार प्रेम करतो. त्याला जगविण्यासाठी व त्याला अपारंपारीक सुख देण्यासाठी वाईट कर्मही करतो. परंतू तो जेव्हा म्हातारा होतो. तेव्हा त्यांची ती मुलं त्याला सोडून पत्नीच्या मनानुसार चालतात व दुःख होतं. म्हणून सिद्धार्थ म्हणतात की चांगले कर्म करा व लोभ सोडा.
पित्याचे वाईट कर्म हेच त्याच्या पुत्राच्या वाईट वागण्याचे कर्म ठरत असतात. कारण तो पुत्र आपल्या पित्याच्याच कर्माचे अनुकरण करीत असतात. सिद्धार्थानं ह्याच तत्वावर जोर दिल्यानं सिद्धार्थानं सांगीतल्यानुसार आपोआपच निर्वाणाला महत्व प्राप्त झालं आहे. कारण आयुष्य जगत असतांना आपण असंच आयुष्य जगत असतो. अगदी राग, लोभ, द्वेष, मद, मत्सराचं. तेव्हा हे आयुष्य आपल्या जीवनात दुःखच आणत असतं. असं दुःख येवू नये म्हणून निर्वाण. निर्वाणानंतर दुःख कायमचं संपत असल्यानं दुःख निवारण्याचा मुख्य मार्ग हा निर्वाण होय असं गौतम बुद्ध म्हणतात. त्याचबरोबर दुःखावर थोडीशी फुंकर मध्यममार्ग वापरल्यानं टाकू शकतो व आपल्या जीवनातील दुःख थोडंसं हलकं करु शकतो असंही गौतम बुद्ध म्हणतात.
महत्वाची गोष्ट म्हणजे निर्वाण म्हणजे मृत्यू. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. जो माणूस जन्मला. तो कधी ना कधी मरणारच आहे. असे असतांना अति, लोभ, अति स्वार्थ आणि अति पैसा कमविण्याचा हव्यास आपण करु नये. मृत्यूनंतर जेही आपण कमवतो, ते जिथले तिथेच राहते, तसेच आपले वागणे जर चांगले नसले तर आपली मुलंही चांगली निघत नाही. म्हणून चांगली मुलं निघावीत, यासाठी आपले कर्मही चांगले असायला हवेत हे शंभर प्रतिशत खरं आहे. कारण जशा बिया पेरु. तसे पीक तयार होईल. तेव्हा चांगली मुलं आणि पिढी तयार करण्यासाठी आपले चांगले कर्मही कारणीभूत असतात आणि असे वाईट कर्म आलेच तर त्याचे निवारण करण्यासाठी निर्वाण हाच अंतिम मार्ग ठरतो. म्हणून निर्वाणाला न घाबरता निर्वाणावर प्रेम करावे. तोच दुःख निवारण्याचा अंतिम मार्ग होय.
परीवर्तन काळाची गरज आहे. जसजशी सृष्टी बदलते. तसतसं परीवर्तन प्रभावी ठरु लागतं. सुजाताच्या म्हणण्यानुसार सिद्धार्थ उर्वेला प्रदेशात आला. त्यांनी तिथंच तपश्चर्या करुन नव्हे तर विचारांचं संशोधन करुन मध्यममार्ग शोधला आणि शेवटी निर्वाण. दुःख निवारण्याचा अंतिम मार्ग. त्यानंतर त्यांनी सुजाताच्या म्हणण्यानुसार त्याला प्राप्त झालेले ज्ञान जगाला देण्यासाठी उपदेशाचा मार्ग पत्करला. परंतू त्या धम्मपदाचा प्रसार करण्यापुर्वी त्यानं आधी सुजाताची भेट घेण्याचं ठरवलं. तसा तो उर्वेला प्रदेशातून रवाना झाला. तो बकरौरला जाण्यासाठी. ज्या प्रदेशात सुजाता राहात असे.
तो बकरौरचा प्रदेश. सिद्धार्थ चालत होता ती वाट. जी वाट बिकट होती. परंतू सिद्धार्थ जाणारच होता त्या वाटेनं. कारण तोच मार्ग त्याच्या यशाचा मार्ग होता.
हा यशाचा मार्ग दाखवला होता सुजातानं. सुजातानं खीर चारतांना हेच सांगीतलं होतं सिद्धार्थाला. सिद्धार्थाला ते सगळं आठवत होतं आज. ती अस्थीपंजर झालेली अवस्था. त्यातच ते मरणाच्या दारात असलेलं शरीर. तरीही वाटत होतं आपल्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, तोपर्यंत आपण अन्न ग्रहण करु नये. परंतू तेवढ्यात सुजाता आली. ती म्हणाली,
"भगवन, आपल्याला जगायलाच हवं. हे उपदेश आणि हे ज्ञान जगाला देण्यासाठी जगणं महत्वाचं आहे आणि ते जगण्यासाठी तुम्हाला खाणं महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा खाणार. तेव्हाच जगणार."
सुजाता ही त्याचेसाठी मानवी संवेदना नाही तर प्रेरणा घेवून आली होती. सिद्धार्थाचा गौतम बनला. तथागतही बनला. परंतू ती सुजाताचीच कृपा होती. ती जर आली नसती आणि तिनं जबरदस्तीनं खीर जर चारली नसती आणि जगायला लावलं नसतं, तर कदाचित आज सिद्धार्थचा तथागत बनला नसता. हे तेवढंच खरं होतं.

************************************************************************************************

तो जंगलाचा भाग होता. तो रस्त्यात दगडधोंडे होते. त्यातच त्या रानात खाचखळग्याची वाट होती. त्यातच त्या रस्त्याने काटेगोटेही होते. वाटेत जंगली श्वापदं होती. तरीही त्याला भीती वाटत नव्हती. सिद्धार्थ चालत होता तो रस्ता. तीच खाचखळग्याची वाट. त्याच्या अंगावर पुरेसे वस्रही नव्हते.
सिद्धार्थच्या अंगात पुरेसे वस्रही नव्हते. त्याच्या अंगावर छतही नव्हते नव्हे तर त्याला थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण करता यावे म्हणून असं कोणतच संरक्षक कवच नव्हतं. तरीही ते उन्हातान्हात वावरले. राजवाड्यात सर्व ऐहिक सुख असतांना त्या सुखाचा त्याग करीत तसेच सर्व राजषी वस्राचा त्याग करुन सिद्धार्थ वर्षभर केवळ आणि केवळ एकाच वस्रात राहिले. तेही चिऊरात. ह्या चिवूरात थंडी, ऊन, वारा, पाऊस झेलायची ताकद होती.
ते पिंपळाचं झाड सिद्धार्थासाठी एक वरदान ठरलं होतं. त्याच झाडात जगता जगता सिद्धार्थ दिव्यज्ञान शोधत होता आणि ते सापडताच आज तो ते वाटण्यासाठी सर्वप्रथम सुजाताच्याच घरी जात होता.
रस्त्यावरचे दगडधोंडे ओलांडत तसेच काटेगोटे ओलांडत सिद्धार्थ सुजाताच्या घरी पोहोचला. जसा तो सुजाताच्या घरी पोहोचला, तसं त्यानं सुजाताला पाहिलं, ती आपल्या नोकराशी भांडत आहे.
सिद्धार्थनं ते पाहिलं. तसा सिद्धार्थ सुजाताला म्हणाला,
"सुजाता हे तुझं कर्म योग्य नाही."
सुजाता सिद्धार्थला भगवानच समजायची. कारण तो ज्या वृक्षात तिला दिसला होता. त्याच वृक्षाला नवश केल्यानं तिला पुत्रप्राप्ती झाली होती.
