कसारा लोकल N 7
आज ऑफिस मधून लवकर निघालो होतो, CSMT ला आलो तेव्हा पंचवटी एक्सप्रेस च्या आधी सुटणारी ०४:५२ ची कसारा मिळाली म्हणजे संध्याकाळी ०७:३० ते ०८:०० पर्यंत नक्कीच पोहचणार होतो , मग मित्रां ची पण भेट होणार होती, CSMT ला मस्त गरम गरम कॉफी, समोसा वाचायला मोबाईल मॅगझीन, व अधून मधून तोंडात टाकायला वेफर इ0 घेऊन मी कसारा पकडली.
जर तुम्ही लोकल न नियमित प्रवास करणारे असाल तर कुठली up लोकल CSMT इथे आल्यावर ठाणे ,की अंबरनाथ की टिटवाळा down म्हणून लागते हे लोकल ने प्रवास करणार्यांना समजत, लोकल च्या नंबर वरून ते ओळखता येत ही त्यातील ट्रिक.
उदा0 लोकल च्या पहिल्या रेक वर ४६८ वगैरे लिहिलेलं असत इत्यादी.
त्या मुळे CSMT कडे जाणारी लोकलच N17 ie कसारा (F) म्हणून लागली होती.
काळजी, विवंचना, कधी शारीरिक आजार, अपघातात लागणे , साध्या गोष्टीत असंख्य अडचणी व इतर अनेक न आवडणाऱ्या घटना कोणाला नसतात, बहुतेक सगळ्यांना असतात, त्या मला पण होत्या व आहेत, पण स्वामींच्या कृपेने मला नेहमी वाटे की स्वामींची इच्छा असेल तर सगळी प्रतिकूल परिस्थिती एक क्षणात नष्ट होईल , व होऊ शकते , जेव्हा मी काही महात्म्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले ,"अरे पण स्वामींनी अशी इच्छा करण्या साठी त्या करता स्वामींची सेवा नको का करायला ...??????, मग नुसतं एखादं पारायण , ११ माळांनी काय होणार, गुरुदेव रानडया सारखा ७ ते १० तास जप हवा, किंवा एखाद्या अवलिया ची कृपा झाली तरच ते शक्य आहे", "त्या मुळे आताचा क्षण महत्वाचा आता आनंदात रहाणे शक्य असेल तर आनंदात रहावे", अस त्यांनी मला सांगितलं
कुठलीही काळजी विवंचना नसणारे, सगळं आयुष्य आपल्या कुंटुंबासह कुठलं ही संकट न येता घालवणारी भाग्यवान कुटुंब, व माझे काही मित्र मी अगदी जवळून बघितलेत, मग मी त्यांच्या पत्रिकांचा जेव्हा बारकाईने अभ्यास केला तेव्हा एक गोष्ट लक्षत आली, त्याच्या पत्रिकेतील ग्रह मांडणी सुंदर होती, मुख्य म्हणजे त्यांची पूर्व पुण्याई खूप मोठी होती
पत्रिकेत ४ किंवा अधिक ग्रह उच्च राशी चे किंवा स्व राशीचे असतील
गुरू लग्नस्थ असेल किंवा लग्न स्थानी दृष्टी असेल तर हे पूर्व जन्मी चे धर्मातम, सद्गुणी , विवेकशील
लग्न मानव सप्तम स्थानी शुक्र असलेले पूर्वजन्मी श्रीमंत सेठ इ0
११ गुरू ५ वा सूर्य व १२ व्यात शुक्र तर असे जातक ही पूर्व जन्मी महद भाग्यवंत असतात
जर जातक हा पूर्वजन्मी सुद्धा भाग्य घेऊन च जन्माला आलेला असेल तर चालू जन्मात तो १००% सुखी च असणार
अर्थात मला त्यांचा हेवा कधी वाटलं नाही, कौतुक वाटे, रावसाहेब जे आता हयात नाहीत त्यांना मी नेहमी म्हणत असे मला एक end to end अशी केस सांगा ना, मी हवं तर त्या व्यक्ती च नाव देतो, अर्थात ह्यावर त्यांनी मला कधीच entertain केलं नाही
