Dharmantaran - 1 in Marathi Motivational Stories by Ankush Shingade books and stories PDF | धर्मांतरण - भाग 1

Featured Books
  • शून्य से शून्य तक - भाग 40

    40== कुछ दिनों बाद दीनानाथ ने देखा कि आशी ऑफ़िस जाकर...

  • दो दिल एक मंजिल

    1. बाल कहानी - गलतीसूर्या नामक बालक अपने माता - पिता के साथ...

  • You Are My Choice - 35

    "सर..."  राखी ने रॉनित को रोका। "ही इस माई ब्रदर।""ओह।" रॉनि...

  • सनातन - 3

    ...मैं दिखने में प्रौढ़ और वेशभूषा से पंडित किस्म का आदमी हूँ...

  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

Categories
Share

धर्मांतरण - भाग 1

धर्मांतरण पुस्तकाविषयी

धर्मांतरण ही कादंबरी वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. ही कादंबरी म्हणजे हिंदू धर्माचं संस्करण आहे.
हिंदू धर्म. या धर्मातूनच सारे धर्म जन्मले असून आर्यही याच भारतातील असल्याचं मत विदवानांचं होतं. त्यावरच आधारीत ही कादंबरी आहे. दि २२/०१/२०२४ ला राम मुर्तीची प्रतिस्थापना होणार होती. त्याचदरम्यान ही कादंबरी लिहिण्यात आली व हिंदू धर्माचं तत्वज्ञान मांडण्यात आलं.
कमल नावाचं एक व्यक्तीमत्व. ज्याला हिंदू धर्माचा अभिमान आहे व तो हिंदू धर्माचं तत्वज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. परंतु त्याची एक मजबूरी आहे. ती मजबुरी म्हणजे पोट. पोटासाठी तो एक व्यवसाय निवडतो. त्यातून त्याला समस्या उद्भवते व तो धर्म बदलवतो. आता तो धर्म कोणता? तो पोटासाठी कोणते काम करतो? त्यानंतर काय होतं? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं वाचन करण्यासाठी माझी ही पुस्तक वाचा व प्रतिसाद द्या. ही कादंबरी थोडी समजून घ्यावी. स्वतःच्या भावना दुखवून घेवू नये. तो एक विचार आहे की जो प्रत्येकाला पडू शकतो. जसा या पुस्तकातील नायकाला पडला. या कादंबरीनं कुणाचे मन दुखवायचे नसून एक रास्त हेतूनं ही कादंबरी लिहिलेली आहे. आपण वाचा. आनंद मिळवा ही विनंती. विशेष म्हणजे कादंबरी ही काल्पनिक सत्यावर आधारलेली आहे.
आपला नम्र अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

धर्मांतरण (कादंबरी) भाग एक
अंकुश शिंगाडे

ती सकाळची वेळ होती. तांबडं फुटलं होतं. तसा सुर्यही आसमंतात वावरायला आला होता. तो फेरफटका मारायला लागला. तशी काही माणसंही उठली होती. तिही फिरायला लागली होती. काही फिरत होती तर काही आपल्या घरात अंगावर गोधडी घेवून झोपली होती.
सकाळ झाली होती. कामाची रेलचेल सुरु झाली होती. हळूहळू वेळ सरकत होती. तशी कामाची घाई होत होती. काही घरी महिलांनी सिलेंडर नसल्यानं अंगणात चुली पेटवल्या होत्या. काहींनी अंघोळीचं पाणी तापवायला ठेवलं होतं तर काहींनी स्वयंपाकही मांडला होता. ते चुक पेटवणं आधुनिक काळात शोभत नव्हतं. कारण सिलेंडरचा जन्म झाला होता. परंतु सिलेंडर स्वयंपाकाला परवडेल तेव्हा ना. तो महाग झाला होता. तो त्या गृहिणींना परवडत नव्हता. म्हणूनच चूल पेटवणं त्यांच्या नशिबात आलं होतं. अशातच त्या सकाळी एका व्यक्तीनं तिच्या घरी दस्तक दिली. जो तृतीयपंथी होता. तो काकुळतीनं म्हणत होता,
"देणं ओ माय. काही भाकरतुकडा असन तं दे खायले. तुह्ये लय उपकार होतीन.''
सकाळी सकाळी कोण दारात आलं म्हणून बकारामची पत्नी शिला माजघरातून बाहेर आली. पाहते काय तर एक तृतीयपंथी असलेला व्यक्ती दरवाज्यातून दस्तक देत होता. करुणेनं माधुकरी मागत होता. तसा तो नवीनच दिसत होता.
शिलानं त्या व्यक्तीला पाहिलं. तिला आश्चर्य वाटलं त्या व्यक्तीचं. ती विचार करु लागली. विचार करु लागली की पुर्वी तृतीयपंथी समुहानं यायचे अन् हा आज अचानक एकटाच दारात. हे कसं काय?
शिला त्याला पाहात होती. निरीक्षण करीत होती. तशी त्याची वेषभुषा तृतीयपंथीयांसारखीच होती. आवाजातही घोगरेपणाच होता. पेहराव एका स्रिचाच होता आणि आवाज पुरुषी. बोलणं स्रियांसारखंच होतं. केसाला गजरा माळलेला होता.
तो साडी नेसला होता. ती साडीही पाहिजे तेवढी खास नव्हती. वेषभुषाही श्रीमंतांसारखी नव्हतीच. कारण शिलानं पाहिलं होतं की आजपर्यंतचे तृतीयपंथी अंगावर वेषभुषा करुन यायचे. त्यांची साडी ही अतिशय भडक व मन वेधून घेणारी असायची. तसेच ते जबरदस्तीनं पैसे वसूल करायचे.
शिलानं जसं त्या तृतीयपंथीयाला पाहिलं. तसा तिला तिच्या लहानपणचा इतिहास तिला आठवायला लागला. ती जेव्हा लहान होती. तेव्हा तिच्या बापाच्या घरी एक तृतीयपंथी आला होता. तशी तिही सकाळचीच वेळ होती.
तिनं पाहिलं होतं की त्या दुकानात फक्त बोयणी झाली होती पन्नास रुपयाची. तेव्हा तृतीयपंथी आला व त्यानं जबरदस्ती करीत तिच्या वडिलांकडून पन्नास रुपये जबरदस्तीनं हिसकावून घेतले होते व म्हणाला होता की आज भरपूर धंदा होईल. आमचा आशिर्वाद आहे. परंतु त्याच दिवशी तिच्या वडीलांच्या गल्ल्यात एकही रुपया आला नव्हता. जणू काही त्याचीच तिच्या वडीलाला दृष्ट लागली होती.
शिलानं तृतीयपंथी बरेच पाहिले होते. बरेच अनुभव आले होते तिला. तिनं बसमध्ये व रेल्वेमध्येही हमखास तृतीयपंथीयांचे थरार अनुभवले होते. तिला तृतीयपंथी आवडत नव्हते. कारण तृतीयपंथी जरी तिच्या दृष्टीकोनातून चांगले असले तरी त्यांच्या जबरदस्तीपणानं पैसे लुटमार होत असल्यानं तिचा दृष्टीकोन बदलला होता त्यांच्याकडे पाहण्याचा. तशी ती त्याच्यावर सकाळी सकाळी खेकसतच म्हणाली,
"तुले का माह्या घर पाटलाचाच वाडा वाटतो की काय रं बाबा. आला सकाळी सकाळी मांगाले."
तिचं ते बोलणं. ते बोलणं ऐकून तो तृतीयपंथी पुन्हा म्हणाला,
"माई, पैसे थोडं नं मागतोय. भूक लागलीया फार. जेवन मागतोय."
'त्या तृतीयपंथीयाला अशी कशी भूक लागली? तृतीयपंथीय तर श्रीमंत असतात.' शिलाच्या मनात आणखी एक प्रश्न तयार झाला. परंतु तशी थोडीशी दयाही निर्माण झाली. वाटलं की बाकीचे तृतीयपंथी अशी करुणेनं विनंती करुन मागणी करीत नाहीत. ते जबरदस्तीनं हिसकावून घेतात. त्यापेक्षा हा बरा. शिवाय पैसे तर मागत नाही आहे हा. जेवनच मागतो. तसा विचार करताच त्याच्या बोलण्यात दम आहे असं शिलाला वाटलं व ती त्याला म्हणाली,
"बरं बाबा. म्या तुले देते जेवन. बस थोडा येळ. माह्यी चूल पेटू दे. कामावर जाले उशीर होईन नायतं."
शिलाचं ते बोलणं. तसा तो तिच्या दाराच्या बाहेर ताटकळत बसला, शिळ्या पार्थ्या जेवनाची वाट पाहात.
काही वेळाचा अवकाश. शिलाची चूल पेटली होती. तिनं एका हंड्यात चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्यानंतर तिनं एका कागदात तिच्या घरच्या शिळ्या पोळ्या आणल्या व एका वाटीत भाजी आणली व ती त्याला म्हणाली,
"खा बाबा. सावकाश खा. मले आशिर्वाद नाय देला तरी चालन. परंतु आपलं पोट भर."
शिलानं त्याला दिलेलं ते शिळं पार्थ जेवन. तरीही त्या जेवनाला तो तृतीयपंथी ताजच जेवन समजून जेवू लागला. कारण त्याला भूक फार लागली होती. तसा काही वेळ गेला व त्याचं पोट भरताच तो म्हणाला,
"माई धन्यवाद. लय उपकार झाले. तुले लय लय आशिर्वाद माह्या. तुह्यी लेकरं बाळं लय सुखी सुखी राहो अन् तू बी लय सुखी सुखी राहो."
काही वेळ गेला व तो तृतीयपंथी तेथून निघून गेला.
तो तृतीयपंथी आता महिन्यामहिन्यानं चक्कर मारत होता. करुणेनं भिक्षेत माधुकरी मागत होता. लोकं त्याला शिळं पार्थ जेवन देत होते. काहीजण पैसेही देत असत. परंतु ना तो कुणावर जबरदस्ती करायचा ना कोणाला जास्तचे पैसे मागायचा. तसा तो एकटाच यायचा.
ती वस्ती......त्या वस्तीत काही इतरही तृतीयपंथी यायचे. ते समुहानं यायचे. जबरदस्ती करायचे. लोकांना ते अन्न मागायचे नाही. फक्त रोकड पैसे मागायचे. ते तृतीयपंथी कमी पैसे घ्यायचे नाहीत. मात्र कमल कमी पैसे घ्यायचा. त्या व्यक्तीचं नाव कमल होतं. कमल एक चालक होता.

***********************************************

वाहनचालक हे देशाचे आधारस्तंभच होते. कारण देशात वस्तू बनत असल्या तरी त्या वाहून नेण्यासाठी वाहन लागायचं आणि ते वाहन चालवायला चालक लागायचा. चालक काही स्वतः जाणूनबुजून अपघात घडवून आणत नव्हता. त्यातच सरकारनं वाहनचालकांसाठी नवीन नियम लावले. सात लक्ष रुपये दंड व दहा वर्ष सक्तमजूरी. जेवढे पैसे चालक आपल्या जीवनभर कमवू शकणार नाही. तेवढे पैसे भरावे असं त्या दंडाचं विधान होतं. ते लावून ते अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले गेले. परंतु असं करीत असतांना लोकांनी आंदोलनाचं शस्र उपसलं आणि सरकारनंही त्यांच्या आंदोलनावर योग्य पवित्रा घेत तुर्तास आंदोलन मागं घेतलं. त्याचं कारण होतं लोकसभेची निवडणूक. आगामी काळात त्याचवर्षी लोकसभेची निवडणूक होती व सरकारला लोकसभेत यशस्वीपणानं निवडून यायचं होतं. म्हणूनच सरकारनं हे नियम मागं घेण्याचं पाऊल उचललं असावं की काय अशी शंका वाटत होती.
चालक......याला इंग्रजीत ड्रायव्हर असं म्हणतात. चालकाच्या बद्दल विचार केल्यास चालक हा गाडी चालवतो. तो गाडी चालवतो आपली, केवळ रस्त्यावरीलच नाही तर जीवनातीलही गाडीही तो चालवत असतो. आता ती गाडी तो कशी चालवतो यावर त्याचं भवितव्य ठरत असतं. उदाहरणार्थ. जीवनातील गाडी असेल आणि ती संसारगाडी त्यानं व्यवस्थीत चालवली नाही तर कोणत्याही वेळेस ती गाडी बंद पडू शकते. अर्थात घटस्फोट होवू शकतो. तसंच रस्त्यावरील गाड्यांचं आहे. रस्त्यावरील गाड्याही अशाच चालवाव्या लागतात. नाहीतर अपघात होतात. त्यात जीवं जातात. आपलाही जीव जातो आणि दुसर्‍याचाही जीव जातो. त्यातच एखादा व्यक्ती मरण पावताच त्या व्यक्तीच्या घरावर आभाळच कोसळलं आहे, अशी अवस्था होवून जाते.
चालक......चालक हे पद फारच महत्वाचं आहे. त्याला मुखिया असं देखील म्हणता येईल. ते पद अतिशय जबाबदारीचं पद आहे. तशीच त्या पदाची गरिमा देखील आहे. परंतु ते पद ज्याला आहे, त्यानं जबाबदारीनं ते पद सांभाळलं तरच त्या चालकाच्या पदाला महत्व प्राप्त होते.
अलिकडं ते पद व्यवस्थीत जबाबदारीनं सांभाळलं जात नाही. म्हणूनच अपघात होतात व हेच अपघात टाळण्यासाठी सरकारनं दोन कायदे बनवले. त्या कायद्याचा अर्थ होता भीती दाखवणे. जर भीती असली तर चालक अगदी डोळ्यात तेल घालून गाड्या चालवतील व अपघात टळतील. असं सरकारला हा होतं. हा उपाय अपघात टाळण्यासाठीच होता. याद्वारे सरकार म्हणत होतं की अपघात विनाकारण करु नका व कोणाच्या भरल्या संसाराला मोडू नका. तेही अगदी बरोबर होतं. तसे ते नियम होते चालकाला सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची शिक्षा.
चालकाला यापुर्वीही दंड होता. त्यातच दोन वर्ष शिक्षेची तरतूद होती. तसा अपघात होताच चालक पळूनही जावू शकत होता. कारण त्याला मारपीटीचा धोका असायचा. काही काही ठिकाणी तर जीवही घेतला जायचा चालकाचा. त्यामुळंच चालक पळायचा व पळणे भाग होता. यावर सरकारनं या नव्या कायद्यात नियम आणला होता की जर चालक पळून गेला नाही. त्यानं अपघात ग्रस्त लोकांना त्यांचे जीव वाचविण्यासाठी मदत केली तर त्या चालकाची शिक्षा काही अंशी माफ होवू शकते. तेही अगदी बरोबरच. परंतु ती शिक्षा कमी जरी करण्याचं आश्वासन असलं तरी तो वाचायला हवा ना. तरच त्या शिक्षेनंतरच्या जगण्याचा चालक आश्वाद घेवू शकेल.
वरील नियम. चालकाला दहा वर्ष शिक्षा व दहा लाख रुपये दंड. हे दोन्ही प्रकार चालकांसाठी वाईटच. कारण दहा वर्ष शिक्षा झालीच तर त्याचेवर आधारीत असलेलं कुटूंब जगेल कसं? हा प्रश्न.
अलिकडे तर रोजंदाऱ्याच कमी आहेत. बेरोजगारी भरपूर आहे. त्यातच समजा एखाद्यानं चालकाची नोकरी पत्करली आणि त्याच्या हातून अपघात झालाच तर त्याला झालेल्या शिक्षेनंतर प्रत्येक चालकाचं कुटूंब देशोधडीला लागू शकतं. तेही ठीक आहे. ती शिक्षा तो व्यक्ती भोगेलही कदाचीत. परंतु सात लाख रुपये दंड. तो कुठून भरेल? हा प्रश्न प्रत्येक जनमाणसांना पडतो. चालकाला तर पडतोच पडतो. कारण साधारणतः खाजगी विभागातील चालकाला सहा ते पंधरा हजारापर्यंत वेतन असतं. ज्यात तो स्वतःचंच पोट भरु शकत नाही. तो कुठून दंड भरणार? एका चालकाला घरी जेवनखावण, कपडेलत्ते, मुलांच्या शिक्षणाच्या सोयी करणं. पत्नीचे वाभाडे पुरवणं, मरण धोरणं, विवाह समारंभ, प्रवास या सर्व गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्या गोष्टी त्या चालकाला सक्षमपणे सहा ते पंधरा हजाराच्या वेतनात करणं शक्य होत नाही. शिवाय काही काही चालक गाड्या चालवून एवढे थकतात की त्यांना तो थकवा वाटू नये म्हणून थोडं मदिरापानही करण्याची सवय असते. अशावेळेस त्याचं वेतन पुरतच नाही. मग तो दंडाची दहा लक्ष रुपये रक्कम कुठून भरणार?
सरकारचं म्हणणं. अपघात हे जाणून बुजून होतात. चालक जाणून बुजून अपघात करतात. सरकारचं हेओ म्हणणं. दोन चार अपवादात्मक प्रकरणं पाहिली की एकप्रकारे बरोबर आहे. ज्याचं जातं त्यालाच कळत असतं. त्याचं कारण आहे लोकांचं गाड्या चालवणं. ते गाड्याच बरोबर चालवीत नाहीत रस्त्यावर. किती प्रचंड वेगात गाड्या असतात की वाटतं त्याच्या मागं कुत्रा लागला की काय? आज महिला वर्ग तर एवढ्या सुसाट वेगानं गाड्या चालवायला लागल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलं बरं. त्यातच नवीन शिकलेली मंडळी. ते तर रस्ता आपल्या जसा बापाचाच समजतात. बिचारे सुसाट वेगानं कट मारु मारु चालवतात. त्यामुळं अपघात घडतात. कारण लोकांना माहीत आहे की शिक्षा होईलच किती? फक्त दोन वर्ष. ती हसत हसत कापून टाकू. दंड होईलच किती? तुटपुंजा. तोही भरुन टाकू. हे धोरण होतं आजपर्यंत. शिवाय असे गुन्हे सिद्ध व्हायला वेळही लागत होता. बरेचसे गुन्हे सिद्धच होत नव्हते. परंतु जसे सरकारनं वरील स्वरुपाचे नियम काढले आणि ते नियम लागू करण्याचा निर्णय घेतला. तसे चालकांचे धाबे दणाणले व विरोध झाला. विरोधानंतर संप. बऱ्याच चालकानं संप केला. कारण होणारी शिक्षा व दंडाची रक्कम जरा जास्तच होती. त्यांचं म्हणणं असं होतं की अपघात हे जाणून बुजून केले जात नाहीत तर अनवधानानं होत असतात. त्यांचही म्हणणं बरोबरच आहे. कारण काही काही अपघात हे चालक स्वतः करीत नाहीत. अनवधानानंच होतात. जसे कधी गाडी चालत असतांना अचानक एखादा व्यक्ती गाडीसमोर येणे. काही काही रस्त्यांवर पायी चालणारी मंडळीही रस्ता ओलांडतांना मागे पुढे न पाहता, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा मागोवा न घेता चालत असतात. काही लोकं रस्त्यांवर गाड्या चालवतांना वाहनांचा मागोवा न घेता गाड्या सुसाट वेगानं चालवत असतात. यात दुसऱ्याच्या मनात अपघात करण्याची इच्छा नसतांनाही अपघात होतो. कधी कधी गाड्यांचे ब्रेक फेल होतात. त्यातूनही अपघात होतो. यात चालक दोषी नसतोच. म्हणूनच चालकांचं आंदोलन. तसं पाहता त्यांचं वेतन अतिशय अल्प असल्यानं आंदोलन. वाटल्यास या शिक्षेचं प्रावधान वाहन मालकाला वा ती गाडी ज्या कंपनीत काम करते. त्या कंपनीला असतं तर चालकांनी कदाचीत आंदोलन केलंही नसतं. परंतु ही शिक्षेची तरतूद व दंडाची रक्कम म्हणजे त्या चालकांच्याच मानेवर कुऱ्हाड मारल्यासारखी आहे. म्हणूनच आंदोलन झालं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास चालक हा देशाचा आधारस्तंभ आहे असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. तो जर नसेल तर कोणत्याच व्यक्तीला कुठेही दूर अंतरावर जाताच येत नाही. शिवाय तो जर नसेल तर राज्यकर्त्यालाही आपल्या निवडणुकीचा प्रसार प्रचार व्यवस्थीत करता येणार नाही. तो टिव्ही वा स्मार्टफोनवरुन तरी किती प्रचार करणार? काही काही ठिकाणी तर निवडणुकीचा प्रचार करायला प्रत्यक्ष उमेदवारच लागतात. अशावेळेस त्या उमेदवाराची गाडी चालकानं न चालविल्यास वा प्रत्यक्ष उमेदवार चालकच असल्यानं त्यानंही आपली भुमिका पार न पाडल्यास त्या उमेदवारांचा प्रचार होणार नाही व ती निवडणूक यशस्वी होणार नाही. त्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करता येणार नाही व निवडणुकीत पराजयाचा सामना करावा लागेल. चालक नसेल तर शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादीत माल शेतीतून लोकांच्या घरापर्यंत पोहोचणार नाही व अन्न खाता येणार नाही. तसेच चालक नसेल तर आपल्याला आपल्या रोजगारासाठी, आपल्या पोटाची सोय करण्यासाठी, आपल्या बायकापोरांच्या पोटाची, कपड्यालत्याची व शिक्षणाची सोय करण्यासाठी दूरवर नोकरी करायला जाता येणार नाही. म्हणूनच चालक महत्वाचा. असं असतांना चालकांवर असे कठोर स्वरुपाचे नियम लावणे बरे नाही. हं, वाटल्यास असे नियम लावावे की जे ते करु शकतात. जसे. वाहनाचा वेग अमूकच हवा. त्यावरती असेल तर कठोर शिक्षा असावी. दारु पिवून वा नशा करुन गाडी चालवत असेल तर कठोरात कठोर शिक्षा असावी. ती कोणीही मान्य करेल. परंतु विनाकारणचे नियम लावून लोकांची मनं दुखवू नये म्हणजे झालं.
नुकतेच सरकारनं चालकावर दंड लावले होते. एखाद्याच्या खाजगी वाहनानं एखाद्याचा मृत्यू झाल्यास चालक त्याला सात लक्ष रुपये देईल व दहा वर्ष कैदेची शिक्षा भोगेल. कमलही चालकच होता खाजगी कंपनीत. तो बारा हजार रुपये कमवीत होता. तेवढ्या पैशानं तो आपलं घरच सांभाळू शकत नव्हता. मग दंड भरणार तरी कुठून? म्हणून तो आंदोलनात सहभागी झाला होता. कमलला वाटत होतं की चालक कमवतोच किती. दंड करायचाच असेल तर जी मंडळी कंपनीत काम करतात. त्या कंपनी मालकाला दंड करावा. त्याचं ते विधान बरोबर होतं. परंतु सर्वच गाड्या कंपनीत नव्हत्या. काही गाड्या चालकांच्या स्वतःच्या मालकीच्या होत्या. ते चालक तेवढी रक्कम कमवीत नसत की ते सात लक्ष रुपये दंड म्हणून भरु शकतील.
चालकाच्या श्रेणीत सर्वच येत होते. साधा दोन चाकी बाईकवालाही चालकच होता. त्यालाही ते नियम लागू होते. जर संबंधीत व्यक्तीचा मृत्यू बाईक किंवा मोपेडनं झालाच तर त्यालाही तेवढ्याच दंडाची रक्कम होती व तेवढ्याच वर्षाची शिक्षा. तसं पाहिल्यास आज घराघरात बाईक व मोपेड गाड्या होत्या. ती मंडळी कर्ज घेवून गाड्या विकत घेत. त्याचं कारण होतं काम. कामाला दूरदूर जावं लागायचं. त्यासाठी सायकल परवडायची नाही. म्हणूनच मोपेड गाड्या वा बाईक गाड्या विकत घेतल्या होत्या लोकांनी.
सरकारनं काढलेला फतवा. तो जल्लादी आदेश होता. तसं आंदोलन झाल्यानं तो जल्लादी आदेश तुर्तास मागं घेतला सरकारनं. परंतु त्यांनी हा आदेश अजिबात लागू करणार नाही असं म्हटलं नाही. तो आदेश आम्ही लागू करुच असं सरकारला वाटत होतं.
कायदा नव्हे तर चालकांच्या जीवनाला नेस्तनाबूत करणारा तो जल्लादी आदेश सरकारनं तुर्तास मागं घेतला होता. तशी तीळसंक्रात आली होती. अशातच लोकं पतंग उडवीत होते. नायलॉन मांजाला सरकारनं बंदी घातली होती. तरीही नायलॉन मांजा विकल्याच जात होता. मात्र कमलला वाटत होतं की चालकावर कारवाई करण्याऐवजी या पतंग उडविणाऱ्या लोकांवर अशा शिक्षेची तरतूद असावी. कारण पंतगाच्या धाग्याने कित्येकांचे जीव जात होते जे निरपराधी असायचे. ज्यात पक्ष्यांचाही समावेश होता.
पतंगाचा खेळ तसा मनोरंजन म्हणून चांगला आहे. परंतु अलिकडील काळात पतंगानं गळे कापत आहेत. जीव जात आहेत. पशुपक्षी जखमी होत आहेत. त्यांचे जीव जात आहे. त्यातच त्या प्राणी पक्षाचा कोणताच गुन्हा नसतो. तेही मरत आहेत. एकंदरीत सांगायचं झाल्यास बरेच नुकसान होत आहेत. हे पाहता कमलला असं वाटायला लागलं होतं की हा पतंग उडविण्याचा खेळच कायमचा बंद करुन टाकावा. तसं त्याचं बरोबरच होतं.