सुजाताचे नोकराशी वागणे, त्यातच सिद्धार्थनं ते पाहणे....... सुजाताचं तसं वागणं सिद्धार्थाला खपलं नाही. तसं त्यानं तिला म्हटलेलं तिला भावलं व ती म्हणाली,
"भगवन, यात माझी काय चूक आहे. हा नोकर माझं काहीच ऐकत नाही. तो आपल्याच तालात वागतो आहे. मग मी तरी काय करु."
सिद्धार्थनं तिचं बोलणं ऐकलं. तसा सिद्धार्थ तिला म्हणाला,
"सुजाता, तुला पत्नीधर्माची योग्य कल्पना नाही. पत्नी कशा असतात तेही तुला माहित नाही."
"भगवन, म्हणजे? याचा अर्थ काय? पत्नीचेही प्रकार असतात काय?"
"होय." सिद्धार्थ म्हणाला.
"कोणते प्रकार.? जरा समजावून सांगाल काय?"
सिद्धार्थनं लगेच होय म्हटलं. तसा तो सांगू लागला व सुजाता निमुटपणे ऐकू लागली.
"सर्वसाधारण पत्नीचे सात प्रकार असतात. पहिला विनाशकारी पत्नी, दुसरा चोर पत्नी, तिसरा मालकीण पत्नी, चवथा मातृ पत्नी, पाचवा बहिण पत्नी, सहावा मित्र पत्नी व सातवा प्रकार म्हणजे दास पत्नी.
पहिल्या प्रकारात विनाशकारी पत्नीचा समावेश होतो. ही पत्नी निर्दयी स्वरुपाची असते. तसेच ही पत्नी विवाहबाह्य संबंध ठेवत असून तिला अन्य पुरुष वर्ग आवडतो व ती आपल्या पतीला तो तिच्यावर कितीही प्रेम करीत असला तरी टाळण्याचा प्रयत्न करीत असते. ही पत्नी घरचा विनाश करीत असते.
दुसरा प्रकार आहे चोर पत्नी. ही पत्नी आपल्या घरची सर्व ही पत्नी आपल्या पतीचा पैशाच्या व्यवहारासाठी जीवंही घेवू शकते. अशी पत्नी आपल्या पतीआडून आपल्या भावा बहिणीला किंवा माहेरच्या नातेवाईकाला किंवा आपल्या हितसंबंधातील व्यक्तींना पैसेही देवू शकते वा पैशाचे व्यवहार करु शकते.
तिसरी मालकीण पत्नी. ही पत्नी आपल्या पतीवर हावी होत असते. ही पत्नी आपल्या पतीचं किंचीतही न ऐकता त्याला कठोर दंड देत असते. ही पत्नी आपल्या सासूसास-याची सेवाही करीत नाही. त्यातच अशाप्रकारची पत्नी ही आळशी असून मोठमोठ्या धमक्या देत वागत असते.
चवथी मातृ पत्नी. अशाप्रकारची पत्नी ही मातृभक्त असते. ही पत्नी आपल्या पतीशी त्याच्या आईसारखा व्यवहार करीत असते. ती दयाळू स्वभावाची असून ती पतीच्या संपतीचीही काळजी घेत त्या संपत्तीला सांभाळत असते.
पाचवी बहिण पत्नी. हिला भगीनीसमा म्हणतात. ही पत्नी आपल्या पतीसोबत त्याची बहिण असल्यासारखा व्यवहार करीत असतात. ही पत्नी आपल्या पतीलाही प्रसन्न करीत असते.
सहावी पत्नी ही मित्र स्वरुपाची पत्नी असते. ही पत्नी आपल्या पतीवर निरतिशय प्रेम करीत असून ती आपल्या पतीची सर्वात जवळची मैत्रीण असते. ती सुख दुःखात आपल्या पतीशी एकनिष्ठ राहात असून अशी पत्नी सुखदुःखात आपल्या पतीला मदत करीत असते.
सातवी पत्नी म्हणून दास पत्नीचं वर्णन करावंसं वाटतं. हिला दासीसमा असंही म्हणतात. ही पत्नी अतिशय समजदार रुपात वावरत असून विपरीत परीस्थितीतही ही रागे भरीत नाही. अर्थात पती कितीही कठोर शब्दांचा वापर करीत असेल तरीही ही पत्नी शांत असते. ती पत्नी पतीची आज्ञा शिरोधारी मानत असते.
आता सुजाता, तू सांग की तुला कोणत्या स्वरुपाची पत्नी होणे आवडेल. मी तुला पतीच्या सर्व स्वरुपाचे वर्णन सांगीतले आहे." सिद्धार्थचं बोलून झालं होतं. तशी सुजाता अतिशय नम्रपुर्वक म्हणाली,
"भगवन, आपण, मला छान उपदेश केला. मी आता एक चांगली व आदर्श पत्नी म्हणून व्यवहार करणार.
भगवन, माझा स्वभाव वाईट बनण्याचे कारण म्हणजे माझे वडील. माझे वडील जमीनदार होते. ते मला अशा सुखात ठेवीत असत की मला कोणताच त्रास झाला नाही. त्यातच आमच्या घरी नोकरचाकर भरपूर असल्यानं आम्हाला कशाचीच चिंता नाही. त्यातच भगवन, माझ्या वडीलांनी माझा या राजघराण्याशी विवाह लावून दिला. त्यामुळं की काय, मला विचार करायला वेळच मिळाला नाही. परंतू आज आपला उपदेश ऐकला व मी कृतार्थ झाले. आता मी एक आदर्श पत्नी बनून दाखवणार."
सिद्धार्थ सुजाताचं ते ऐकत होता. त्याला बरं वाटलं. त्याला वाटलं होतं की आपल्या उपदेशानं कदाचित सुजाताला राग येणार. परंतू उलट घडलं होतं. सुजाताला राग आला नव्हता. तर तिची चूक तिनं स्विकार केली होती. तसं पाहता तिनं ती चूक स्विकार करुन एक आदर्श पत्नी बनण्याचे संकेत तिनं दिले होते नव्हे तर आदर्श पत्नी बनण्याचे कबूल केले होते. ते जणू तिचं सिद्धार्थाला दिलेलं वचनच होतं.
सिद्धार्थानं सुजाताशी ब-याच गोष्टी केल्या. त्यानंतर तो जगभ्रमतीसाठी निघाला. परंतू वाटेतून जातांना तिच्या मनात तेच विचार होते. जे सुजातानं त्याच्या मनात पेरले होते.
बुद्ध याचा अर्थ ज्ञानवंत. ज्याला महासागराएवढे प्रचंड ज्ञान आहे. तसेच ज्याने स्वतः स्वतःच्या इंद्रीयावर विजय मिळवला आहे तो.
सिद्धार्थानं जिथं तपश्चर्या केली. त्या स्थानाला बुद्धगया म्हणतात व ज्या वृक्षाखाली तपश्चर्या केली. त्याला बोधीवृक्ष म्हणतात. परंतू खरं पाहता ह्या दिव्य ज्ञानाची सुरुवातच वडाच्या झाडापासून सुरु झाली. त्यामुळं वडाच्या झाडाला हिन समजू नये.
सुजाता नावाची ती स्री. ती त्याची पत्नी नव्हती. परंतू एक सखी म्हणून तिनं भुमीका पार पाडली. तिनंच सिद्धार्थाचं जीवन फुलवलं नव्हे तर या सरळ सोप्या मार्गानं सिद्धार्थाला मार्गदर्शन करुन त्याचं मनोधैर्य खचू दिलं नाही.
सुजाता ही देखील मायबापाच्या घरी राजवैभवात राहिली. परंतू ज्यावेळी तिनं गौतमाकडून त्याचे उपदेश ऐकले, तेव्हा तिच्या मनात जो अहंम होता, तो पार गळून पडला. त्याचा प्रसंग असा. एकदा सिद्धार्थाला सुजातानं विचारलं.
"भगवन, आपण कुठून आलात आणि कुणाचे पुत्र आहात?"
