पान १
माझी चौथीची वार्षिक परीक्षा संपली आणि मी आता पाचवी इयत्तेत जाणार म्हणून , मी खूप आनंदी होते . मला पप्पांनी आधी सांगितल्याप्रमाणे मी यावर्षी म्हणजे
पाचवीला नवीन शाळेत जाणार आहे , हे मला आधीच माहित होते . पप्पांनी सांगितल्याप्रमाणे आणि तसेच ठरल्याप्रमाणे माझे Admission त्या नवीन शाळेत केले
आणि ती शाळा म्हणजे पुण्यातील लक्ष्मी रोड वरील Huzurpaga ( हुजूरपागा ) . ही पुण्यातील मोठी नामांकित मुलींची शाळा आहे . त्यामुळे , आपण पुण्यात
मोठ्या शाळेत शिकणार आहोत या आनंदाला काही सीमाच उरलेली नव्हती आणि Hostel म्हणल्यावर तर मला एवढच माहित होत की , तिथं आपली सगळी काम
आपल्यालाच करावी लागतात . म्हणजे अगदी आपल्या जेवणाचं ताट ते आपले कपडे पण आपल्यालाच धुवावे लागतात असं काही . पण , मी ते मनावर घेतलं नाही .
आता मात्र सुट्टी संपत आली होती . माझी नव्या शाळेत जाण्याची तयारी सुरु झाली होती . मला पप्पांनी सर्व वस्तू आणि शाळेचं साहित्य नवीन घेतलं होत . घरात
बाकी किरकोळ तयारी चालू होतीच , उलट जसे जसे दिवस जवळ येत होते तशी कामाची तयारी पण वेगात वाट बघत होते , तो Hostel ला जाण्याचा दिवस आला .
आम्ही सर्वजण माझ्या शाळेत ४-४.३० ( चार-साडेचार ) च्या दरम्यान पोहोचलो होतो . मम्मीने मला सगळं आवरून दिलं . सर्वजण आता मला Hostel वर सोडून
पुन्हा घरी निघण्याच्या तयारीत होते . मम्मी मात्र , मला सूचना देत होती , " भांडू नको , नीट राहा , रडू नकोस , अभ्यास कर " आणि ती निघून गेली . मुलींच
Hostel असल्यामुळे फक्त मुली आणि त्यांची आई यांनाच तिथे परवानगी होती म्हणून, माझे पप्पा बाहेरच थांबले होते . मला अजून पण आठवतंय , मम्मी निघून
गेल्यावर मी माझ्या बेडवर बसले होते . कदाचित माझी मम्मी मला सोडून गेलीये हे मला जाणवलं नव्हतं . पण एकं पाच मिनिटांनी माझी मावशी परत माझ्याकडे
आली आणि मला घट्ट मिठी मारली आणि निघून गेली . पण , मला तेव्हाही काही समजलं नाही . आजूबाजूला सर्व मुलींचे पालक त्यांना आवरून देत होते , माझ्या
मम्मी सारख्याच त्यांनाही सूचना देत होते . नंतर नंतर सगळ्यांचे पालक निघून गेले . मला अचानक माझ्या मम्मी पप्पांची आठवण झाली . Hostel ची इमारत
माझ्यासाठी नवीन असल्यामुळे मला ते लवकर सापडतही नव्हते . शेवटी मला एक जिना दिसला आणि मी त्या जिन्याने खाली गेले . बाकीच्या खूप पालकांच्या
गाड्या समोरच्या Graund वर होत्या आणि तिथेच खूप मुलींचे पालक असल्यामुळे मी माझ्या मम्मी पप्पांना पण तिथेच शोधत होते . पण , ते कुठेच दिसत नव्हते .
मी खूप शोधलं नंतर माझ्या लक्षात आलं की , इतर मुलींच्या पालकांप्रमाणे तेही मला सोडून निघून गेले . मी तेव्हा खूप रडले होते . आपल्या जवळची
आपली माणसं आपल्याला अचानक जेव्हा सोडून जातात . तेव्हा , जे वाटत ते खूप वाईट असत .
आता माझ्या मनाला मीच समजवत होते , " इथून पुढे तुझ्याजवळ मम्मी - पप्पा नाहीत . आता सगळं तुझं तुलाच करायचं आहे . " मला सगळ्यांची खूप आठवण येत होती .
मी आता एकटीच आहे असं मला सारखं वाटत होत . मी खूप रडत होते असं वाटत होत की ,आता लगेच घरी जावं . मी माझ्या बेडवर बसले होते . आता या नवीन ठिकाणी आपण
कोणासोबत तरी ओळख केली पाहिजे असं मला वाटलं कारणं आता मला इथंच राहायचं होतं . म्हणून मी माझ्या रूम मधल्या मुलींसोबत ओळख करून घेतली . त्या पहिल्या दिवशी
आम्ही सात जणी होतो . मी , सई , श्रद्धा , श्वेता , धनश्री , अंकिता आणि साक्षी .
पुढचं पान लवकरच...