************************************************

सरकार राबवीत आहे नायलॉन मांजा बंद करण्याचा उपक्रम. लोकं सर्रास नायलॉन मांजा वापरत आहेत. जो मांजा सडत नाही. खराब होत नाही व वर्षानुवर्ष टिकून राहतो. ज्या मांजानं अनेकांचे गळे कापले जातात. अनेक पक्षी त्या मांज्यात लटकून त्यातून सुटका न झाल्यानं उपासानं व विना अन्नपाण्यानं तडपत तडपत मरण पावतात. त्यामुळंच सरकारनं फक्त नायलॉन मांजावर बंदी घातली आहे. इतर धाग्यांना सोडलं आहे.
सरकारचं म्हणणं आहे की नायलॉन मांजावर बंदी आणली की लोकांचे गळे कापले जाणार नाही. कारण साधा मांजा हा तेवढ्या तीव्र स्वरुपाचा नसतो. तो लवकरच कुजतोही व त्याची लवकर विल्हेवाट लावता येते. परंतु नायलॉन मांजा हा वर्षानुवर्ष टिकून राहतो. त्याची विल्हेवाट लावता येत नाही. परंतु पतंग हा लोकांचा आवडता खेळ असल्यानं सरकारनं जरी नायलॉन मांजावर बंदी घातली तरी या नायलॉन मांज्याची विक्री लोकं लपूनछपून करतातच. करीत आहेत व लोकांचे गळे कापले जात आहेत.
नायलॉन मांजाच्या अनुषंगानं विचार केल्यास पुर्वी पतंग उडत नव्हते काय? उडत होते. मग त्यात जो मांजा वापरला जात होता, तो घातक नव्हता काय? तो घातकच होता. कारण त्यात काच राहात होता. परंतु त्यावर बंदी घातली गेली नव्हती. कारण त्यात काच जरी असला तरी ते धागे कालांतरानं कुजत असत व नष्ट होत असत. याचा अर्थ असा नव्हता की ते धागे माणसाचे आजच्यासारखे गळे कापत नव्हते. तसेच त्याच धाग्यात आजच्यासारखे पशुपक्षी लटकून पडत नव्हते. असं सरकारचं म्हणणं.
अलीकडील काळात पतंग उडविणे या खेळाला लोकं जास्त महत्व देवू लागले आहेत. पतंग उडविण्याचा छंदही तसा वाढत चाललेला आहे. यातूनच माणसांचे गळेच कापले जात आहेत. तसेच पशुपक्षांचेही जीव जात आहेत.
सरकार राबवीत आहे नायलॉन मांजा बंद करण्याचा उपक्रम. लोकं सर्रास नायलॉन मांजा वापरत आहेत. जो मांजा सडत नाही. खराब होत नाही व वर्षानुवर्ष टिकून राहतो. ज्या मांजानं अनेकांचे गळे कापले जातात. अनेक पक्षी त्या मांज्यात लटकून त्यातून सुटका न झाल्यानं उपासानं व विना अन्नपाण्यानं मरण पावतात.
सरकारचं म्हणणं आहे की नायलॉन मांजावर बंदी आणावी. परंतु पतंग हा लोकांचा आवडता खेळ असल्यानं सरकारनं जरी नायलॉन मंजावर बंदी घातली तरी या नायलॉन मांज्याची विक्री लोकं लपूनछपून करतातच. करीत आहेत व लोकांचे गळे कापले जात आहेत.
नायलॉन मांज्याच्या अनुषंगानं विचार केल्यास पुर्वी पतंग उडत नव्हते काय? उडत होते. मग त्यात जो मांजा वापरला जात होता, तो घातक नव्हता काय? तो घातकच होता. कारण त्यात काच राहात होता. परंतु त्यावर बंदी घातली गेली नव्हती. कारण त्यात काच जरी असला तरी ते धागे कालांतरानं कुजत असत व नष्टही होत असत. याचा अर्थ असा नव्हता की ते धागे माणसाचे आजच्यासारखे गळे कापत नव्हते. तसेच त्याच धाग्यात आजच्यासारखे पशुपक्षी लटकून पडत नव्हते. ते धागे त्यावेळेसही माणसाला क्षति पोहोचवीत होते आणि त्या धाग्यानही पशुपक्षी मरण पावत होते.
पतंग हा खेळ राष्ट्रीय नाही. म्हणतात की तो खेळ चीनमधून आला. तसा तो खेळ वाईटच. कारण पतंग कटल्यानंतर ती पतंग उडत उडत लांब अंतरावरुन जमीनीवर पडते आणि ती पडतांना माणसाला क्षति पोहोचवते. यामुळंच हा खेळच मुळात बंद करायला हवा. नायलॉन मांजावर बंदी आणण्याऐवजी. कारण या खेळात फक्त क्षणीक सुख मिळत असते. मात्र दुःख पाहता जन्मभराचं होते. कुणाचा एकुलता एक लहान मुलगा मरण पावतो तर कुणाच्या घरचा मोठा जीव मरण पावतो. जो कमवता असतो. मग तो नायलॉन मांजा का असेना आणि साधा मांजा का असेना. मांजा विचारच करीत नाही की मी नायलॉन आहे वा मी साधा आहे.
देशानं नायलॉन मांजावर बंदी घालणं हा व्यक्तीगत अधिकार आहे. भारतीय संविधानानं बहाल केलेला. भारतीय संविधानात अनुच्छेद १९ ते २२ मध्ये काही कलमानुसार आपल्याला स्वंतत्र्य वागण्याचे अधिकार दिले आहेत. स्वतंत्र्य व मुक्त विहार करण्याचे अधिकार. त्यात कलम २१ नुसार व्यक्तीगत स्वातंत्र्य बहाल केले गेले आहे. पतंग उडविणे हा आपला व्यक्तीगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळंच त्यावर बंदी आणता येत नाही. परंतु त्या छंदानं जर कुणाचे जीव जात असेल तर असे छंद कोणत्या कामाचे? असे छंद वा खेळ बंद केलेले बरे. उदाहरणार्थ. एखाद्यानं जर म्हटलं की मला अनुच्छेद १९ ते २२ नुसार व्यक्तीगत स्वातंत्र्याचे अधिकार आहेत. मला त्यानुसार मुक्तपणे वागता येते. त्याच वागण्यातून मला हत्या करायची आहे. तर हत्या करण्याचा अधिकार अनुच्छेद १९ ते २२ बहाल करीत नाहीत. पतंग उडविणे ह्या गोष्टीही अशा हत्येच्याच प्रकारात बसतात. त्यामुळंच तसे खेळच मुळात बंद करण्याची गरज आहे. फक्त नायलॉन मांजा बंद करणे नाही. त्यासाठी केवळ जनजागृतीचीच गरज नाही तर तसा कायदा बनविण्याची गरज आहे. जेणेकरुन शेकडो लोकांचे प्राण वाचवता येईल. पशुपक्षाचेही प्राण वाचवता येतील.
महत्वाचं सांगायचं झाल्यास पतंग हा खेळ जरी लोकांना रोजगार देणारा असला तरी तो विध्वंसक खेळ आहे. असे खेळ बंद केलेले बरे. ते खेळ जर बंद झाले तर भविष्यातील कित्येक लोकांचे प्राण वाचवता येवू शकतील हे तेवढंच खरं. तशी बंदी आणल्यास लोकं नक्कीच भडकतील. परंतु काही दिवसानंतर हळूहळू सवय पडेल व तद्नंतर लोकांना वाटेल की ही गोष्ट बरी झाली की पतंग उडविण्याचा छंद बंद झाला.
पतंग उडविणे हा छंद असून तो छंद बंद करणे अतिशय आवश्यक आहे. तो बंद केल्यास उद्या भावी पिढी आपले उपकारच मानतील. म्हणतील की प्राणी पक्षांच्या जीवाची आमच्याही जुन्या पिढीनं दखल घेतली व पतंग उडविण्याचा खेळ बंद केला म्हणून बरे झाले.
कमलला वाटायचं की ज्याप्रमाणे चालकावर दंड लावला व शिक्षा घातली की चालक निरपराध माणसांचा अपघात करतात. तसाच दंड लावावा पतंग उडविणाऱ्यांवर. तेही निरपराध प्राण्या पक्ष्यांचा जीवच घेतात. तसेच ते माणसांचाही मांजानं गळे कापून जीवच घेतात. परंतु सरकार तसं करणार नाही. याची खंत व्यक्त करीत होता तो.

