पानं ३
मला तर आता काय करू सुचत नव्हतं . खूप रडायला येत होत . आता हे लिहिताना काय वाटत नाहीये . पण , तेव्हा माझ्यावर आलेल मोठं संकट वाटलं होत. धनश्री
(माझी मैत्रीण) मला म्हणाली , मी थांबते इथेच तू लगेच घेऊन ये चष्मा . मी लगेच जाऊन चष्मा घेऊन आले . मग आम्ही नेमून दिलेल्या वर्गात बसलो . म्हणजे आमच्या
Admission च्या पावतीवर क्लास आणि Division दिलेली होती . धनश्री आणि मी एकाच वर्गात होतो . तेव्हा आमचं सेमीच च ऍडमिशन झालं नव्हतं. आम्ही दोघी एकत्र बसलो .
नंतर आमची एक नवीन मैत्रीण झाली , लक्ष्मी . ती सेमीची Exam द्यायला आली होती , त्या दिवशी . पण , आमची त्या दिवशी Exam झालीच नाही , दुसऱ्या दिवशी झाली .
खरं म्हणजे , मला सेमी ला ऍडमिशन नकोच होत . म्हणून , मला ती सेमीची Exam पण द्यायची नव्हती . मी पहिली ते चौथी मराठी माध्यमातून शिकले होते .त्यामुळे मला जर गणित
आणि शास्त्र English मधून आलं नाही तर , म्हणून मला खूप भीती वाटायची . त्यामुळे, मी या Exam मध्ये Fail व्हायचं ठरवलं . का काय माहित ? पण मी हे ठरवलं होत .
मला आठवतयं , त्या दिवशी आमचा Result लागणार होता . Result लागण्याआधी शाळा भरल्यावर लक्ष्मी माझ्या आणि धनश्री च्या शेजारी बसली . पण , नेहमी
सारखी ती बोलत नव्हती . मी तिला विचारलं काय झालं ? ती काहीच बोलली नाही . पण , तिचे डोळे पाण्याने अगदी गच्च भरून आले होते . तिच्या डोळ्यातल्या पाण्याने मला शांत
केलं होत . माझ्यात तिला पुन्हा तोच प्रश्न विचारायची हिम्मत होत नव्हती. इतक्यात तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तिनेच सांगितलं , ' माझी आई गेली , मला फार आठवण येतेय
तिची '. हे ऐकल्यावर धनश्री माझ्याकडे पाहत होती . आता मी यावर तिला कसं समजावणार होते ? तेवढ्यात आमच्या Exam चा Result लागला . माझी तर इच्छाच नव्हती दुसऱ्या
वर्गात जाण्याची . मला माझ्या मैत्रिणींनी खूप समजवल . पण या Exam वरून मी सारखी रडत असायचे . तेव्हा ढेकणे बाई या आमच्या वर्गशिक्षिका होत्या. आम्ही ५ वी ड या मराठी
माध्यमाच्या वर्गात बसायचो . त्या दिवशी आमच्या बाईंनी Result वाचायला सुरुवात केली . एका एका मुलीच नाव लिस्ट मध्ये येत होत . मला तरं सेमी माध्यमाच्या वर्गात जायचं
नव्हतं. त्यामुळे, आपलं नाव या लिस्ट मध्ये असू नये . हीच माझी इच्छा होती . पण , झालं उलटचं माझं नाव त्या लिस्ट मध्ये आलंच . मग आम्हाला लगेचच दुसऱ्या वर्गात जायला
सांगितलं . लक्ष्मी आणि धनश्री पण माझ्यासोबत होत्या . मग आम्ही दुसऱ्या वर्गात गेलो . मलगुंडे बाईंनी आमची हजेरी घेतली . आता त्या आमच्या नवीन वर्गशिक्षिका होत्या . आणि
माझा ५ वी चा पहिला होता वर्ग इयत्ता ५ वी ६ . तेव्हा ६ , ५ , ४ हे अंक तुकडी (Division) साठी होते . नंतर पुढे त्या ऐवजी अ , ब , क अशा तुकड्या (Division) झाल्या . शेवटी
माझा सेमी च्या वर्गाचा प्रवास सुरु झालाच .
सकाळी लवकर उठणं , आवरणं आणि मग नाश्ता , क्लास , शाळेची तयारी , जेवण , शाळा , मधल्या सुट्टीचा नाश्ता , शाळेतून आल्यावर Fresh होणं , नाश्ता करणं मग
प्रार्थनेला जाणं , रात्रीच जेवणं , सुट्टीच्या दिवशी T.V पाहायचा आणि भरपूर झोपायचं . सुट्टीच्या दिवशी जेवण करून दुपारी झोपणे हे Hostel मध्ये एखाद्या सणासारखं साजरं केलं
जात . म्हणजे आमच्या हॉस्टेल मध्ये शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस दुपारच्या वेळी कोणत्याही रूम मध्ये पाहिलं तरी तुम्हाला सगळे झोपले हे दिसणारच . खिडक्यांना बेडशीट
लावून अंधार करणे , दार लावणे , Fan चा Speed Full करणे आणि मग काय ? मस्त ताणून देणे . असेच आमचे शाळेचे दिवस बऱ्यापैकी चालले होते .
पुढच पानं लवकरच.....