"तू तुझी साधना वाढव, म्हणजे आपोआप तुला ह्या गोष्टी समजायला लागतील, पण इथे फुकट काही मिळत नाही , त्या करता नुसत्या ११ माळा नी काय होणार, १५ , १५ तास साधना हवी"
"आणि एखाद्याचा पूर्वजन्म समजून तू काय साध्य करणार, त्यांनी चांगली कर्मे केली ते तुला आत्यंतिक सुखात दिसत आहेत, त्या पेक्षा स्वामींची कृपा महत्वाची"
मला ही ते पटलं , मग परत मी त्यावर विचार करणं सोडून दिलं
०८ ०८३० ला कसारा ०९३० ला नासिक मग मित्रांच्या भेटी, तिखट जाळ मिसळी चे प्लॅन, शनी रवी जमलं तर त्र्यंबक किंवा सप्तशृंगी अस काहीसं प्लानिंन , फोन, वेळ मजेत गेला कसारा आलं तेव्हा रात्री चे ०८०० वाजले होते. स्टेशन वर उतरलो, आणि क्षणभर कृपामुर्ती स्वामी क्षणभर डोळ्या समोर उभे राहिले व "पंचवटी ने जा" इतकं बोलून अदृश्य झाले.
मला घरी जायची घाई होती, मी मनात स्वामींना विनवल , "स्वामी आज मी जातो share टॅक्सी, प्लिज..….!", Share taxi पकडली, ड्राइवर फुल tight होता, बोलरोत मी मध्यभागी बसलो, जीप फुल्ल होती.
"बाळ्या....", ओरडतच ड्रायव्हर न गाडी काढली, बाळ्या ची जीप मागेच होती मग सुरू झाली जीवघेणी शर्यत.
कसारा घाट वळण विचित्र आहेत, त्यात ह्या पोरांची आपापसात शर्यत, स्वामीं च ऐकायला हवं होतं उगीच नसत्या भानगडीत पडलो. मी मनात स्वामींचा जप करत बोलेरो च सीट घट्ट धरून बसलेलो, शेवटी मला राहवलं नाही
"ओ, तुमची रेस , आम्हाला घरी पोहोचवल्या वर खेळा!"
"ए भाऊ, तुला काय प्रॉब्लेम आहे?"
"अरे गाडीत म्हातारी माणस आहेत बायका आहेत, तुमच्या रेस मध्ये कोणाला काही लागलं म्हणजे किती वाढवा होईल", माझा आवाज चढला होता. जीप मधल्या एकदोन लोकांनी ही त्याला सुनावलं होत, शेवटी,
"बाळ्या उद्या खेळू रेस", म्हणत त्याच driving सुरू झालं, पण गाडी वेगात चालवत होताच. मी मनोमन स्वामींची माफी मागत, त्यांना विनवल होतो स्वामी कस ही करून काळजी घ्या. जप चालू होता, स्वामींच ऐकलं नाही ही खंत रुख रुख होतीच,
घाट संपला, हायस वाटलं, आता त्यानं वेग अजून वाढवला होता, मी मनात स्वामींचा जप करत होतो, आपला आयुष्याचा chapter कसारा घाटात आज संपला असच वाटत होतं, त्यात ड्राइवर जवळ जवळ १४० , १५० च्या स्पीड न चालवत होता.
अचानक समोर दोन डोळे चमकले, मग लक्षात आलं तो बैल होता, पण गाडीचा वेग इतका भयानक होता की धाडकन आवाज होऊन, गाडी समोरील बैल अदृश्य झाला, गाडी रस्स्त्याच्या कडेला घरंगळत जाऊन थांबली, पुढे ४० फूट खोल खड्डा होता, किंचाळ्या, आक्रोश ह्यांन वातावरण भरून गेलं, मी सीट धरून बसलेलो असल्याने मला जबरदस्त हिंसका बसला पण साधा ओळखाडा सुद्धा नव्हता, हिसक्या मुळे मात्र अंग चांगलंच दुखत होत.