************************************************

कमल आज शहरात राहात होता. शहरात जास्त पतंगा उडत होत्या. गावखेड्यात तशा पतंगा कमी उडत आणि उडत तर त्याही माळरानावर. माळरानावर पतंगाच्या स्पर्धाच लागत होत्या. त्यात कधी पैसेही डावावर लावले जात असत. लोकं आपली पतंग कटू नये म्हणून चांगला मांजा वापरत. तसं पाहता तीळसंक्रात असलीच की लोकांचा आनंदाचा सणच राहात असे. महिला वान वाटत तर पुरुष पतंग उडवीत. या पतंग उडविण्यात मोठी माणसंही आघाडीवर होती. पतंग उडविण्यात गरीब श्रीमंत असा भेद नव्हताच. गरीबी मुलं पतंग उडवीत. मात्र ते आधी पतंगा पकडत. त्या फाटल्या असतील तर चिपकवत व त्यानंतर ते आपला छंद पुर्ण करीत.
शहरात मात्र वेगळीच पतंग उडविण्याची पद्धत होती. शहरात अगदी डि जे लावून डिजेच्या तालावर पतंगीची मजा लुटणारे भरपूर होते. मात्र कमल पतंग उडवीत नव्हता. कारण त्यानं आपल्या डोळ्यासमोर एका माणसाचा पतंगाच्या धाग्यानं गळा चिरलेला पाहिला होता. तो व्यक्ती जागीच तडफडून मरण पावला होता.
कमल हा गावखेड्यात राहणारा एक व्यक्ती. लोकं लहानपणापासूनच त्याला बाईलवेडा म्हणायचे. त्याचं कारण होतं. त्याचं बाईसारखं बोलणं. लाजणं. तसंच लहानपणी कधी कधी त्याला स्रियांचीच कपडे परीधान करण्याची सवय होती. त्याचं गाव सुसंपन्न अशा भागात नव्हतं.
गाव खेडं असलेलं. अतिशय मागासलेलं खेडं. त्या गावात शिक्षणाचा गंध नव्हता. मुलं जास्तीत जास्त प्राधान्य शिक्षणाला देत नव्हते तर ते शेतीला प्राधान्य द्यायचे. ते शेतीतच जायचे. त्यामुळं शिक्षण म्हणजे काय? हेही गावाला समजायचं नाही. अशाच वातावरणात कमलही राहात होता.
कमल लहान असतांना गावात कधी कधी तमाशा यायचा. मग रात्रभर फड रंगायचा. त्यात स्री पात्र रंगायचे. स्री पात्र सादर करणारा गडी हा पुरुषच असायचा. तेही कळायचं त्या लहानशा वयात. त्यानंतर ती मुलं आईवडील शेतावर गेल्यावर जेव्हा घरी राहायची. तेव्हा तेही तमाशाचा खेळ खेळून पाहात असत.
१७ व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार अस्तित्वात आला. हा कलाप्रकार सिद्ध होण्यापूर्वी महाराष्ट्रात गोंधळ, जागरण, बळीराजा आणि महासुभा, ज्योतिबा यांच्या कार्याची जागृती पर गीत गायन जागरण, वाघ्यामुरळी, दशावतार, बहुरूपी, वासुदेवाची गाणी, पोतराज इ. लोककलाप्रकार प्रचलीत होते. त्यानंतर तमाशा आला व तमाशातील अंग लोकांना कळायला लागली. तमाशा हा गण, गौळण, लावणी, बतावणी आणि वग अशा पाच अंगांनी समृद्ध झालेला आहे.
'तमाशा' हा शब्द अरबी असून त्याचा अर्थ 'प्रेक्षणीय दृश्य' असा आहे. तमाशाच्या नायकांना असलेली 'शाहीर' ही संज्ञाही मूळ 'शायर' किंवा 'शाहर' या अरबी शब्दापासून बनलेली आहे. तमाशाचे आणि नायकाचे नाव अरबी असल्यामुळे हा तमाशा मुसलमानांच्या प्रभावातून उदय पावला असावा, असं काही विद्वानांचं मत आहे. तसंच 'तमाशा' हा शब्द मूळचा मराठी भाषेतील नसून तो उर्दूतून मराठीत आला आहे.
१३ ते १४ व्या शतकात दक्षीण भारतात मुसलमानी अंमल सुरु झाल्यापासून तो मराठीत आढळतो. एकनाथांच्या एका भारुडात 'बड़े बड़े तमाशा 'देखें' अशी ओळ आहे. अशी माहिती तमाशाच्या जन्माविषयी सापडते.
१८ व्या शतकाच्या सुरुवातीला वीरांच्या विषयवासनेवर उतारा म्हणून जन्मलेला हा खेळ, १९ व्या शतकाच्या सुरुवातीला भक्ती, नीती, ब्रह्मज्ञान यात टाकण्यात आला. म्हणजे तमाशाचे हाड शूरवीरांच्या शृंगाराचे, तर मांस सात्त्विकतेचेच टाकले असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. हाडाचे वळण आणि मासांने दिलेला आकार यांनी प्रकृती बनते, तसे शृंगाराच्या हाडाने आणि सात्त्विकतेच्या मांसाने तमाशाचे शरीर बनले आहे. सध्याच्या तमाशाच्या गाडीचे एक चाक शृंगाराचे तर दुसरे ब्रह्मज्ञानाचे आहे. या दोन्ही चाकांना जोडणारा कणा शूरवीरांच्या पराक्रमाचा असतो.
साधारणपणे असे तमाशाचे स्वरुप आहे. तमाशाचे खरे स्वरुप जरी पेशवाईतच उत्तर पेशवाईतच उदयास आले असले तरी तो प्रकार महाराष्ट्रात पूर्वीपासूनच अस्तित्त्वात होता. आज तमाशातून ते शुरवीरांचे पोवाडे जास्त करुन दिसत नाहीत की ज्यांचे पोवाडे पुर्वी गायले जायचे.
तमाशांचं आयोजन राजा करीत असे. राजा ते आयोजन करीत असतांना त्यात दोन हेतू ठेवत होता. पहिला हेतू असायचा, तो म्हणजे पोवाडे गायल्यावर सैनिकांना प्रेरणा मिळेल व ते नवजोशानं शत्रूंशी लढतील. कारण तमाशाचे जे गण पाडले होते. त्यात पोवाड्यांचाही समावेश होता व ते पोवाडे शुरविरांचे गायले जात असत. शाहीर हा हुबेहूब शुरविरांचे पोवाडे गात असत.
तमाशाचा दुसरा हेतू होता. तो म्हणजे मनोरंजन. सैनिक जेव्हा एखाद्या लढाईतून विजय मिळवून परत येत. तेव्हा ते थकलेले असायचे. तेव्हा त्यांचं मनोरंजन व्हावं या हेतूनंही तमाशे आयोजीत केले जायचे.
आज तमाशाचं स्वरुप पुर्णच बदललेले आहे. आज तमाशात शुरविरांचे पोवाडे कमी दिसतात. परंतु जे ही दाखवलं जातं. ते कामाचं व सुधारणेच्या दृष्टिकोणातून दाखवलं जातं. अपेक्षा केली जाते की समाज सुधरावा. त्यानुसार एखाद्या व्यक्तीची हत्या का केली? माणसानं कसं वागावं? यावर आधारीत घडलेल्या सत्य घटनेवर आजचे शाहीर पोवाडे तयार करुन त्याचं सादरीकरण हुबेहूब करुन घेतात. असं वाटतं की ती कथा खरोखरच घडत आहे.
तमाशाचे काही गणंही पडतात. तमाशाची सुरुवातच गणाने म्हणजेच गणपतीला आवाहन करुन होते.. 'अथर्वशीर्षात 'गं' काराची उपासना आहे. ज्ञानेश्वरांनी या 'गं' काराला व्यवहारी भाषेत गण असे नाव देऊन त्याला ईश आदि अशा शब्दांनी 'भावार्थदीपिकेत' नमन केले आहे. शाहिरांनी गण हा शब्द तसाच ठेवला आणि 'गणापूत झाली सारी उत्पत्ती' असे म्हटले. प्रत्येक मंगल कार्याची सुरुवात गणेशपूजनापासून करण्याची आपली परंपरागत प्रथा आहे. म्हटलं जातं की गणपती ह्या देवतेला पुजा सुरुवातीला केल्यास आपले विघ्न टळतात व आपल्या संबंधीत कार्यात बाधाच येत नाही. तीच गणाच्या रुपाने तमाशात रूढ झाली. आजही समाजामध्ये प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही विघ्नहर्त्या विनायकाची पूजा अथवा नमन करुनच होताना दिसते. तमाशातही प्रत्येक खेळ निर्विघ्न पार पडावा म्हणून गणेशाला गणातून नमन अथवा आवाहन केले जाते.
शाहिरात पुर्वी दोन प्रकारचे आध्यात्मीक विचार प्रवाह होते. आजही आहेत. शिव किंवा ब्रह्म यांना श्रेष्ठ मानणारे 'तुरेवाले' तर शक्ती व माया यांना श्रेष्ठ मानणारे 'कलगीवाले' हे आपापल्या परीने आपल्या दैवतांचे स्तवन करीत 'गण गाताना हे शाहीर प्रतिपक्षाला उद्देशून धाक वैन्याला किंवा अपयश द्यावे दुष्मनाला अशी भाषा वापरीत. अर्थात श्रोत्यांनी गण ऐकल्याबरोबर तो गाणारा शाहीर कोणत्या पक्षाचा आहे, याची कल्पना श्रोत्यांना येत असे. हा गण सादर करताना म्हणण्यात येणाऱ्या काव्यास 'गणाची लावणी' असे म्हटले जाते. ज्या काळात तमाशा उभारीस आला तो काळ पेशवाईचा आणि पेशवे गजाननाचे भक्त होते आणि तमाशा हे शेवटी आध्यात्मीक बीज असणारे लौकिक लोकनाट्य असल्याने गणातून गणपतीची आराधना करण्यास प्रथम प्राधान्य मिळाले.
तमाशा सादर करत असताना गणानंतर गौळण सादर झाली. या गौळणीचे मूळ ज्ञानेश्वरापर्यंत जाऊन पोचते. त्यांनी आध्यात्मीक गौळणी लिहिल्या. तमाशात मात्र आध्यात्मातूनही शृंगार दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. महाभारत काळात श्रीकृष्ण मथुरेला दही, दूध, तूप, लोणी घेवून जाणाऱ्या गौळणींना अडवत असे आणि त्यांच्याकडून लोणी घेत असे हे सर्वज्ञातच आहे. तोच संदर्भ येथेही येतो. तमाशातील श्रीकृष्णही मथुरेला जाणाऱ्या गौळणींना अडवतो. गौळणीमध्ये राधा व इतर गौळणींची कृष्ण व त्याचे सवंगडी त्यामध्ये प्रामुख्याने पेंद्या छेडछाड करतो. त्यातूनही विनोद निर्माण होतो. गौळणीतील मावशी आणि पेंद्या, मावशी आणि कृष्ण, मावशी आणि इतर गौळणी यांच्यातील बोलणं अतिशय चटकदार आणि द्व्यअर्थी असतं. हे पूर्णपणे करमणूकप्रधान संवाद असतात. सर्व गौळणी, मावशी कृष्णाची विनवणी करतात. शेवटी कृष्ण आपले अस्सल दान म्हणजेच तमाशातील 'गौळण' मिळाल्यानंतर सर्व गौळणींना जाण्याची अनुज्ञा देतो आणि गौळण संपते.
तमाशात लावणीलाही मोठे महत्व आहे. प्रत्येक तमाशात एक दोन लावण्या असतातच. हा तमाशातील अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. लावणी या शब्दाचा संबंध काहीजण संस्कृतमधील लापणिकेशी लावण्याचा प्रयत्न करतात तर काही लोक शेतीमध्ये ज्याप्रमाणे भाताच्या रोपाची लावणी असते. तशी अक्षरांची शब्दांची एकापुढे एक लावलेली रचना म्हणजे 'लावणी' अशी निर्मिती सांगून 'लावणी'च्या निर्मितीचा संबंध श्रमपरिहारार्थ झाला असावा असे सांगतात. ती समूहमनाचे रंजन करण्यासाठीही जन्मल्याचे सांगीतले आहे. लावणीचे विषय वेगवेगळ्या स्वरुपाचे असतात. यात पौराणीक, आध्यात्मीक, सामाजीक, काल्पनीक तसेच स्त्री-पुरूष सौंदर्यवर्णन, शृंगार, विरह, वियोग, रूसवे फुगवे इत्यादी विषय हाताळले जातात. परंतु या सर्व विषयातील शृंगारावर आधारित असणाऱ्या लावण्यांची संख्या जास्त असल्याने लावणी म्हणजे शृंगार अशी धारणा झाल्याचे दिसते.
बतावणी, ह्या प्रकारालाही तमाशात अतिशय महत्व आहे. नाटकाची लांबी वाढविण्यासाठी किंवा गंभीर नाटकात प्रेक्षकांना हसविण्यासाठी फार्स रंगभूमीवर होऊ लागले. समाजातील व्यंगावर यामधून बोट ठेवले जाई. ते ही विनोदाच्या साह्याने. तमाशातील फार्समध्ये बहुतांशी 'तात्या' आणि 'बापू' ही दोन पात्रे असतात. पुढे सादर होणाऱ्या वगातील पात्रांची रंगरंगोटी होईपर्यंतच्या वेळात बतावणीचे सादरीकरण होत असे. 'तात्या' आणि 'बापू' दोघेही विनोदासाठी चुटक्यांचे किंवा शापांचे सहाय्य घेऊन प्रेक्षकांना हसवत. जर पात्रांचे कपडे बदलवायचे असेल तर त्याला पुरेसा वेळ लागत असे. त्या वेळात कधी ढोलक मास्तर तर कधी खंजेरीवाला असा तात्या वा बापू बनून यायचा व लोकांचं मनोरंजन करायचा.
तमाशातली फार्स किंवा बतावणी संपल्यानंतर वगाचे सादरीकरण होते. तमाशातील नाट्य खऱ्या अर्थाने वगामध्ये पहावयास मिळते. 'वेग' हा शब्द 'ओघ' या शब्दाचा अपभ्रंश असावा, कारण ग्रामीण भाषेमध्ये 'ओघ' ऐवजी 'वग' या शब्दाचा वापर केल्याचे आढळून येते. तर 'सातवाहन राजा हाल याच्या गाथासप्तशती या ग्रंथामध्ये 'वग्ग' हा शब्द समूह कळप या अर्थानी वापरला असल्याचे दिसते. या 'वग्ग' या शब्दापासून वग हा शब्द रूढ झाला असावा. कारण तमाशातील वगाची निर्मिती किंवा प्रत्यक्ष प्रयोग समूहमनाच्या किंवा प्रत्येक पात्रांच्या स्वतंत्र प्रतिभेचे एकत्रीकरण असते म्हणून ती समूहनिर्मिती ठरते. वगाचे स्वरूप हे नाटकाप्रमाणे असते. संवाद, पात्रे नाटकाप्रमाणेच असतात. वगाची कथा ठरलेली असते. पण प्रत्येक पात्राच्या तोंडचे संवाद मात्र स्वयंस्फूतीने किंवा हजरजबाबीपणाने अभिव्यक्त होतात. तमाशाचा साधारणपणे उत्तरार्ध म्हणजे वग. वगाची लिखित संहिता नसते. पण स्थूल कथा प्रत्येक पात्राला ज्ञात असते. पात्रे स्वयंस्फूर्तीने पण कथेला अनुसरून संवाद म्हणत असतात. सरदार किंवा तमाशाचा प्रमुख संवादामध्ये सुसूत्रता राखून कथेला गती प्राप्त करून देत असतो. विमुक्त संवाद, अभिनय, नृत्य, संगीत यांच्या माध्यमातून वगाचा प्रयोग सिद्ध होतो.
वरील स्वरुप बाबी ह्या पात्राबाबतच्या आहेत. मात्र तमाशातील मुख्य बाब म्हणजे वाद्य. वाद्यात ढोलकी, तुणतुणे, हलगी किंवा कडे आणि झांज या चारींच्या वाद्यमेळ्यात नाचीच्या पायातील चाळांचीही भर पडते. या प्रत्येक वाद्याची माहिती पुढीलप्रमाणे.
ढोलकी हे तमाशातील महत्त्वाचे वाद्य आहे. दक्षिणेतील मृदुंग, खोळ याहून ती वेगळी आहे. मृदंगाचे एक टोक लहान करत नेलेले असते. तसेच तमाशातील ढोलकीचे काहीवेळा ते थोडेसे लहान केलेले दिसते. मृदंगाच्या आवाजात एक दमदारपणा आहे. तर ढोलकीत कडक फडकतेपणा आहे. साधारण दोन-सव्वादोन फूट लाकूड पोखरून हे खोड बनविलेले असते. हे खोड बहुधा शेळी, बोकड यांच्या निम्म्या कमविलेल्या कातड्याने मढविलेले असते. धिमपुडा रुंद आणि शाईपुडा अरुंद असतो. बऱ्याच वेळा तमाशाची ढोलकी सरळ समांतरही असलेली आढळते. शाईकडचा पुडा लोखंडी कड्यावर आवळलेला आणि तो धिमपुड्याला सुताच्या दोरीने जखडलेला असतो. तमाशा ढोलकीचा स्वर दोरीच्या तिढ्यात बारीक खुंट्या घालून, त्यांनी दोरीचा पीळ वाढवून खालीवर नेलेलं असतं. तसेच तुणतुणे. तुणतुणे लाकडी मापट्याला, खालच्या तोंडाला कातड्याने मढवून तयार केलेले असते. मापट्याच्या मध्यावरून बारीक तार वर घेतलेली असते. मापट्याच्या बाजूला दोन-अडीच फुटाची तिरकस दांडी बसवून तिच्या वरच्या टोकाच्या खुंटीला ती तार गुंडाळलेली असते. ही दांडी हातात धरुन, त्याच हाताच्या बोटाने नखाने तुणतुणे वाजवतात. तुणतुण्याच्या टोकाला रंगीत रुमाल बांधलेला असतो. तुणतुणे वाजविणारा सुरत्या असतो. गाण्याचे पालुपद पुढे चालवीत तो तुणतुणे वाजवत असतो. तसंच हलगी हे वाद्य. हे वाद्य शाहिरांच्या डफापासून तमाशात आले. पण डफापेक्षा हलगीचा आवाज कडक आणि टणक असतो. हे एक साधे वाद्य आहे. साधारण: मोठ्या ताटाच्या आकाराचे हे वाद्य लाकडी किंवा लोखंडी कड्यावर कातडे मढवून तयार केलेले असते. तमाशात विशिष्ट प्रसंगीच या वाद्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे तमाशात कडाक्याचा रंग भरला जातो. तमाशाच्या मुख्य सरदाराजवळ ही हलगी असते. ही हलगी तो छातीच्या डाव्या बाजूला उभी धरून तिच्यावर उजव्या हाताची थाप देऊन वाजवितो. हलगीच्या खाली तो डाव्या हाताच्या पंजाने बोटात लहान काडी धरून त्या काडीने हलगीवर आघात करूनही तो हलगी वाजवितो. त्यामुळे काडीच्या आघाताने व उजव्या हाताच्या थापेने हलगीतून कडक आवाजाचे संगीत निर्माण होते. या हलगीला 'कडे' असेही म्हणतात.
झांज....... झांज हे घनवाद्य प्रकारात येते. झांज हे वाद्य पितळ या धातूपासून बनविले जाते. दोन चकत्या पितळ या धातूपासून तयार करून त्या एका दोरीच्या दोन टोकांना बांधतात. या दोन चकत्यांचा एकमेकांवर विशिष्ट पद्धतीने आघात केला की आवाज निर्माण होतो. हे वाद्य सहाय्यक वाद्य म्हणून वापरले जाते. याचा वापर जास्त करुन भजनात होतो. हे वाद्य देखील तमाशात पुर्वी वापरले जात असत.
तो तमाशाचा खेळ. कमलला तमाशाचा खेळ फार आवडायचा व तो, तो खेळ आवडीनं खेळायचा. त्याला स्रियांची वस्रे घालून नाचणं अतिशय आवडायचं. तोच ताल करता करता तो लहानाचा मोठा होत होता.
कमल आपल्या आईचा एकुलता एक मुलगा. परंतु तोही असा की त्याला त्या बालवयापासून मुलांशी राहाणं आवडत नव्हतं. तो मुलींशीच राहायचा. त्यांच्याशी बोलणं, हसणं, खिदळणं त्याला आवडत होतं. परंतु जसजसा तो मोठा होत गेला. तसतसे संदर्भ बदलत गेले व त्याला आता त्या मुली आपल्याशी बोलू देत नसत. फक्त त्याचा वापर करुन घेत. कधी त्याला चिडवीतही असत. त्यामुळंच त्याची अवस्था त्या काळात तमाशातील पेंड्यासारखी झाली होती. तो तसा एकदाचा प्रसंग. कमलबाबत घडला होता तो प्रसंग. कमल शाळेत जात होता. तेव्हा शाळेत आधारकार्ड भरण्याचं काम आलं होतं. लहान व शाळेतील मुलांनाही आधारकार्ड अनिवार्य केलं होतं. अशातच शिक्षकानं गमतीनं विचारलं.
"हं, सांगा आपआपल्या नावासमोर. मी मेल लिहू की फिमेल?"
शिक्षकांचा तो प्रश्न. तसा प्रश्न शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारुच नये. कारण विद्यार्थ्यांमधून मेल कोण आणि फिमेल कोण? हे शिक्षकांना ठामपणे माहीत असतं. तसा तो प्रश्न त्या शिक्षकानं शाळेत विचारायलाच नको होता. परंतु त्यांनी एकेकाचं नाव घेवून विचारलं की फिमेल की मेल. तसं आनंददायी शिक्षण आलं होतं शाळेत. अगदी हसतहसत सगळेजण शिकत होते. सर्वांनी विनोद करीत करीत आपआपला परिचय दिला. त्यानंतर शेवटी कमलचा क्रमांक आला. कमल उभा झाला. तसे सगळे हसले. मग शिक्षक आजुबाजूला पाहू लागले. विचारु लागले. 'काय झालं?'
विद्यार्थ्यांना शिक्षकानं तसं विचारताच सारे चूप बसले. तसा तो शिक्षक दरडावून पुन्हा म्हणाला,
"काय झालं हसायला. कोणी सांगत नसेल तर मी सर्वांना वर्गाच्या बाहेर काढणार. अशी कोणाची टिंगल टवाळकी करणं बरं तरी आहे काय? तुमची अशीच कोणी टिंगल केली तर?"
तो हसण्याचा प्रसंग. त्यानंतर शिक्षकाचं दाटणं. त्यावर एक मुलगी हिंमत करुन उभी झाली. म्हणाली,
"सर, यात आमचा दोष नाय. हा करतोच तसा."
"म्हणजे?"
शिक्षकानं पुन्हा प्रश्न केला. तशी ती चूप बसली. तसा थोडा वेळ गेला. वर्गात चिरस्मशान शांतता पसरली. सगळे चूप बसले. थोड्या वेळानं हिंमत करुन एक मुलगा उभा झाला. तसे शिक्षक म्हणाले,
"तुलाही काही बोलायचं आहे काय?"
"होय."
"बोल तर."
"सर हा बायल्यासारखाच करतोय."
त्या मुलाचे ते बोल. तसं वर्गात परत हास्य पिकलं. ती मुलं इकडं तिकडं पाहात खो खो हसत होती. तसे शिक्षक बोलले.
"आता चूप बसा. नाहीतर मार देईल."
ते शिक्षकांचं बोलणं. तसे सर्वजण मार पडेल या धाकानं चूप बसले. शिक्षकानं त्यालाही बसवलं व त्याच्या जागेवर स्वतःच मेल लिहिलं व वर्गाचे ते पपत्र पुर्ण केले. तशी बऱ्याच विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकानं भरली. परंतु तरीही ती माहिती पुर्ण होत नव्हती. काहीतरी चुकतच होतं. त्याचं कारण होतं आधारकार्ड. आधारकार्डवर बऱ्याच विद्यार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे व्यवस्थीत जुळत नसल्यानं सगळा सावळा गोंधळ होता. आधारकार्ड विद्यार्थ्यांना अनिवार्य केलं होतं.
आधारकार्ड विद्यार्थ्यांना अनिवार्य, मग त्यासाठी काय यंत्रणा सरकार उपलब्ध करुन देत आहेत? तर याचं उत्तर काहीच नाही असं म्हणता येईल. कारण आधारकार्ड काढत असतांना वा अपडेट करीत असतांना आधारकार्ड केंद्रावर एवढी भीड असते की सहजासहजी एका दिवसात आधारकार्डचं काम होत नाही. दररोज चकरा माराव्या लागतात. ज्यात वेळ व पैसा वाया जातोच. शिवाय विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो वा नुकसान होते व त्याला घेवून जाणाऱ्या पालकांच्याही कामाचं नुकसान होत असतं. जे आजच्या महागाईच्या काळात अतिशय महत्वाचं असतं. यावर उपाय म्हणजे आधारकार्ड बनविण्याच्या ॲपची वा अपडेट करणाऱ्या ॲपची उपलब्धता शिक्षकाच्या मोबाईलवर करुन देणे. ज्यातून आधारकार्ड काढणे वा अपडेट करणे ही प्रक्रिया सहज व सुलभ घडू शकेल हे तेवढंच खरं आहे.