सिद्धार्थानं ते ऐकलं. तसं असत्य बोलायची सवयच नव्हती सिद्धार्थांना. त्यातच ते म्हणाले,
"मी कपिलवस्तू राज्याचा रहिवासी आहे. माझ्या वडीलाचे नाव शुद्धोधन. माझे वडील राजा आहेत कपिलवस्तूचे. मी त्यांचा मुलगा. मला माझ्या वडीलांनी अपार सुख दिलं. कोणत्याच गोष्टीची मला राजवाड्यात कमी नव्हती. त्यातच माझा विवाहही झाला.
मला सुख देण्यामागे माझ्या वडीलाची भुमिका अशी की माझी आई महामाया माझ्या लहानपणीच मृत्यू पावली होती. त्यातच माझं छत्र हरवल्याचं दुःख माझ्या वडीलांना झालं. म्हणून की काय, माझ्या वडीलांनी मला अंतर दिलं नाही. माझा सांभाळ माझी मावशी गौतमीनं केला.
मी राजवैभवात लोळलेला. माझ्या वडीलांनी कधीच मला राजवाड्याबाहेर जावू दिलं नाही. परंतू ते एकदा लढाईनिमित्य बाहेर गेलेले असतांना मला बाहेर जाण्याचा योग आला व मी चार घटना पाहिल्या. त्यात एक तिरडीवर जाणारा व्यक्ती पाहिला. दुसरा आजारी व्यक्ती पाहिला. तिसरा म्हातारा व्यक्ती पाहिला आणि चवथा प्रसंग म्हणजे एक संन्यासी व्यक्ती. यामध्ये तिनही प्रसंगात मला दुःख दिसलं आणि चवथ्या प्रसंगात जो संन्यासी दिसला. तो अगदी आनंदात होता. मग मी ठरवलं, आपण संन्यासी व्हायचं. हा राजपाट, मुलंबाळं आणि पत्नी सर्व सोडायचं नव्हे तर ही मोह माया, राग द्वेष सारं काही.
माझ्या वडीलांनी सांगीतलं की महामाया ही माझी आई प्रसुतीसाठी जेव्हा माहेरी निघाली. त्यावेळी वाटेतच लुंबीनीमधील बागेत एका शालवृक्षाखाली ती प्रसूत झाली व माझा जन्म झाला.ह्या दिवसानंतर काही दिवसातच माझ्या आईचं निधन झालं.
माहित आहे सुजाता, माझं वय सोळा वर्षाचं असतांना माझ्या वडीलांनी माझा विवाह यशोधरेशी लावून दिला. मी माझ्या पत्नीसोबत काही वर्ष राहिलो. तिच्यापासून मला एक पुत्रही झाला. राहूल नावाचा. शेवटी मी सगळं सोडलं आणि संन्यास पत्करला.
मी जेव्हा एकोणतीस वर्षाचा होतो, तेव्हाच मी संन्यासी जीवनाला अंतिम मार्ग समजून एका पावसाळी, बाहेर धो धो पाऊस सुरु असतांना रात्रीचा माझ्या पत्नीचे म्हणजे यशोधरेचे ओझरते दर्शन घेतले व तिचे अंतिम दर्शन घेवून तसेच माझे बाळ राहूलचे मुख हळूच चुंबून मी राजवाड्याबाहेर निघालो. मी बाहेर पडणार व संन्यास स्विकारणार हे कोणालाही माहित नव्हतं. फक्त हे चन्नला माहित होतं. तो माझा सारथी होता. त्याला कंठक घोड्यासह बाहेर उभं राहायला सांगीतलं होतं. त्याचं कारणंही तसंच होतं. जर मी पायी निघालो असतो तर, राजवाड्यात मी न दिसल्यानं माझ्या वडीलांनी माझा शोधाशोध घेण्यासाठी सैन्य पाठवले असते व मी सापडलो असतो. म्हणून मी कंठक घोडा वापरला होता. त्यातच त्या घोड्याच्या टापाचा आवाज होवू नये म्हणून चन्ननं कंठकाच्या पायाला कापडं बांधली होती.
सर्वप्रथम चन्ननं मला राजगृहच्या जंगलात सोडून दिलं व तो माघारी फिरला. त्यानंतर मी भटकत भटकत आपल्या बकरौरमध्ये आलो आणि सुजाता तुझ्याच सांगण्यावरुन उर्वेला प्रदेशात गेलो. आज जे काही उपदेश देत आहे. ही तुझीच प्रेरणा आहे. तू जर नसती तर मी कदाचित जीवंतही नसतो. मी केव्हाच मरुन गेलो असतो व माझे हे मला प्राप्त झालेले ज्ञान माझ्या मृत्यूसह केव्हाच दफन झाले असते माझ्यासह. ते मला कळलेही नसते हे तेवढंच खरं सुजाता. तू माझी भाग्यविधाता आहेस. आता फक्त एकच इच्छा आहे आणि तीच अंतिम इच्छा आहे माझी की माझं हे मला प्राप्त झालेलं ज्ञान जगाला मिळावं. कारण मी जो मार्ग प्राप्त केला, तो मार्ग समुळ दुःखाचा नाश करणारा मार्ग आहे."
सुजातानं सिद्धार्थाची जीवनकहाणी ऐकली व तिच्याच हलचल निर्माण झाली. तशी ती विचार करु लागली. परीवर्तनाचा. सिद्धार्थानं आपल्या जीवनात सर्वच ऐहिक सुखाचा त्याग केला व तो बुद्ध बनला आणि आपण असे संसाराच्या राहाटगाडग्यात अजूनही गुरफटत आहोत. मी.......मी. माझा पती, माझा मुलगा करीत बसलो आहोत. परीवर्तन काळाची गरज आहे. आपण हे बुद्धत्व स्विरारावं. ह्या सिद्धार्थाचे विचार अनमोल आहेत. हे विचार मरु नयेत कधीही. सिद्धार्थ जगणार नाहीत जास्त काळ. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचारही मरतील कदाचित. परंतू आपण ते विचार मरु देवू नयेत. आपण त्यांचं शिष्यत्व पत्करावं व आपण त्यांचे हे विचार जगात पेरावेत. आज त्याच विचारांची जगाला गरज आहे. आपण हे विचार जगाला द्यावेत. ते विचार चिरकाल टिकवावेत. नव्हे तर जगाचे कल्याण करण्यासाठी ज्याप्रमाणे सिद्धार्थानं संसाराचा त्याग केला. आपणही तसाच त्याग करावा.
सिद्धार्थ सांगत होता. सुजाताला त्या दिव्य ज्ञानाच्या गोष्टी. ज्या गोष्टी त्यानं अनुभवातून शिकल्या होत्या. तशी सुजाताही आपल्या मनातील विचारात परीवर्तन करीत होती. सिद्धार्थाला ते माहित नव्हतं. सिद्धार्थ परत म्हणाला,
"माहित आहे सुजाता, एकदा एक स्री माझ्याकडे आली. ती रडत होती व रडता रडता मला म्हणत होती की तिच्या लेकराला एका सापानं दंश केला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. तो तिचा एकुलता एक पुत्र असून मी त्याला जीवंत करावं. ती अशाप्रकारे मला विनंती करीत होती. परंतू मला सांग सुजाता हे जन्म मरण माझ्या हातात आहे का? नाही ना." सिद्धार्थ तसा थांबला. तशी सुजाता त्याला म्हणाली,
"मग काय घडलं भगवन?"