गाडीचा पत्रा पूर्ण फाटला होता, काच फुटली होती, डीझेल टॅंक पूर्ण फुटून रस्त्यावर डीझेल च डीझेल होत, माझ्या मागे बसलेल्या महिलांना जबर लागलं होतं तर पुढे बसलेल्यांच्या नाका तोंडातन रक्त वहात होत, बाजूला बसलेल्यांचे पाय सीट मध्ये अडकले होते, मी एकटाच असा होतो की मला काही झालं नव्हतं, कसा बसा जीप बाहेर आलो, हळू हळू गर्दी जमायला लागली होती, मी त्यातून सरळ बाहेर पडलो, बैल कुठे दिसत नव्हता, मग तो भास होत की काय देवजाणे पण मला तस वाटत नव्हतं, मला पुढे सोमवारी औरंगाबाद गाठायचं होत त्या मुळे सरळ हायवे वरून चालायला सुरुवात केली, सगळी कडे गच्च अंधार होता, समोरून येणाऱ्या गाड्यांचे दिवे डोळे दिपवून टाकत होते, अंगावर सरसरून काटा आला, अंग मात्र ठेचकाळल्या सारख दुखत होत,
बरच अंतर चालल्या वर एक ट्रक ला हात दाखवला, त्याला गाडी ४० km पेक्षा कमी वेगाने चालव अशी विनंती करत नासिक ला पोहोचलो, जीप मध्ये एक मुंबई चे आचार्य होते, नासिक येथे कोणीतरी हॉस्पिटल मध्ये आजारी आहेत म्हणून त्यांच्या साठी मृत्यूंजय जपा स निघाले होते, सुदैवाने त्यांना नाकाला थोडं मार लागला होता पण बाकी काही झालं नव्हतं, ते ट्रक मध्ये बरोबर होते
"अहो मी नासिक ला एका माणसाला दीर्घायुष्य लाभावे म्हणून मृत्युंजय जप करण्यास निघालो होतो, आज त्याच्या ऐवजी मीच गेलो असतो"
मी काहीच बोललो नाही
दुसऱ्या दिवशी रावसाहेबना ही हकीगत सांगून, नाक घासून स्वामींच्या फोटो समोर माफी मागितली,
त्यांना हसू आवरत नव्हतं
मी म्हणालो,"का हसत आहात....?"
"अविनाश, स्वामींनी सांगून सुद्धा तू जीप नी गेलास च"
आज सकाळी ध्यान करताना स्वामींनी मला एक दृश्य दाखवलं, त्यात तुझ्या कडे बोट करत स्वामी म्हणत होते "ये गधा कब सुधारेगा पता नाही...!"
"मला आधी त्याचा अर्थ समजला नाही , आजची हकीगत ऐकल्यावर कळलं"
"अविनाश, स्वामीं तुला सूचना देऊन सुद्धा तू त्यांचं ऐकणार नाही हे स्वामींना माहिती होत, तरी त्यांनी तुझी काळजी घेतलीच हे विलक्षण आहे असं नाही का तुला वाटत????, यात स्वामींना तू एक प्रकारे त्रास च दिलास, हे जस जसे समजायला उमजायला लागेल तशी स्वामींची तुझ्या वरील कृपा वाढत जाईल..."
"आता परत अस करू नकोस...."
मला एकदम लाजल्या सारख होऊन वाईट वाटलं, डोळ्यात अश्रू उभे राहिले
"तारक मंत्रात नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अस जरी लिहिलेलं असलं तरी सुद्धा, आपण तारतम्य ठेवूनच वागायला हवं....!!!!!!!!!"
ह्या नंतर मात्र परत अशी चूक कधी ही होणार नाही ह्याची मी जमेल तेवढी काळजी आज पर्यंत घेत आलो व पुढे घेईन एवढं मात्र खरं
अविनाश
@स्वामी@
*Enjoy!!!!!!!!*