शाळा.......शाळा हे संस्काराचं एकमेव औपचारिक केंद्र आहे. तिथं शिक्षणासोबत संस्काराचीही मेजवाणी मिळत असते. अशाच या शाळेतून कोणत्याही प्रकारच्या देश विकासाच्या योजनेचे बी पेरण्याचं काम सरकार करीत असतं.
सरकारचही बरोबर असतं. कारण लहान मुलांच्या बाबतीत संस्कार पेरतांना पालक हे मजबूर असतात. कारण शाळेत आपल्या मुलांना नाही पाठवत म्हटल्यास विद्यार्थ्यांचं नुकसान होतं व पाठवतो म्हटलं तर सरकारचं दडपण शोषावंच लागतं.
सरकारनं अशीच आणलेली आधारकार्ड योजना. जे आधारकार्ड भारतीय नागरिकत्वाचं प्रमाण नाही, असंच कार्डवर लिहिलेलं असतं. हे जरी खरं असलं तरी त्या योजनेनुसार सरकारनं आधारकार्ड हे प्रत्येक नागरीकाला अनिवार्य केलं व सरकारनं प्रत्येकाला आधारकार्ड काढायला लावलं. मग गरीब असो की श्रीमंत, ज्यांचा कार्ड काढतांना वेळ वाया गेला तरी चालेल, ते कार्ड काढतांना वेळ लागला तरी चालेल. सरकारला त्याचं काही घेणदेणं नाही.
आधारकार्ड........आधारकार्ड जरी देशाच्या नागरीकत्वाचं प्रमाण नसलं तरी ते सर्वांना अनिवार्य केलं आहे. त्याचबरोबर ते विद्यार्थ्यांनाही अनिवार्य केलं आहे. परंतु असं आधारकार्ड काढत असतांना ज्या समस्या उद्भवतात. त्या न सांगितलेल्या बऱ्या. विद्यार्थ्यांचं आधारकार्ड काढत असतांना वा ते अपडेट करीत असतांना एका एका समस्येसाठी व ती चूक दुरुस्त करण्यासाठी पालकांना आधारकार्ड केंद्रावर किती चकरा माराव्या लागतात याची गणतीच करता येत नाही. बर्‍याच चकरा तर आधारकार्ड बायोमेट्रिक करतांनाच माराव्या लागतात. कारण लहान लेकरांचे बोटाचे ठसेच लवकर येत नाहीत. शिवाय कधीकधी स्पेलिंग चूक तर कधी जन्मतारखेत घोळ. कधी मेलचं फिमेल होतं तर कधी फिमेलचं मेल. त्यातच उच्च शिकलेला असलेला व्यक्तीही आपली माहिती स्वतः भरत नाही. तो दुसऱ्याच व्यक्तीला भरायला लावतो आपली माहिती आणि जो माहिती ऐकून भरतो. तोही चूक माहिती भरतो. त्यानंतर ती भरलेली माहिती शिकलेला व्यक्ती कधीच वाचून पाहात नाही आणि शहानिशाही करीत नाही की ती माहिती चूक आहे की बरोबर आहे. यातूनच चुका होतात. एवढ्या चुका होतात की सतरावेळा आधारकार्ड केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतात.
आधारकार्ड बाबतीत चुका. काही चुका अनवधानानं होत असतात तर काही चुका या जाणूनबुजूनही होत असतात. जाणूनबुजून होत असलेल्या चुका या आपलं त्या आधारकार्ड फॉम भरीत असतांना दुर्लक्ष केल्यानं होत असतात. या चुका सहजासहजी सुधारता येत नाही. त्याला वेळ लागतोच.
अलिकडील काळात आधारकार्डला अतिशय महत्व आलेलं आहे. त्यामुळंच छोट्याछोट्या गोष्टीसाठी आधारकार्ड सुधारणे गरजेचे आहे. म्हणूनच आधारकार्ड सुधरविण्यासाठी सतरा चकरा मारणे गरजेचे. हा दृष्टिकोन हेरुन आधारकार्डसाठी चकरा मारल्या जातात. त्यातच लहान मुलांचं अर्थात विद्यार्थ्यांचं आधारकार्ड अपडेट करतांना चकरा माराव्या लागतात सगळे कामधाम सोडून. यावर उपाय एकच. तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड अपडेट करण्याची जबाबदारी शिक्षकांना द्यावी आणि त्यासाठी सरकारनं एक आधारकार्ड बनविण्याचं किंवा अपडेट करण्याचं ॲप बनवावं. ज्या ॲपनुसार विद्यार्थ्यांचं आधारकार्ड अपडेट करता येईल वा नवीन काढता येईल. तसंच आधारकार्ड काढण्याचं काम सुकर होईल. परंतु सरकार तसं करीत नाही. ते शिक्षकांना आदेश देत असतं की तुम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं आधारकार्ड अपडेट करुन घ्या. आधारकार्ड काढून घ्या. आधारकार्ड दुरुस्त करुन घ्या. त्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास द्या. त्यांच्या पालकांना त्रास द्या. त्यातच एखाद्या पालकानं आपल्या पाल्याचं आधारकार्ड अपडेट नाही केलं वा ते कार्ड बनवलंच नाही तर त्या विद्यार्थ्यांना गाडीवर बसवून स्वतः आधारकार्ड केंद्रावर घेवून जावून त्या विद्यार्थ्यांच्या आधारकार्डचं काम करुन घ्या. असं जर तुमच्यानं जमत नसेल तर तुम्ही शिक्षक म्हणून काम करु नका. नोटीस घ्या व घरी बसा.
सरकारचं शिक्षकांप्रती हे धोरण. जे आधारकार्ड देशीय नागरिकत्वाचं प्रमाण नाही. ते आधारकार्ड काढत असतांना शिक्षकांना पालकांना व विद्यार्थ्यांना असा होणारा त्रास. हा त्रास जर पाहिला तर आधारकार्ड का काढायला लावावं सरकारनं? असा प्रश्न पडतो. अन् ते जर काढायचं असेल तर त्याचं आजच्या ऑनलाईनच्या काळात सरकारनं त्याचं ॲप शिक्षकांना का बरं देवू नये की जेणेकरुन विद्यार्थ्यांना कोणत्याच स्वरुपाचा त्रास होणार नाही. तसेच पालकांनाही कोणत्याच स्वरुपाचा त्रास होणार नाही. तसाच त्रास शिक्षकांनाही होणार नाही. अर्थातच जर सरकार आधारकार्ड प्रत्येक विद्यार्थ्यांना अनिवार्य म्हणत असतं वा करीत असतं. परंतु ते तसं अनिवार्य करीत असतांना जर आजच्या ऑनलाईनच्या काळात प्रत्येकाच्या मोबाईलवर त्याचं ॲप द्यावं. जेणेकरुन प्रत्येकाला प्रत्येकाचं आधारकार्ड घरच्या घरीच अपडेट करता येईल. बनवता येईल व होणारा त्रास वाचवता येईल हे तेवढंच खरं. तसं ॲप उपलब्ध करुन देणं यात काहीच गैर नाही. एवढंच सांगावेसे वाटेल.
शिक्षकांना विद्यार्थ्यांचं आधारकार्ड नसल्यानं त्रासच होत होता. तसं त्या शाळेतील शिक्षकांना वाटायचं की सरकारनं आम्हाला आधारकार्ड बनविण्याचं तंत्रज्ञान शिकवावं. जेणेकरुन आम्ही विद्यार्थ्यांचं आधारकार्ड स्वतःच काढून ते आधारकार्ड आमच्या शाळेतील दाखल नमुन्यानुसार व्यवस्थीत करु. मग आधारकार्ड मिसमॅचचे प्रॉब्लेमच उद्भवणार नाहीत. परंतु सरकार तरी तसं ऐकत नव्हतं. कारण त्यांची कमाई जात होती.
आधार.......प्रत्येकाला आधार हवा असतो. आधार महत्वपुर्ण गरज आहे मानवाची. जर आधार नसेल तर मनुष्याचा जन्मच वाया गेला असं म्हणता येईल. म्हणतात की आधाराशिवाय कोणताच व्यक्ती पुढं जात नाही. याचाच अर्थ असा की आधार नसला तर त्या माणसाचा जन्म व्यर्थ गेल्याशिवाय राहात नाही. आधार जसा माणसाला लागतो, तसाच आधार पशुपक्षी व वृक्षवल्लीलाही लागू आहे. जसा एखाद्या वेलीला जर आधार नसला तर तिची वाढ खुंटते किंवा ती जमीनीवरच पसरते. तसं मनुष्यप्राण्यांचंही आहे. माणसालाही आधाराची गरज आहे. जसे, आई आपल्या बाळास जन्म दिल्यानंतर त्याला सर्वप्रथम दुधाचा आधार देते. तेव्हाच त्याचं पोट भरतं व तो लहानाचा मोठा होत जातो. त्यानंतर तो थोडा मोठा झाला की त्याला शाळेत टाकलं जातं. मग शाळेत त्याचे शिक्षक त्याला आधार देत असतात. त्यानंतर तो आणखी थोडा मोठा झाला की त्याचे मित्र त्याला आधार देत असतात. त्यानंतर तो तरुण झाला की त्याचा विवाह होतो व पत्नी त्याला आधार देते. मग तो म्हातारा झाला की त्याची मुलं त्याचा आधार बनतात. तसंच या मानवाच्या जीवनप्रवासात एखादा व्यक्ती आंधळा असलाच तर त्याला त्याची काठी आधार देते.
आधाराबाबत सांगायचं झाल्यास सांगावेसे वाटेल की आम्ही जेव्हा लहान होतो. तेव्हा आमचे वडील शेतात झाडं लावायचे. तसे ते झाडं लावतांना त्या झाडाच्या लहान रोपट्याजवळ एक लाब काठी गाडायचे. ते ती काठी का गाडतात, ते त्यावेळेस कळायचं नाही. परंतु आता कळतं. ते ती काठी त्या झाडाला आधार देण्यासाठी गाडत होते.
आधाराचं मानवाच्या जीवनात फार महत्व आहे. आधार नसेल तर मानवाचं जीवन निरस व कंटाळवाणं वाटत असतं. ज्यांना मुलंबाळं नसतात. त्यांना जीवनच जगावसं वाटत नाही असं आधाराचं महत्व आज तरी आहे. मात्र आजच्या काळात हा आधारच नष्ट होवू पाहात आहे. त्याचं कारण आहे संबंध. आज पतीपत्नींमध्ये वाद येत आहेत. ते वाद एवढे विकोपाला जात आहेत की त्यातून पती पत्नी दोघंही विलग होतांना दिसत आहेत. त्यात मुलं जर असतील तर मुलाबाळांचं अतोनात नुकसान होतांना दिसत आहे. कधी कधी पत्नी पतीला सोडून जातांना मुलाबाळाची चिंताच करीत नाही तर कधी पती पत्नीला सोडून जातांना मुलांची चिंता करीत नाही. अशावेळेस कधीकधी ती मुलं आईकडं असतात तर कधी वडीलांकडं तर कधीकधी दोघांकडेही नसून शेल्टर होममध्ये असतात. ती मुलं मायबाप असूनही त्यांचं छत्र हरविल्यानं अनाथांचं जीवन जगत असतात. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होत नाही.
आज जसा पती पत्नींमध्ये वाद आहे. तसाच वाद आज मुलं आणि मायबापांमध्ये आहे. मायबाप जेव्हा म्हातारे होतात. तेव्हा त्यांना आधाराची खरी गरज असते. परंतु ज्यावेळेस त्यांना आपल्या पुत्रांची गरज असते. त्यावेळेस ती मुलं आपल्या मायबापाची सेवा करीत नाहीत. तर ती मुलं आपल्या पत्नीला आणि मुलाला घेवून वेगळी चूल मांडून वेगळे राहात असतात किंवा मायबापाला वृद्धाश्रमात टाकत असतात.
महत्वपुर्ण बाब ही की आधार भक्कम असावाच लागतो. ज्याप्रमाणे मोठमोठ्या झाडांना मुळं भक्कम असा आधार देतात व झाडांना कोसळू देत नाहीत. तसाच आधार माणसांनाही हवा असतो. मग ते लहान का असेना वा ते तरुण का असेना वा ते म्हातारे का असेना. जसं आधाराशिवाय एखादं झाड वा वेल मोठं होवू शकत नाही. तसाच मनुष्यजीवही आधाराशिवाय मोठा होवू शकत नाही. एवढंच नाही तर माणूस मरतांना त्याला न्यायला चार खांद्यांचा आधार लागतोच. त्याशिवाय तो स्मशानातही जात नाही. तसाच आधार नसेल तर तो जळूही शकत नाही. जळतांनाही प्रेताला लाकडाचा आधार घ्यावाच लागतो आणि मोक्षासाठी राखेला पाण्याचा. एवढं आधाराचं महत्व आहे. आधार जर कोणाला दिला गेला नाही तर त्या माणसाचं संपुर्ण आयुष्यच अंगुपंगू होवून जाईल. म्हणूनच म्हटलं जातं, बुडत्याला काठीचा आधार.
आज जग तसंच आहे. स्वार्थी झालं आहे. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाहीत. म्हणूनच कोणीही कोणाला कोणत्याही वेळेला आधार द्यायला पाहात नाही. आधाराचं एवढं महत्त्व आहे की जर समुद्रात जहाज चालवीत असतांना खंदक नावाचा आधार नसेल तर ते जहाज स्थिर राहू शकत नाही. जनावरांना माणसांचा आधार नसेल तर ते जनावर जगूच शकणार नाहीत मानवी वस्तीत. झाडांना मुळाचा आधार नसेल तर झाडं पृथ्वीतलावर उभीच राहू शकणार नाहीत. तसंच एखाद्या अपघाताचे वेळेस जर कोणी आधार दिलाच नाही तर त्या अपघात प्रवण स्थळावरील लोकं वेदनेनं अन् पाण्यानं अशीच तडफडत मरतील यात शंका नाही. म्हणूनच आधार अनिवार्य आहे. परंतु कधीकधी हाच आधार आपल्याला संकटात टाकून जातं. त्याचं कारण म्हणजे आपला समाज. अपघात प्रवण ठिकाणी आपण आपले एक कर्तव्य म्हणून अपघाती लोकांना मदत करीत असतो. परंतु असे झालेले अपघात हे आपल्याच अंगाशी येतात. जेव्हा पोलीस मंडळी अपघात प्रत्यक्ष पाहिला व आपण या घटनेचे साक्षीदार म्हणून आपल्याला न्यायालयात हजर करीत असतात व न्यायालयाचे फेरे मारायला लावतात. तसंच एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर आपल्याला मदतीची हाक देत असल्यास आपण त्याला लिफ्ट नावाचा आधार देतो आणि पुढील व्यक्ती स्वतःच लिफ्ट घेवून सुनसान जागेत ज्याने लिफ्ट दिली, त्याच्याच मानेवर सुरी लावतो. तो केवळ सुरीच लावत नाही तर तो त्याला लुटून त्याचीच गाडी घेवून पळूनही जाण्यास यशस्वी ठरतो. असाच कित्येक वेळेस दिलेला आधार आपल्याशी अंगलट करीत असल्यामुळंच आजच्या काळात कोणीही कोणाला आधारच देत नाही.
विशेष सांगायचं म्हणजे आधार ही एक महत्वाची गोष्ट आहे. तो जर दिल्या गेला नाही तर बऱ्याच लोकांचं नुकसान होईल. वयोवृद्ध व्यक्तींना वृद्धाश्रमात जावंच लागेल. लहान मुलांना आईवडील सोडून जाताच भीक मागून कसंतरी जगावं लागेल. आंधळ्याला काठी दिलीच नाही तर त्याचा प्रत्येकवेळेस अपघात होईल. लंगड्या व्यक्तींना बैसाख्याचा आधार दिल्या गेला नाही तर ते चालूच शकणार नाहीत. म्हणूनच आधार महत्वाचा. परंतु आधार हा काही लोकांमुळं बदनामच झालं आहे. म्हणूनच आजच्या काळात कोणी कोणाला आधार द्यायला पाहात नाहीत. परंतु तसं जरी असलं तरी आधार हा द्यायलाच हवा. कारण आपण जर कोणाला आधार दिला नाही तर आपल्यालाही कोणी आधार देणार नाही. मग आपलंही आधाराशिवाय जगणं व्यर्थ असेल यात शंका नाही. विशेष म्हणजे आपण कोणाला आधार दिल्यावर जो काही आपल्याला आनंद मिळतो ना. तो आनंद गगनात मावेनासा असतो. त्या आनंदाला परीसीमा नसते. म्हणूनच आधार द्यायलाच हवा हे तेवढंच खरं.
जसा आधार हा आंधळ्या, लंगड्याला द्यायला हवा. तसा तो आधार वृद्ध मातापित्यांनाही द्यायला हवा. जरी ते इतरांचे आईवडील असले तरी. तसाच आधार इतरांनाही द्यायला हवा. अर्थातच मुक्या प्राण्यांनाही आधार द्यायला हवा. वनस्पतींनाही आधार द्यायला हवा. कारण तेही आपले आधारस्तंभच आहेत.
मनुष्यप्राण्यांबाबत म्हणतात की माणसाला भावभावना असतात. त्यांनाही वेदना होतात आणि त्यांनाही दुःख होतंच. तसंच दुःख होतं मुक्या जनावरांना. मुकं जनावर का असेना, त्यांनाही भावभावना असतात. त्यांनाही वेदना होतात आणि त्यांनाही दुःख होतंच. हे तेव्हा कळतं. जेव्हा तेही रडत असतात. डोळ्यातून अश्रू ढाळत असतात. फरक एवढाच असतो की माणसाला रडतांना मोठा आवाज काढण्याची सवय असते. जनावरांना ती नसते.
काही लोकं असे असतात की त्यांना मुक्या प्राण्यांच्या भावभावना कळतात. ते मग सहानुभूतीपूर्वक व्यवहार करतात मुक्या प्राण्यांसोबत. जणू सहानुभूतीच बाळगतात मुक्या प्राण्यांबद्दल. परंतु असेही काही लोकं जगात आहेत की जे अशा मुक्या प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळगत नाहीत. तसं पाहिल्यास सहानुभूतीपूर्वक व्यवहारही करीत नाहीत. ते तर कापून टाकतात प्राण्यांना. भयंकर त्रास देत असतात. काही माणसं माणूसकीच्याही पलीकडं जात असतात त्यांच्याशी वागणूक करतांना.
प्राणी मग ते कोणतेही का असेना, आपल्या कामातच येत असतात. जशी गाय. गाय आपल्याला दूध देत असते. कुत्रा घराची राखण करीत असतो. बकरी लेंडीखत व दूध देत असते. कोंबड्या, बदके आपल्याला अंडे देत असतात. मेंढी लोकर देत असते. साप आपल्या शेतातील धान्य फस्त करणाऱ्या उंदरांचा बंदोबस्त लावत असतो. साधी मधमाशी आपल्याला शहद देत असते. लहानसा काजवा देखील अंधारात प्रकाशाची वाट दाखवत असतो. तसं पाहिल्यास बरेचसे प्राणी असे आहेत की ते आपल्याला त्रास देत नाहीत. उलट आपले आधार बनत असतात. परंतु आपण त्यांना बदल्यात काय देतो? क्लेश, दुःख, वेदना. त्यातच त्या प्राण्यांना ते आपले गुलाम असल्यागत वागवत असतो.
प्राण्यांनाही आपल्या वागण्याचा त्रास होतोच. परंतु ते आपले दुःख कोणाला सांगतील बरे. ते फक्त अश्रू काढू शकतात डोळ्यातून. रडूही शकतात डोळ्यातून. परंतु ते आवाज करु शकत नसल्यानं त्यांचं रडणं आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तसं पाहता मानवजात ही स्वार्थी आहे. ती मानवजात मुक्या प्राण्यांबाबतही वागतांना स्वार्थीपणानंच वागते. समजा एखाद्या प्राण्यांचा आपल्याला जेव्हापर्यंत उपयोग असेल, तेव्हापर्यंत माणूस त्याचा चांगलाच वापर करून घेतो. ज्या दिवशी मानवाला वाटलं की अमुक अमुक प्राणी आपल्या काही कामाचा नाही. तेव्हा त्याची वागणूक बदलते. त्यानंतर तो त्या प्राण्याचं फुकटचं टेन्शन पालवत नाही. या प्राण्यांच्या क्षेणीत गाय किंवा बैल असेल तर तो त्यांना चक्कं कसायाला विकून टाकतो. इथं तर माणूस असा प्राणी आहे की ज्याला बुद्धी असल्यामुळं तो बुद्धीच्या जोरावर काहीही करु शकतो. जसं त्यानं आज वाघासारख्या प्राण्यांवरही नियंत्रण मिळवलं आहे. इथला मानव तर असा आहे की ज्याला म्हशीचं दुध चालतं. मात्र तिचं पिल्लू चालत नाही. त्या म्हशीनं पिल्लाला जन्म दिला आणि ते पिल्लू जर नर निघालं तर हा माणूस त्याला विषारी इंजेक्शन देवून मारुन टाकतो किंवा ते पिल्लू थोडं मोठं झाल्यावर त्याला कसायाला विकून टाकतो. तेच पुढे म्हशीबाबत आणि गाईबैलाबाबतही करतो. गाय, म्हैस वा बैल भाकड झालं अर्थात ती दूध देत नसली वा बैलाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तो बैल शेतात काम देणारा नसेल तर त्याला चक्कं कसायास विकतो. मग हा कसाई अशा जनावरास कापून त्याचं मांस विकतो व चामड्याला परिपक्वं करुन त्याच्या वस्तू बनवतो वा चप्पल बनवतो.
गाय, म्हैस व बैलच नाही तर, निसर्गाच्या या लेकराची मानवासमोर काही किंमत नाही. बकरी वा मेंढ्यांचा काही उपयोग नाही म्हणून मानव त्यांना चक्कं कापून टाकण्याचं काम करतो. तसाच तो कोंबड्यांचा जन्म केवळ कापण्यासाठीच झाला आहे असं मानून कापतो. परंतु मुक्या प्राण्यांची तो दया घेत नाही. ही हिंसाच आहे.
हिंसेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हिंसा मानवानं करुच नये. कारण जिथं आपला एक बोट कापताच आपल्याला अशक्यप्राय वेदना होतात. तिथं त्या प्राण्यांची चक्कं मानच कापली जाते. तेव्हा त्याला कसं वाटत असेल? याची कल्पना न केलेली बरी. जिथं आपलं एक बोट कटतांना आपल्याला अशक्यप्राय त्रास होतो, तिथंच जर आपली मान कापली तर......तर आपल्याला कसं वाटेल? ही कल्पनाही आपल्याला सहन होत नाही. तेव्हा महत्वपुर्ण गोष्ट ही की आपले मुके प्राणी हे मित्र आहेत. कोणत्या ना कोणत्या कामात येणारे. असे समजून आपण कोणत्याच प्राण्यांची हिंसा करु नये वा कोणालाही करु देवू नये हे तेवढंच खरं. खरं तर त्यांचीही आपण दया घ्यावी. कारण ते आपल्या उपयोगाचे आहेत. तसेच त्यांना आपले आधारस्तंभ देखील म्हणता येईल यात शंका नाही.
आधार जसा प्राण्यांना हवा. तसाच आधार वनस्पतींनाही हवा. आधार झाडांनाही हवाच असं म्हटलं तर खरंच आपल्याला आश्चर्य वाटत असेल, नाही का? होय. ती बाब आश्चर्यातच टाकणारी आहे. परंतु त्याकडं कोणी लक्ष देत नाही. तसं पाहिल्यास झाडांनाही आधार हवा म्हटलं तर लोकं समजतील. झाडांना कशाला हवा आधार. आधार हवा वेलींना. कारण वेली या आधाराशिवाय वर जावू शकत नाहीत. म्हणूनच त्यांना कुंपन करावं लागतं वा लाकडाचं आच्छादन तयार करावं लागतं.
वास्तविक पाहता आधार वेलींनाच नाही तर झाडांनाही हवा असतो. कारण त्या झाडाला जर आधार दिल्या गेला नाही तर झाडं मोठी होणार नाहीत. त्यासाठी त्या झाडाला पाणी द्यावं लागतं. कारण पाणीच नसेल तर झाडं मरुन जातात. कुंपन करावं लागतं. कुंपन जर नसेल तर झाडांना पाळीव जनावरं खातात व नष्ट करुन टाकतात.
कमल लहानाचा मोठा होत होता. तो शाळेत जात होता व तेथील अभ्यास करीत होता. कमल चिकित्सक बुद्धीमत्तेचाही होता. परंतु त्याचे वडील गरीब होते. विश्वकोटीचं दारिद्र्य होतं त्याच्या घरी. त्याचा फटका बसला होता त्याला.