"मी म्हटलं की तूला माहित नाही की काय, मनुष्य जेव्हा जन्म घेतो, तेव्हाच माणसाचा मृत्यू ठरलेला असतो. त्यावर ती स्री म्हणाली की तिला हे सर्व माहित आहे. परंतू तुम्ही महात्मा आहात. एक ज्ञानवंत व्यक्ती. मला माहित आहे की तुमच्यात एवढं सामर्थ्य आहे की तुम्ही माझ्या लेकराला जीवंत करु शकता. म्हणूनच मी तुम्हाला प्रार्थना करीत आहे. म्हणूनच मी ही आस करुन आपल्याकडे आले. परंतू आपण माझ्या मुलाला जीवंत न करता केवळ उपदेश देत बसलात. जर आपण माझ्या पुत्राला जीवंत करु शकत नाही तर तसं मला सांगा. मी निघून जाईल.
मी विचार केला की बिचारी स्री. तिचा एकुलता एक पुत्र मरण पावला. तिला आता समजावणं कठीण आहे. तसं मी तिला म्हटलं की ठीक आहे. मी देवाला प्रार्थना करतो की त्यानं तुझ्या पुत्राला जीवंत करावं. परंतू त्यासाठी तुला माझी एक विनंती ऐकावी लागेल. त्यावर ती स्री म्हणाली की सांगा आपली कोणती विनंती आहे. मी म्हटलं की तू मला अशा घरातून मोवरी आणून दे. ज्या घरात कोणाचाच मृत्यू झालेला नाही.
माझं ऐकताच त्या स्रीच्या मनात नवा उत्साह संचारला. तशी ती राई शोधायला निघाली. ती स्री प्रत्येक घरी गेली आणि अट सांगून तिनं प्रत्येक घरी राई मागीतली. परंतू तिला उत्तर मिळालं की त्यांच्या घरी कोणीतरी मरण पावला आहे. शेवटी ती थकली. कारण तिला कोणतंच असं घर सापडलं नाही की ज्या घरी कोणीच मरण पावलेला नाही. परंतू त्या गोष्टीनं तिच्या मनात परीवर्तन झालं आणि तिला कळून चुकलं की मृत्यू अटळ असून मृत्यूच अंतिम सत्य आहे.
हे समजताच ती शेवटी माझ्याजवळ आली. मला सांगायला लागली की मला असं घर मिळालं नाही. ज्या घरी कोणीच मरण पावलेला नाही. आता मला समजलं आहे की मृत्यूच अंतिम सत्य आहे. मी आता या माझ्या लेकराच्या मृत्यूचा सामना करेल. आपल्याला विचारणार नाही." सिद्धार्थनं ते सांगताच लांब श्वास घेतला व म्हणाला,
"सुजाता आपण कितीही मृत्यूला अडवलं, तरी मृत्यूला अडवता येत नाही. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे."
सुजाता काय समजायचं ते समजली व तीही चूप बसली. तिनं पुढचे प्रश्न विचारलेच नाही.

************************************************************************************************

अनाथपिंडीका सुजाताचे सासरे होते. त्यांचं लहानपणीचं नाव सुदत्त होतं. सुजाताला वाटत होतं की आपणही संन्यास घ्यावा. पण तो घेणार कसा? मुल लहान होतं. त्याचं पालनपोषण करणं आणि त्याला सांभाळणं कठीण होतं. कारण संन्यास याचा अर्थ सांसरीक सुखापासून फारकत घेणे. सुजाताला सिद्धार्थ गौतम ाचे विचार आवडत होते. त्याचा प्रसार करणंही आवडत होतं. परंतू ती काय करणार. उपाय नव्हता. अशातच तिचे सासरे अनाथ पिंडीका सिद्धार्थ गौतमाचे शिष्य बनले.
तिचे सासरे जेव्हा सिद्धार्थ गौतमाचे शिष्य बनले, तेव्हा तिला आनंद वाटला होता. कारण तिही तेच वदत होती. परंतू तिलाही तेच अपेक्षीत होतं.
सुजाता ब-याच दिवसापासून विचार करीत होती की आपणही गौतमाचे शिष्यत्व पत्करावे. तिनं केवळ सिद्धार्थाला सोन्याच्या कटोरीत खीरच चारली नाही तर त्याला मध्यम मार्गाविषयीही मार्गदर्शन केले. ते जेवन म्हणजे बुद्धाची ताकद ठरली आणि ते मार्गदर्शन बुद्धासाठीच नाही तर सर्व मनुष्यप्राणीमात्राला जीवन जगण्यासाठी प्रेरणा ठरली. आज ज्या ठिकाणी सुजातानं सिद्धार्थाला खीर चारली. त्या ठिकाणी सुजाता नावाचं स्तूप आहे. ते स्तूप आजही सुजाता व सिद्धार्थाच्या अस्तित्वाची साक्ष देते. ह्या भागाला सुजातागड असेही म्हटले जाते.
म्हणतात की ह्या सुजाता स्तूपाचे निर्माण सम्राट अशोकानं केलं. सम्राट अशोकानं अनेक स्तूप बांधले. त्यापैकी हा एक.
सिद्धार्थाचे नामकरण जेव्हा ज्ञानप्राप्त झाले. तेव्हा बुद्ध असे करण्यात आले. बुद्ध अर्थात ज्ञानी. तो सुजाताला जेव्हा जेव्हा भेटत असे. सिद्धार्थ आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी जेव्हा जेव्हा फिरत असे. ते आलेले अनुभव तेव्हा तेव्हा तो सुजाताला आपल्या प्रवासादरम्यान आलेले अनुभव सांगत असे.
एकदा असाच अनुभव सिद्धार्थला आला. श्रावस्तीमध्ये एक कुंभार समाजाचा व्यक्ती भिख्खूचा सन्मान करीत असे. एकदा तक्षशिला राज्याचा राजा भिख्खूचा वेष परीधान करुन त्याच्याकडे आला. तो त्याला भिख्खू असल्याचे सांगत आतमध्ये शिरला. तोच त्या दरम्यान सिद्धार्थही तिथे आला. तेव्हा सिद्धार्थनं त्याला विचारलं की मी आज इथेच मुक्काम करणार आहे. त्यावर तो कुंभार समाजाचा व्यक्ती म्हणाला,
"आज माझ्याकडे एक भिख्खू आधीच आलेला आहे. मी त्याला विचारतो. त्यानं परवानगी दिल्यास आपल्याला सांगतो."
सिद्धार्थनं ते ऐकले व तो म्हणाला,
"ठीक आहे. एका संन्यासी व्यक्तीला जर त्रास होत असेल तर दुस-या संन्यासानं तिथं थांबणं योग्य नाही."
कुंभार आतमध्ये गेला. त्यानं आतील भिख्खूरुपी राजाची परवानगी घेतली. त्यावर राजा म्हणाला,
"यात परवानगीची काय आवश्यकता आहे. त्याला आत बोलवा."
तक्षशिलेचा तो राजा........सिद्धार्थला तो ओळखत नव्हताच. तसा तो राजा सिद्धार्थला म्हणाला,
"मी भिख्खू बनलो. कारण मी बुद्धाचे उपदेश ऐकले." गौतमानं ते ऐकलं. तसे ते म्हणाले,
"आपण बुद्धांना पाहिलं आहे का?"
"नाही. आजपर्यंत असा योगच आला नाही."
"पाहायची इच्छा आहे का?"
"अति तीव्र आहे."
राजानं बुद्धाचे बरेच उपदेश ऐकले होते. त्याला पाहायचीही तीव्र इच्छा होती. परंतू तसा योगच येत नसल्यानं समस्या होती. त्या राजानं तथागताला परीचयही विचारला. परंतू सिद्धार्थनं तसं परीचय देणं टाळलं. त्यातच सिद्धार्थानं त्याला प्राप्त ज्ञानानुसार आपले तत्वज्ञान राजाला ऐकविणे सुरु केले.
