पान २
आता सगळ्यांचे पालक गेले होते , त्यामुळे आम्ही रूम मध्ये बसलो होतो . सगळेच एकमेकांना नवीन होते . त्यामुळे हळू हळू नाव विचारण्यापासून ओळख करून घेण्याचं काम चालू होत . तेवढ्यात एक घंटा झाली . वरच्या मजल्या वरच्या सगळ्या मुली खाली येताना आम्हाला दिसल्या . त्यांना विचारल्यावर समजलं , रोज संध्याकाळी ६.३० ला प्रार्थनेची बेल होते , आम्ही लगेच त्यांच्या मागे गेलो . नवीन होतो , म्हणून काहीच माहित नव्हतं ना !
सगळ्या मुली एका लाईन मध्ये बसल्या होत्या . आम्ही पण मागे बसणार तेवढ्यात आमच्या रेक्टर ( राजगिरे बाई ) म्हणाल्या , ' मागे बसलेल्या मुलींनी पुढे एक लाईन करा चला उठा ' आता वाटलं एवढ्या पुढ कशाला बोलवलं असेल ? पण , काय करणार ? गेलो पुढे बसायला . प्रार्थना झाली , आता बाईंनी सगळ्यांना एक एक करून पुढे सगळ्या मुलींसमोर येऊन आपली ओळख करून द्यायला सांगितली . आम्ही त्यानंतर जेवायला मेस मध्ये गेलो . त्या दिवशी जेवायला बटाट्याची भाजी होती . मला वाटलं , रोजच बटाटा असतो इथे जेवायला . त्यामुळे , निदान माझ जेवणाचं एक टेन्शन कमी झालं होत . कारण , मला बटाटा ही एकच भाजी आवडत होती . अरे ! हो एक सांगायच राहिलच , जेव्हा आमच्या रेक्टर बाईंनी मला माझ नाव सगळ्या मुलींसमोर सांगायला लावल तेव्हा , मला इतकी भीती वाटली होती ना काय सांगू ? समोर उभं राहून बोलायची माझी पहिलीच वेळ होती . मी कधीच समोर उभं राहून बोलायची Daring केली नव्हती . खूप भीती वाटायची मला . मी सगळ्यांच्या समोर उभी राहिले होते . तेव्हा मला फक्त माझं नाव , गाव , इयत्ता एवढेच सांगायचे होते पण , तेवढे २ मि . सुद्धा मला खूप अवघड गेले . असं झाल होत , कधी सगळं सांगून परत खाली बसेल .
आमच जेवण झाल्यावर बाईंनी आम्हाला T.V दाखवला . नंतर रात्री दुधाची बेल झाली आणि आम्ही सगळे दूध प्यायला गेलो . मग रूम आलो आता झोपणार होतो . पण , झोप येत नव्हती . घरची आठवण येत होती . त्या रात्री एक वाजेपर्यंत मी आणि सई रडत होतो . बाकी सगळे झोपले होते . रात्री झोप न लागल्यामुळे आम्ही पहाटेच उठलो , अंघोळीसाठी नंबर लावला , सगळं आवरलं . ६.४५ ला सकाळी दुधाची बेल झाली . आता हॉस्टेल मध्ये कुठे काय आहे , हे सगळ थोडं माहिती झालं होत . आम्ही दूध प्यायला गेलो . तेव्हा भलीमोठी लाईन लागली होती दूध घेण्यासाठी . तेव्हा कविता ताई सगळ्यांना दूध वाटप करायच्या . आधी त्यांच नाव माहित नव्हतं . पण , नंतर सगळ्या सोबत ओळख झाली . नंतर आमच्याकडे मोकळा वेळ होता मग , आम्ही दप्तर आवरलं . आमची शाळा तेव्हा दुपारी १२.१० ला भरायची . नवीन युनिफॉर्म , नवीन साहित्य यामुळे मस्तच वाटत होत . १०.३० ला सकाळी जेवणाची बेल झाली .
आम्ही जेवायला गेलो तेव्हा ताटात भोपळ्याची भाजी वाढली होती . मला तर फक्त बटाट्याची भाजी आवडायची . तेव्हा मला ती भाजी पाहूनच रडायला आल . पण , काय करणार ? ते घर नव्हतं , हॉस्टेल होत . तिथे लाड करायला मम्मी पप्पा नव्हते , शिस्त लावायला रेक्टर बाई होत्या . त्यामुळे मी मनाची तयारी करून बळचं भाजी खाल्ली त्या दिवशी . जेवण झाल , रूममध्ये आल्यावर पटकन नवीन शूज - सॉक्स घातले . N3 असं नाव होत आमच्या रूमच . आता निघालो मग सगळे शाळेत . शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे लवकर जायचं ठरल होत आमच . हॉस्टेल च्या पायऱ्या उतरल्यावर लक्षात आलं , आपला चष्मा रूम मधेच राहिला . लहान असतानाच मला चष्मा लागला होता . मी कधी कोणत्या भाज्या खायचे नाही , खूप T.V बघायचे , काहीही झालं तरी रडायचे म्हणून तुला चष्मा लागलाय असं मम्मी मला म्हणायची . मी चष्मा आणायला रूममध्ये जाणार , तेवढ्यात शाळेची घंटा झाली आणि राष्ट्रगीत सुरु झाल .
पुढचं पान लवकरच.....