************************************************

कमल जसा चालक बनला होता. तसाच तो रामभक्तही होता. त्याला राम आवडत असे व त्याचेवर तो अभ्यास करीत असे. त्याला रामाचं अस्तित्व माहीत झालं होतं. मात्र लोकं सर्रास म्हणत होते की राम देव नाही. राम झालाच नाही. यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याला वाटायचं की राम हा अस्तित्वात होता व तो देवही होता. देवत्व हे माणसाच्या वागण्यावरुन ठरत असतं. राम चांगला वागला आपल्या काळात. म्हणूनच तो आदर्श ठरला. त्यानं राज्य चालवत असतांना कर्तव्य पालन केलं आणि तसं कर्तव्य पालन करीत असतांना त्याच्या आड जो जो आला. त्याला त्यानं दंडही दिला होता.
कमलनं लहानपणीच रामायण अनुभवलं होतं. त्या संदर्भात बऱ्याच पुस्तका त्यानं वाचल्या होत्या व त्याच पुस्तका वाचून तो भारावला होता. त्याला प्रेरणा मिळाली होती त्या पुस्तकापासून. तसंच गावात जे रामलीलेचे प्रयोग होत. ते पाहून तो भारावला होता व प्रेरीतही तेवढाच झाला होता. त्याच आधारावर बालपणीच त्याला काहीतरी करायला हवं असं वाटत होतं. अशातच रामायण टिव्हीवर लागलं होतं.
कमलचं ते शाळेत शिकण्याचं वय. त्याच काळात रामायण लागलं होतं दुरदर्शनवर. तेच रामायण म्हणजे कमलला भारावणारी गोष्ट झाली. कमलने त्यातून बोध घेतला व ठरवलं की आपणही रामासारखं राक्षसं मारुन टाकावी. त्यानंतर त्याच वेळेस तो एक लांब काठीचा बाण बनवायचा व त्याला दोरी बांधून त्याचा धनुष्य बाण बनवून तो बाण खेळण्यातील बाण म्हणून वापरु लागला. त्याला तो बाण खेळता खेळता त्याच वयात रामाची गोडी वाटली व राम आदर्श वाटू लागला होता.
रामाबाबत विचार करीत असतांना त्याला लोकांनी रामावर केलेले ताशेरे आवडत नव्हते. त्यातच त्याला वाटायचं की लोकं फक्त रामावर ताशेरे ओढतात. ज्यांना रामाचा व्यवस्थीत इतिहासच माहिती नाही व ज्यांनी रामायणाच्या प्रती वाचलेल्या नाहीत. जोही इतिहास माहीत आहे. तो फक्त त्यांना कुणीतरी सांगितल्याचा इतिहास आहे. राम काय आहे आणि काय नाही. हे प्रत्यक्ष रामायण वाचल्यावरच कळू शकतं.
रामाच्या आदर्शपणाचा विचार करीत करीत तो लहानाचा मोठा होत होता. त्यानं रामावर आधारीत बऱ्याच गोष्टी वाचल्या होत्या. तसं तत्वज्ञान तो लोकांना सांगत होता. परिस्थितीने त्याला ट्रक चालक बनविल्यानं कधी कधी त्याच्या तत्वज्ञान सांगण्यावर मर्यादा येत होत्या.
आज भारत स्वतंत्र्य होता. संविधान बनलं होतं व संविधानानं सर्वांना स्वतंत्र्यपणे विहार करण्याचं व मत मांडण्याचं स्वातंत्र्य बहाल केलं होतं. तसा कमल मोठाच झाला होता. तो विचार करीत होता की देशात स्वतंत्र्यता आहे व संविधानही. त्याचप्रमाणे देशातील लोकं शिकत आहेत. उच्च शिक्षण घेत आहेत. तरीही देशात अज्ञानी लोकं अधिवास करतात असं वाटत आहे. लोकं शिकले असले वा उच्चशिक्षीत झाले असले तरी अशिक्षीतपणासारखे वागत आहेत.
तो तसाच विचार करायचा. त्यातच त्याच्या मनात आज नवीनच विचार चमकून गेला होता. पहिला म्हणजे त्याला वाटत होतं की बाबासाहेबांनी उतारवयात आपला धर्म का बदलवला असेल? तसाच दुसरा विचार म्हणजे हिंदू मुसलमानांचे दंगे का होत असतील? तसं पाहिल्यास दर पाच वर्षानं निवडणूक यायची व दर पाच वर्षाच्या निवडणूकीत तोच तो मुद्दा असायचा राम मंदिर बांधणे.
राम मंदिर बांधणे हा जागतिक पातळीवरील विचार होता. कारण त्या जागेवर आजपर्यंत बाबरी मशिद होती. तसं पाहता देशात कित्येक वेळा हिंदू मुसलमानांचे दंगे होत होते. कोणी म्हणत होते की ती रामाची जन्मभुमी असून त्या जागेवर रामाचं मंदिर असावं तर कोणी म्हणत होते की त्या ठिकाणी बाबरीच मशिद असायला हवी. त्यातच तिसराही पक्ष दावा करीत होता की ते स्थान बौद्ध स्थान आहे. मात्र हा तिसरा पक्ष वाद करीत नव्हता. कारण होतं बुद्ध तत्वज्ञान. ते बुद्ध तत्वज्ञान शांततेचं प्रसारक होतं. तो पक्ष शांततेनं वागत होता.
अवधपुरी....... ज्या भागात रामाच्या जागेसाठी वाद सुरु होता. त्याचं पुर्वीचं नाव अवधपुरी होतं. त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळात त्याचं नाव साकेत ठेवण्यात आलं व त्यानंतर अयोध्या. राम त्या ठिकाणी जन्मला म्हणून त्याला विशेष महत्व दिलं गेलं.
कमलचे ते विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. तशी त्यानं रामायणाची मुळ प्रत वाचली व त्याच्या लक्षात आलं की पुर्वीच्या रामायणात भेदभाव नव्हता. भेदभावाचं प्रकरण नंतर रामायणात जाणूनबुजून टाकण्यात आलं. ते त्याला कळलं रामायणातील उत्तर कांड प्रकरण वाचतांना. ज्यातून सत्य प्रतिपादीत होत होतं व लेखकानं जाणूनबुजून कसं मुळच्या रामायणात असत्य शिरवलं हे दिसून येत होतं कमलला.
अयोध्या अर्थात पुर्वीच्या अवधपुरीत पुष्यामृत नक्षत्रात रामाच्या बनलेल्या भव्यदिव्य मंदिरात रामाच्या मुर्तीची स्थापना होणार होती. ते पाहता जाहिरातवाले तेथे काय काय घडत आहे याची काही काही कपोलकल्पित माहिती प्रसारीत करीत होते. जसे पुष्पक विमान येणे, विभीषण येणे, अस्वल येणे, माकडांचा झुंड येणे, गिद्धांचा झुंड येणे, साप दिसणे इत्यादी.
साप दिसणे याचा संबंध लक्ष्मण व वासूकी यांच्याशी लावण्यात येत होता. त्याबाबत एक दंतकथाही प्रसारीत केली जात होती. ती म्हणजे हनुमानाची. जेव्हा रामाला मरण हवं असतं. तेव्हा ते आपली अंगठी पाताळात टाकतात. ती शोधायला हनुमान स्वयं पाताळात जातात. तेथेच त्याची वासूकी व तक्षकशी भेट होते. जे साप होते त्या काळातील गाजलेले. शिवाय लक्ष्मणाला शेषनागाचा अवतारच मानण्यात येत होता. म्हणून अयोध्येत साप दिसत आहेत असं लोकं मानत होते. असं लोकांचं म्हणणं. गिद्ध हे संपाती व जटायूचे अवतार. म्हणूनच ते दिसत आहेत. माकड दिसणं हेही त्या काळात अस्तित्वात असलेल्या माकडाचा संकेत देत होते. त्याचप्रमाणे अस्वल दिसणं म्हणजे जांबवंताची उपस्थिती दर्शविणारं दृश्य होतं. असंही लोकं मानत होते. या सर्व संकेतावरुन हे निश्चित करता येत होतं की राम येतील.
राम काही जिवंत व्यक्तीमत्व नव्हते की ते येतील. परंतु तसाच देखावा केल्या जात होता नव्हे तर त्यातूनच धार्मीक भावना जोपासल्या जात होत्या. त्यातच वरील बाबतीतूनच एक ब्राह्मण वर्षाचा व्यक्ती सांगत होता की १९९२ ला बाभरी मशिदीचा ढाचा पाडत असतांना एक भिंत तुटत नव्हती. त्यावेळेस त्या भिंतीचं तोडण्याचं काम सुरु असतांना अचानक आरती सुरु झाली व त्या आरतीदरम्यान एक माकड त्या भिंतीवर बसायला आलं. त्यानंतर आरती संपल्यावर ती भिंत तोडत असतांना जास्त जोर लागला नाही. क्षणातच ती भिंत तुटली. हा चमत्कारच घडला होता. वरील या सर्व गोष्टीवरुन अयोध्येत रामाचं अस्तित्व होतं हे सिद्ध होत होते.
राम मंदिराचा वाद होता. तो बऱ्याच वर्षांपासून होता. तो वाद प्रधानमंत्री मोदीनं ताबडतोब सोडवला होता. त्यामुळंच ते हनुमंताचे अवतार वाटत होते. कारण हनुमंतालाही एक पत्नी होती. जी सुर्यदेवाची मुलगी होती. ती पत्नी फक्त विद्या शिकण्यापुरती केली होती. संसार केला नव्हता तिनं. त्यानंतर हनुमंत आजीवन ब्रम्हचारी राहिले. रामाची सेवा करीत. तेच मोदीबाबत घडलं होतं.
मोदी हे त्यावेळचे देशाचे प्रधानमंत्री होते. मोदींनाही एकच पत्नी होती यशोदाबेन. तिच्याशीही मोदीनं संसार केला नव्हता. आजीवन ब्रम्हचारी राहिले होते ते व रामाची सेवा केली होती त्यांनी. राममंदीरांचा तिढा सोडवून व आज अयोध्येत राममंदीर बांधून. ती त्यांचीच कृपा होती की आज राममंदिराचा तिढा सुटला होता व अयोध्येत राममंदीर बनलं होतं.
कमलला वाटायचं की राम एक चांगलं व्यक्तीमत्वं. मर्यादा पुरुषोत्तम असलेलं. तो तसा विचारच करायचा व विचारांती ठरवायचा.
राम आदर्शच होता. मात्र कधी त्यांच्यावर सीतेला सोडण्याचा आरोप लावला जात होता तर कधी शंभूक ऋषींची हत्या करण्याचा. कधी बालीची हत्या करण्याचा तर कधी रावणाची हत्या करण्याचा. यावरुन प्रश्न पडत आहे की रामाला आज जे आदर्शपण मिळालं आहे. ते योग्य आहे काय? तर त्याचं उत्तर होय होतं. राम अर्थातच आदर्शच होते. मग ही शंभूक हत्या का झाली? त्यानं बालीला का मारलं? त्यानं सीतेला का त्यागलं? अन् त्यानं रावणाला का मारलं? तर यात उत्तर एकच होतं. ते म्हणजे अधर्म. जिथं जिथं अधर्म माजेल, तिथं तिथं रामच नाही तर रामासारखा इतर व्यक्ती येवून त्याला संपवेलच. याचाच अर्थ असा होता की तो व्यक्ती गर्वहरण करेल. यात शंभर प्रतिशत सत्यता होती व ही सत्यता नाकारता येत नव्हती.
रावण एक ब्राह्मण होता. विश्रवा नावाच्या ब्राह्मण व्यक्तीकडून त्याचा जन्म झाला होता. त्याचा विवाह कैकसी नावाच्या आदिवासी स्रीशी झाला होता. त्यामुळंच त्याला आज आदिवासी लोकं देवता मानतात. पितृसत्ताक कुटूंब पद्धती असल्यानं रावण ब्राह्मणच ठरतात. ते आदिवासी ठरत नाहीत. अशा रावणाला अतिशय गर्व झाला होता. त्याचं गर्वहरण रामानं केलं त्यांची हत्या करुन. काय वाईट होतं त्यात? वर्तमानकाळात त्याचा विचार केल्यास एखादा व्यक्ती वस्तीमध्ये निरपराध असलेल्या माणसांना मारत असेल. त्यांच्या पत्नी व मुलींवर अत्याचार करीत असेल तर त्याला मारणं काय वाईट असतं? एवढंच आहे की तोही गुन्हाच. तेच घडलं त्या काळात. रामानं रावणाला मारलं एक गुन्हा झाला. परंतु त्यानं दुसऱ्यांना छळणाऱ्या म्हणजेच त्रास देणाऱ्या माणसाला मारलं. आता लोकं म्हणतील की बालीला का मारलं?
बाली हा सतत सुग्रीवाला त्रास द्यायचा व जबरदस्तीनं त्याची बायको घेवून जायचा. आता वर्तमानकाळात त्याचा विचार केला तर हे दिसतं की कोणीही आपली पत्नी कोणाला नेवू देत नाही. खुद्द आपल्या भावालाही नाही. ती कल्पनाही आपल्याला सहन होत नाही. तोच अधर्म. अशा अधर्मी माणसाला रामानं मारलं. कारण त्याला अधर्माची चीड होती. आता लोकं म्हणतील की शंभूक ऋषीचा वध का केला असावा? यावर स्पष्टीकरण असं की त्या काळात शंभूक ऋषीनं तपश्चर्या करण्याचा नियम मोडला होता. नियम मोडणं हा गुन्हाच ठरतो. तो मग कोणत्याही जाती धर्माचा का असेना. शिवाय रामानं त्याला मारलं नाही. फक्त मारण्याचं कर्तव्य केलं. कारण तो एक राजा होता. राजाच्या मनात जरी कुणाची हत्या करण्याची इच्छा नसेल तरी ती प्रसंगी त्याला करावीच लागते. कारण तो एक राजा असतो व त्याला आपले कर्तव्य करुन सर्वांना न्याय द्यावा लागतो. क्षणीक विचारही करता येत नाही. ते राजपद जो धारण करतो, त्याला कळतं. वरवर गोष्टी सांगायला काहीही जात नाही. शंभूक ऋषीच्या हत्येत राम दोषी ठरला. कारण तो एक राजा होता आणि त्यानं आपलं कर्तव्य केलं होतं म्हणून. परंतु दोष रामाचा नव्हता तर ज्या मनूनं नियमावली बनवली होती व ती नियमावली जो तथाकथीत समाज राबवून घेत होता. दोष त्या समाजाचाच होता. परंतु माझा राम बदनाम झाला.
रामाच्या बाबतीत विचार करता करता कमलला रामाच्या हातून घडलेल्या कृत्याबद्दल पश्चाताप होत होता. त्याला वाटत होतं की समाजाच्या चालीरीतीत फसून बिचारा राजा बनलेला राम बदनाम झाला. त्याबद्दल आज काही लोकं मोठ्या दिमाखात गोष्टी सांगतात आणि म्हणतात की रामानं दृष्कृत्य केलं. परंतु रामानं दृष्कृत्य केलं नव्हतं. हे समाजानं स्वतः तपासण्याची गरज आहे. समाजानं हे ठरवावं की मी जर त्या जागी असतो तर काय केलं असतं. मी शंभूकांची हत्या केली असती की जनतेचा रोष स्विकार केला असता.
महत्वाचं म्हणजे एक व्यक्ती जेव्हा राजपद धारण करतो. तेव्हा काही गोष्टी त्याची इच्छा नसतांना त्याला कराव्याच लागतात. तेच शंभूक ऋषीबाबत घडलं. शिवाय मनात इच्छा नसतांना लोकांसाठी राजाला आपलं कर्तव्य करावंच लागतं. कारण तो आपला पालक असतो. उदाहरणार्थ आपले आईवडील.
कमल लोकांना राम चांगला होता हेच समजावून सांगायचा. त्याबद्दल दाखलेही द्यायचा. म्हणायचा, कल्पना करा की आपल्या आईवडीलांना जेव्हा काम नसतं आणि उपाशी राहायची पाळी येते तेव्हा ते स्वतः उपास भोगतात. परंतु लेकरांना उपाशी ठेवत नाहीत. अशी लेकरं उपाशी राहू नये म्हणून ते प्रसंगी चोरीही करतात. त्यामुळं शंभूक ऋषी, बाली, रावण यांना मारणं जरी रामाला गैर वाटत असलं तरी रामाला ते कृत्य करावंच लागलं. कारण प्रजा ही त्यांची मुलंच होती. शिवाय सीतेला त्यांनी त्यागलं नाही तर समाजात आपल्याच पतीची म्हणजेच रामाची बदनामी होवू नये म्हणून स्वतः सीता त्याला सोडून गेली. या सर्व गोष्टी घडत गेल्या रामाच्या जीवनात. राम आदर्श होताच. परंतु चंद्रावर जसा दाग दिसतो ना. तेच रामाच्याही जीवनात घडलं. रामाला बदनाम करण्यात आलं. महत्वपुर्ण गोष्ट ही की शंभूक ऋषी प्रकरण हे मुळच्या वाल्मीकी लिखीत रामायणात नाही. त्यावरुन शंभूक ऋषी राम कालखंडात झाला की नाही? यावर प्रश्नचिन्हं केंद्रीत होतं. उत्तर रामायण हा भाग तद्नंतर जोडला गेलेला आहे. कोणत्यातरी कुत्सीत बुद्धीच्या माणसांनी. यासारख्या बऱ्याच गोष्टी उत्तर रामायणात आहेत की ज्या रामाला बदनाम करतात व त्यांच्या आदर्शाला मर्यादा आणतात.
वाल्मीकी रामायणात काही वर्णनं आहेत. जसे राम जेव्हा वनवासात जातात, तेव्हा ते निषादराज नावाच्या राजाकडील जेवन करतात. जो एक शुद्र जातीचा राजा होता व जो त्यांचा परम मित्र होता. (संदर्भ बालकांड १/३७-४०) जर राम भेदभाव मानत असते तर त्यांनी निषादराज राजांकडील जेवनच ग्रहण केलं नसतं. तसाच दुसरा शबरीचा प्रसंग. या प्रसंगात त्यानं शबरीची उष्टी बोरं खाल्ल्याचं वर्णन आहे. (संदर्भ अरण्यक कांड ७४/ ७) या शबरी प्रसंगात खुद्द वाल्मीकींनी म्हटलं की शबरी एक सिद्धजनांनी मानलेली तपस्विनी स्री होती. ( संदर्भ अरण्यक कांड ७४/१०) याचाच अर्थ असा की त्या काळात शुद्रांच्या तपस्येबाबत बंदी नव्हती. कारण शबरीनंही तपस्या केली होती. जरी ती शुद्र जातीची असली तरी. परंतु तरीही रामानं तिला दंड न देता तशीच तिनं उष्टी केलेली बोरं पाहूनही तिला दंडीत केलं नाही. ती बोरं खाल्ली. यावरुन रामाचं आदर्शपण सिद्ध होतं.
वाल्मीकी रामायण लिखीत युद्ध कांडात (संदर्भ १२७ -५९) यामध्ये पुष्पक विमान कुबेराकडे रामानं दान केल्याचं वर्णन आहे. ते केव्हा दान केलं? याचंही वर्णन आहे. याचाच अर्थ असा की उत्तर कांडातील या लेखकाला पुष्पक विमान रामानं केव्हा परत मागीतला? ही साधी गोष्ट माहीत नाही. यावरुन शंभूक वध घडलाच नाही.
कमलला महत्वाचं वाटत होतं, तो नित्य म्हणायचा, राम हे असं व्यक्तीमत्व होतं की जे आदर्शच होतं. वर्तमानकाळाच्या नजरेतून त्यांच्याबाबत वर्णन करतांना त्यांनी त्या काळातील गुंड प्रवृत्तीची माणसं संपवली असावी असं म्हणता येवू शकेल. याबाबत प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकते. असो, तो आपला मुद्दा नाही. आपला मुद्दा हा आहे की राम आदर्श असो वा नसो, आपल्या देशातील आहे. ज्या देशाचा आपल्याला स्वाभिमान आहे. यावरुन तो आपला आहे व ज्याला ज्याला आपल्या देशाचा स्वाभिमान असेल. त्याला राम आवडावाच यात शंका नाही. आपण उत्तरकांडावर वा इतर कपोलकल्पित कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रामाच्या आदर्शपणावर ताशेरे ओढू नये. प्रत्यक्ष वाल्मीकीचं रामायण वाचावं. कारण तोच राम काळातील एकमेव साक्षीचा नमुना आहे. उत्तरकांड प्रकरण नाही.
महत्वपुर्ण गोष्ट ही की राम आपल्या देशातील आदर्शाचा नमुना होता. आपला एक राजा होता. इतिहासात झालेला. त्यानं केलेल्या त्या काळातील कृती ह्या त्या काळातील परिस्थितीनुसार चांगल्याच असतील. त्या त्या परिस्थितीला शोभून. आज त्या गोष्टी आपल्या मनाला खटकतात. कारण आपण आजच्या स्वातंत्र्याच्या काळात जगतो. म्हणूनच त्या काळातील गोष्टीवर आपण पुरेपूर लक्ष देवू शकत नाही. त्या गोष्टी आपल्याला रामाच्या चारित्र्यावर दाग दाखवतात. परंतु महत्वाची बाब ही की रामाचं चारित्र चांगलंच होतं व तेवढंच वाखाणण्याजोगंही. त्याचा कुणीही आजच्या घडीला बाऊ करु नये. हं, याबाबत मी एवढं निश्चितच म्हणू शकतो की राम देव नव्हता. एक व्यक्ती होता. परंतु त्याच्या सिद्धहस्त कारणानं तो देवच ठरला व आपण आज त्यांना देवच मानतो. यावरुन आज त्यांना देव माना असं मी प्रत्येकाला म्हणत नाही. कारण व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. यानुसार प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असू शकतो.