सिद्धार्थनं आपल्या वाणीद्वारा राजाला उपदेश करताच राजा समजला की हाच संन्यासी गौतम बुद्ध आहे. क्षणातच तो बुद्धाच्या चरणावर लोटांगीत झाला. तसा तो सिद्धार्थाला आपला शिष्य बनविण्याविषयी बोलू लागला. तसं सिद्धार्थानं सांगीतलं,
"राजन, त्यासाठी तुम्हाला चिवर व भिक्षापात्रची गरज आहे. ती मिळवा मग आपल्याला दिक्षा देता येईल."
राजाला दिक्षा घेण्याची इच्छा होती. तसा तो निघाला. परंतू वाटेल त्याचा एका वेड्या गाईच्या हमल्यानं त्याचा मृत्यू झाला. जणू त्याची जीवनमरणच्या चक्रातून मृत्यू झाली होती.
दुसरा अनुभव असा होता की सिद्धार्थ भटकत असतांना जंगलात अंगूलीमाल नावाचा दरोडेखोर भेटला. तो दरोडेखोर त्या जंगलाच्या रस्त्यावरुन येणा-या माणसांची हत्या करीत असे. त्याला त्यातच आनंद वाटत होता. त्या माणसांची हत्या करुन तो त्याच्या अंगूल्या गळ्यात टाकत असे.
मगधचा तो प्रदेश. त्या प्रदेशातील ते जंगल. त्या जंगलात अंगूलीमाल नावाचा दरोडेखोर. सिद्धार्थला लोकांनी जेव्हा या दरोडेखोराबाबत सांगीतलं. तशी गौतमानं बुद्धांना त्याच्यासोबत बोलायची इच्छा व्यक्त केली. त्यातच बुद्धाला लोकांनी सांगीतलं.
"तो दरोडेखोर आहे. असं भेटायला जावू नका."
सिद्धार्थनं लोकांना त्याला भेटायला चालण्याविषयी विनंती केली. परंतू लोकं भीतीनं लोकं सिद्धार्थाबरोबर गेले नाही. तसा सिद्धार्थ एकटाच निघून गेला.
वाटेत तो जंगलाचा भाग लागला व सिद्धार्थला तो भेटला.त्याला तसा तो म्हणाला,
" मला तुझी हत्या करायचीय."
त्यावर तथागत न घाबरता म्हणाले,
"तू झाडाचं एक पान तोडून आण. मग माझी हत्या कर."
अंगूलीमालनं एक झाडाचं पान तोडून आणलं. तसा सिद्धार्थला म्हणाला,
"आता, मला तुमची हत्या करु द्या." तसा सिद्धार्थ म्हणाला,
"माझं पुन्हा एक काम कर. मग खुशाल हत्या कर माझी."
अंगुलीमाल तसा म्हणाला,
"ठीक आहे, सांगा लवकर तुमचं काम."
"आता हे पान ज्या झाडावरुन तोडलं, त्या झाडाला जोडून ये."
अंगूलीमाल म्हणाला,
"हे कसं जोडता येईल."
तसा सिद्धार्थ म्हणाला,
"जर तुला हे झाडाचं पान जोडता येत नाही. तसा तोडण्याचाही हक्क नाही. एका माणसाचं मस्तक जर जोडता येत नसेल तर ते तू का तोडतोस?" सिद्धार्थचं तो अवाकपणे ऐकत होता. त्यानंतर तो म्हणाला,
"भगवन, मला माफ करा. मी भटकत होतो. मला तुमच्या शरणात घ्या." अंगूलीमालनं तथागताला असं म्हणताच त्यानंतर हळूच अंगूलीमाल त्याचा शिष्य बनला. त्यानंतर तोही सिद्धार्थासह सिद्धार्थाचे उपदेश लोकांना सांगून हिंसेच्या मार्गापासून परावृत्त करु लागला.
आज सिद्धार्थ पुन्हा सुजाताच्या बकरौर जिल्ह्यात आला. त्याला पुन्हा सुजाताशी भेटण्याची इच्छा झाली.
आज चैत्र पौर्णीमा होती. तथागत पुन्हा ध्यानस्थ बसले होते. तशी सुजाताची त्याला आठवण आली. तो तिला भेटायला राजवाड्यात गेला असता त्यानं सुजाताला म्हटलं,
"सुजाता, तू थोर आहेस की तू मला खीर चारुन या जगाला दुःखापासून मुक्त करण्यासाठी व उपदेश देण्यासाठी जगवलं. मी सहा वर्षे ध्यानस्थ होतो. परंतू मला किंचीतही ज्ञान प्राप्त झालं नव्हतं. परंतू तू मला खीर चारताच तसेच मार्गदर्शन करताच मला मध्यममार्ग सापडला.
सुजाता, तू मला भेटायला येण्यापुर्वी माझ्या हाडाचा सापळा झाला होता. परंतू तू मला खीर देवून जगवलं. त्यावेळी मी तुला वंदन करुन तू जे म्हटलं, ते आठवंतय का तुला?"
"नाही भगवन, मला काहीच आठवत नाही."
"माहित आहे तू का म्हटलं. तू म्हटलं की हे पूज्य श्रमण, दुःखमुक्तीचा आपणास साक्षात्कार होताच आपण मला पुन्हा इथे येवून भेट द्याल. तसे मला अभिवचन द्यावं. माहित आहे तूच मला उर्वेला प्रदेशात त्या निरांजना नदीच्या काठी असलेल्या बोधीवृक्षाजवळ जायला लावलं आणि तिथं जाताच अवघ्या चार आठवड्यात मला ज्ञानप्राप्ती झाली.
सुजाता मला आजही मी एवढे सहा वर्ष ध्यानप्राप्ती करुनही आणि शरीराला एवढ्या वेदना देवूनही मला ज्ञानप्राप्ती का झाली नाही याचं आश्चर्य वाटतं. तसंच कळतं की शरीराला अतिकष्ट दिल्यानंही प्रज्ञाप्राप्ती होत नाही. याचा अनुभव मला तू आणलेली व मी ग्रहण केलेली खीर खावून आला. त्यानंतर मी अवघे चारच आठवडे बसलो बकरौरवरुन निघाल्यावर ध्यानधारणेत. बस, मला ज्ञानप्राप्ती झाली. तो वैशाख पौर्णीमेचा दिवस होता. आता माझे मलाच वाटते की मी सिद्धार्थ राहिलो नाही तर मी बुद्ध झालो आहे."
"भगवन, माझीही इच्छा आहे की मी स्वतः आपली शिष्य बनावं. मलाही आपली शिष्य बनवून घ्या."
"सुजाता, ते शक्य नाही. कसं शक्य आहे ते. तू माझी गुरु आहेस. मला मार्गदर्शन करणारी........ आणि गुरुंना शिष्य! हा विचारही अनाकलनीय आहे. सुजाता, मला माफ कर. मी तुला शिष्यत्व देवू शकत नाही व दिक्षाही."
सिद्धार्थ तसा चूप झाला. तो पुढे बोलला नाही. काही वेळानं तो पुन्हा सुजाताला म्हणाला,
"सुजाता, आज माझी इच्छा आहे की तू खीर बनवावी. मला पुन्हा तुझ्या हातची खीर खायची आहे. चारशील का?"
"ठीक आहे." सुजाता म्हणाली. तशी सुजातानं पटकन खीर बनवली व ती प्राशन केल्यानंतर सिद्धार्थ पुन्हा तेथून रवाना झाला. लोकांना उपदेश देण्यासाठी व जगाला दुःखातून मुक्त करण्यासाठी.
सिद्धार्थ निघून गेल्यानंतर सुजाताचं मन काही संसारात रमत नव्हतं. तिलाही दिक्षा घ्यायची होती. बुद्धाच्या तत्वाचा प्रसार तिला करायचा होता. परंतू तथागत तिला दिक्षा द्यायला तयार नव्हते. ते म्हणत होते की तू गुरु आहेस आणि गुरुंना मी शिष्य कशी बनवू शकेल!
सुजाता विचारात होती. कारण तिला बुद्धाशिवाय शिष्य बनता येत नव्हतं. तसा तो एकदाचा दिवस आला. सुजाताच्या घरी काही भिख्खू आले. त्यांनी बुद्धाकडून तिच्याबद्दल ब-याच गोष्टी ऐकल्या होत्या. तशी ती त्या भिख्खूंना म्हणाली,
"मला भिक्षूणी बनायची आहे. कृपया मला दिक्षा द्याल का?"
भिख्खूंनी तिची इच्छा जाणली व तिला स्वतः धम्मदिक्षा दिली.
काही दिवस असेच गेले. तसे एक दिवस ते पुन्हा सुजाताच्या घरी आले. त्यांनी पाहिलं की सुजातानं दिक्षा घेतलेली आहे व सुजाता आपली शिष्य बनलेली आहे. तसा ते पाहताच तो आश्चर्यचकीत झाला. त्याबद्दल तो सुजाताला विचारु लागला. तशी सुजाता म्हणाली,
"भगवन, आता रागावू नका. मी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे."
"सुजाता एक लक्षात घे. जोही व्यक्ती धम्मदिक्षा घेतो. त्यानं कधीही राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर पाळू नये. अहंकार कधीही बाळगू नये. मलाही तुझा राग नाही. कारण मीही आज तुझ्याचसारखा एक बौद्ध भिख्खू आहे. तू हेही लक्षात ठेवायला हवं की ही संन्यासी वृत्ती आणि माझे हे विचार जगाच्या कल्याणासाठी वापर. कोणाचं मन दुःखविण्यासाठी नाही."
"मी तुमच्या सर्व आज्ञेचा वापर करीन. मी आपल्या जीवनात सदाचारीनेच वागीन. जगाचे कल्याण करण्यासाठी आपल्या तत्वज्ञानाचा वापर करीन. तसेच मी कोणाचेही मन दुखवणार नाही."
सिद्धार्थ काय समजायचं ते समजला. त्यानंतर तो सुजाताला काहीही बोलला नाही. त्यानं आजही खीर प्राशन केली व तो तेथून निघून गेला.
सुजाताही दिक्षा घेतल्यानंतर आपले कार्य करीत होती. ती लोकांना उपदेश करीत होती. ती जीवनभर राग, लोभ, मोह मायेच्या आहारी गेली नाही. तसेच ती जीवनभर तथागताचे निर्वाण होईपर्यंत त्यांच्या आज्ञेतच वागली.
आज सिद्धार्थला कसनसं वाटत होतं. त्यांना माहित होतं की आज ते मृत्यूच्या समीप जाणार आहेत. कारण त्यांनी काल रात्री एका लोहाराच्या खीर प्राशन केली होती. ज्याचं नाव कुंडा होतं. ती खीरही विषयुक्त होती.
सिद्धार्थ गौतम बुद्धाचे वाढते महत्व पाहून त्याचे विरोधकही तेवढेच तयार झाले होते.
ते कुशीनगर........गौतम बुद्धाच्या महापरीनिर्वाणाचं ठिकाण. इथेच सिद्धार्थ गौतमाचे महापरीनिर्वाण झाले होते.
सिद्धार्थची आई सिद्धार्थाला जन्म देवून मरुन गेली. त्यानंतर त्यांचे निवासस्थानी एका ऋषीचं आगमण झालं. ते म्हणाले की सिद्धार्थ एकतर मोठा राजा बनेल किंवा एक महान साधू. त्या ऋषीचं भाकीत आज खरं ठरलं होतं. सिद्धार्थ आज महान तपस्वी साधू बनले होते.
आज सिद्धार्थ अंशी वर्षाचे झाले होते. तरीही तेच तेज गौतमात होते. जे तेज एकोणतीसाव्या वर्षी घर सोडतांना होते.
ते पावसाळ्याचे दिवस. त्यातच बुद्धानं भ्रमती करता करता राजगृह इथं मुक्काम केला. त्यानंतर ते भटकत भटकत वैशालीला पोहोचले. तिथेच जवळपास असलेल्या बेल्गाम नावाच्या गावी त्यांनी वर्षावास केला. तिथेच ते आजारी पडले. त्या आजारातही ते फिरु पाहात होते. परंतू शिष्यांनी नकार देताच ते थांबले. पुढे ते स्वस्थ झाल्यावर अंबगाव, भंडगाव, जंबूगाव, भोगनगर फिरत फिरत पावा नावाच्या गावी आले. तिथे ते कुंडा नावाच्या लोहार समाजाच्या आंब्याच्या आमराईत थांबले. तिथे त्यांनी त्याच ठिकाणात त्यांनी जेवनही केले. या ठिकाणी जेवनात गोड भात अर्थात खीर होती.
खीर गौतमाची आवडता पदार्थ होता. सिद्धार्थनं ती खीर खाल्ली. परंतू ती खीर खाताच ते अचानक आजारी पडले. कोणी म्हणतात की त्यात विष होतं. सिद्धार्थाला माहित होतं की आपण मरणार. परंतू दोष या कुंडावर लागायला नको. म्हणून की काय, ते तेथून कुशीनगरला जाण्यास निघाले.
गौतमाला माहित होतं, आज आपण मरणार आहोत. तशी त्यांना सुजाताची आठवण झाली. एक सुजाता की जिनं सिद्धार्थाला खीर चारुन त्याला नवं जीवन दिलं तर दुसरा हा कुंडा लोहार की ज्यानं खीर चारुन त्यांचा अंत्य करण्याचा प्रयत्न केला.
रस्त्यातून जाता जाता सिद्धार्थला रस्त्यात थकवा जाणवला. त्याच्या पोटात दुखणं सुरु झालं. त्यातच त्यांचा प्रिय शिष्य आनंद त्यांच्यासोबत होता. त्याला तो म्हणाला,
"आनंदा, माझी प्रकृती ठीक नाही. विश्राम करायची इच्छा आहे."
आनंदानं सिद्धार्थला एका कुकुत्था नदीच्या पात्रात असलेल्या दोन शाल वृक्षाच्या मधात बसवलं. तसा सिद्धार्थ म्हणाला,
"आनंदा, माझ्यासाठी कुकुत्था नदीतून पाणी आण."
आनंदा पिण्यासाठी त्या नदीतून पाणी आणायला गेला. तसं सिद्धार्थनं त्या रेतीवर चिवूर टाकलं व त्यावर तो आडवा झाला. तोच त्यानं त्यानं सर्व शिष्यांना बोलावलं. म्हटलं की माझ्या मृत्यूनंतर कुणालाही दोष देवू नका. कुणालाही अपशब्द बोलू नका. तसं बोलल्यास दोष लागेल मला. माझा अंत समीप आलेला असून ज्या शाल नावाच्या दोन वृक्षामध्ये माझा जन्म झाला. त्याच शाल नावाच्या दोन वृक्षांच्या मध्येच माझा मृत्यू होणार आहे."
आनंदा थोड्या वेळातच पाणी घेवून आला. गौतमानं तसं म्हणताच सारे शिष्य रडायला लागले. त्याचबरोबर आनंदाही. तसा सिद्धार्थ पुन्हा म्हणाला,
"मी तुम्हाला पुर्वीच सांगीतलं की जी वस्तू उत्पन्न होते. तिचा विनाश निश्चीत आहे. मग तुम्ही रडता का? मला मरण पावताच आपण मला गुरु मानून माझ्या मार्गावर चालू नका. तसं वचन मला द्या."