सत्य असत्याचा परिचय झाला होता कमलला. तसा तो मोठा विचारवंत बनणार असं त्याच्या एकंदर वर्तणूकीवरुन दिसून येत होतं. परंतु प्रारब्धच ते. त्या प्रारब्धानं त्याचा घात केला होता. त्याच्या वडीलांना अचानक काळानं हिरावून घेतलं होतं. त्यानंतर संसाराचा भार त्याचेवर आला व त्यानं शाळा सोडून दिली होती.
कमल चांगल्या विचारांचा होता. तो चांगले विचार ठेवत होता. कपट नव्हताच त्याच्या मनात. तसा तो जगत होता. त्यानं शाळा सोडली होती व तो आईसोबत कामाला जात होता. अचानक त्याला कोणीतरी सुचवलं की असं काम करण्यात काही तथ्य नाही. हे काम आपल्याला पुढील काळात कामात येत नाही. त्यामुळंच त्यानं एखादं कौशल्याचं काम शिकावं. विचार करता करता त्यानं ठरवलं की आपण एखाद्या कामाचं कौशल्य शिकावं. तसाच विचार केला. परंतु काम पकडायचं कोणतं? कोणीही त्याला काम देत नव्हतं. अशातच एका व्यक्तीनं त्याला आपल्या ट्रकवर कंन्डक्टर म्हणून नेलं.
कमल आता एका गाडीवर कंन्डक्टर म्हणून जावू लागला होता. त्यातच तो कधी कधी ट्रक चालवूनही पाहू लागला होता. त्यानंतर तो पुर्ण ट्रक चालविण्याचं कौशल्य शिकला. शेवटी तो त्यात निष्णांत झाला होता.
कमल जातीनं अस्पृश्य नव्हता. परंतु त्याला बाबासाहेब आवडत होते. तेवढा त्याला आपला समाज आवडत नव्हता. कारण त्याचा समाज हा बाबासाहेबांना मानत नव्हता आणि बाबासाहेबांच्या विचारानुसारही चालत नव्हता. त्यामुळंच त्याला आपल्याच समाजाची चीड येत होती. तसं पाहता तो समाज आजही काही करीत नव्हता आणि वरुन मोठ्या दिमाखात मर्दुमगीरीच्या गोष्टी सांगत होता. जे त्या कमलला पचनी पडत नव्हतं. अशातच त्यावर्षीचा प्रजासत्ताक दिन उजळला व कमलला पुरेपूर बाबासाहेब आठवले व तो विचार करु लागला की बाबासाहेबांनी धम्मपरीवर्तन का केलं असावं?
ती सव्वीस जानेवारी होती. भारतीय प्रजासत्ताक दिन. त्या दिवशी भारतीय प्रजासत्ताकानं खऱ्या अर्थानं जगण्याचं साधन दिलं होतं अस्पृश्यांना. स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यायचा? हे त्यानुसार ठरवलं गेलं होतं.
संविधान हे बाबासाहेबांनी नोव्हेंबर १९४९ ला लिहून पुर्ण केलं होतं व ते २६ जानेवारी १९५० ला लागू झाले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. ते त्यांनी अथक परीश्रम घेवून. त्यात त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे म्हणजेच सविता आंबेडकर यांचेही अनुभव कामात आले होते. ते संविधान देशानं लागू केलं. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते ठरले व ते देशाच्या संविधानाचे वडील झाले होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निर्माते असल्यानं संविधानाचे बाप ठरले. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्यानुसार त्यांना वाटलं की ज्या समाजासाठी मी एवढी धावपळ केली. तो समाज आता सुधारेल. त्यांना संविधानाचा लाभ घेता येईल व आपला विकास करता येईल. परंतु तो त्यांचा विचार होता. प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. मंडळी आपलीच होती. भेदभावही आपल्याच देशाचा होता. आपलीच माणसं भेदभावानं आपल्याच माणसांवर अत्याचार करीत होती.
डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान बनवलं. ते देशानं लागूही केलं व विटाळ पुर्णतः निघून जाईल याचाही विचार झाला. परंतु त्या साऱ्या गोष्टी फोल ठरल्या. कारण त्यानंतर काही काळ गेला व काही काळानंतर सार्वत्रिक निवडणूका झाल्या व त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका निवडणुकीत आपल्याच माणसांनी पाडलं व बाबासाहेबांना कळलं की ज्या देशातील माणसांसाठी त्यांनी संविधान लिहिलं आहे. त्या माणसांना वाटतं की आपण पहिलं जसे होतो. तसंच राहावं. बदल अपेक्षीत नाही. शिवाय ते बदलणार नाहीत. तसाच विटाळही त्यांना हवाच आहे. परंतु ते मोजक्या लोकांसाठी ठीक होतं. पण बाकीच्यांचं काय? त्यांचा कोणता दोष? याचाच विचार बाबासाहेबांनी केला व धम्मपरीवर्तन केलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक खंत होती. तशीच ती चीडही. ती चीड होती भेदभावाची. त्यांना माणसं वाईट वाटत नव्हती. त्यांच्यातील वृत्ती वाईट वाटत होती. ते कुणाचाही द्वेष करीत नव्हते. कोणत्याही धर्माची निंदा नालस्ती त्यांनी केली नाही. सर्व धर्मीयांबद्दल त्यांनी आदर बाळगला. फक्त त्यांचा विरोध होता या देशातील मनोवृत्तीचा. जी मनोवृत्ती देवादिकांना मधात ठेवून स्वतःचा स्वार्थ साधत आपल्याच लोकांवर भेदभावानं पुढ्यात येत होती. त्यामुळंच बाबासाहेबांनी ठरवलं की आपण मुळात ज्या देवधर्माला मधात आणून येथील छुप्या मनोवृत्तीची माणसं जो वार करतात. तो वार आपण कायमचाच बंद करावा. त्यासाठी येथील देवाला व धर्मालाच सोडून द्यावं कायमचं. ज्यातून ना रहेगा बास व ना बजेगी बासरी अशी समाजाची स्थिती होईल व समाज आपोआपच सुधारेल.
डॉक्टर बाबासाहेब हे विचारवंत होते. बऱ्याच पुस्तका त्यांनी वाचल्या होत्या. त्यावरुन त्यांना जगातील राज्यकर्त्यांचा, प्रशासकांचा व विचारवंतांचा इतिहास कळला होता. त्यानुसार मुस्लीम शासकाबद्दलही कळलं होतं.
मुस्लीम शासक औरंगजेब हुशार होता. त्याचं स्वप्न होतं आलमवीर बनण्याचं. ज्याला त्यांचा स्वार्थ देखील म्हणता येईल. त्याला वाटत होतं की आपण आलमवीर बनावं. त्यानंतर त्यांनी अभ्यास केला होता की कसं आपल्याला आलमवीर बनता येईल. तसा अभ्यास करीत असतांना त्यांच्या लक्षात आलं की जर यात धर्माचा वापर केला तर....तरच आपण आलमवीर बनू शकतो. कारण लोकांना आपला धर्म आवडतो. धर्मासाठी या देशातील लोकं मरतात. परंतु धर्म सोडत नाहीत. आपल्या वारसांनी आपल्या आधी जे राज्य केलं. ते याच संकल्पनेतून. तसं पाहता सातव्या शतकात मोहम्मद बिन कासीमनं राजा दाहिरची हत्या केली होती. त्याचं कारण होतं की त्याला हिंदूस्थानात विजय मिळवायचा होता. हिंदूस्थानाचा प्रदेश काबीज करायचा होता व सम्राट बनायचं होतं. राजा दाहिर हा हिंदू होता व हिंदूपण चालू नये म्हणून इतर धर्माच्या माणसांनी मोहम्मद बिन कासीमशी कुरघोडी केली व त्यातून राजा दाहिरची हत्या झाली. हा इतिहास होता. तो इतिहास औरंगजेबाला माहीत होता. शेवटी आपल्या धर्मीय लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी त्यानं गुरु तेगबहाद्दूर सिंह, महाराज संभाजी, फतेहसिंह, जोरावर सिंह अशी एक एक माणसं संपवली व आपल्या धर्माची सहानुभूती मिळवली. ते आपल्या धर्मीय लोकांना दाखवलं. परंतु त्यात त्यानं आपल्याच धर्मातील कित्येक निरपराधांचा वापर करुन त्यांचीही हत्या केली हे दर्शवलं नाही. आपलेच भाऊ संपवले होते आपलं स्वतःचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि आपल्या स्वतःच्याच वडीलाला कैदेत टाकलं होतं. त्यातूनच मुस्लीम धर्माची औरंगजेब बादशाहाला योग्य सहानुभूतीच मिळाली.
हिंदू धर्मानंही त्याच दृष्टीकोनाचा वापर केला होता. त्यांनी आपल्या देवदेवता मधात आणल्या होत्या व म्हटलं होतं की हे देव आमचे आहेत. त्यांना हात लावायचे नाही. तो बाटतो. तपश्चर्या करायची नाही. त्यावर आमचा हक्कं आहे.
बाबासाहेबांनाही विचार यायचा की जे देवं पाषाणाचे आहेत. ज्यात देवत्व नाही. तरीही समाज त्यावर हक्कं गाजवतो. तो समाज मंदीर प्रवेश नाकारतो आणि तो नाकारत असतांना माध्यम म्हणून देवादिकांचा वापर करतो. आपण हे देवधर्मच सोडावे. समाजाला सोडायला लावावे. तयार करावे. जर हे देवधर्म पुजणं आपण बंद केलं तर कदाचीत आपल्या माणसांना भेदभाव करणाऱ्या त्या लोकांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यातच आपल्या माणसांची परिस्थिती सुधारेल. आपली माणसं सुधरतील व विटाळ कायमचा संपेल. अशातच एक तात्कालिक कारण घडलं. ते म्हणजे १९५२ ची निवडणूक. त्या निवडणुकीत बाबासाहेबांचा चक्कं पराभव झाला होता व तो पराभव आपल्याच माणसांनी केला होता. ज्या आपल्या बिरादरीवर बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता. त्यांना १९५२ च्या निवडणुकीत वाटत होते की मी माझ्या बिरादरीतील लोकांसाठी संविधान लिहिलं. मग मी भरघोस मतानं निवडणुकीत निवडून येईल. तेच स्वप्न पाहात होते बाबासाहेब. परंतु ते सर्व फोल ठरलं व बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्नच राहिलं.
बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव होताच बाबासाहेबांना कळलं की आपल्या बिरादरीतील माणसं ही अति शहाणी आहेत की ज्यांना चांगल्या गोष्टीची पारख नाही. त्यांना तसा त्या गोष्टीचा अनुभव होताच. सन १९२५ मध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला होता. त्यावेळेस महाडातील बरीच बिरादरीतील मंडळी चवदार तळ्याच्या आंदोलनात सहभागी झाली नव्हती. बाबासाहेबांनी विचारणा केली असता उत्तर मिळालं होतं. 'बाबासाहेब, तुम्ही तर निघून जाल. परंतु आम्हाला भोगावं लागेल.' ते सहभागी झाले नव्हते, जरी त्यांच्या गावात कार्यक्रम होता. मात्र त्यावेळेस इतर जातीतील लोकांनीच बाबासाहेबांची पाठराखण केली होती. बदल्यात बाबासाहेबांनी संविधानात तिनशे चाळीसवी कलम लिहिली व ती त्यांना बहालही केली. त्यानंतर त्यांनी तिनशे एकेचाळीसव्या कलमेचा विचार केला.
सन १९५२ ची निवडणूक बाबासाहेबांच्या धर्मपरीवर्तन करण्यास कारणीभूत ठरली असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण त्या निवडणुकीत त्याच बिरादरीतील माणसांनी पराभव केल्यानं बाबासाहेबांना वाटलं की माझ्या बिरादरीतील माणसं अतिशहाणी आहेत की जे आपल्याच माणसांना नाकारतात व स्वतःचा होणार असलेला विकास टाळतात. ह्या बिरादरीला जर वर आणायचं असेल वा सुधरंवायचं असेल तर त्यांचा धर्म आधी बदलवायला हवा. जर धर्म बदलवला तर थोडा फरक पडू शकतो. तसा त्यांचा दूरदर्शी स्वभाव होताच. त्यानंतर तसा विचार करीत असतांना कोणता धर्म श्रेष्ठ याचा अभ्यास स्वतः बाबासाहेबांनी केला. त्यावर विचारमंथन केलं. काही धर्माच्या माणसांची भेट घेतली. प्रत्येकजण म्हणत होतं की बाबासाहेब, आपल्याला धर्मात यायला कोण अडवतं. मुस्लीम काजी तर पाठीमागंच लागला होता. शेवटी विचार करुन बाबासाहेबांनी ठरवलं. आपण बौद्ध धर्म घ्यायचा. कारण त्या धर्मात वास्तविकता आहे. चमत्काराला स्थान नाही.
बाबासाहेबांनी सन १९५६ ला बौद्ध धम्म घेतला व त्याचा काही प्रमाणात प्रसारही केला. तेव्हा बिरादरीतील काही माणसं म्हणत होती. 'बाबासाहेब वेडे झालेत की काय, धर्म बदलवला.' परंतु ती योग्य गोष्ट होती. कारण त्यानं समाज सुधारणा होणार होती. समाज सुधारणार होता.
बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतला खरा. परंतु त्यांनी कोणाचा देव वाईट वा कोणाच्या प्रथा वाईट म्हटल्या नाही. एवढंच म्हटलं की मी अमूक देवांना मानणार नाही व मी त्यांची पुजा करणार नाही.
महत्वाचं सांगायचं म्हणजे बाबासाहेब उच्च विचारांचे होते. त्यांनी कोणत्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यांना गरज नव्हती धर्म परीवर्तन करण्याची. परंतु समाज सुधारणा व्हावी व विटाळ कायमचा संपावा. म्हणूनच त्यांनी धर्म परीवर्तन केलं. त्या बाबासाहेबांच्या धम्म परीवर्तनाबाबत विचार केल्यास आज काय घडत आहे. खरंच समाज सुधारणा झाली का? तर त्याचं उत्तर किंचीतही नाही असंच येईल. लोकं फक्त वरवर बोलतात. परंतु अंतर्मनात कपट भरलेला स्पष्टपणे दिसून येतो. आजची मंडळी केवळ सुधारणा झाल्याचा आव आणतात आणि दुसर्‍याच्या धर्मावर टिका करतात. जे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं. कारण बाबासाहेबांना माहीत होतं की ज्या समाजसुधारणेची त्यांनी मुहूर्तमेढ चवदार तळ्याचं आंदोलन करतेवेळी रोवली. त्यावेळेस भाला, संग्राम व मनुस्मृती हे ग्रंथ जाळले गेले. त्याची सुरुवातच मुळात एका ब्राह्मण व्यक्तीपासून केली. जो त्या दहन समितीचा अध्यक्ष होता व ज्याचे नाव बाबासाहेब सहस्रबुद्धे होतं. जो महाडातीलच रहिवाशी होता व चवदार तळ्याच्या आंदोलनानंतर त्याला महाडातीलच उच्चवर्णीयांनी वाळीत टाकलं होतं त्यांना. शिवाय हालहालही केले होते. तसंच हेही माहीत होतं की समाजपरीवर्तन करतांना त्यांना इतर धर्मातील व्यक्तींनी मदत केली. जशी चवदार तळ्याचा खटला लढतांना हिंदू लोकांची झालेली मदत. निवडणुकीच्या वेळी निवडून येतेवेळी मुस्लीमांची झालेली मदत. तसंच बालपणात शिक्षण शिकत असतांना हिंदू राजे सयाजीराव गायकवाड व छत्रपती शाहूमहाराज यांची झालेली मदत. ती सर्व मंडळी व खुद्द बाबासाहेब धर्म परीवर्तन करण्यापुर्वी हिंदूच होते. तसेच मदत करणारे काही मुस्लीमही होते.
बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्विकारताच आजचा समाजही बौद्ध बनला. त्यांनी बौद्ध धम्म स्विकारला. परंतु परीपुर्ण स्वरुपात नाही. फक्त विचार ठेवला, त्याच जोरावर ते आता प्रखर विरोध करतात. एवढा विरोध असतो की ज्याची तीव्रताच मापता येत नाही. मात्र कृतीत सगळी भेसळता दिसून येते आणि ज्या देवांला बाबासाहेबांनी मानणार नाही म्हटलं, त्या देवाला लपूनछपून आजचे लोकं मानतात. तसंच पुजाविधी मला मान्य नाही असं बाबासाहेबांनी म्हटलं. आजचा समाज पुजाविधीलाही स्थान देतो. त्यांनी सांगीतलेल्या बावीस प्रतिज्ञांचंही परीपुर्ण पालन होतांना दिसत नाही.
महत्वाचं सांगायचं म्हणजे बाबासाहेबांनी जे सांगीतलं त्यावर समाजानं नक्कीच अंमल करावा यात शंका नाही. परंतु त्याच समाजानं दुसऱ्याच्या धर्मावर, त्यांच्या देवादिकांवर, त्यांच्या नियमांवर टिका करु नये. कारण त्यांच्यातच बाबासाहेब अखेरपर्यंत राहिले. त्यांनी फक्त लोकांच्या मनोवृत्तीला विरोध केला. देवादिकांना, नियमांना वा धर्मांना विरोध केला नाही. आपण जर असा विरोध केलाच तर बाबासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. जो आत्मा, परमात्मा बाबासाहेब मानत नव्हते. पण इतर धर्मातील लोकं मानत असत. आजही मानतात. त्या धर्मातील लोकांच्या नियमांना, धर्मांना, देवादिकांना वा इतर गोष्टींना विरोध करणे म्हणजेच त्यांनी बाबासाहेबांना केलेली मदत विसरणे होय. जे बाबासाहेबांना कधीही खपणार नाही. यात शंका नाही.
कमलचा तो विचार रास्त होता. कारण भरपूर मंडळी अशी होती की ती फक्त हिंदूच धर्मावर टिका करीत होती. त्याचं कारण होतं, हिंदू धर्मातील समावेशकता. कमलला त्याच्यातही ते हिंदू धर्माचं मोठेपण वाटत होतं. त्याला वाटायचं की हिंदू धर्मावर कोणी टिका करीतही असेल. तरी हिंदू धर्मीय मंडळी रागावत नाहीत वा कोणाला चिरडून टाकत नाहीत. ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. कारण तो एक महान धर्म आहे. टिकाकारांनाही सामावून घेणारा धर्म आहे. परंतु त्याच जागी असलेले इतर धर्म. त्यांचा धर्म कितीही वाईट असेल, तरी त्या धर्माच्या नियमांवर व अत्याचारांवर कोणाला बोट ठेवता येत नाही. कारण तो बोट कापण्याची ताकद त्यांच्या धर्मात आहे. कोणी जर त्यांच्या धर्मावर टिका केली तर सरळ त्या व्यक्तीवर ते हल्ले करतात व त्याला यमसदनी पोहोचवतात. म्हणूनच भीतीनं कोणताच व्यक्ती इतर धर्मावर टिका करायला घाबरतात. तशी हिंदू धर्मावर टिका करीत असतांना राम व क्रिष्ण जे हिंदू धर्मीयांचे आराध्य देव आहेत. त्यांच्यावरही टिका करीत असतात. मात्र हिंदुधर्मीय लोकं इतर धर्मात कितीही वाईट गुण असतील तरी त्यांच्यावर टिका करीत नाहीत.
राम अस्तित्त्वात होता की नव्हता हा प्रश्न नाही. असं कमलला वाटायचं. तसे त्याचे राम अस्तित्त्वात असण्याबाबतचे विचार होते व तो समाजाला राम अस्तित्त्वाबाबत सांगायचा.
राम अस्तित्त्वात होता याचे पुरावे पाहात सर्वोच्च न्यायालयानंही निकाल दिला व अयोध्येतील भुमी रामललाची आहे असं गृहीत धरुन ती जागा रामललाला दिली. मात्र काही लोकं याला विरोध करतात. म्हणतात की सर्वोच्च न्यायालयानं सन १९८२ व सन १९९८ ला निकाल दिला की रामायण महाभारत हे काल्पनिक महाकाव्य आहे व राम क्रिष्ण झालाच नाही. मात्र त्याचे पुरावे कोणीही देत नाहीत. तसाच अयोध्येत रामाचा जन्मच झाला नाही असं म्हणतात. परंतु त्याचेही कोणी पुरावे देत नाहीत. मात्र कमलला वाटायचं की राम अस्तित्त्वात होता व रामाचं अस्तित्व न्यायालयानंही मान्य केलंय. त्याचा जन्म अयोध्येत झाला. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयानंही रामाचं अस्तित्व स्विकारत अयोध्येतील भुमी राममंदीर बांधायला दिली.
पुर्वी ते ठिकाण अयोध्याच आहे का? यावर विचारमंथन झालं व तज्ञ लोकांनी सर्वेक्षण करुन अंदाज लावला की शरयू नदीच्या काठावर असं एक ठिकाण पुर्वी होतं की ज्याला देवघाट म्हणत. त्याच ठिकाणी सीता माता पृथ्वीच्या आत गेली व ती भुगर्भात सामावली. तसेच ज्या ठिकाणी विष्णू राहात होते. त्याला नारायणघाट म्हणत. त्याच्याच आजुबाजूच्या प्रदेशाला चितवनचा प्रदेश म्हणत. त्याला नंतर नाव देण्यात आलं रामघाट. कारण राम याच ठिकाणावर शरयू नदीतून वातावरणात समाहीत झाले होते. हा सर्व प्रदेश अयोध्येचा परीसर होता. त्याच्या खाणाखुणा सापडल्या. यावरुनच रामाची राजधानी अयोध्याच ठरविण्यात आली. त्यानंतर कल्पना केली गेली की या ठिकाणी जर राम राहात होते तर त्यांचं मंदीरही असावं. परंतु तिथं बाबरी मशिद होती.
ती बाबरी मशीद. त्या बाबरी मशिदीचं चांगलं निरीक्षण करण्यात आलं. त्यात बाबरी मशिदीचे तब्बल बारा खांब हे हिंदू बनावटीचे दिसले. त्यातच या खांबावर देवी देवता व मानवी अवशेषांचे तब्बल दोनशे त्रेसष्ट तुकडे सापडले. ज्याला इस्लाममध्ये स्थान नव्हते. त्यातच हे सापडलेले खांब व मुर्तीचे अवलोकन करताच ते इतर मंदिरांच्या खांबासारखे दिसत होते. यावरुनच ठरवण्यात आलं की याच ठिकाणी बाबरी मशिद उभी झाली. जिथं पुर्वी राममंदिर होतं.
मुळच्या रामायणात रामायणाच्या अयोध्या नगरीचं वर्णन होतं. अयोध्या हे ठिकाण शरयू नदीकाठी आहे व आज तेथे सापडलेल्या मंदीर खांबाच्या अवशेषावरुन हेच ठिकाण रामजन्मभूमी असल्याचं सिद्ध झालं. पुढील काळात हा वाद न्यायालयात गेला. परंतु हा वाद लवकर सुटला नाही. कारण तो निवडणूकीचा महत्वपुर्ण मुद्दा झाला. सर्व सत्ताधारी प्रचार करीत की आम्ही राममंदिराचा वाद संपवू. परंतु सत्तेवर आल्यावर वाद संपत नव्हता आणि तो संपला एका झटक्यात. ज्याला काहीच वेळ लागला नाही.
मुळची अवधपुरी असलेलं हे ठिकाण. याच ठिकाणी सर्वेक्षकांच्या नोंदीनुसार रामाचा जन्म झाला. त्याला सम्राट अशोकाच्या काळात साकेत असं नाव मिळालं व सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म स्विकारल्यावर धर्माचा प्रसार केला व चौऱ्यांशी हजार स्तूपं बांधली. त्यातील काही लहानमोठी होती. त्यातच त्यांनी साकेतलाही काही स्तूपं बांधली. यावरुन ती बुद्धभुमीही ठरली. त्यानंतर सम्राट अशोकाचं राज्य अर्थात मौर्यांचं राज्य गेलं व पुष्यमित्र शृंगाचं राज्य आलं. म्हणतात की शृंग घराणं हिंदूवादी राजे होते आणि मौर्य राजघराणे हे बौद्धवादी. म्हणूनच शृंग घराण्यांनी स्तूपं पाडली. परंतु शृंग घराण्यांनं स्तूप पाडली असली तरी चौऱ्यांशी हजार स्तुपं पाडली नाहीत. त्यातील बरीचशी स्तूपं शिल्लक होतीच. त्यानंतर पुन्हा त्यात भर पाडत काही ठिकाणी जी बौद्ध राजवट अस्तित्त्वात होती. त्यांनी बौद्ध स्तूपं बांधलीच. काही मंदिरांचंही बांधकाम झालंच. तसं पाहता स्थापत्यकलेत गुप्त, चोल, चंदेल, होयसळ, मौर्य व मुगल घराणं आघाडीवर दिसतं.
मौर्यांनी बांधलेली चौऱ्यांशी हजार स्तूपं व त्यापुर्वी गुप्त, चोल, चंदेल, होयसळ व इतर घराण्यांनी बांधलेली वैदिक मंदीरं. त्यानंतरही बांधली गेलेली स्तुपं व मंदीरं, ती भरपूर प्रमाणात होती. त्यातील काही मंदीरं आजही दिसतात. खजुराहो सारखी मंदीरं आजही दिसून येत आहेत. मग बाकीची मंदीर कुठं गेली? स्तूपं कुठं गेली असावी? असा विचार केल्यास प्रश्न पडतो. तसा प्रश्न कमललाही पडत होता.
सन सातव्या शतकात आलेला मोहम्मद गझनी. त्यानं भारतातून म्हणजेच त्यावेळेसच्या हिंदुस्थानातून बरीचशी संपत्ती लुटून नेली. त्यानं तसं भारताला लुटून नेतांना बऱ्याच मंदिराची लुटालूट केली व मंदिरं नेस्तनाबूत केली. ज्यात स्तुपांचाही समावेश असेलच. त्यानं सतरा स्वाऱ्या केल्या. सतरा स्वाऱ्यांच्या वेळेस नासधूस केली होती. त्यानंतर आलेला मोहम्मद बिन कासीम. त्यानंही अशीच नासधूस केली. तेव्हापर्यंत बौद्ध स्तूपं अस्तित्वात होतीच. कारण राजा दाहिर ज्यावेळेस सिंधचा राजा बनला. त्यापुर्वी तिथं बौद्ध राजवंश होता व त्या राजवंशात बौद्ध स्तूपं नसतील कशावरुन? ती होतीच. तसंच त्याही काळापर्यंत इतरही भागात बौद्ध राजे होतेच. असा इतिहास सांगतो. मग बौद्ध राजे जर होते तर बौद्ध स्तूपंही असतीलच.
सन बाराव्या शतकात महम्मद घोरीनं पृथ्वीराज चव्हाणवर राजा जयचंदच्या फितूरीनं विजय मिळवला व त्यांना बंदी बनवलं असा इतिहास सांगतो. त्यानंतर मुस्लीम शासकांचा एकछत्री अंमल देशातील अनेक राजवटीत सुरु झाला. या मुस्लीम राजवटींनी अनेक देवळं पाडली असं वर्णन इतिहासात आहे. मग देशातील चौऱ्यांशी हजार स्तूपं गेली कुठं? या देवळाबरोबर तिही पाडली गेलीच असेलच. नालंदाचं विद्यापीठ हे मुस्लीम शासकानं जाळलं. ज्यात बौद्ध ग्रंथ विपूल प्रमाणावर होते. याबाबतीत एक उदाहरण द्यायचं झाल्यास पहिलं उदाहरण गझनीचं देता येईल. म्हटलं जातं की गझनी आला. त्यानं भरपूर संपत्ती लुटून नेली. देवळांना ठेच पोहोचवली. तसंच दुसरं उदाहरण अफजलखानाचं देता येईल. म्हटलं आहे की अफजलखान वाईमार्गानं आला. त्यानं असंख्य गाईंची कत्तल केली. असंख्य स्रियांच्या इज्जती लुटल्या. असंख्य देवळं ध्वस्त केली. आता ज्या स्रियांच्या इज्जती लुटल्या. त्यात हिंदूच स्रिया असतील काय? इतर धर्मीय स्रिया नसतील काय? गाईंच्या कत्तलीमध्ये इतर धर्मीयांच्या घरच्या गाई नसतील काय? फक्त हिंदूच धर्मीयांकडीलच गाई असतील काय? तसंच जी देवळं पाडली. त्यात एकतरी स्तूप नसेल काय? असेल. परंतु त्यावेळेस राज्य हे हिंदूचं प्रबळ असल्यानं हिंदूंच्याच देवळांचा उल्लेख आहे. स्तुपांचा नाही. त्या ठिकाणी जाणूनबुजून टाळला असेलच. लिहिणारे इतिहासकारही एकाच बाजूंचे होते. बौद्ध धर्मीयांना लिहिण्याचा अधिकार नव्हता. मग ते स्तूप पाडल्याबद्दल कसे लिहतील? या सर्व शंकाकुशंका नाकारता येत नाही. शिवाय ऐतिहासीक पुराव्यावरुन मंदीर नेस्तनाबूत करण्याचा सपाटा व पुरावा मुगल शासकांच्याच बाबतीत दिसतो. इतर शासकांच्या बाबतीत दिसत नाही. त्यानंतर चक्कं राममंदिराचा वाद सर्व जगानंच पाहिला व सिद्धही झालं की राममंदिर जिथं होतं, त्यावर बाबरी बांधण्यात आली होती. तेच झालं असेल बौद्ध स्तुपांबाबत. चौऱ्यांशी हजार स्तुप पाडून त्यावरही मशिदी व देवळं उभी झाली असतील. ही देखील शक्यता नाकारता येत नाही. मुळात बाबरी मशिद वाद. हा वाद कुठून आला? का आला? त्याला हवा का मिळाली? यावर कोणी विचार करीत नाही. इतिहास व मनोवृत्ती समजून घेत नाहीत. कोणी आपल्या मनात जसं भरवलं. त्यावरच बोलत असतो आपण. परंतु यात स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास असं म्हणता येईल की यात फक्त राज्यकर्ता असलेल्या माणसांचा दोष होता. संबंध लोकांचा नाही. कारण मुस्लीम लोकं त्यावेळीही हिंदू धर्मीयांच्या सेनेत होते. परंतु मुस्लीम राज्यकर्त्यांनी लोकांच्या मनोवृत्तीचा अभ्यास केला होता. त्यांना काय हवं व काय नको. हेही ओळखलं होतं. त्यानुसारच त्या राज्यकर्त्यांनी लोकांची कमजोर बाजू धर्म आहे हे ओळखून तोच धागा पकडला व त्यानुसार त्यांनी धार्मीक गोष्टी करण्याला प्राधान्य दिलं. ज्यातून देवळं पाडली, स्तूपं पाडली असावी व त्या जागेवर मशिदी उभ्या राहिल्या असाव्या. ही शक्यता नाकारता येत नाही. शिवाय त्यांनी आपला धर्म वाढविण्यासाठी भीती पसरवली असावी. हे पदोपदी त्यावेळच्या लेखनातून जाणवतं. जेणेकरुन भीतीनं लोकं मुस्लीम बनतील. त्यासाठी त्यांनी जोरावर सिंह, फतेहसिंह, संभाजी, तेगबहाद्दूर यांना फाशी दिली. तसंच आपल्या धर्मातील धार्मीकतेला विरोध ज्या ज्या लोकांनी केला, त्याला त्याला फाशी दिली असावी. मग हे पाहिलं नाही की तो व्यक्ती हिंदू होता की मुस्लीम. मात्र संभाजी महाराजांची हत्या केल्यानं हिंदूंचा इतिहास समोर आला. फतेहसिंह व जोरावर सिंह तसेच तेगबहाद्दूर यांची हत्या घडल्यानं शिखांचा इतिहास समोर आला. परंतु कित्येक मुस्लीम लोकांच्या हत्या त्याच बिरादरीतील या राज्यकर्त्यांनी केल्या. त्या पुढे आल्या नाहीत. त्या इतिहासकारांनी जाणीवपूर्वक लपवल्या असतील. त्याचं कारण होतं. त्यावेळच्या राज्यकर्त्यांचा धाक. विशेषता लेखकाला राज्यकर्त्यांच्या विरोधात लिहिता येत नाही आणि लिहिलं असतं तर फाशीच झाली असती. मग कोण लिहिणार होता तसा इतिहास?
कमलला तेच वाटायचं विचार करतांना तसा तो लोकांना तेच तत्वज्ञान सांगायचा. म्हणायचा,
"आजचा समाज आपला बाकीचा असलेला इतिहास आठवत नाही. विचार करीत नाही की सम्राट अशोकांनी उभारलेले चौऱ्यांशी हजार स्तूप कुठं गेले? फक्त विचार करतो आणि वदतो की राम या जगात झालाच नाही. क्रिष्णही झालाच नाही अन् संबंधीत हिंदूचेच देव झाले नाही. कारण अमाप राग आहे हिंदूंबाबत मनामनात भरलेला आणि का असणार नाही? सामाजीक विषमतेनं व विटाळानं तथाकथीत समाजाचे एवढे हालहाल झाले की जे विसरता येत नाही. मंदीरप्रवेश बंदी. अंगण प्रवेश बंदी. अशा साऱ्याच बंद्या अनुभवल्या या लोकांनी. म्हणूनच राग उफाळून येतो मनामनातील. तसंच त्यांना वरवर एवढंच माहीत आहे की मनुस्मृतीत त्यांच्याबाबत वाईट लिहिलं होतं. त्यानुसारच समाज वागत होता आणि वागणूक देत होता. शिवाय त्याच आधारावर पेशव्यांनी गळ्यात गाडगा घातला होता व कमरेला झाडू. परंतु हे सगळं कोणं केलं? एका मनू नावाच्या कुत्सीत बुद्धीच्या माणसानं. तसंच ते तत्वज्ञान राजांकडून राबवून घेणाऱ्या यंत्रणेनं. तसंच एका मुस्लीम असलेल्या व्यक्तीमत्वानं व संबंधीत यंत्रणेनं. यात जनतेचा कोणता दोष? जसे आज जे सत्तेवर कार्य करीत आहेत. ते कोणतेही निर्णय आणतात आणि ते आपण पालन करतो. कोणतेही आढेवेढे न घेता. जसा जी एस टी टॅक्स. सर्वांचा विरोध आहे त्याला. तरी भरतोच ना आपण तो टॅक्स. दुसरी गोष्ट सिलेंडर महाग होणे. त्याचा सर्वांना प्रश्न आहे. परंतु आपण ओरडतो का? तेच घडलं त्याही राज्यकर्त्याच्या काळात. राजा हा प्रमुख होता आणि सर्व यंत्रणा राजाच्या इशाऱ्यावर चालत होती. त्यामुळं त्यानं जसं त्याच्या मनात आलं. तसं राज्य केलं.
राम झाला असं म्हटल्यास वा राम आणि समस्त हिंदू देवतांबद्दल जमेची बाजू लिहिताच काही लोकं कारणांच्या बाबतीत म्हणतात की कारणे वाचणारांत बौद्धिक अलगाववाद तांडव करण्याची शक्यता जास्तच आहे. आपल्या या प्रस्तुतीत किंचित असलेले विडंबन वाचकांच्या लक्षात न येता राम व रामायणाचे महिमामंडण अधीक दिसते. म्हणजे मा. सर्वोच्च न्यायालयाने व जगातील चिकित्सक बौद्धिक वर्गाने मान्य केलेले रामकाळ व रामायणाचे "काल्पनिकत्व" आपण नाकारतो की स्वीकारतो हे समजणे दोलायमान स्थितीत आहे. कृपया, लेखणी चालवायचीच आणि प्रस्तुत व्हायचेच यासाठी जनसामान्यांच्या कत्तली करणाऱ्या कपोलकल्पिनांचे उदात्तीकरण होणार नाही याची काळजी घ्या. राजकीय व धार्मिक लोकांनी थाटलेल्या कत्तलखान्यांचे झेंडे उंच करण्यात हातभार लावू नका.
मा. सर्वोच्च न्यायालयानंही रामाचं असलेलं अस्तित्व मान्य केलेलं आहे. म्हणूनच राममंदिर बनलं व राममंदिराला जागा मिळाली. राम होता की नव्हता हे आपल्याला माहीत नाही. कारण आपण त्या काळात नव्हतो व त्या काळात काय घडलं हे आपल्यालाही माहीत नाही. केवळ तर्कावरुन आपल्या विचारात मतभेद आहेत. प्रत्येकात दोन बाजू असतात. काही लोकं म्हणतील राम झाला नाही तर काही लोकं म्हणतील की राम झाला. आता नेमकं काय ठरवायचं? अवधपुरीला साकेत नाव होतं हे तरी माहीत नसेल आजच्या काही लोकांना. तशीच चौऱ्यांशी हजार बौद्ध स्तुपं बांधली होती. हेही माहीत नसेलच. ती बौद्ध स्तुपं फक्त हिंदूंनी तोडली. विद्रूपीकरण केली गेली एवढंच माहीत आहे. परंतु ती स्तुपं मुघलांनीही तोडली हे माहीत नाही. त्यावर कोणीच ओरडत नाही. आक्षेप घेत नाहीत आणि त्याचा उल्लेख इतिहास लेखनात नाही. कारण लेखनीवर राज्यकर्त्यांचाच वरदहस्त होता. आपल्याला आपल्यावर हिंदुनी अत्याचार केले हे माहीत आहे आणि मुस्लीम शासकांनी केले हे माहीत नाही. गणपत नावाच्या व्यक्तीनं संभाजी राजाचे तुकडे शिवले व अग्नी दिला. त्यामुळंच त्याचे हालहाल करुन व धिंड काढून मुस्लीम शासकांनी मारलं यावर कोणीच बोलत नाही. रायप्पाचीही तशीच हत्या झाली हा इतिहास सांगतो. फक्त शहानिशा केली मुळ रामायणाची तर सगळे प्रश्न करतात. कारण आपलीही मनोवृत्ती तशीच असल्यानं आपल्याही मनात तसेच विचार येतात. यावरुन आपल्यात व मनूत कोणता फरक होईल.
महत्वपुर्ण बाब ही की आपण राम होवो की न होवो. आपल्या बहुमोल चांगल्या विचारांचे उदात्तीकरण करु नये. इतर धर्मीयांबाबतही आदर बाळगावा. ज्याला सहिष्णूता म्हणता येईल. जो आदरणीय बाबासाहेबांनी बाळगला. तो इतिहास आहे आपला जुना. गतकाळात घडलेला. अन् तो जर इतिहास आठवायचा असेल तर हेही आठवावं की आज एकत्रीत झालेला आपलाच समाज, आपलाच समाज त्यावेळेस एकमेकांबाबत का भेदभाव पाळत होता? का बिरादरीतील पोटजातीत विटाळ होता? आपलीच माणसं. तरीही विटाळच पाळत होती एकमेकांबाबत आणि आजही रजस्वाचा विटाळ मानतांना दिसतो समाज. लपूनछपून देवांचीही पुजा करतो व त्याच देवांना वरवर शिव्याही हासडतो. हे कितपत बरोबर आहे. विचार करावा की आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना. परंतु चार बोटं आपल्याकडं असतात. तसाच हाही विचार करावा की आज आपण काय करीत आहोत? आज आपण असे बोलणारे खरंच सगळे एकत्रीत तरी आहोत काय? आज प्रत्येकाचा वेगवेगळा पक्ष आहे. जेवढे घरात व्यक्ती त्याहीपेक्षा कितीतरी जास्त पक्ष आपल्याच समाजात पाहायला मिळतात. यावरुन सांगायचं झाल्यास आपण राम, क्रिष्णाच्या अस्तित्वावर शंका करण्याऐवजी वा काल घडलेल्या विटाळाच्या घटना आठवण्याऐवजी ती स्तूपं आठवावीत. ती स्तूपं गेली कुठं? याचा शोध घ्यावा. त्यावर बोलावं. चिंतन करावं. तसंच आजचं राजकारणही एकत्र येवून करावं. घरातील व्यक्तीपरत्वे पक्ष ठेवू नये. ते स्तुपं सापडतीलही कदाचीत. जेव्हा देशाची सत्ता हातात येईल. परंतु त्यासाठी एकत्रीकरण गरजेचं. एकत्रीकरणानं कुत्रीही वाघाची शिकार करतात. तसंच आजच्या घडत असलेल्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे. काल मनुस्मृतीत लिहिल्याप्रमाणे तिचं बाबासाहेबांनी दहन केल्यावरही आजही महिलांवर अत्याचार होतात. अस्पृश्यांवर अत्याचार होतात. मग कुठं जातो समाज? समाजाला काय फक्त बोलण्याचंच काम येतं? नाही ना. मग एकत्रीत व्हावं आणि त्याच अत्याचाराचा सामना करावा की शत्रूला धडकी भरेल. जो बोले सो निहाल तोच सत श्री अकाल. परंतु त्यावेळेस एकत्रीत येणं आठवत नाही?
विशेष बाब ही की प्रत्येकाच्या मनात आजही बहुमोल विचार असतात. परंतु आपण त्याचा वापर करीत नाही. उलट जो करतो त्याला टोमणे मारत बसतो. आपण आपल्या बहुमोल विचारांची देवाणघेवाण न करता. जे विचार समाजाच्या अतिशय उपयोगी पडतात वा पडू शकतात. आपण आपले विचार चांगले बनवावेत. सडके बनवू नयेत. कारण जगाला व देशाला सडक्या विचारांची गरज नाही. ते कुजून कधीतरी संपतातच. चांगले विचार टिकून राहतात यात शंका नाही. सृष्टीलाही चांगल्याच विचारांची गरज आहे."
कमल विचार करीत होता. वाढत्या वयाबरोबर त्याचेही विचार प्रगल्भ बनले होते. त्याला वाटत होतं की आर्य हे भारतातीलच असावेत. परंतु त्या विचारावर भारतातील लोकांचं एकमत नव्हतं. त्यामुळं हाही इतिहास खरा असेल काय? असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला होता. त्याबाबतीत तो म्हणत असे,
"भारतातच नव्हे तर हिंदुस्थानात सर्वात पुर्वी वैदिक धर्म स्थापन झाला होता. ज्याला आज हिंदू हे नाव होतं. जो धर्म आर्यांनी स्थापन केला. म्हणतात की जे आर्य भारतातील नसून विदेशातील होते. ते खैबर खिंडीमार्गानं आले. ज्याला काही पुरावे नाहीत. परंतु याबाबतीत महत्वाचं सांगायचं झाल्यास आर्य भारतातीलच मुळ रहिवाशी असून ते विदेशी नसावेत. हाही एक इतिहासच. हा इतिहास खरा असू शकतो काय?"
लोकं हा इतिहास मानत नव्हते. काही लोकांनी याबाबत पुस्तका लिहिल्या होत्या. त्यात आर्यांचं बरंच वर्णन लिहिलं होतं. त्यात काही जणांनी लिहून ठेवलं होतं की आर्य विदेशातील. त्यामुळंच आर्य हे विदेशातून आले असावेत. हा अंदाज बांधला जात होता.