शिष्यांनी तसं वचन दिलं. त्यातच सिद्धार्थनं देह सोडला. त्यांचे महापरीनिर्वाण झाले होते. सिद्धार्थचे महापरीनिर्वाण होताच सहा दिवस पर्यंत लोकं त्याचे दर्शन घेण्यासाठी येत होते. सातव्या दिवशी त्यांचा देह जाळण्यात आला. त्यानंतर त्यांच्या अस्थीकलशावरुन मगध राजा अजातशत्रू, कपिलवस्तूचे वंशज राजा शाक्य आणि विच्छवीचे राजे यामध्ये भयंकर स्वरुपात भांडण झालं. त्यानंतर भांडण शांत झालं व द्रोण नावाच्या ब्राम्हण समाजातील व्यक्तीनं यात समझोता केला. त्यानुसार बुद्धाच्या अस्थींचं आठ भागात वर्गीकरण केलं गेलं. त्या अस्थी आठ राज्यात गाडल्या गेल्या. त्यानंतर त्या अस्थींना सम्राट अशोकानं काढल्या व त्याचे चौ-यांशी हजार स्तूप बनवले होते.

************************************************************************************************

सिद्धार्थ वास्तववादी दृष्टिकोण बाळगणारे होते. तसेच ते अंधश्रद्धा पाळणारे नव्हते. खरं पाहता तेच बुद्ध तत्वज्ञान होय.
कोणतीेही मुलं नवसानं होत नाही असं सिद्धार्थ मानत. त्यातच नवसानं मुल झालं असं मानणारी सुजाता. त्या सुजाताकडून गौतमानं खीर तर खाल्ली. परंतू तिचा अंधविश्वास सिद्धार्थनं दूर केला.
त्याच ज्ञानाचा परीणाम की काय, सुजाताही तथागताची शिष्या बनली होती नव्हे तर त्यांचे तत्वज्ञान जगात पसरविण्यासाठी तिनंही सर्वतोपरी प्रयत्न केले होते.
सुजाता संपली असली तरी आजही सुजाताला मानलं जातं. यात सुजातानं केलेलं कार्य. सुजातानं मनात कधीच किंतू परंतू न ठेवता कार्य केलं. तिनं बुद्धाच्या अस्थीपंजर शरीरात प्राण फुंकला. तसेच ज्ञानाचा प्रकाश ओतला. कोणतीही अपेक्षा न ठेवता. तसेच मनात कोणताही अहंकार न बाळगता. म्हणूनच की काय, ती अमर झाली. त्यामुळं की काय, सुजाता बुद्ध इतिहासात अमर झाली. मग खीरीच्या रुपानं का होईना.
सुजातापासून बरंच शिकण्यासारखं आहे. लोकांनी शिकावं. ज्याप्रमाणे बुद्ध तत्वज्ञान अभ्यासलं जातं. तसाच सुजाताच्याही जीवनाचा अभ्यास व्हावा. तेव्हाच बुद्ध तत्वज्ञानाला खरा अर्थ प्राप्त होईल. त्यानंतर त्या तत्वज्ञानाला कोणी मिटविण्याचा जरी प्रयत्न केला. तरी ते मिटणार नाही. कारण सुजातानं जसा बुद्धाच्या अस्थीपंजर शरीरात प्राण ओतला नव्हे तर परीवर्तन केलं. तसंच परीवर्तन सुजाताच्या विचाराने चालल्यानंतर आपल्याही जीवनात होवू शकेल यात शंका नाही. सुजाताचा अभ्यास करतांना आजही वाटायला लागतं की आपल्या विचारातही तशाच स्वरुपाचं परीवर्तन व्हावं.
सुजाता अल्लड होती आधीपासूनच. अंधविश्वास बाळगणारी...... तरीही तीनं बुद्धाच्या उपदेशानंतर अंधविश्वास सोडला. स्वतःत परीवर्तन आणलं नव्हे तर ती त्याची गुरु असूनही शिष्या बनली. आज सुजाता पृथ्वीतलावर नसली तरी तिचा हाच भाव विचारात घेण्यासारखा आहे. ती महान होती. परंतू तिनं स्वतःला महान मानलं नाही. हेच तिच्या यशाचे गमक आहे. तसेच बुद्ध तत्वज्ञानाच्याही यशाचे गमक आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. याची साक्ष आजही सुजाता नामक गड देत आहे. जो बुद्धगयापासून अवघ्या तीस किमीच्या अंतरावर आहे. विशेष म्हणजे सुजाता कालही महान होती, आजही महान आहे आणि उद्याही राहणार. परंतू तिला ओळखणारा हवा. त्याला तथागताचीच दृष्टी हवी. सिद्धार्थानं तिला ओळखलं होतं नव्हे तर तिच्या विचाराचं त्यांनी स्वागतच केलं होतं. तिच्या विचारांनी ते चालले होते नव्हे तर आपल्यातील कुविचार तिच्या म्हणण्यानुसार काढले होते व तिच्याही मनातले कुविचार आपल्या सम्यक ज्ञानानं काढून तिच्या विचारात परीवर्तन आणले होते. ही विचार करणारी बाब आहे.
आज सुजाता नाही. परंतू सुजाताची खीर आहे. आज सुजाता नाही परंतू सुजातासारखी कित्येक माणसे या विश्वात आहेत. म्हणूनच हे विश्व चालत आहे. कारण त्यांच्या विचारांना सुजाताच्या मार्गदर्शनाची झालर आहे नव्हे तर विचारांची. जी झालर तथागताला प्राप्त झाली होती. म्हणूनच तथागत सिद्धार्थापासून तथागत भगवान गौतम बुद्ध बनले. त्यामुळे सुजाता होती म्हणूनच सिद्धार्थाचे गौतम बुद्ध बनले नाही तर सिद्धार्थ सिद्धार्थच राहिला असता. तो बुद्ध झाला नसता हे निर्विवाद सत्य आहे आणि जेव्हापर्यंत बुद्ध असणार, तेव्हापर्यंत सुजाताही असणार हेही सत्य आहे. त्यासोबतच ती सुजातानं सिद्धार्थाला चारलेली खीर. ज्या खीरीनं बुद्धाच्या शरीरात नवचैतन्य निर्माण झाले होते नव्हे तर त्यांना मध्यम मार्गही सापडला होता. तसेच ज्ञानप्राप्तीचे त्यांच्या मनात बीजारोपण झाले होते हेही तेवढंच आहे.
आज सुजाता नव्हती आणि सिद्धार्थ गौतम बुद्धही नव्हते. परंतू बुद्धाचे तत्वज्ञान आज जगानं स्विकारले होते. त्यातच सुजाताचे खीर चारणेही लोकांच्या लक्षात होते. सुजाता मरुन व बुद्धाचे अवतार संपवून बरेच दिवस झाले होते. कित्येक पिढ्या ओसरल्या होत्या. परंतू सुजाता आणि भगवान तथागत गौतम बुद्ध संपले नव्हते. तसेच बुद्ध तत्वज्ञानाला कित्येक राजे महाराजांनी संपविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे बांधले गेलेले अवशेष..........त्या अवशेषावरही विद्रूपीकरण करण्यात आले. परंतू बुद्ध तत्वज्ञान शांतीचा मार्ग प्रदान करणारे असल्याने ते तत्वज्ञान संपले नाही. ते आणखीनच वृद्धींगत होत गेले. कारण त्याला सुजाताच्या सुविचाराची ची झालर लाभली होती.
सुजाता मरुन गेली होती. परंतू आजही ती जीवंत होती. कित्येक पिढ्या निघून गेल्या होत्या. परंतू सुजाता अमर झाली होती. आजही ती खीरीच्या रुपात प्रत्येक जनमाणसाच्या मनात घर करुन होती.
ज्याप्रमाणे सुजाताच्या बोलण्यानं सिद्धार्थात परीवर्तन झालं होतं. त्याचा गौतम बुद्ध बनला होता. तसंच परीवर्तन आज लोकांमध्येही झालं होतं. बुद्ध तत्वज्ञानानंतर व धम्मानंतर कित्येक तत्वज्ञान व धर्म या पृथ्वीतलावर आलेत. कुणी यहूदी आले. कुणी मुसलमान आले. काही पाश्चात्य देखील आले. परंतू बुद्ध तत्वज्ञान सरस ठरलं. कारण इतर धर्मात जे तत्व होतं. तेच तत्व त्या धर्माच्या ब-याच आधी बुद्ध तत्वज्ञानात होतं.