कमलला वाटत होतं की शत्रू आपलेच असतात. जे विनाकारण प्रत्यक्ष पुरावे न पाहता कोणत्याही गोष्टीवर विरोध करीत असतात. त्यांना निसर्गाचं चक्र कसं सुरु राहातं. निसर्गात कोणत्या घटना झाल्या. कोणत्या नाही. तशाच त्या घटना झाल्या की नाही याची कल्पना नसते. त्याचा पुरावाही नसतो त्यांच्याजवळ. तरीही आव आणत आपल्याला बरंच माहीत आहे याचा कांगावा करीत असतात.
कमलचं विचार करणं साहजीक होतं. तसं पाहता तो हिंदूधर्मीय असल्यानं व त्याला हिंदू त्याला जास्त आवडत असल्यानं त्याला आपल्या धर्माबाबत जास्त आत्मीयता वाटत होती. त्यातच त्याला इतिहास आठवत होता त्याच्या देशाचा की जो इतिहास त्याच्या देशात पुर्वी घडला होता व जो इतिहास त्याच्याच पुर्वजांनी सहन केला होता.
कमलनं नालंदाचा इतिहास वाचला होता. तिथं बौद्ध पुस्तका होत्या बऱ्याचशा. परंतु त्या मुस्लीम राज्यकर्त्याला खपल्या नाहीत व त्यातच त्यानं नालंदा विश्वविद्यापीठ जाळलं. त्यामुळंच त्याच्या हिंदू धर्मावर इतर कोणत्या धर्मियानं टिका केल्यास तो म्हणत असे,
"नालंदा असंच विद्यापीठ होतं की जे जगात प्रसिद्ध होतं. त्या ठिकाणी देश विदेशातील लोकं शिकायला यायचे. परंतु त्या विद्यापीठाला मुगलांची दृष्ट लागली व तुर्की शासक बख्तियार खिलजी यानं आग लावून टाकली होती त्या विद्यापीठाला. त्या विद्यापीठात एवढी पुस्तकं होती की त्या पुस्तकाला लावलेली आग तीन महिने विझली नव्हती. त्यानं त्या काळात बऱ्याचशा भिक्खू व धर्माचार्यांना मारुन टाकले होते. स्तुपांनाही नेस्तनाबूत केले होते.
नालंदा विद्यापीठाला आग लावण्यामागं कारण होतं. एकदा बख्तियार फारच आजारी पडला होता. त्याचा आजार बराच होत नव्हता. त्यानं हकीमाकडूनही उपचार केला. परंतु कोणत्याही हकीमानं त्याला सुधरवले नाही. ते पाहून तो नालंदा विद्यापीठात नोकरीला असलेल्या आचार्य राहूल श्रीभद्र यांच्याकडे गेला. त्यानं सांगीतलं की जर त्याचा आजार त्या आचार्यानं सुधरवला नाही तर तो त्यांची हत्या करेल. शेवटी इलाज नव्हता श्रीभद्रांकडे. त्यांनी एक कुराणाची पुस्तक घेतली. कुराण बख्तियारला फारच आवडायची. त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर औषधी लावली व ती कुराण प्रत त्याला वाचायला लावली.
बख्तियार हा कट्टर मुस्लीम धर्मरक्षक होता. त्यानं कुराणाची ती प्रत वाचली. ते वाचत असतांना प्रत्येक पानाला तो बोटाने स्पर्श करायचा व प्रत्येक वेळेस ते पान पालटवितांना एक बोट तोंडात टाकायचा. अशातच काही दिवसानंतर कुराण प्रत वाचून झाली. कारण त्या प्रतीला आजच्या काळातील होमिओपॅथिक औषधी लावली असेल. ती दररोज तोंडात गेली व तो बरा झाला.
बख्तियार बरा झाला. परंतु त्याला तमाम हिंदुस्थानातील लोकांनी केलेली औषधी आवडली नव्हती. म्हणूनच तो चिडला. कारण हिंदुस्थानातील लोकं ज्ञानी होते. त्यानंतर असं ज्ञानवर्धन पुस्तकांच्या माध्यमातून महिंदुस्थानातील लोकांना होवू नये. म्हणूनच त्यानं नालंदा विश्वविद्यालयाला आग लावून दिली. कारण तेथूनच तमाम ज्ञानी व विचारवंत पिढी घडत होती. जे बख्तियारला अडचणीचं वाटत होतं.
हिंदुस्थानात निर्माण झालेला सर्वात पुर्वीचा धर्म म्हणजे माणूसकीचा धर्म. त्यानंतर वैदिक धर्म निर्माण झाला. ज्याला आज हिंदू धर्म म्हटलं जातं. हिंदूचा मुळात अपभ्रंश हिन आणि दुबळे. मुगल हिंदूंना हिन व दुबळे समजायचे. तसं पाहता दुसऱ्या धर्माच्या लोकांकडून चांगल्या गोष्टीची अपेक्षाच करता येत नाही. ते नाव मुस्लीमांनी दिलं व आज आपण वापरतो. त्याचं कारण त्यात पुष्कळ मोठा स्वाभीमान दडलेला आहे. या शब्दांचा वापर करणे म्हणजेच समस्त लोकांना प्रेरणा देणे होय. हे पटलं येथीलच काही विचारवंतांना व पुढं धर्मासाठी वैदिक शब्द जावून हिंदू शब्द आला असावा. पुढे हाच शब्द वैदिक धर्माचा स्वाभीमान ठरला. कारण वैदिक धर्माला मुस्लीमांनी जाणूनबुजून हिंदू म्हटलं होतं. जो शब्द आजची ताकद ठरला आहे. त्यांना दाखवून देण्यासाठी तद्नंतर हिंदू हा शब्द विचारवंतांनी वापरायला सुरुवात केली.
सिद्धार्थ गौतम बुद्ध जेव्हा शुद्धोधन राजाच्या पोटी जन्मले. त्यावेळेसही धर्म अस्तित्वात होता व तो धर्म म्हणजे हाच वैदिक धर्म होय. ज्याला आज हिंदू नाव आहे. कारण त्यावेळेस वर्णव्यवस्था अस्तित्वात होती. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य, शुद्र. सिद्धार्थाचे वडील क्षत्रीय होते. सिद्धार्थ राजदरबारात अगदी सुखात होते. त्यांनी कधीच दुःख पाहिलं नव्हतं. म्हणून ते एकदा त्यांचे वडील घरी नसतांना नगराबाहेर पडले. त्यांनी त्या दिवशी तीन दुःखाचे प्रसंग पाहिले. ते दुःखाचे प्रसंग त्यांना आवडले नाही व त्यावर उपाय शोधण्यासाठी ते बाहेर पडले व त्यांनी बौद्ध धर्माचा शोध लावला व त्याच बौद्ध धर्माला सिद्धार्थांनी धम्म नाव दिलं."
कमलला तो इतिहास आठवला. तसा त्याच्या मनात आणखी एक विचार चमकून गेला. त्यावर तो म्हणत असे,
"आपला धर्म श्रेष्ठ म्हणण्याची परंपरा आजची नाही. समाजात अठरापगड जाती आधीपासूनच होत्या. सर्व जातींचा वापर करुन घेण्याची पद्धत आधीपासूनच होती. स्वार्थ असला की राजे गोड बोलत व स्वार्थ निसटला की हत्या करीत. दूत याचा अर्थ फार मोठा असायचा. तो केंद्रबिंदू असायचा. तो फार मोठे कार्य करायचा. जो केंद्रबिंदू दोन राज्यात सलोखा स्थापीत करुन ठेवायचा. आजचे लोकं त्याला चमच म्हणतात. महत्वपुर्ण बाब ही की आपल्याला धर्माचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे व वैदिक धर्म हा मुळात भारतात जन्मलेला धर्म आहे. इतर सर्व धर्माच्या पुर्वी. परंतु त्याचा जन्म भारतात जरी झालेला असला तरी त्याला भारतात जन्मलेला धर्म असं लोकं मानत नाहीत. कारण आर्य हे भारतातील नाहीत. ते बाहेरुन आले असाच इतिहास आपण आजपर्यंत शिकत आलेलो आहोत. ज्याला कोणतंच प्रमाण नाही. यावरुन विचार येतो की या देशात पुर्वी लोकं राहात नव्हते काय? राहात होते तर त्यांचा धर्म कोणता होता? याचा विचार कोणीही करीत नाहीत आणि सांगतात की इतर धर्म आधीचे. एक वैदिक सोडला तर इतर धर्म बौद्ध धम्माच्या नंतरचे. बौद्ध धम्म हा सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या जन्मानंतर. त्याआधी त्याचे वडील क्षत्रीय होते व क्षत्रीय हा एक वर्ण असून जो वर्ण वैदिक धर्मात लिखीत असलेल्या चार वर्णांपैकी एक होता. याचाच अर्थ असा की वैदिक धर्म हा इतर धर्माच्या आधीचा. असे म्हटल्यास आतिशयोक्ती ठरणार नाही. तसाच राम झाला व रामायण लिहिल्या गेलं. तसाच क्रिष्ण झाला व महाभारत हे महाकाव्ये लिहिल्या गेलं हा दावा फोल ठरत नाही. कारण ते घटक वैदिक संस्कृतीचे एक भागच आहेत."
आर्यांच्या अस्तित्वावरुन कमलच्या मनात संभ्रम होता. तो आर्याविषयी म्हणत असे,
"आर्य भारतात आले. त्यांनी आपला धर्म या देशातील तमाम द्रविड असलेल्या संस्कृतीवर वसवला असं काही लोकांचं म्हणणं. त्यालाही कुणी प्रमाण देत नाहीत. आर्य भारतात आले किंवा नाही हे कोणालाच माहीत नाही. कोणी म्हणतात उत्तरेकडील खैबर खिंडीतून आले. परंतु ते योग्य प्रमाण ठरत नाही. यावरुन आर्य कुठूनच आले नाही. ते याच देशातील होते ही शक्यता नाकारता येत नाही. तसाच या देशात सर्वात पुर्वी आर्यांनीच वैदिक धर्म जन्माला घातला. याचाच अर्थ असा की भारतात अस्तित्वात असलेला व पहिल्यांदा जन्म म्हणून निर्माण झालेला पहिला धर्म हा वैदिक असावा यात शंका नाही व यातही विरोधाभास आहे व प्रत्येकजण आपआपली मते मतांतरे मांडतात.
इंग्रज जेव्हा भारतात आले. त्यावेळेस त्यांनी येथील अभ्यास केला. अभ्यासाअंती त्यांना समजलं की या देशातील लोकांना आपापसात लढवत ठेवलं तरच आपल्याला यांच्यावर राज्य करता येईल. त्यांनी मुस्लीम व हिंदूत भांडणं लावली. शिख व मुस्लीमात भांडणं लावली. तसाच मुस्लीमांशी सलोखा ठेवला. कारण त्यांना मुस्लीमांची ताकद माहीत होती. शिवाय त्यांनी आर्य भारतीय नाहीत. ते बाहेरुन आलेले आहेत. असाच विचार पसरवला. कारण ते दुरदर्शी स्वभावाचे होते. याचाच अर्थ ज्या अखंड हिंदुस्थानात मुळचा असणारा हिंदू धर्म. ज्या हिंदू धर्मानं आपल्याच स्वतःच्या घरात संस्कार अबाधीत ठेवले. त्याच धर्माच्या इथे अस्तित्वात असण्यावरच प्रश्नचिन्हं निर्माण केलं. त्यातच त्यांनी हिंदू धर्मात असलेल्या तमाम जातीतील माणसांनाच आपापसात लढवून जातीय विष पेरलं. आजही तेच विष संपायचं नाव घेत नाही. हं, एक चूक नक्कीच झाली हिंदू धर्माची की ज्या चुकीनं हा धर्म निष्प्रभ ठरतो. ती चूक म्हणजे जातीय भेदभाव. आजच्या काळात ज्या जातींना अस्पृश्य जातीत टाकलं आहे ना. त्या सर्व जातींना मंदीर प्रवेश नव्हता व सर्व त्यांचे स्वातंत्र्याचे मार्ग बंद केले होते.
हिंदू धर्म...... हा धर्म आधीपासूनच संस्कारावर टिकला आहे. पारीवारीक संस्कार या धर्मात कुटकूट भरलेला दिसून येतो. आजही भावाभावांचे वाद इथं पाहायला मिळत असले तरी दुसऱ्या परक्या व्यक्तीनं आपल्या भावाला मारल्यास आपण बघ्यांची भुमिका घेत नाही. एवढे गुढ संस्कार पेरले आहेत हिंदू धर्मानं. या धर्मात पाषाणाला देव म्हणून पुजलं जातं. त्यातही देव दिसतो या धर्मातील लोकांना. लोकांनी चांगलं वागावं. आपल्यात सुधारणा करावी. म्हणूनच या पाषाण रुपी देवाचं पुजन. ही अंधश्रद्धा असली तरी एक अतिशय चांगली गोष्ट आहे. चांगल्या सुधारणा करण्यासाठी. या धर्माचा आराध्य देव प्रभू श्रीराम असून ज्यानं आपल्या आईवडीलांचा मान राखला. त्याच्या पत्नीनं पत्नीवाचं कर्तव्य पालन करुन दाखवलं. त्यांच्या भाऊ लक्ष्मणानं मनात किंचीतही लोभ न बाळगता राज्य त्याग केला. तो वनवासात गेला व आपला भाऊ राम व आपली वहिनी सीता यांची सेवा केली. दुसरा भाऊ भरतानं राजगादीवर पादत्राणे ठेवून चौदा वर्ष राज्य सांभाळलं. तेही स्वार्थ मनात न बाळगता. तसेच शत्रुघ्नानं मनात किंतू परंतु न ठेवता राज्याचं रक्षण केलं. ज्या रामायणातून भावाभावांनी आपले संबंध चांगले ठेवावे ही शिकवण मिळते. तशीच माता सावत्र का असेना, आईचं ऐकायचं अशी शिकवण रामकाळ देतो. विशेष म्हणजे वहिणीचे पावित्र्यपण जोपासणारा दिर वर्ग, पतीची बदनामी होवू नये म्हणून स्वतःच वनात जाणारी सीता. प्रजाहितदक्षपणा दाखवते. मात्र त्यांच्यावर कलंक लावणारे त्यावेळेसही राज्यात होते आणि आजही आहेत. रामराज्य आदर्श असंच राज्य होतं आणि त्यांचा वैदिक धर्मही आदर्श संस्कारांनं भरलेला परीपुर्ण धर्म होता. नियमांचं काटेकोर पालन होत होतं त्या राज्यात. प्रसंगी अतिथीचं ऐकतांना वा प्रजेचं ऐकतांना रामानं कर्तव्याचं पालन केलं. कर्तव्यात मजबुरीनं का असेना, आपला भाऊ लक्ष्मण. तो कर्तव्यात चुकला म्हणून आपल्या भावालाही सोडलं नाही. हेच हिंदू धर्माचं आदर्श तत्वज्ञान. जो धर्म तमाम हिंदूंना हवाहवासा वाटतो. याऊलट इतर धर्म. त्या धर्मांचा इतिहास तेवढा खास नाही.
मुगल शासकांचा याबाबतीत इतिहास रक्तरंजीत आहे. मग तो कोणत्याही देशातील का असेना, क्रांती, खून, कापाकापी आणि दहशत याच गोष्टींना प्राधान्य दिला जातो त्यांच्यात. मुगल शासकात सातव्या शतकापासून अनेक शासक झालेत. प्रत्येकांनी राजगादीवर बसण्यासाठी कापाकापीच केल्या. औरंगजेबाला बादशाहा बनण्याचा स्वार्थ असल्यानं बादशाहा बनण्यापूर्वी आपल्या तीनही भावाची हत्या केली. त्यानंतर आपल्या वडीलांना कैदेत टाकलं. शिवाय आलमवीर बनण्यासाठी कित्येक शासकांच्या कत्तली केल्या. कित्येक मंदीरं पाडली. स्तुपंही पाडली. त्यानंतर त्याच्या वारसांनीही तेच केलं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आजही धर्माधर्मात तेढ आहे. प्रत्येक धर्मातच उच्चनीचतेचा भेदभाव आहे. प्रत्येक धर्मात दोन दोन पंथ आहेत व प्रत्येक पंथ दुसऱ्या पंथाचा तिरस्कार करतो. असं असतांना त्याच धर्मात काहीही घडो. आपल्याला काय करायचं. असा विचार करुन जगणं अति महत्वाचं. परंतु आजची मंडळी दुसऱ्याच धर्माकडे बोट दाखवून टिका करतांना दिसतात. कोणी जर ताशेरे ओढणाऱ्या माणसांकडे बोट दाखवत असतील व त्यावर एखाद्यानं टिका केली तर त्याला चमच म्हटलं जातं. परंतु तोच व्यक्ती ताशेरे ओढणाऱ्या व्यक्तीमत्वाचे वाभाडे काढतो. कारण त्याला अस्मिता असते व आपल्या धर्माबाबत तेवढंच प्रेमही.
महत्वाचं म्हणजे लोकं आपल्या धर्माकडे पाहात नाहीत व विचारही करीत नाहीत व समजूनही घेत नाहीत की याआधी आमचे पुर्वज याच धर्मात होते. याच धर्मातील लोकांनी आमच्या पुर्वजांनाही आपल्या धर्मात राहू दिलं. शिवाय लोकांना जगविण्याचा मार्गही शोधू दिला. ज्यातून आमचाच नाही तर आमच्या येणाऱ्या कित्येक पिढ्यांचा उद्धार झाला."
कमलनं जशा इतिहासाच्या पुस्तका वाचल्या. तसंतसं त्याला सत्य काय आहे हे माहीत झालं व तो जगासमोर ते तत्वज्ञान मांडू लागला. परंतु त्या तत्वज्ञानानं पोट थोडं भरणार होतं. शिवाय तो एक महान तत्ववेत्ता नव्हता की लोकं त्याचं ऐकतील. त्यामुळंच त्याला सिद्धार्थ गौतमासारखी प्राप्त झालेली माहिती की आर्य भारतातीलच रहिवाशी होते. ती माहिती त्याला प्रसवता येत नव्हती. अशातच तो काळा जी आर आला होता की ज्या जी आरनं चालकांच्या चालविण्याचीच हत्या केली होती. चालकाच्या हातून अपघात झाल्यास सात लाख दंड व दहा वर्षाची शिक्षा होती.
कमलनं आता आपली नोकरी सोडली होती. त्याला वाटत होतं की कोणाजवळ आहेत एवढे पैसे की ज्याच्या हातानं अपघात झाल्यास त्याला तेवढी रक्कम भरता येईल. अपघात तर अनवधानानंच होतात. कधी आपला दोष असतो तर कधी दुसऱ्याच व्यक्तीचा. परंतु भोगमान तर आपल्यालाच. मग कोण करेल एवढी तुटपुंज्या वेतनात नोकरी. त्यापेक्षा दुसरं काम करावं. असाच विचार करुन त्यानं चालकाची नोकरी सोडली होती. विचार करुन की आता यापुढे कोणाचीच गाडी चालवायची नाही. आता तो पुर्णपणे घरी बसला होता.
कमलनं चालकाची नोकरी सोडली खरी. परंतु आता त्याला दुसरं काम मिळत नव्हतं. तो घरीच बसला होता. घरी बायकापोरांचा प्रश्न होता. ते उपाशी राहात होते. कारण घरी कमावता तो एकच होता. धंदा लावायचा कोणता तर जवळ पैसा नव्हता. मुलंही लहान होती की ज्यामुळे त्याची पत्नीही कामाला जावू शकत नव्हती. अशातच हाल हाल होत होते घरचे. तसा तो विचार करु लागला की काय करावं. कसं जगावं व आपल्या परीवाराला कसं जगवावं?
तो कामासाठी दिवसभर वणवण भटकत होता. परंतु हाताला काम नव्हतं. समोर बायकापोरं यायची. दिमाख चिडचिडही जायचा. अशातच त्यानं पाहिलं. त्याची लहान मुलगी त्याच्या पत्नीसमोर रडत होती व रडतांना आपल्या आईला ती आपल्या आईला खाऊसाठी पैसे मागत होती. परंतु आईजवळ पैसे राहिल तेव्हा ना. तिलाही चीड येत होती व त्या रागाच्या भरात तिनं आपल्या त्या मुलीच्या कानपटात हाणून दिली.
ते दृश्य. ते दृश्य सहन होणारं नव्हतं. ते दृश्य पाहिलं कमलनं व म्हणाला,
"कशाला मारलंया तिले?"
"दिसत नाय का तुमाले? पोरगी पैसे मांगते. जोवर खाले पैसे नाईत. मंग ईले कोठून देवू? समजत नाई का ईले."
ते त्याच्या पत्नीचे उत्तर. त्यावर त्यानं आपली मुलगी रोमाला जवळ बोलावलं. तिचे अश्रू पुसले. तिला शांत केलं व पुन्हा विचार करु लागला. विचार करु लागला की काम कोणतं करता येईल.
कामाचा विचार करीत असतांना त्याच्या समोर ध्येय होतं ते आपल्या पत्नीचं, आपलं व आपल्या लेकरांचं पोट पालन करणं. त्याच ध्येयानं पिसाळलेल्या कमल विचार करीत असतांना अचानक त्याला त्याचं बालपण आठवलं व आठवलं की आपण लहान असतांना साडी वापरायचो आणि नाचायचो. गणपतीत गावात तमाशा पाहिला की बस त्याचे प्रयोग जवळपास पंधरा दिवस चालायचे.
कमलला जसं ते त्याचं बालपण आठवलं. तसंच आठवलं की आपण साडी घालून, तशीच त्या तृतीयपंथीयांची वेषभुषा करुन वा तृतीयपंथीय असल्याचा आव आणून भिक्षा मागीतली तर....... तर आपलं पोटंही भरता येईल. आपल्या पत्नीच्या पोटालाही अन्न देता येईल व आपल्या मुलांनाही पोषता येईल व त्यांच्या शिक्षण पाण्याच्या व कपड्यालत्याच्या साऱ्या सोई पुरवता येईल. असा विचार करुन त्यानं स्वतः तृतीयपंथीय बनून भिक्षा मागायचं ठरवलं. त्यातच त्यानं जीही आजपर्यंत इतिहासाची पुस्तकं वाचली होती. त्यातून जे सत्य गवसलं होतं. ते सत्य व त्यातून निर्माण झालेलं ज्ञान, जे तो जगाला देवू पाहात होता. त्या प्राप्त झालेल्या ज्ञानाची हत्या झाली होती.

************************************************