ती खीर.......त्या खीरीनं तथागताच्या अस्थीपंजर झालेल्या शरीरात प्राण ओतला. तिच खीर आज विषयुक्त झाली होती. तिच खीर जीव देणारी अन् तिच खीर आज जीव घेणारीही ठरली होती.
तथागत सिद्धार्थ गौतम...........सिद्धार्थचा कुशीनगरात मृत्यू झाला होता. त्याच्या शवाला कुशीनगरात अग्नीच्या स्वाधीन करण्यात आले होते. त्यातच त्याच्या अस्थीचं आठ भागात विभाजन करुन त्या अस्थी त्या त्या भागात पोहोचल्या होत्या. हळूहळू ही बातमी सर्वदूर पसरली. तशी ती बातमी काही लोकांनाही लागली. तशीच काही राजांना.
ते राजे ती बातमी ऐकताच फार दुःखी झाले होते. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्यातच त्यांना रडूही कोसळलं होतं. त्यांना जुने दिवस आठवायला लागले होते. ती सुजाता, ते वडाचे झाड आणि ती खीर आठवत होती आज सर्वांना.
ती खीर.......सुजाता आठवत होती लोकांना. ती खीर....... ज्या खीरीनं तथागताला नवीन जीवन दिलं होतं. त्या अस्थीपंजर शरीरात प्राण ओतला. तिच खीर...... आज त्याच खीरीनं तथागताचा प्राणही घेतला होता. सगळं आठवत होतं त्यांना. त्याचबरोबर ती मंडळी रडत होती.
त्यांना सुजाता आठवत होती. तसेच तिनं सिद्धार्थ गौतमाला केलेलं मार्गदर्शन देखील आठवत होतं. त्याचबरोबर आठवत होतं त्यांना गौतमानं सुजाताला शिष्य न बनवणं.
ती मंडळी विचार करु लागली होती की सिद्धार्थ गौतमानं तिला शिष्य का बनवलं नसावं. तसं क्षणातच त्यांना त्याचं उत्तरही सापडलं होतं. कदाचित लोकं द्वेषातून साधकाचा जीव घेतात. म्हणून सिद्धार्थनं सुजाताला दिक्षा दिली नसावी. तिला शिष्य बनवलं नसावं. कारण तिच्या जीवाची त्याला काळजी वाटत असावी. वाटत असावे त्याला की माझ्या आधी सुजाताचा जीव जावू नये.
सुजातानं गौतमाच्या मृत्यूनंतर जेवढा विलाप करायचा तेवढा केला असता. परंतू ती आधीच मरण पावली होती.
गौतम बुद्धाच्या मृत्यूनंतर आनंदा विलाप करु लागला होता. त्यानंतर तो त्वेषानं उठला. तसा तो चालता झाला. एक मनात निर्धार करुन. तो गावोगाव भटकत होता. कुणालाही दोष न देता. बुद्ध तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी. कदाचित बुद्धाचं अपुर्ण राहिलेलं कार्य आपल्यालाच पूर्ण करायचे आहे असा विचार करुन. बुद्ध मृत्यूनंतर तोही फार काळ जीवंत राहिला नाही.

************************************************************************************************

बुद्ध मृत्यूपुर्वी सुजाता मरण पावली होती. तिला एका आजारानं ग्रासलं. त्यातच ती मृत्यू पावली. परंतू तिनं तथागताला चारलेली खीर आणि त्याला केलेला उपदेश आजही लोकांच्या लक्षात होता. कदाचित सुजाता जर नसती तर आज तथागताचेही नाव लोकांना माहित झाले नसते नव्हे तर ती त्याची गुरु असूनही त्याची शिष्या बनली होती. हे तिला अहंकार नसण्याचे प्रतिक आहे. सुजाता झाली म्हणून सिद्धार्थ ज्ञानी ठरला. हे विधीलिखीतच होते असेही काही लोकं म्हणतात. परंतू सिद्धार्थ विधीलिखीतपणा मानणा-यांपैकी नव्हते.
ते वैशालीचं ठिकाण. बौद्ध भिक्षूणी बनल्यानंतर सुजाता साकेत नावाच्या बौद्ध मठात बरेच दिवसपर्यंत राहिली. त्यातच एक दिवस सिद्धार्थ गौतमाच्या उपस्थितीतच ती वैशाली इथे एका आश्रमात मरण पावली. ती त्या काळात कविताही बनवीत असे. तिच्या कविता थेरीगाथा या बौद्ध धम्माच्या पवित्र ग्रंथात पाली भाषेत आजही अस्तित्वात आहेत. ती त्यातील एका कवितेत लिहिते की मी सुंदरशा अलंकारात अनमोल पडद्यात तसेच चंदनाच्या सुंगधात वावरणारी तसेच केसांना सुंदर गजरा लावून सजून धजून राहणारी त्यातच दास दास्यांच्या घिरट्यात माझं जीवन. माझ्यासमोर दुर्लभ खाद्य पदार्थ राहात असत.
जीवनातील सर्व सुख माझ्यासमोर असायचे. वेगवेगळे पेय माझ्यासमोर असायचे. जीवनातील सर्व सुख माझ्यासमोर असायचे. सर्व ऐश्वर्य सर्व क्रिडा मला पाहायला मिळत असे. परंतू मी जेव्हा बुद्धांना पाहिलं. त्यांचा प्रकाश पाहिला. तो प्रकाश अद्भूत होता. मी त्यांच्या जवळ जावून त्यांच्या पायावर झुकली. त्यातच माझे जीवन परीवर्तीत झाले.
मी त्यांच्या सानिध्यात असतांना मला धम्म समजला. वासनारहित जीवन समजले. अमरत्व म्हणजे काय तेही समजले. इच्छांना कसे ताब्यात करायचे तेही शिकले. त्यातच मी शिकले की जीवनात दुःखावर मात करण्यासाठी इच्छेवर ताबा ठेवावा. ज्यांचा इच्छेवर ताबा असतो. तोच जगातील सर्वांगसुंदर व्यक्ती असतो आणि ज्यांचा इच्छेवर ताबा नसतो. त्यांचं जीवन नरकासमान असते. तो व्यक्ती व्यक्ती नसतो आणि ते घर घरासारखं नसते.
तिनं सांगीतलेल्या मौलवान गोष्टी आजही लागू होतात नव्हे तर नवनवीन बोध देवून जातात. तिनं तथागताचं जीवन घडवलं नव्हे तर भवितव्य. त्यामुळंच की काय, सिद्धार्थचं जीवन घडविणा-या ज्या स्रिया झाल्या. जशी गौतमी - सिद्धार्थची मावशी, यशोधरा - सिद्धार्थची पत्नी. त्यात सुजाताचाही समावेश होतो. सुजाता महान स्रीच नाही तर एक भाग्यविधाता होती. ती होती म्हणूनच सिद्धार्थाचं जीवन सुवर्णमय झालं होतं. ती तथागतापुर्वीच मरण पावली असली तरी तथागताला मरतासमयी तिची आठवण आली होती. तो म्हणाला होता अंतिम समयी की 'एक सुजाता होती, जिनं मला खीर चारुन नवीन जीवन दिलं होतं. तिच खीर आज सुजाता नसल्यानं तसेच कुंडाच्या हातानं खाल्यानं विषमय झाली आहे. दोष कुणाला देवू नका. कारण आज सुजाता नाही तर तथागताचंही या जगात कोणतंच काम नाही. कोणतं काम नाही.'

***************************************************************************************************************************************समाप्त****